०२ ऑक्टोबर २०१९

पोलीस भरती प्रश्नसंच 2/10/2019

Q1. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे?
✅.  - देहरादून

 

Q2. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण?
✅. - लिएंडर पेस

 

Q3. पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे?
✅.  - ओरिसा

 

Q4. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते?
✅.  - व्हिटॅमिन सी

 

Q5. 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती?
✅. - के.एम. मुंशी

 

Q6. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे?
✅- हिमाचल प्रदेश

 

Q7. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
✅. - मौलाना अबुल कलाम आझाद

 

Q8. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे?
✅.  - कुतुब मीनार

 

Q9. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
✅. - विनू मंकड

 

Q10. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते?
✅. - राष्ट्रपती

 

Q11. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
✅. - वेटलिफ्टींग

 

Q12. या पैकी कोणते वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते?
✅.  - मानस वाघ राखिव उद्यान

 

Q13. स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?
✅.  -र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

 

Q14. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती?
✅. - भारत छोडो आंदोलन

 

Q15. या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे?
✅. - जिफ (GIF)

 

Q16. भारतीय संविधानातील कलम ५० च्या अंतर्गत काय प्रावधान आहे?
✅. - न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन

 

Q17. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती?
✅.  - लॉर्ड मेयो

 

Q18. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे?
✅.  - आंध्र प्रदेश

 

Q19. BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता?
✅.  - चीन

 

Q20. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता?
✅.  - वूलर तलाव

 

Q31. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?
✅.  - केरळ

 

Q22. जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
✅. - गुजरात

 

Q23. सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल.
✅. - सुषमा स्वराज

 

Q24. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे?
✅.  - राजस्थान

 

Q25. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
✅. - बियास

 

Q26. जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प __नदीवर आहे.
✅.  - चिनाब

 

Q27. जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती?
✅.  - 43

 

Q28. माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे?
✅. - अरवली

 

Q29. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
✅ V - तिरुवनंतपुरम

 

Q30. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे?
✅.  - कावेरी

चालु घडामोडी वन लाइनर्स, 02 ऑक्टोबर 2019.

🔶 02 ऑक्टोबर: महात्मा गांधी यांची 150 वी जयंती

🔶 02 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

🔶 01 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय कॉफी दिन

🔶 19 डिसेंबर 2019 रोजी कोलकाता आयपीएल 2020 लिलावाचे आयोजन करेल

🔶 एआयबीए वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप रशियामध्ये आयोजित केली जाईल

& भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लढवणार आहेत

🔶 बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 3 ऑक्टोबरपासून भेट देणार आहेत

Jit सुरजित एस. भल्ला यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक (भारत) म्हणून नियुक्त केले गेले

Russia रशियामधील भारतीय दूतावासाने गांधी यांच्या 150 व्या जयंतीदिनी गांधी-टॉल्स्टॉय प्रदर्शन आयोजित केले

Mahat महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीदिनी मोनाकोने टपाल तिकिटांचे प्रकाशन केले

V पी व्ही सिंधू ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत 6 व्या स्थानावर आहे

B बीडब्ल्यूएफच्या ताज्या क्रमवारीत सायना नेहवाल आठव्या क्रमांकावर आहे

🔶 किदांबी श्रीकांत ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत 9 व्या स्थानावर आहे

S बी एस प्रणीत ताज्या बीडब्ल्यूएफ रँकिंगमध्ये 12 वा क्रमांक लागतो

Latest बीएमडब्ल्यूएफ क्रमवारीत समीर वर्मा 12 व्या क्रमांकावर आहे

Up परुपल्ली कश्यप ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत 25 व्या क्रमांकावर आहे

