१२ सप्टेंबर २०१९

असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) अध्यक्षपदी सुनील अरोरा

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ह्यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) या आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्षपद स्वीकारले. सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी AWEBचे अध्यक्षपद रोमानियाकडून भारताकडे सोपविण्यात आले आहे. 2017 साली झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला होता. रोमानियाचे प्रतिनिधी आयन मिनकू रेड्यूलेस्कू ह्यांनी AWEBचा ध्वज सुनील अरोरा ह्यांना सोपवला आणि आता हा ध्वज सन 2021 पर्यंत भारताकडे राहणार. भारतीय निवडणूक आयोगाने 3 सप्टेंबर 2019 रोजी बेंगळुरू या शहरात AWEBची चौथी आमसभा आयोजित केली होती. त्यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला. आमसभेने AWEBचे नवे उपाध्यक्ष म्हणून दक्षिण आफ्रिका या देशाचे ग्लेन व्ह्यूमा माशिनीनी तसेच नवे सरचिटणीस (महासचिव) म्हणून कोरिया प्रजासत्ताकचे जोंग्युन चोए यांच्या नियुक्तीलाही मान्यता दिली आहे. अरोरा यांनी अशी घोषणा केली की दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवी दिल्लीतल्या ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेन्ट (IIIDEM) या संस्थेमध्ये एक AWEB केंद्र सुरू केले जाणार आहे, जे निवडणुकीच्या उत्तमोत्तम पद्धती तयार करणार आणि क्षमता बांधणी वाढवण्याबद्दल कार्य करणार.

A-WEB बद्दल :-

असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) ही जगभरातल्या निवडणूक व्यवस्थापन मंडळांची (EMBs) सर्वात मोठी संघटना आहे. त्याची स्थापना दक्षिण कोरियाच्या सोंग-डू या शहरात 14 ऑक्टोबर 2013 रोजी झाली. आता त्याचे कायमस्वरूपी सचिवालय सोल (दक्षिण कोरिया) या शहरात आहे.

जगभरात मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि सहभागी तत्त्वावर निवडणुका घेण्यात कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वाढवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. यंदा युक्रेन, कंबोडिया, अफगाणिस्तान तसेच सिएरा लिओन, इंडोनेशिया आणि मॉरिशस हे नव्याने दाखल झालेले AWEBचे सभासद आहेत तर सहयोगी सदस्य म्हणून असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीज (AAEA) संघात सामील झाले आहे. आता संघात त्याचे सदस्य म्हणून 111 देशांमधली 120 निवडणूक आयोग मंडळे आणि सहयोगी सदस्य म्हणून 21 आंतरराष्ट्रीय संघटना सामील आहेत.

ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘वर्क व्हिसा’ मिळणार


🎓 ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना आता तेथे कामाचा अनुभव घेणेही शक्य होणार आहे.

🎓अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन वर्षे नोकरी किंवा काम करण्यासाठी आवश्यक व्हिसाही मिळणार आहे.

🎓गेल्या काही वर्षांपासून भारतातून ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यर्थ्यांची संख्या वाढली आहे.

🎓 यंदा जून महिन्यांपर्यंत आकडेवारीनुसार २२ हजार भारतीय विद्यार्थी ब्रिटनमध्ये शिक्षण घेत आहेत.

🎓गेल्यावर्षीपेक्षा ब्रिटनमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४२ टक्क्य़ांनी वाढली आहे.

🎓 विशेषत: विज्ञान, तंत्रज्ञान शाखांतील पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी ब्रिटनला प्राधान्य देतात.

🎓शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथे काम करण्याची संधीही या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

🎓 शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे नोकरीसाठी आवश्यक असलेला व्हिसा देण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे.

🎓या विद्यार्थ्यांना ‘स्किल्ड वर्क व्हिसा देण्यात येईल. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू होईल.

🎓त्याचबरोबर पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरील निर्बंधही काढून टाकले आहेत.

🎓व्हिसा मिळवण्याची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत ९६ टक्के अर्जदार विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला आहे.

११ सप्टेंबर २०१९

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून १४०० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य.

✍ मुंबई महानगर क्षेत्रासह अकोला, नाशिक, पुण्यासाठी टाटा पॉवरची योजना

✍ परदेशांत छतावरील सौर ऊर्जानिर्मितीला मोठे महत्त्व देण्यात येत असून मुंबई महानगर प्रदेशात छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून १४०० मेगावॉट वीजनिर्मिती शक्य असल्याची माहिती टाटा पॉवरच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाचे अध्यक्ष आशीष खन्ना यांनी दिली.

