०६ सप्टेंबर २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.

   1) पाय घसरला म्हणून पडलो    2) पाय घसरून पडलो
   3) पाय घसरला व पडलो      4) यापैकी नाही

उत्तर :- 2

2) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

   1) विलासरावांचा थोरला    2) मुलगा   
  3) क्रिकेटचा सामना    4) चांगला खेळला

उत्तर :- 4

3) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी प्रयोग    2) कर्तरी प्रयोग    3) भावे प्रयोग    4) संकरित प्रयोग

उत्तर :- 2

4) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............

   1) कर्मधारय    2) व्दंव्द      3) व्दिगू      4) अव्ययीभाव

उत्तर :- 1

5) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –

     ‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?

   1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह      2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
   3) स्वल्पविराम वा पूर्णविराम    4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह

उत्तर :- 2

6) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता?

   1) मूळुमूळु    2) मूळुमूळू   
   3) मुळूमुळू    4) मुळुमुळु

उत्तर :- 3

7) ‘च’ या वर्गातील च्, छ्, ज्, झ – या वर्णांचा उच्चार ......................... असा दुहेरी होतो.

   1) कंठय व तालव्य    2) मूर्धन्य व कंठय
   3) तालव्य व दंत तालव्य    4) दंत्य व औष्ठय

उत्तर :- 3

8) पुढीलपैकी ‘पूर्वरूप संधी’ चे योग्य उदाहरण कोणते ?

   1) खिडकी + आत = खिडकीत    2) न + उमजे = नुमजे
   3) घाम + डोळे = घामोळे      4) एक + एक = एकेक

उत्तर :- 1

9) खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते  ?

   1) रस्ता    2) भारत     
   3) हिमालय    4) गंगा

उत्तर :- 1

10) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. – आपण गरीबांना मदत करावी.

   1) गरीबांना    2) आपण   
   3) जो      4) करावी

उत्तर :- 2

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य      2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य      4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

उत्तर :- 2

2) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
     स्तव
   1) तुलनावाचक      2) हेतुवाचक    3) दिक्वाचक    4) विरोधवाचक

उत्तर :- 2

3) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?

    ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

   1) परिणामबोधक    2) स्वरूपबोधक    3) कारणबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 2

4) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’

   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी    3) सर्वनाम    4) ‍क्रियापद

उत्तर :- 2

5) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमान काळ    4) रीतिवर्तमान काळ

उत्तर :- 4

6) ‘आनंद’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.

   1) हर्ष      2) आनंदीआनंद     
   3) हास्य    4) उत्साह

उत्तर :- 1

7) ‘भव्दजन’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुध्दार्थी आहे ?

   1) सज्जन    2) दुर्जन     
   3) प्रेमीजन    4) विद्ववत्जन   

उत्तर :- 2

8) ‘स्वत:मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.

   1) खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी    2) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग
   3) आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला  4) उथळ पाण्याला खळखळाट फार

उत्तर :- 4

9) ‘पाणी सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

   1) शेतीला पाणी देणे    2) त्याग करणे   
   3) इतरांना मदत करणे    4) कोंडी फोडणे

उत्तर :- 2

10) ‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा.

   1) अग्रज    2) अपूर्व     
   3) अनुज    4) अष्टावधानी

उत्तर :- 3 

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धात सेरेनाचा शतकमहोत्सव


🔰सेरेना विल्यम्सने वांग क्विंगला फक्त 44 मिनिटांत नामोहरम करून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील शतकमहोत्सवी विजयाची नोंद केली आणि विक्रमी 24व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे दिमाखात वाटचाल केली.

🔰तसेच सहा वेळा अमेरिकन विजेत्या सेरेनाने मंगळवारी चीनच्या 18व्या मानांकित वांगला 6-1, 6-0 असे सहज पराभूत केले. आता उपांत्य फेरीत तिची युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाशी गाठ पडणार आहे.

🔰अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या इतिहासात विजयांचे शतक नोंदवणाऱ्या ख्रिस एव्हर्टच्या पंक्तीत आता सेरेना दाखल झाली आहे.

०५ सप्टेंबर २०१९

मराठी प्रश्नसंच 5/9/2019

1) पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.

