३० सप्टेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ओळखा.

     मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.
   1) भाषण    2) समोर      3) अधिक    4) करवत नाही

उत्तर :- 1

2) आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे हे ................ या प्रयोगातील वाक्य आहे.

   1) कर्मणी    2) कर्तरी      3) संकरित    4) भावे

उत्तर :- 4

3) पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे ? – पुरणपोळी

   1) मध्यमपदलोपी समास      2) तत्पुरुष समास 
   3) अव्ययीभाव समास      4) व्दंव्द समास

उत्तर :- 1

4) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

   1) अर्धविराम    2) स्वल्पविराम    3) संयोगचिन्ह    4) अपूर्णविराम

उत्तर :- 4

5) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’
     या काव्य ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे ?

   1) उपमा    2) रूपक      3) उत्प्रेक्षा    4) अनन्वय

उत्तर :- 3

6) पुढीलपैकी ‘अभ्यस्त’ शब्द कोणता?

   1) दररोज    2) रात्रंदिवस    3) अभ्यास    4) यापैकी कोणताही नाही

उत्तर :- 4

7) ‘ढळला रे ढळला दिन सख्या, संध्या भिवविती हदया’ या काव्यपंक्तीतील ‘दिन ढळला’ या शब्दसमूहाचा ध्वन्यार्थ सांगा.

   1) दिवस मावळला  2) सूर्य बुडाला    3) आयुष्य संपत आले  4) दिवस संपला

उत्तर :- 3

8) खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?

   1) वाट      2) पंथ      3) रस्ता      4) पथ

उत्तर :- 2

9) ‘नैसर्गिक’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

   1) प्राकृतिक    2) स्वाभाविक    3) कृत्रिम      4) सृष्टी

उत्तर :- 3

10) ‘बादरायण संबंध असणे’ चा योग्य अर्थ निवडा.

   1) घनिष्ठ मैत्री असणे      2) दुरान्वयाने संबंध असणे
   3) ओढून ताणून संबंध  लावणे    4) शत्रूत्व असणे

उत्तर :- 3

तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर ठरले अव्वल

◾️राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

◾️ राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

◾️ राज्यात ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष मतदार, ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ महिला तर २ हजार ५९३ तृतीयपंथी अशा एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झाली आहे.

◾️तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार आहेत.

◾️पुणे जिल्ह्यात एकूण ४० लाख १९ हजार ६६४ पुरुष मतदार तर ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ३९ लाख २९ हजार २३२ पुरुष मतदार तर ३२ लाख ९७ हजार ६७ महिला मतदार आहेत.

◾️ठाणे जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ पुरुष मतदार आणि २८ लाख ८१ हजार ७७७ महिला मतदार आहेत.

◾️तृतीयपंथी वर्गवारीमध्ये
📌 मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ५२७ तृतीयपंथी मतदार,
📌ठाणे जिल्ह्यात ४६० आणि
📌पुणे जिल्ह्यात २२८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

◾️ लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये २१ लाख १५ हजार ५७५ एवढी वाढ झाली आहे.

◾️ लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ मतदार होते तर आता ३१ आॅगस्टपर्यंत ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ एवढी मतदार नोंदणी झाली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२९ सप्टेंबर २०१९

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

Q1. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये 'शांतीनिकेतन' ची स्थापना केली?
✅. - रवींद्र नाथ टागोर

 

Q2. 'राष्ट्रासभे' ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
✅.  - लॉर्ड डफरीन

 

Q3. खालील पैकी कोण 'राष्ट्रसभे' च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते?
✅.  - महात्मा गांधी

 

Q4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते?
✅.  - जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर

 

Q5. 'वंदे मातरम' हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत.
✅.  - युगांतर

 

Q6. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती?
✅.  - महात्मा गांधी

 

Q7. खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता?
✅.  - लॉर्ड लिटन

 

Q8. आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते?
✅.  - पंडित नेहरू

 

Q9. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले?
✅.  - 1953

 

Q10. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
✅.  - व्ही. के. कृष्ण मेनन

 

Q11. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले?
✅. -  रेसलिंग (wrestling)

 

Q12. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ?
✅ B-  महाराष्ट्र व गुजरात

 

Q13. मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ?
✅.  - सविनय कायदेभंग चळवळ

 

Q14. खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length)
✅. - NH7

 

Q15. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती?
✅. - ललित कला अकादमी

 

Q16. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे ?
✅. - विजय मल्ला

 

Q17. YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
✅. - 1989

 

Q18. धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात?
✅.  - गोवा

 