✍ तर मुंबईसह अकोला, नाशिक, पुणे या शहरांत छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांच्या उभारणीसाठी टाटा पॉवर काम करत असल्याची माहिती टाटा पॉवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी दिली.

✍ दिल्लीत छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांमधून २२०० मेगावॉट वीजनिर्मितीची केली जात असून मुंबई-ठाणे, रायगड-पालघर या मुंबई महानगर क्षेत्रात ही क्षमता १४०० मेगावॉट आहे.

✍ मुंबईतील टाटा पॉवर वीज वितरण कंपनीच्या सात लाख ग्राहकांसाठी निम्म्या दरात वातानुकूलन यंत्रणा देण्याबाबतचा उपक्रम व्होल्टासच्या सहाय्याने मंगळवारी सुरू करण्यात आला...

जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉनलद्दाखमध्ये झाली

💢 7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी जम्मू व काश्मीरच्या लेह या शहरात जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत असलेल्या ‘लद्दाख मॅरेथॉन’ची आठवी आवृत्ती आयोजित केली गेली होती.

💢 या कार्यक्रमात भारताच्या विविध भागातून आणि 25 परदेशांमधून 6 हजाराहून अधिक धावपटू सहभागी झाले होते.

💢 हा कार्यक्रम लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) यांच्याद्वारे प्रायोजित होता.

           ♨️  स्पर्धेचे विजेते   ♨️

💢 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज - शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीना वॉल्टर (आयर्लंड)

💢 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन - जिग्मेट डोल्मा (महिला) (सलग तिसर्‍या वर्षी अव्वल स्थान), शबीर हुसेन (पुरुष)

💢 हाफ मॅरेथॉन (महिला) - ताशी लाडोल

             ♨️  स्पर्धेविषयी   ♨️

💢 मॅरेथॉन समुद्रसपाटीपासून 11,000 फूटांहून अधिक उंचीवर आयोजित केले जाते. ही जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते.

💢 हा कार्यक्रम चार वर्गांमध्ये विभागला जातो; ते आहेत – 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज, 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर हाल्फ मॅरेथॉन आणि 7 किलोमीटर रन फॉर फन.

💢 ही मॅरेथॉन प्रथम सन 2012 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

💢 मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे.

Composite Water Managment Index 2019

- अहवालाची ही दुसरी आवृत्ती
- अहवालासाठी 2016-17 हे आधार वर्ष तर 2017-18 हे संदर्भ वर्ष मानले आहे.
- नीती आयोगाने केंद्रीय जल शक्ती मंत्रालय आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या सहकार्याने हा अहवाल काढला आहे.
- अहवालातील क्रमवारी भूमीगत पाण्याची पातळी, सिंचन व्यवस्था, शेतातील पाण्याचा वापर, ग्रामीण आणि शहरी पाणीपुरवठा व्यवस्था आणि पाणी व्यवस्थापनाचे धोरण, यावर आधारित आहे.
- या अहवालात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे.

बिगर हिमालयीन राज्यांची क्रमवारी

1. गुजरात
2. आंध्र प्रदेश
3. मध्य प्रदेश
4. गोवा
5. कर्नाटक

ईशान्य भारत आणि हिमालयीन राज्यांची क्रमवारी

1. हिमाचल प्रदेश
2. उत्तराखंड
3. त्रिपुरा
4. आसाम
5. सिक्किम

केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी

1. पाॅडेचेरी
2. दिल्ली

पीके मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन प्रधान सचिव म्हणून पदभार स्वीकारला

🔘 शिक्षणसंपादन 🔘

◾️अर्थशास्त्र विषयात पदवीधर , पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी घेतली आहे . 

🔘राजकीय पार्श्वभूमी 🔘

◾️ओडिशामध्ये जन्मलेल्या नोकरशहा पीके मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन प्रधान सचिव म्हणून पदभार स्वीकारला. 

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी नुकतेच पदाचा राजीनामा केल्यानंतर हे घडले. यापूर्वी पीके मिश्रा हे पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव होते आणि प्रधान सचिव म्हणून त्यांची नेमणूक केली जात आहे.

 ◾️मिश्रा हे १९७२ च्या बॅचचे गुजरात कॅडरचे आयएएस होते. यापूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींसोबत काम केले होते. 

◾️कृषी व सहकार विभागात सचिव आणि राज्य विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत.

