३१ ऑक्टोबर २०१९

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 2/11/2019

1. BVSC : YEHX :: MRCP : ?

 NJXK

 LKXM

 NIXK

 OIVM

उत्तर : NIXK

 

2. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?

 पेटी

 शेत

 हॉल

 खोली

उत्तर :शेत

 

3. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?

 ब्रोमीन

 पारा

 तांबे

 चांदी

उत्तर :ब्रोमीन

 

4. 98,72,?,32,18,8

 42

 46

 50

 54

उत्तर :50

 

5. मराठी भाषेची वर्णसंख्या किती आहे?

 35

 20

 48

 56

उत्तर :48

 

6. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवार कोण बसले?

 राजाराम

 संभाजी महाराज

 बाजीराव

 माधवराव

उत्तर :संभाजी महाराज

 

7. पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण किती टक्के असते?

 30.84

 20.94

 18.94

 21.94

उत्तर :20.94

 

8. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत?

 10

 11

 12

 9

उत्तर :12

 

 

9. भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधीत आहे?

 केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदार्‍या

 राज्यभाषा

 पंचायत राज्य

 नगरपालिका

उत्तर :राज्यभाषा

 

10. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांच्या समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरूस्तीन्वये करण्यात आला?

 41 व्या

 42 व्या

 44 व्या

 50 व्या

उत्तर :42 व्या

 

11. भारतामध्ये किती किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

 5

 7

 8

 9

उत्तर :7

 

12. मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते?

 बालाजीराव

 नारायणराव

 बाजीराव

 सवाई माधवराव

उत्तर :नारायणराव

 

13. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे?

 अनुच्छेद 19

 अनुच्छेद 14

 अनुच्छेद 22

 अनुच्छेद 21

उत्तर :अनुच्छेद 21

 

14. साखर हे —– आहे?

 प्रोटीन

 अॅमिनो अॅसिड

 व्हिटॅमिन

 ओलीगोसॅकॅराईडस  

उत्तर :ओलीगोसॅकॅराईडस 

 

15. व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार उदभवतो?

 रातआंधळेपणा

 मुडदूस

 अॅनेमिया

 बेरीबेरी

उत्तर :मुडदूस

 

16. पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती?

 201

 204

 206

 210

उत्तर :206

 

17. महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणते?

 935

 948

 958

 यापैकी नाही

उत्तर :यापैकी नाही

 

18. पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली?

 1 नोव्हेंबर 1966

 1 डिसेंबर 1965

 1 मे 1960

 15 ऑगस्ट 1947

उत्तर :1 नोव्हेंबर 1966

 

19. द्रोणाचार्य पुरस्कार केव्हापासून देण्यास सुरुवात झाली?

 1991

 1985

 1954

 1960

उत्तर :1985

 

20. नुकतेच भारताचे पंतप्रधान यांनी खालीलपैकी कोणत्या देशाला भेट दिली?

 चीन

 नेपाळ

 भुतान

 बांग्लादेश

उत्तर :भुतान

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 1/11/2019

1. 0.01+1.01+1.001+0.0001=?

 2.0211

 2.0111

 2.1111

 1.0211

उत्तर : 2.0211

 

2. पुष्पाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले, तिचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेच्या वयाच्या सव्वा पट (1.25) आहे तर तिचे लागच्या वेळी वय किती वर्षे होते?

 25 वर्षे

 36 वर्षे

 28 वर्ष

 24 वर्षे

उत्तर :24 वर्षे

 

3. एका पदार्थाची 1/4 (एक चतुर्थाश) किलोग्रामची किमत रुपये 0.60 इतकी आहे तर 200 ग्रॅमची किंमत किती?

 42 पैसे

 50 पैसे

 48 पैसे

 40 पैसे

उत्तर :48 पैसे

 

4. अतुल आज रोजी त्यांच्या काकापेक्षा 30 वर्षे लहान आहे, 5 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4 (एक चतुर्थाश) होते, तर अतुलच्या काकाचे 5 वर्षांनंतरचे वय किती असेल?

