२१ ऑक्टोबर २०१९

चालू घडामोडी प्रश्नसंच 21/10/2019

📌कोणत्या औषधीनिर्माता कंपनीने औषधी-प्रतिरोधक क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध तयार केले?

(A) सिप्ला
(B) मायलान✅✅✅
(C) सन फार्मास्युटिकल
(D) ल्युपिन

📌‘ईस्टर्न ब्रिज-5’ हा भारत आणि ____ या देशादरम्यानचा संयुक्त हवाई सराव आहे.

(A) ओमान✅✅✅
(B) संयुक्त अरब अमिराती
(C) इस्त्राएल
(D) जापान

📌एस. पी. मुखर्जी यांच्या नावावरून नामकरण करण्यात येणारा चेनानी-नाश्री बोगदा _ या राज्यात आहे.

(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू व काश्मीर✅✅✅
(C) उत्तराखंड
(D) अरुणाचल प्रदेश

📌जागतिक पोलाद संघाच्या (वर्ल्डस्टील) उपाध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली?

(A) टी. व्ही. नरेंद्रन
(B) लक्ष्मी मित्तल
(C) शशी रुईया
(D) सज्जन जिंदल✅✅✅

📌राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) याचे मुख्य कार्यालय _ येथे आहे.

(A) बेंगळुरू
(B) पुणे
(C) हैदराबाद✅✅✅
(D) नवी दिल्ली

२० ऑक्टोबर २०१९

चालू घडामोडी वन लाइनर्स, 20 ऑक्टोबर 2019.


✳ बंगाल वॉरियर्सने प्रो कबड्डी लीग 7 चे विजेतेपद जिंकण्यासाठी दबंग दिल्लीला पराभूत केले

✳ 54 वी भारतीय रेल्वे रायफल नेमबाजी स्पर्धा पुणे येथे सुरू

✳ दुसरा भारत-म्यानमार नौदल व्यायाम 'आयएमएनएक्स -19' 'विशाखापट्टणम येथे आयोजित केला जाईल

✳ रिलायन्स इंडस्ट्रीज 9 ट्रिलियन रुपयांची मार्केट कॅप पार करणारी भारताची पहिली कंपनी बनली

✳ वाको वर्ल्ड ज्येष्ठ किकबॉक्सिंग चँपियनशिप 2019 बोस्नियामध्ये होणार आहे

✳ श्रीलंका मनी लॉन्ड्रिंगच्या जोखमीवर असलेल्या देशांच्या एफएटीएफ यादीतून काढून टाकली

✳ एशियन ट्रॅक सायकलिंग सी’शिप्स कोरियाच्या इंचिओनमध्ये सुरू होते

✳ एशियन ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत रोनाल्डोसिंग स्लीव्हर जिंकला

✳ एशियन ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत त्रिश्या पॉल वोन कांस्य

✳ उत्तराखंड सरकारने गुटखा निर्मिती, साठवण आणि विक्रीवर बंदी घातली आहे

✳ 7 वा सीआयएसएम जागतिक सैन्य खेळ चीनच्या वुहान येथे प्रारंभ होत आहेत

✳ स्टीव्ह स्मिथने आयसीसीच्या ताज्या कसोटीतील फलंदाज क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे

✳ आयसीसीच्या ताजी बॅट्समन क्रमवारीत विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ केसी विल्यमसनने आयसीसीच्या ताज्या कसोटीतील बॅट्समन क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले

✳ पुजाराने आयसीसीच्या ताज्या कसोटीतील बॅट्समन क्रमवारीत चौथा क्रमांक पटकावला

✳ आयसीसीच्या ताजी बॅट्समन क्रमवारीत रहाणे 9 व्या स्थानावर आहे

✳ आयसीसीच्या नवीनतम कसोटी बॉलिंग क्रमवारीत कमिन्स प्रथम क्रमांकावर आहे

✳ सी. रबाडाने ताज्या आयसीसीच्या कसोटी बॉलिंग क्रमवारीत द्वितीय क्रमांक मिळवला

✳ आयसीसीच्या ताज्या कसोटी बॉलिंग क्रमवारीत जे बुमराह तिसरा या क्रमांकावर आहे

✳ आर. अश्विनने आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत 7 वे स्थान मिळविले

✳ पंतप्रधान मोदींनी तुर्कीला भेट दिली

✳ रजनीश कुमार भारतीय बॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले

✳ इराण इलेक्टेड आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा असोसिएशनचे ब्युरो सदस्य

