०४ सप्टेंबर २०१९

वर्ल्डकप नेमबाजीत भारत नंबर वन; ५ सुवर्ण

 🏆पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत.

🏆रिओत झालेल्या वर्ल्डकप नेमबाजीत भारताने ५ सुवर्ण आणि प्रत्येकी २ रौप्य व ब्राँझपदकांसह अव्वलस्थान मिळविल्यामुळे भारतीय नेमबाजांवरचा विश्वास आता आणखी वाढला आहे.

🏆या वर्षीच्या चार वर्ल्डकपमध्ये भारताने एकूण २२ पदकांची कमाई केली आहे.

🏆त्यातच १० मीटर एअर रायफल नेमबाजी महिला गटाच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या अपूर्वी चंडेला, अंजुम मुदगिल आणि वलरिव्हन एलावेलिन यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविल्यामुळे एकूणच भारताने नेमबाजीत जागतिक स्तरावर पहिले स्थान मिळविले आहे.

🏆भारताचे युवा नेमबाज मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांनी आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र गटात सुवर्णयश पटकावले.

🏆याच प्रकारात भारताच्या यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली.

🏆मिश्रच्या एअर पिस्तुलच्या फायनलमध्ये मनू-सौरभ जोडीने शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आपलेच सहकारी यशस्विनीसिंग देसवाल-अभिषेक वर्माला १७-१५ असे नमविले.

🏆मनू आणि सौरभ दोन्ही सतरा वर्षांचे आहेत. अंतिम फेरीत अनेक चढ-उतार बघायला मिळाले. मनू-सौरभ सुरुवातीला ३-९ने पिछाडीवर होते.

🏆यानंतर ते ७-१३ आणि ९-१५ असे पिछाडीवर पडले होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. यानंतरच्या सलग चार फेऱ्या जिंकून त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीला निष्प्रभ केले. तत्पूर्वी, पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत मनू-सौरभ जोडीने ४०० पैकी ३९४ गुणांची कमाई केली.

🏆अखेरच्या सीरिजमध्ये तर या जोडीने प्रत्येकी १०० गुण मिळवले. यशस्विनी आणि अभिषेक जोडीने ३८६ गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले होते. यातील अव्वल आठ जोड्या अंतिम फेरीत दाखल झाल्या.

🏆मनू-सौरभ जोडीने वर्ल्डकपमधील एअर पिस्तुलमध्ये चारही सुवर्णपदके आपल्या नावे केले आहेत.

     🥇वर्ल्डकपमध्ये भारताचे वर्चस्व🥇

🏆या वर्षाच्या चारही वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाजांनी निर्विवाद वर्चस्व राखले.

🏆ब्राझीलमध्ये झालेल्या या वर्ल्डकपमध्येही भारतीय नेमबाजांनी आपला दबदबा राखला.

🏆मंगळवारी संपलेल्या या वर्ल्डकपमध्ये भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझ, अशी एकूण नऊ पदके पटकावली. या वर्ल्ड कपमध्ये इतर देशांच्या नेमबाजांना एक सुवर्णपदकाच्या वर कमाई करता आली नाही.

🏆भारताने या वर्षातील चारही वर्ल्डकपमध्ये मिळून २२ पदकांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी भारताने वर्ल्डकपमध्ये एकूण १९ पदके मिळवली होती.

            🥇पदकतक्ता🥇

देश.  सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण

भारत ५  २.   २.   ९

चीन १    २    ४    ७

क्रोएशिया १.  १   ०   २

ब्रिटन १.   १    ०.   २

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जम्मू-काश्मिरात पंच, सरपंचांना विमासुरक्षा

💢जम्मू आणि काश्मिरातील गावांचे सरपंच आणि पंच (पंचायतींचे सदस्य) यांना पोलिस संरक्षण दिले जाणार असून त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा कवच पुरवले जाणार आहे.

💢केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मिरातील पंच व सरपंचांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी हे आश्वासन दिले.