 50 वर्षे

 60 वर्षे

 70 वर्षे

 40 वर्षे

उत्तर :50 वर्षे

 

5. 5000 रूपयावर दोन वर्षासाठी 8 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती?

 5842 रुपये

 832 रुपये

 1832 रुपये

 1932 रुपये

उत्तर :832 रुपये

 

6. एका कारला 300 कि.मी. अंतर कापण्यासाठी 5 तास लागतात. त्या कारला तेच अंतर पूर्वीच्या वेळेच्या 4/5 पट वेळेत कापण्यासाठी किती वेग ठेवावा लागेल?

 60 कि.मी. प्रति तास

 75 कि.मी. प्रति तास

 85 कि.मी. प्रति तास

 70 कि.मी. प्रति तास

उत्तर :75 कि.मी. प्रति तास

 

7. लक्ष्मणला 6 कि.मी. अंतर जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात, तर त्याच वेग किती आहे?

 5  कि.मी. प्रति तास

 8 कि.मी. प्रति तास

 10 कि.मी. प्रति तास

 9 कि.मी. प्रति तास  

उत्तर :8 कि.मी. प्रति तास

 

8. एक डझन पेनची किंमत 540 रुपये आहे, तर 319 पेनची किंमत किती?

 14,355 रुपये

 15,455 रुपये

 14,555 रुपये

 14,655 रुपये

उत्तर :14,355 रुपये

 

9. 35 चे 60 टक्के करून येणारी संख्या ही 400 च्या किती टक्के आहे?

 5.25

 10.5

 12.5

 6

उत्तर :5.25

 

10. ए हा एक रेडियो बी ला दहा टक्के नाफ्याने विकतो. ब तो रेडियो सी याला पाच टक्के नफ्याने विकतो. जर सी याला तो रेडियो घेण्यासाठी 462 रुपये द्यावे लागले असतील, तर ए ने रेडियो किती रुपयात खरेदी केला होता?

 420

 400

 380

 500

उत्तर :400

11. 1/2 चे 3/4 टक्के म्हणजे किती?

 0.00075

 0.00375

 0.00475

 0.00275

उत्तर :0.00375

 

12. अडीच वर्षांनंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दलासह एकूण 720 रुपये मिळाले तर मुद्दल किती?

 540 रुपये

 640 रुपये

 600 रुपये

 700 रुपये

उत्तर :640 रुपये

 

13. एका प्लॉटची लांबी 40 फुट व रुंदी 50 फुट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

 20 चौरस फुट

 2000 चौरस फुट

 200 चौरस फुट

 2000 चौरस फुट

उत्तर :2000 चौरस फुट

 

14. एक इंच म्हणजे किती मिलीमीटर?

 28 मि.मि.

 25.4 मि.मि.

 26.4 मि.मि.

 30.48 मि.मि.

उत्तर :25.4 मि.मि.

 

15. 55556666+8888+2222-130000000+600=?

 14439488

 15539488

 14339488

 14539488

उत्तर :14439488

 

16. (500-33)(500+33)=?

 247911

 248911

 246911

 248811

उत्तर :248911

 

17. घडांचा द्राक्षांची जो संबंध आहे तोच संबंध व्होडकाचा खालीलपैकी कशाशी आहे?

 सफरचंद

 बटाटा

 बार्ली

 ओट

उत्तर :बटाटा

 

18. इंग्लंड : अटलांटिक महासागर :: ग्रीनलँड : ?

