२८ सप्टेंबर २०१९

शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2019

● नवी दिल्लीत एका आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 2019 या वर्षासाठी ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.

● वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) या संस्थेच्यावतीने दिल्या जाणार्‍या या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-👇👇

• जैवशास्त्र : डॉ. कायारत साई कृष्णन
(IISER, पुणे); डॉ. सौमेन बसक
(NII, नवी दिल्ली)

• रसायनशास्त्र : डॉ. राघवन बी. सुनोज
(IIT, मुंबई); डॉ. तपस कुमार माजी (JNCASR, बेंगळुरू)

• भु-शास्त्र, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र : डॉ. सुबिमल घोष (IIT, मुंबई)

• अभियांत्रिकी विज्ञान : माणिक वर्मा (मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया, बेंगळुरू)

• गणितीशास्त्र : डॉ. दिशांत मयूर भाई
पंचोली (IMS, चेन्नई);
डॉ. नीना गुप्ता (ISI, कोलकाता)

• वैद्यकीयशास्त्र : डॉ. धीरज कुमार
(ICGEB, नवी दिल्ली); डॉ. मोहम्मद जावेद अली (एल.व्ही. प्रसाद आय इंस्टीट्यूट, हैदराबाद)

• भौतिकशास्त्र : डॉ. अनिंदा सिन्हा (IISc, बेंगळुरू);  डॉ. शंकर घोष (TIFR, मुंबई)

● पुरस्काराविषयी :-

• वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक डॉ. शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या भारतीय व्यक्तींना दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. 1958 साली पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला.

• वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिला जाणारा हा पुरस्कार जैवशास्त्र, रसायनशास्त्र, भुमी, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान, गणितशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, भौतिकशास्त्र या विभागांमध्ये दिला जातो

16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग 'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार जाहीर #

16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल 'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

या पुरस्काराला 'प्रतिनोबेल किंवा पर्यायी नोबेल' म्हणून ओळखले जाते.

नोबेल शांतता पुरस्कारासाठीही ग्रेटाला नामांकन देण्यात आले आहे.

4 डिसेंबरला म्हणजेच नोबेल पारितोषिक वितरणाच्या सहा दिवस आधी स्टॉकहोम येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

ग्रेटा थनबर्गने स्वतःची ओळख 16 वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता असा करून दिला आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी तिने गेल्या वर्षी म्हणजेच 2018 साली ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन सुरू केले होते.

त्यानंतर तिने शुक्रवारी सतत आंदोलने केली आहेत, त्यामुळे वर्षभरात कितीतरी शुक्रवार ती शाळेतही जाऊ शकलेली नाही.

ग्रेटाच्या आंदोलनाला “फ्रायडेज फॉर द फ्युचर” असे नाव मिळाले असून हे आंदोलन विविध देशांमध्ये पोहोचले आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

व्यापारी आणि स्वयं-रोजगारप्राप्त लोकांसाठीच्या राष्ट्रीय पेंशन योजनेलाही प्रारंभ.

शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठीच्या प्रयत्नातला आणखी एका महत्वाच्या योजनेचा प्रधानमंत्री किसान मान धन योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडची राजधानी रांची येथे प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत 60 वर्षाच्या पाच कोटी छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेंशनद्वारे त्यांचे जीवन सुरक्षित करण्यात येणार आहे.

व्यापारी आणि स्वयं रोजगार असलेल्या व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पेंशन योजनेचा प्रारंभही पंतप्रधानांनी केला.

या व्यक्ती आणि व्यापाऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षीपासून किमान दरमहा 3,000 रुपये पेंशन या योजनेद्वारे मिळणार आहे.
सुमारे 3 कोटी छोट्या व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

‘जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करणारे भक्कम सरकार’ असे आश्वासन निवडणुकीच्या वेळी दिले होते.नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.

