३० ऑक्टोबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’ – अलंकार ओळखा.

   1) उत्प्रेक्षा    2) उपमा      3) रूपक      4) यमक

उत्तर :- 2

2) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?

   1) पेशवा    2) पाव      3) पावडर    4) पाकीट

उत्तर :- 2

3) रस व त्याचे स्थायीभाव यांच्या जोडया लावा.

   अ) शांत    i) जुगुप्सा
   ब) अद्भुत    ii) उत्साह
   क) वीर    iii) शम
   ड) बीभत्स    iv) विस्मय

  अ  ब  क  ड
         1)  i  iii  iv  ii
         2)  iii  iv  ii  i
         3)  i  ii  iii  iv
         4)  iv  i  ii  iii

उत्तर :- 2

4) वेगळा शब्द ओळखा.

   1) ग्रंथ      2) पोथी      3) पुस्तक    4) पिशवी

उत्तर :- 4

5) ‘मोहन नीताला तिच्या परीक्ष बोलला होता’ या वाक्यातील ‘परीक्ष’ शब्दाच्या विरुध्द असणारा शब्द निवडा.

   1) उपकार    2) अपरोक्ष    3) परिधान    4) उपेक्षित

उत्तर :- 2  

6) घटना प्रसंगासाठी साजेशी म्हण शोधा.
     ‘एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.’

   1) फार झाले हसू आले    2) नव्याचे नऊ दिवस
   3) नवी विटी नवे राज्य    4) नाव मोठे लक्षण खोटे

उत्तर :- 1

7) ‘खांदेपालट करणे’ हा वाक्यप्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

   1) अन्त्ययात्रा    2) डाव      3) घटका      4) दंड

उत्तर :- 1

8) ‘सहा महिन्यांतून एकदा प्रसिध्द होणारे’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द आहे ते ओळखा.

   1) मासिक    2) दैनिक      3) सामासिक    4) षण्मासिक

उत्तर :- 4

9) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.

   1) षष्ठयब्दिपूर्ती    2) षष्टयब्दिपूर्ति    3) षष्टयब्दीपूर्ती    4) षष्टयब्दिपुर्ति

उत्तर :- 1

10) मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.

   1) त्, थ्, द्, ध्, न् 2) ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
   3) प्, फ्, ब्, भ्, म्  4) च्, छ्, ज्, झ्, म्

उत्तर :- 2

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘सुरेखा चित्र काढत असे’ – काळ ओळखा.

   1) साधा भूतकाळ    2) रीती भूतकाळ    3) अपूर्ण भूतकाळ    4) पूर्ण भूतकाळ

उत्तर :- 2

2) ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) भ्रतार      2) सुतारीण    3) लोहार    4) होलार

उत्तर :- 2

3) सोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) सोन्य      2) सोनं      3) सोने      4) सोनी

उत्तर :- 3

4) पुढील विधाने वाचा.

   अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते.
   ब) ऊ – कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते.
   क) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओकारान्तच राहते.

   1) अ व ब बरोबर    2) ब व क बरोबर    3) अ बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4

5) कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?

   1) षष्ठी        2) संबोधन    3) प्रथमा      4) तृतीया

उत्तर :- 3   

6) ‘तु फार चतुर आहेस’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) आज्ञार्थी    2) उद्गारार्थी    3) विधानार्थी    4) प्रश्नार्थी

उत्तर :- 3

7) ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील ‘अंत’ या शब्दाला वाक्य पृथक्करणात .............. म्हणतात.

   1) उद्देश्य    2) उद्देश्य विस्तार    3) क्रियापद    4) विधानपूरक

उत्तर :- 1

8) रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा : भावे प्रयोगात क्रियापद नेहमी ............. असते.

   1) नपुंसकलिंगी    2) पुल्लिंगी    3) स्त्रीलिंगी    4) अनेकलिंगी

उत्तर :- 1

9) अव्ययीभाव समासात

   1) पहिले पद महत्त्वाचे असते    2) दुसरे पद महत्त्वाचे असते
   3) दोन्ही पदे महत्त्वाची असतात    4) दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्त्वाचे असते

उत्तर :- 1

10) वाक्‍यातून जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेणे असा अर्थ विचारला जात असेल तर .............. हे विरामचिन्ह वापरतात.

