१७ सप्टेंबर २०१९

आता प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येणार प्रवास

🔰अनेकदा तिकिटांसाठी लागलेल्या लांब रांगा आपली डोकेदुखी ठरत असतात. परंतु आता रेल्वेने घेतलेला मोठा निर्णय हा प्रवाशांसाठी थोडासा दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आपात्कालिन परिस्थितीत आता प्रवासी प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत. परंतु यासाठी रेल्वेने एक अट घातली आहे.

🔰प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवास करण्याची मुभा रेल्वे दिली असून यासाठी संबंधित प्रवाशाला गार्ड किंवा टिसीचे परवानगी पत्र घ्यावे लागणार आहे. जर यासाठीही सदर प्रवाशाकडे वेळ नसल्यास ट्रेनमध्ये जाऊन नियमित प्रक्रिया पूर्ण करत प्रवास करू शकता. रेल्वेच्या नियमानुसार हे परवानगी पत्र रेल्वेचे गार्ड, टिसी किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून घेता येऊ शकते.

🔰तर ट्रेनमध्ये चढल्यानंतर प्रवाशाला याबाबत टिसीला माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सदर प्रवाशाच्या इच्छित स्थळाचे त्यांच्याकडून तिकिट बनवून घेता येईल. परंतु यासाठी केवळ 250 रूपये दंडाच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत. तसेच ज्या श्रेणीतून प्रवास करायचा असेल, त्याच श्रेणीचे शुल्क भरावे लागेल. प्रवाशी ज्या रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढला ते बोर्डिंग स्टेशन मानले जाणार आहे. परंतु याद्वारे प्रवसाची मुभा मिळणार असली तरी तिकिटाचे आरक्षण मात्र देण्यात येणार आहे.

🔰तसेच दरम्यान, सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत केवळ 10 रूपये आहे. कोणतीही व्यक्ती जाणूबुजून अथवा फसवण्याच्या बहाण्याने या तिकिटावर प्रवास करत असेल, तर त्याला तुरूंगवारीही होऊ शकते. तसेच यासाठी 1 हजार 260 रूपयांचा दंड किंवा तुरूंगवारी आणि दंड दोन्ही होऊ शकतो.

१६ सप्टेंबर २०१९

पोलीस खात्यातील पदांचा जेष्ठताक्रम

🔹 पोलीस महासंचालक- DGP

🔹 अतिरिक्त पोलीस महासंचालक- ADGP

🔹 विशेष पोलीस महानिरीक्षक- SIGP

🔹 पोलीस महानिरीक्षक -IGP

🔹 पोलीस उपमहानिरीक्षक- Dy.IGP

🔹 सहाय्यक पोलीस महानिरीक्षक -AIGP

🔹 पोलीस अधीक्षक- SP/DCP

🔹 पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस उपायुक्त -Dy. SP/ACP

🔹 वरिष्ठ पोलीस निरीक्षक Sr.PI

🔹 पोलीस निरीक्षक -PI

🔹 सहायक पोलीस निरीक्षक -API

🔹 पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) -PSI

🔹 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (जमादार) Asst PSI

🔹 पोलीस हवालदार PHC

🔹 पोलीस नाईक PN

🔹 पोलीस शिपाई PC

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌कोणत्या राज्य सरकारने इनोव्हेशन व्हिजन मोहिमेअंतर्गत 'जन सुचना पोर्टल'चा आरंभ केला?

(A) गुजरात
(B) राजस्थान✅✅✅
(C) दिल्ली
(D) महाराष्ट्र

📌भारतीय कंपनीद्वारे भारतात प्रथमच मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस कुठे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत?

(A) पोरबंदर, गुजरात
(B) कोची, केरळ
(C) मुंबई, महाराष्ट्र✅✅✅
(D) चेन्नई, तामिळनाडू

📌13 सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बदल करण्यात आलेल्या लघू वित्त बँकेसाठीच्या (SFB) किमान पेड-अप भांडवलाची आवश्यकता मर्यादा किती आहे?

(A) रु. 2000 कोटी
(B) रु. 1000 कोटी
(C) रु. 200 कोटी✅✅✅
(D) रु. 100 कोटी

📌13 सप्टेंबर 2019 रोजी केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की काही उत्पादनांना वगळता कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी परवाना घेण्याची आवश्यकता नाही. वगळलेल्या यादीमध्ये कोणत्या उत्पादनाचा समावेश नाही?

