१२ सप्टेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘माझा भाऊ आनंदाने रसगुल्ले खातो’ या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.

   1) रसगुल्ले    2) माझा      3) भाऊ      4) आनंदाने

उत्तर :- 2

2) ‘राणी प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) प्रधानकर्तृक

उत्तर :- 1

3) ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते, त्या समासास ............. म्हणतात.

   1) तत्पुरुष समास  2) अव्ययीभाव समास  3) बहुव्रीही समास    4) कर्मधारय समास

उत्तर :- 2

4) संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल ?

   1) स्वल्पविराम    2) अर्धविराम    3) संयोगचिन्ह    4) अपूर्णविराम

उत्तर :- 1

5) ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याशी’ अलंकार ओळखा.

   1) अतिशयोक्ती    2) व्यतिरेक    3) श्लेष      4) अन्योक्ती

उत्तर :- 1

6) खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?

   1) पद      2) नयन      3) वडवानल    4) डोळा

उत्तर :- 4

7) उष:काल होता होता, काळरात्र झाली ........... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) वाच्यार्थ    2) शब्दार्थ    3) व्यंगार्थ    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

8) ‘अवडंबर’ म्हणजे –

   1) अगडबंब    2) अवघड    3) स्तोम      4) यापैकी नाही

उत्तर :- 3

9) ‘चोर चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाहिले’ या वाक्यातील चोर या शब्दाचा विरुध्दार्थी अर्थ असलेला
     शब्द निवडा.

   1) साधू    2) सन्याशी    3) प्रामाणिक    4) साव

उत्तर :- 4

10) जो वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो – या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते ?

   1) तळे राखील तो पाणी चाखीन      2) साखरेचे खाणार, त्याला दैव देणार
   3) पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा      4) हाजिर तो वजीर

उत्तर :- 4

एका ओळीत सारांश, 12 सप्टेंबर 2019

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉पुढील पाच ते सात वर्षांमध्ये सर्व सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी एवढी रक्कम खर्च करण्याची भारत सरकारने योजना आखली आहे – 130 अब्ज डॉलर.

👉भारतीय हवाई दलाने या तळाचे पुनरुज्जीवन केले, जेथे राफेल लढाऊ विमानांचे पहिले पथक तैनात असणार - 17 स्क्वाड्रेन 'गोल्डन अ‍ॅरो' (अंबाला).

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉भारतीय रिझर्व्ह बँकेनी यू. के. सिन्हा समितीच्या शिफारसीला दुजोरा दिला आहे की या राज्याच्या स्टार्टअप उद्योगांसाठीच्या कल्पक मॉडेलचे मूल्यांकन केले जावे जे इतर राज्यांमध्ये अंमलात आणले जाऊ शकणार - तेलंगणा.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 यामध्ये “गोल्डन लायन” पुरस्कार जिंकणारा चित्रपट - जोकर (टॉड फिलिप्स).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉ही व्यक्ती अमेरिकेत होणार्‍या वार्षिक ‘48व्या अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF)’ या कार्यक्रमात प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करणार - कॅप्टन संग्राम पवार.

👉11 सप्टेंबरपासून पंतप्रधानांचे नवे प्रधान सचिव - डॉ. पी. के. मिश्रा.

👉11 सप्टेंबरपासून पंतप्रधानांचे नवे प्रधान सल्लागार - पी. के. सिन्हा.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या आठव्या ‘लद्दाख मॅरेथॉन’च्या 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज गटाचे विजेते - शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीनावॉल्टर (आयर्लंडची महिला).

👉इटालियन ग्रँड प्रिक्स 2019 फॉर्म्युला वन मोटार शर्यतीचा विजेता - चार्ल्स लेकलर्क (फेरारी).

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉समुद्रसपाटीपासून 11,000 फूटांहून अधिक उंचीवर आयोजित केली जाणारी जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत - लद्दाख मॅरेथॉन (जम्मू व काश्मीर).

👉अखिल भारतीय व्यापारी संघटना (CAIT) याचे स्थापना वर्ष – सन 1990.

👉अमेरिकेत झालेला पहिला अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF) – सन 1972.

पाकच दहशतवादाचा केंद्रबिंदू

✍जीनिव्हा : जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या व्यासपीठावर मांडण्याचा पाकिस्तानने केलेला प्रयत्न मंगळवारी धुडकावून लावताना, ‘‘पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू असून काश्मीरबाबतच्या त्याच्या प्रचारातील खोटेपणाला जग भुललेले नाही,’’ अशी घणाघाती टीका भारताने केली आहे.

