०२ ऑक्टोबर २०१९

अजून एक बँक संकटात, ९३ वर्षे जुन्या बँकेवर RBI चे निर्बंध

✍खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या संचालकांविरुद्ध दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आल्याच्या दोन दिवसांनंतर लगेचच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन लक्ष्मीविलास बँकेवरही (एलव्हीबी) आर्थिक निर्बंध (पीसीए) घातले आहेत.  त्यामुळे आता नव्याने कर्जे देणे, लाभांश जाहीर करणे आणि शाखांचा विस्तार करण्यात लक्ष्मीविलास बँकेला अडचणी येणार आहेत.

✍पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधानंतर देशातील सहकार क्षेत्रात गुंतवणूकदार, ग्राहक, खातेदारांमध्ये संतापाची भावना असतानाच लक्ष्मी विलास बँकेच्या घडामोडींची भर पडली आहे. लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध घालण्यामागे, कोणत्याही आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे,  मोठ्या प्रमाणातील थकीत कर्जे आणि दोन वर्ष सातत्त्याने ‘अॅसेट क्वालिटी’त झालेली घसरण ही तीन मुख्य कारणं असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.

✍बँकेकडे असलेल्या मुदत ठेवीतील रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारदार रेलिगेअर फिनव्हेस्ट कंपनीने केला आहे.आघाडीची गुंतवणूकदार कंपनी असलेल्या रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडच्या लक्ष्मी विलास बँकेत ७९० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

✍त्यातील रकमेचा बँकेच्या संचालकांनी परस्पर संमतीने गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडीचा परिणाम बँकेच्या समभागमूल्यावरही दिसून आला असून बँकेचा समभाग देखील आपटला आहे. चेन्नईत मुख्यालय असलेल्या ९३ वर्षे जुन्या लक्ष्मी विलास बँकेच्या देशभरात ५६९ शाखा आहेत. बँकेने जून २०१९ अखेर ४९,५३६ कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदविला आहे.

10 महिन्याच्या बाळाच्या आईने मोडला उसेन बोल्टचा विक्रम


✍अमेरिकेच्या एलिसन फेलिक्स हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उसेन बोल्टला मागे टाकत नवा इतिहास रचला.

✍फेलिक्सने दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 4 गुणिले 400 मीटर मिश्र रिले प्रकारात आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकवून दिले आणि स्टार धावपटू उसेन बोल्टचा विक्रम मोडीत काढला.

✍तर महत्वाची बाब म्हणजे केवळ 10 महिन्यांचे बाळ असलेल्या मातेने हा दमदार पराक्रम करून दाखवला आहे.

✍तसेच 10 महिन्यांपूर्वी फेलिक्सने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सहा वेळा ऑलिम्पिक विजेत्या फेलिक्सने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर प्रथमच मैदानावर उतरली. त्यामुळे तिचा हा विक्रम अधिकच खास मानला जातो आहे.

✍फेलिक्सने 4 गुणिले 400 मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचसोबत तिचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हे 12 वे सुवर्णपदक  ठरले.

✍एखाद्या जागतिक स्पर्धेत एवढी सुवर्णपदके जिंकणारी फेलिक्स पहिलीचं धावपटू खेळाडू ठरली.

✍यापूर्वी हा विक्रम उसेन बोल्ट याच्या नावावर होता. त्याच्या नावावर आतापर्यंत 11 सुवर्णपदके आहेत. तो 2017 मध्ये अखेरचा स्पर्धेत उतरला होता. पण त्याचा हा विक्रम फेलिक्सने मोडला.

चीनकडून काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित

✍चीनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून हा तंटा संयुक्त राष्ट्र संहिता व सुरक्षा मंडळ ठराव तसेच द्विपक्षीय करारांच्या  मदतीने शांततामय मार्गाने सोडवावा, असा सल्ला दिला आहे.

✍पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र असलेल्या चीनने संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताना भारताने जम्मू काश्मीरच्या स्थितीत एकतर्फी बदल करू नयेत, असेही म्हटले आहे.

✍चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सांगितले,की काश्मीर प्रश्न हा भूतकाळातील काही घटनांमुळे मागे राहिलेला तंटा आहे. हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संहिता, द्विपक्षीय करार व सुरक्षा मंडळाच्या ठरावांच्या आधारे सोडवावा.

