१० ऑक्टोबर २०१९

गोवर

गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.
वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.

माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.

◾️कारण आणि लक्षणे

गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.

गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.

◾️उपचार

गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अ‍ॅस्पिरिन देऊ नये

◾️प्रतिबंध

गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते.

गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते.

रवीचंद्रन अश्विनने केली विश्वविक्रमाची बरोबरी; घेतले जलद 350 बळी; मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी

♻️ टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

♻️ अश्विनने कसोटीत सर्वात वेगवान 350 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून अश्विनने जोरदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावात त्याने सात विकेट्स घेत आपल्या विकेट्सची संख्या 349 वर पोहोचवली होती.

♻️ आज दुसऱ्या डावात पहिली विकेट घेत अश्विनने भारताकडून वेगवान 350 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 66 व्या सामन्यात त्याने 350 विकेट घेतल्या आहेत. यासह त्यानं श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विश्वविक्रमाची बरोबरी केली.

♻️ भारताकडून अनिल कुंबळेने 77 सामन्यात 350 विकेट तर हरभजन सिंहने 83 सामन्यात 350 विकेट्स घेतल्या होत्या.

♻️ श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने 66 व्या कसोटीत 350 वा गडी बाद केला होता. कसोटीमध्ये 800 गडी बाद करणारा मुरलीधरन जगातील एकमेव गोलंदाज आहे.

♻️ कसोटीत पाच विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने आतापर्यंत 27 वेळा केली आहे. याशिवाय सात वेळा 10 गडी बाद करण्याची कमालही त्यानं केली आहे.

♻️ याचबरोबर जलद 250 आणि 300 बळी घेण्याचा विश्वविक्रम देखील अश्विनच्याच नावावर आहे.

पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण होऊन आज १०६ वर्षे पूर्ण

♻️ जगातील मानवनिर्मित आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण होऊन आज १०६ वर्षे पूर्ण झाली.

♻️ १९१३ साली आजच्याच दिवशी अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी व्हाइट हाऊसमधून टेलिग्राफ सिग्नलच्या माध्यमातून या कालव्याचे उद्घाटन केले. असे असले तरी ३ ऑगस्ट १९१४ रोजी कालव्यामधून जाहजांची वाहतूक सुरु झाली. या कालव्यामुळे अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडले गेले.

♻️ कालव्याच्या अटलांटिक किनाऱ्यावर कोलोन तर पॅसिफिक किनाऱ्यावर पनामा ही बंदरे आहेत. पनामा कालव्याची लांबी ८० किमी आणि रुंदी १८० ते ३३० किमी आहे.

♻️ या कालव्यामुळे अमेरिकेच्या अटलांटिक व पॅसिफिक किनाऱ्यामधील अंतर कमी झालेले आहे. पनामा कालव्यामुळे संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, संयुक्त संस्थाने ते जपान हे अंतर कमी झाले आहे.

♻️ जाणून घेऊयात आधुनिक अभियांत्रिकी शास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमूना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनामा कालव्याबद्दलच्या खास गोष्टी...

>
पनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो.

>
पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती. २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.

>
ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे २६ मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी ११० फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी ७७.१ किमी (४८ मैल) आहे.

>
अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी एक असल्याचे सांगत या कालव्याचा आधुनिक युगातील आश्चर्यांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.

>
पनामा कालवा बांधण्यापूर्वी प्रशांत महासागरामधून अटलांटिक महासागरात पोचण्यासाठी बोटींना दक्षिण अमेरिका खंडाला वळसा घालून धोकादायक मेजेलनच्या सामुद्रधुनीमधून प्रवास करावा लागत असे. मध्य युगापासून हा प्रवास टाळण्यासाठी मानवनिर्मित कालव्याची कल्पना मांडली जात होती.

