१७ सप्टेंबर २०१९

300 ड्रोनचा वापर करून भारताचा नकाशा तयार करणार: SoI


💢 देशाचा नकाशा तयार करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) प्रथमच ड्रोनचा वापर करणार आहे.

💢 योजनेनुसार ड्रोन या अद्ययावत तंत्राचा वापर करून हाय-रिझोल्यूशन असलेले नकाशे तयार करण्यात येणार आहेत.

💢 पुढील दोन वर्षांत भारतीय भूप्रदेशाचा एकूण 75% भौगोलिक भाग, म्हणजेच एकूण 3.2 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी सुमारे 2.4 दशलक्ष चौ.किमी.चा नकाशा तयार केला जाणार आहे.

💢 सध्या सर्वोत्कृष्ट नकाशांचे रिझोल्यूशन (पृथक्करण) 1: 250000 असे आहे, म्हणजेच नकाशावरील 1 सेंटीमीटर हे भुमीवरील 2500 सेंटीमीटर दर्शविते.

💢 योजनेनुसार नवा नकाशा 1:500 रिझोल्यूशनचा असणार आहे.

⭕️ भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) ⭕️

💢 भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) या संस्थेचे मूळ सन 1767 मध्ये आहे.

💢 हे भारतातला सर्वांत जुना वैज्ञानिक विभाग आणि जगातल्या सर्वात जुन्या सर्वेक्षण आस्थापनांपैकी एक आहे.

💢 सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया हे या संस्थेचे प्रमुख आहेत.

💢 सध्या हे पद लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार यांच्याकडे आहे.

💢 संस्थेचे मुख्यालय देहारादून (उत्तराखंड) येथे आहे.

💢 देशाचे शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण आणि नकाशा तयार करण्यासाठी कर्नल लॅम्ब्टन आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट या प्रसिद्ध सर्वेक्षकांनी 10 एप्रिल 1802 रोजी ‘ग्रेट ट्रीग्नोमेट्रिक सर्व्हे (GTS)’चा पाया रचला होता.

        ⭕️ भारताचा भूगोल ⭕️

💢 भारत देशाचे भौगोलिकदृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात.

💢 भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.

💢 भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता.

💢 पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले.

💢 साधारणपणे 5 कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली.

💢 भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला.

💢 आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. गंगेच्या खोर्‍याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे.

💢 अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये गणला जातो

💢 अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे.

💢 पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो.

💢 दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत.

💢 दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ निर्माण आहेत.

💢 भारताला एकूण 7,517 किलोमीटर (4,671 मैल) इतका समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यातला 5,423 किलोमीटर (3,370 मैल) इतका द्वीपकल्पीय भाग भारतात आहे तर उर्वरित 2,094 किलोमीटर (1,301 मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.

💢 मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये 43 टक्के वाळूचे किनारे आहे, 11 टक्के खडकाळ तर उर्वरित 46 टक्के दलदलींनी भरलेला आहे.

💢 बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.

💢 दख्खनच्या पठारावरील महत्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात.

💢 मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.

💢 पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्‍यापाण्याचे दलदल आहे त्याला ‘कच्छचे रण’ असे म्हणतात.

💢 गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे.

💢 भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात - दक्षिण अरबी समुद्रातले लक्षद्विप आणि इंडोनेशियाजवळचे अंदमान आणि निकोबार.

डीआरडीओकडून ‘अस्त्र’ क्षेपणास्राचे सुखोई -30 द्वारे यशस्वी परीक्षण

◾️संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने आज हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ या क्षेपणास्त्राचे  यशस्वी परीक्षण केले.

◾️सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानाद्वारे या क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले. पश्चिम बंगालमधील हवाई तळावरून सुखोईने या क्षेपणास्त्रासह भरारी घेतली होती.

◾️संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असलेल्या या क्षेपणास्रात ७० किलोमीटर अंतरावरील लक्ष भेदण्याची क्षमता आहे.

◾️चाचणीप्रसंगी या क्षेपणास्त्राने हवेत तरंगणाऱ्या आपल्या लक्षाचा अचुक वेध घेतला.