✳ अर्जुन कपूर यांनी चेल्सी एफसी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली

✳ बजरंग पुनिया मोबिल इंडियाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कार्यरत

✳ ग्लोबल पाळत ठेवणे निर्देशांकातील डेटा प्रायव्हसीसाठी रशियाचा सर्वात क्रमांकावर आहे

✳ ग्लोबल पाळत ठेवणे निर्देशांकातील डेटा गोपनीयतेसाठी चीनने दुसर्‍या क्रमांकाचा क्रमांक लावला

✳ ग्लोबल पाळत ठेवणे निर्देशांकातील डेटा गोपनीयतेसाठी भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे

✳ 2022 मध्ये भारत 91 वी इंटरपोल जनरल असेंब्लीचे आयोजन करणार आहे

✳ येस बँकेने एमएसएमई असोसिएशनला डिजीटल करण्यासाठी 'ये स्केल' सुरू केले

✳ एसबीआयने युनायटेड किंगडममध्ये मोबाईल अॅप 'योनो' सुरू केले

✳ जपान पाकिस्तानमध्ये कुशल पाकिस्तानी कामगारांना नोकरीसाठी सामंजस्य करार करेल

✳ शी जिनपिंग नेपाळच्या दौर्‍यावर येण्यासाठी 2 दशकांत चीनचे पहिले अध्यक्ष बनले

✳ ओडिशाच्या दुती चंदने स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला

✳ मलेशियामध्ये जोहान चषक 9 वा सुलतान

✳ ब्रिटनने जोहोर चषकातील 9 वा सुलतान ऑफ इंडिया जिंकला

✳ श्रीलंका एफएटीएफच्या ग्रे यादीतून काढली

✳ डेरामार्क मध्ये आयोजित पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय 2019

✳ पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय 2019 मध्ये प्रमोद भगतने कांस्य जिंकला

✳ चौथा भारत-आसियान व्यवसाय समिट मनिला मध्ये आयोजित

✳ मनिला मध्ये भारत-फिलीपिन्स व्यवसाय संमेलन आयोजित.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) अरेरे! फार वाईट झाले. या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

   1) शोकदर्शक    2) प्रशंसादर्शक   
   3) तिरस्कारदर्शक  4) यापैकी नाही

उत्तर :- 1

2) ‘तुम्ही पुढे व्हा, मी आलोच’ या विधानातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ    2) संनिहित भविष्यकाळ 
   3) भूतकाळ    4) अपूर्ण वर्तमानकाळ

उत्तर :- 2

3) ‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते ?

   1) स्त्रीलिंग    2) पुल्लिंग   
   3) नपुंसकलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

4) काल आमच्या घरी खूप पाहूणे आले होते. या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत ?

   1) षष्ठी व प्रथमा    2) सप्तमी व प्रथमा   
   3) पंचमी व व्दितीया  4) षष्ठी व व्दितीया

उत्तर :- 2

5) कोल्ह्याला द्राक्षे आंबट – या म्हणीचा अर्थ योग्य पर्याय निवडून सांगा.

   1) कोल्हा मांस भक्षक असल्याने द्राक्षे खात नाही    2) न मिळणा-या गोष्टीला नावे ठेवणे
   3) कोल्ह्याला द्राक्षे आंबटच लागतात      4) कोल्ह्याला द्राक्षे आवडत नाहीत

उत्तर :- 2

6) ‘सुताराने पाळणा केला’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्यपृथक्करणात काय म्हणतात ?

   1) मूळ उद्देश्य      2) विधेय पूरक   
   3) उद्देश्य विस्तारक    4) मुळ विधेय

उत्तर  :- 2

7) खालील पर्यायी उत्तरांतील भावे प्रयोग असणारे वाक्य कोणते ?

   1) ती गाणे गाते      2) ती घरी  जाते   
   3) तिने गाणे म्हटले    4) तिला घरी जाववते

उत्तर :- 4

8) या समासात व्दितीय पद प्रधान असतो त्याला ....................... समास म्हणतात.

   1) व्दंव्द समास      2) कर्मधारय समास 
   3) तत्पुरुष समास    4) यापेक्षा वेगळे उत्तर

उत्तर :- 3

9) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी कोणते चिन्ह वापराल.

   1) स्वल्पविराम    2) पूर्णविराम   
   3) अर्धविराम    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

10) खालीलपैकी देशी शब्द ओळखा.
   1) इडली    2) लुगडे     
   3) समोसा    4) अथाणु

उत्तर :- 2

१९ ऑक्टोबर २०१९

Importnat for police bharati

• देशातील पहिली संत्रा वायनरी.
:- सावरगाव (नागपूर).

• देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन.
:- पुणे.

• देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात.
:- अरुणाचल प्रदेश.

• देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ.
:- नागपूर.

• देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी.
:- चैन्नई.

• देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय.
:- ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे).

• देशातील पहिले दूरदर्शन केंद्र.
:- दिल्ली.

• देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र.
:- पुणे.

• देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य.
:- कर्नाटक.

• देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प.
:- ताडोबा (चंद्रपूर).

• देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य.
:- हिमाचलप्रदेश.

• देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली.
:- बंगलोर.

• देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे.
:-  पुणे.

• देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य.
:- सिक्किम.

• देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी.
:-  पुणे.

• देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव.
:- गरिफेमा.

• देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर .
:- झारखंड.

• देशातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य .
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य .
:-  त्रिपूरा.

• देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर.
:- सुरत.

• देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य .
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य.
:-  तामिळनाडू.

• देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक.
:-  बंगळूर.

• देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य.
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य.
:-  महाराष्ट्र.

• देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प.
:- कांडला (गुजरात).

• देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य.
:- प.बंगाल.

• देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य.
:-  मध्यप्रदेश.

• देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ.
:- राज्यस्थान.

• देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र.
:- हडपसर (पुणे).

• देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य.
:- हरीयाणा.

• देशातील पहिले स्त्री बटालियन.
:- हडी राणी (राजस्थान).

• देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले ई – पंचायत सुरु करणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य.
:-  दिल्ली.

• देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा.
:- नदिया (प.बंगाल).

• देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य.
:-  महाराष्ट्र.

• देशातील पहिला खासगी विमानतळ.
:-  दुर्गापूर (प.बंगाल).

• देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले.
:- दिल्ली.

• देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ.
:- वापी (गुजरात).

• देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य.
:- उत्तराखंड.

• देशातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क.
:- भुवनेश्वर.

• देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य.
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प.
:- आळंदी.

• देशातील पहिले सॅटेलाईट शहर.
:- पिलखूआ (उत्तरप्रदेश).

• देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज.
:- काटेवाडी.

• देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिला निर्मल जिल्हा.
:- कोल्हापूर.

• देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली.
:- भुसावळ – आजदपूर.

• देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी.
:- मुंबई.

• देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य.
:- गुजरात.

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 19/10/2019


1. 3,8,?,21,29,38 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

 13

 12

 15

 14

उत्तर : 14

 

2. 1,1,1,2,4,8,?,9,27 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

 4

 6

 8

 3

उत्तर :3

 

3. A,C,F,J,O,? वरील अक्षरमालेत प्रश्न चिन्हाचे जागी कोणते अक्षर येईल?

 T

 V

 U

 S

उत्तर :U

 

4. बीड जिल्ह्यातील —– या ठिकाणी इ.स. 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा दारुण पराभव केल होता?

 खंडेश्वरी

 राक्षसभुवन

 किल्ले धारूर

 धर्मापुरी

उत्तर :राक्षसभुवन

 

5. बीड जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग मादवळमोही-पाडळशिंगी-माजलगाव या महामार्गाचा क्रमांक काय आहे?

 211

 222

 212

 224

उत्तर :211

 

6. आय.सी.सी. 20-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2014 चा विश्व विजेता देश कोणता?

 भारत

 पाकिस्तान

 श्रीलंका

 वेस्टइंडीज

उत्तर :श्रीलंका

 

7. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड (जि.पुणे) येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

 नागनाथ कोत्तापल्ले

 फ.मु. शिंदे

 उत्तम कांबळे

 वसंत डाहके

उत्तर :फ.मु. शिंदे

 

8. हसविणारा वायु कोणत्या वायुस म्हटले जाते?

 नायट्रोजन ऑक्साईड

 कार्बन डाय ऑक्साईड

 सल्फर डाय ऑक्साईड

 कार्बन मोनोक्साईड

उत्तर :सल्फर डाय ऑक्साईड

 

9. खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही?

 कोराडी

 कोयना

 परळी

 एकलहरे

उत्तर :कोयना

 

10. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

 लॉन टेनिस

 बॅडमिंटन

 स्कोश

 टेबल टेनिस

उत्तर :बॅडमिंटन

 

11. खालील वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा? परमेश्वर सर्वत्र असतो.