सध्या देशातल्या सुमारे साडेसहा कोटी शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात 21 हजार कोटीपेक्षा जास्त रुपये जमा करण्यात आले आहेत. झारखंडमधल्या 8 लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात सुमारे 250 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. विकासाला आमचे प्राधान्य आहे आणि कटिबद्धताही, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. प्रत्येक भारतीयाला सामाजिक सुरक्षेचे कवच देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ज्यांना अतिशय गरज आहे अशांना सरकार मदतीचा हात देत आहे. गेल्या मार्चपासून अशाच पद्धतीची पेंशन योजना देशातल्या असंघटीत क्षेत्रातल्या कोट्यवधी कामगारांसाठी सुरू आहे.

32 लाख कामगारांपेक्षा जास्त कामगार श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी झाले आहेत. 22 कोटी पेक्षा जास्त जण प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी झाले आहेत. त्यापैकी 30 लाख लाभार्थी केवळ झारखंडमधले आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 44 लाख गरीब रुग्णांना लाभ झाला असून त्यापैकी 3 लाख झारखंडमधले आहेत.

सर्वांना सक्षम बनविण्यासाठी पंतप्रधानांनी आज देशभरातल्या आदिवासी बहुल भागात 462 एकलव्य आदर्श शाळांचा प्रारंभ केला. त्या भागातल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर दर्जेदार शिक्षण पुरविण्यावर या शाळांमध्ये लक्ष केंद्रीत करण्यात येईल.

या एकलव्य शाळा, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे माध्यम म्हणून काम करण्याबरोबरच क्रीडा, कौशल्य विकास सुविधाही उपलब्ध करतांनाच स्थानिक कला आणि संस्कृतीचे जतनही यामध्ये करण्यात येणार आहे. या शाळांत प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सरकार दरवर्षी एक लाख रुपयापेक्षा जास्त खर्च करणार आहे.

IMDच्या ‘जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’मध्ये भारत 44 व्या क्रमांकावर

स्वित्झर्लंडच्या IMD संस्थेचा भाग असलेल्या ‘वर्ल्ड कॉम्पिटीटिव्हनेस सेंटर’ या विभागाकडून ‘जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’ या शीर्षकाखाली जागतिक स्पर्धात्मकतेच्या बाबतीत एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्यवसाय, सरकारी आणि व्यापक समाजातल्या आर्थिक परिवर्तनासाठी एक मुख्य चालक ठरणार्‍या डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास आणि त्यांचे अन्वेषण करण्यासाठी 63 राष्ट्रांची क्षमता आणि तत्परता यांचे मूल्यमापन करते.

अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी, अभ्यासात तीन घटकांना विचारात घेतले जाते:
(i) ज्ञान - नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता; (ii) तंत्रज्ञान - नवीन डिजिटल क्षेत्राच्या नवकल्पना विकसित करण्याची क्षमता; आणि (iii) भविष्यातली तत्परता - आगामी विकासासाठीची तयारी.

या यादीत यंदा भारताने चार स्थानांची प्रगती दाखवीत 44 वे स्थान प्राप्त केले आहे. भारताने ज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब व शोध घेण्यासाठी भविष्यातल्या तयारीच्या बाबतीत विशेष सुधारणा केली आहे. दूरसंचार क्षेत्रातल्या गुंतवणुकीच्या बाबतीत भारताने प्रथम स्थान मिळविले.

अन्य ठळक बाबी

🔸संयुक्त राज्ये अमेरिका (USA) ही जगातली सर्वाधिक डिजिटल स्पर्धात्मक अर्थव्यवस्था आहे.

🔸अमेरिकेच्यापाठोपाठ पुढे सिंगापूर (2), स्वीडन, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, फिनलँड, हाँगकाँग SAR, नॉर्वे आणि कोरिया प्रजासत्ताक या देशांचा प्रथम 10 मध्ये क्रम लागतो.

🔸अमेरिका आणि स्वीडन हे देश ज्ञाननिर्मिती, तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रोत्साहनपूर्ण वातावरणाची निर्मिती आणि अभिनव कल्पनांचा अवलंब करण्याची तयारी यांच्यात संतुलित दृष्टीकोन ठेवतात. सिंगापूर, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड एक किंवा दोन घटकांना प्राधान्य देतात.

