३० ऑक्टोबर २०१९

बुद्धिमत्ता चाचणी विभाजतेच्या कसोट्या

2 ची कसोटी :
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
– उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

3 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
– उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
– संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

4 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
– उदा. 3568912
– शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

5 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
– उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

9 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
– उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
– संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

10 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
– उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

11 ची कसोटी : 
– ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
– उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
– 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
– 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

12 ची कसोटी : 
– ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

15 ची कसोतो : 
– ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

16 ची कसोटी : 
– ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

18 ची कसोटी : 
– ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.

उदाहरणे :
1) 2 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 
1. 3721
2. 47953 
3. 72142
4. 68325
उत्तर : 72142
नियम: संख्येतील एकक स्थानचा अंक सम असल्यास 2 ने नि:शेष भाग जातो.

2) 3 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 37241
2. 571922
3. 7843
4. 64236
उत्तर : 64236
नियम: 
संख्येतील अंकांच्या बेरजेस 3 ने पूर्ण भाग गेल्यास
6+4+2+3+6=21÷3 = 7

3) 5 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 56824
2. 9876
3. 7214
4. 7485
उत्तर : 7485
नियम: संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 असल्यास 5 ने नि:शेष भाग जातो.

4) 6 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 3472
2. 5634
3. 9724
4. 6524
उत्तर : 5634

5) 9 ने नि:शेष भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती?
1. 12643 
2. 85521
3. 75636
4. 54829
उत्तर : 75636

 (ब) संख्यांचे विभाजक

नमूना पहिला –
1) 60 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती?
1. 10
2. 12
3. 14
4. 8
उत्तर : 12
स्पष्टीकरण :-
कोणत्याही सम संख्येचे विभाजक 1,2 व ती संख्या असतेच.
60×1, 30×2, 20×3, 15×4, 12×5, 10×6 
:: 6×2 = 12

नमूना दूसरा –
1) 36 ही संख्या दोन पूर्ण संख्यांचा गुणाकाराच्या रूपात जास्तीत जास्त किती प्रकारे (वेळा) लिहिता येईल?1. 4
2. 6
3. 5
4. 8
उत्तर : 5
स्पष्टीकरण : 
1×36, 2×18, 3×12, 4×9, 6×6 म्हणजेच एकूण 5 वेळा लिहिता येईल.

संगणक प्रश्नसंच

● वेबसाईट वरील वेब पेजचा पत्यास काय म्हणतात?

अ. URL
ब. HTTP
क. Browser
ड. Email

उत्तर - अ.URL

● इंटरनेट मध्ये जोडलेल्या संगणकाच्या ॲड्रेसला काय म्हणतात?

अ. Email
ब. Browser
क. WWW
ड. इंटरनेट प्रोटोकॉल

उत्तर - ड. इंटरनेट प्रोटोकॉल

● FTP चे विस्तारीत रूप काय आहे?

अ. File Transfer Procedure
ब. File Transport Protocol
क. File Transfer Protocol
ड. Fully Transfer Protocol

उत्तर - क. File Transfer Protocol

● खालील पैकी कोणत्या टेक्नोलॉजीचा 4G मध्ये समावेश होतो?

अ. जीएसएम
ब. युएलबी
क. सीडीएमए
ड. जीपीएस

उत्तर - ब. युएलबी

● सायबर स्पेस ही प्रथम संकल्पना कोणी मांडली?

अ. विल्यम वर्डसवर्थ
ब. विल्यम जॉर्डन
क. विल्यम गिब्सन
ड. विल्यम स्मिथ

उत्तर - क. विल्यम गिब्सन

● खालील पैकी कोणता आऊटपुट डिव्हाइस आहे?

अ. की बोर्ड
ब. जॉयस्टीक
क. माऊस
ड. मॉनिटर

उत्तर - ड. मॉनिटर

● कोणत्या कंपनीने पहिले व्यावसायिक संगणक तयार केले?

अ. रेमिग्टंन रॅड
ब. IBM
क. पास्कल
ड. मायक्रोसॉफ्ट

उत्तर - अ. रेमिग्टंन रॅड

● _ चा वापर हे तिसर्या पिढीतील संगणकाचे वैशिष्ट्य होते.