✍जम्मू काश्मीरची स्थिती  बदलणारे कुठलेही निर्णय एकतर्फी घेण्यात येऊ नयेत. भारत व पाकिस्तान यांचा शेजारी देश म्हणून हा प्रश्न प्रभावी मार्गाने हाताळून दोन्ही देशातील संबंध सुरळित व्हावेत अशीच चीनची इच्छा आहे.

✍भारताने पाच ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरसाठीचा अनुच्छेद ३७० रद्द करून  विशेष दर्जा रद्द केला होता.

एमसीसी अध्यक्षपदी संगकारा

◾️ऐतिहासिक मेरलिबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) अध्यक्षपदाची सुत्रे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने स्वीकारली आहेत

◾️. या मानाच्या क्लबमध्ये अध्यक्ष होणारा संगकारा हा पहिला ब्रिटिशेतर खेळाडू ठरला आहे. गेल्या मे महिन्यातच मावळते अध्यक्ष अँथनी रेफर्ड यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत संगकाराच्या नावाची घोषणा केली होती.

◾️‘एमसीसीसारख्या अतिउच्च अन् मानाच्या क्लबचा अध्यक्ष होणे ही माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाची बाब आहे.

◾️एमसीसीचे मावळते अध्यक्ष रेफर्ड म्हणाले, ‘सध्याच्या घडीला एमसीसीच्या अध्यक्षपदासाठी संगकारापेक्षा सरस व्यक्ती असूच शकत नाही.

◾️क्रिकेट या खेळाची ताकद आणि या खेळाची प्रेक्षकांना बांधून ठेवणारी उत्कंठा संगकाराला ठाऊक आहे.

◾️एमसीसीच्या मार्फत क्रिकेटच्या प्रसारासाठी जे कार्य सुरू असते, त्याचा ब्रँडअॅम्बेसिडर म्हणून संगाकारा योग्य व्यक्ती आहे’.

◾️१३४ कसोटींमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४१ वर्षांच्या संगकाराचे एमसीसी क्लबशी असलेले नाते जुनेच आहे.

◾️२००२मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना या क्लबविरुद्ध खेळला

‘अॅट्रॉसिटी’च्या जुन्याचतरतुदी राहणार कायम

◾️अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (एससी, एसटी) अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अॅट्रॉसिटी) अटकेबाबतच्या जुन्याच तरतुदी आता कायम राहणार आहेत.

◾️ सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी याबाबत स्वत:च्याच आधीच्या निर्णयात अंशत: सुधारणा केली.

◾️ 'अॅट्रॉसिटी'तील त्वरित अटकेसह काही तरतुदी, २० मार्च २०१८ रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्याच दोन न्यायाधीशांनी शिथिल केल्या होत्या.

◾️त्यावर देशभर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारनेही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने जुन्या तरतुदी कायम ठेवल्या आहेत.

◾️'एससी', 'एसटी' वर्गातील नागरिकांना अजूनही अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कारासारख्या यातना सोसाव्या लागत आहेत.

◾️ राज्य घटनेने त्यांना कलम १५ अंतर्गत संरक्षण दिल्याकडे, न्या. अरुण मिश्र, एम. आर. शहा, बी. आर. गवई यांनी लक्ष वेधले. या कायद्याचा गैरवापर होण्याचे प्रमाण जातींमुळे नसून मानवी अपयशांमुळे आहे.

◾️ कायद्यातील तरतुदी शिथिल करणे घटनाविरोधी आहे, असे न्यायालयाने याप्रसंगी सांगितले. दरम्यान, दोन न्यायाधीशांच्या निकालावर या पीठाने १८ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीवेळीही टीका केली होती.

◾️मलनि:स्सारण वाहिन्यांत उतरून अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही स्वच्छता करावी लागत असल्याबद्दल न्यायालयाने त्या वेळी संताप व्यक्त केला होता.

◾️ सरकार स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनंतरही उपेक्षितांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे, न्यायालयाने, अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांना सुनावले होते.

   🔰 काय होता २०१८चा निवाडा?🔰

◾️सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निवाड्याद्वारे, संबंधित कायद्यान्वये आरोपीला तत्काळ अटक करण्यास मनाई केली होती

◾️ या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे त्या वेळी नमूद करण्यात आले होते.

◾️ सरकारी अधिकारी, कर्मचारी; तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना या कायद्याद्वारे दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारींचा त्रास होत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.