💢या शिष्टमंडळाने मंगळवारी येथे शहा यांची भेट घेतली.

💢 'आम्हाला सुरक्षा पुरवण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली. त्याप्रमाणे प्रशासन सुरक्षा पुरवेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे,' असे कुपवाडा जिल्ह्यातील सरपंच मिर जुनैद यांनी भेटीनंतर सांगितले.

💢 तर सर्व पंच व सरपंचांना दोन लाखांचे विमा संरक्षण देण्याचे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिल्याचे श्रीनगर जिल्ह्यातील हरवान गावचे सरपंच झुबेर निषाद भट यांनी सांगितले.

💢जम्मू-काश्मिरात येत्या १५ ते २० दिवसांत मोबाइलचे नेटवर्क पुन्हा प्रस्थापित होईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितल्याचेही भट म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ऑलिम्पिकमधील भारताचे नववे स्थान निश्चित


✍यशस्वीनी सिंह देसवालने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युक्रेनच्या ऑलिना कोस्टिव्हायशवर मात करीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले.
याचप्रमाणे ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी भारताचे नववे स्थान निश्चित केले.

✍22 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या यशस्विनीने आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत 236.7 गुणांची  कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ऑलिनाने 234.8 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर सर्बियाच्या जस्मिना मिलाव्होनोव्हिचने 215.7 गुणांसह  कांस्यपदक मिळवले.

चालू घडामोडी प्रश्नसंच 4/9/2019

📌कोणत्या भारतीय खेळाडूला पहिल्या-वहिल्या AIPS एशिया पुरस्कार सोहळ्यात महिला गटात ‘सर्वोत्तम आशियाई खेळाडू’ म्हणून गौरविण्यात आले?

(A) पी. व्ही. सिंधू
(B) स्मृती मंधाना
(C) हरमनप्रीत कौर
(D) मेरी कोम✅✅✅

📌भारतातले सर्वाधिक उंचीवर उभारलेले स्काय सायकलिंग ट्रॅक कुठे बांधण्यात आला आहे?

(A) मनाली✅✅✅
(B) लेह
(C) लाहौल
(D) स्पीती

📌इप्सोस या संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये कोणता देश अग्रस्थानी आहे?

(A) ऑस्ट्रेलिया
(B) ग्रेट ब्रिटन
(C) कॅनडा
(D) (A) आणि (C)✅✅✅

📌इप्सोस या संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?

(A) 5 वा
(B) 18 वा
(C) 9 वा
(D) 22 वा

📌29 ऑगस्ट 2019 रोजी आशियाई विकास बँक (ADB) याच्या अध्यक्षांनी भारत सरकारच्या नवीन प्रमुख उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सन 2020 ते सन 2022 या काळात ___ हून अधिकचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले.

(A) 12 अब्ज डॉलर✅✅✅
(B) 22 अब्ज डॉलर
(C) 32 अब्ज डॉलर
(D) 52 अब्ज डॉलर

📌टाइम मासिकाद्वारे प्रसिद्ध झालेल्या 'जगातील सर्वात मोठी ठिकाणे २०१' 'कोणत्या क्रमांकावर आहेत?

(A) कॅम्प अ‍ॅडव्हेंचर (रोनेडे, डेन्मार्क)
(B) मोरी बिल्डिंग डिजिटल आर्ट म्युझियम (टोकियो, जपान)
(C) जियोसी जियोथर्मल सी बाथ्स (हुसविक, आइसलँड)✅✅✅
(D) डिस्नेलँडमधले स्टार वॉर्स: गॅलेक्सीज एज (अॅनाहिम, कॅलिफोर्निया)

📌रशियाच्या कझान शहरात ‘वर्ल्ड स्किल्स 2019’ या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले?

