१५ नोव्हेंबर २०१९

भारत - पाकिस्तानदरम्यान कर्तारपूर कॉरिडोर खुला करण्यात आला आहे. ही ती जागा आहे जिथे गुरुनानकांनी आपल्या आयुष्याची शेवटची 18 वर्षं घालवली होती.


✍गुरुनानकांच्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांच्या दृष्टीने त्यांचं जन्मस्थान ननकानासाहिब (पाकिस्तान), सुलतानपूर लोधी (भारत) आणि कर्तारपूर या शहरांना विशेष महत्त्व आहे.

✍ननकाना साहिब
गुरुनानकांचं हे जन्मस्थळ आज पाकिस्तानात आहे.
✍सुलतानपूर लोधी
गुरुनानकांच्या आयुष्यातलं हे दुसरं महत्त्वाचं ठिकाण असं म्हणता येईल. भारतातल्या या जागी त्यांनी जवळपास 14-15 वर्षं घालवली. त्यांच्या वास्तव्याशी संबंध असलेल्या 5 महत्त्वाच्या जागा इथे आहेत.
✍बेबे नानकी यांचं घर
इथे गुरूनानक यांची बहीण आपले पती जय रामजी यांच्यासोबत राहत असे. इथली पाणपोई आजही सुरू आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर गुरू ग्रंथ साहिब ठेवण्यात आलाय आणि तिथे एक संग्रहालयही आहे.
✍गुरुद्वारा हट साहिब
नानकी यांचे पती जय रामजी यांनी सुलतानपूर लोधीमधल्या एका गुरुद्वारामध्ये गुरुनानक देव यांची नियुक्ती केली होती. त्याच ठिकाणी आज हा गुरुद्वारा हट साहिब आहे.
✍गुरुद्वारा बेर साहिब
या ठिकाणी गुरुनानक ध्यानधारणा करायचे. इथे असलेलं एक बोराचं झाड गुरूनानक यांनी लावलं असल्याचं शीख समुदायाची धारणा आहे.
✍गुरुद्वारा संत घाट
ना हिंदू - ना मुस्लिम हा संदेश गुरुनानक यांनी इथेच दिला होता.
✍सुलतानपूर लोधी नावाची ही जागा भारतातल्या पंजाबमधील कपूरथलाजवळ आहे. इथल्या नवाब दौलत लोधी यांच्याकडे गुरूनानकांनी कामही केल्याचं मानलं जातं. त्यांच्या मुलांचा जन्मही इथेच झाला.
✍कर्तारपूर गुरुद्वारा
कर्तारपूर साहिब पाकिस्तानात असलं तरी ते भारतापासून फक्त साडेचार किलोमीटरवर आहे.
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक 1522मध्ये कर्तारपूरला आले होते, असं मानलं जातं. आपल्या आयुष्याची शेवटची 18 वर्षं त्यांनी इथेच घालवली.

✍प्रकाश पर्व म्हणजे काय आणि कसं साजरं केलं जातं?
गुरुनानक यांचा जन्मदिवस शीख समुदायात 'प्रकाश पर्व' म्हणून साजरा केला जातो.

राफेलप्रकरणी फेरविचार याचिकांवर आज निर्णय

🔰फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकारला  निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निकाल  जाहीर करणार आहे.

🔰दसॉल्ट कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्याच्या करारात पूर्वीच्या कराराच्या तुलनेत जास्त रक्कम खर्च झाली असून सगळी निर्णय प्रक्रियाच सदोष होती असा  आरोप काँग्रेससह विरोधकांनी केला होता.

🔰फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची निर्णय प्रक्रिया सदोष होती तसेच पूर्वीच्या करारापेक्षा आताच्या करारातच जास्त पैसा खर्च करण्यात आला असा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला होता.

🔰१४ डिसेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमानांच्या ५८ हजार कोटी रुपयांच्या करारातील गैर प्रकारांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. त्यावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी व वकील-कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी निकालावर फेरविचार करण्याची मागणी एका याचिकेतून केली होती. याशिवाय वकील विनीत धंधा, आपचे वकील संजय सिंह यांनीही फेरविचार याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर सरन्यायाधीश  रंजन गोगोई, न्या. एस.के.कौल, न्या. के.एम जोसेफ हे गुरुवारी निकाल देणार आहेत.

नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी मिहिर शहा समितीची स्थापना...

🔰नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्याच्या उद्देशाने जल सुधारणांचे विश्लेषण आणि त्याचा मसुदा तयार करण्यासाठी भारत सरकारने मिहिर शहा यांच्या नेतृत्वात दहा सदस्य असलेली एक उच्चस्तरीय समिती नेमली. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने 11 नोव्हेंबर 2019 रोजी याबद्दल घोषणा केली.

🔴समिती व त्याची कार्ये :-

🔰मिहिर शहा हे पूर्वीच्या नियोजन आयोगाचे (आताचे NITI आयोग) माजी सदस्य आणि एक जल तज्ज्ञ आहेत. समितीत इतर सदस्यांमध्ये माजी जलसंपदा सचिव शशी शेखर आणि केंद्रीय भूजल मंडळाचे माजी अध्यक्ष ए. बी. पंड्या यांच्यासह दहा लोक आहेत.

🔰केंद्रीय जल आयोग (CWC) आणि केंद्रीय भूजल मंडळ (CGWB) या दोनही संस्थांच्या कार्यांचा आढावा घेण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले आहे.

🔰समिती या दोनही मंडळांचे लक्ष नसलेल्या मुद्द्यांना ओळखून त्याबाबत असलेल्या तफावतीचे विश्लेषण करणार आहे.

🔴धोरणाबाबत..

🔰भारत सरकारचे केंद्रीय जलसंपदा मंत्रालय राष्ट्रीय जल धोरण तयार करीत असते. धोरण उपलब्ध जलसंपत्तीचे नियोजन आणि त्यांचे संवर्धन आणि कार्यक्षमपणे वापर अश्या मुद्द्यांना लक्षात घेवून तयार केले जाते. सप्टेंबर 1987 मध्ये भारताने पहिले राष्ट्रीय जल धोरण अवलंबले होते. पुढे सन 2002 आणि नंतर सन 2012 मध्ये त्याचे पुनरावलोकन करण्यात आले आणि त्यात सुधारणा करण्यात आली.

🔰राष्ट्रीय जल धोरण वैश्विक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या ‘हवामानातले बदल विषयक राष्ट्रीय कृती योजना’ (NAPCC) याच्या अंतर्गत चालविलेल्या आठ मोहिमांपैकी एक आहे. पाण्याचा वापर 20 टक्क्यांनी कार्यक्षमपणे वाढविले हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

या आहेत जगातील 10 श्रीमंत महिला


1) लिलिएन बेटनकोर्ट :

जगातील सर्वात प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधनांचं  उत्पादन करणाऱ्या लॅारिअल कंपनीच्या मालक असलेल्या लिलिएन यांचं उत्पन्न 44.3 अब्ज डॅालर इतकं होतं.

2) एलिस वॅाल्टन :

अमेरिकेतील प्रसिद्ध वॅालमार्ट स्टोअरच्या मालक असलेल्या एलिस यांचं उत्पन्न 33.8 अब्ज डॅालर इतकं आहे.

3) जॅकलिन मार्स :

अमेरिकेतील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार म्हणून मार्स यांची ओळख आहे. मार्स यांचं उत्पन्न 27 अब्ज डॅालर इतकं आहे.

4) मारिया फ्रँका फिसोलो :

मारिया या इटलीमध्ये राहाणारे अब्जाधीश आहेत. युरोपमधीलच नाही तर जगभरातील सर्वात प्रसिद्ध फेरेरो चॅाकलेट्स आणि मिठाई कंपनीच्या त्या मालक आहेत. त्यांचं उत्पन्न 25.2 अब्ज डॅालर आहे.