🔶 पॅलेस्टाईनने महात्मा गांधींवर एक संस्मरणीय टपाल तिकिट जारी केले

🔶 एस एस मल्लिकार्जुन राव यांनी पंजाब नॅशनल बँकेचे नवीन सीएमडी नेमले

🔶 भाजपचे गौतम कुमार बंगळुरुचे महापौर निवडले

Mars एअर मार्शल एच एस अरोरा यांनी एअर स्टाफ ऑफ एअर स्टाफ म्हणून प्रभार स्वीकारला

M कुमार संगकारा यांनी एमसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

In डेव्हिन वेनिगने ईबेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पद सोडले आहे

Vs भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: विशाखापट्टणम येथे पहिली कसोटी

Qatar वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची सुरुवात डोहा, कतार येथे होईल

🔶 अविनाश साबळे अविनाश 3000 एम स्टीपलचेस फायनलसाठी पात्र ठरला

🔶 बीसीसीआय क्रिकेटरांना वयाचा घोटाळा नोंदविण्यासाठी 24-तासांची हेल्पलाईन सुरू करते

🔶 रशियन अल्कोहोल वापर 43% कमी: डब्ल्यूएचओ अहवाल

🔶 एनएसए अजित डोभाल ऑक्टोबरमध्ये सौदी अरेबियाला भेट देणार आहेत

🔶 ओडिशाने सर्व अर्बन बॉडीसाठी एकल-वापर प्लास्टिकवर बंदी वाढविली.

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे व जिल्ह्याचे नाव

आंबोली (सिंधुदुर्ग)

खंडाळा (पुणे)

लोणावळा (पुणे)

भिमाशंकर (पुणे)

चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

जव्हार (पालघर)

तोरणमाळ (नंदुरबार)

पन्हाळा (कोल्हापूर)

महाबळेश्वर (सातारा)

पाचगणी (सातारा)

कोयनानगर (सातारा)

माथेरान (रायगड)

मोखाडा(ठाणे)

सूर्यामाळ (ठाणे)

म्हैसमाळ (औरंगाबाद)

येडशी (उस्मानाबाद)

रामटेक (नागपूर)

--------------------------------------------------------

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) खालीलपैकी किती संमतिदर्शक अव्यये आहे.

     हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा
   1) सर्व      2) सहा      3) पाच      4) चार

उत्तर :- 1

2) ‘मी निबंध लिहीत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) अपूर्ण भूतकाळ    2) रीती वर्तमानकाळ 
   3) रीती भूतकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 3

3) “हंस” या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.

   1) हंसी    2) हंसा      3) हंसीण      4) हंसीका

उत्तर :- 1

4) रामाहून गोविंदा मोठा आहे.

     अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?

   1) कर्ता    2) संप्रदान    3) अपादान    4) करण

उत्तर :- 3

5) वाक्यप्रकार ओळखा.

     आई वडिलांचा मान राखावा.

   1) आज्ञार्थी    2) विध्यर्थी   
   3) संकेतार्थी    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

6) ‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.
   1) स्वतंत्र    2) महाप्राण
   3) संयुक्त स्वर    4) स्वर

उत्तर :- 1

7) ‘मनस् + पटल’ हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे.

   1) मन:पटल    2) मनसपटल
   3) मनीपटल    4) म : नटपल

उत्तर :- 1

8) भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

   1) सुंदर – सौंदर्य    2) नवल – नवली
   3) शूर – शौर्य      4) गंभीर – गांभीर्य

उत्तर :- 2

9) ‘लोकांनी आपण होऊन श्रमदान केले’ या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

   1) अनुसंबंधी सर्वनाम    2) आत्मवाचक सर्वनाम
   3) दर्शक सर्वनाम    4) सर्वनामोत्पन्न सर्वनाम

उत्तर :- 2

10) ‘पृथकत्ववाचक’ संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते ?

   1) छपन्न मोती      2) पाचवी खेप
   3) थोडी विश्रांती    4) एकेक मुलगा

उत्तर :- 4 

उत्तरप्रदेशात प्राचीन नदीचे उत्खनन

👉केंद्रीय जल मंत्रालयाने प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) येथे गंगा आणि यमुना नदींना जोडणार्‍या जुन्या व कोरड्या पडलेल्या नदीचे उत्खनन केले आहे.

