१६ ऑक्टोबर २०१९

चालू घडामोडी १६/१०/२०१९

📍 जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स ऑन _ गव्हर्नन्स’ या युतीमध्ये भारत सामील झाला.

(A) रोबोटिक्स
(B) टेक्नॉलॉजी ✅✅
(C) एज्युकेशन
(D) हेल्थ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ____ येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

(A) रशिया✅✅
(B) न्युझीलँड
(C) भारत
(D) जर्मनी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍__________ याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

(A) किमर कोपेजन्स
(B) लक्ष्य सेन ✅✅
(C) मॅट मोरिंग
(D) युसुके ओनोडेरा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍_____ मध्ये ‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला.

(A) कर्नाटक
(B) ओडिशा
(C) राजस्थान
(D) मध्यप्रदेश ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 _ यांना 2019 सालाचा नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला.

(A) फिलेमोन यांग
(B) अबी अहमद अली✅✅
(C) जुहा सिपिला
(D) नरेंद्र मोदी

📌अलीकडेच चर्चेत असलेले ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?

(A) औषधी
(B) जलशुद्धीकरण✅✅✅
(C) तांत्रिक शिक्षण
(D) खगोलशास्त्र

📌कोणती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींना (महिला) मदत करण्याच्या उद्देशाने आहे?

(A) सुकन्या समृद्धी
(B) CBSE उडान योजना
(C) विज्ञान ज्योती✅✅✅
(D) बेटी बचाओ बेटी पढाओ

📌‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) डॉ. मनमोहन सिंग
(B) डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम✅✅✅
(C) अटलबिहारी वाजपेयी
(D) चेतन भगत

📌_____ या संस्थेनी ‘साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस, मेकिंग (डी)सेंट्रलायझेशन वर्क’ संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

(A) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(B) जागतिक आर्थिक मंच (WEF)
(C) जागतिक बँक✅✅✅
(D) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)

📌2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?

(A) अॅना बर्न्स आणि सॅली रुनी
(B) जॉर्ज सौन्डर्स आणि अॅना बर्न्स
(C) पॉल बेटी आणि मार्लन जेम्स
(D) मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो
      ✅✅✅

📌UNICEF या संस्थेच्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

I) अमेरिकेत बालमृत्यू दर सर्वात कमी आहे.

II) ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड्स चिल्ड्रेन’ अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो.

(A) केवळ I
(B) केवळ II✅✅✅
(C) I आणि II दोन्ही
(D) यापैकी एकही नाही

📌___________ या दिवशी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो.

(A) 10 ऑक्टोबर
(B) 12 ऑक्टोबर
(C) 13 ऑक्टोबर
(D) 15 ऑक्टोबर✅✅✅

📌कोण WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली?

(A) करोलिना प्लिस्कोवा
(B) नाओमी ओसाका
(C) अॅशले बार्टी
(D) कोको गॉफ✅✅✅

📌__________ येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

(A) रशिया✅✅✅
(B) न्युझीलँड
(C) भारत
(D) जर्मनी

📌__________ याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

(A) किमर कोपेजन्स
(B) लक्ष्य सेन✅✅✅
(C) मॅट मोरिंग
(D) युसुके ओनोडेरा

📌_____ मध्ये ‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला.

(A) कर्नाटक
(B) ओडिशा
(C) राजस्थान
(D) मध्यप्रदेश✅✅✅

📌_____ यांना 2019 सालाचा नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला.

(A) फिलेमोन यांग
(B) अबी अहमद अली✅✅✅
(C) जुहा सिपिला
(D) नरेंद्र मोदी

जेम्स पिबलेज ह्यांच्या समवेत मिशेल मेयर व दिदीएर क्वेलोज यांनी _____ शास्त्रामधील 2019 नोबेल पारितोषिक जिंकला.

(A) वैद्यकीयशास्त्र
(B) भौतिकशास्त्र✅✅✅
(C) साहित्य
(D) अर्थशास्त्र

📌कोणत्या व्यक्तीने 2019 या वर्षासाठीचे रसायनशास्त्रामधले नोबेल पारितोषिक जिंकले?