5) सुसॅन क्लेटन :

जर्मनीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सुसॅन यांची ओळख आहे. बीएमडब्लू आणि अल्टाना या नामवंत कंपनीच्या त्या गुंतवणूकदार आहेत. त्यांचं उत्पन्न 20.4 अब्ज डॅालर आहे.

6) लॅारेन पॅावेल जॅाब्स :

सामाजिक संस्थांच्या लॅारेन कार्यकर्त्या आहेत. अ‍ॅपल कंपनीचे मालक स्टिव्ह जॅाब्स यांच्या लॅारेन पत्नी आहेत. त्यांच उत्पन्न 20 अब्ज डॅालर आहे.

7) जिना रिनेहार्ट :

ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेल्या जिना हॅंकॅाक या कंपनीच्या मालक आहेत. त्यांचं उत्पन्न 15 अब्ज डॅालर आहे.

8) अ‍ॅबगेल जॅान्सन :

अ‍ॅबगेल जॅान्सन या अमेरिकेच्या बिझनेस वुमन आहेत. फिडेलिटी या कंपनीच्या त्या मालक असून त्यांच उत्पन्न 14.4 अब्ज डॅालर इतकं आहे.

9) आयरिस फॅान्टबोना :

आयरिस यांचं स्थान जगातील श्रीमंतांच्या यादीत 101 क्रमांकावर असून लॅटिन अमेरिकेतील श्रीमंतांमध्ये त्या पाचव्या स्थानावर आहेत. त्यांचं उत्पन्न 13.7 अब्ज डॅालर इतकं आहे.

10) बिट हेसिटर : 

जर्मनीच्या अब्जाधीशांपैकी एक असलेल्या बिट किराणा माल सवलतीत मिळवून देणाऱ्या 'अल्दि' या सुपरमार्केटच्या मालक आहेत. त्यांचे उत्पन्न 13.6 अब्ज डॅालर इतके आहे.

१४ नोव्हेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘साप’ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळयासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील
    शक्तीला काय म्हणतात ?

   1) अभिधा    2) लक्षणा    3) व्यंजना    4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 1

2) ‘चाल’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

   1) चाळ    2) पैंजण      3) वाईट चाल    4) हल्ला

उत्तर :- 4

3) ‘सुगम’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) सोपा    2) दुर्गम      3) सुलभ      4) सहज

उत्तर :- 2

4) वाक्यसमूहासाठी म्हण शोधा. –

हेमाने आपल्या अंगचा दोष नाहीसा होण्यासारखा नाही हे बघून त्याचा होईल तितका उपयोग
     करून घ्यायचे ठरवले.

   1) इकडे आड तिकडे विहीर      2) आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी
   3) फुटका डोळा काजळाने साजरा करावा    4) अंथरुण पाहून पाय पसरावे

उत्तर :- 3

5) ‘थक्क होणे’ या शब्दाचा वाक्यात योग्य पध्दतीने उपयोग करा.

   1) भारतीय स्त्रियांची विलक्षण बुध्दी पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो आहे.
   2) भारतीय पुरषांच्या बुध्दीला थकवा आला आहे.
   3) विद्यार्थी शिकून शिकून थक्क होतात.
   4) विद्यार्थीनी खेळून खेळून थक्क होतात.

उत्तर :- 1

6) “ज्यांना प्रामुख्याने बुध्दीचा वापर करावा लागतो असे लोक ...................”
     या शब्दसमूहासाठी पुढील योग्य शब्द निवडा.

   1) माथाडी    2) बुध्दिमांद्य    3) बुध्दिजीवी    4) कष्टकरी

उत्तर :- 3

7) पुढील चार पर्यायातून शुध्द शब्द ओळखा.

   1) आवतीभोवती  2) अवतीभवती    3) अवतीभोवती    4) औतीभोवती
उत्तर :- 1

8) मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत  ?
   1) 48      2) 34      3) 36      4) 12

उत्तर :- 4

9) ‘जगज्जननी’ या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?

   1) जगज्ज + जनी  2) जग + अननी    3) जगत् + जननी    4) जग + जननी

उत्तर :- 3

10) ‘उदार’ या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात ?