>
पनामाचे मोक्याचे स्थान व अरूंद भूमीचा पट्टा पाहता येथेच हा कालवा काढणे सहजपणे शक्य होते. रोमन साम्राज्याचा राजा पहिला कार्लोस याने १५३४ साली ह्या कालव्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. १८५५ साली अमेरिकेने पनामा कालव्याचा प्रस्ताव मांडला. ह्याच काळात सुवेझ कालव्याचे निर्माण करण्यात फ्रेंचांना यश मिळाल्यामुळे पनामा कालव्याच्या बांधकामाबद्दल स्थापत्यकारांना हुरूप आला.

>
११८१ साली फ्रान्सने पनामा कालव्याचे बांधकाम हाती घेतले. परंतु सुमारे २८ कोटी अमेरिकन डॉलर खर्च केल्यानंतर हा उपक्रम दिवाळखोरीत निघाला व १८९० साली काम थांबले.

>
पुढील १३ वर्षे अमेरिकेने अनेक पाहण्या व अभ्यास केले. अखेर १९०४ साली राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने ह्या कालव्याचे हक्क विकत घेतले व बांधकाम पुन्हा सुरू झाले. अनेक अडचणींचा सामना करीत अमेरिकन अभियंत्यांनी १९१४ साली कालव्यामधून जाहजांची वाहतूक सुरु झाली. १९९९ सालापर्यंत पनामा कालव्याचा ताबा अमेरिकेकडेच होता.

क्रिडा

आफ्रिका खंडासाठी FIFA चे नवे जनरल डेलीगेट - फातमा समौरा (FIFAचे सरचिटणीस).

सामान्य ज्ञान

प्रादेशिक हवाई संपर्क देणारी भारत सरकारची योजना - UDAN (उडे देश का आम नागरिक).

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) – स्थापना वर्ष: सन 1904; मुख्यालय: झ्युरिक (स्वित्झर्लंड).

दक्षिण आफ्रिका – राजधानी: केप टाउन (संविधानक); राष्ट्रीय चलन: दक्षिण आफ्रिकन रँड.

निवृत्तीवेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण (Pension Fund Regulatory and Development Authority -PFRDA) याचे स्थापना वर्ष – सन 2003.

भूगोल प्रश्नसंच 10/10/2019

1) खालीलपैकी कोणते पिके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत.
   1) एरंड, भात, ओट    2) गहू, भात, वांगी
   3) मका, भात, टोमॅटो    4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 1

2) योग्य जोडया लावा.
  वारे      स्थान
         अ) गरजनारे चाळीस    i) 50º द. अक्षवृत्त
         ब) शूर पश्चिमी वारे    ii) 5º उ. ते 5º द. अक्षवृत्त
         क) उन्मत साठ    iii) 40º द. अक्षवृत्त
         ड) निर्वात पट्टा    iv) 60º द. अक्षवृत्त
    अ  ब  क  ड
           1)  i  iii  iv  ii
           2)  iii  i  iv  ii
           3)  iv  iii  ii  i
           4)  i  ii  iii  iv
उत्तर :- 2

3) खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते ?
   1) 1º सें.दर 160 मी. ला    2) 1º सें. दर 170 मी. ला
   3) 1º सें. दर 100 मी. ला    4) 1º सें. दर 260 मी. ला
उत्तर :- 1

4) योग्य जोडया लावा.
  वातावरणाचे थर      उंची
         अ) तापांबर        i) 500 ते 1050 किमी
         ब) स्थितांबर      ii) 16 ते 50 किमी
         क) आयनांबर      iii) 0 ते 16 किमी
         ड) बाह्यांबर        iv) 80 ते 500 किमी
    अ  ब  क  ड
           1)  iii  ii  i  iv
           2)  ii  iv  i  iii
           3)  iii  ii  iv  i
           4)  i  iii  iv  ii
उत्तर :- 3

5) जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तो ..................
   1) कमी कालावधीचा हवामान अंदाज   
   2) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज
   3) जास्त कालावधीचा हवामान अंदाज   
   4) वरील सर्व
उत्तर :- 2

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांचा आर्थिक विकासदराबाबत धोक्याचा इशारा

📌जागतिक मंदीचे भारतात पडसाद

◾️जगातील सर्वात मोठय़ा उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीसदृश स्थितीचे परिणाम दिसू लागल्याचे

◾️आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिएव्हा यांनी स्पष्ट केले.