◾️अशा तक्रारींची प्रथम पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी करावी व नंतर अटक करावी, असे निर्देश त्या वेळी देण्यात आले होते.

◾️ नंतर लोकभावना पाहून केंद्र सरकारने, त्याबाबत सुधारणा विधेयक संसदेत आणून त्यास दोन्ही सभागृहात मंजुरी घेतली होती.

०१ ऑक्टोबर २०१९

मुंबई विमानतळ उद्यापासून १०० % प्लास्टिकमुक्त

◾️मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या म्हणजेच २ ऑक्टोबर पासून १०० टक्के प्लास्टिकमुक्त होणार आहे.

◾️जीव्हीकेने सोमवारी ही घोषणा केली. 'विमानतळावर सर्व एकल वापराच्या प्लास्टिकविरोधात प्लास्टिक उत्पादनांना बंदी असेल.

◾️ यात
📌थर्माकोलपासून बनवलेली डिस्पोजेबल कटलरी (पॉलिस्टीरीन किंवा प्लास्टिक)
📌 पेट बॉटल्स (२०० एमएलपेक्षा कमी), 📌प्लास्टिक बॅग (हँडल शिवाय आणि हँडल असलेल्या),
📌 स्ट्रॉ,
📌 थर्मोकोल आयटम्स आणि
📌बबल रॅपचा समावेश आहे.' अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.

◾️ याऐवजी जीव्हीके लाउंजमध्ये स्टीलचे स्ट्रॉ, कटलरी आणि अन्य बायोडिग्रेडेबल मटेरिअलच्या वस्तू, कापडी पिशव्या वापरल्या जाणार आहेत.

◾️दरम्यान, पालिकेनेही नागरिकांना प्लास्किटमुक्तीचे आवाहन केले आहे.

◾️नियमभंग करणाऱ्यांवर पाच हजार रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई किंवा तीन महिने कैद आणि २५ हजारपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

◾️ 'सर्व नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक जवळच्या संकलन केंद्रात जमा करायचे आहे,' असं मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.

◾️देशभरातील १२९ विमानतळ 'प्लास्टिकमुक्त' करण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला होता.

◾️ त्यापैकी ३५ विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. पण मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मोहिमेपासून दूरच होते.

◾️एएआयच्या ताब्यात जवळपास १३५ विमानतळ आहेत. या विमानतळांचा प्रदूषण अभ्यास जानेवारी महिन्यात करण्यात आला.

◾️त्याआधारे सध्या कार्यरत असलेल्या १२९ विमानतळांवर प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत केवळ एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, बाटल्या, पेले, पिशव्या आदींवर विमानतळ परिसरात बंदी घालण्यात आली.

◾️पहिल्या टप्प्यात १५ विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. प्लास्टिकबंदीबाबतचा निर्णय एएआयने त्यांच्या अखत्यारित असलेल्या विमानतळांबाबत घेतला आहे.

◾️पण मुंबई विमानतळाची मालकी जीव्हीके समूहाकडे आहे.

◾️त्यामुळे देशात सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्लास्टिकमुक्तीचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता.

◾️ तसे असले, तरी एएआयने केलेल्या ३५ विमानतळांमध्ये राज्यातील पुणे, गोंदिया, औरंगाबाद येथील विमानतळांचा समावेश आहे. 

◾️पंतप्रधानांचे आवाहन महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे निमित्त साधून दोन ऑक्टोबरपासून पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधताना पंतप्रधान मोदी यांनी केले होते.

◾️प्लास्टिकऐवजी ज्यूटच्या थैल्या वापरण्याचा सल्ला त्यांनी दुकानदारांना दिला होता. 

◾️सिक्कीम अग्रेसर भारतात प्लास्टिक बंदीचे प्रयत्न यापूर्वीही अनेकदा झाले असून ते यशस्वी होऊ शकलेले नाही.

◾️१९९८ साली सिक्कीममध्ये प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती.

◾️ती कमालीची यशस्वी ठरली असून प्लास्टिकचा अजिबात वापर न करणारे

◾️सिक्कीम हे भारतातील आदर्श राज्य ठरले आहे. मात्र, अन्य राज्यांना सिक्कीमचे अनुकरण करणे शक्य झालेले नाही.