🔸हॉंगकॉंग SAR, कोरिया प्रजासत्ताक, तैवान आणि चीन यासारख्या अनेक आशियाई अर्थव्यवस्थांनी 2018 सालाच्या तुलनेत यंदा लक्षणीय प्रगती दर्शविलेली आहे. या सर्व अर्थव्यवस्थांनी त्यांच्या तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये आणि त्यांच्या व्यवसायातील चपळाईमध्ये उल्लेखनीय प्रगती दर्शविलेली आहे.

🔸भारत आणि इंडोनेशिया या देशांनी अनुक्रमे चार आणि सहा स्थानांनी झेप घेतली असून, प्रतिभा, प्रशिक्षण आणि शिक्षण तसेच तांत्रिक पायाभूत सुविधांचा विस्तार अश्या बाबतीत सकारात्मक परिणाम अनुभवले.

🔸मध्य-पूर्व प्रदेशामध्ये, संयुक्त अरब अमिरात आणि इस्त्राएल हे प्रमुख प्रादेशिक डिजिटल केंद्र म्हणून कायम राहिले.

🔸लॅटिन अमेरिकेत मेक्सिको आणि कोलंबिया केवळ या देशांनीच या वर्षी प्रगती दर्शविलेली आहे.

अरुणाचलप्रदेशात पर्यटन प्रकल्प

केंद्र सरकार प्रणीत ‘स्वदेश दर्शन’ योजनेतंर्गत मुख्यमंत्री पेमा खांडू व राज्य पर्यटनमंत्री के.जे.अल्फोन्स यांनी अरुणाचल प्रदेश राज्यातील दोन ईशान्य पर्यटन प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

या दोन्ही प्रकल्पांना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने वर्ष २०१५ मध्येच मंजुरी दिली होती.

🔰 भालुकपोंग-बोम्दील-तवांग प्रकल्प -
          या प्रकल्पात गृहनिर्माण, शौचालय बांधणी यांसारखी पायाभूत कामे करण्यात आली आहेत.

आता सोरंग माठ, त्यात त्सो व सेला सरोवर, थीन्ग्बू व ग्रेन्खा गरम पाण्याचे झरे यासारख्या ठिकाणी विविध सुविधा करण्यात येणार आहेत.

🔰नाफरा-संगदूपोटा-जीरो-येम्चा प्रकल्प -
          या प्रकल्पाअंतर्गत पर्यटनास अनुकूल असणाऱ्या विविध विविध नगरांमध्ये हस्तकला बाजार, गिर्यारोहण उपक्रम, मोठमोठी वाहनतळे, हेलिपॅड अशा सुविधा देण्यात येणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी वन लाइनर्स, 27 सप्टेंबर 2019.

✳ मध्य प्रदेश सरकारने भोपाळ मेट्रोचे नाव राजा भोज आणि भोज मेट्रो म्हणून ओळखले जाईल अशी घोषणा केली.

✳ डीएम राजनाथसिंग 28 सप्टेंबर रोजी द्वितीय कलवारी वर्ग पाणबुडी 'आयएनएस खंदेरी' कमिशनसाठी

✳ भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंह भाजपमध्ये सामील झाले

✳ ऑलिम्पिक पदक जिंकणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त भाजपमध्ये सामील झाला

✳ द्वितीय भारत - सिंगापूर हॅकाथॉन आयआयटी मद्रासमध्ये घेण्यात येईल

✳ अफगाणिस्तानात राष्ट्रपतीपदाची निवडणूक 28 सप्टेंबर रोजी होणार आहे

✳ एनएसए अजित डोभाल काश्मीर दौर्‍यावर श्रीनगर येथे पोचले

✳ शासनाने देशभरात टूल्स रूमची संख्या 18 ते 153 पर्यंत वाढविली

✳ रूपा गोपीथ यांनी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निवडले

✳ परुपल्ली कश्यप कोरिया ओपन पुरुष एकेरी क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश करते