   1) य, ता    2) ई, त्व      3) ई, पणा    4) य, ई

उत्तर :- 1

भावनगर येथे जगातील पहिल्या सीएनजी पोर्ट टर्मिनलसाठी गुजरात सरकारने मान्यता दिली

गुजरात सरकारने नुकतीच भावनगरमधील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) टर्मिनलला 1,900 कोटी प्रस्तावित गुंतवणूकीस मान्यता दिली.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बोर्डाने मंजूर केलेली ही सुविधा जगातील पहिले सीएनजी पोर्ट टर्मिनल असेल, अशी राज्य सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रिटनचे मुख्यालय फॉरेसाइट ग्रुप आणि मुंबईस्थित पद्मनाभ मफतलाल ग्रुप संयुक्तपणे विकसित करणार आहेत.

यावर्षी जानेवारीत झालेल्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये भावनगर येथे बंदर टर्मिनल उभारण्यासाठी गुजरात मेरीटाईम बोर्डाने (जीएमबी) दूरदर्शी समूहाबरोबर सामंजस्य करार केला होता.

१३ नोव्हेंबर २०१९

दाल तलाव ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ घोषित केला जाणार

👉जम्मू व काश्मीर सरकारने श्रीनगरचे प्रसिद्ध दाल तलाव आणि त्याच्याजवळच्या आसपासच्या भागांना इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) म्हणून घोषित करण्यासाठी दहा सदस्यांची समिती गठीत केली आहे.

👉दाल तलाव "लेक ऑफ फ्लॉवर्स", "ज्वेल इन द क्राऊन ऑफ कश्मीर" किंवा "श्रीनगर्स ज्वेल" या नावानेही ओळखले जाते. यात झेलम नदीचे पाणी साठते.

👉2017 साली केलेल्या अभ्यासानुसार, प्रदूषण आणि अतिक्रमणांमुळे दाल तलाव त्याच्या मूळ क्षेत्रफळापासून म्हणजेच 22 चौरस किलोमीटर क्षेत्रापासून सुमारे 10 चौरस किलोमीटरपर्यंत कमी झाले आहे.

👉तलावाची क्षमता सुमारे 40 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आणि पाण्याची गुणवत्ता खालावली आहे.

👉तलावाच्या आरोग्यास धोका तयार झाल्याने तिथले पर्यावरण दूषित झाले आहे. हे स्थळ पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. तिथे 800 ते 900 हाऊसबोटी देखील आहेत.

प्रश्नसंच 13/11/2019

📍 कोणते प्रयोगांसाठी वापरले जाणारे NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान आहे?

(A) ग्लेन X-55
(B) मॅकडोनाल्ड Y-57
(C) मॅक्सवेल X-55✅✅
(D) मॅक्डोवेल-55

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणी ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले?

(A) केंटो मोमोटा✅✅
(B) चौउ तिएन-चेन
(C) साई प्रणीथ
(D) पी. कश्यप

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ऑस्ट्रेलियात खेळवल्या गेलेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?

(A) फ्रान्स✅✅
(B) स्वित्झर्लंड
(C) स्पेन
(D) कॅनडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) _ येथे आयोजित करण्यात आले.

(A) नवी दिल्ली
(B) अलाहाबाद
(C) कोलकाता✅✅
(D) पुणे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या खेळाडूने 14 व्या आशियाई अजिंक्यपद या स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावले?

(A) एश्वर्य प्रतापसिंग तोमर
(B) किम जोंग्युन✅✅
(C) झोंघाओ झाओ
(D) सुमा शिरूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणी चॅलेन्जर टेनिस स्पर्धेच्या दुहेरी प्रकाराचे विजेतेपद पटकावले?

(A) पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन✅✅
(B) अँड्र्यू गोरन्सन आणि ख्रिस्तोफर रुंगकट
(C) जेम्स व्हाइट आणि विजय सुंदर प्रशांत
(D) डेव्हिड ऑन्टाँगो आणि जॉन इस्नर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगातील सर्वाधिक महागड्या इमारती

जगात बर्‍याच सुंदर इमारती आहेत. या इमारती कोट्यवधी रुपयांच्या आहेत. चला जाणून घेऊया जगातील पाच सर्वात महागड्या इमारती कोणत्या आहेत?