◾️ तसेच येत्या वर्षांत मंदीची झळ भारताला अधिक सोसावी लागण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

◾️जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीसदृश स्थितीतून वाटचाल करीत असून त्यामुळे जगातील नव्वद टक्के देशांचा आर्थिक विकास दर कमी होणार असल्याचा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला.

◾️आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, जगात सध्या मंदीसदृश स्थिती असून या वर्षी आर्थिक विकास दर हा दशकाच्या आरंभापासून प्रथमच सर्वात कमी असेल.

◾️ जागतिक आर्थिक स्थितीचा अहवाल पुढील आठवडय़ात जारी केला जाणार असून त्यात २०१९ व २०२० या वर्षांचा सुधारित अंदाज दिला जाणार आहे.

◾️शुक्रवारी भारताच्या रिझव्‍‌र्ह बँकेने असे म्हटले होते की, आर्थिक विकास दर सध्याचे मंदीसदृश वातावरण बघता ६.९ टक्क्यांच्या आधीच्या अंदाजाइतका राहणार नाही तर तो ६.१ टक्के राहू शकतो.

            🔰 जगाची स्थिती 🔰

◾️ २०१९ मध्ये जगातील नव्वद टक्के देशात आर्थिक वाढ कमी झाली आहे.

◾️जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्याने अनेक देशांना फटका बसणार आहे. ही घसरण चालू असताना ४० उदयोन्मुख बाजारपेठा व विकसनशील अर्थव्यवस्था यांचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक राहणार आहे. त्यातील १९ देश आफ्रि केतील आहेत.

◾️अमेरिका व जर्मनीत बेरोजगारी ऐतिहासिक नीचांकी आहे.

             🔰 भारताला झळ 🔰

◾️भारत व ब्राझीलसारख्या मोठय़ा देशात या वर्षी मंदीसारखी परिस्थिती जास्त जाणवणार असून गेली अनेक वर्षे घोडदौड करणाऱ्या चीनच्या आर्थिक वाढीला लगाम बसणार आहे, असे जॉर्जिएव्हा यांनी नमूद केले आहे.

सारांश, 10 ऑक्टोबर 2019

                   🏆 संरक्षण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

INS तीर, INS सुजाता, INS शार्दुल आणि ICGS सारथी या ठिकाणी आयोजित प्रथम ट्रेनिंग स्क्वॉड्रॉन या कार्यक्रमासाठी दाखल झाले - मोम्बासा, केनिया.

                🏆 अर्थव्यवस्था 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

क्युरेटेड तंत्रज्ञान आणि बँकिंग उपाययोजनांच्या माध्यमातून MSME उद्योगांच्या संघांच्या व्यवहारांना डिजिटल करण्यासाठी येस बँकेनी तयार केलेले अ‍ॅप - 'येस स्केल' बिझकनेक्ट.

                🏆 आंतरराष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2019 या काळात आयोजित करण्यात आलेल्या ‘C40 जागतिक महापौर शिखर परिषद 2019’ या कार्यक्रमाचे ठिकाण - कोपेनहेगन, डेन्मार्क.

जागतिक आर्थिक मंचच्या (WEF) ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2019’ यामध्ये पहिले स्थान - सिंगापूर (अमेरिका द्वितीय).

सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (पारपत्र) म्हणून हेन्ले अँड पार्टनर्स या संस्थेच्या ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स 2019’ यामध्ये पहिले स्थान - जापान आणि सिंगापूर (दक्षिण कोरिया, फिनलँड आणि जर्मनी द्वितीय स्थानावर आहेत).