👉संभाव्य भूजलाचा पुनर्भरण स्त्रोत म्हणून या भागाला विकसित करणे हा या उत्खनन करण्यामागे हेतू होता.

🌹🌳🌴नदीचे अस्तित्व🌴🌳🌹

👉शोधलेली नदी ही प्रयागराज या शहराजवळ गंगा-यमुना संगमाच्या सुमारे 26 किलोमीटर दक्षिणेस दुर्गापूर गावात यमुना नदीला जोडणारी पुरलेली पालेओ वाहिनी होती.

👉वर्णन केल्याप्रमाणे ही प्राचीन नदी सुमारे 4 किलोमीटर रुंद, किलोमीटर लांबीची असून, नदीचे अवशेष मातीखाली 15 मीटर जाडीचा थरात दिसून येतात.

👉 एक पालेओ वाहिनी (paleochannel) प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) जवळ गंगा आणि यमुना नदींना जोडते.

🌹🌳🌴नदीचा शोध कसा लागला?🌴🌳🌹

👉उत्तरप्रदेशात प्रयागराज आणि कौशांबी प्रदेशाच समावेश असलेल्या भौगोलिक सर्वेक्षणादरम्यान CSIR-NGRI (नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) आणि केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांना डिसेंबर 2018 मध्ये या नदीचा शोध लागला.

👉प्रदेशात असलेल्या पालेओ वाहिन्या (paleochannels) अस्तित्त्वात नसलेल्या नद्यांचा मार्ग उघडकीस आणतात.

👉अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की पालेओ वाहिन्यांच्या पुराव्यांनुसार पौराणिक ‘सरस्वती’ नदी अस्तित्त्वात आहे.

'मन की बात'मध्ये पंतप्रधान, मुलींच्या सन्मानार्थ अभियान चालवले जाणार

✍पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) आज त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील चौथ्या 'मन की बात'मध्ये (Man ki Baat) बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी सुर-सम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय संपूर्ण जनतेला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

✍'मन की बात'मध्ये मोदींनी मुलींच्या सन्मानार्थ यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर देशभरात सन्मान अभियान चालवले जाण्याचे सांगितले.

✍'सेल्फी विद डॉटर'प्रमाणेच 'भारत की लक्ष्मी' (BharatKiLaxmi) हे अभियान चालवले जाणार असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियावर BharatKiLaxmi हा हॅशटॅग अधिकाधिक वापरण्याचेही त्यांनी सांगितले.

✍देश के सारे विद्यार्थियों, टीचर और परिजनों से मेरा आग्रह है कि आप स्ट्रेस फ्री इग्जाम से जुड़ें पहलुओं को लेकर के अपने अनुभव मुझे बताइए, सुझाव बताइए। उस पर मैं सोचूंगा और उसमें से जो मुझे ठीक लगेगा उसको मैं मेरे अपने शब्दों में लिखने का प्रयास करूंगा: पीएम मोदी.

अजून एक बँक संकटात, ९३ वर्षे जुन्या बँकेवर RBI चे निर्बंध

✍खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या संचालकांविरुद्ध दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आल्याच्या दोन दिवसांनंतर लगेचच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन लक्ष्मीविलास बँकेवरही (एलव्हीबी) आर्थिक निर्बंध (पीसीए) घातले आहेत.  त्यामुळे आता नव्याने कर्जे देणे, लाभांश जाहीर करणे आणि शाखांचा विस्तार करण्यात लक्ष्मीविलास बँकेला अडचणी येणार आहेत.

✍पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधानंतर देशातील सहकार क्षेत्रात गुंतवणूकदार, ग्राहक, खातेदारांमध्ये संतापाची भावना असतानाच लक्ष्मी विलास बँकेच्या घडामोडींची भर पडली आहे. लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध घालण्यामागे, कोणत्याही आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे,  मोठ्या प्रमाणातील थकीत कर्जे आणि दोन वर्ष सातत्त्याने ‘अॅसेट क्वालिटी’त झालेली घसरण ही तीन मुख्य कारणं असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.