   1) रांगणारे मूल    2) पिकलेला आंबा    3) पेणचे गणपती    4) वरचा मजला

उत्तर :- 3

2) पुढीलपैकी ‘ला’ आख्यात ओळखा.
   1) बसला    2) बसू      3) बसतो      4) बसावा

उत्तर :- 1

3) ‘तुला जसे वाटेल तसे वाग’ – या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीदर्शक ................. आहे.
   1) क्रियाविशेषण वाक्य      2) विशेषण वाक्य
   3) प्रधानवाक्य        4) नामवाक्य

उत्तर :- 1

4) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

   अ) शब्दयोगी अव्यये नामांना जोडू नयेत नाही.   
   ब) शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत.

   1) अ बरोबर    2) ब बरोबर    3) अ आणि ब बरोबर  4) अ आणि ब चूक

उत्तर :- 4

5) गुरुजी म्हणाले, की ‘प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे’ या वाक्यातील गौणवाक्य कोणते ?

   1) गुरुजी म्हणाले      2) प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे
   3) प्रत्येकाने नियमितपणे      4) नियमितपणे शाळेत यावे

उत्तर :- 2

1) अयोग्य जोडी निवडा.

   अ) विरोधीदर्शक    -  उंहू
   ब) शोकदर्शक    -  अगाई
   क) मौनदर्शक    -  गुपचित

   1) अ      2) ब      3) क      4) यापैकी नाही

उत्तर :- 4

2) ‘मी पुस्तक वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) रीती भूतकाळ  2) रीती वर्तमानकाळ  3) पूर्ण वर्तमानकाळ  4) साधा वर्तमानकाळ

उत्तर :- 1

3) ‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.

   1) कविता    2) कवयित्री    3) कवित्री    4) कवियित्री

उत्तर :- 2

4) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन हे एकवचनासारखेच राहते.

   अ) कागद    ब) आज्ञा     क) उंदीर      ड) विद्या

   1) ब, क, ड    2) अ, ब, क, ड    3) अ, क, ड    4) अ, ब, ड

उत्तर :- 2

5) ‘मुलांना’ या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?

   1) मुला    2) मुलां      3) मुलींना    4) मुलाला

उत्तर :- 2

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

◾️राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची  म्हणून नियुक्ती केली. ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव राहिलेले  हे १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. राज्याच्या मुख्यसचिवासह त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि  गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मदान यांचे स्वागत केले. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल पूर्ण झाला.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 05 सप्टेंबर 2019.

*5 सप्टेंबर: शिक्षक दिन*

✳ अफगाणिस्तानचा रशीद खान सर्वात तरुण कसोटी कर्णधार ठरला

✳ रहमत शाह कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला

✳ राफेल नदालने यूएस ओपन 2019 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

✳ एमएनआर बालन पुडुचेरी असेंब्लीचे उपसभापती म्हणून निवडण्यासाठी तयार आहेत

✳ *डब्ल्यूईएफने प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 जाहीर केला*

✳ ट्रॅव्हल अ‍ॅन्ड टुरिझम कॉम्पिटिटिव्हिटी रिपोर्ट  2019 मध्ये भारताचा 34 वा क्रमांक आहे

✳ स्पेनने टॉप ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कॉम्पिटिटिनिटी रिपोर्ट  2019

✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 मध्ये फ्रान्सचा दुसरा क्रमांक आहे

✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल  2019 मध्ये जर्मनी तिसरा क्रमांकावर आहे

✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 मध्ये जपानने चौथा क्रमांक पटकावला
 
✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 मध्ये अमेरिकेचा पाचवा क्रमांक आहे

✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 मध्ये ब्रिटन सहाव्या क्रमांकावर आहे

✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया 7 व्या स्थानावर आहे

✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 मध्ये इटलीचा आठवा क्रमांक आहे

✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 मध्ये कॅनडाचा 9 वा क्रमांक आहे

✳ ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कॉम्पिटिटिव्हिटी रिपोर्ट 2019 मध्ये स्वित्झर्लंडचा दहावा क्रमांक आहे

✳ चीन प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल 2019 मध्ये 13 व्या स्थानावर आहे

✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 मध्ये इस्त्राईलचा.  57 वा क्रमांक आहे

✳ श्रीलंका प्रवास आणि पर्यटन स्पर्धा अहवाल 2019 मध्ये 77 व्या क्रमांकावर आहे

✳ प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल 2019 मध्ये नेपाळचा क्रमांक 102 वा आहे

✳ ट्रॅव्हल अ‍ॅन्ड टुरिझम कॉम्पिटिटिव्हिटी रिपोर्ट 2019 मध्ये पाकिस्तानचा 121 वा क्रमांक आहे