   1) पूर्णविराम    2) प्रश्नचिन्ह    3) उद्गारचिन्ह    4) विचारचिन्हविराम

उत्तर :- 2

बुद्धिमत्ता चाचणी शेकडेवारी

1) कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.

· उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.)

· 125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह धा.

· 500 चे 30% = 150

· 500 चे 10% = 50

· 30% = 10%×3

· = 50×3 = 150

· 500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.)

· 500 ची 1% = 5

· :: 500 चे 8% = 40

2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.

· उदा. 368 चे 12.5% = ?

· 368×12.5/100

· = 368×1/8= 46

3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.

· उदा. 465 चे 20% = 93

· 465×20/100

· = 465×1/5 ने गुणा = 93

4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.

· उदा. 232 चे 25% = 58

· 232×25/100

· = 232×1/4= 58

5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.

· उदा. 672 चे 37.5% = 252

· 672×37.5/100

· = 672×3/8

· = 252

6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.

· उदा. 70 चे 50% = 35

· 70×50/100

· = 70×1/2

· = 35

7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.

· उदा. 400 चे 62.5% = 250

· 400×62.5/100

· = 400×5/8

· = 250

8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.

· उदा. 188 चे 75% = 141

· 188×3/4

· = 141

9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.

· उदा. 888 चे 87.5% = 777

· 888 × 87.5/100

· = 888×7/8

· = 777

10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह धा.

· उदा. 25 चे 25% = 6.25

· 25 × 25/100

· = 625/100

· = 6.25

नमूना पहिला –

उदा.

2400 पैकी 144= किती टक्के?

1. 8%

2. 6%

3. 5%

4. 4%

उत्तर : 6%

स्पष्टीकरण :-

टक्के (%) = 144×100/2400=144/24 = 6%

नमूना दूसरा –

उदा.

X चे 7% = 126; तर X=?

1. 1600

2. 1800

3. 1500

4. 1400

उत्तर : 1800

स्पष्टीकरण :-

X × 7/100=126

:: X=126×100/7=18×100 = 1800

नमूना तिसरा –

उदा.

1500 चे 40% = X चे 8%; :: X=?

1. 6000

2. 9000

3. 7500

4. 8500

उत्तर : 7500

स्पष्टीकरण :-

1500×40/100=X×8/100

:: 1500×40=X=8

:: X=1500×40/8=1500×5=7500 किंवा

तोंडी काढताना 8 ची 5 पट = 40, यानुसार 1500 ची 5 पट = 7500

नमूना चौथा –

उदा.

1200 चे 8% = 400 चे किती टक्के?

1. 16%

2. 24%

3. 20%

4. 18%

उत्तर : 24%

स्पष्टीकरण :-

:: X=1200×8/100=400×X/100
:: 1200×8=400×X

:: X=1200×8/400=3×8=24%
किंवा

तोंडी काढताना 400 ची 3 पट = 1200 आणि 8 ची 3 पट = 24%


नमूना पाचवा –

उदा.

A ला B पेक्षा 10% गुण जास्त मुळाले, तर B ला A पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले ?

1. 10%

2. 9%

3. 9 1/11%

4. 11 1/11%

उत्तर : 9 1/11%

सूत्र :

B ला A पेक्षा टक्के कमी गुण = 100×टक्के/100+टक्के = 100×10/100+10= 1000/110 = 9 1/11%


नमूना सातवा –

उदा.

एका परिक्षेत 30% विधार्थी गणितात नापास झाले. 20% विधार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विधार्थी दोन्ही विषयांत नापास झाले, तर दोन विषयांच्या घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विधार्थी उत्तीर्ण झाले?