Q19. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे?
✅.  - सुकन्या

 

Q20. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते?
✅. - शालीमार गार्डन

 

Q21. या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्‍या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते?
✅.  - गेलापॅगोस

 

Q22. कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या संचार नियमांना काय म्हटले जाते?
✅. - प्रोटोकॉल

 

Q23. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो?
✅. - दसरा

 

Q24. 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते?
✅.  - विजय अमृतराज

 

Q25. पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे?
✅. - आंध्र प्रदेश

 

Q26. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती?
✅. - नर्मदा

 

Q27. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे?
✅.  - ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट

 

Q28. हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
✅.  - कर्नाटक

 

Q29. कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते?
✅. - भरतनाट्यम

 

Q30. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे?
✅.  - अरुणाचल प्रदेश

मोबाईलची 5-जी सेवा वर्ष 2022 पासून भारतात

◾️सध्या भारतात 4-जी मोबाईल सेवेचा लाभ घेणारे कोट्यवधी ग्राहक आढळून येतात. मात्र जगभर आता 5-जी या अतिशय वेगवान आणि उत्तम बॅंडविडथ असलेल्या मोबाईल्सची चलती आहे.

◾️दूरसंचार क्षेत्रात भारतात झालेल्या मोबाईल क्रांतीमुळे नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच नव्या टेलिकॉम धोरणाला मंजूरी दिली असून वर्ष 2022 पर्यंत देशात 5-जी सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक वेगवान तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मिती होणार आहे. याद्वारे दहा हजार कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीला आकर्षित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

◾️या नव्या टेलिकॉम धोरणाचे नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी (एनडीसीपी) असे नामकरण करण्यात आले आहे.

◾️या धोरणाच्या मसुद्यानुसार, एनडीसीपीचे ध्येय फाईव्ह-जी तंत्रज्ञान आणि ऑप्टिकल फायबर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरात हायस्पीड ब्रॉडबॅण्ड सेवा रास्त दरात उपलब्ध करून देणे, असणार आहे.

◾️त्याचबरोबर टेलिकॉम कमिशनचे नाव बदलून डिजिटल कम्युनिकेशन्स कमिशन, असे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या धोरणानुसार, डिजिटल कम्युनिकेशनसाठी निरंतर आणि परवडणारी सेवा देण्यासाठी स्पेक्‍ट्रमची सर्वोत्तम किंमत मिळवण्याची तरतूद करण्यात आली आहे. साडेसात लाख कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या टेलिकॉम क्षेत्रासाठी स्पेक्‍ट्रमची सर्वोत्तम किंमत आणि त्यासंबंधीचे शुल्क ही महत्त्वाची बाब ठरणार आहे.

◾️त्याचबरोबर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या टेलिकॉम सेक्‍टरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्पेक्‍ट्रम शुल्काची तर्कशुद्ध आकारणी करण्यात येणार आहे.

◾️या नव्या धोरणानुसार, प्रत्येकाला 100 मेगाबाईट प्रति सेकंद या वेगाने ब्रॉडबॅण्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

◾️तसेच फाईव्ह-जी सेवा आणि 2022 पर्यंत 40 लाख नवे रोजगारही उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘कर’ या धातूपासून ‘मी करा’ या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात रुपांतर कसे होईल. बरोबर पर्याय निवडा.

   1) आम्ही करू    2) मी करीन   
   3) मी करून    4) आम्ही करावे

उत्तर :- 1

2) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – पुरणपोळी

   1) स्त्रीलिंगी    2) पुल्लिंग   
   3) नपुंसकलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

3) षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत ?

   1) ने, ए, ई, शी    2) ऊन, हून   
   3) त, ई, आ    4) चा, ची, चे

उत्तर :- 4

4) वाक्याचा प्रकार ओळखा. – ‘सर्वांनी शांत बसा.’

   1) संकेतार्थी    2) विध्यर्थी   
   3) संयुक्त    4) आज्ञार्थी

उत्तर :- 4

5) ‘एके दिवशी युध्द बंद झाल्याची बातमी येऊन धडकली,’ या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ?

   1) धडकली    2) युध्द बंद झाल्याची    
   3) बातमी     4) येऊन, एके दिवशी

उत्तर :- 4

6) पुढीलपैकी मध्यमपदलोपी समास कोणता ?

   1) हसतमुख    2) पत्रव्यवहार   
   3) शोधग्राम    4) गृहसेवा

उत्तर :- 2

7) खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा.

   1) ?      2) !     
   3) :      4) ;

उत्तर :- 4

8) शब्द बनणे किंवा सिध्द होणे याला काय म्हणतात ?