 पॅसिफिक महासागर

 अटलांटिक महासागर

 आर्क्टिक महासागर

 अंटार्क्टिक महासागर

उत्तर :आर्क्टिक महासागर

 

19. MASTER चा OCUVGT जो संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?

 ETKPB

 DTKPI

 DTKPB

 KTKPI

उत्तर :DTKPI

 

20. NUMBER : UNBMRE :: GHOSTS : ?

 HGOSTS

 HOGSTS

 HGSOST

 HGSOTS

उत्तर :HGSOST

‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल

भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144 वी जयंती.

देशभरात त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत खास कार्यक्रमाचं आयोयन करण्यात आले आहे. यंदा देखील त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी...

● पटेलांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यपूर्ण असेच होते. चाणक्याची मुत्सद्दी नीती त्यांच्याजवळ होती. आपल्या कामावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य होते. ते खंबीर प्रशासक होते.

● स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान म्हणून देखील जगाला त्यांची ओळख आहे.

● पटेल यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून आदराने गौरविले गेले आहे.

● एक निष्णात वकील म्हणून त्यांचा अल्पावधीतच लौकिक झाला. याचबरोबरच त्यांनी अहमदाबाद पालिकेची निवडणूक लढवत राजकारण प्रवेश केला.

● महात्मा गांधी यांनी हजारो शेतकऱ्यांसह सत्याग्रहाची चळवळ सुरू करत याचे नेतृत्व त्यांनी सरदार पटेल यांच्याकडे सोपविले. यातूनच सरदार पटेल यांचे नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उदयास आले.

● तत्कालीन सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत–पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली होती.

● भारत देशाला एकसंध ठेवण्यात मोलाची कामगिरी करणार्‍या या गुजरातच्या सुपुत्राला भारतीय स्त्रियांनी 'सरदार' अशी उपाधी बहाल केली आहे.

● 31 ऑक्टोंबर 1875 रोजी जन्मलेल्या पटेलांनी भारतमातेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची केली. 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जम्मू-काश्मीर व लडाख आजपासून केंद्रशासित

◾️आज, ३१ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत.

◾️सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन राज्य म्हणून अस्तित्वात येणार आहेत.

◾️त्यामुळे देशातील
📌केंद्रशासित प्रदेशांची संख्या ९ होणार असून
📌राज्यांची संख्या २९वरून २८ होणार आहे.

◾️५ ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्य लडाख आणि जम्मू काश्मीर असे स्वतंत्र होणार असल्याची घोषणा करण्यात आली. दोन्ही सभागृहात जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक २०१९ ला मंजुरी मिळाली आणि राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी देखील केली.

◾️आता ३१ ऑक्टोबर पासून जम्मू काश्मीर आणि लडाख प्रशासकीयरित्या केंद्र सरकारच्या अख्त्यारित असतील.

✍ हे बदल होणार ‼️

◾️राज्यातील वेगळी राज्यघटना संपुष्टात येणार

◾️काश्मीरचा स्वतंत्र झेंडाही रद्द होणार. अर्थात जम्मू आणि काश्मीरमध्ये तिरंगा फडकावला जाईल

◾️ काश्मीरमधील लोकांचे दुहेरी नागरिकत्व संपुष्टात येणार आहे.

◾️कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत केवळ त्याच राज्यातील नागरिकांना मतदानाचा अधिकार होता. इतर राज्यांमधील नागरिक तिथे मतदानही करू शकत नाही आणि निवडणुकीत उमेदवार म्हणूनही उभे राहू शकत नाहीत.

◾️केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयानंतर भारतातील कुणीही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन मतदानही करू शकतो आणि उमेदवारही होऊ शकतो.

◾️ हे दोन्ही प्रदेश केंद्रशासित असले तरी जम्मू काश्मीरमध्येच विधानसभा असेल. लडाखमध्ये विधानसभा नसणार आहे

◾️ जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत विधानसभेच्या एकूण ८७ जागा आहेत. यापैकी
📌४६ जागा काश्मीर,

📌३७ जागा जम्मू आणि लडाखमध्ये विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत.