✍बँकेकडे असलेल्या मुदत ठेवीतील रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारदार रेलिगेअर फिनव्हेस्ट कंपनीने केला आहे.आघाडीची गुंतवणूकदार कंपनी असलेल्या रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडच्या लक्ष्मी विलास बँकेत ७९० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

✍त्यातील रकमेचा बँकेच्या संचालकांनी परस्पर संमतीने गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडीचा परिणाम बँकेच्या समभागमूल्यावरही दिसून आला असून बँकेचा समभाग देखील आपटला आहे. चेन्नईत मुख्यालय असलेल्या ९३ वर्षे जुन्या लक्ष्मी विलास बँकेच्या देशभरात ५६९ शाखा आहेत. बँकेने जून २०१९ अखेर ४९,५३६ कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदविला आहे.

10 महिन्याच्या बाळाच्या आईने मोडला उसेन बोल्टचा विक्रम


✍अमेरिकेच्या एलिसन फेलिक्स हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उसेन बोल्टला मागे टाकत नवा इतिहास रचला.

✍फेलिक्सने दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 4 गुणिले 400 मीटर मिश्र रिले प्रकारात आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकवून दिले आणि स्टार धावपटू उसेन बोल्टचा विक्रम मोडीत काढला.

✍तर महत्वाची बाब म्हणजे केवळ 10 महिन्यांचे बाळ असलेल्या मातेने हा दमदार पराक्रम करून दाखवला आहे.

✍तसेच 10 महिन्यांपूर्वी फेलिक्सने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सहा वेळा ऑलिम्पिक विजेत्या फेलिक्सने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर प्रथमच मैदानावर उतरली. त्यामुळे तिचा हा विक्रम अधिकच खास मानला जातो आहे.

✍फेलिक्सने 4 गुणिले 400 मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचसोबत तिचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हे 12 वे सुवर्णपदक  ठरले.

✍एखाद्या जागतिक स्पर्धेत एवढी सुवर्णपदके जिंकणारी फेलिक्स पहिलीचं धावपटू खेळाडू ठरली.

✍यापूर्वी हा विक्रम उसेन बोल्ट याच्या नावावर होता. त्याच्या नावावर आतापर्यंत 11 सुवर्णपदके आहेत. तो 2017 मध्ये अखेरचा स्पर्धेत उतरला होता. पण त्याचा हा विक्रम फेलिक्सने मोडला.

चीनकडून काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित

✍चीनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून हा तंटा संयुक्त राष्ट्र संहिता व सुरक्षा मंडळ ठराव तसेच द्विपक्षीय करारांच्या  मदतीने शांततामय मार्गाने सोडवावा, असा सल्ला दिला आहे.

✍पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र असलेल्या चीनने संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताना भारताने जम्मू काश्मीरच्या स्थितीत एकतर्फी बदल करू नयेत, असेही म्हटले आहे.

✍चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सांगितले,की काश्मीर प्रश्न हा भूतकाळातील काही घटनांमुळे मागे राहिलेला तंटा आहे. हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संहिता, द्विपक्षीय करार व सुरक्षा मंडळाच्या ठरावांच्या आधारे सोडवावा.

✍जम्मू काश्मीरची स्थिती  बदलणारे कुठलेही निर्णय एकतर्फी घेण्यात येऊ नयेत. भारत व पाकिस्तान यांचा शेजारी देश म्हणून हा प्रश्न प्रभावी मार्गाने हाताळून दोन्ही देशातील संबंध सुरळित व्हावेत अशीच चीनची इच्छा आहे.

✍भारताने पाच ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरसाठीचा अनुच्छेद ३७० रद्द करून  विशेष दर्जा रद्द केला होता.