दुबईत ‘2019 टेलीकॉम्स वर्ल्ड मिडल ईस्ट अवॉर्ड्स’ सोहळ्यात ‘डिजिटल कंटेंट सर्विस ऑफ द इयर’ हा सन्मान जिंकणारा भारतीय उद्योग – ZEE5 ग्लोबल.

अमेरिकेचा ‘2019 सेक्रेटरी ऑफ स्टेट्‍स अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट एक्सिलन्स’ हा पुरस्कार प्राप्त करणारा भारतीय उद्योग - पेप्सीको इंडिया (17 अब्ज लिटरपेक्षा जास्त पाणी वाचविण्यासाठी).

                    🏆 राष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जागतिक आर्थिक मंचच्या (WEF) ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2019’ यामध्ये भारताचा क्रमांक – 68 वा.

हेन्ले अँड पार्टनर्स या संस्थेच्या ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स 2019’ यामध्ये भारताचा क्रमांक – 82 वा.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आफ्रिकेतल्या या देशांचा समावेश करण्यासाठी ‘कापूस तांत्रिक सहाय्य कार्यक्रम (TAP)’ याचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली - माली, घाना, टोगो, झांबिया आणि टांझानिया.

बंगळुरुच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे 9 ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम - प्रधान मंत्री अभिनव शैक्षणिक कार्यक्रम - ‘ध्रुव (DHRUV)’.

                🏆 व्यक्ती विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

रसायनशास्त्रामधील 2019 नोबेल पुरस्काराचे विजेता - 
📌जॉन गुडइनफ (अमेरिका),
📌 स्टेनली व्हिटिंगहॅम (अमेरिका) आणि
📌अकिरा योशिनो (जापान) (लिथियम-आयन बॅटरीच्या विकासासाठी).

मुंबई विद्यापीठातून जर्मन अभ्यासात PhD पूर्ण करणारी जगातली पहिली अंध विद्यार्थी - उर्वी जंगम.

                   🏆 क्रिडा 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग 18 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदविणारा महिला क्रिकेट संघ - ऑस्ट्रेलिया.

             🏆 विज्ञान व तंत्रज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संख्येत सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह - शनी (82 चंद्र).

                  🏆 सामान्य ज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

C40 शहरे समूह – स्थापना: सन 2005; सचिवालय: लंडन (ब्रिटन).

युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) - स्थापना: सन 1874 (09 ऑक्टोबर); मुख्यालय: बर्न, स्वित्झर्लंड.

जागतिक टपाल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडणारा व्यक्ती - आनंद मोहन नरुला (भारतीय).

एखाद्या क्षेत्रात चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास प्रतिबंधित करणारे 1973 सालाच्या फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) मधले कलम - कलम 144.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज - स्थापना: सन 1875; स्थळ: दलाल स्ट्रीट, मुंबई.

भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation of Indian Chambers of Commerce and Industry -FICCI) याची स्थापना – सन 1927.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

विज्ञान प्रश्नसंच

1) क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी होतो.
   1) अंतराळ प्रवास, शल्यचिकित्सा, चुंबकीय अनुवाद    2) शल्यचिकित्सा, चुंबकीय अनुवाद, सुदूर संवेदन
   3) अंतराळ प्रवास, शल्यचिकित्सा, सुदूर संवेदन    4) अंतराळ प्रवास, चुंबकीय अनुवाद, सुदूर संवेदन
उत्तर :- 3

2) सापाचे विष हे ...........................
   1) आम्लयुक्त असते      2) आम्लारीयुक्त असते   
   3) आम्ल व आम्लारी दोन्ही असते    4) उदासीन असते
उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणते जीव संघ सिलेंटेराटामधले असून वसाहतीने राहणारे आहेत.
   1) कोरल्स    2) सी – निमोज   
   3) दोन्ही नाही    4) दोन्ही
उत्तर :- 4

4) केल्वीन मापन पध्दत सर्वसामान्य मानवी शरीराचे तापमान किती दर्शविते ?
   1) 2800K    2) 290K     
   3) 300K    4) 310K
उत्तर :- 4