◾️ विधानसभा क्षेत्र निर्धारित करताना तेथील लोकसंख्या आणि मतदारांचा टक्का लक्षात घेतला जातो.

◾️ त्यामुळे जम्मूतील विधानसभेच्या मतदारसंघाची संख्या वाढेल.

◾️तर काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघ कमी होतील

◾️ न्यायव्यवस्थेत काहीही बदल होणार नाही.

◾️ श्रीनगर उच्च न्यायालय आणि जम्मू-काश्मीर खंडपीठ पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहील. पंजाब आणि हरयाणासाठी चंदीगडचं जे महत्त्व आहे, तसचं या दोन राज्यांचं असेल

◾️ केंद्राचे सर्व कायदे लागू होणार 

◾️भारतीय संसद यापुढे काश्मीरसाठीही सर्वोच्च असेल.

◾️भारताची राज्य घटना या प्रदेशाला पूर्णपणे लागू होईल. यानंतर जम्मू-काश्मीरची वेगळी राज्यघटना नसेल

◾️लडाख याचे विभाजन होऊन तो केंद्रशासित प्रदेश बनला. मात्र इथे विधानसभा असणार नाही. इथला प्रशासकीय कारभार चंदीगडप्रमाणे चालवला जाईल

◾️ जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार कायदा, सीजीए लागू होणार 

◾️भारतीयांना काश्मीरमधील संपत्ती खरेदी करण्याचा आणि काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे

◾️ राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेपही करता येणार आहे

◾️ कोणताही भारतीय नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी करू शकतो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली

1) खालील माहितीचा विचार करा.
   अ) संयुक्त राष्ट्रसंघटनेतर्फे दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.
   ब) 2018 च्या या दिनाचा विषय Know your status हा होता.
   क) युनोतर्फे 1988 पासून हा दिवस साजरा केला जातो.
  1) अ, ब, क खरे    2) अ खरे    3) अ, ब खरे      4) अ, क खरे
उत्तर :- 1

   2) जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक हवा प्रदूषणासंबंधीच्या आकडेवारीनुसार (pm-2.5) जगातील
          सर्वाधिक प्रदूषीत पहिल्या  20 शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे.
   1) 13        2) 14      3) 15        4) 16
उत्तर :- 2

3) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पहिली स्वतंत्र्य महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली.
   1) मिताली राज    2) इंद्रा नुई    3) अरुधंती भट्टाचार्य    4) मंदीरा बेदी
उत्तर :- 2

4) खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.
   अ) धोंडव केशव कर्वे    ब) पांडूरंग वामन काणे    क) विनोबा भावे   
   ड) डॉ. बि.आर. आंबेडकर  इ) जे.आर.डी. टाटा    ई) लता मंगेशकर   
   उ) पं. भीमसेन जोशी    ऊ) सचिन तेंडूलकर
  1) इ सोडून सर्व    2) वरील सर्व    3) ब सोडून सर्व      4) उ सोडून सर्व
उत्तर :- 2

5) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संघटीत क्षेत्रातील रोजगार निर्मितीत पहिला क्रमांक कोणत्या
     राज्याचा आहे.
   1) महाराष्ट्र      2) तामिळनाडू    3) गुजरात      4) हरियाणा
उत्तर :- 1

10 चालुघडामोडी सराव प्रश्न उत्तरे 31/10/2019

1) ‘युरोपियन ओपन 2019’ ही स्पर्धा कुणी जिंकली?
उत्तर : अँडी मरे

2) आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटने (ISSA)ची स्थापना कोणत्या साली झाली?
उत्तर : सन 1927

3) भारतीय बँक संघाचे (IBA) अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : रजनीश कुमार

4) ‘एशियन ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक पटकावले?
उत्तर : रोनाल्डो सिंग

5) ‘स्टार्टअप शिखर परिषद’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर : नवी दिल्ली