◾️आतापर्यंत या क्षेपणास्त्र प्रणालीतील २७ क्षेपणस्रांचे त्यांची कामगिरी निश्चित करण्यासाठी व त्यांना मान्यता देण्यासाठी परीक्षण केल्या गेले आहे.

◾️भारत सरकारने मार्च २००४ मधील ९९५ कोटींच्या अर्थसंकल्पात ‘अस्त्र’ च्या योजनेस मंजुरी दिली होती.

◾️डीआरडीओ अंतर्गत हैदराबादेतील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेस अस्त्र क्षेपणास्त्रांच्या रचना आणि विकासासाठी काम करणारी एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

◾️पहिल्या अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानाद्वारे मे २०१४ मध्ये घेण्यात आली होती.

◾️भारताच्या संरक्षणसामग्रीत असलेले  ‘अस्त्र’  नावाचे हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे विमानभेदी क्षेपणास्त्र आहे.

◾️हे  भारतीय बनावटीचे असून  १५ किलो स्फोटके घेऊन प्रवास करू शकते. सुपरसॉनिक गतीने हे क्षेपणास्त्र मारा करते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आधी जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं

मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे ६४५९० चौ. किमी असून यामध्ये पुढील ८ जिल्हे आणि त्यातील – ७८ तालूके व ६३ बाजारपेठेची शहरं आहेत.

1) औरंगाबाद
2) नांदेड
3) परभणी
4) बीड
5) जालना
6) लातूर
7) उस्मानाबाद व
8) हिंगोली

 



 

दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या ५ जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.

यामध्ये वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, ५२ दरवाजे, पानचक्की, ३ जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.

मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी –

पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते.

निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता.

मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले.

दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

 



 

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.

मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्गजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले.

या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.

निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली – ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.

मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.

१५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला.

हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला…!

हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला…!

हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला…!

१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.

 



 

१७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत.

भारताला इंधनाची कमी भासू देणार नाही सौदीचं आश्वासन

✍ सौदी अरबमधील प्रमुख तेल उत्पादक कंपनी असलेल्या सौदी अरामकोने भारताला इंधनाची कमी भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. असे तेल मंत्रालयाने सोमवारी सांगितले आहे. विशेष म्हणजे सौदी अरामकोच्या अबकेक आणि खुराइस येथील  केंद्रांवर दोन दिवसांपूर्वीच ड्रोनद्वारे हल्ले झालेले आहेत. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

✍ सौदी अरामकोच्या अधिकाऱ्यांनी रविवारी भारतीय रिफायनरींना इंधन पुरवठ्यात कमी भासू दिली जाणार नसल्याचे सांगितले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय भारतीय रिफायनर आणि सौदी अरामको यांच्याशी सल्लामसलत करून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असे तेल मंत्रालयाकडू सांगण्यात आले आहे.

✍ जगातल्या सर्वा मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक अशी ओळख असलेली सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या दोन केंद्रांवर ड्रोनद्वारे शनिवारी सकाळी हल्ले झाले होते.  त्यामुळे आगामी चार महिन्यात इंधनाचे दर सर्वोच्च पातळीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

✍ सुरूवातीस या हल्ल्यामुळे नेमके किती नुकसान झाले आहे हे जरी अस्पष्ट असले, तरी यामुळे देशातील निम्म्याहून अधिक इंधन उत्पादन उत्पादन घटले आहे आणि दररोजचा ५.७ दशलक्ष बॅरल किंवा जगातील पाच टक्के पुरवठा कमी झाला आहे. 

✍ इंधन पुरवठ्यात इराकनंतर दुसरा क्रमांक सौदीचा लागतो, तर भारत आपल्या गरजेच्या ८३ टक्के तेलाची आयात करतो.

✍ सौदीने २०१८-१९ या आर्थिक वर्षात निर्यात केलेल्या एकूण २०७.३ दशलक्ष टन तेलापैकी भारताने ४०.३० दशलक्ष टन कच्चा तेलाची खरेदी केली आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –

   1) धरसोड करणे    2) टंगळमंगळ करणे    3) सोडून देणे    4)  पुढे पुढे जाणे

उत्तर :- 2

2) ‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) परात्म      2) ऐतखाऊ      3) घरकोंबडा    4) एकलकोंडा

उत्तर :- 3

3) खालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.