✳ जगातील सर्वाधिक सजीव शहरांच्या यादीमध्ये नवी दिल्ली 118 व्या स्थानावर आहे

✳ जगातील सर्वाधिक लाइव्ह लाइव्ह शहरांच्या यादीत मुंबईचा 119 वा क्रमांक आहे

✳ व्हिएन्ना जगातील सर्वाधिक लोकप्रिय शहरांची यादी

✳ जगातील सर्वाधिक लाइव्ह लाइव्ह शहरांच्या यादीत मेलबर्न दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ सिडनी जगातील सर्वाधिक लाइव्ह लाइव्ह शहरांच्या यादीत तिसरा या क्रमांकावर आहे

✳ ओसाका जगातील सर्वाधिक लाइव्ह लाइव्ह शहरांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे

✳ कॅल्गरी जगातील सर्वाधिक सजीव शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे

✳ कराची जगातील सर्वाधिक लाइव्ह लाइव्ह शहरांच्या यादीत 136 व्या क्रमांकावर आहे

✳ ढाका जगातील सर्वाधिक लाइव्ह लाइव्ह शहरांच्या यादीत 138 व्या क्रमांकावर आहे

✳ वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने जाहीर केले 10 सुवर्ण राखीव राष्ट्रांसह नेशन्स

✳ अमेरिकेने 8,133.5 टन सोन्याच्या एकूण राखीसह देशाच्या यादीत अव्वल स्थान मिळविले

✳ जर्मनी एकूण 3,366 8 टन सोन्याच्या साठ्यासह दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ आयएमएफ 2,451.8 टन सोन्याच्या एकूण राखीसह तिसर्‍या क्रमांकावर आहे

✳ इटलीने एकूण 2,451.8 टन सोन्याच्या साठ्यासह चौथा क्रमांक पटकावला

✳ फ्रान्सने 2436.1 टन सोन्याच्या एकूण राखीसह पाचव्या क्रमांकावर आहे

✳ रशियाने 2,219.2 टन सोन्याच्या एकूण राखीसह 6 व्या क्रमांकावर आहे

✳ 1,936.5 टन सोन्याच्या एकूण साठ्यासह चीनने 7 वे स्थान मिळविले

✳ स्वित्झर्लंडने 1,040 टन सोन्याच्या एकूण राखीसह 8 व्या क्रमांकावर आहे

✳ जपानने 765.2 टन सोन्याच्या एकूण साठ्यासह 9 वे स्थान मिळविले

✳  618.2 टन सोन्याच्या एकूण सोन्याच्या राखीसह भारताचा 10 वा क्रमांक आहे

✳ पाकिस्तान 64.6 टन सोन्याच्या साठ्यासह 45 व्या क्रमांकावर आहे.

वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग


1) नाव मिळवणे. 
अर्थ :- कीर्ती मिळविणे. 
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम 
            येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 

2) रक्ताचे पाणी करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी 
     केले आणि स्वराज्याची स्थापना केली. 

3) सोंग काढणे. 
अर्थ :- नक्कल करणे. 
वाक्य :-  सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब 
            सोंग काढतो. 

4) रात्रीचा दिवस करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले. 

5)भांबावून जाणे. 
अर्थ :- गोंधळून जाणे. 
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात 
           आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो  भांबावून गेला.

6)डोक्यावर घेणे. 
अर्थ :- अतिलाड करणे. 
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला 
    आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर 
    घेतले. 

7) आळा घालणे. 
अर्थ :- बंदी आणणे. 
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा 
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला. 

8) तीरासारखे धावणे. 
अर्थ:- खूप वेगाने धावणे. 
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश 
       स्पर्धेत तीरासारखा धावतो. 

9) मर्जी राखणे. 
अर्थ :- खूश ठेवणे. 
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी 
      जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली. 

10) संगोपन करणे. 
अर्थ :- पालनपोषण करणे. 
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने 
          तिचे संगोपन केले.

11) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.

12) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

13)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

14) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

15) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

16) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

17) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

18) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

19)अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

20) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

वॉशिंग्टनः न्यायाधीशपदी भारतीय वंशाची महिला

📌 भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित शिरीन मॅथ्यू यांची अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या दक्षिण जिल्ह्याच्या अमेरिकन जिल्हा न्यायालयात न्यायाधीशपदासाठी नियुक्त केले आहे.

📌मॅथ्यू या पहिल्या आशियन पॅसिफिक अमेरिकन महिला ठरल्या आहेत.

📌तसेच, त्या अमेरिकेतील एका मोठ्या कायदा फर्म 'जोन्स डे'याच्याशी संलग्न आहे. यापूर्वी त्या कॅलिफोर्नियात एका सहायक संघीय वकील होत्या.