   1) शब्दबंध    2) शब्दार्थ   
   3) शब्दसाध्य    4) शब्दसिध्दी

उत्तर :- 4

9) दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
     ‘थंड’

   1) गार      2) किनारा 
   3) आधात    4) गर्दी

उत्तर :- 2

10) ‘विहंग’ या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ :

   1) स्त्री      2) पक्षी     
   3) साप    4) आकाश

उत्तर :- 2

इराक भारताचा मुख्य तेल पुरवठादार देश

भारत सरकारच्या वाणिज्यिक गुप्तचर व सांख्यिकी महासंचालनालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाकडून होणार्‍या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये 72 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सध्या इराक, सौदी अरब, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) हे भारताचे मुख्य कच्चे तेल पुरवठादार देश आहेत. पश्चिम आशियातल्या या पारंपारिक पुरवठादारांच्या पलीकडेही तेलाच्या खरेदीत विविधता आणण्याची योजना भारताने आखलेली असून आता अमेरिकेकडूनही तेलाची आयात केली जात आहे.

अन्य ठळक बाबी

🔸एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अमेरिका या देशांनी सुमारे 4.5 दशलक्ष टन कच्चे तेलाचा पुरवठा भारताला केला.

🔸इराक हा देशाची कच्च्या तेलाची आवश्यकतेच्या जवळजवळ एक चतुर्थांश भाग पूर्ण करतो आणि तो देश भारताला तेल पुरवठा करणारा मुख्य देश आहे. इराकने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारताला 21.24 दशलक्ष टन वजनी तेलाची विक्री केली.

🔸एप्रिल-ऑगस्ट 2019 या कालावधीत भारताने 91.24 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली, जेव्हा की गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण 93.91 दशलक्ष टन एवढे होते.

🔸सौदी अरब हा देश पारंपारिकपणे भारताचा तेलासाठीचा सर्वोच्च स्रोत राहिला आहे, परंतु 2017-18 मध्ये त्याची जागा प्रथमच इराकने घेतली. सौदी अरब कडून भारताला 17.74 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा झाला.

🔸अमेरिकेने मे महिन्यात आर्थिक निर्बंध घातल्यामुळे भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात करणे थांबविलेले असून तेथून केवळ 2 दशलक्ष टन तेलाचीच आयात केली गेली.

🔸नायजेरियाने इराणची जागा घेत भारताकडे तेल पुरवठा करणार्‍या देशांमध्ये तिसरे स्थान मिळविले. एप्रिल-ऑगस्टमध्ये त्याने 7.17 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला. त्यापाठोपाठ UAE (6.4 दशलक्ष टन) आणि व्हेनेझुएला (6.17 दशलक्ष टन) या देशांचा क्रम लागतो.

कलम 370 वरील याचिकांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून वेगळे घटनापीठ

◾️ जम्मू- काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या असून, यावर आता न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.

◾️सर्वोच्च न्यायालयानेच आज या घटनापीठाची स्थापना केली.

◾️ या घटनापीठामध्ये
📌 न्या. एस. के. कौल,
📌न्या. आर. सुभाष रेड्डी,
📌 न्या. बी. आर. गवई आणि
📌 न्या. सूर्यकांत यांचाही समावेश आहे. 

◾️या घटनापीठाची रीतसर सुनावणी ही 1 ऑक्‍टोबरपासून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

◾️हे पाच सदस्यीय घटनापीठ केंद्र सरकारच्या 370 वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाची घटनात्मक वैधता आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी दिलेला आदेश याची पडताळणी करणार आहे.

◾️तत्पूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 28 ऑगस्ट रोजी या संदर्भातील याचिकांची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर घेण्याचे निर्देश दिले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२८ सप्टेंबर २०१९

भारतीय संघात रोहित शर्मा घेणार धोनीची जागा

📌महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात खेळत नसताना, मर्यादीत षटकांच्या सामन्यात उप-कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ३ विजेतेपद मिळवली आहेत.

📌विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली रोहितने संघातील तरुण खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम करावं अशी अपेक्षा करत आहेत.

📌“मैदानात काहीवेळा झटपट निर्णय घेण्याची आवश्यकता असते. रोहितने अशावेळी तरुण खेळाडूंशी बोलून, चर्चा करुन त्यांना मदत करावी अशी अपेक्षा आहे. संघामध्ये तुम्हाला समतोल राखायचा असतो. कर्णधाराला मदतीसाठी एका सिनीअर खेळाडूची गरज असते. धोनी संघात असताना कोहली आणि धोनी हे तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायचे.