(A) जॉर्ज स्मिथ
(B) जोचीम फ्रँक
(C) जॉन बी. गुडइनफ✅✅✅
(D) फ्रेझर स्टोडार्ट


मराठमाेळ्या सौरभ अम्बुरेला मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान

📌 लातूर जिल्ह्यातील उदगीरचे शत्रूला धडकी भरवणारे 'राफेल' हे अत्याधुनिक लढाऊ विमान विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारतीय वायुदलात सहभागी झाले. उदगीरात बालपण गेलेल्या भारतीय हवाई दलातील मराठमोळे स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांस अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेल' उडवण्याचा पहिला मान मिळालेला आहे.

📌 भारतीय वायुदलामध्ये अत्याधुनिक लढाऊ विमान राफेल सहभागी झाल्याचा आनंद भारतीयांना झालेला आहे. परंतु राफेल विमान उडवण्याचा पहिला मान उदगीरात बालपण गेलेल्या स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांना मिळाल्याने येथील नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे.

📌 स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अम्बुरे यांचे उदगीर हे आजोळ आहे. कर्नाटकातील बिदर हे त्यांचे मूळ गाव असले तरी त्यांचे आई-वडील दोघेही उदगीर येथे एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये नोकरीस होते. त्यामुळे अम्बुरे कुटुंबीय उदगीरात वास्तव्यास होते.

📌स्क्वाड्रन लीडर सौरभ अम्बुरे यांचे प्राथमिक शिक्षण येथील विद्यावर्धिनी इग्लिश स्कूल येथे झालेले आहे त्यानंतर त्याचे पुढील शिक्षण हे सातारा सैनिक स्कूल येथे झाले आहे. स्क्वाड्रन लीडर अम्बुरे यांचे आई-वडील सध्या हैदराबाद येथे राहत असल्याचे त्यांच्या उदगीर येथील आजोळमधील नातलगांनी सांगितले.....

भूगोल प्रश्नसंच 16/10/2019

1) ‘जेटस्ट्रीम’ चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा :
   अ) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वा-यांच्या दरम्यान आढळतात.
   ब) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.
   क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.
   ड) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.
   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) ब आणि ड
उत्तर :- 1

2) एल् निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
   1) ॲटलांटिक    2) पॅसिफिक    3) इंडियन    4) आर्कटिक
उत्तर :- 2

3) भारतीय हवामान खात्याने मान्सून वा-याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करून चार ऋतू मानलेले आहेत, या ऋतूच्या
     सोबत कालावधी दिला आहे, यापैकी अचूक पर्याय ‍निवडा.
   अ) नैऋत्य मान्सून काळ  -  जून ते ऑक्टोबर     ब) मान्सून उत्तर काळ  -  ऑक्टोबर ते डिसेंबर
   क) ईशान्य मान्सून काळ  -  जानेवारी ते फेब्रुवारी   ड) मान्सून पूर्व काळ  -  मार्च ते मे
   1) फक्त अ विधान बरोबर आहे.      2) ब आणि क विधाने बरोबर आहेत.
   3) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर :- 4

4) भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्राने ‘Amw’ हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे ?
   1) निमशुष्क स्टेपी हवामान    2) मोसमी हवामान अल्पकालीन शुष्क हिवाळी
   3) मान्सून शुष्क हिवाळी      4) ध्रुवीय शुष्क हिवाळी
उत्तर :- 2

5) खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते ?
   1) हवेचा दाब    2) तापमान    3) वा-याची दिशा    4) सूर्यप्रकाश
उत्तर :- 2

चालू घडामोडी वन लाइनर्स,15 ऑक्टोबर 2019.


✳ 12 ऑक्टोबर: जागतिक स्थलांतरित पक्षी दिन

✳ थीम 2019: "पक्ष्यांचे रक्षण करा: प्लास्टिक प्रदूषणाचे निराकरण व्हा"

✳ 13 ऑक्टोबर: आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

✳ थीम 2019: "गंभीर पायाभूत सुविधा आणि मूलभूत सेवांचे व्यत्यय यांचे आपत्तीचे नुकसान कमी करा"

✳ 15 ऑक्टोबर: ग्रामीण महिलांचा आंतरराष्ट्रीय दिन

✳ थीम 2019: "ग्रामीण महिला आणि मुली इमारत हवामानातील लचीला"