(A) तंबाखूपासून बनविलेली उत्पादने
(B) संरक्षण उपकरणे
(C) भांगपासून बनविलेली उत्पादने✅✅✅
(D) औद्योगिक स्फोटके

📌2019 या साली जागतिक प्रथमोपचार दिनाचा विषय कोणता होता?

(A) फर्स्ट ऐड अँड रोड सेफ्टी
(B) माय हेल्थ, माय राइट
(C) फर्स्ट ऐड अँड एक्सक्लूडेड पीपल✅✅✅
(D) गेटिंग टू झीरो

📌कोणत्या ठिकाणी 10 वी आशियाई प्रशांत युवा खेळ ही स्पर्धा खेळवली गेली?

(A) झगरेब, क्रोएशिया
(B) ल्युब्लजना, स्लोव्हेनिया
(C) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
(D) व्लादिवोस्तोक, रशिया✅✅✅

📌कोणता दिवस भारतात हिंदी दिन साजरा केला जातो?

(A) 14 ऑक्टोबर
(B) 14 सप्टेंबर✅✅✅
(C) 02 सप्टेंबर
(D) 02 ऑक्टोबर

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) उपसर्ग साधित शब्द निवडा.

   1) मोफत    2)‍ बंदिस्त    3) पैठणी      4) भरजरी

उत्तर :- 4

2) मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

   1) अभिधामूल व्यंजना    2) लक्षणामूल व्यंजना
   3) लक्षण लक्षणा      4) सारोपा लक्षणा
उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणता शब्द ‘घर’ या अर्थाचा नाही ?

   1) सदन    2) गृह      3) गोठा      4) गेह

उत्तर :- 3

4) पर्यायी उत्तरातील ‘अ’ व ‘ब’ या शब्दगटातून विरुध्द अर्थी शब्द जोडी कोणती ती शोधा.

  अ    ब

         1) अश्व    वाजी
         2) हय    घोडा
        3) अनुज    अग्रज
         4) वारू    तुरंग

उत्तर :- 3

5) गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा. – अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. पण तरीही त्यांना
     स्वत:ला सावरले. कारण म्हणतात ना ..............

   1) वळणाचे पाणी वळणावरच जाणार    2) शीर सलामत तर पगडी पचास
   3) शेंडी तुटो वा पारंबी तुटो      4) पदरी पडले पवित्र झाले

उत्तर :- 2

6) ‘ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा.’ नकारार्थी वाक्य बनवा.

   1) ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा      2) ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका
   3) ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवा    4) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका

उत्तर :- 4

7) ‘शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो’ या वाक्यातील ‘विधानपूरक’ ओळखा.

   1) शरद    2) चांदणे     
   3) गुलमोहर    4) मोहक 

उत्तर :- 4

8) ‘रामाकडून रावण मारला गेला.’ या प्रयोगाचे नाव सांगा ?

   1) कर्तरी प्रयोग    2) कर्मणी प्रयोग   
   3) भावे प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

9) ‘मीठभाकर’ या समाहार व्दंव्द समासाचा विग्रह कसा आहे ?

   1) मीठ किंवा भाकरी      2) मीठ घालून केलेली भाकरी
   3) मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ    4) भाकरी आणि मीठ

उत्तर :- 3

10) खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. – केवढी शुभवार्ता आणलीस तू

   1) ,      2) .     
   3) ?      4) !

उत्तर :- 4

बलात्कार खटल्यांसाठी १०२३ जलदगती न्यायालये

◾️देशभरात महिला आणि मुलांवरील अत्याचारांचे १.६६ लाखांहून अधिक खटले प्रलंबित असून या प्रकरणांवर जलद सुनावणी घेण्यासाठी एक हजार २३ जलदगती विशेष न्यायालये स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे.

◾️केंद्रीय कायदा मंत्रालयांतर्गत न्याय विभागातर्फे सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार यातील प्रत्येक न्यायालय किमान १६५ प्रकरणे प्रतिवर्षी निकालात काढेल, अशी अपेक्षा आहे.

◾️सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यातील ३८९ न्यायालये लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो)अंतर्गत दाखल झालेली प्रकरणे हाताळतील.