◾️पीके मिश्रा यांच्या कृषी मंत्रालयाच्या कार्यकाळात अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचले आणि कृषी जीडीपीमध्ये भरीव वाढ झाली.

माहिती संकलन :- अजित सर बी पब्लिकेशन

नदालने पाचव्यांदा जिंकल्या वर्षात दोन ग्रँड-स्लॕम स्पर्धा

◾️टेनिसमधील सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी एक असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने  यूएस ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह त्याने बरेच विक्रम केले पण त्यातील विशेष उल्लेखनीय विक्रम म्हणजे पाचव्यांदा त्याने वर्षात एकापेक्षा अधिक ग्रँड स्लॕम स्पर्धा जिंकल्या आहेत.

◾️यंदा मे महिन्यात त्याने फ्रेंच ओपनचे 12 व्यांदा अजिंक्यपद पटकावले होते तर आता यूएस ओपनमध्ये तो चौथ्यांदा अजिंक्य ठरला आहे.

✅ नदालने वर्षात एकापेक्षा अधिक ग्रँड-स्लॕम स्पर्धा कधी जिंकल्या ते बघू या…

🔸2019- फ्रेंच ओपन व यूएस ओपन

🔹2017- फ्रेंच ओपन व यूएस ओपन

🔸2013- फ्रेंच ओपन व यूएस ओपन

🔹2010- फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि युएस ओपन

🔸2008- फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन

◾️विशेष म्हणजे याआधीच्या चारही वेळा तो त्या- त्या वर्षअखेरीस जागतिक क्रमवारीत ‘नंबर वन’ होता. आतासुध्दा त्याला ही संधी आहे. तसे झाल्यास तो पाचव्यांदा वर्षअखेर नंबर वन असेल आणि याबाबत फेडरर व जोकोवीचची तो बरोबरी करेल तर पीट सॕम्प्रासच्या सहा वर्षांच्या विक्रमाच्या तो आणखी एक पाऊल जवळ पोहोचेल.

◾️नदालच्या 19 ग्रँड-स्लॕम विजेतेपदांपैकी यूएस ओपनचे हे चौथे अजिंक्यपद (2010, 13, 17 आणि 19) आहे. याशिवाय त्याने फ्रेंच ओपन सर्वाधिक 12 वेळा, विम्बल्डन दोन वेळा तर अॉस्ट्रेलियन ओपन एकदा जिंकली आहे.

◾️आणखी एक विशेष विक्रम म्हणजे 2008 मध्ये 21-22 वर्षांचा असताना नदाल वर्षातील चारही ग्रँड-स्लॕम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत फेरीत पोहोचला होता आणि त्याने किमान दोन विजेतेपद पटकावली होती. त्यानंतर आता 11 वर्षांनी 33 वयात तो पुन्हा एकदा वर्षातील चारही ग्रँड स्लॕम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत पोहचला आणि दोन स्पर्धांत विजेता ठरला.

◾️वाढत्या वयात 11 वर्षानंतरही यशात असे सातत्य राखणारे विरळच, म्हणून नदालचा उल्लेख ‘लंबी रेस का घोडा’ असा केला जातो.

◾️वयाची तिशी ओलांडल्यावर पाच ग्रँड-स्लॕम स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू आहे.

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांना ‘राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार जाहीर

👉ज्येष्ठ समीक्षक व अनुवादक प्रा. चंद्रकांत पाटील यांना यंदाचा ‘राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

👉मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने हिंदी साहित्य समृद्ध करणाऱ्या इतर भाषिक साहित्यिकाला हा पुरस्कार दिला जातो. 

👉सृजनशील लेखन, सक्रियता आणि दोन भाषांना जोडण्याचे योगदान लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

👉चार दशकांपासून पाटील मराठी-हिंदी साहित्याचा दुवा म्हणून महत्त्वाचे काम करीत आहेत.

👉महत्त्वाच्या हिंदी कविता त्यांनी मराठीत अनुवादित केल्या. तसेच मराठी कविताही हिंदीत भाषांतरीत केल्या.

👉पाटील यांची ‘वैसे वे मेरा शत्रू नही’, ‘रसगंधर्व’, ‘तिची स्वप्ने’, ‘पुन्हा एकदा कविता’, ‘चौकटीबाहेरचे चेहरे’ आदी पुस्तके गाजली आहेत.

👉एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून २०१८ या वर्षांसाठी निवड समितीने पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

👉मराठी व हिंदी भाषेत डॉ. पाटील यांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

👉 त्यांना यापूर्वी भीष्म साहनी यांच्या ‘तमस’ या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला.