✳ 16 ऑक्टोबर: जागतिक अन्न दिन

✳ थायलंडमध्ये आरसीईपीची इंटरसिशनल मंत्रीमंडळ बैठक आयोजित केली जाईल

✳ पीयूष गोयल आरसीईपीच्या 9 व्या इंटरसिशनल मिनिस्टरी मिलिटरीला उपस्थित राहणार आहेत

✳ आर्मी कमांडरची परिषद नवी दिल्ली येथे सुरू झाली

✳ स्टीव्ह स्मिथने आयसीसीच्या ताज्या कसोटीतील फलंदाज क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे

✳ आयसीसीच्या ताजी बॅट्समन क्रमवारीत विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ केसी विल्यमसनने आयसीसीच्या ताज्या कसोटीतील बॅट्समन क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले

✳ पुजाराने आयसीसीच्या ताज्या कसोटीतील बॅट्समन क्रमवारीत चौथा क्रमांक पटकावला

✳ आयसीसीच्या ताजी बॅट्समन क्रमवारीत रहाणे 9 व्या स्थानावर आहे

✳ आयसीसीच्या नवीनतम कसोटी बॉलिंग क्रमवारीत कमिन्स प्रथम क्रमांकावर आहे

✳ सी. रबाडाने ताज्या आयसीसीच्या कसोटी बॉलिंग क्रमवारीत द्वितीय क्रमांक मिळवला

✳ आयसीसीच्या ताज्या कसोटी बॉलिंग क्रमवारीत जे बुमराह तिसरा या क्रमांकावर आहे

✳ आर. अश्विनने आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत 7 वे स्थान मिळविले

✳ मार्गारेट वुड आणि बर्नार्डिन एव्हारिस्टो संयुक्तपणे बुकर पुरस्कार 2019

✳ बहरैन ओपन येथे प्रियांशु राजावतने पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविण्याचा दावा केला

✳ रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन युएईच्या 2 दिवसाच्या राज्य दौर्‍यावर असतील

✳ पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची मदत बिहार सरकार देईल

✳ *अर्थशास्त्र 2019 मध्ये नोबेल पुरस्कार*

✳ अर्थशास्त्र 2019 मधील नोबेल पुरस्कार अभिजित बॅनर्जी, एस्तेर डुफलो, मायकेल क्रेमर यांना प्रदान

✳ भारतीय-अमेरिकन अभिजित बॅनर्जी यांनी वर्ष 2019 साठी अर्थशास्त्र नोबेल जिंकले

✳ अभिजीत बॅनर्जी नोबेल जिंकणारा 8 वा भारतीय वंशाचा व्यक्ती आहे

✳ झिम्बाब्वे आणि नेपाळ निलंबन काढून टाकल्यानंतर आयसीसीचे सदस्य म्हणून परत

✳ राष्ट्राध्यक्ष आर एन कोविंद गुरुवारपासून जपानच्या फिलिपाईन्सच्या 7 दिवसांच्या दौर्‍यावर येणार आहेत

✳ सौरव गांगुली बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होतील

✳ फिल सिमन्स यांची वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक

✳ अनूप कुमार मेंडीरत्ता कायदेविषयक व्यवहार म्हणून नेमणूक सचिव

✳ कैस सईद ट्युनिशियाचे निवडलेले अध्यक्ष

✳ वर्ल्ड बँकेने FY20 साठी 6% व  7.5% टक्क्यांपर्यंत वाढीचा अंदाज वर्तविला आहे.

✳ रणवीर सिंगमध्ये ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून मानवर दोर्‍या

✳ केरळ नेदरलँड्सबरोबर कागदपत्रे सामायिक करण्यासाठी सामंजस्य करार करणार आहे

✳ बहिन व केरळ यांनी फिन-टेक, आयसीटी मधील सहकार्यासाठी सामंजस्य करार केला

✳ फिफा आणि डब्ल्यूएचओ, निरोगी राहण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार करतो

✳ जेएनयू आणि आयसीएमआर ने शिक्षण व संशोधन क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला

✳ आयसीसीने 2019 वर्ल्ड कपचा निर्णय घेतलेल्या बाउंड्री मोजणी नियम

✳ सप्टेंबर 2019 मध्ये डब्ल्यूपीआय महागाई दर 0.33% पर्यंत खाली आला

✳ आयएनडीडब्ल्यू वि एसएयूः भारताने दक्षिण आफ्रिकेला 6 धावांनी पराभूत केले

✳ क्रिकेटपटू मिताली राजने कर्णधार म्हणून 100 वे वन डे जिंकला

✳ एसएएफएफ महिला अंडर -15  स्पर्धेची सुरुवात भूतानमध्ये

✳ आंध्र प्रदेशात शेतकर्‍यांसाठी "रायथू भरोसा योजना" सुरू झाली

✳ आरबीआय पीएमसी बँकेच्या ग्राहकांच्या पैसे काढण्याची मर्यादा ,40000 पर्यंत वाढवते.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.