✍भारताच्या परराष्ट्र सचिव विजय ठाकूर सिंग यांनी पाकिस्तानने काश्मीरवरून भारताविरोधात केलेल्या आरोपांचा स्पष्ट शब्दांत समाचार घेताना सांगितले की, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा ठेवायचा की नाही, हा निर्णय घेण्याचा आम्हाला सार्वभौम अधिकार आहे. आमच्या संसदेने तो निर्णय घेतला आहे. त्यात कोणत्याही अन्य देशाला हस्तक्षेप करण्यास वावच नाही.

✍जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक तऱ्हेने सामाजिक आणि आर्थिक विकास घडावा, यासाठी देशाने लोकशाही मार्गाने हा निर्णय घेतला आहे. काश्मिरी जनतेला सर्वाधिक झळ दहशतवादानेच बसली असून पाकिस्तानच्या चिथावणीने हा दहशतवाद फोफावत असल्याचे अनेकवार सिद्ध झाले आहे. खरे पाहता संपूर्ण जगानेच संघटितपणे दहशतवादाचा कणा मोडण्याची गरज आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार 'मेघदूत


◾️ यापुढे शेतकऱ्यांना घर बसल्या हवामान आणि कृषी सल्ल्याची माहिती मिळणार आहे. हवामान विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्थेने 'मेघदूत' हे ऍप विकसित केले आहे. या मोबाईल ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

◾️मेघदूत ऍपमुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेत आपल्या पिकांचे नियोजन करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसानही टाळण्यास हातभार लागणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना आपआपल्या जिल्ह्यानुसार आपल्या मातृभाषेत ही माहिती उपलब्ध होणार आहे.

◾️मागील दीड महिन्यांपासून या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जात असल्याची माहिती कृषी हवामान विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. यापूर्वी एसएमएसद्वारे आणि संकेस्थळावर माहिती दिली जात होती. मात्र या ऍपमुळे आता शेतकऱ्यांना अधिक माहिती उपलब्ध होईल.

◾️'मेघदूत' ऍपच्या माध्यमातून देशभरातील 658 जिल्ह्यांत माहिती दिली जाईल. आतापर्यंत 150 जिल्ह्यांना माहिती मिळत आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये माहिती देण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. लवकरच तेथेही ही व्यवस्था उपलब्ध होईल.

◾️'मेघदूत' ऍपमध्ये तापमान, पाऊस आणि पीक सल्ल्याची माहिती दिली जाते. या ऍपच्या माध्यमातून मागील 10 दिवसांची आणि पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नियोजन करण्यास मोलाची मदत होत आहे. पुढील एक-दोन दिवसात पाऊस पडणार असेल, तर शेतकरी पिकाला पाणी देणे आणि औषध फवारणी करणे टाळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार असून पिकाला फायदा होणार आहे.

माता, बालमृत्यू रोखण्यासाठी 'लक्ष्य मान्यता

◾️आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यात या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या उपक्रमामुळे प्रसूती सेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

◾️राज्यातील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि खासगी रुग्णालयातील प्रसूती सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 'लक्ष्य मान्यता' उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमातून प्रसूती सेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

◾️सार्वजनिक आरोग्य विभाग आणि फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनोकॉलोजिकल सोसायटी ऑफ इंडिया (फॉग्सी) यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

◾️याचा शुभारंभ नुकताच पुण्यातील औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

◾️याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री शिंदे म्हणाले, "राज्यातील महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी तसंच खाजगी संस्थांमध्ये सेवांचा दर्जा सुधारून प्रसूतीदरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष्य मान्यता उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रसूतीदरम्यान आणि प्रसूती पश्चात गुणात्मक सेवा उपलब्ध करून माता आणि नवजात बालकांचे होणारे मृत्यू कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे"

◾️"लक्ष्य मान्यता दर्जात्मक सेवा मानांकनाचा अवलंब करण्यासाठी नोंदणीकृत रूग्णालयांना दर्जात्मक सेवेच्या 26 मानाकांवर आधारित रूग्ण काळजी, सुरक्षितता, गुणवत्ता आणि सुविधा सुधारणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खाजगी प्रसूती रुग्णालयांमध्ये गुणवत्ता मानकांना चालना देण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असून या उपक्रमामुळे माता आणि बालकांना गुणात्मक सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल", असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

पियुष गोयल थायलंडमध्ये आयोजित RECPच्या मंत्रिस्तरीय बैठकीत उपस्थित

​​

8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2019 या काळात थायलंड देशांची राजधानी बँकॉकमध्ये सातवी RCEP मंत्रिस्तरीय बैठक, सोळावी ASEAN-भारत आर्थिक मंत्री बैठक आणि सातवी पूर्व आशिया आर्थिक मंत्री शिखर परिषद 2019 हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये भारताच्यावतीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग व रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित आहेत.