◾️उर्वरित ६३४ न्यायालये गरजेनुसार केवळ बलात्कार प्रकरणे किंवा बलात्कार आणि पोक्सो कायद्याखालील दोन्ही प्रकरणे निकाली काढतील, असेही या प्रस्तावात नमूद केले आहे.

◾️देशभरात बलात्कार आणि पोक्सो गुन्ह्याखालील एक लाख ६६ हजार ८८२ प्रकरणे विविध न्यायालयांत प्रलंबित असल्याचे विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे.

◾️देशातील ३८९ जिल्ह्यांतील पोक्सो कायद्याखालील प्रलंबित प्रकरणांची संख्या १००पेक्षा पुढे गेली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या जिल्ह्यांमध्ये एक पोक्सो न्यायालय असणे आवश्यक आहे. यामध्ये अन्य प्रकरणांची सुनावणी घेता येणार नाही, असेही प्रस्तावात मांडले आहे.

◾️ जलदगती विशेष न्यायालय स्थापन करण्याची प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, असे न्याय मंत्रालयाने आधीच म्हटले आहे.

◾️यासाठी ७६७.२५कोटी खर्चाचा अंदाज आहे. केंद्र सरकार निर्भया निधीतून एका वर्षासाठी ४७४ कोटींची मदत करणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎻 द किंग ऑफ द ब्लूज'🎸

◾️तब्बल १५ वेळा ग्रॅमी अॅवार्ड जिंकण्याचा विक्रम करणारे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार, गिटारवादक आणि 'द किंग ऑफ द ब्लूज' बी. बी. किंग यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल बनवून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

◾️जगाला 'ब्लूज' या संगीत शैलीची ओळख करून देणाऱ्या किंग यांच्या अनिमेटेड व्हिडिओचं गुगलने डुडल तयार केलं आहे.

◾️त्यात त्यांना त्यांची आयकॉनिक गिटार हातात घेतलेलं दाखविण्यात आलं आहे.

◾️बी. बी. किंग यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२५ रोजी अमेरिकेच्या इंडोलाजवळील मिसिसिपी येथे झाला होता.

◾️ सुरुवातीच्या काळात ते रस्त्यावर गायचे. कधी कधी रात्री वस्त्यांवरही कार्यक्रम करायचे. पुढे संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी मेम्फिसची वाट धरली.

◾️मेम्फिसला गेल्यावर तिथे त्यांनी त्यांच्या अनोख्या संगीताद्वारे प्रत्येक संगीतकाराला त्यांच्याकडे आकर्षित केलं. १९४८मध्ये रेडिओवर गाण्याची पहिली संधी त्यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

◾️त्यांनी 'बील स्ट्रीट ब्लूज बॉय' नावाने रेडिओवर कार्यक्रम सादर करण्यासा सुरुवात केली. पुढे या कार्यक्रमाचं नाव 'ब्लूज बॉय किंग' असं ठेवण्यात आलं.

◾️ 'बी बी किंग' हे त्याचं शॉर्टफॉर्म नाव फेमस झालं आणि किंग यांनाही याच नावानं ओळखलं जाऊ लागलं.

◾️'द थ्रिल इज गॉन' आणि 'एव्हरी डे आय हॅव दे ब्लूज' हे त्यांचे मास्टरपीस मानले जातात. 'थ्री ओ क्लॉक्स ब्लूज' हा त्यांचा शोही प्रचंड लोकप्रिय होता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्नसंच 16/9/2019

कॅनरा बँकेचे मुख्यालय कर्नाटकमध्ये ………..येथे आहे.

1.  तुमकुर

2.  बंगळूरु🚔🚔

3.  बिजापूर

4.  हुबळी

बिहू हा लोकनृत्य प्रकार ……राज्यातील आहे.

1.  तामिळनाडू

2.  राजस्थान

3.  आसाम🚔🚔

4.  नागपूर

क्रिकेट मधील षटकारांचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडीजचा खेळाडू.

1.  सुनील नारीने

2.  दिनेश रामदिन

3.  ख्रिस गेल🚔🚔

4.  द्वावेने ब्रवो

भारतीय जनसंघाचे संस्थापक होते.

1.  प्रवीण देव

2.  डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी🚔🚔

3.  डॉ.शरद व्यास

4.  राहुल गुप्ता

आसाम राज्यात साजरा केला जातो.