5⃣ जगातील पाचव्या सर्वात महागड्या इमारतीचे नाव दि कॉस्मोपॉलिटन आहे. अमेरिकेत असलेल्या या इमारतीचे मूल्य 312.04 अब्ज रुपये आहे.

4⃣ Apple चे मुख्यालय चौथे सर्वात महागडे आहे. Apple पार्क म्हणून ओळखल्या जाणार्‍या या इमारतीची किंमत 354.60 अब्ज रुपये आहे.

3⃣ तिसरी सर्वात महागडी इमारत सिंगापूरमधील मरीन बे सँड्सची आहे. याची किंमत 425.52 अब्ज रुपये आहे.

2⃣ जगातील दुसर्‍या सर्वात महागड्या इमारतीतील मक्कामध्ये स्थित अराबाज अल बेट टॉवर्स आहे. या टॉवर्सची किंमत 1134.72 अब्ज रुपये आहे.

1⃣ जगातील सर्वात महागड्या इमारतींमध्ये सौदी अरेबियाच्या मक्कामधील मस्जिद अल-हारम पहिल्या क्रमांकावर आहे. स्टिस्टाच्या मते, त्याचे मूल्य 7092 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) व्याकरणातील पुरुष ही संज्ञा लौकिक जीवनातील पुरुष या व्यक्तीशी संबंधित असून तृतीय पुरुषाच्या बाबतीत तिन्ही लिंगे
     येतात.

   1) या विधानाचा उत्तरार्ध चूक आहे      2) हे संपूर्ण विधान चूक आहे
   3) या विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे    4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

उत्तर :- 3

2) लाटणे – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) लाटण    2) लाटण्या    3) लाटणी    4) लाटणा

उत्तर :- 3

3) योग्य जोडया जुळवा.

   a) व्दितीया    अ) चा, ची, चे
   b) तृतीया    ब) ने, ए, शी
   c) पंचमी    क) स, ला, ते
   d) षष्ठी      ड) ऊन, हुन

   1) a – अ, b - ब, c - क, d – ड    2) a – ड, b - क, c - ब, d – अ
   3) a – क, b - ब, c - ड, d – अ    4) a – क, b - अ, c - ब, d – ड   

उत्तर :- 3

4) ‘सर्कशीत काम करणा-या प्राण्यांचे हाल मला बघवत नाहीत’ – वाक्यप्रकार ओळखा.

   1) केवल    2) मिश्र      3) गौण      4) संयुक्त

उत्तर :- 1

5) ‘मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो’ – या केवल वाक्याचे पृथ्थकरण करा.

   1) उद्देश्य – पक्षी, उद्देश्य विस्तार – मोठा, क्रियापद – बांधतो, कर्म – आपलले सुंदर घरटे, विधेय विस्तार – उंच झाडावर.

   2) उद्देश्य – मोठा, उद्देश्य विस्तार – पक्षी, क्रियापद – बांधतो, कर्म – आपलले सुंदर घरटे, विधेय विस्तार – उंच झाडावर.

   3) उद्देश्य – घरटे, उद्देश्य विस्तार – मोठा पक्षी, क्रियापद – बांधतो, कर्म –सुंदर, विधेय विस्तार – उंच झाडावर.

   4) उद्देश्य – उंच , उद्देश्य विस्तार – मोठा पक्षी , क्रियापद – बांधतो, कर्म – सुंदर घरटे, विधेय विस्तार – उंच झाडावर.

उत्तर :- 1

6) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) गाय गुराख्याकडून बांधली जाते      2) त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
   3) शिक्षक मुलांना शिकवितात      4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे

उत्तर :- 1

7) खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) कर्मधारय      2) तत्पुरुष   
   3) मध्यमपदलोपी    4) बहुव्रीही

उत्तर :- 3

8) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.

   1) -      2) ?     
   3) !      4) ”

उत्तर :- 3

9) उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा .................. हा अलंकार होतो.