👉 ‘कवितांतरण’ या त्यांच्या काव्य संपादनासाठी अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.

👉साहित्य अकादमीतर्फे भारतीय लेखकांच्या प्रतिनिधी मंडळात सदस्य म्हणून  चीन  व विश्व हिदी संमेलनात दक्षिण आफ्रिका  येथे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

@CompleteMarathiGrammar

1) ‘सहलीस गेल्यावेळी आम्ही भरपूर पाणी प्यायलो’ या वाक्यातील अधोरेखित ‘अव्ययाचा’ प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय      4) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

2) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
   अ) ‘कडे, मध्ये, प्रमाणे’ ही शुध्द शब्दयोगी अव्यये आहेत.
   ब) ‘च, मात्र, ना’ ही शब्दयोगी अव्यये नाहीत.

   1) फक्त अ बरोबर    2) फक्त ब बरोबर    3) अ आणि ब बरोबर    4) अ आणि ब चूक

उत्तर :- 4

3) ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली’, या संयुक्त वाक्यातील अव्यय कोणते ?

   1) विकल्पबोधक    2) परिणामबोधक    3) न्यूनत्वबोधक      4) समुच्चयबोधक

उत्तर :- 4

4) बिनचूक जोडी निवडा.

   अ) आश्चर्यकारक    -  ओहो
   ब) हर्षदर्शक    -  आहा
   क) तिरस्कारदर्शक  -  इश्श

   1) अ, ब, क      2) ब, क      3) अ, क        4) अ

उत्तर :- 1

5) पुढील वाक्यातील ‘काळ’ चार पर्यायातून निवडा. – सीता अभ्यास करीत आहे.

   1) अपूर्ण वर्तमानकाळ    2) रीती वर्तमानकाळ  3) पूर्ण वर्तमानकाळ    4) साधा वर्तमानकाळ

उत्तर :- 1

6) पुढील शब्दाचे ‘लिंग’ ओळखा. – तट्टू

   1) स्त्रीलिंग    2) नपुंसकलिंग    3) पुल्लिंग    4) इष्टलिंग

उत्तर :- 2

7) योग्य विधाने निवडा.
   अ) आकारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते.
   ब) आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात.

   1) दोन्ही योग्य    2) दोन्ही अयोग्य    3) फक्त ब योग्य    4) फक्त अ योग्य

उत्तर :- 1

8) ‘तारू’ या शब्दाचे विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्यरूप कोणते ?

   1) तारू    2) तारूस    3) तारवा      4) तारवास

उत्तर :- 3

9) अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा. – “त्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत.”

   1) अष्टमी    2) सप्तमी      3) षष्ठी      4) पंचमी

उत्तर :- 2

10) ‘समोसे चांगले झाले आहेत’ – या वाक्याचे उद्गारार्थी रूप कसे होईल ?

   1) समोसा ? चांगला झालाय    2) वा ! मस्त झालेत समोसे
   3) समोसा, नाही बुवा चांगला झाला    4) चांगले लागतात समोसे

उत्तर :- 2

विक्रम लँडर सुस्थितीत.

🔰चांद्रयान 2 मधील विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून आघाती अवतरणानंतर ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर कोसळले असले तरी, त्याचे तुकडे झालेले नाहीत, ते सुस्थितीत आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्पष्ट केले.तसेच विक्रम लँडरमध्ये प्रज्ञान ही बग्गीसारखी गाडी आहे.

🔰चांद्रयानापासून 2 सप्टेंबरला वेगळ्या झालेल्या विक्रम लँडरला अलगदपणे चांद्रभूमीवर उतरवण्याचा प्रयोग 7 सप्टेंबरला  करण्यात आला. तो सुरुवातीला व्यवस्थित पार पडला; पण अखेरच्या टप्प्यात लँडर चांद्रभूमीपासून दोन कि.मी. उंचीवर  असताना त्याचा ‘इस्रो’च्या मुख्यालयाशी व पृथ्वीवरील भूकेंद्रांशी संपर्क तुटला. जेथे हे विक्रम लँडर उतरणे अपेक्षित होते तेथेच त्याचे आघाती अवतरण झाले, असे ‘ऑर्बिटर’ने पाठवलेल्या छायाचित्रांतून दिसत आहे. लँडरचे तुकडे झालेले नाहीत, तर ते सुस्थितीत आहे.

🔰विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश आले तर नेमके काय घडले हे समजू शकेल. इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्रॅक)च्या चमूने या अवतरणात नेमके काय चुकले असावे याचा शोध सुरू केला आहे.