✳ बांगलादेश दुर्गापूजनाच्या वेळी भारताला 500 टन हिलची निर्यात करणार आहे

✳ लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

✳ भारतातील इंटरनेट यूजरबेसपैकी जवळपास 15% हे वय 5-11 वर्षांच्या दरम्यान आहे: आयएएमएआय

✳ पंतप्रधान मोदींनी न्यूयॉर्कमध्ये इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांची भेट घेतली

✳ सार्कच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न्यूयॉर्कमध्ये झाली

✳ एएएम एस जयशंकर यांनी सार्कच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला भाग घेतला

✳ फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक्स चिराक यांचे निधन

✳ 74 वे संयुक्त राष्ट्र महासभेचे सत्र न्यूयॉर्कमध्ये सुरू

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  74 व्या युएनजीए सत्राला संबोधित करणार आहेत

✳ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आज यूएनजीए सत्राच्या 74 व्या सत्राला संबोधित करणार आहेत

✳ राजीव सिन्हा यांना पश्चिम बंगालचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले जाईल

✳ सौरव गांगुली इलेक्टेड क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष

✳ आयएमडी बिझिनेस स्कूलने वर्ल्डचे डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्था 2019 जाहीर केले

✳ जगातील सर्वाधिक डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्था 2019 मध्ये यूएस अव्वल स्थानावर

✳ सिंगापूर जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत द्वितीय क्रमांकावर आहे

✳ जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत स्वीडनचा तिसरा क्रमांक आहे

✳ जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत डेन्मार्कचा चौथा क्रमांक आहे

✳ स्वित्झर्लंडने जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत 5 व्या स्थानावर आहे

✳ जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत नेदरलँड्स सहाव्या क्रमांकावर आहे

✳ फिनलँड जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत 7 व्या स्थानावर आहे

✳ हाँगकाँगने जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत आठवा क्रमांक मिळवला

✳ जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत नॉर्वेचा 9 वा क्रमांक आहे

✳ कोरियाने जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत 10 वे स्थान मिळविले

✳ तैवानने जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत 13 वे स्थान मिळविले

✳ जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत चीनने 22 वे स्थान मिळविले

✳ जगातील डिजिटली स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत रशियाचा 38 वा क्रमांक आहे

✳ जगातील डिजिटल प्रतिस्पर्धी अर्थव्यवस्थेत भारताचा 44 वा क्रमांक आहे

✳ पीएमसी बँक खात्यांसाठी आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 10,000 रुपये केली आहे

✳ पाकिस्तान, तुर्की, मलेशिया संयुक्तपणे इस्लामिकोफोबिया टीव्ही सुरू करण्यासाठी

✳ वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची सुरुवात डोहा, कतार येथे होईल

✳ 2018 मध्ये भारतात 21.5 लाख टीबी प्रकरणे नोंदवली गेली: अहवाल

✳ जागतिक युवा बुद्धीबळ स्पर्धा  2019 मुंबई येथे होणार आहे

✳ आयसीसी 2023 पर्यंत फेसबुकसह विशेष डिजिटल सामग्री भागीदारी

✳ पंतप्रधान मोदी 9 नोव्हेंबर रोजी करतारपूर यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीच्या ध्वजारोहण करणार आहेत.

राणी रामपालकडे हॉकीचे नेतृत्व

.

स्टार फॉरवर्ड राणी रामपाल हिच्याकडे इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाºया या दौºयात पाच सामने खेळविले जातील.

४ ऑक्टोबरपर्यंत चालणाºया या दौºयात उपकर्णधार गोलकिपर सविता असेल. सविता आणि रजनी इतिमारपू यांनी स्वत:चे स्थान पक्के केले. बचावफळीत दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, निरा खोखर आणि सलिमा टेटे, नमिता टोप्पो, सुशीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंझ यांना स्थान देण्यात आले आहे

मुख्य कोच शोर्ड मारिन म्हणाले, ‘आम्ही टोकियो आलिम्पिकसाठी पात्रता गाठण्यात महत्त्वाच्या वळणावर आहोत. या दौºयाचा लाभ ओडिशात होणाºया एफआयएच हॉकी आॅलिम्पिक पात्रता फेरीत अमेरिकेविरुद्ध खेळताना निश्चित होणार आहे.’