✅ RCEP बद्दल

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN)

याचे दहा सदस्य (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम) आणि त्याचे सहा FTA भागीदार (चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड) यांच्या दरम्यानचा एक प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे. नोव्हेंबर 2012 साली कंबोडियात झालेल्या ASEAN शिखर परिषदेत RCEP वाटाघाटी औपचारिकपणे लागू झाली. RCEP हा जगातला सर्वात मोठा आर्थिक गट आहे आणि जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था या गटात समाविष्ट आहे. या भागात 3.4 अब्ज लोकसंख्या असून एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP, PPP) 49.5 लक्ष कोटी डॉलर इतके आहे.

✅ ASEAN आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN): हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे. याची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी दिनांक 8 ऑगस्ट 1967 रोजी केली आणि याचे मुख्यालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.

मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदारची हंगामी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती.

मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदारची दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यासाठी हंगामी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथम दोन्ही संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. दोन्ही संघात ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेकरता अमोल दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फलंदाजीचे धडे देणार आहे. १९९४ साली मुंबईकडून रणजी क्रिकेटमध्ये अमोल मुझुमदारने पदार्पण केले होते. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला प्रशिक्षण देण्यासोबतच अमोलने भारताचा १९ वर्षाखालील संघ, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या २३ वर्षाखालील संघालाही प्रशिक्षण दिलं आहे. मध्यंतरी अमोलने नेदरलँडच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.

असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) अध्यक्षपदी सुनील अरोरा

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ह्यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) या आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्षपद स्वीकारले. सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी AWEBचे अध्यक्षपद रोमानियाकडून भारताकडे सोपविण्यात आले आहे. 2017 साली झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला होता. रोमानियाचे प्रतिनिधी आयन मिनकू रेड्यूलेस्कू ह्यांनी AWEBचा ध्वज सुनील अरोरा ह्यांना सोपवला आणि आता हा ध्वज सन 2021 पर्यंत भारताकडे राहणार. भारतीय निवडणूक आयोगाने 3 सप्टेंबर 2019 रोजी बेंगळुरू या शहरात AWEBची चौथी आमसभा आयोजित केली होती. त्यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला. आमसभेने AWEBचे नवे उपाध्यक्ष म्हणून दक्षिण आफ्रिका या देशाचे ग्लेन व्ह्यूमा माशिनीनी तसेच नवे सरचिटणीस (महासचिव) म्हणून कोरिया प्रजासत्ताकचे जोंग्युन चोए यांच्या नियुक्तीलाही मान्यता दिली आहे. अरोरा यांनी अशी घोषणा केली की दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवी दिल्लीतल्या ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेन्ट (IIIDEM) या संस्थेमध्ये एक AWEB केंद्र सुरू केले जाणार आहे, जे निवडणुकीच्या उत्तमोत्तम पद्धती तयार करणार आणि क्षमता बांधणी वाढवण्याबद्दल कार्य करणार.

A-WEB बद्दल :-

असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) ही जगभरातल्या निवडणूक व्यवस्थापन मंडळांची (EMBs) सर्वात मोठी संघटना आहे. त्याची स्थापना दक्षिण कोरियाच्या सोंग-डू या शहरात 14 ऑक्टोबर 2013 रोजी झाली. आता त्याचे कायमस्वरूपी सचिवालय सोल (दक्षिण कोरिया) या शहरात आहे.

जगभरात मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि सहभागी तत्त्वावर निवडणुका घेण्यात कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वाढवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. यंदा युक्रेन, कंबोडिया, अफगाणिस्तान तसेच सिएरा लिओन, इंडोनेशिया आणि मॉरिशस हे नव्याने दाखल झालेले AWEBचे सभासद आहेत तर सहयोगी सदस्य म्हणून असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीज (AAEA) संघात सामील झाले आहे. आता संघात त्याचे सदस्य म्हणून 111 देशांमधली 120 निवडणूक आयोग मंडळे आणि सहयोगी सदस्य म्हणून 21 आंतरराष्ट्रीय संघटना सामील आहेत.

ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘वर्क व्हिसा’ मिळणार


🎓 ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना आता तेथे कामाचा अनुभव घेणेही शक्य होणार आहे.

🎓अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन वर्षे नोकरी किंवा काम करण्यासाठी आवश्यक व्हिसाही मिळणार आहे.