📌सध्या धोनी भारतीय संघात नसल्यामुळे रोहितने आपल्या अनुभवाचा फायदा संघातील तरुण खेळाडूंना करुन द्यावा असं सर्वांचं मत पडलं आहे.” संघ व्यवस्थापनातील सुत्राने IANS वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली._

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२२ कुळ कायदा
३)  १८२९ सतीबंदी कायदा
४)  १८३५ वृत्तपत्र कायदा
५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)  १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७)  १८५८ राणीचा जाहीरनामा
८)  १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९)  १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२)  १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३)  १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४)  १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५)  १८८७ कुळ कायदा
१६)  १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७)  १८९९ भारतीय चलन कायदा
१८)  १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९)  १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०)  १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२१)  १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२)  १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३)  १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणाकायदा
२४)  १९१९ रौलेक्ट कायदा
२५)  १९३५ भारत सरकार कायदा
२६)  १९४४ राजाजी योजना
२७)  १९४५ वेव्हेल योजना
२८)  १९४५ त्रिमंत्री योजना
२९)  १९४७ माउंटबॅटन योजना
३०)  १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ब्रिटनच्या पंतप्रधानांचा संसदेत पुन्हा पराभव

✍ पक्षाच्या वार्षिक परिषदेसाठी संसदेचे कामकाज तीन दिवसांसाठी स्थगित करावे हा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा प्रस्ताव गुरुवारी खासदारांनी फेटाळल्याने जॉन्सन यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यामुळे ब्रेग्झिटपूर्वी जॉन्सन यांना संसदेत किती विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे.

✍ पुढील आठवडय़ात जॉन्सन यांच्या कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षाची वार्षिक परिषद होणार असून त्यासाठी संसदेचे कामकाज अल्पावधीसाठी स्थगित करावे ही जॉन्सन यांची सूचना खासदारांनी फेटाळली.

✍ जॉन्सन यांचा संसदेतील हा सातवा पराभव आहे.

✍ सर्व प्रमुख पक्षांच्या परिषदांच्या वेळी संसद अल्पावधीसाठी स्थगित केली जाते, मात्र ब्रेग्झिटमुळे खासदारांच्या मनात असलेल्या तणावाने आता परिसीमा गाठली आहे, त्यामुळेच विरोधी मतदान झाले आहे.

✍ जॉन्सन यांचा संसद पाच आठवडय़ांसाठी स्थगित करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचा निर्णय मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

जागतिक स्नूकर स्पर्धा : अडवाणी-मेहता जोडीला विश्वविजेतेपद

◾️ सांघिक प्रकाराच्या अंतिम सामन्यात थायलंडवर मात

◾️भारताच्या पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता जोडीने आव्हानात्मक थायलंडच्या संघाचा पराभव करीत बुधवारी ‘आयबीएसएफ’ जागतिक स्नूकर स्पर्धेतील सांघिक विजेतेपदावर नाव कोरले.

◾️ अडवाणीच्या खात्यावर हे २३वे जागतिक जेतेपद जमा झाले आहे. तंदुरुस्तीमुळे भविष्यापुढे प्रश्नचिन्ह उभ्या राहिलेल्या आदित्यचे हे पहिलेवहिले विश्वविजेतेपद ठरले.

◾️ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बिलियर्ड्स स्पध्रेसाठी जाण्यापूर्वी अडवाणी आठवडय़ाभरासाठी भारतात येणार आहे.

कलावरी क्लासची अद्ययावत पाणबुडी आयएनएस खंडेरी ही आज भारतीय नौदलात समाविष्ट होणार आहे.

◾️केंद्रीय संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ही पाणबुडी नौदलात समाविष्ट केली जाईल. भारतीय नौदलाकडील ही दुसरी कलावरी क्लासची पाणबुडी आहेत.