1.  रोगोली बिहू हा महोत्सव🚔🚔

2.  मेहंदी महोत्सव

3.  ड्रेस महोत्सव

4.  डान्स महोत्सव

जगातील फेसबुक वापरणाऱ्या १२७ देशामध्ये प्रथम क्रमांकावर सुमारे १४.२ कोटी फेसबुक युजर असणारा देश.

1.  पाकिस्तान

2.  भारत🚔🚔

3.  अमेरिका

4.  चीन

ही योजना केंद्र सरकारने देशातील छोटया व अति लघु व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केली आहे.

1.  उज्वला योजना

2.  मुद्रा योजना🚔🚔

3.  विमा योजना

4.  समाधान योजना

गुजरातमधील ………येथे राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.

1.  अहमदाबाद

2.  राजकोट

3.  सुरत

4.  बडोदा🚔🚔

ग्रामपंचायतीच्या सरपंचाला सरकारकडून दरमहा ………..मानधन दिले जाते.

1.  ११ हजार रुपये

2.  १ हजार रुपये🚔🚔

3.  ४ हजार रुपये

4.  २ हजार रुपये

कसोटी क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करणारी भारतीय महिला खेळाडू.

1.  मिताली राज🚔🚔

2.  प्रिया राव

3.  रुपाली पवार

4.  मोना सिंग

भारतीय हॉकी संघाचा १०० वा आंतरराष्ट्रीय हॉकी सामना खेळणारा खेळाडू.

1.  जिमन राव

2.  चिंगलेनसाना सिंग🚔🚔

3.  मारीओन लीमीस

4.  ईस्माईल कोम

बिग अॅपल म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील शहर.

1.  हौस्तोन

2.  चीकॅगो

3.  बोस्तोन

4.  न्यूयॉर्क🚔🚔

जल संधारणासाठी महाराष्ट्र शासनासोबत पाणी पर्यंत फाऊंडेशन सामील झाले आहे.या फाऊंडेशनची सुरुवात …………यांनी केली आहे.

1.  सलमान खान

2.  आमिर खान🚔🚔

3.  अमिताभ बच्चन

4.  नाना पाटेकर

नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईनींग.

1.  अमेरिका

2.  नागपूर

3.  मुंबई

4.  दिल्ली🚔🚔

केंद्र सरकारने ……….पासून २ लाख रुपयापेक्षा जास्तीच्या सोने खरेदीवर पॅन कार्ड अनिवार्य केले आहे.

1.  १ जानेवारी २०१५

2.  २ जून २०१५

3.  ३ मार्च २०१५

4.  १ जानेवारी २०१६🚔🚔

आय. एस. बिंद्रा क्रिकेट स्टेडीयम ……येथे आहे.

1.  अमेरिका

2.  अमरावती

3.  नागपूर

4.  मोहाली (पंजाब)🚔🚔

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेन्ट अॅण्ड पंचायतीराज .

 

1.  दिल्ली

2.  हैद्राराबाद (तेलंगणा)🚔🚔

3.  नागपूर

4.  मुंबई

रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रात असणाऱ्या………..बेटांचे नामकरण महाराष्ट्र सरकारने कान्होजी आंग्रे द्वीप असे केले आहे.

1.  एलीफटा बेट

2.  माजुली बेट

3.  उंदेरी बेट

4.  खांदेरी बेट🚔🚔

झिरो पेन्डन्सी हा उपक्रम राबविणारे सनदी अधिकारी.

1.  राज देशपांडे

2.  रवि कुमार

3.  चंद्रकांत दळवी🚔🚔

4.  राहुल पांडे

जगात सर्वाधिक लसी चे उत्पादन घेणारा देश.

1.  चीन

2.  यापैकी सर्व

3.  भारत🚔🚔

4.  अमेरिका

येथे महाराष्ट्र सरकारने वन अकादमी स्थापन केली आहे.

1.  मुंबई

2.  नागपूर🚔🚔

3.  अमरावती

4.  चंद्रपूर

महाराष्ट्र पोलीस दलाने हे अॅप लोकांना संकटसमयी तात्काळ मदत मिळावी या हितुने सुरु केले आहे.

1.  सुरक्षा अॅप

2.  प्रतिसाद (आस्क )🚔🚔

3.  काॅल अॅप

4.  व्हाॅट्स अॅप

जलयुक्त शिवार योजना -ही …………च्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राबवली जाते.