📌सॅन डिएगोमध्ये दक्षिण कॅलिफोर्नियाच्या दक्षिणी जिल्हा संघीय न्यायालयात त्यांचे नामांकन बुधवारी व्हाइट हाऊसद्वारे घोषित करण्यात आले.

📌आता त्यांच्या नियुक्तीला सिनेटद्वारे अनुमोदन करण्यात आले आहे. अमेरिकेतील संघीय न्यायालयात ट्रम्प यांच्या द्वारे घोषित करण्यात आलेल्या नामांकनात मॅथ्यू या सहाव्या भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित नागरिक ठरल्या आहेत.

📌दक्षिण आशिया बार आसोसिएशन (साबा) चे अध्यक्ष अनिश यांनी याला ऐतिहासिक नामांकन म्हटले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

रशियन शस्त्रास्त्रांना भारतीय साथ; दोन्ही देशांत १५ करार


◾️भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षणविषयक सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकीत रशियाच्या संरक्षण सामग्रीसाठी भारतीय बनावटीचे सुटे भाग वापरण्याचा निर्णय बुधवारी दोन्ही देशांनी घेतला; तसेच रशिया या उत्पादनांसाठीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित

  👉व्लाडिव्होस्टॉकः भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षणविषयक सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकीत रशियाच्या संरक्षण सामग्रीसाठी भारतीय बनावटीचे सुटे भाग वापरण्याचा निर्णय बुधवारी दोन्ही देशांनी घेतला; तसेच रशिया या उत्पादनांसाठीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यातील चर्चेवेळी हा निर्णय घेण्यात आला. पौर्वात्य आर्थिक मंचाच्या (ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम) अधिवेशनासाठी पंतप्रधान येथे आले आहेत.

'संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याविषयी दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली. त्याचाच भाग म्हणून संयुक्तपणे लष्करी साधनसामग्रीचे उत्पादन करणे, सुटे भाग आणि घटकांचे उत्पादन करणे आणि विक्री पश्चात यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निश्चित करण्यात आले. सध्याही या प्रकारची भागीदारी सुरू आहे. मात्र तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत रशियन बनावटीची शस्त्रास्त्रे आणि संरक्षणविषयक इतर सामग्रीचे तंत्रज्ञान हस्तांतरही भारताला केले जाणार आहे,' असे दोन्ही देशांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

संरक्षण क्षेत्रात रशिया गेली पन्नास वर्षे भारताचा विश्वासू भागीदार राहिला आहे, असे गौरवोद्गार पुतीन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत काढले. पुढील वर्षीच्या व्हिक्टरी डे सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मॉस्कोला भेट देण्याचे निमंत्रणही पुतीन यांनी मोदींना दिले. भारताने रशियाकडे १४.५ अब्ज डॉलरच्या शस्त्रास्त्रे आणि संरक्षणविषयक इतर सामग्रीची मागणी नोंदवली आहे, अशी माहिती रशियाच्या संरक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गेल्या वर्षी रशियाची एस-४०० क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेने भारतावर मोठा दबाव आणला होता. तरीही तो व्यवहार पार पडला. तसेच, काही छोट्या युद्धनौका (फ्रिगेट), दारूगोळा, तसेच इग्ला-एस ही चल हवाई यंत्रणा भारत रशियाकडून खरेदी करणार आहे, अशी माहिती रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल को ऑपरेशनचे प्रमुख दिमित्री शुग्यायेव्ह यांनी दिली.

🔴काश्मीरप्रश्नी भारताची भूमिका समजावली

'काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याबाबत भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष पुतीन यांना समजावून सांगितली. उभय नेत्यांतील चर्चेदरम्यान मोदी यांनी स्वत: पुढाकार घेत काश्मीरचा विषय उपस्थित केला. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशियाने भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुतीन यांचे आभारही मानले. पाकिस्तान भारताविरोधात सातत्याने खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करीत असल्याचेही मोदी यांनी पुतीन यांना सांगितले,' अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.

🔻'एके-२०३मुळे नवी उंची'

एके-२०३ रायफलींचे उत्पादन भारतात संयुक्तपणे करण्यामुळे दोन्ही देशांतील संबंध नवी उंची गाठतील, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. भारत हा रशियाचा महत्त्वाचा सहकारी देश आहे, अशा शब्दांत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी द्विपक्षीय भागीदारीचा गौरव केला. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील कोरवा येथे इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने एके-२०३ रायफलींचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. भारतीय दारूगोळा कारखाना मंडळ (ओएफबी) आणि रोसनबर्न एक्स्पोर्ट्स आणि कन्सर्न कलाश्निकोव्ह यांचा हा संयुक्त भागीदारीतील प्रकल्प आहे. याबाबतचा करार फेब्रुवारी महिन्यात करण्यात आला होता.