एमसीसी अध्यक्षपदी संगकारा

◾️ऐतिहासिक मेरलिबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) अध्यक्षपदाची सुत्रे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने स्वीकारली आहेत

◾️. या मानाच्या क्लबमध्ये अध्यक्ष होणारा संगकारा हा पहिला ब्रिटिशेतर खेळाडू ठरला आहे. गेल्या मे महिन्यातच मावळते अध्यक्ष अँथनी रेफर्ड यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत संगकाराच्या नावाची घोषणा केली होती.

◾️‘एमसीसीसारख्या अतिउच्च अन् मानाच्या क्लबचा अध्यक्ष होणे ही माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाची बाब आहे.

◾️एमसीसीचे मावळते अध्यक्ष रेफर्ड म्हणाले, ‘सध्याच्या घडीला एमसीसीच्या अध्यक्षपदासाठी संगकारापेक्षा सरस व्यक्ती असूच शकत नाही.

◾️क्रिकेट या खेळाची ताकद आणि या खेळाची प्रेक्षकांना बांधून ठेवणारी उत्कंठा संगकाराला ठाऊक आहे.

◾️एमसीसीच्या मार्फत क्रिकेटच्या प्रसारासाठी जे कार्य सुरू असते, त्याचा ब्रँडअॅम्बेसिडर म्हणून संगाकारा योग्य व्यक्ती आहे’.

◾️१३४ कसोटींमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४१ वर्षांच्या संगकाराचे एमसीसी क्लबशी असलेले नाते जुनेच आहे.

◾️२००२मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना या क्लबविरुद्ध खेळला

‘अॅट्रॉसिटी’च्या जुन्याचतरतुदी राहणार कायम

◾️अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (एससी, एसटी) अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अॅट्रॉसिटी) अटकेबाबतच्या जुन्याच तरतुदी आता कायम राहणार आहेत.

◾️ सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी याबाबत स्वत:च्याच आधीच्या निर्णयात अंशत: सुधारणा केली.

◾️ 'अॅट्रॉसिटी'तील त्वरित अटकेसह काही तरतुदी, २० मार्च २०१८ रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्याच दोन न्यायाधीशांनी शिथिल केल्या होत्या.

◾️त्यावर देशभर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारनेही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने जुन्या तरतुदी कायम ठेवल्या आहेत.

◾️'एससी', 'एसटी' वर्गातील नागरिकांना अजूनही अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कारासारख्या यातना सोसाव्या लागत आहेत.

◾️ राज्य घटनेने त्यांना कलम १५ अंतर्गत संरक्षण दिल्याकडे, न्या. अरुण मिश्र, एम. आर. शहा, बी. आर. गवई यांनी लक्ष वेधले. या कायद्याचा गैरवापर होण्याचे प्रमाण जातींमुळे नसून मानवी अपयशांमुळे आहे.

◾️ कायद्यातील तरतुदी शिथिल करणे घटनाविरोधी आहे, असे न्यायालयाने याप्रसंगी सांगितले. दरम्यान, दोन न्यायाधीशांच्या निकालावर या पीठाने १८ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीवेळीही टीका केली होती.

◾️मलनि:स्सारण वाहिन्यांत उतरून अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही स्वच्छता करावी लागत असल्याबद्दल न्यायालयाने त्या वेळी संताप व्यक्त केला होता.

◾️ सरकार स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनंतरही उपेक्षितांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे, न्यायालयाने, अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांना सुनावले होते.

   🔰 काय होता २०१८चा निवाडा?🔰

◾️सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निवाड्याद्वारे, संबंधित कायद्यान्वये आरोपीला तत्काळ अटक करण्यास मनाई केली होती

◾️ या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे त्या वेळी नमूद करण्यात आले होते.

◾️ सरकारी अधिकारी, कर्मचारी; तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना या कायद्याद्वारे दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारींचा त्रास होत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.

◾️अशा तक्रारींची प्रथम पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी करावी व नंतर अटक करावी, असे निर्देश त्या वेळी देण्यात आले होते.

◾️ नंतर लोकभावना पाहून केंद्र सरकारने, त्याबाबत सुधारणा विधेयक संसदेत आणून त्यास दोन्ही सभागृहात मंजुरी घेतली होती.