महिला हॉकी संघ :

सविता (उपकर्णधार), रजनी इतिमारपू बचावफळी : दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना

खोखर, सलिमा टेटे.मधली फळी : सुशीला चानू पुखराम्बाम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल,

लिलिमा मिंझ, नमिता टोप्पो आक्रमक फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर व शर्मिला देवी.

ऑस्ट्रेलियात गांजास कायदेशीर मान्यता


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ऑस्ट्रेलियन विधिमंडळांने देशाची राजधानी कॅनबेरा आणि आसपासच्या प्रदेशात वैयक्तिक गांजा वापरास कायदेशीर मान्यता दिली आहे.

त्यामुळे गांजावरील निर्बंध शिथिल करणारे कॅनबेरा हे ऑस्ट्रेलियातील पहिलेच शहर ठरले आहे.

ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी (एसीटी) विधानसभेत बुधवारी (ता. २५) राजधानी कॅनबेरा क्षेत्रातील खासदारांकडून याबाबत एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाअंतर्गत ऑस्ट्रेलियातील सहा राज्यांसह, दोन मुख्य प्रातांमध्ये वैयक्तिक गांजा वापरास परवानगी देण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅ ३१ जानेवारी २०२० पासून हा नवीन कायदा अंमलात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मात्र, यासाठी सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत.

यामध्ये प्रतिव्यक्ती ५० ग्रॅम गांजा बाळगण्यास परवानगी देण्यात आली असून, गांजाचा वापर करणाऱ्याचे वय हे १८ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

याशिवाय प्रति कुटुंब केवळ ४ गांजाच्या रोपांची लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

❇️ संघराज्यीय कायद्यांशी परस्परविरोधी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ऑस्ट्रेलियाच्या संघराज्यीय कायद्यानुसार गांजा हा एक प्रतिबंधित पदार्थ आहे. त्यामुळे नवा कायदा हा ऑस्ट्रेलियातील संसद निर्मित राष्ट्रीय औषध कायद्यांशी परस्परविरोधी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये देखील गांजाच्या वैयक्तिक वापरास कायदेशीर मान्यता देण्याबाबत जनमत चाचणी घेण्यात येणार आहे.
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) रिकाम्या जागी योग्य शब्दाचा वापर करा.

    क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांनाच ................... असे म्हणतात.

   1) अविकारी क्रियापदे    2) कर्मविषयक अव्यये   
   3) क्रियाविशेषण अव्यये    4) शब्दयोगी अव्यय

उत्तर :- 3

2) खालील वाक्यांपैकी शब्दयोगी अव्ययाचा उचित प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

   1) देशासाठी प्राण अर्पण करणारे हुतात्मे होत      2) पतंग वर जात होता
   3) सूर्य ढगामागे लपला          4) मागे या ठिकाणी विहीर होती

उत्तर  :- 3

3) ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

   1) कीर्ति    2) रूपे      3) परी      4) उरावे

उत्तर :- 3

4) अयोग्य जोडी निवडा.

   अ) प्रशंसादर्शक    -  खाशी, ठीक फक्कड
   ब) तिरस्कारदर्शक  -  शीड, हुडूत, छी
   क) संबोधनदर्शक  -  अगे, अरे, अहो
   1) अ      2) ब      3) क      4) यापैकी नाही

उत्तर :- 4

5) खालील वाक्यातील ‘अपूर्ण भविष्यकाळी’ वाक्य कोणते  ?

   1) आईने देवपूजा केली असेल      2) आई देवपूजा करीत होती
   3) आई देवपूजा करीत असेल      4) आई देवपूजा करीत आहे

उत्तर :- 3

6) ‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग कोणते?
   1) नपुंसकलिंगी      2) उभयलिंगी    3) स्त्रीलिंगी    4) पुल्लींगी.

उत्तर :- 3

7) गायी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

   1) बैल        2) गाय      3) गाई      4) कळप

उत्तर :- 2

8) ‘खेळ’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?