   1) सावकारशाही    2) राजेशाही   
   3) सामंतशाही      4) जमीनदारशाही

उत्तर :- 3

2) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

   1) आध्यात्मिक      2) अध्यात्मिक   
   3) आध्यात्मीक      4) अधात्मिक
उत्तर :- 1

3) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?

   1) क्     2) ण्     3) ळ      4) क्ष्
उत्तर :- 3

4) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

   1) पुर्नजन्म    2) पूर्ण जन्म    3) पुनर्जन्म    4) पुनर्जम्न

उत्तर :- 3

5) अचूक विधाने निवडा.

   अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
   ब) शब्दापासून पदे बनतात.
   क) पदापासून शब्द बनतात.
   1) फक्त अ अचूक  2) फक्त अ आणि क अचूक
   3) फक्त ब अचूक    4) फक्त क अचूक

उत्तर :- 3

6) तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता?

   1) केलेले उपकार जाणणारा    2) केलेले उपकार न जाणणारा
   3) हालअपेष्टा सहन करण्याचा गुण    4) जाणून घेण्याची इच्छा असणारा

उत्तर :- 3

7) योग्य शब्द निवडा.

   1) अल्पसंख्याक    2) अल्पसंख्यांक   
   3) अल्पसख्यांक    4) अल्पसंख्याकं

उत्तर :- 1

8) पुढील स्वर जोडयातून सजातीय स्वर जोडी ओळखा.

   1) उ – ऊ    2) अ – इ   
   3) इ – ए    4) अ – ई

उत्तर :- 1

9) ‘अंत:करण’ या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.

   1) अंत: + करण      2) अंतस् + करण   
   3) अत:स् + करण    4) अंतर् + करण

उत्तर :- 4

10) श्रीमंत माणसांना गर्व असतो. – या वाक्यातील विशेषणाचे नाम करा.

   1) श्रीमंतांना गर्व असतो    2) श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात
   3) माणसांना गर्व असतो    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

१५ ऑक्टोबर २०१९

आजपर्यंतचे नोबेल पुरस्काराचे भारतीय मानकरी


● रवींद्रनाथ टागोर - 1913 - साहित्याचा नोबेल

● चंद्रशेखर व्यंकट रमण-1930 - भौतिकशास्त्र नोबेल

●हरगोविंद खुराणा-1969- वैद्यकशास्त्र नोबेल

●मदर तेरेसा – 1978 -  शांततेचा नोबेल

●सुब्रमण्यम चंद्रशेखर - 1983 - भौतिकशास्त्र नोबेल

●अमर्त्य सेन - 1998 -  अर्थशास्त्र नोबेल

●व्ही.एस.नायपॉल - 2001 - साहित्याचा नोबेल

●व्यंकटरमण रामकृष्णन- 2009- रसायनशास्त्र नोबेल

●कैलाश सत्यार्थी – 2014 - शांततेचा नोबेल

●आर.के.पचौरी - 2015 - शांततेचा नोबेल

●अभिजित बॅनर्जी-2019 - अर्थशास्त्र नोबेल

✅ भारतीयांना प्राप्त नोबेल पारितोषिक:-

साहित्याचा नोबेल - 2
शांतता नोबेल - 3
अर्थशास्त्र नोबेल - 2
वैद्यकशास्त्र नोबेल - 1
भौतिकशास्त्र नोबेल - 3