०१ ऑक्टोबर २०१९

मुंबई विमानतळ उद्यापासून १०० % प्लास्टिकमुक्त

◾️मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या म्हणजेच २ ऑक्टोबर पासून १०० टक्के प्लास्टिकमुक्त होणार आहे.

◾️जीव्हीकेने सोमवारी ही घोषणा केली. 'विमानतळावर सर्व एकल वापराच्या प्लास्टिकविरोधात प्लास्टिक उत्पादनांना बंदी असेल.

◾️ यात
📌थर्माकोलपासून बनवलेली डिस्पोजेबल कटलरी (पॉलिस्टीरीन किंवा प्लास्टिक)
📌 पेट बॉटल्स (२०० एमएलपेक्षा कमी), 📌प्लास्टिक बॅग (हँडल शिवाय आणि हँडल असलेल्या),
📌 स्ट्रॉ,
📌 थर्मोकोल आयटम्स आणि
📌बबल रॅपचा समावेश आहे.' अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.

◾️ याऐवजी जीव्हीके लाउंजमध्ये स्टीलचे स्ट्रॉ, कटलरी आणि अन्य बायोडिग्रेडेबल मटेरिअलच्या वस्तू, कापडी पिशव्या वापरल्या जाणार आहेत.

◾️दरम्यान, पालिकेनेही नागरिकांना प्लास्किटमुक्तीचे आवाहन केले आहे.

◾️नियमभंग करणाऱ्यांवर पाच हजार रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई किंवा तीन महिने कैद आणि २५ हजारपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

◾️ 'सर्व नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक जवळच्या संकलन केंद्रात जमा करायचे आहे,' असं मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.

◾️देशभरातील १२९ विमानतळ 'प्लास्टिकमुक्त' करण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला होता.

◾️ त्यापैकी ३५ विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. पण मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मोहिमेपासून दूरच होते.

◾️एएआयच्या ताब्यात जवळपास १३५ विमानतळ आहेत. या विमानतळांचा प्रदूषण अभ्यास जानेवारी महिन्यात करण्यात आला.

◾️त्याआधारे सध्या कार्यरत असलेल्या १२९ विमानतळांवर प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत केवळ एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, बाटल्या, पेले, पिशव्या आदींवर विमानतळ परिसरात बंदी घालण्यात आली.

◾️पहिल्या टप्प्यात १५ विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. प्लास्टिकबंदीबाबतचा निर्णय एएआयने त्यांच्या अखत्यारित असलेल्या विमानतळांबाबत घेतला आहे.

◾️पण मुंबई विमानतळाची मालकी जीव्हीके समूहाकडे आहे.

◾️त्यामुळे देशात सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्लास्टिकमुक्तीचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता.

◾️ तसे असले, तरी एएआयने केलेल्या ३५ विमानतळांमध्ये राज्यातील पुणे, गोंदिया, औरंगाबाद येथील विमानतळांचा समावेश आहे. 

◾️पंतप्रधानांचे आवाहन महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे निमित्त साधून दोन ऑक्टोबरपासून पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधताना पंतप्रधान मोदी यांनी केले होते.

◾️प्लास्टिकऐवजी ज्यूटच्या थैल्या वापरण्याचा सल्ला त्यांनी दुकानदारांना दिला होता. 

◾️सिक्कीम अग्रेसर भारतात प्लास्टिक बंदीचे प्रयत्न यापूर्वीही अनेकदा झाले असून ते यशस्वी होऊ शकलेले नाही.

◾️१९९८ साली सिक्कीममध्ये प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती.

◾️ती कमालीची यशस्वी ठरली असून प्लास्टिकचा अजिबात वापर न करणारे

◾️सिक्कीम हे भारतातील आदर्श राज्य ठरले आहे. मात्र, अन्य राज्यांना सिक्कीमचे अनुकरण करणे शक्य झालेले नाही.

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...