6) ‘नॉन-अलाइन्ड मूव्हमेंट (NAM) शिखर परिषद 2019’ कुठे भरणार आहे?
उत्तर : बाकू

7) वित्तीय कृती दलाच्या (FATF) ‘ग्रे लिस्ट’ मधून कोणत्या देशाला हटविण्यात आले आहे?
उत्तर : श्रीलंका

8) सुलतान ऑफ जोहोर चषक या पुरुष हॉकी स्पर्धेत कोणत्या संघाने भारताला पराभूत केले?
उत्तर : ग्रेट ब्रिटन

9) फेब्रुवारी 2020 मध्ये ‘डिफेन्स एक्सपो’ कुठे भरवण्यात येणार आहे?
उत्तर : लखनऊ

10) सॅंटियागो शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर : चिली

अंकगणित वर्ग आणि वर्गमूळ

(65)2 = 4225 संख्येच्या शेवटी जर 5 असेल तर वर्गसंख्येच्या शेवटी 25 येतात व दशक स्थानाचा अंक व त्या पुढचा अंक यांच्या गुणाकारांची संख्या लिहावी.

उदा. (65)2 =4225 = (शेवटी 25 लिहून 6 च्या पुढचा अंक 7 घेऊन 6 × 7 = 42 लिहावे).

 दोन अंकी कोणत्याही संख्येचा वर्ग काढताना :-

उदा. (42)2 =(a+b)2 =a2 +2ab + b2 या सूत्राचा वापर करून कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येतो.

(42)2

यात a=4,b=2

 (42)2 = (40+2)2=1600+2 (40×2)+4

=1600+160+4 = 1764   किंवा

22 = 4 एककस्थानी 4 लिहा.

2(4×2) = 16 चे 6 हातचा 1,

42 चा वर्ग 16   16+1 = 17, याप्रमाणे सूत्रानुसार

    :: √1764 = 42

 लक्षात ठेवा :

1) 1 व 9 च्या वर्गाच्या एककस्थानी 1 असते.

2) 3 व 8 च्या वर्गाच्या एककस्थानी 4 असते.

3) 3 व 7 च्या वर्गाच्या एककस्थानी 9 असते.

4) 4 व 6 च्या वर्गाच्या एककस्थानी 6 असते.

5) 5 च्या वर्गाच्या एकक स्थानी 5 असते.

उदा.√5329 =73 या उदाहरणात एककस्थानी 9 हा अंक आहे. म्हणून वर्ग मुळात 3 किंवा 7 हे अंक येतील.

53 ही संख्या 7 च्या वर्गापेक्षा मोठी आहे. म्हणून वर्गमूळ 73 किंवा 79 असले पाहिजे.

परंतु 70 चा वर्ग = 4900 व 80 चा वर्ग = 6400 आहे. 5329 ही संख्या 4900 ला जवळची, म्हणून 73 हे वर्गमूळ किंवा (75)2= 5625 यापेक्षा 5329 हे लहान आहे.

म्हणून √5329 = 73

नमूना पहिला –

उदा.

खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?

0.196

19.6

1.96

0.00196

उत्तर : 1.96

ल्कृप्ती :-

पूर्ण वर्गासाठी अपूर्णांकातील स्थळांचे स्थान सम पाहिजे.

नमूना दूसरा-

उदा.

खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल ?

**304

*50

7*38

*765

ल्कृप्ती :-

कोणत्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1,4,5,6,9,0, हे अंक येतात व संख्येच्या एकक स्थानी 5 असेल. तर संख्येचा दशकस्थानी 2 अंक येतो व संख्येच्या एकेक स्थानी 0 असेल; तर संख्येत शेवटी 2 च्या पटीत शून्य येतात.

नमूना तिसरा –

उदा.

√(26)2-(10)2 =?

4

16

24

48

उत्तर : 24

ल्कृप्ती :-

a2-b2 = (a+b)(a-b) √(26+10)×(26-10)

= √36×16 = 6×4 = 24

नमूना चौथा –

उदा.