1.  ५ डिसेंबर २०१४🚔🚔

2.  ७ मार्च २०१५

3.  4 ऑगस्ट २०१३

4.  ८ मे २०१६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माचे १२५ वे वर्ष महाराष्ट्र सरकार …….म्हणून साजरा करीत आहे.

1.  सार्वजनिक एकात्मता वर्षे

2.  स्वावलंबन वर्षे

3.  सामाजिक न्याय वर्षे

4.  समता व सामाजिक न्याय वर्षे🚔🚔

सांख्यिकीवर आधारित जिल्हा विकास आराखडे तयार करण्याकरिता निवड झालेले महाराष्ट्रातील जिल्हे -.

1.  अमरावती व नाशिक

2.  नागपूर व चंद्रपूर🚔🚔

3.  दिल्ली व नागपूर

4.  चंद्रपूर व अमरावती

चंद्रशेखर आझाद

(जन्म: २३ जुलै १९०६-मृत्यु: २७ फेब्रुवारी १९३१)

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्युनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशन या क्रांतीकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशिएशन या नवीन नावाखाली पुनर्बाधणी केली. त्याचप्रमाणे त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते.

जन्म आणि बालपण:
चंद्रशेखर यांचा जन्म २३ जुलै १९०६ ला सध्याच्या अलीराजपुर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होते. त्यांचे पूर्वज कानपूर जवळच्या बदरखा गावात राहत होते. जगरानी देवी ह्या सीताराम यांच्या तिसर्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरीत झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसीमधील संस्कृत शाळेत गेले. डिसेंबर १९२१ मध्ये महात्मा गांधीनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चन्द्रशेखरने सहभाग घेतला. त्यासाठी त्याला अटक सुद्धा झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव आझाद असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते आझाद आडनावाने ओळखले जाऊ लागले.

मृत्यु:
२७ फेब्रुवारी १९३१ ला अलाहाबादमधील अल्फ्रेड पार्क येथे सुखदेव राज या क्रांतीकारकाला भेटायला गेले असताना एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला आणि चंद्रशेखर व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे ठेवण्यात आले.
---------------------------------------------------------------------

आंतरराष्ट्रीय ओझोन दिन - १६ सप्टेंबर

फ्रीज, एअरकंडिशनर आणि इतर यंत्रणात वापरल्या जाणा-या क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या ठरला छिद्रे पडत असल्याचे दिसले. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण (अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन) पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रारणाचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात. संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते !

⭕️ मूळ संकल्पना व सुरुवात ⭕️

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) १९९५ सालापासून हा दिवस पाळला जातो. १९७८ साली कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली. हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण रसायनांतील बदलांसाठी २०१० आणि २०३० या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत.

⭕️ अधिक माहिती ⭕️

खरेतर चंगळवादाने सर्व पृथ्वीला संकटात टाकल्याचे हे आणखी एक उदाहरण होय. विकसनशील देशांनी वस्तू वापरण्यापूर्वी त्यांच्या पर्यावरणीय परिणामांचा विचार करावा ही अपेक्षा. तसेच हरितगृह- वायूंच्या प्रमाणावर नियंत्रण आणणारा क्योटो करारही यशस्वी ठरेल अशी आशा आहे. सध्या ऐवजी हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन आणि हायड्रोफ्लुरोकार्बन चा वापर सुरु झाला आहे. परंतु यावरही २०३० पूर्वी नियंत्रण आणायचे आहे.

​​डीआरडीओकडून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्र प्रणालीतील ही तिसरी यशस्वी चाचणी होती. याला भारतीय सेनेच्या तिसऱ्या पिढीच्या रणगाडा भेदी क्षेपणास्राच्या आवश्यकतेसाठी विकसित केले गेले जात आहे.

डीआरडीओने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या क्षेपणास्राचे वजन इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. या क्षेपणास्राला मॅन पोर्टेबल ट्राइपॉड लाॅंचरद्वारे लाॅंच केले गेले होते. यानंतर त्याने त्याचे लक्ष्य अत्यंत अचुकतेने व आक्रमकतेने भेदले.

या क्षेपणास्राची तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीसाठी ‘डीआरडोओ’चे अभिनंदन केले आहे. सध्या कलम ३७० हटवण्यात आल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातारण आहे. या पार्श्वभूमीवर ही क्षेपणास्र चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.