1. 40%

2. 30%

3. 70%

4. 60%

उत्तर : 60%

क्लृप्ती :-

परिक्षेत नापास झालेल्यांची टक्केवारी = (गणितात नापास) + (इंग्रजीत नापास) - (दोन्हीविषयांत नापास)

केवळ गणितात नापास विधार्थी %=30-10=20% 30% + 20% - 10 = 40%

इंग्रजीत नापास विधार्थी %=20-10=10%

दोन्ही विषयात मिळून नापास %=10% गणित नापास → (30%)

:: परिक्षेत नापास विधार्थ्यांची टक्केवारी = 40% इंग्रजी नापास → (10%)

:: उत्तीर्ण विधार्थ्यांची टक्केवारी = 60% दोन्ही विषयात नापास → (20%)

नमूना आठवा –

उदा.

150 चा शेकडा 60 काढून येणार्‍या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

1. 96

2. 54

3. 90

4. 30

उत्तर : 96

स्पष्टीकरण :

150 चे 60% = 90 90 चे 60% = 54

:: 150-54 = 96


नमूना नववा –

उदा.

एका परिक्षेत 70% विधार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विधार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% विधार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाले. जर 3000 विधार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, तर त्या परीक्षेस एकूण किती विधार्थी बसले होते?

1. 7500

2. 5000

3. 6000

4. 8000

उत्तर : 5000

स्पष्टीकरण :-

इंग्रजी गणित दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण परिक्षेत एकूण अनुत्तीर्ण विधार्थी %=

उत्तीर्ण 70% 65% 25% 30+35-25 = 40%

अनुउत्तीर्ण 30% 35%

:: परिक्षेत एकूण अनुउत्तीर्ण विधार्थी = 40%

:: उत्तीर्ण विधार्थी = 100-40 = 60%

:: 60% विधार्थी = 3000

:: एकूण विधार्थी = 3000×100/60 = 5000

बुद्धिमत्ता चाचणी विभाजतेच्या कसोट्या

2 ची कसोटी :
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
– उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

3 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
– उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
– संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

4 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
– उदा. 3568912
– शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

5 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
– उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

9 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
– उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
– संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

10 ची कसोटी : 
– ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
– उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

11 ची कसोटी : 
– ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
– उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
– 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
– 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

12 ची कसोटी : 
– ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

15 ची कसोतो : 
– ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

16 ची कसोटी : 
– ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

18 ची कसोटी : 
– ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.

उदाहरणे :
1) 2 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 
1. 3721
2. 47953 
3. 72142
4. 68325
उत्तर : 72142
नियम: संख्येतील एकक स्थानचा अंक सम असल्यास 2 ने नि:शेष भाग जातो.

2) 3 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 37241
2. 571922
3. 7843
4. 64236
उत्तर : 64236
नियम: 
संख्येतील अंकांच्या बेरजेस 3 ने पूर्ण भाग गेल्यास
6+4+2+3+6=21÷3 = 7

3) 5 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 56824
2. 9876
3. 7214
4. 7485
उत्तर : 7485
नियम: संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 असल्यास 5 ने नि:शेष भाग जातो.

4) 6 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
1. 3472
2. 5634
3. 9724
4. 6524
उत्तर : 5634

5) 9 ने नि:शेष भाग जाणारी खालील पैकी संख्या कोणती?
1. 12643 
2. 85521
3. 75636
4. 54829
उत्तर : 75636

 (ब) संख्यांचे विभाजक

नमूना पहिला –
1) 60 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती?
1. 10
2. 12
3. 14
4. 8
उत्तर : 12
स्पष्टीकरण :-
कोणत्याही सम संख्येचे विभाजक 1,2 व ती संख्या असतेच.
60×1, 30×2, 20×3, 15×4, 12×5, 10×6 
:: 6×2 = 12

नमूना दूसरा –
1) 36 ही संख्या दोन पूर्ण संख्यांचा गुणाकाराच्या रूपात जास्तीत जास्त किती प्रकारे (वेळा) लिहिता येईल?1. 4
2. 6
3. 5
4. 8
उत्तर : 5
स्पष्टीकरण : 
1×36, 2×18, 3×12, 4×9, 6×6 म्हणजेच एकूण 5 वेळा लिहिता येईल.

संगणक प्रश्नसंच

● वेबसाईट वरील वेब पेजचा पत्यास काय म्हणतात?