अ. व्हक्युम ट्यूब
ब. इंटिग्रेटेड सर्किट
क. चीप
ड. आर्टीफीशल इंटलिजन्ट

उत्तर - ब. इंटिग्रेटेड सर्किट

● ____ हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे साधन आहे.

अ. दुरदर्शन
ब. टेलिफोन
क. उपग्रह
ड. वरील सर्व

उत्तर - ड. वरील सर्व

● जगभरात पसरलेल्या व एकमेकांना जोडलेल्या संगणकाच्या जाळ्याला काय म्हणतात?

अ. इंटरनेट
ब. ईमेल
क. टेलिफोन
ड. ईकॉमर्स

उत्तर - अ. इंटरनेट

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. ‘विराजमान झालेला’ या शाब्दसमुहाबद्दल योग्य असणारा शब्द कोणता?

 अतिथी

 अग्रज

 अधिष्ठित

 विद्यमान

उत्तर : विद्यमान

 2. ‘कोल्हेकुई’ या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता?

 निष्फळ बडबड

 निरर्थक गोष्ट

 क्षुद्र लोकांची ओरड

 अर्थहीन पाठांतर

उत्तर :क्षुद्र लोकांची ओरड

 3. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची —– हे वाक्य पूर्ण करण्यात कोणता वाक्यप्रचार योग्य ठरेल?

 पित्तखवळणे

 कंबर खचणे

 कंबर बांधणे

 धकडी भरणे

उत्तर :कंबर खचणे

 4. ‘सप्तपदी’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा?

 व्दंव्द

 उपपदतत्पुरुष

 बहूव्रीही

 व्दिगू

उत्तर :व्दिगू

 5. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?

 अत्तर

 पेशवा

 तंबाखू

 दादर

उत्तर :तंबाखू

 6. ‘आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या वाक्यातील उपमान कोणते?

 माया

 तुझी

 आम्हावारी

 आभाळागत

उत्तर :आभाळागत

 7. ‘तो काम न करता नुसता फिरत असतो’. या वाक्याचा काळ ओळखा?

 रिती वर्तमानकाळ

 साधावर्तमानकाळ

 अपूर्ण वर्तमानकाळ

 रिती भूतकाळ

उत्तर :रिती वर्तमानकाळ

 8. ‘जाऊ’ या शब्दाचे अनेकवचनी रुपे कोणते?

 जाऊ

 जाववा

 ज्यावा

 जावा

उत्तर :जावा

 9. ‘दृष्टी आड सृष्टी’ या म्हणीचा अर्थ कोणता?

 दृष्टीत दोष असणे

 दृष्टीशिवाय दिसत नाही

 आंधळ्याला सृष्टी दिसत नाही

 आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे.

उत्तर :आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे.

 10. ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?

 लाला लजपतराय

 सुभाषचंद्र बोस

 बाळ गंगाधर टिळक

 रामनाथ गोयंका

उत्तर :बाळ गंगाधर टिळक

 11. महात्मा गांधीजीचा जन्म कोठे झाला?

 पोरबंदर

 राजकोट

 साबरमती

 सेवाग्राम

उत्तर :पोरबंदर

 12. महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे?

 शिर्डी

 त्र्यंबकेश्वर

 नांदेड

 पैठण

उत्तर :त्र्यंबकेश्वर

 13. इंडिया गेट हे कोणत्या ठिकाणी आहे?

 दिल्ली

 मुंबई

 आग्रा

 चेन्नई

उत्तर :दिल्ली

 14. गोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवरती कोणता तलाव बांधलेला आहे?

 इटीयाडोह

 नवेगाव

 कुर्‍हाडा

 सिवनी

उत्तर :इटीयाडोह

 15. गोंदिया जिल्हयातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे?

 तिरोडा

 मोरगाव अर्जुनी

 सालेकसा

 देवरी

उत्तर :मोरगाव अर्जुनी

 16. तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते?

 उत्तरप्रदेश

 आंध्रप्रदेश

 महाराष्ट्र

 केरळ

उत्तर :आंध्रप्रदेश

 17. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ते निवडा.

 लोकसभा

 राज्यसभा

 विधानसभा

 विधान परिषद

उत्तर :राज्यसभा

 18. गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे केव्हा सुरू झाली?