   1) खेळ      2) खेळे      3) खेळी      4) खेळू

उत्तर :- 1

9) ‘विद्यार्थ्याला बक्षीस दिले’ हे कोणते कारक आहे ?

   1) अपादान      2) संप्रदान    3) अधिकरण    4) करण

उत्तर :- 2

10) तरुणांच्या मनात विष का पेरता ! या वाक्याचे आज्ञार्थी रूप कसे होईल ?

   1) तरुणांच्या मनात विष ! ते कां पेरता !      2) तरुणांच्या मनात विष पेरू नका
   3) तरुणांची मने विषारी बनतील        4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

दिवीज शरणला सेंट पीटर्सबर्ग स्पर्धेचे विजेतेपद


✍भारताचा दिवीज शरण आणि स्लोव्हेकियाचा इगोर झेलेने या जोडीने सेंट पीटर्सबर्ग एटीपी टेनिस स्पर्धेच्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

✍अंतिम सामन्यात रविवारी त्यांनी इटालियन जोडी मॅट्टियो बेरेंटीनी व सिमोन बोलेल्ली यांना ६-३, ३-६, १०-८ अशी मात दिली.

✍या विजेतेपदाने दिवीज व इगोर जोडीला २५० एटीपी गुणांची कमाई झाली आहे.

✍३३ वर्षीय दिवीजचे हे दुहेरीचे पाचवे विजेतेपद असून त्याने यंदा रोहन बोपन्नाच्या जोडीने पुण्यात महाराष्ट्र ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावून यंदाची सुरूवात यशस्वी केली होती.

✍यंदा त्याने महाराष् ओपनशिवाय निंगबो चॅलेंजर स्पर्धासुद्धा जिंकली आहे.

✍उपांत्य फेरीत दिवीज व इगोर या जोडीने अग्रमानांकित निकोला मेक्तीक व फ्रँको स्कुगोर या क्रोएशियन जोडीला ७-५, ६-१ असा पराभवाचा धक्का दिला होता.

२७ सप्टेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी किती संमतिदर्शक अव्यये आहे.

     हां, जी, जीहां, ठीक, बराय, हाँ, अच्छा

   1) सर्व      2) सहा      3) पाच      4) चार

उत्तर :- 1

2) ‘मी निबंध लिहीत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) अपूर्ण भूतकाळ    2) रीती वर्तमानकाळ 
   3) रीती भूतकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 3

3) “हंस” या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.

   1) हंसी    2) हंसा      3) हंसीण      4) हंसीका

उत्तर :- 1

4) रामाहून गोविंदा मोठा आहे.
     अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?

   1) कर्ता    2) संप्रदान    3) अपादान    4) करण

उत्तर :- 3

5) वाक्यप्रकार ओळखा.
     आई वडिलांचा मान राखावा.

   1) आज्ञार्थी    2) विध्यर्थी   
   3) संकेतार्थी    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

6) ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या वाक्यात विधेय कोणते आहे?

   1) गावा    2) आमुच्या   
   3) आम्ही    4) जातो

उत्तर :- 4

7) ‘तुम्ही कामे केलीत’, हे वाक्य कोणत्या प्रयोग प्रकारातील आहे ?

   1) कर्तृ – कर्मसंकर  2) कर्मकर्तरी   
   3) कर्तृ – भावसंकर  4) कर्मृ – भावसंकर

उत्तर :- 1

8) खालील शब्दाचा समास ओळखा. – ‘सादर’

   1) विभक्ती – तत्पुरुषस      2) सहबहुव्रीही   
   3) व्दंव्द        4) नत्र बहुव्रीही

उत्तर :- 2

9) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास खालीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल.

   1) पूर्णविराम    2) अर्धविराम   
  3) स्वल्पविराम    4) अपूर्णविराम

उत्तर :- 4

10) पुढील शब्दातील तद्भव शब्द ओळखा.

   1) जल      2) गाव     
   3) एजंट    4) मंजूर

उत्तर :- 2

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...