 विशेषण

 क्रियाविशेषण

 क्रियापद

 सर्वनाम

उत्तर :क्रियापद

 

12. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा?

रामाने रावणास मारले.

 कर्तरी प्रयोग

 कर्मणी प्रयोग

 भावे प्रयोग

 मिश्र वाक्य

उत्तर :भावे प्रयोग

 

13. खालील वाक्यातील अलंकार ओळखा?

 जाणावा तो ज्ञानी! पूर्ण समाधानी!

 निसं:देह मनी! सर्वकाळ!!

 अनुप्रास

 यमक

 श्लेष

 अर्थालंकार

उत्तर :यमक

 

14. समानार्थी शब्द ओळखा? हत्ती:

 समीरण

 हेम

 कुंजर

 मृगेंद्र

उत्तर :कुंजर

 

15. समानार्थी शब्द ओळखा? समुद्र:

 सिंधु

 आदित्य

 सारंग

 समर

उत्तर :सिंधु

 

16. विरुद्धार्थी शब्द ओळखा? कृश:

 अकृश

 विकृश

 कृपण

 स्थूल

उत्तर :स्थूल

 

17. विरुद्धार्थी शब्द ओळखा? शुद्धपक्ष:

 अशुद्धपक्षी

 विशुद्धपक्षी

 शुल्कपक्ष

 वद्यपक्ष

उत्तर :वद्यपक्ष

 

18. केलेले उपकार जाणणारा.

 कृतघ्न

 कृतज्ञ

 कर्तव्यपरायमुख

 उपकृत

उत्तर :कृतज्ञ

 

19. ‘ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?

 एकाच गावात खूप बाभळी असणे

 निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे

 शेजारी पाजारी वास्तव्य असणे

 सहवासाने शेजार्‍याचा गुण घेणे

उत्तर :निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे

 

20. ‘उंटावरचा शहाणा’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?

 मूर्खासारखे सल्ले देणारा

 शहाणपण शिकवणारा

 योग्य सल्ला देणारा

 मदत करणारा

उत्तर : मूर्खासारखे सल्ले देणारा

चालू घडामोडी प्रश्नसंच आणि स्पष्टीकरण १९/१०/२०१९

प्र.१) अलीकडेच चर्चेत असलेले ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?

(अ) औषधी
(ब) जलशुद्धीकरण✅✅✅
(क) तांत्रिक शिक्षण
(ड) खगोलशास्त्र

स्पष्टीकरण : अलीकडेच चर्चेत असलेले ‘लोटस-HR’ हे जलशुद्धीकरण संबंधित आहे.

प्र.२) कोणती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींना (महिला) मदत करण्याच्या उद्देशाने आहे?

(अ) सुकन्या समृद्धी
(ब) CBSE उडान योजना
(क) विज्ञान ज्योती✅✅✅
(ड) बेटी बचाओ बेटी पढाओ

स्पष्टीकरण : विज्ञान ज्योती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींना (महिला) मदत करण्याच्या उद्देशाने आहे.

प्र.३) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(अ) डॉ. मनमोहन सिंग
(ब) डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम✅✅✅
(क) अटलबिहारी वाजपेयी
(ड) चेतन भगत

स्पष्टीकरण : ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आहेत.

प्र.४) _ या संस्थेनी ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस, मेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

(अ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(ब) जागतिक आर्थिक मंच (WEF)
(क) जागतिक बँक✅✅✅
(ड) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)

स्पष्टीकरण : जागतिक बँक या संस्थेनी ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस, मेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

प्र.५) 📌2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?

(अ) अॅना बर्न्स आणि सॅली रुनी
(ब) जॉर्ज सौन्डर्स आणि अॅना बर्न्स
(क) पॉल बेटी आणि मार्लन जेम्स
(ड) मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो
      ✅✅✅

स्पष्टीकरण : ) 2019 सालाचा बुकर पुरस्कार मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो यांनी जिंकला.

प्र.६) UNICEF या संस्थेच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

अ) अमेरिकेत बालमृत्यू दर सर्वात कमी आहे.

ब) ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो.

(अ) केवळ अ
(भ) केवळ ब✅✅✅
(क) अ आणि ब दोन्ही
(ड) यापैकी एकही नाही

स्पष्टीकरण : UNICEF या संस्थेच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाच्या संदर्भात खालीलपैकी ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो, हे विधान चुकीचे आहे.