🔰तसेच चांद्रयान 2 मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम), रोव्हर (प्रज्ञान) असे तीन भाग होते. लँडर आणि रोव्हरचा कार्यकाल एक चांद्र दिवस म्हणजे पृथ्वीवरील चौदा दिवसांइतका होता. चौदा दिवसांत लँडरशी संपर्क प्रस्थापित करणे
आवश्यक आहे, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष शिवन यांनी सांगितले.

प्रश्नसंच

📌हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?

A. रोकड पिके
B. तेलबिया पिके
C. कडधान्य
D. तृणधान्य✅✅

📌खालीलपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते ?

A. बीट
B. ऊस ✅✅
C. गोड ज्वारी
D. मका.

📌महाराष्ट्र राज्यात __ हे तेलबियाचे पिक कोरडवाहू शेतीत घेतले जाते .

A. सूर्यफूल
B. करडई ✅✅
C. जवस
D. मोहरी

📌सध्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

वाघ✅✅
सिंह
हत्ती
चिता

📌"रिव्हाल्युशनरी" हे पत्रक कोणी सुरु केले?

रामकृष्ण बिस्मील
सचीद्रनाथ संन्याल✅✅
शहानाजखान
भगतसिंग

📌भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

डॉ. आंबेडकर
डॉ. राजेंद्रप्रसाद✅✅
पंडित नेहरू
लॉर्ड माऊंटबॅटन

📌कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो?

मुंबई
दिल्ली
कोलकत्ता✅✅
नागपूर

📌जगातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक भारतात राहतात....???

१० टक्के
१६ टक्के✅✅
२० टक्के
२९ टक्के

📌मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?


ब✅✅

📌कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो?

गाय
कुत्रा
उंदिर✅✅
मांजर

📌............ पासून अॅल्सुमिनिअम मिळवले जाते.

तांबे
बॉक्साइट✅✅
लोखंड 
मँगनिज

📌-------- या सरोवराची निर्मिती उल्कपातापासून झालेली आहे?

चिलका 
लोणार ✅✅
सांभर
पुलीकेत

📌राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?

१६
१७✅✅
१८
१९

📌लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ............ पासून मिळतात.

A .......कुटुंब
B .......शाळा
A+B ..दोन्हीही✅✅
D........मंदिर

📌भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात?

पंडित नेहरू ✅✅
डॉ. राजेंद्र प्रसाद
इंदिरा गांधी
महात्मा गांधी

📌खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे?

चेन्नई
कोलकाता
विशाखापट्टणम ✅✅
कांडला

📌रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात?

सल्फ्युरिक अॅसिड✅✅
मायट्रोजन ऑक्सीईड
हैड्रोक्लोरिक अॅसिड
अमितो आम्ल

📌दुलीप करंडक ही स्पर्धा कोणत्या क्रिडाप्रकाराशी संबंधित आहे?

(A) टेनिस
(B) क्रिकेट✅✅✅
(C) फुटबॉल
(D) बास्केटबॉल

📌कोणत्या संघाने दुलीप करंडक 2019 ही क्रिकेट स्पर्धा जिंकली?

(A) इंडिया रेड✅✅✅
(B) इंडिया ग्रीन
(C) इंडिया ब्लू
(D) इंडिया ब्लॅक

📌एका भारतीय वकील आणि माजी कायदा मंत्रीचे 8 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले. त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव काय होते?

(A) महेश जेठमलानी
(B) तीरथ दास डोगरा
(C) एच. आर. गोखले
(D) राम जेठमलानी✅✅✅

📌8 सप्टेंबर 2019 रोजी पाळलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा विषय काय आहे?

(A) लिटरसी अँड स्किल्स डेव्हलपमेंट
(B) लिटरसी अँड मल्टीलिंगुअॅलीझम✅✅✅
(C) लिटरसी इन ए डिजिटल वर्ल्ड
(D) रीडिंग द पास्ट, राइटिंग द फ्युचर

📌‘लष्करी औषधे’ या विषयावर शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य देशांची पहिली परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) शांघाय, चीन
(B) बिजींग, चीन
(C) ढाका, बांग्लादेश
(D) नवी दिल्ली, भारत✅✅✅

📌तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क कुठे उभारण्यात आले आहे?
(A) निर्मल, निजामाबाद जिल्हा
(B) जगतील, निजामाबाद जिल्हा
(C) लक्कमपल्ली, निजामाबाद जिल्हा
✅✅✅
(D) बेलगमपल्ली, निजामाबाद जिल्हा

📌चौथी ‘हिंद महासागर परिषद 2019’ कुठे आयोजित करण्यात आली?