मरियम थ्रेसियांना ‘संत’ पदवी बहाल


- केरळमधील नन मरियम थ्रेसिया यांच्यासह इतर चार जणांना रविवारी व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या भव्य समारंभात सेंट फ्रान्सिसने संत पदवी दिली. तिच्या मृत्यूनंतर 93 वर्षांनंतर नन मेरी थ्रेसिया यांना ही उपाधी देण्यात आली.
- सिस्टर थ्रेसिया यांचे वयाच्या 50 व्या वषी 8 जून 1926 रोजी निधन झाले होते. महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱया मरियम थ्रेसिया यांनी बऱयाच शाळा स्थापन केल्या होत्या. त्यांचा जन्म 3 मे 1876 रोजी झाला होता. विशेष म्हणजे केरळमध्ये सामाजिक उन्नतीसाठी प्रसिद्ध असलेल्या थ्रेसिया यांना ‘मदर तेरेसा’ यांच्यासारखे मानले जाते.
- व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर स्क्वेअरमध्ये नन मरियम थ्रेसिया यांना संत मान देऊन सन्मानित करण्यात आले. सिस्टर थेसिया यांनी 50 वर्षांच्या स्वतःच्या अल्प आयुष्यात मानवतेच्या भल्यासाठी केलेले कार्य जगासाठी अद्भूत उदाहरण आहे असे सांगत स्वतःसाठी नव्हे तर इतरांकरता जगणाऱया असामान्य लोकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी भारत राहिला आहे.

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली 15/10/2019

1) जंकफुडवर कर लादणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
   1) केरळ    2) कर्नाटक    3) गुजरात    4) महाराष्ट्र
उत्तर :- 1

2) खालील माहितीचा विचार करा.
   अ) महाराष्ट्र राज्यातील पहिले मराठी विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे.
   ब) 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
  1) अ, ब सत्य    2) अ सत्य    3) ब सत्य    4) अ, ब सत्य
उत्तर :- 1

3) ‘मिस इंडिया 2018’ चा किताब खालीलपैकी कोणी जिंकला.
   1) मिनाक्षी चौधरी    2) अनुकृती व्यास   
   3) श्रेया राव      4) मानुषी छिल्लर
उत्तर :- 2

4) सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
   1) मेघालय    2) मणीपूर      3) मिझोराम    4) केरळ
उत्तर :- 1

5) स्वाईन फ्लूची मोफत लस देणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
   1) आसाम    2) गोवा      3) महाराष्ट्र    4) तामीळनाडू
उत्तर :- 3

रासायनिक सूत्र (Chemical Formula)

✶ साधारण नमक ➠ NaCl
✶ बेकिंग सोडा ➠ NaHCO₃
✶ धोवन सोडा ➠ Na₂CO₃·10H₂O
✶ कास्टिक सोडा ➠ NaOH
✶ सुहागा ➠ Na₂B₄O₇·10H₂O

✶ फिटकरी➠ K₂SO₄·Al₂(SO₄)₃·24H₂O
✶ लाल दवा ➠ KMnO₄
✶ कास्टिक पोटाश ➠ KOH
✶ शोरा ➠ KNO₃
✶ विरंजक चूर्ण ➠ Ca(OCl)·Cl

✶ चूने का पानी ➠ Ca(OH)₂
✶ जिप्सम ➠ CaSO₄·2H₂O
✶ प्लास्टर ऑफ पेरिस ➠ CaSO₄·½H₂O
✶ चॉक ➠ CaCO₃
✶ चूना-पत्थर ➠ CaCO₃

✶ संगमरमर ➠ CaCO₃
✶ नौसादर ➠ NH₄Cl
✶ लाफिंग गैस ➠ N₂O
✶ लिथार्ज ➠ PbO
✶ गैलेना ➠ PbS

✶ लाल सिंदूर ➠ Pb₃O₄
✶ सफेद लेड ➠ 2PbCO₃·Pb(OH)₂
✶ नमक का अम्ल ➠ HCl
✶ शोरे का अम्ल ➠ HNO₃
✶ अम्लराज ➠ HNO₃ + HCl (1 : 3)

✶ शुष्क बर्फ ➠ CO₂
✶ हरा कसीस ➠ FeSO₄·7H₂O
✶ हॉर्न सिल्वर ➠ AgCl
✶ भारी जल ➠ D₂O
✶ प्रोड्यूशर गैस ➠ CO + N₂

✶ मार्श गैस ➠ CH₄
✶ सिरका ➠ CH₃COOH
✶ गेमेक्सीन ➠ C₆H₆Cl₆
✶ नीला कसीस ➠ CuSO₄·5H₂O
✶ ऐल्कोहॉल ➠ C₂H₅OH

✶ मण्ड ➠ C₆H₁₀O₅
✶ अंगूर का रस ➠ C₆H₁₂O₆
✶ चीनी ➠ C₁₂H₂₂O₁₁
✶ यूरिया ➠ NH₂CONH₂
✶ बेंजीन ➠ C₆H₆
✶ तारपीन का तेल ➠ C₁₀H₁₆

राफेल विमानाची वैशिष्ट्ये

1. राफेलला प्रत्येत मोहिमेवर पाठवता येऊ शकते.