   1) अमिबा      2) अमीबा      3) अब्मिबा    4) अम्बिमा

उत्तर :- 1

4) खालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ...............

   1) सजातीय      2) विजातीय      3) संयुक्त      4) –हस्व

उत्तर :- 1

5) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

   1) कवीश्वर      2) दुरात्मा      3) सज्जन    4) गणेश

उत्तर :- 3

6) योग्य पर्याय निवडा.

   अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो.
   ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.

   1) अ      2) दोन्ही      3) ब      4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

7) ‘सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमाने वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.

   1) भाववाचक    2) सामान्यनाम    3) क्रियावाचक    4) धातुसाधित

उत्तर :- 1

8) सर्वनामाचे एकूण मूळ ............ प्रकार पडतात. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.

   1) नऊ    2) तीन      3) चार      4) सात

उत्तर :- 1

9) ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) सर्वनाम साधित विशेषण    2) धातुसाधित विशेषण
   3) अव्ययवसाधित विशेषण    4) नामसाधित विशेषण

उत्तर :- 4

10) ‘तू एवढया भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.

   1) आख्यात    2) वाख्यात    3) ताख्यात    4) लाख्यात

उत्तर :- 2

गृहनिर्माण, निर्यात क्षेत्रासाठी अर्थबळ.


✍देशाच्या मंदावलेल्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी गृहबांधणी आणि निर्यात क्षेत्रासाठी प्रोत्साहनपर उपायांची घोषणा केली. या दोन महत्त्वाच्या रोजगारप्रवण क्षेत्रांसाठी ७० हजार कोटींचा निधी सरकारने खुला केला आहे.

✍चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत विकासाचा दर सहा वर्षांतील तळ दाखविणारा पाच टक्के नोंदला गेला आहे. विकासदराची ही घसरण थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या चार आठवडय़ांत योजले गेलेले हे तिसरे अर्थ-प्रोत्साहक उपाय आहेत.

✍शनिवारी पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांची घोषणा केली. यापूर्वी विदेशी गुंतवणूकदारांवरील कर अधिभार रद्दबातल करण्यात आला आहे, तसेच दहा सरकारी बँकांचे महाविलीनीकरण करून चार मोठय़ा बँकांची निर्मितीची वाट खुली करण्यात आली आहे.

संसद स्थगित करण्याचा जॉन्सन यांचा निर्णय बेकायदा

📌लंडन : ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या नियोजित तारखेच्या दोन महिन्यांपूर्वी देशाची संसद स्थगित करण्याचा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा निर्णय बेकायदा असल्याचा निर्णय स्कॉटलंडच्या एका न्यायालयाने बुधवारी दिला. तथापि, संसद स्थगितीचा निर्णय रद्द करण्याचा आदेश त्यांनी दिला नाही.

📌या मुद्दय़ावर ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय घ्यायला हवा, असे एडिनबर्ग येथील स्कॉटलंडच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले. तेथील सुनावणी मंगळवारी सुरू होणार आहे.

📌ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर  पडण्याच्या दोन आठवडे आधीपर्यंत,  म्हणजे १४ ऑक्टोबपर्यंत देशाची संसद पाच आठवडय़ांसाठी स्थगित करण्याच्या, किंवा औपचारिकरीत्या कामकाज थांबवण्याच्या सरकारच्या निर्णयाला ७० लोकप्रतिनिधींच्या एका गटाने आव्हान दिले आहे.

📌पुढील महिन्यात संसदेच्या नव्या सत्रात ब्रेग्झिटविषयीचा आपला अजेंडा नव्याने सुरू करता यावा यासाठी आपण ही कृती केल्याचा जॉन्सन यांचा दावा आहे. मात्र, संसद स्थगितीमुळे त्यांची बंडखोर लोकप्रतिनिधींच्या विरोधाला तोंड देण्यापासून काही दिवसांसाठी सुटका होणार आहे. जॉन्सन हे लोकशाही मार्गाने होणाऱ्या समीक्षेपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

भारताच्या सहकार्याचे अमेरिकेकडून कौतुक

🔰वॉशिंग्टन : इराणकडून तेल खरेदी न करण्याच्या मुद्दय़ावर भारताकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारताचे कौतुक केले आहे. भारत हा अमेरिकेचा चांगला मित्र असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे.