पोलीस भरती प्रश्नसंच 1/10/2019

Q1. खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती कार्यान्वित केली?
✅. - हरियाणा

 

Q2. कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला?
✅. - उत्तरप्रदेश

 

Q3. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो?
✅. - अहिल्याबाई होळकर

 

Q4. महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते.
✅. - गडचिरोली

 

Q5. भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली होती.
✅. - 1984

 

Q6. Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे.
✅. - सरला बेन

 

Q7. जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो?
✅. - 24 नोव्हेंबर

 

Q8. 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे?
✅.  - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

 

Q9. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
✅.  - वैनगंगा

 

Q10. राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली?
✅.  - 2 जुलै 2012

 

Q11. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर _____म्हणून साजरा करते.
✅. - सामाजिक न्याय दिन

 

Q12. दिल्ली जवळील नोएडा येथे सुरु झालेले फॉर्मुला-1 (F-1) कार रेसिंग सर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते?
✅.  - बुध्द इंटरनॅशनल सर्किट

 

Q13. रामनाथ गोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत?
✅. - 14वे

 

Q14. लंडन ऑलंपिक २०१२ मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलीत?
✅.  - 6

 

Q15. Senkaku Islands चा वाद कोणत्या दोन राष्ट्रां दरम्यान आहे?
✅   - चीन व जपान

 

Q16. मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डनचे नामकरण कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावरुन केले गेले?
✅   - जिजामाता

 

Q17. या पैकी कॉम्प्यूटर मधील मेमरी लोकेशन कोणते आहे?
✅  - रजिस्टर

 

Q18. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
✅  - सिक्किम

 

Q19. संगणकातील 'वर्ड प्रोसेसर' या प्रणालीत कोणत्या सुविधेमुळे एका ओळीत शब्द मावत नसल्यास आपोआप दुसर्‍या ओळीच्या सुरवातीला घेतला जातो?
✅   - वर्ड रॅप

 

Q20. शिप्रा नदीच्या उपनद्या सरस्वती व खान कोणत्या शहरात आहेत?
✅   - इंदूर

 

Q21. एनएम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्यूटर कंपनीला आता कोणत्या नावाने ओळखले जाते?
✅   - इंटेल

 

Q22. फॉस्बरी फ्लॉप' कोणत्या ऍथलिटिक खेळाशी संबंधित आहे?
✅   - उंच उडी

 

Q23. पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना कोणी केली होती?
✅   - स्वामी विवेकानंद

 

Q24. संयुक्त राष्ट्र २० जून हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा करते?
✅   -वर्ल्ड रिफ्यूजी डे

 

Q25. भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्षांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यु होतो?
✅  - जतिंगा

 

Q26. ऍडमिरलस्‌ ,झेब्राज्‌ व मोनार्कज्‌ या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत?
✅   - फुलपाखरु

 

Q27. टिहरी बांध कोणत्या नदीवर बनलेला आहे?
✅  - भागीरथी

 

Q28. कोणत्या व्यवसायातील लोकांना 'हिप्पोक्रेटिक शपथ' घ्यावी लागते?
✅  - चिकित्सक

 

Q29. लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे?
✅  - लाल किल्ला

 

Q30. झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता?
✅  - ईथरनेट

चालू घडामोडी वन लाइनर्स, 1 ऑक्टोबर 2019.

✳ 01 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ व्यक्तींचा दिवस

✳ थीम 2019: "वय समानतेचा प्रवास"

✳ ज्येष्ठ अभिनेता विजू खोटे यांचे मुंबईत निधन

✳ कॉमनवेल्थ ज्युडो चॅम्पियनशिप बर्मिंगहॅममध्ये सुरू होईल

✳ जसलीन सैनीने कॉमनवेल्थ ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले

✳ अपूर्वा पाटील कॉमनवेल्थ ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकली

✳31 मार्च 2020 पर्यंत वैध प्रवासी दस्तऐवज म्हणून सुरू ठेवण्यासाठी पीआयओ कार्ड

✳ भारतीय वायुसेना प्रमुख बी एस धनोआ आज सेवानिवृत्त

✳ आर के भदौरिया यांनी भारतीय वायुसेनेचे 26 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

✳ सुशील कुमार लोहानी यांची ओडिशा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक

✳ मेजर स्वदेशी प्रणालीसह ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र यशस्वीरीत्या चाचणी-अयशस्वी

✳ अन्नू राणी जागतिक चँपियनशिपमध्ये भाला थ्रो फायनलसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली

✳ आज सैनिकी नर्सिंग सेवेचा 94 वा वाढता दिवस

✳ रेशेश मेनन यांना भारतीय ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीचे डीजी म्हणून नियुक्त केले

✳ एशियन एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये विल्सन सिंग-सतीश कुमार जोडीने सुवर्ण जिंकले

✳ बेंगळुरू येथे 10 व्या आशियाई वयोगटातील चषक स्पर्धेस प्रारंभ

✳ जय भगवान भोरिया यांना पीएमसी बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केले

✳ के एस धातवलिया यांना पीआयबीचे प्रधान महासंचालक म्हणून नियुक्त केले

✳ मुनीर अक्रम यांनी संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचा कायमस्वरुपी प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली

✳ आंतरराष्ट्रीय अंडी आयोगाच्या अध्यक्षपदी सुरेश चित्तुरी यांची नियुक्ती

✳ उपेंद्र राय ज्येष्ठ सल्लागार, सहारा इंडिया ग्रुप म्हणून नियुक्त

✳ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निवडक अध्यक्ष डॉ विजय पाटील

✳ जेराल्ड डेव्हिस वेल्श रग्बी युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडले

✳ राजीव सिन्हा यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला

✳ जेकब थॉमस यांना केरळ मेटल इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​एमडी म्हणून नेमणूक

✳ रायन मॅककार्थी यांनी 24 व्या अमेरिकन सैन्य सेक्रेटरी म्हणून शपथ घेतली

✳ भारताची जीडीपी वाढ या आर्थिक वर्षात 5.2% होण्याची शक्यता आहेः EIU

✳ ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून स्वप्ना बर्मन मधील सेन्को गोल्ड अँड डायमंड्स रोप

✳ ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडलेल्या होममे दोर्‍या

✳ पाकिस्तानने श्रीलंकेला ऐतिहासिक कराचीच्या वनडे सामन्यात पराभूत केले

✳ बाबर आझम 11 एकदिवसीय शतके गाठण्यासाठी तिसरा क्रमांकाचा वेगवान खेळाडू ठरला

✳ भारताच्या सुमित नगलने ताज्या एटीपी क्रमवारीत 135 वे स्थान मिळविले

✳ क्रिकेटपटू रोहित शर्मा वन्यजीव संरक्षणासाठी 25 लाख रुपयांची देणगी

✳ भारताने 25 वर्षात मान्सूनचा सर्वाधिक पाऊस नोंदविला: आयएमडी

✳ केरळ, चंडीगड अव्वल नीति आयोगाचे शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक

✳ नीति आयोगाच्या शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांकामधील सर्वात वाईट कामगिरी करणारा.

मराठी सराव प्रश्न 1/10/2019


१) खालीलपैकी मृदु वर्ण कोणते?
१) क्            २) ग् ३) च् ४) ट्

२) खालीलपैकी अर्धस्वर कोणते?
१) श्, ष् २) स्, ग्           ३) य्, र् ४) ट्, ठ्

३) व्यंजनामध्ये मुख्यमहाप्राण कोणता?
१) ळ् २) ह् ३) क् ४) च्

४) कंठ तालव्य वर्ण कोणते ते ओळखा?
१) य्, र् २) च्, ह् ३) ए, ऐ ४) त्, थ्

५) कठोर वर्ण ओळखा?
१) ग्, घ् २) ड्, ढ् ३) त्, थ् ४) ब्, भ्

६) प्रद्युन्म या शब्दात व्यंजन किती?
१) आठ २) नऊ ३) सात ४) सहा

७) खालीलपैकी कोणते व्यंजन कंठ्य नाही?
१) घ्          २) ह् ३) ख् ४) म

८) 'गौर्यानंद' या शब्दाचा संधी विग्रह करा?
१) गौरी+आनंद २) गौर+आनंद ३) गोरा+आनंद ४) गोर्य+आनंद

९) 'ईश्वर + इच्छा ' या शब्दाचा संधी करा?
१) ईश्वरइच्छा २) ईश्वरेच्छा ३) ईश्वरिच्छा ४) ईश्वरीच्छा

१०) ' मंत्रालय' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा?
१) मंत्र+आलय   २) मंत्रा+लय ३) मंत्री+आलय ४) मंत्रा+आलय

११) जगत + ईश्वर या विग्रहाची संधी करा?
१) जगतेश्वर २) जगतईश्वर ३) जगदीश्वर ४) जगदेश्वर