(A) माले, मालदीव✅✅✅
(B) नवी दिल्ली, भारत
(C) नैरोबी, केनिया
(D) जिबूती

‘मलेरियाचे उच्चाटन सध्या तरी अशक्यच’

आतापर्यंत मानवामधील देवी या एकमेव रोगाचे पूर्णत: निर्मूलन झालेले आहे. मलेरियाचे निर्मूलन करणे तत्त्वत: शक्य असले, तरी सध्या वापरात असलेल्या लसींमधील त्रुटी आणि मलेरिया नियंत्रणाची साधने- पद्धतींमधील दोष लक्षात घेता मलेरियाच्या संपूर्ण निर्मूलनाची सध्या शक्यता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेचे जागतिक मलेरिया संचालक डॉ. प्रेडो अलोन्सो यांनी सांगितले की, मलेरियाचे निर्मूलन करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा उद्देश आहे याबाबत कोणतीही शंका नाही, मात्र त्याविषयीच्या उपाययोजनांच्या शक्याशक्यतांबाबतच प्रश्न निर्माण झाले आहेत. मलेरियाला अटकाव करण्यासाठी आपण सध्या करीत असलेल्या उपाययोजना लक्षात घेतल्या, तर त्यांच्या माध्यमातून मलेरियाचे निर्मूलन होण्याची फारशी शक्यता नाही, असे त्यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा अध्यक्षपदावरून पायउतार

चीनमध्ये ऑनलाइन रिटेल क्षेत्र (किरकोळ विक्री क्षेत्र) गाजवणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा हे अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत.

अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे चीनच्या उद्योगांपुढे आव्हान असताना त्यांनी अलिबाबा या ई व्यापार कंपनीचा निरोप घेतला आहे.

मा हे चीनमधील सर्वात श्रीमंत व सर्वाना परिचित असलेले उद्योजक असून त्यांनी त्यांच्या ५५ व्या वाढदिवशी हे पद सोडले आहे.

त्यांनी एक वर्षभरापूर्वीच पद सोडण्याचे संकेत दिले होते. ते आता अलिबाबा भागीदारी मंडळात सदस्य राहतील.

हा ३६ सदस्यांचा गट असून त्याला कंपनीचे संचालक ठरवण्याचा अधिकार आहे.

जॅक मा हे इंग्रजीचे माजी शिक्षक असून त्यांनी १९९९ मध्ये अलिबाबा कंपनी स्थापन करून चीनच्या निर्यातदारांना अमेरिकी किरकोळ व्यापारक्षेत्राशी सांगड घालून दिली.

नंतर या कंपनीने चीनमधील वाढत्या ग्राहक बाजारपेठेतच काम करण्याचे ठरवले, कंपनीने बँकिंग, करमणूक, क्लाउड कॉम्प्युटिंग या क्षेत्रात काम केले.

जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत १६.७ दशलक्ष डॉलर्सच्या महसुलात ६६ टक्के वाटा देशी उद्योगांचा आहे.

सध्या चीनच्या रिटेल उद्योगावर अमेरिकेबरोबरच्या व्यापार युद्धामुळे अनिश्चिततेचे सावट असून अमेरिकी आयातीची किंमत आता वाढली आहे. ऑनलाइन विक्री २०१९ च्या पहिल्या सहामाहीत १७.८ टक्क्य़ांपर्यंत घसरली असून त्यामुळे चीनच्या आर्थिक वाढीला लगाम लागला आहे.

२०१८ मध्ये ऑनलाइन विक्री २३.९ टक्के होती.

कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कूची पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहोर.

२३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्काआर्थर अ‍ॅश स्टेडियमवर एक तास आणि ४० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात १९ वर्षीय बियांकाने ३७ वर्षीय आठव्या मानांकित सेरेनाला ६-३, ७-५ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले.

१५व्या मानांकित बियांकाचे हे कारकीर्दीतील एकूण तिसरे विजेतेपद असून यापूर्वी तिने एंडियन वेल्स आणि टोरंटो टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी ती कॅनडाची पहिली खेळाडू ठरली आहे.

४ सेरेनाला गेल्या दोन वर्षांत चार विजेतेपदांनी हुलकावणी दिली. २०१८ आणि २०१९ची विम्बल्डन तसेच अमेरिकन या दोन्ही स्पर्धामध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...