🔰इराण आणि भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत, मात्र अमेरिकेला सहकार्य करण्यासाठी भारताने इराणकडून तेल आयात मोठय़ा प्रमाणात कमी केली आहे. इराणवर आर्थिक निर्बंध लादून अमेरिकेने अन्य सहकारी देशांना इराणकडून तेलाची आयात बंद करण्यास सांगितले होते. सुरुवातीला अमेरिकेने भारतासह अन्य देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली होती. मात्र सहा महिन्यांनंतर ही सवलत बंद करण्यात आली होती.

🔰इराणच्या आण्विक कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने २०१५च्या आण्विक करारातून माघार घेतली. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे.  इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असे निर्बंध अमेरिकेने लादले आहेत. त्यामुळे उभय देशांत मोठा तणाव निर्माण झाला आहे.

आता प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येणार प्रवास

🔰अनेकदा तिकिटांसाठी लागलेल्या लांब रांगा आपली डोकेदुखी ठरत असतात. परंतु आता रेल्वेने घेतलेला मोठा निर्णय हा प्रवाशांसाठी थोडासा दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आपात्कालिन परिस्थितीत आता प्रवासी प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत. परंतु यासाठी रेल्वेने एक अट घातली आहे.

🔰प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवास करण्याची मुभा रेल्वे दिली असून यासाठी संबंधित प्रवाशाला गार्ड किंवा टिसीचे परवानगी पत्र घ्यावे लागणार आहे. जर यासाठीही सदर प्रवाशाकडे वेळ नसल्यास ट्रेनमध्ये जाऊन नियमित प्रक्रिया पूर्ण करत प्रवास करू शकता. रेल्वेच्या नियमानुसार हे परवानगी पत्र रेल्वेचे गार्ड, टिसी किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून घेता येऊ शकते.

🔰तर ट्रेनमध्ये चढल्यानंतर प्रवाशाला याबाबत टिसीला माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सदर प्रवाशाच्या इच्छित स्थळाचे त्यांच्याकडून तिकिट बनवून घेता येईल. परंतु यासाठी केवळ 250 रूपये दंडाच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत. तसेच ज्या श्रेणीतून प्रवास करायचा असेल, त्याच श्रेणीचे शुल्क भरावे लागेल. प्रवाशी ज्या रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढला ते बोर्डिंग स्टेशन मानले जाणार आहे. परंतु याद्वारे प्रवसाची मुभा मिळणार असली तरी तिकिटाचे आरक्षण मात्र देण्यात येणार आहे.

🔰तसेच दरम्यान, सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत केवळ 10 रूपये आहे. कोणतीही व्यक्ती जाणूबुजून अथवा फसवण्याच्या बहाण्याने या तिकिटावर प्रवास करत असेल, तर त्याला तुरूंगवारीही होऊ शकते. तसेच यासाठी 1 हजार 260 रूपयांचा दंड किंवा तुरूंगवारी आणि दंड दोन्ही होऊ शकतो.

१६ सप्टेंबर २०१९

पोलीस खात्यातील पदांचा जेष्ठताक्रम

🔹 पोलीस महासंचालक- DGP

🔹 अतिरिक्त पोलीस महासंचालक- ADGP

🔹 विशेष पोलीस महानिरीक्षक- SIGP

🔹 पोलीस महानिरीक्षक -IGP

🔹 पोलीस उपमहानिरीक्षक- Dy.IGP

🔹 सहाय्यक पोलीस महानिरीक्षक -AIGP

🔹 पोलीस अधीक्षक- SP/DCP

🔹 पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस उपायुक्त -Dy. SP/ACP

🔹 वरिष्ठ पोलीस निरीक्षक Sr.PI

🔹 पोलीस निरीक्षक -PI

🔹 सहायक पोलीस निरीक्षक -API

🔹 पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) -PSI

🔹 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (जमादार) Asst PSI

🔹 पोलीस हवालदार PHC

🔹 पोलीस नाईक PN

🔹 पोलीस शिपाई PC

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌कोणत्या राज्य सरकारने इनोव्हेशन व्हिजन मोहिमेअंतर्गत 'जन सुचना पोर्टल'चा आरंभ केला?

(A) गुजरात
(B) राजस्थान✅✅✅
(C) दिल्ली
(D) महाराष्ट्र

📌भारतीय कंपनीद्वारे भारतात प्रथमच मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस कुठे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत?