अ. URL
ब. HTTP
क. Browser
ड. Email

उत्तर - अ.URL

● इंटरनेट मध्ये जोडलेल्या संगणकाच्या ॲड्रेसला काय म्हणतात?

अ. Email
ब. Browser
क. WWW
ड. इंटरनेट प्रोटोकॉल

उत्तर - ड. इंटरनेट प्रोटोकॉल

● FTP चे विस्तारीत रूप काय आहे?

अ. File Transfer Procedure
ब. File Transport Protocol
क. File Transfer Protocol
ड. Fully Transfer Protocol

उत्तर - क. File Transfer Protocol

● खालील पैकी कोणत्या टेक्नोलॉजीचा 4G मध्ये समावेश होतो?

अ. जीएसएम
ब. युएलबी
क. सीडीएमए
ड. जीपीएस

उत्तर - ब. युएलबी

● सायबर स्पेस ही प्रथम संकल्पना कोणी मांडली?

अ. विल्यम वर्डसवर्थ
ब. विल्यम जॉर्डन
क. विल्यम गिब्सन
ड. विल्यम स्मिथ

उत्तर - क. विल्यम गिब्सन

● खालील पैकी कोणता आऊटपुट डिव्हाइस आहे?

अ. की बोर्ड
ब. जॉयस्टीक
क. माऊस
ड. मॉनिटर

उत्तर - ड. मॉनिटर

● कोणत्या कंपनीने पहिले व्यावसायिक संगणक तयार केले?

अ. रेमिग्टंन रॅड
ब. IBM
क. पास्कल
ड. मायक्रोसॉफ्ट

उत्तर - अ. रेमिग्टंन रॅड

● _ चा वापर हे तिसर्या पिढीतील संगणकाचे वैशिष्ट्य होते.

अ. व्हक्युम ट्यूब
ब. इंटिग्रेटेड सर्किट
क. चीप
ड. आर्टीफीशल इंटलिजन्ट

उत्तर - ब. इंटिग्रेटेड सर्किट

● ____ हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे साधन आहे.

अ. दुरदर्शन
ब. टेलिफोन
क. उपग्रह
ड. वरील सर्व

उत्तर - ड. वरील सर्व

● जगभरात पसरलेल्या व एकमेकांना जोडलेल्या संगणकाच्या जाळ्याला काय म्हणतात?

अ. इंटरनेट
ब. ईमेल
क. टेलिफोन
ड. ईकॉमर्स

उत्तर - अ. इंटरनेट

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. ‘विराजमान झालेला’ या शाब्दसमुहाबद्दल योग्य असणारा शब्द कोणता?

 अतिथी

 अग्रज

 अधिष्ठित

 विद्यमान

उत्तर : विद्यमान

 2. ‘कोल्हेकुई’ या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता?

 निष्फळ बडबड

 निरर्थक गोष्ट

 क्षुद्र लोकांची ओरड

 अर्थहीन पाठांतर

उत्तर :क्षुद्र लोकांची ओरड

 3. वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची —– हे वाक्य पूर्ण करण्यात कोणता वाक्यप्रचार योग्य ठरेल?

 पित्तखवळणे

 कंबर खचणे

 कंबर बांधणे

 धकडी भरणे

उत्तर :कंबर खचणे

 4. ‘सप्तपदी’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा?

 व्दंव्द

 उपपदतत्पुरुष

 बहूव्रीही

 व्दिगू

उत्तर :व्दिगू

 5. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?

 अत्तर

 पेशवा

 तंबाखू

 दादर

उत्तर :तंबाखू

 6. ‘आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या वाक्यातील उपमान कोणते?

 माया

 तुझी

 आम्हावारी

 आभाळागत

उत्तर :आभाळागत

 7. ‘तो काम न करता नुसता फिरत असतो’. या वाक्याचा काळ ओळखा?

 रिती वर्तमानकाळ

 साधावर्तमानकाळ

 अपूर्ण वर्तमानकाळ

 रिती भूतकाळ

उत्तर :रिती वर्तमानकाळ

 8. ‘जाऊ’ या शब्दाचे अनेकवचनी रुपे कोणते?