(A) प्रणव उदयराक नुतलापती
(B) श्वेता रतनपुरा
(C) संजय प्रामणिक
(D) अश्वथा नारायण सनागवारापू✅✅✅

📌भारतात ‘राष्ट्रीय पोषण माह’ म्हणून कोणत्या महिना साजरा करण्याची घोषणा केली गेली?

(A) जुलै 2019
(B) ऑगस्ट 2019
(C) सप्टेंबर 2019✅✅✅
(D) ऑक्टोबर 2019

📌फिच सोल्यूशन्स या संस्थेच्या अहवालानुसार, कोणता देश 2025 सालापर्यंत कोकिंग-पद्धतीचा कोळसा आयात करणारा सर्वात मोठा आयातदार देश बनणार?

(A) फ्रान्स
(B) जापान
(C) भारत✅✅✅
(D) चीन

📌इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने "बिल्ड फॉर डिजिटल इंडिया" उपक्रम राबविण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञान कंपनीबरोबर भागीदारी केली आहे?

(A) गुगल✅✅✅
(B) मायक्रोसॉफ्ट
(C) अॅमेझॉन
(D) फेसबुक

📌कोणता संघ 15 वर्षाखालील SAFF चषक 2019 फूटबॉल स्पर्धेचा विजेता आहे?

(A) म्यानमार
(B) पाकिस्तान
(C) भारत✅✅✅
(D) नेपाळ

📌1 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या फेरबदलात राष्ट्रपतींनी राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या राज्यांसाठी नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यासंदर्भात चुकीची ‘राज्य-राज्यपाल’ जोडी शोधा.

(A) राजस्थान - कलराज मिश्रा
(B) महाराष्ट्र – भगत सिंग कोश्यारी
(C) हिमाचल प्रदेश - बंडारू दत्तात्रेय
(D) केरळ - तमिलीसाई सौंदराराजन✅✅

📌कोणत्या भारतीय नेमबाजाने ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत महिला गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?

(A) यशस्वीनी देसवाल✅✅✅
(B) ईशा सिंग
(C) करनी सिंग
(D) निशिता चौकी

📌अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार ऑगस्ट 2019 या महिन्यामध्ये वस्तू व सेवा कराचे (GST) किती संकलन झाले?

(A) रु. 1.02 लक्ष कोटी
(B) रु. 17,733 कोटी
(C) रु. 98,202 कोटी✅✅✅
(D) रु. 48,958 कोटी

रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

◾️अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय ? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो ? जाणून घेऊयात सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या या अलर्ट्स बद्दल.

🔷 ग्रीन अलर्ट 🔷

◾️कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे.

🔶 यलो अलर्ट 🔶

◾️पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

🔷 ऑरेंज अलर्ट 🔷

◾️कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

🔶 रेड अलर्ट 🔶

◾️नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येते. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 03 सप्टेंबर 2019


✳ 3 सप्टेंबर रोजी बेंगळुरू येथे  असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (ए-डब्ल्यूईबी) ची  4 थी महासभा

✳ यूएनसीसीडी चे 14 व्या पक्षांचे कॉन्फरन्स (सीओपी) नवी दिल्ली येथे होणार आहेत

✳ पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत अभियानासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन कडून पुरस्कार मिळवतील

✳ भारत 2019-21 मुदतीसाठी ए-डब्ल्यूईबी ची अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारेल

✳ आयएएएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपची सुरुवात जर्मनीतील बर्लिनमध्ये होते

✳ आईएएएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 1500 मी मध्ये जिन्सन जॉन्सन स्लीव्हर जिंकला

✳ लसिथ मलिंगाने शाहिद आफ्रिदीला टी -20 मध्ये सर्वाधिक विकेट-टेकर म्हणून मागे टाकले

✳ 8 अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्स आयएएफमध्ये सामील झाले

✳ आयएएफ चीफ बी एस धानोआ, अभिनंदन फ्लाय मिग -21 एकत्र

✳ विक्रम लँडरने यशस्वीरित्या चंद्रयान 2 पासून विभक्त केले

✳ ऑगस्टमध्ये 15 महिन्यांच्या नीचांकीत भारत मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथः पीएमआय