 25 सप्टेंबर 1996

 26 सप्टेंबर 1996

 25 ऑक्टोबर 1996

 25 सप्टेंबर 1995

उत्तर :25 सप्टेंबर 1996

 19. आयएसआय ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे?

 बांग्लादेश

 इराण

 अफगाणिस्तान

 पाकिस्तान

उत्तर :पाकिस्तान

 20. सागरतळावर होणार्‍या भूकंपामुळे पाण्याला हादरे बसून पाण्यावर लाटा निर्माण होतात त्यास काय म्हणतात?

 भूकंप

 त्सुनामी

 जलतरंग

 लाटा

उत्तर :त्सुनामी

----------------------------------------

काही महत्वाची कलमे

1. घटना कलम क्रमांक 14
कायद्यापुढे समानता

2. घटना कलम क्रमांक 15
भेदभाव नसावा

3. घटना कलम क्रमांक 16
समान संधी

4. घटना कलम क्रमांक 17
अस्पृश्यता निर्मूलन

5. घटना कलम क्रमांक 18
पदव्यांची समाप्ती

6. घटना कलम क्रमांक 19 ते 22
मूलभूत हक्क

7. घटना कलम क्रमांक 21 अ
प्राथमिक शिक्षण

8. घटना कलम क्रमांक 24
बागकामगार निर्मूलन

9. घटना कलम क्रमांक 25
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

10. घटना कलम क्रमांक 26
धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

11. घटना कलम क्रमांक 28
धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

12. घटना कलम क्रमांक 29
स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

13. घटना कलम क्रमांक 30
अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

14. घटना कलम क्रमांक 40
ग्राम पंचायतीची स्थापना

15. घटना कलम क्रमांक 44
समान नागरिक कायदा

16. घटना कलम क्रमांक 45
6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

17. घटना कलम क्रमांक 46
शैक्षणिक सवलत

18. घटना कलम क्रमांक 352
राष्ट्रीय आणीबाणी

19. घटना कलम क्रमांक 356
राज्य आणीबाणी

20. घटना कलम क्रमांक 360
आर्थिक आणीबाणी

21. घटना कलम क्रमांक 368
घटना दुरूस्ती

22. घटना कलम क्रमांक 280
वित्त आयोग

23. घटना कलम क्रमांक 79
भारतीय संसद

24. घटना कलम क्रमांक 80
राज्यसभा

25. घटना कलम क्रमांक 81
लोकसभा

26. घटना कलम क्रमांक 110
धनविधेयक

27. घटना कलम क्रमांक 315
लोकसेवा आयोग

28. घटना कलम क्रमांक 324
निर्वाचन आयोग

29. घटना कलम क्रमांक 124
सर्वोच्च न्यायालय

30. घटना कलम क्रमांक 214
उच्च न्यायालय

भूगोल प्रश्नसंच

1.   धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅  - अमरावती

2.   कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते?
✅.  - कोरकू 

3.   अमरावती जिल्ह्यातून जाणार्‍या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?
✅.   - गाविलगड रांग 

4.  पैनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते?
✅.   - अजिंठा, बुलढाणा 

5.   पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
✅.   - पैनगंगा 

6.  तापी नदीच्या खोर्‍यात येणारा जिल्हा कोणता?
✅  - बुलढाणा 

 7.  अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
✅  - विषम 

8.   बाळापूर हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅  - अकोला 

9.  कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - अकोला 

10.    जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?
✅.  - अकोला 

11.   विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता?
✅   - अकोला 

12.    शिरपूर हे जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - अकोला 

13.   काटेपूर्णा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - अकोला 

14.   पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - अकोला

15.   नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते?
✅.   - बुलढाणा   

16.   कापसाचे कोठार कोणत्या शहरास संबोधतात?
✅.   - अमरावती 

17   यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमाट आढळते?
✅.   - गोंड 

18.  लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - बुलढाणा 

19.    किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - नांदेड व यवतमाळ 

20.   यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो?
✅.   - गोंडवन 

21.    लाकडाचे आधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता ?
✅.  - अमरावती 