🎓गेल्या काही वर्षांपासून भारतातून ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यर्थ्यांची संख्या वाढली आहे.

🎓 यंदा जून महिन्यांपर्यंत आकडेवारीनुसार २२ हजार भारतीय विद्यार्थी ब्रिटनमध्ये शिक्षण घेत आहेत.

🎓गेल्यावर्षीपेक्षा ब्रिटनमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४२ टक्क्य़ांनी वाढली आहे.

🎓 विशेषत: विज्ञान, तंत्रज्ञान शाखांतील पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी ब्रिटनला प्राधान्य देतात.

🎓शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथे काम करण्याची संधीही या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

🎓 शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे नोकरीसाठी आवश्यक असलेला व्हिसा देण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे.

🎓या विद्यार्थ्यांना ‘स्किल्ड वर्क व्हिसा देण्यात येईल. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू होईल.

🎓त्याचबरोबर पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरील निर्बंधही काढून टाकले आहेत.

🎓व्हिसा मिळवण्याची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत ९६ टक्के अर्जदार विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला आहे.

११ सप्टेंबर २०१९

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून १४०० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य.

✍ मुंबई महानगर क्षेत्रासह अकोला, नाशिक, पुण्यासाठी टाटा पॉवरची योजना

✍ परदेशांत छतावरील सौर ऊर्जानिर्मितीला मोठे महत्त्व देण्यात येत असून मुंबई महानगर प्रदेशात छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून १४०० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य असल्याची माहिती टाटा पॉवरच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाचे अध्यक्ष आशीष खन्ना यांनी दिली.

✍ तर मुंबईसह अकोला, नाशिक, पुणे या शहरांत छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांच्या उभारणीसाठी टाटा पॉवर काम करत असल्याची माहिती टाटा पॉवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी दिली.

✍ दिल्लीत छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून २२०० मेगावॉट वीजनिर्मितीची केली जात असून मुंबई-ठाणे, रायगड-पालघर या मुंबई महानगर क्षेत्रात ही क्षमता १४०० मेगावॉट आहे.

✍ मुंबईतील टाटा पॉवर वीज वितरण कंपनीच्या सात लाख ग्राहकांसाठी निम्म्या दरात वातानुकूलन यंत्रणा देण्याबाबतचा उपक्रम व्होल्टासच्या सहाय्याने मंगळवारी सुरू करण्यात आला...

जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉनलद्दाखमध्ये झाली

💢 7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी जम्मू व काश्मीरच्या लेह या शहरात जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत असलेल्या ‘लद्दाख मॅरेथॉन’ची आठवी आवृत्ती आयोजित केली गेली होती.

💢 या कार्यक्रमात भारताच्या विविध भागातून आणि 25 परदेशांमधून 6 हजाराहून अधिक धावपटू सहभागी झाले होते.

💢 हा कार्यक्रम लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) यांच्याद्वारे प्रायोजित होता.

           ♨️  स्पर्धेचे विजेते   ♨️

💢 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज - शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीना वॉल्टर (आयर्लंड)

💢 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन - जिग्मेट डोल्मा (महिला) (सलग तिसर्‍या वर्षी अव्वल स्थान), शबीर हुसेन (पुरुष)

💢 हाफ मॅरेथॉन (महिला) - ताशी लाडोल

             ♨️  स्पर्धेविषयी   ♨️

💢 मॅरेथॉन समुद्रसपाटीपासून 11,000 फूटांहून अधिक उंचीवर आयोजित केले जाते. ही जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते.

💢 हा कार्यक्रम चार वर्गांमध्ये विभागला जातो; ते आहेत – 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज, 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर हाल्फ मॅरेथॉन आणि 7 किलोमीटर रन फॉर फन.

💢 ही मॅरेथॉन प्रथम सन 2012 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

💢 मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे.

Composite Water Managment Index 2019

- अहवालाची ही दुसरी आवृत्ती
- अहवालासाठी 2016-17 हे आधार वर्ष तर 2017-18 हे संदर्भ वर्ष मानले आहे.
- नीती आयोगाने केंद्रीय जल शक्ती मंत्रालय आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या सहकार्याने हा अहवाल काढला आहे.
- अहवालातील क्रमवारी भूमीगत पाण्याची पातळी, सिंचन व्यवस्था, शेतातील पाण्याचा वापर, ग्रामीण आणि शहरी पाणीपुरवठा व्यवस्था आणि पाणी व्यवस्थापनाचे धोरण, यावर आधारित आहे.
- या अहवालात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे.