✳ मालदीवमध्ये चौथे दक्षिण आशियाई स्पीकर्स समिट

✳ सीजे गीता मित्तल यांना न्यायमूर्ती पी एन भगवती पुरस्कार

✳ कल्याण सिंग 52 वर्षांच्या कालावधीत पूर्ण झालेला राजस्थानचा पहिला राज्यपाल

✳ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आसामला भेट देतील

✳ 5.65 कोटी कर भरणा-यांनी कर भरणा-या कर आकारणीच्या सन 2019-20

✳ इशांत शर्मा कसोटी क्रिकेटमधील आशिया बाहेरील सर्वात यशस्वी भारतीय पेसर बनला

✳ वर्ल्ड मार्शल आर्ट मास्टर्स जू जित्सू चॅम्पियनशिप कोरियामध्ये सुरू

✳ वर्ल्ड मार्शल आर्ट मास्टर्स जू जित्सू चॅम्पियनशिपमध्ये अनुपमा स्वाइन ब्राँझ जिंकली

✳ यूएस ओपन: नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडररने प्री-क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला

✳ आर पंत कसोटी क्रिकेटमधील 50 डिसमिसल्समध्ये वेगवान भारतीय कीपर आहे

✳ भारतीय पंच नितीन मेनन नोव्हेंबरमध्ये कसोटी पदार्पण करणार आहेत

✳ सेरेना विल्यम्सने यूएस ओपन क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला

✳ पाकिस्तान क्रिकेट मंडळाने देशांतर्गत क्रिकेटला 1 अब्ज रुपयांचा पंप दिला

✳ हिमा दास वर्ल्ड सीच्या शिशिपमधील वैयक्तिक कार्यक्रमातून बाहेर पडणे

✳ तीनसुकिया हे 4000 वा वायफाय-सक्षम रेल्वे स्टेशन बनले

✳ चार्ल्स लेकलर बेल्जियम ग्रँड प्रिक्स 2019 जिंकला

✳ यूपीआय व्यवहार ऑगस्टमध्ये 918.35 दशलक्ष विक्रमी टच करतात

✳ केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह जपानमध्ये दाखल झाले

✳ हुबली टायगर्सने कर्नाटक प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले

✳ मोहम्मद शमी तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज 150 कसोटी विकेट

✳ चिनी परराष्ट्रमंत्री वांग यो यांनी उत्तर कोरियाला भेट दिली

✳ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी पूर्व सैन्य कमांडर म्हणून कार्यभार स्वीकारला.

भारतातला सर्वाधिक लांबीचा विद्युतीकृत रेल बोगदा आंध्रप्रदेश राज्यात

1 सप्टेंबर 2019 रोजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आंध्रप्रदेश राज्यात देशातल्या सर्वाधिक लांबी असलेल्या विद्युतीकृत रेल बोगद्याचे उद्घाटन केले.

आंध्रप्रदेश राज्याच्या चेरलोपल्ली आणि रापुरू या स्थानकांच्यादरम्यान तयार करण्यात आलेला हा 6.6 किलोमीटर लांबीचा बोगदा ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम रेलमार्गाचा एक भाग आहे. हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरुन 'घोड्याची नाल'च्या आकारात बनविला गेला आहे. बोगद्याची उंची 6.5 मीटर एवढी आहे.

नव्याने बांधण्यात आलेला हा बोगदा कृष्णापट्टनम बंदर आणि दुर्गम भागांच्या दरम्यान मालवाहतूक करण्यासाठी अखंड रेल जोडणी प्रदान करणार आहे.

ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम दरम्यानच्या 112 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकृत रेल्वेमार्गामुळे प्रवासाची वेळ 5 तासांनी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या, गाडीला कृष्णापट्टनम बंदर ते ओबुलावरीपल्ली पर्यंत जाण्यासाठी 10 तास लागतात

०३ सप्टेंबर २०१९

मराठी व्याकरण प्रश्नमालिका 3/9/2019

1. या ठिकाणी माझे काय काम?
उद्गारवाचक 
नकरार्थी
प्रश्नार्थक
होकारार्थी

* उत्तर - प्रश्नार्थक

2. ‘पाणउतारा करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा .
पाणी उतारावर वाहणे
पायऱ्या उतरणे
पाय उतार होणे
अपमान करणे

* उत्तर - अपमान करणे

3. अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा दाढी धरणे
पकडून ठेवणे
कचाट्यात पकडण
आळवणी करणे
शरण आणणे

* उत्तर - आळवणी करणे

4. केशवकुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे?
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
कृष्णाजी केशव दामले
राम गणेश गडकरी
प्रल्हाद केशव अत्रे

* उत्तर -प्रल्हाद केशव अत्रे

5. ..... जळले तरी पीळ जात नाही.
दोरखंड
चऱ्हाट
घर
सुंभ

* उत्तर - सुंभ

6. मी घरीच शिकलो
अकर्मक कर्तरी
सकर्मक कर्तरी
सकर्मक भावे
अकर्मक भावे

* उत्तर - अकर्मक कर्तरी

7. मी पुस्तके वाचली
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही

* उत्तर -  कर्मणी प्रयोग

8. 'हात दाखविणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
कर्तबगारी दाखविणे
फसविणे
प्रकृती दाखविणे
हात दाखऊन भविष्य पाहणे

* उत्तर -  फसविणे

9. रात्र संपता संपत नाही
साधा वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमानकाळ
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ

* उत्तर -  अपूर्ण वर्तमानकाळ

10. कपिलाषष्टीचा योग - या शब्दाचा अर्थ कोणता?
ऋणानुबंध
दुर्मिळ योग
योगायोगाने होणारी भेट
कपिल मुनींचा जन्मदिवस

* उत्तर - दुर्मिळ योग
----------------------------------------------------------

सुवर्ण'सिंधू : जागतिक स्पर्धेत जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदकविजेते भारतीय
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1983 - प्रकाश पादुकोण
( पुरुष एकेरी) - कांस्यपदक

2011 - ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा
( महिला दुहेरी) - कांस्यपदक

2013 - पी. व्ही. सिंधू
( महिला एकेरी) - कांस्यपदक

2014 - पी. व्ही. सिंधू
( महिला एकेरी) - कांस्यपदक

2015 - सायना नेहवाल
( महिला एकेरी) - रौप्यपदक

2017 - पी. व्ही. सिंधू
( महिला एकेरी) - रौप्यपदक

2017- सायना नेहवाल
( महिला एकेरी) - कांस्यपदक

2018 - पी. व्ही. सिंधू
( महिला एकेरी) - रौप्यपदक

2019 - बी साई प्रणित
( पुरुष एकेरी) - कांस्यपदक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

एका ओळीत सारांश, 3 सप्टेंबर 2019

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉ऑगस्ट 2019 या महिन्यातले वस्तू व सेवा कर (GST) संकलन - 98,202 कोटी रुपये.

👉2 सप्टेंबर रोजी या बँकेनी MSME उद्योगांच्या ग्राहकांना सहकारी तत्वावर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ECL फायनान्स या कंपनीबरोबर करार केला - सेंट्रल बँक ऑफ इंडिया.

👉2 सप्टेंबर रोजी फिच सोल्युशन्स या संस्थेद्वारे आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारतासाठी अंदाज बांधलेला GDP वृद्धीदर - 6.4 टक्के.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉या ठिकाणी 750 मेगावॅट क्षमतेचा गॅस-आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी बांग्लादेशाच्या सरकारने रिलायन्स पॉवर ऑफ इंडिया या कंपनीशी करार केला - ढाकाजवळील मेघनाहट येथे

👉आग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक समितीच्या 72 व्या सत्राचे या ठिकाणी 2 सप्टेंबर रोजी उद्घाटन झाले - नवी दिल्ली, भारत.