81×64=5184, ::√5184=?

62

72

68

78

उत्तर : 72

सूत्र :-

√a2 × b2 = a×b  यासूत्राचा वापर √5184 = √81×64

= √92 × 82 = 9×8

= 72

नमूना पाचवा –

उदा.

√0.0289 =?

1.7

0.17

17

0.017

उत्तर : 0.17

नियम- वर्गमुळात दशांशस्थळे निम्मी होतात

:: √289=17

:: √2.89=1.7  आणि :: √0.0289=0.17

:: √0.000289=0.017

नमूना सहावा-

उदा.

√1.44/x=0.1;  :: x=?

1.44

12

144

14.4

उत्तर : 144

स्पष्टीकरण :-

√1.44/x

=0.1 1.44/x

=(0.1)2 1.44/x

=(0.01)    

:: x= 1.44/0.01=144  

नमूना सातवा –

उदा.  

√21+√10+√36=?

6

2

5

7

उत्तर : 5

स्पष्टीकरण :-

√21+√10+√36

= √21+√10+6

=√21+√16

= √21+4

= √25

=5

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 31/10/2019

1. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात इटीयाडोह व गोंदिया तालुक्यात आंभोरा येथे काय आहे?

 भारत संशोधन केंद्र

 मॅग्रीज शुद्धीकरण

 मत्सबीज प्रजनन केंद्र

 तांदूळाची बाजारपेठ

उत्तर :मत्सबीज प्रजनन केंद्र

 2. 30 जानेवारी 2013 रोजी चांदिपूर (ओडिशा) येथे कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली?

 के-15

 पृथ्वी-2

 पिनाका

 अग्नी-1

उत्तर :पिनाका

 3. राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार —— यांना आहे.

 लोकसभा सभापती

 पंतप्रधान

 राष्ट्रपती

 यापैकी नाही

उत्तर :राष्ट्रपती

 4. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर —– आहे.

 माऊंट एव्हरेस्ट

 कांचन गंगा

 नंदा देवी

 के-2 (गॉडवीन ऑस्टन)

उत्तर :के-2 (गॉडवीन ऑस्टन)

 5. असहकार आंदोलन —– यांनी जाहीर केले.

 लो.टिळक

 पं.नेहरू

 म.गांधी

 डॉ. आंबेडकर

उत्तर :म.गांधी

 6. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?

 कोतवाल

 ग्रामसेवक

 सरपंच

 पोलिस पाटील

उत्तर :सरपंच

 7. पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख —– असतो.

 ग्रामसेवक

 गटविकास अधिकारी

 मुख्याधिकारी

 विस्तार अधिकारी

उत्तर :गटविकास अधिकारी

 8. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50 टक्के आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी —— या जिल्ह्यातून झाली?

 सांगली

 पुणे

 सोलापूर

 कोल्हापूर

उत्तर :पुणे

 9. 28 जानेवारी 2013 रोजी कोणत्या देशाने अवकाशात जिवंत माकड पाठविले?

 इराक

 इराण

 जपान

 रशिया

उत्तर :इराण

 10. 23 मे 2013 रोजी केंद्रीय मंत्रीमंडळाने कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा (Claasical Language) दर्जा प्रदान केला आहे?

 मराठी

 मल्याळम

 तमिळ

 कन्नड

उत्तर :मल्याळम

 11. संस्कृती एक्सप्रेस ही —– यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे?

 स्वामी विवेकानंद

 रविंद्रनाथ टागोर

 स्वामी दयानंद सरस्वती

 भगतसिंग

उत्तर :रविंद्रनाथ टागोर

 12. संगणकाच्या मेमरीची क्षमता —– या एककात मोजली जाते.

 बीट

 बाईट

 किलोबाईट

 मेगाबाईट

उत्तर :बाईट

 13. करुणानिधींची कन्या DMK पक्षाच्या कनीमेळी यांचा कोणत्या प्रकरणात हात असल्याचा दावा CBI ने केला आहे?