2. 60 हजार फुटांपर्यंत हे विमान उड्डाण करू शकतं. तसंच याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे

3. मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही हे विमान ओळखलं जातं. तसंच वेगवेगळ्या हवामानात हे विमान काम करू शकतं.

4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.

5. राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.

6. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.

7. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.

8. राफेल विमान 24 हजार 500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.

चालू घडामोडी प्रश्नसंच 15/10/2019

📌कोणत्या केंद्रीय सरकारी रुग्णालयाने ‘कायाकल्प पुरस्कार 2018-19’ जिंकला?

(A) जवाहरलाल स्नातकोत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (JIPMER), पुडुचेरी

(B) वैद्यकीय शिक्षण व संशोधन स्नातकोत्तर संस्था (PGIMER), चंदीगड

(C) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), दिल्ली✅✅✅

(D) इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य व वैद्यकीय विज्ञान संस्था (NEIGRIHMS), शिलांग

📌2019 या वर्षी आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिनाची संकल्पना काय होती?

(A) रिड्यूस डिझास्टर डॅमेज टू क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिसरप्शन ऑफ बेसिक सर्व्हिसेस✅✅✅

(B) रिड्यूसींग डिझास्टर इकनॉमिक लॉसेस

(C) होम सेफ होम

(D) लिव्ह टू टेल: राईसिंग अवेयरनेस, रिड्यूसींग मोर्टेलिटी

📌_____ येथे भारत आपले पहिले ऑलम्पिक हॉस्पिटॅलिटी हाऊस उभारणार आहे.

(A) पॅरिस
(B) बिजींग
(C) टोकियो✅✅✅
(D) लंडन

📌‘धर्म गार्डियन 2019’ विषयी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

I) ‘धर्म गार्डियन’ हा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो 2015 या सालापासून भारतात घेतला जातो.

II) ‘धर्म गार्डियन’ हा भारत, रशिया आणि जापान या देशांच्या दरम्यानचा तिरंगी लष्करी सराव आहे.

(A) केवळ I
(B) केवळ II
(C) I आणि II दोन्ही
(D) यापैकी एकही नाही✅✅✅

📌पृथ्वीच्या वातावरणामधला आयनोस्फीयर या थराचा अभ्यास करण्यासाठी NASAने पाठवविलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे?

(A) ICON✅✅✅
(B) SEO
(C) IONO
(D) INO

📌भारत आणि _ या देशांच्या नौदलांचा ‘2019 कोऑर्डिनेटेड पेट्रोल (CORPAT)’ नावाचा सागरी सराव आयोजित केला गेला.

(A) ऑस्ट्रेलिया
(B) बांग्लादेश✅✅✅
(C) चीन
(D) मालदीव

📌पृथ्वीवरील कार्बनच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या जागतिक संशोधनपर कार्यक्रमाचे नाव काय आहे?

(A) कार्बन रिसर्च प्रोग्राम
(B) डीप कार्बन ऑब्जर्व्हेटरी✅✅✅
(C) कार्बन अर्थ प्रोग्राम
(D) कार्बन फॉर अर्थ

📌कोणते राज्य सरकार राज्यामधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी कन्याश्री विद्यापीठाची स्थापना करणार आहे?

(A) केरळ
(B) पश्चिम बंगाल✅✅✅
(C) ओडिशा
(D) आसाम

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

🌸दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🌸परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🌸सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🌸प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🌸परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🌸मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🌸सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

🔶प्रार्थना समाजाचे कार्य🔶

🌺प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🌺न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🌺ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🌺देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🌺अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🌺प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🌺मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🌺४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🌺मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🌺इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🌺इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🌺प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

🔶प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन🔶

🌺प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...