यापूर्वी भारतीय सैन्याने राजस्थानमधील पोखरण येथे ‘नाग’ या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्रदेखील डीआरडीओनेच विकसीत केले होते. आता तिसऱ्या पिढीतील रणगाडा भेदी नाग क्षेपणास्राच्या निर्मितीचे कार्य या वर्षाअखेर सुरू होणार आहे.

अमित पंघलची विजयी सलामी

🥊आशियाई विजेता अमित पंघलने (५२ किलो) जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात यशाने केली.

🥊त्याने तैपेईच्या तु पो वै याच्यावर मात करत विजयी सलामी दिली.

🥊या स्पर्धेत दुसरा मानांकित असलेल्या २३ वर्षीय अमितने प्रतिस्पर्धी वै याच्यावर ५-० अशी सरळ मात केली.

🥊 या विजयामुळे अमितने उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. पहिल्या फेरीत त्याला पुढची चाल मिळाली होती.

🥊आक्रमक खेळाने अमितने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व गाजविले.

🥊त्या तुलनेत पो वै याने अमितच्या आक्रमकतेला उत्तर देण्याऐवजी त्यापासून लांब पळण्याचाच पर्याय निवडला. त्यामुळे रेफ्रींनी त्याला सातत्याने तसे न करण्याचा इशारा दिला.

🥊गेल्या जागतिक स्पर्धेतही पो वै याची अमितशी झुंज झाली होती.

🥊हॅम्बर्गला झालेल्या त्या स्पर्धेतही अमितच्या आक्रमकतेपुढे पो वैने पळ काढणेच पसंत केले होते.

🥊२०१७च्या जागतिक स्पर्धेत हसनबाय दुस्मातोव्हविरुद्ध पराभूत झालेल्या अमितने यावर्षी जबरदस्त कामगिरी केली आहे.

🥊त्याने वजनी गटही बदलला आहे. आता तो ४९ किलो ऐवजी ५२ किलोत खेळत आहे.

🥊या हंगामाच्या प्रारंभीच त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले. त्याआधी काही महिने त्याने ५२ किलो वजनी गटात खेळणे सुरू केले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५ सप्टेंबर २०१९

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेटवीर कपिल देव झाले 'कुलगुरू'

▪️भारताला 1983 साली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकूण देणारे कर्णधार कपिल देव यांची हरयाणा स्पोर्ट्स विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे.
▪️हे देशातील तिसरे क्रीडा विद्यापीठ आहे. या विद्यापीठांमध्ये गुजरात गांधीनगर येथील स्वर्निम गुजरात क्रीडा विद्यापीठ आणि चेन्नईच्या तामीळनाडू फिजिक्स एज्युकेशन व क्रीडा विद्यापीठाचा समावेश आहे. पण, पुर्णतः खेळासाठी असलेले हे पहिलेच विद्यापीठ आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक करीअरच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये हरयाणा क्रीडा विद्यापीठाचे बील पास करण्यात आले.  ''या विद्यापीठाला राष्ट्रपतींची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे, परंतु त्यासाठीचे सर्व पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कपिल देव यांची नियुक्ती      करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. याबाबत मी व्यक्तीशः कपिल देव यांच्याशी बोललो आहे आणि त्यांनीही होकार कळवला आहे,''असे अनिल वीज यांनी सांगितले.
▪️कपिल देव यांनी 1975 साली हरयाणाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सहा विकेट घेत हरयाणाला विजय मिळवून दिला होता.

सक्षम बचत गटांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख व्हावी


▪️प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला सबळीकरण हे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना किमान व्याजदर योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही चळवळ महिलांच्या आर्थिक उत्थानाची चळवळ बनवा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.
▪️भारत स्वतंत्र झाला तरी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आणखी बाकी असून महिला बचत गटांमार्फत ५० टक्के समुदायांना आर्थिक संपन्न बनविणे हे या बचत गटाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, त्यासाठी आवश्यक ती मदत शासनस्तरावरून केली जात आहे. या चळवळीमध्ये माझा गृह जिल्हा असणारा चंद्र्रपूर हा जगाच्या पातळीवर सर्वात उत्तम जिल्हा म्हणून पुढे यावा, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
▪️प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला सबळीकरण हे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना किमान व्याजदर योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही चळवळ महिलांच्या आर्थिक उत्थानाची चळवळ बनवा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...