 जाऊ

 जाववा

 ज्यावा

 जावा

उत्तर :जावा

 9. ‘दृष्टी आड सृष्टी’ या म्हणीचा अर्थ कोणता?

 दृष्टीत दोष असणे

 दृष्टीशिवाय दिसत नाही

 आंधळ्याला सृष्टी दिसत नाही

 आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे.

उत्तर :आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे.

 10. ‘केसरी’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?

 लाला लजपतराय

 सुभाषचंद्र बोस

 बाळ गंगाधर टिळक

 रामनाथ गोयंका

उत्तर :बाळ गंगाधर टिळक

 11. महात्मा गांधीजीचा जन्म कोठे झाला?

 पोरबंदर

 राजकोट

 साबरमती

 सेवाग्राम

उत्तर :पोरबंदर

 12. महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे?

 शिर्डी

 त्र्यंबकेश्वर

 नांदेड

 पैठण

उत्तर :त्र्यंबकेश्वर

 13. इंडिया गेट हे कोणत्या ठिकाणी आहे?

 दिल्ली

 मुंबई

 आग्रा

 चेन्नई

उत्तर :दिल्ली

 14. गोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवरती कोणता तलाव बांधलेला आहे?

 इटीयाडोह

 नवेगाव

 कुर्‍हाडा

 सिवनी

उत्तर :इटीयाडोह

 15. गोंदिया जिल्हयातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटन स्थळ कोणत्या तालुक्यात आहे?

 तिरोडा

 मोरगाव अर्जुनी

 सालेकसा

 देवरी

उत्तर :मोरगाव अर्जुनी

 16. तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते?

 उत्तरप्रदेश

 आंध्रप्रदेश

 महाराष्ट्र

 केरळ

उत्तर :आंध्रप्रदेश

 17. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ते निवडा.

 लोकसभा

 राज्यसभा

 विधानसभा

 विधान परिषद

उत्तर :राज्यसभा

 18. गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे केव्हा सुरू झाली?

 25 सप्टेंबर 1996

 26 सप्टेंबर 1996

 25 ऑक्टोबर 1996

 25 सप्टेंबर 1995

उत्तर :25 सप्टेंबर 1996

 19. आयएसआय ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे?

 बांग्लादेश

 इराण

 अफगाणिस्तान

 पाकिस्तान

उत्तर :पाकिस्तान

 20. सागरतळावर होणार्‍या भूकंपामुळे पाण्याला हादरे बसून पाण्यावर लाटा निर्माण होतात त्यास काय म्हणतात?