 आदर्श घोटाळा

 2-जी स्प्रेक्ट्रम घोटाळा

 राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा घोटाला

 यापैकी नाही

उत्तर :2-जी स्प्रेक्ट्रम घोटाळा

 14. 11:25:?:35

 22

 16

 15

 8

उत्तर :16

 15. एका वर्तुळाची त्रिज्या 5% ने वाढविल्यास क्षेत्रफळ किती वाढेल?

 5%

 10.5%

 10.25%

 10%

उत्तर :10.25%

 16. खालील मालिकेत कोणती संख्या येईल?

12,23,34,45,—?

 55

 56

 57

 58

उत्तर :56

 17. 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल.

 7 मीटर

 7 1/17 मीटर

 5 मीटर

 8 मीटर

उत्तर :5 मीटर

 18. राजाने एक रेडिओ 680 रु ला विकला. तेव्हा त्यास 15% तोटा झाला जर 10% नफा मिळावा अशी इच्छा असेल तर रेडिओ किती रुपयास विकावा?

 680.20

 800

 880

 920

उत्तर :880

 19. मुद्दल 5000 रु. 4 वर्षाकरिता ठेवले तर त्यास 1600 रु. व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता?

 6%

 9%

 8%

 12%

उत्तर :8%

 20. 60 चे 30% किती?

 22

 18

 30

15

उत्तर : 18

चालू घडामोडी वन लाइनर्स, 30 ऑक्टोबर 2019.

✳ 29 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन

✳ 29 ऑक्टोबर: जागतिक स्ट्रोक दिन

✳ मध्य प्रदेशला नुकतेच सर्वोत्कृष्ट मूल्य गंतव्य म्हणून समाविष्ट केले गेले आहे

✳ सोफी विल्वा बेल्जियमची पहिली महिला पंतप्रधान ठरली

✳ 29 व्या बेसिक मंत्रिमंडळाची बैठक चीनमधील बीजिंग येथे झाली

✳ भारताने सागरी क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे

✳ हार्वर्ड बिझिनेस आढावा वर्ल्ड 2019 च्या यादीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे सीईओ जाहीर केले

✳ एनव्हीआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांनी वर्ल्ड 2019 च्या यादीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे सीईओ अव्वल स्थान मिळविले

✳ वर्ल्ड 2019 च्या यादीमध्ये अ‍ॅडोबचे सीईओ एस नारायण सहाव्या क्रमांकावर आहेत

✳ मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा  2019 च्या जागतिक क्रमवारीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या सीईओंमध्ये 7 व्या क्रमांकावर आहेत

✳ मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला वर्ल्ड 2019 च्या यादीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाया सीईओंमध्ये 9 व्या स्थानावर आहेत

✳ नाइकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क पार्करने वर्ल्ड 2019 च्या यादीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाया सीईओंमध्ये 20 वे स्थान मिळवले

✳ पलचे सीईओ टिम कुक वर्ल्ड 2019 च्या यादीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाया मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 62 व्या स्थानावर आहेत

✳ अमित सचदेव व्हाईट हाऊस फेलोच्या प्रतिष्ठित 2019-20 च्या प्रतिष्ठित व्यक्तीसाठी नियुक्त

✳ अष्टांगे, अपंग व्यक्ती आता पोस्टल बॅलेट्सद्वारे मतदान करू शकतात

✳ आयआयएम कलकत्ता फायनान्शियल टाईम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट रँकिंगमध्ये 17 व्या क्रमांकावर आहे

✳ अरुणाचल प्रदेशात तवांग महोत्सवाचे 7 वे संस्करण सुरू झाले

✳ आयसीसी अँटी करप्शन कोडचा भंग केल्याबद्दल शाकिब अल हसनवर 2 वर्षांची बंदी

✳ भारतीय रेल्वेने तिकीट मोहिमांविरूद्ध ‘ऑपरेशन धनुष’ सुरू केले

✳ नेपाली महोत्सव 'कुकुर' ने 'कुत्र्यांचा दिवस' साजरा केला.