बिगर हिमालयीन राज्यांची क्रमवारी

1. गुजरात
2. आंध्र प्रदेश
3. मध्य प्रदेश
4. गोवा
5. कर्नाटक

ईशान्य भारत आणि हिमालयीन राज्यांची क्रमवारी

1. हिमाचल प्रदेश
2. उत्तराखंड
3. त्रिपुरा
4. आसाम
5. सिक्किम

केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी

1. पाॅडेचेरी
2. दिल्ली

पीके मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन प्रधान सचिव म्हणून पदभार स्वीकारला

🔘 शिक्षणसंपादन 🔘

◾️अर्थशास्त्र विषयात पदवीधर , पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी घेतली आहे . 

🔘राजकीय पार्श्वभूमी 🔘

◾️ओडिशामध्ये जन्मलेल्या नोकरशहा पीके मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन प्रधान सचिव म्हणून पदभार स्वीकारला. 

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी नुकतेच पदाचा राजीनामा केल्यानंतर हे घडले. यापूर्वी पीके मिश्रा हे पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव होते आणि प्रधान सचिव म्हणून त्यांची नेमणूक केली जात आहे.

 ◾️मिश्रा हे १९७२ च्या बॅचचे गुजरात कॅडरचे आयएएस होते. यापूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींसोबत काम केले होते. 

◾️कृषी व सहकार विभागात सचिव आणि राज्य विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत.

◾️पीके मिश्रा यांच्या कृषी मंत्रालयाच्या कार्यकाळात अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचले आणि कृषी जीडीपीमध्ये भरीव वाढ झाली.

माहिती संकलन :- अजित सर बी पब्लिकेशन

नदालने पाचव्यांदा जिंकल्या वर्षात दोन ग्रँड-स्लॕम स्पर्धा

◾️टेनिसमधील सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने  यूएस ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह त्याने बरेच विक्रम केले पण त्यातील विशेष उल्लेखनीय विक्रम म्हणजे पाचव्यांदा त्याने वर्षात एकापेक्षा अधिक ग्रँड स्लॕम स्पर्धा जिंकल्या आहेत.

◾️यंदा मे महिन्यात त्याने फ्रेंच ओपनचे 12 व्यांदा अजिंक्यपद पटकावले होते तर आता यूएस ओपनमध्ये तो चौथ्यांदा अजिंक्य ठरला आहे.

✅ नदालने वर्षात एकापेक्षा अधिक ग्रँड-स्लॕम स्पर्धा कधी जिंकल्या ते बघू या…

🔸2019- फ्रेंच ओपन व यूएस ओपन

🔹2017- फ्रेंच ओपन व यूएस ओपन

🔸2013- फ्रेंच ओपन व यूएस ओपन

🔹2010- फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि युएस ओपन

🔸2008- फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन

◾️विशेष म्हणजे याआधीच्या चारही वेळा तो त्या- त्या वर्षअखेरीस जागतिक क्रमवारीत ‘नंबर वन’ होता. आतासुध्दा त्याला ही संधी आहे. तसे झाल्यास तो पाचव्यांदा वर्षअखेर नंबर वन असेल आणि याबाबत फेडरर व जोकोवीचची तो बरोबरी करेल तर पीट सॕम्प्रासच्या सहा वर्षांच्या विक्रमाच्या तो आणखी एक पाऊल जवळ पोहोचेल.

◾️नदालच्या 19 ग्रँड-स्लॕम विजेतेपदांपैकी यूएस ओपनचे हे चौथे अजिंक्यपद (2010, 13, 17 आणि 19) आहे. याशिवाय त्याने फ्रेंच ओपन सर्वाधिक 12 वेळा, विम्बल्डन दोन वेळा तर अॉस्ट्रेलियन ओपन एकदा जिंकली आहे.

◾️आणखी एक विशेष विक्रम म्हणजे 2008 मध्ये 21-22 वर्षांचा असताना नदाल वर्षातील चारही ग्रँड-स्लॕम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत फेरीत पोहोचला होता आणि त्याने किमान दोन विजेतेपद पटकावली होती. त्यानंतर आता 11 वर्षांनी 33 वयात तो पुन्हा एकदा वर्षातील चारही ग्रँड स्लॕम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत पोहचला आणि दोन स्पर्धांत विजेता ठरला.

◾️वाढत्या वयात 11 वर्षानंतरही यशात असे सातत्य राखणारे विरळच, म्हणून नदालचा उल्लेख ‘लंबी रेस का घोडा’ असा केला जातो.

◾️वयाची तिशी ओलांडल्यावर पाच ग्रँड-स्लॕम स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...