(A) पोरबंदर, गुजरात
(B) कोची, केरळ
(C) मुंबई, महाराष्ट्र✅✅✅
(D) चेन्नई, तामिळनाडू

📌13 सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बदल करण्यात आलेल्या लघू वित्त बँकेसाठीच्या (SFB) किमान पेड-अप भांडवलाची आवश्यकता मर्यादा किती आहे?

(A) रु. 2000 कोटी
(B) रु. 1000 कोटी
(C) रु. 200 कोटी✅✅✅
(D) रु. 100 कोटी

📌13 सप्टेंबर 2019 रोजी केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की काही उत्पादनांना वगळता कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी परवाना घेण्याची आवश्यकता नाही. वगळलेल्या यादीमध्ये कोणत्या उत्पादनाचा समावेश नाही?

(A) तंबाखूपासून बनविलेली उत्पादने
(B) संरक्षण उपकरणे
(C) भांगपासून बनविलेली उत्पादने✅✅✅
(D) औद्योगिक स्फोटके

📌2019 या साली जागतिक प्रथमोपचार दिनाचा विषय कोणता होता?

(A) फर्स्ट ऐड अँड रोड सेफ्टी
(B) माय हेल्थ, माय राइट
(C) फर्स्ट ऐड अँड एक्सक्लूडेड पीपल✅✅✅
(D) गेटिंग टू झीरो

📌कोणत्या ठिकाणी 10 वी आशियाई प्रशांत युवा खेळ ही स्पर्धा खेळवली गेली?

(A) झगरेब, क्रोएशिया
(B) ल्युब्लजना, स्लोव्हेनिया
(C) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
(D) व्लादिवोस्तोक, रशिया✅✅✅

📌कोणता दिवस भारतात हिंदी दिन साजरा केला जातो?

(A) 14 ऑक्टोबर
(B) 14 सप्टेंबर✅✅✅
(C) 02 सप्टेंबर
(D) 02 ऑक्टोबर

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) उपसर्ग साधित शब्द निवडा.

   1) मोफत    2)‍ बंदिस्त    3) पैठणी      4) भरजरी

उत्तर :- 4

2) मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

   1) अभिधामूल व्यंजना    2) लक्षणामूल व्यंजना
   3) लक्षण लक्षणा      4) सारोपा लक्षणा
उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणता शब्द ‘घर’ या अर्थाचा नाही ?

   1) सदन    2) गृह      3) गोठा      4) गेह

उत्तर :- 3

4) पर्यायी उत्तरातील ‘अ’ व ‘ब’ या शब्दगटातून विरुध्द अर्थी शब्द जोडी कोणती ती शोधा.

  अ    ब

         1) अश्व    वाजी
         2) हय    घोडा
        3) अनुज    अग्रज
         4) वारू    तुरंग

उत्तर :- 3

5) गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा. – अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. पण तरीही त्यांना
     स्वत:ला सावरले. कारण म्हणतात ना ..............

   1) वळणाचे पाणी वळणावरच जाणार    2) शीर सलामत तर पगडी पचास
   3) शेंडी तुटो वा पारंबी तुटो      4) पदरी पडले पवित्र झाले

उत्तर :- 2

6) ‘ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा.’ नकारार्थी वाक्य बनवा.

   1) ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा      2) ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका
   3) ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवा    4) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका

उत्तर :- 4

7) ‘शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो’ या वाक्यातील ‘विधानपूरक’ ओळखा.

   1) शरद    2) चांदणे     
   3) गुलमोहर    4) मोहक 

उत्तर :- 4

8) ‘रामाकडून रावण मारला गेला.’ या प्रयोगाचे नाव सांगा ?

   1) कर्तरी प्रयोग    2) कर्मणी प्रयोग   
   3) भावे प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

9) ‘मीठभाकर’ या समाहार व्दंव्द समासाचा विग्रह कसा आहे ?

   1) मीठ किंवा भाकरी      2) मीठ घालून केलेली भाकरी
   3) मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ    4) भाकरी आणि मीठ

उत्तर :- 3

10) खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. – केवढी शुभवार्ता आणलीस तू

   1) ,      2) .     
   3) ?      4) !

उत्तर :- 4

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...