✳ रियाधमध्ये 3 रा फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरम आयोजित

✳ पंतप्रधान मोदींनी तिसर्‍या फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरममध्ये भाग घेतला

✳ दिल्लीतील महिला आजपासून सार्वजनिक बसमध्ये विनामूल्य राईड मिळवतात

✳ भारत बांगलादेश विरुद्ध कोलकाता येथे पहिली ए-डे-नाईट टेस्ट खेळेल

✳ न्या. शरद अरविंद बोबडे 47 व्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त

✳ अनूप कुमार सिंह राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे डीजी म्हणून नियुक्त

✳ 1 नोव्हेंबरपासून बांगलादेश-भारत मैत्री संवाद कॉक्स बाजारात

✳ नेपाळची निर्मल पूर्वे ही जगातील सर्वात जलद पर्वतारोहण बनली

✳ निर्मल पुजाने केवळ 6 महिन्यांत 14 सर्वोच्च शिखरे मोजली

✳ सौदी अरेबियाबरोबर रणनीतिक भागीदारी परिषद करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारत

✳ जपानी शैक्षणिक व मुत्सद्दी सदाको ओगाटा निधन झाले

✳ बिस्वा इज्तेमा 10-12 जानेवारी 2020 पासून ढाका येथे घेण्यात येईल

✳ उझबेकिस्तानमध्ये एससीओ प्रमुख राज्य सभेचे आयोजन केले जाईल

✳ राजनाथ सिंह एससीओच्या प्रमुख राज्यस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत

✳ सी 40 जागतिक महापौर शिखर परिषद डेन्मार्कमध्ये आयोजित

✳ कॅरोलिन क्रिआडो पेरेझने रॉयल सोसायटी विज्ञान पुस्तक पुरस्कार 2019 जिंकला

✳ भारतीय रेल्वे 10 पर्यटन गाड्यांमध्ये 200 सलूनचे रुपांतर करेल

✳ केंद्र नूतनीकरण करण्यायोग्य उर्जेवर संपूर्णपणे लडाख चालविण्याची योजना आहे

✳ फिच रेटिंग्जने वित्तीय वर्ष 2019 मध्ये भारताचा जीडीपी अंदाज 5.5% पर्यंत खाली आणला आहे.

✳ बी एस यादव यांना इराकमध्ये भारताचे पुढचे राजदूत म्हणून नियुक्त केले

✳ एम के परदेशी यांना सामोआ येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले

✳ चीनमधील वुहानमध्ये 7 वा सीआयएसएम मिलिटरी वर्ल्ड गेम्स 2019 आयोजित

✳ चीनने 7 व्या सीआयएसएम मिलिटरी वर्ल्ड गेम्स 2019 मध्ये पदकांची यादी केली

✳ 7 व्या सीआयएसएम मिलिटरी वर्ल्ड गेम्स 2019 मध्ये रशिया दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ 7 व्या सीआयएसएम मिलिटरी वर्ल्ड गेम्स 2019 मध्ये ब्राझीलचा तिसरा क्रमांक आहे

✳ 7 व्या सीआयएसएम मिलिटरी वर्ल्ड गेम्स 2019 मध्ये भारताचा 27 वा क्रमांक आहे

✳ डोमिनिक थिम वोन (पुरुष) इर्स्ट बँक ओपन (व्हिएन्ना ओपन) 2019

✳ लेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांनी सरकारविरोधी निषेध करत राजीनामा जाहीर केला

✳ भारतातील सर्वात वयातील योग शिक्षक नानम्मल यांचे 99 व्या वर्षी निधन झाले.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...