   1) श्लेष      2) आपन्हुती   
   3) यमक      4) दृष्टांत

उत्तर :- 2

10) ‘तद्भव’ शब्द निवडा.

   1) ओठ    2) आठव   
   3) आयुष्य    4) आठशे

उत्तर :- 1

मानवी हक्क संरक्षण कायदा : 1993

प्रारंभिक:

(या कायद्यामध्ये एकूण 43 कलम आहेत.)

1. संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :

या अधिनियमाला मानवी हक्क संरक्षण कायदा असे संबोधण्यात येईल.

याचा विस्तार जम्मू-काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर असेल.

तो दिनांक 28 सप्टेंबर 1993 रोजी अंमलात आल्याचे मानण्यात येईल.

2. व्याख्या :

सशस्त्र दले याचा अर्थ नौदल, भुदल, हवाईदल आणि त्यामध्ये संघातील इतर कोणत्याही सशस्त्र दलाचा समावेश होतो.

अध्यक्ष म्हणजे आयोगाच्या किंवा राज्य आयोगाच्या अध्यक्ष्यस्थानी असलेली व्यक्ती होय.

आयोग म्हणजे कलम 3 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोग होय.

मानवी हक्क म्हणजे व्यक्तीचे जीवनस्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा यासंबधीचे संविधानाने हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये समाविष्ट असलेले आणि भारतातील न्यायालयांना अमलबजावणी करता येईल असे हक्क होय.

मानवी हक्क न्यायालये म्हणजे कलम 30 नुसार करण्यात आलेली मानवी हक्क न्यायालये होय.

आंतरराष्ट्रीय करार म्हणजे नागरी व राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करार जे 16 डिसेंबर,1966 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये स्वीकारण्यात आलेले आहेत; आणि केंद्र सरकार अधिसूचनेव्दारे निर्दिष्ट करेल त्याप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेकडून स्वीकृत करण्यात येईल अशी संधी किंवा करार होय.

सदस्य म्हणजे आयोगाचा किंवा राज्य आयोगाचा सदस्य होय.

अल्पसंख्यांकसाठी राष्ट्रीय आयोग म्हणजे अल्पसंख्याकासाठी राष्ट्रीय आयोग कायदा 1992 च्या कलम 3 नुसार स्थापन करण्यात आलेला अल्पसंख्याकासाठी राष्ट्रीय आयोग असा होतो.

अनुसूचित जातीकरीता राष्ट्रीय आयोग म्हणजे राज्य घटनेच्या कलम 338 मध्ये निर्देशित करण्यात आलेल्या अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग, असा आहे.

अनुसूचित जमातीकरीता राष्ट्रीय आयोग म्हणजे राज्य घटनेच्या कलम 338 (क) मध्ये निर्देशित केलेल्या अनुसूचित जमातींकरिता राष्ट्रीय आयोग असा आहे.

महिलांसाठी राष्ट्रीय आयोग म्हणजे महिलांसाठी राष्ट्रीय आयोग कायदा 1990 च्या कलम 3 नुसार स्थापन करण्यात आलेला राष्ट्रीय महिला आयोग असा होतो.

अधिसूचना म्हणजे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना होय.

विहित म्हणजे या कायद्याद्वारे करण्यात आलेल्या नियमांव्दारे विहित करण्यात आलेले होय.

लोकसेवक या संज्ञेस भारतीय दंडसंहितेच्या (1860 ई ) कलम 21 मध्ये जो अर्थ दिला आहे तोच अर्थ असेल.

राज्य आयोग म्हणजे कलम 21 नुसार स्थापण्यात आलेला राज्य मानवी हक्क आयोग होय.

जम्मू व काश्मीर राज्यात अस्तित्वात नसलेल्या कोणत्याही कायद्याचा निर्देश या कायद्यात करण्यात आला असेल तर त्याचा अर्थ त्या राज्यात या कायद्याशी अनुरूप असा कोणताही कायदा अस्तित्त्वात असेल तर त्याचा निर्देश आहे असा समजण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग

✍महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. सी आर सी म्हणजेच बालहक्क परिषदेत निर्देषित मानांकना बरहुकूम वर्तणूकीकरिता आयोग विविध उपक्रम राबवितो. यामध्ये खाली दिलेल्या काही प्रमाण मानांकनांचा समावेश होतो:

✍बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे.