5) काही बंध हे इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने निर्माण होत असतात अशा बंधाला ..........................
   1) सहसंयुज बंध    2) विद्युत संयुज बंध 
   3) आयनिक बंध    4) मेटॅलिक बंध
उत्तर :- 1

जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारताची १० पायऱ्यांनी घसरण

👉भारताचा १५वा क्रमांक लागला असून भागधारक प्रशासनात तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जीनिव्हा : जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत १० अंकांनी घसरला असून त्याचा ६८वा क्रमांक लागला आहे. सिंगापूरने जगातील सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्था म्हणून स्थान असलेल्या अमेरिकेला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे.

गेल्या वर्षी भारताचा क्रमांक जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात ५८वा होता. इतर देशांच्या क्रमवारीत सुधारणेमुळे यंदा भारत ६८व्या क्रमांकावर फेकला गेल्याचे जीनिव्हा येथील जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केलेल्या स्पर्धात्मकता निर्देशांक दर्शवितो. ‘ब्रिक्स’च्या तत्सम निर्देशांकातही भारत या वर्षी खालच्या क्रमांकावर होता.

👉जागतिक आर्थिक मंचाने बुधवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतात विशेषकरून बँकिंग व्यवस्था फारच कमकुवत झालेली दिसून येते, असे आवर्जून नमूद केले आहे.

अपेक्षित आयुर्मानात भारत १४१ देशांत १०९व्या क्रमांकावर असून त्याची कामगिरी दक्षिण आशियाच्या सरासरी कामगिरीच्याही खाली आहे. एकूण क्रमवारीत भारताच्या खाली श्रीलंका (८४), बांगलादेश (१०५), नेपाळ (१०८), पाकिस्तान (११०) हे शेजारील देश आहेत.

देशांतर्गत स्थूल आर्थिक स्थिरता, बाजारपेठेचे आकारमान, सखोल वित्तीय क्षेत्र हे भारताचे जमेचे घटक आहेत. उद्यम सुशासनात भारताचा १५वा क्रमांक लागला असून भागधारक प्रशासनात तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत बाजारपेठ आकारमानात भारत तिसऱ्या क्रमांकावर असून अक्षय्य ऊर्जा नियमनात भारताचा तिसरा क्रमांक आहे.

नवप्रवर्तनात भारत प्रगत अर्थव्यवस्थांच्या बरोबरीने आहे, असे जागतिक आर्थिक मंचाने स्पष्ट केले आहे.

०९ ऑक्टोबर २०१९

आर्थिक विषमतेच्याबाबतीत भारत जगात अव्वल स्थानी

♻️ जगाच्या अर्थिक विषमता अहवालातून उत्पन्नाबाबत जागतिक स्तरावर भारताबाबत एक लाजीरवाणी बाब समोर आली आहे. गेल्या दशकांमध्ये जगातील उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाली त्यामुळे आर्थिक विषमताही निर्माण झाली असून २०१६ मध्ये जगाचे निम्म्यापेक्षा अधिक उत्पन्न हे एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोकांकडे गेल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. यामध्ये आर्थिक विषमतेच्याबाबतीत भारत जगात अव्वल स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

♻️ आर्थिक विषमतेच्या या ट्रेन्डनुसार, जगाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न दिसून येते. यामध्ये युरोपात सर्वाधिक आर्थिक समानता पहायला मिळते, कारण इथल्या लोकसंख्येच्या टॉपच्या १० टक्के लोकांकडे ३७ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. तर मध्य आशियात सर्वाधिक आर्थिक विषमता असून इथे लोकसंख्येतील टॉपच्या १० टक्के लोकांकडे ६१ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. फर्स्टपोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.