१२) 'वाङनिश्चय' या शब्दाची योग्य फोड करा?
१) वाक् + निःश्चय २) वाग + निश्चय ३) वाङ + निश्चय ४) वाक् + निश्चय

१३) मराठीमध्ये कोणत्या पद्धतीने लिहिल्या जाते?
१) डावीकडून उजवीकडे २) उजवीकडून डावीकडे  ३) डावीकडे डावीकडे  ४) यापैकी नाही

१४) गवीश्वरचा योग्य विग्रह ओळखा?
१) गवी + ईश्वर २) गव् + ईश्वर ३) गो + ईश्वर ४) गवी + श्वर

१५) महोत्सव या संधीची फोड करा?
१) महा + उत्सव २) मही +उत्सव ३) महो + त्सव ४) मह + उत्सव

१६) मातृ + छाया या विग्रहाची संधी करा?
१) मातृछाया      २) मात्रोछाया ३) मातृच्छाया ४) मातृउच्छाया

१७) संधी करा षट् + मास
१) षटमास २) षन्मास ३) षण्मास ४) षंमास

१८) निष्पाप या शब्दचा शब्द संधीनुसार तयार झालेला दुसरा शब्द ?
१) सच्छील २) सच्चरित्र ३)दुष्काळ ४) सदाचार

१९) 'अ' किवा 'आ' पुढे 'ए' किंवा 'ऐ' आल्यास दोहोबद्दल ऐ होतो या नियमात न बसणारा शब्द लिहा ?
१) एकैक २) सदैव ३) गंगैध        ४) मतैक्य

२०) मानु + अंतर या विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?
१) मानवंतर     २) मनुअंतर     ३) मवंतर ४) मन्वंतर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⭕उत्तरे:
१) २, २) ३, ३) २, ४) ३ ,५) ३ ,६) ४ ,७) ४, ८) ४, ९) २ ,१०) ४
११) ४ ,१२) ४ ,१३) १ ,१४) ३, १५) १, १६) ३ ,१७) ३ ,१८) ३ ,
१९) ३ ,२०) १

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा.’ नकारार्थी वाक्य बनवा.

   1) ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा      2) ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका
   3) ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवा    4) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका

उत्तर :- 4

2) ‘शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो’ या वाक्यातील ‘विधानपूरक’ ओळखा.

   1) शरद    2) चांदणे     
   3) गुलमोहर    4) मोहक 

उत्तर :- 4

3) ‘रामाकडून रावण मारला गेला.’ या प्रयोगाचे नाव सांगा ?

   1) कर्तरी प्रयोग    2) कर्मणी प्रयोग   
   3) भावे प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग
उत्तर :- 2

4) ‘मीठभाकर’ या समाहार व्दंव्द समासाचा विग्रह कसा आहे ?

   1) मीठ किंवा भाकरी      2) मीठ घालून केलेली भाकरी
   3) मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ    4) भाकरी आणि मीठ

उत्तर :- 3

5) खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. – केवढी शुभवार्ता आणलीस तू

   1) ,      2) .     
   3) ?      4) !

उत्तर :- 4

6) ‘गुळगुळीत’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) रेखीव    2) ओबडधोबड   
   3) पारथर्शी    4) खरखरीत

उत्तर :- 4

7) ‘प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच’ या अर्थाची म्हण ओळखा.
   1) घरोघर मातीच्या चुली      2) जेवीन तर तुपाशी नाही तर उपाशी
   3) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे  4) गाडयाबरोबर नळयाची यात्रा

उत्तर :- 3

8) ‘आज पाऊस पडावा’ – वाक्यप्रकार ओळखा.

   1) केवल    2) मिश्र     
   3) संयुक्त    4) गौण

उत्तर :- 1

9) ‘दुस-याच्या अंकित असणारा’ – या शब्दसमूहासाठी खाली दिलेल्या शब्द समुहातील लागू पडणा-या शब्दसमूहाचा अचूक पर्याय
      लिहा.

   1) पाताळयंत्री      2) बोकेसंन्यशी   
   3) ताटाखालचे मांजर    4) उंटावरचा शहाणा

उत्तर :- 3

10) शुध्द स्वरूप ओळखा.
   1) पुनजर्न्म    2) पूनर्जन्म   
   3) पुनर्जन्म    4) पूर्नजन्म

उत्तर :- 3

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...