✍बालकांसंदर्भातील कृती मध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल.

✍बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे.

✍प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जिवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचाही, बालकाच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाचा, बुध्दिमत्ता आणि  शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे.

✍बालकाला आराम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा तसेच खेळणे आणि मनोरंजक कृती मध्ये रमण्याचा अधिकार आहे.

✍प्रत्येक बालकाचा योग्य त्या प्रमाणात शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, मनोबल आणि सामाजिक विकास होईल अशा प्रमाण जीवनमानाचा अधिकार आहे.

✍कोणत्याही बालकाला बेकायदेशीर हस्तातंरण, अपहरण, विक्री किंवा वाहतूक इत्यादी उद्देशाने किंवा कोणत्याही प्रकारे हानि होता कामा नये.

✍बालकाच्या दृष्टीकोनाला योग्य तो सन्मान द्यायला हवा.

✍बालकाला त्याच्या  मनाविरुध्द त्याच्या पालकांपासून विभक्त करू नये, अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा असे विभक्त करणे बालकाच्या उत्तम हीतासाठी साठी आवश्यक असते.

✍कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकाला राज्याकडून विशेष संरक्षण आणि मदत मिळण्याचा हक्क असतो.

✍बालकांची काळजी घेणे किंवा संरक्षण करणे यासाठी जबाबदार संस्था, सेवा आणि सुविधांनी संस्थापित मानाकंनाना धरून राहण्याची निश्चिती करावी.

✍मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांना त्यांचा सन्मान राखणाऱ्या परिस्थिती, स्वावलंबंत्वाचा पुरस्कार आणि समाजामध्ये सक्रिय सहभागाने आयुष्याचा संपूर्ण आनंद घेता यावा आणि चांगले जीवन जगता यावे.

💕आर्थिक शोषणापासून बालक संरक्षित आहेत.

✍मुलांनी अंमली पदार्थ आणि मनावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांचे बेकायदेशीर सेवन करता कामा नये.

✍बालकांना सर्व प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक हिंसा, इजा किंवा गैरवर्तन, दुर्लक्ष किंवा निष्काळजीत्व,  दुर्वतन किंवा शोषण, लैंगिक गैरवर्तनासकट सर्व बाबींपासून संरक्षण आहे.

✍प्रत्येक मुलं सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित आहे.

✍कोणत्याही मुलाला बेकायदेशीरपणे किंवा स्वैरपणे यातना किंवा इतर क्रूर वर्तणूक, अमानवीय किंवा मानहानिकारक वर्तणूक किंवा शिक्षा किंवा स्वातंत्र्य मूकायला लागता कामा नये.

✍कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष, शोषण किंवा गैरवर्तणूक, यातना पिडीत मुलांचे शारीरिक आणि मानसिक हानि भरून येण्यासाठी आणि त्यांचा समाजात समावेश होण्याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे केल्या गेल्या पाहिजेत.

✍सैन्य हमल्या बाधित मुलांना आंतरराष्ट्रीय मानवता कायदा लागू आहे.

✍आरोपित, आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करतांना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे.

✍कोणत्याही मुलाच्या खाजगी जीवनात मनमानीपणे किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप, त्याच्या/तिच्या घरावर किंवा त्याच्या/तिच्या सन्मान आणि नावलौकीकावर आघात होता कामा नये.

RBI ने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली!

📍 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे

👉 चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एक नोटही छापली नाही, माहिती अधिकारात माहिती समोर

💁‍♂ वर्ष आणि नोटांची छपाई :

● 2016-17मध्ये : 354.29 कोटी
● 2017-18 मध्ये : 11.15 कोटी
● 2018-19मध्ये : 4.66 कोटी

💫 चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...