♻️ यामध्ये भारतातील एकूण लोकसंख्येच्या टॉप १० टक्के लोकांकडे ५५ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. देशातील विविध भागातही उत्पन्नामध्ये विषमता दिसून येते. सन १९८० पासून उत्तर अमेरिका, चीन, भारत आणि रशिया या देशांनी वेगाने झालेली आर्थिक विषमता वाढ अनुभवली आहे. या काळात केवळ युरोपमध्येच सातत्याने आर्थिक वाढ झाली होती.

♻️ १९८० च्या काळात युरोप आणि युनायटेड स्टेट्स-कॅनडा रिजनमध्ये आर्थिक विषमतेची एकच पातळी होती. मात्र, आता यामध्ये बदल झाला आहे. १९८०च्या काळात या भागांमध्ये टॉपच्या १० टक्के लोकांकडे ३० टक्के उत्पन्नाचा वाटा होता. या आकडेवारीच्या तुलनेत २०१६ मध्ये युरोपमध्ये ही वाढ केवळ ३४ टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र, अमेरिकेत ती ४७ टक्क्यांवर जाऊन पोहोचली होती.

♻️ भारतात १९९१ मध्ये झालेल्या आर्थिक उदारीकरणानंतर देशात उच्च उत्पन्न वाढ दिसून आली होती. त्याचबरोबर आर्थिक विषमतेतही वाढ झाली होती. १९९० पर्यंत १ टक्के लोकांकडेच सर्वाधिक उत्पन्न होते. त्यानंतर २०१६ पर्यंत त्यात सातत्याने वाढ होत गेली.

राफेल विमानाची वैशिष्ट्ये

1. राफेलला प्रत्येत मोहिमेवर पाठवता येऊ शकते.

2. 60 हजार फुटांपर्यंत हे विमान उड्डाण करू शकतं. तसंच याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.

हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.

3. मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही हे विमान ओळखलं जातं. तसंच वेगवेगळ्या हवामानात हे विमान काम करू शकतं.

4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.

5. राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.

6. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.

7. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.

8. राफेल विमान 24 हजार 500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.

भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग खालीलप्रमाणे सांगता येतील

● N H 7 --- वाराणसी, नागपूर, हैद्राबाद, बंगलोर, कन्याकुमारी.

● N H 6 --- हाजीरा, नागपूर, रायपूर, कोलकाता.

● N H 5 ---बहरगोरा, भुवनेश्वर, विजयवाडा, चेन्नई.

● N H 15--पठाणकोट, अमृतसर, बिकानेर, कंडला.

● N H 2---- दिल्ली, आग्रा, कानपुर, बरही, कोलकत्ता.

● N H 8----दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई.

● N H 17--पनवेल, मंगलोर, कोझिकोड, एटापल्ली.

● N H 4 ---ठाणे, पुणे, बंगलोर, चेन्नई.

● N H 3 ---आग्रा, इंदोर, नाशिक, मुंबई.

● N H 31--बरही, पुणे, सिलिगुरी, अमिनगाव 

भूगोल प्रश्नसंच

1) तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ................... होय.
   1) 20ºC    2) 28ºC      3) 32ºC      4) 25ºC
उत्तर :- 2

2) शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
   अ) पर्यावरण संतुलन राखणे.    ब) सामाजिक – आर्थिक समता साध्य करणे.
   क) आर्थिक लाभ मिळवणे.
   1) अ व क बरोबर  2) ब व क बरोबर    3) अ व ब बरोबर    4) सर्व बरोबर
उत्तर :- 4

3) सपासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टय खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?
   1) विषुववृत्तीय पर्जन्य अरण्यांचा प्रदेश    2) भूमध्य हवामानाचा प्रदेश
   3) मोसमी हवामानाचा प्रदेश      4) सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश
उत्तर :- 1

4) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................... असते.
   1) 470 W/m²    2) 770 W/m²    3) 1170 W/m²    4) 1370 W/m²
उत्तर :- 4

5) एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण :
   1) ऋतूपरत्वे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन बदलतो.
   2) दिवासाची लांबी बदलते.
   3) सूर्यापासूनचे अंतर बदलते.
   4) वरील सर्व
उत्तर :- 4

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...