22.   महाराष्ट्रातील बॉक्साइट कोणत्या जिल्ह्यात सापडते?
✅.  - अकोला, अमरावती 

23.  अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय?
✅.  - विदर्भ 

24.    चिखलदरा हे पर्वत शिकर कोणत्या पर्वतात आहे?
✅.  - सातपुडा 

25.  टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे?
✅.  - नांदेड व यवतमाळ 

26.  लोणार क्रेटर वनोद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - बुलढाणा 

27.    जलगंगा धरण कोठे आहे?
✅.  - बुलढाणा

28.  गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे?
✅.   - विदर्भ 

29.  हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
✅.  - यवतमाळ 

30.  श्री दत्त अवधुताचे जागृत स्थान कोठे आहे?
- कारंजा 

२७ ऑक्टोबर २०१९

10 चालुघडामोडी सराव प्रश्न उत्तरे

1) ट्युनिशियाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर : कैस सईद

2) भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोण आहे?
उत्तर : पंकज कुमार

3) आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरणे प्रदर्शनी (IREE) 2019’ कुठे भरविण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

4) कोणत्या बँकेने 2018-19 ‘डिजीधन मिशन डिजिटल पेमेंट्स अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकला?
उत्तर : येस बँक

5) भारतीय भूदलाचा ‘सिंधू सुदर्शन’ सराव कोणत्या राज्यात घेण्यात आला?
उत्तर : राजस्थान

6) केंद्र सरकारने कोणत्या दूरसंचार कंपनीला BSNLमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर : MTNL (महानगर टेलीफोन निगम लिमिटेड)

7) भारतीय हवाई दल 83 ‘तेजस’ LCA विमानांसाठी कुणासोबत करार करणार आहे?
उत्तर : हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

8) ‘2019 वुशू विश्व अजिंक्यपद’ या स्पर्धेत 48 किलो गटात कोणी सुवर्णपदक पटकावले?
उत्तर : प्रवीण कुमार

9) ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 24 ऑक्टोबर

10) ‘IUCN रेड लिस्ट’मध्ये हिमबिबट्याला कोणत्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे?
उत्तर : असुरक्षित

--------------------------------------------------------

--------------------------------------------------------

--------------------------------------------------------

२५ ऑक्टोबर २०१९

प्रश्नावली - विज्ञान

1. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?
1) 32°C
2) 30°C
3) 31°C
4) 37°C
————————————————-
2. स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितिज ऊर्जा .......................
1) वाढते
2) कमी होते
3) तितकीच राहते
4) शून्य होते
—————————————————
3. खालीलपैकी कोणता रोग जीवनसत्व ‘क’ असावी उदभवतो?
1) बेरीबेरी
2) रातअंढाळेपणा
3) स्क्व्र्ही
4) चिडचिडेपणा
————————————————-
4. बटाटा हे ------------ आहे?
1) मुळ
2) खोड
3) वीज
4) फळ
————————————————--
5. सर्वंयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता?
1)O
2)AB
3) A
4) B
———————————————-
6. ७ कि.मी. = किती डेकामीटर
1) ७०
2) ७००
3) ७०००
4) ०.७००
———————————————
7. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?
1) स्ट्रेप्टोमायसिन
2) पेनिसिलिन
3) डेप्सॉन
4) ग्लोबुलिन
————————————————
8. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो?
1) बॅक्टेरिऑलॉजी
2) व्हायरॉलॉजी
3) जेनेटिक्स
4) मेटॅलर्जी
——————————————
9. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?
1) १९७५
2) १९७४
3) १९७३
4) १९७२
———————————————
10. पिग आयर्न साधारणत ----------- एवढ्या तापमानास वितळते?
1) १२००°
2) १५००°
3) १३००°
4) १०००°

उत्तरसूची -
(1) 4
(2) 1
(3) 3
(4) 2
(5) 1
(6) 3 
(7) 1
(8) 2
(9) 2
(10) 2

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव  प्रश्न

1) माणसाने स्वार्थ व ............... चा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) आप्पलपोटी      2) प्रपंच     
   3) परमार्थ      4) पोटार्थ

उत्तर :- 3

2) समानार्थी म्हण शोधा. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’

   1) खाऊ जाणे तो पचवू जाणे    2) जशी कुडी तशी पुडी
   3) यापैकी नाही        4) अंथरुण पाहून पाय पसरावे

उत्तर :- 3

3) ‘धिंडवडे निघणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?