 भूकंप

 त्सुनामी

 जलतरंग

 लाटा

उत्तर :त्सुनामी

----------------------------------------

काही महत्वाची कलमे

1. घटना कलम क्रमांक 14
कायद्यापुढे समानता

2. घटना कलम क्रमांक 15
भेदभाव नसावा

3. घटना कलम क्रमांक 16
समान संधी

4. घटना कलम क्रमांक 17
अस्पृश्यता निर्मूलन

5. घटना कलम क्रमांक 18
पदव्यांची समाप्ती

6. घटना कलम क्रमांक 19 ते 22
मूलभूत हक्क

7. घटना कलम क्रमांक 21 अ
प्राथमिक शिक्षण

8. घटना कलम क्रमांक 24
बागकामगार निर्मूलन

9. घटना कलम क्रमांक 25
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

10. घटना कलम क्रमांक 26
धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

11. घटना कलम क्रमांक 28
धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

12. घटना कलम क्रमांक 29
स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

13. घटना कलम क्रमांक 30
अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

14. घटना कलम क्रमांक 40
ग्राम पंचायतीची स्थापना

15. घटना कलम क्रमांक 44
समान नागरिक कायदा

16. घटना कलम क्रमांक 45
6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

17. घटना कलम क्रमांक 46
शैक्षणिक सवलत

18. घटना कलम क्रमांक 352
राष्ट्रीय आणीबाणी

19. घटना कलम क्रमांक 356
राज्य आणीबाणी

20. घटना कलम क्रमांक 360
आर्थिक आणीबाणी

21. घटना कलम क्रमांक 368
घटना दुरूस्ती

22. घटना कलम क्रमांक 280
वित्त आयोग

23. घटना कलम क्रमांक 79
भारतीय संसद

24. घटना कलम क्रमांक 80
राज्यसभा

25. घटना कलम क्रमांक 81
लोकसभा

26. घटना कलम क्रमांक 110
धनविधेयक

27. घटना कलम क्रमांक 315
लोकसेवा आयोग

28. घटना कलम क्रमांक 324
निर्वाचन आयोग

29. घटना कलम क्रमांक 124
सर्वोच्च न्यायालय

30. घटना कलम क्रमांक 214
उच्च न्यायालय

भूगोल प्रश्नसंच

1.   धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅  - अमरावती

2.   कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते?
✅.  - कोरकू 

3.   अमरावती जिल्ह्यातून जाणार्‍या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?
✅.   - गाविलगड रांग 

4.  पैनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते?
✅.   - अजिंठा, बुलढाणा 

5.   पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
✅.   - पैनगंगा 

6.  तापी नदीच्या खोर्‍यात येणारा जिल्हा कोणता?
✅  - बुलढाणा 

 7.  अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
✅  - विषम 

8.   बाळापूर हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅  - अकोला 

9.  कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - अकोला 

10.    जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?
✅.  - अकोला 

11.   विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता?
✅   - अकोला 

12.    शिरपूर हे जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - अकोला 

13.   काटेपूर्णा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - अकोला 

14.   पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - अकोला

15.   नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते?
✅.   - बुलढाणा   

16.   कापसाचे कोठार कोणत्या शहरास संबोधतात?
✅.   - अमरावती 

17   यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमाट आढळते?
✅.   - गोंड 

18.  लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - बुलढाणा 

19.    किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - नांदेड व यवतमाळ 

20.   यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो?
✅.   - गोंडवन 

21.    लाकडाचे आधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता ?
✅.  - अमरावती 

22.   महाराष्ट्रातील बॉक्साइट कोणत्या जिल्ह्यात सापडते?
✅.  - अकोला, अमरावती 

23.  अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय?
✅.  - विदर्भ 

24.    चिखलदरा हे पर्वत शिकर कोणत्या पर्वतात आहे?
✅.  - सातपुडा 

25.  टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे?
✅.  - नांदेड व यवतमाळ 

26.  लोणार क्रेटर वनोद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.   - बुलढाणा 

27.    जलगंगा धरण कोठे आहे?
✅.  - बुलढाणा

28.  गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे?
✅.   - विदर्भ 

29.  हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
✅.  - यवतमाळ 

30.  श्री दत्त अवधुताचे जागृत स्थान कोठे आहे?
- कारंजा 

२७ ऑक्टोबर २०१९

10 चालुघडामोडी सराव प्रश्न उत्तरे

1) ट्युनिशियाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर : कैस सईद

2) भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोण आहे?
उत्तर : पंकज कुमार

3) आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरणे प्रदर्शनी (IREE) 2019’ कुठे भरविण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

4) कोणत्या बँकेने 2018-19 ‘डिजीधन मिशन डिजिटल पेमेंट्स अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकला?
उत्तर : येस बँक

5) भारतीय भूदलाचा ‘सिंधू सुदर्शन’ सराव कोणत्या राज्यात घेण्यात आला?
उत्तर : राजस्थान

6) केंद्र सरकारने कोणत्या दूरसंचार कंपनीला BSNLमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर : MTNL (महानगर टेलीफोन निगम लिमिटेड)

7) भारतीय हवाई दल 83 ‘तेजस’ LCA विमानांसाठी कुणासोबत करार करणार आहे?
उत्तर : हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

8) ‘2019 वुशू विश्व अजिंक्यपद’ या स्पर्धेत 48 किलो गटात कोणी सुवर्णपदक पटकावले?
उत्तर : प्रवीण कुमार

9) ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 24 ऑक्टोबर

10) ‘IUCN रेड लिस्ट’मध्ये हिमबिबट्याला कोणत्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे?
उत्तर : असुरक्षित

--------------------------------------------------------

--------------------------------------------------------

--------------------------------------------------------

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...