प्र.७) ___ या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.

(अ) 10 ऑक्टोबर
(ब) 12 ऑक्टोबर
(क) 13 ऑक्टोबर
(ड) 15 ऑक्टोबर✅✅✅

स्पष्टीकरण : 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.

प्र.८) कोण WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली?

(क) करोलिना प्लिस्कोवा
(ब) नाओमी ओसाका
(क) अॅशले बार्टी
(ड) कोको गॉफ✅✅✅

स्पष्टीकरण : कोको गॉफ हि महिला WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली.

प्र.९) __ येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

(अ) रशिया✅✅✅
(ब) न्युझीलँड
(क) भारत
(ड) जर्मनी

स्पष्टीकरण : रशिया येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

प्र.1०) __ याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

(अ) किमर कोपेजन्स
(ब) लक्ष्य सेन✅✅✅
(क) मॅट मोरिंग
(ड) युसुके ओनोडेरा

स्पष्टीकरण : लक्ष्य सेन याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 सराव प्रश्न

1) पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही?

   1) विनी    2) खेरीज    3) देखील    4) निराळा

उत्तर :- 3

2) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे.’

   1) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
   3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

3) ठीक ! या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.

   1) प्रशंसा    2) विरोध      3) आश्चर्य    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

4) ‘मी निबंध लिहीत असतो.’ या ‍विधानातील काळाचा प्रकार कोणता ?

   1) साधा वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमानकाळ      4) रीती वर्तमानकाळ

उत्तर :- 4

5) ‘वाघ’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) वाघिण    2) वाघिन    3) वाघ्रीन    4) वाघीण

उत्तर :- 4

6) ‘तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

   1) कर्ता    2) अपादान    3) करण      4) अधिकरण

उत्तर :- 3

7) ‘सर्वांनी सकाळी लवकर उठावे’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) संकेतार्थी    2) स्वार्थी    3) आज्ञार्थी    4) विध्यर्थी

उत्तर :- 4

8) खालील विधानातील उद्देश्यविस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा.

     ‘शिवाजीचा भाऊ व्यंकोजी तंजावरास गेला.’

   1) व्यंकोजी    2) शिवाजी    3) शिवाजीचा भाऊ  4) तंजावरास

उत्तर :- 3

9) ‘शिपायाकडून चोर धरला गेला.’ हे या प्रयोगातील वाक्य होय.

   1) भावे    2) कर्मकर्तरी    3) कर्तृकर्तरी    4) कर्मणी

उत्तर :- 2

10) ‘पुरणपोळी’ या शब्दाचा अर्थ

   1) पुरण भरलेली पोळी      2) पुरणाची पोळी
   3) पुरण आणि पोळी      4) गूळ घालून केलेली पोळी

उत्तर :- 1

पोलीस भरती साठी महत्वाचे आजार व त्याचे स्त्रोत


स्त्रोत:-आजार

हवेमार्फत पसरणारे आजार:-क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), गोवर : जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, अॅथ्रक्स, पोलिओ.

कवकांमुळे (Fungus) होणारे आजार:-रिंगवर्म, मदूरा फूट, अॅथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.

कृमींमुळे (Worms) होणारे आजार:-अस्करियासिस, अंकिलोस्टोमियासिस, टिनीयोसिस, नारू (ड्रॅकयूनक्युलस मेडीनेसीस), विविध कृमी संसर्गामुळे होणारे (गोलकृमी, अंकुश कृमी) रक्तक्षय, हत्तीरोग – (फायलेरिया) (नूचेरिया बॅन्क्रोप्टी, बी.मालायी).

आनुवंशिक आजार:-हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम

काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना

                ★G- 4 संघटना★

●सदस्य देश - ब्राझील , भारत , जर्मनी , जपान
●उद्देश - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी स्थान प्राप्त करणे

                  ★G-5 संघटना★
●सदस्य देश - भारत, चीन, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका
●उद्देश - वेगाने विस्तारित होणाऱ्या आर्थिक जगतात परस्पर साहाय्य व सहयोग याद्वारे विकास साध्य करणे.
      
                 ★G-6 संघटना★
●सदस्य देश - अमेरिका , युनायटेड किंगडम , फ्रांस , जर्मनी , इटली , जपान
  
                ★G-7 संघटना★
●सदस्य देश- अमेरिका , फ्रांस , इटली , कॅनडा , जपान , जर्मनी , युनायटेड किंगडम
--------------------------------------------------------

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...