   1) फजिती होणे      2) मिरवणूक निघणे 
   3) वडे तळणे      4) बोबडी वळणे

उत्तर :- 1

4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ चा शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा.

   1) तितिक्षा      2) गरीब     
   3) दयाळू      4) मायाळू

उत्तर :- 1

5) शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

   1) महात्म्य      2) माहात्म्य   
   3) माहात्म      4) महात्म

उत्तर :- 2

6) शब्दाचा अर्थ व्यक्त करण्याच्या ................... शक्ती असतात. या वाक्यातील गाळलेला शब्द निवडा.

   1)  तीन    2) अनेक     
   3) दोन      4) चार

उत्तर :- 1

7) ‘पंकज’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

   1) चिखलात पडलेला    2) चिखलाने माखलेला 
   3) चिखलात जन्मलेला    4) चिखलाशी संबंध नसलेला

उत्तर :- 3

8) दिलेल्या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द निवडा. – ‘तडाग’

   1) निर्झर    2) जलाशय   
   3) तळे      4) सरोवर

उत्तर :- 1

9) खालीलपैकी कोणत्या विधानात ‘नावडतीचे मीठ अळणी’ या म्हणीचा अर्थ सापडतो ?

   1) नावडती माणसे शुध्द मनाची असतात    2) क्षुल्लक कारणांवरून दुस-यास दोष देणे
   3) अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही    4) मीठ कमी खाणारे अप्रिय ठरतात

उत्तर :- 3

10) ‘विचार न करता एखाद्याच्या मागून जाणे, परंपराशरणता’
     हा अर्थ सुचविण्यासाठी योग्य वाक्प्रचार वापरा.

   1) गतीवर येणे      2) गतानुगतिक   
   3) गण्यावरावण्याचे प्रसंग    4) गणचौथ पुजणे

उत्तर :- 2

Join : @

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – ‘मांजर उंदिर पकडते.’

   1) कर्मणी    2) कर्तरी      3) भावे      4) संकर

उत्तर :- 2

2) ‘गजाननाच्या कृपेने कार्यसिध्दी होवो’ – या वाक्यातील सामासिक शब्द कोणता ?

   1) गजानन    2) कृपेने      3) कार्यसिध्दी    4) होवो

उत्तर :- 1

3) खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य वापर केलेले वाक्य ओळखा.

   1) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी, गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”
   2) याज्ञवल्क्य म्हणाले : मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून, मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे !
   3) याज्ञवलक्य म्हणाले, मैत्रेयी ! गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे ?
   4) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता ; वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”

उत्तर :- 1

4) अलंकार ओळखा.

     येथे समस्त बहिरे बसतात लोक
     का भाषणे मधुर तू करिशी अनेक I
     हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
     रंगावरून तुजला गणतील काक II

   1) अप्रस्तुत प्रशंसा  2) उपमा      3) श्लेष      4) प्रतीप

उत्तर :- 1

5) तत्सम शब्द निवडा.

   1) धरती     2) पृथ्वी      3) जमीन      4) धरा

उत्तर :- 2

6) ‘जगाचे नियंत्रण करणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात येतो?

   1) जगन्नायक    2) जगन्नियंता   
   3) जगन्नाथ    4) जगतकर्ता

उत्तर :- 2

7) खालीलपैकी अचूक शब्द निवडा.

   1) पारंपारिक    2) परंपारिक   
   3) पारंपरिक    4) पांरपरीक

उत्तर :- 3

8) पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत ?

   1) ग, ध    2) ज, झ     
   3) प, फ    4) क्ष, ज्ञ

उत्तर :- 4

9) खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतील ‘पररूप संधी’ असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

   1) करून    2) जाऊन   
   3) घेईल    4) होऊ

उत्तर :- 1

10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

     गरीबांना, सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे.
   1) नाम        2) विशेषण   
   3) उभयान्वयी अव्यय    4) केवलप्रयोगी

उत्तर :- 1

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढील वाक्यातील रिकामी जागा अचूक पर्यायाने भरा.
     शब्दाच्या अक्षरांमधील शेवटच्या अक्षराला .............. म्हणतात.