🔻दोन्ही देशांत १५ करार

- दोन्ही देशांत १५ करार करण्यात आले. त्यात लष्करी साह्य, दळणवळण, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, सागरी वाहतूक आदी क्षेत्रांचा समावेश

- सन २०२५ पर्यंत द्विपक्षीय व्यापार ११ अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट

- कुडनकुलम येथील उर्वरित चार अणुभट्ट्या उभारणीला गती देणार

- गगनयान मोहिमेतील भारतीय अंतराळवीरांना रशिया प्रशिक्षण देणार

- दहशतवादाबाबत दुटप्पी भूमिका अमान्य करणे

- अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य राहावे, यासाठी पाठिंबा देणे

समुद्रयान’ प्रकल्पातून भारत खोल महासागरात खनिजांचा शोध घेणार

👉सन 2021-22 मध्ये पाणबुडीसारख्या वाहनामधून खोल समुद्रात मानव पाठविण्याची भारताची महत्वाकांक्षा असून त्यासंदर्भात ‘समुद्रयान’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

👉चेन्नईची राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) 'समुद्रयान' प्रकल्प राबववित आहे.

👉सुमारे 200 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामधून तीन व्यक्तींसह सुमारे 6000 मीटर खोलीपर्यंत पाण्याखाली जाण्यास सक्षम असलेले जलयान तयार केले जात आहे.

👉 देशातच विकसित केल्या जात असलेल्या प्रस्तावानुसार समुद्राच्या तळाशी सहा किलोमीटरच्या खोलीवर 72 तास कार्य करू शकणारे जलयान तयार केले जात आहे.

👉सध्या पाणबुडी केवळ 200 मीटरच्या खोलीपर्यंतच समुद्राखाली जाऊ शकते.

👉‘समुद्रयान’ प्रकल्प हा खोल समुद्रात खनिजांचा शोध घेण्यासाठी भु-शास्त्र मंत्रालयाच्या पथदर्शी प्रकल्पाचा एक भाग आहे.

👉या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्रतळाशी असलेल्या दुर्मिळ खनिजांचा शोध घेतला जाणार आहे आणि असा शोध घेणार्‍या विकसित देशांच्या पंक्तीत भारताला ठेवणार आहे.   

✅पार्श्वभूमी

👉केंद्रीय हिंद महासागर खोरे (Central Indian Ocean Basin -CIOB) या प्रदेशामध्ये समुद्राच्या तळाशी पॉलीमेटॅलिक नोडूलचा शोध घेण्यासंबंधी भारताला काही विशेषाधिकार दिले गेले आहेत. पॉलीमेटॅलिक नोडूल हे समुद्राच्या तळाशी आढळून येतात.

👉इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी (ISA) कडून दिल्या गेलेल्या अधिकारांमधून पॉलीमेटॅलिक नोडूलच्या संदर्भात शोध घेण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात 75000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ दिले गेले आहे.

👉त्या क्षेत्रात अंदाजे 380 दशलक्ष टन इतके पॉलीमेटॅलिक नोडूलचे स्त्रोत आहे, ज्यात 4.7 दशलक्ष टन निकेल, 4.29 दशलक्ष टन तांबा आणि 0.55 दशलक्ष टन कोबाल्ट आणि 92.59 दशलक्ष टन मॅगनीझ असू शकते.

👉1987 साली पॉलीमेटॅलिक नोडूलचा शोध घेणे आणि त्याच्या वापरासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून केंद्रीय हिंद महासागर खोरे (CIOB) यामध्ये एक विशेष क्षेत्र वाटप करण्यात आले. त्यामुळे एक अग्रगण्य गुंतवणूकदाराचा दर्जा मिळवणारा भारत हा पहिला देश ठरला.

👉भारतासह इतर सात देशांना/कंत्राटदारांनादेखील भु-शास्त्र मंत्रालयाच्या माध्यमातून समुद्राच्या तळाशी शोधकार्य चालविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

👉इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी (ISA) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक शाखा आहे, जी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात महासागरांच्या समुद्रातल्या मृत स्त्रोतांचा शोध घेण्यास आणि त्यांचा वापर करण्यावर नियंत्रण ठेवते.

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...