🔵 या पाणबुडीची वैशिष्ट्ये 🔵

◽️आयएनएस खंडेरी
◾️लांबी 67.5 मीटर
◽️उंची 12.3 मीटर
◾️वजन 1565 टन

🔺11 किलोमीटर लांबीची पाईप फिटींग
🔺60 किलोमीटर लांबीची केबल फिटींग आहे 
🔺हाय टेन्साईल स्ट्रेन्थ, त्यामुळे अधिक खोलवर सक्षमपणे सक्रीय राहणार 
🔺सलग 45 दिवस पाण्यात राहण्याची क्षमता 
🔺स्टील्थ टेक्नोलॉजीमुळे रडारला हुलकावणी देण्याची क्षमता 
🔺कोणत्याही हवामानात काम करण्याची क्षमता 
🔺350 मीटर खोलवरून शत्रूला हेरण्याची क्षमता 
🔺 आयएनएस खंडेरीत 360 बॅटरी सेल्स 
🔺प्रत्येक बॅटरी सेलचे वजन 750 किलो 
🔺 पाणबुडीत दोन 1250 केडब्ल्यू डिझेल इंजिन 
🔺या जोरावर 6500 नॉटीकल मैल(12000 किमी) अंतर कापणे शक्य 
🔺 सर्वोच्च वेग 22 नॉटस् इतका 
🔺 सर्व अभेद्य चाचण्यांवर पाणबुडी सक्षम 
🔺त्यामुळे सायलेंट किलर अशी पाणबुडीची गणना 
🔺आयएनएस खंडेरीत अनेक अद्ययावत शस्रे 
🔺 पाणबुडीतील आतला आवाज बाहेर न येण्याचे तंत्रज्ञान 
🔺 त्यामुळे शत्रुला सुगावा लागणे कठिण 
🔺 सुरूंग अंथरण्याचीही पाणबुडीची क्षमता 
🔺आयएनएस खंडेरीत दोन पेरिस्कोप आहेत 
🔺 खंडेरीत 6 टॉरपिडो ट्युब्स, एका वेळी 12 टॉरपिडो डागण्याची क्षमता

ब्लॅक होल (कृष्ण विवर) :-

• सप्टेंबर 2019  मध्ये .................... फंडामेंटल फिजिक्समध्ये ......... किंवा ........ हा पुरस्कार देण्याची देण्याची घोषणा करण्यात आली. ब्लॅक होलची (कृष्णविवर) जगातील पहिली प्रतिमा तयार करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.----------- टीमच्या एकूण 347 वैज्ञानिकांनी हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आणि ब्लॅक होल सारख्या अदृश्य शरीराची प्रतिमा जगासमोर सादर केली. ---------- 2019 रोजी इव्हेंट होरायझन टेलीस्कोप संघाने ---------(-------) नावाच्या आकाशगंगा (गॅलेक्सी) मध्ये असलेल्या ब्लॅक होलची प्रतिमा प्रकाशित केली.

या पुरस्कारांतर्गत या संघाला 3 मिलियन अमेरिकी डॉलर ची बक्षीस  देण्यात आले आहे. ही प्रतिमा आकारास आणणारया टीमचे नेतुत्व --------- या महिलेने केले होते. ---------- दुर्बिणीने (EHT) हे छायाचित्र काढलं आहे. EHT ही एक दुर्बिण नसून ------- दुर्बिणींचा संच आहे.

• ब्लॅक होल(कृष्णविवर):-

* उघड्या डोळ्यांना 'न दिसू शकणाऱ्या' या कृष्णविवराचा व्यास ----------- किमीचा आहे आणि आकार पृथ्वीच्या तीस लाख पट मोठा.

* ------- दीर्घिकेत (गॅलेक्सी) जवळपास दहा दिवस ही प्रतिमा स्कॅन करण्यात आली.

* हे कृष्णविवर आपल्या संपूर्ण सूर्यमालेच्या आकाराहूनही मोठे आहे

राष्ट्रीय पुरस्कार:-

• यश चोप्रा मेमोरियल पुरस्कार ( ५ वा) :-
२०१८ :- आशा भोसले

•  हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार:-
२०१८ :- खैय्याम

• पी. सी. चंद्रा पुरस्कार
२०१९:- डॉ. देवी प्रसाद

• सरस्वती पुरस्कार
२०१८:- डॉ. के. शिवा रेड्डी
२०१७:- सितांशू यशचंद्र

•  बिहारी पुरस्कार :-
२०१८:- मनीषा कुलश्रेष्ठ
२०१७:- विजय वर्मा

• व्यास सन्मान:-
२०१८:- लीलाधर जुग्डी
२०१७:- ममता कालीया

• इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
२०१७:- टी.एम. कृष्णा

• रविंद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार:-
२०१८:- राणादास गुप्ता

• उत्कृष्ट संसद सभासद पुरस्कार
२०१७:- भृतहरी मेहता
२०१६:- दिनेश त्रिवेदी

• जी.डी. बिर्ला पुरस्कार :-
२०१८:- राजीव कुमार वर्षाने
२०१७:- डॉ. राजन शंकर नारायन

• सरला पुरस्कार
२०१८ :- शत्रुघ्न पांडव

• शलाका सन्मान:-
२०१७-१८:- जावेद अख्तर

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...