   1) अन्त्य अक्षर    2) आद्य अक्षर    3) उपान्त्य अक्षर    4) उपान्त्यर्पू अक्षर

उत्तर :- 1

2) ‘वाडमय’ या शब्दातील संधी सोडवा.

   1) वाग् + मय    2) वाक् + अमय    3) वाक् + मय    4) वांग + मय

उत्तर :- 3

3) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
     “नुसती हुशारी काय कामाची ?”

   1) विशेषण    2) गुणधर्मदर्शक भाववाचक नाम
   3) सामान्य नाम    4) विशेषनाम

उत्तर :- 2

4) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
    ‘कुठे आहे तो भामटा ? तो बघा पळाला’

   1) दर्शक सर्वनाम  2) संबंध सर्वनाम    3) आत्मवाचक सर्वनाम  4) सामान्य सर्वनाम

उत्तर :- 1

5) पुढील शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल ते चार पर्यायातून निवडा. – नागपूर .............

   1) नागपूरकर    2) संत्री      3) नागपूरी    4) मोसंबी

उत्तर :- 3

6) ‘मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ – या वाक्यातील कर्ता ओळखा.

   1) मी    2) संकष्टी चतुर्थी    3) चंद्र    4) दिसणे

उत्तर :- 3

7) खालील अधोरेखित शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
     ‘पाणी गटागट पिऊ नकोस’

   1) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय    2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
   3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    4) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

8) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.

   1) हे संपूर्ण विधान चूक आहे      2) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
   3) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे      4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

उत्तर :- 2

9) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे  ?’

   1) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय    2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
   3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

10) उंहू ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

   1) विरोध    2) तिरस्कार    3) शोक    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

प्रश्नाउत्तरे

  1.  केळी भुकटी कोठे तयार होते?
✅.   - वसई. 

2.  रासायनिक द्र्व्यांचा कारखाना कोठे आहे?
✅.   - पनवेल व अंबरनाथ. 

3.   वनस्पती तूप कोठे बनवले जाते?
✅.   - मुंबई. 

4.  रासायनी कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅.   - खत व औषधे. 

5.  गरम झर्‍यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
✅.   - वज्रेश्वरी. 

6.  चुंबकीय वेधशाळा कोठे आहे?
✅.   - अलिबाग. 

7.  महाराष्ट्राचा दक्षिण टोकाकडील घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाण कोणते?
✅.  - अंबाली. 

8.   भारताचे पॅरिस कोणत्या शहरास म्हणतात?
✅.   - मुंबई.

9.  हाजीमलंग बाबाची कबर कोठे आहे?
✅.  - कल्याण. 

10.   दशभुजा गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - रत्नागिरी. 

♻️👇 तुम्हला खालील प्रश्नाचे उत्तरे माहीत आहे का ? 👇♻️

*🔹 संत ज्ञानेश्वराचे पूर्ण नाव काय?*
Ans : ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी

*🔹 केरळचा नृत्य प्रकार?*
Ans : कथकली / मोहीनाटम

*🔹 मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटीश गव्हर्नर कोण?*
Ans : एलफिस्टन

*🔹 नेपाळची राजधानी कोणती?*
Ans : काठमांडू

*🔹 महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य:*
Ans : वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड

*🔹 पृथ्वीवर कोट्यावधी वर्षापूर्वी सर्व खंड मिळून एक मोठा भूखंड होता त्या काय नाव होते?*
Ans : पैन्जीया

*🔹 बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्थेचा निर्माता कोण होता?*
Ans : रॉंबरट क्लाईव्ह

*🔹 राज्यातील प्रसिद्ध ठिकाणे: आगाखान पॅलेस?*
Ans : पुणे (महाराष्ट्र)

*🔹 'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?*
Ans : जल

*🔹 कोकण रेल्वेमधील सर्वात मोठा बोगदा कुठे आहे?*
Ans : कुरबुडे

*🔹 लिंबाच्या रसामध्ये कोणते असिड असते?-;?*
Ans : सायात्रिक असिड

*🔹 गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव काय?*
Ans : राम गणेश गडकरी

*🔹 सूर्यापासून मिलाणारी उर्जा ........ मुळे मिळते?*
Ans : केंद्रीय समिलन

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...