👉आग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक समितीच्या 72 व्या सत्राच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवडले गेलेले व्यक्ती – डॉ. हर्ष वर्धन.

👉फिच सोल्यूशन्स या संस्थेच्या अहवालानुसार, 2025 सालापर्यंत कोकिंग-पद्धतीचा कोळसा आयात करणारा सर्वात मोठा आयातदार देश – भारत (चीनला मागे टाकणार).

👉3 सप्टेंबर 2019 रोजी होणार्‍या ‘असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज’ (A-WEB) याच्या 4व्या आमसभेचा आयोजनकर्ता - भारतीय निवडणूक आयोग (बेंगळुरू येथे)

👉सन 2019-21 या कालावधीसाठी ‘असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज’ (A-WEB) याचा अध्यक्ष – भारत.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉स्वच्छ भारत अभियानासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉शिकागो येथे झालेल्या पहिल्या ऑल इलाइट रेसलिंग (AEW) विश्व विजेतेपद या स्पर्धेचा विजेता - अमेरिकेचा कुस्तीपटू ख्रिस जेरीको.

👉15 वर्षाखालील SAFF चषक 2019 फूटबॉल स्पर्धेचा विजेता संघ - भारत.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉1 सप्टेंबरपासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिकवरील बंदी घालणारा राज्य - उत्तरप्रदेश.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) याचे स्थापना वर्ष – सन 1997.

👉असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (A-WEB) – स्थापना वर्ष: सन 2013 (14 ऑक्टोबर); सचिवालय: सॉन्ग-डो, दक्षिण कोरिया.

👉भारतीय निवडणूक आयोग – स्थापना वर्ष: सन 1950 (25 जानेवारी); सचिवालय: नवी दिल्ली.

👉जागतिक आरोग्य संघटना (WHO) – स्थापना वर्ष: सन 1948 (7 एप्रिल); मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड.

👉बांग्लादेश - राजधानी: ढाका; राष्ट्रीय चलन: बांग्लादेशी टाका.

मोदींना मिळालेले पुरस्कार

◾️पुरस्कार : किंग हमाद ऑर्डर ऑफ रीनेसंस
पुरस्काराचे वैशिष्ट्य : बहरीनमधील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार

◾️पुरस्कार : ऑर्डर ऑफ द डिस्टिंगाइश्ड रूल ऑफ इज्जुद्दीन 
पुरस्काराचे वैशिष्ट्य : परदेशी पाहुण्यांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार

◾️पुरस्कार : ऑर्डर ऑफ सेंट ऐंड्रू
पुरस्काराचे वैशिष्ट्य : रशियातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार

◾️पुरस्कार : ऑर्डर ऑफ जायेद
पुरस्काराचे वैशिष्ट्य : संयुक्त अरब अमीरातमधील सर्वोच्च नागरि पुरस्कार

◾️पुरस्कार : ग्रैंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन
पुरस्काराचे वैशिष्ट्य : ईस्त्राईलतर्फे इतर देशांच्या प्रमुखांना देण्यात येणारा सर्वोच्च नागरि पुरस्कार

◾️पुरस्कार : स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान
पुरस्काराचे वैशिष्ट्य : अफगाणिस्तानकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरि पुरस्कार

◾️पुरस्कार : ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सऊद
पुरस्काराचे वैशिष्ट्य : मुस्लिम नसलेल्या व्यक्तीला सौदी अरेबियाकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरि पुरस्कार

◾मोदींना अमेरिका दौऱ्यावेळी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे पुरस्कार

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.

   1) गाय गुराख्याकडून बांधली जाते      2) त्त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
   3) शिक्षक मुलांना शिकवितात      4) शिक्षकांनी मुलांना शिकवावे

उत्तर :- 1

2) खालीलपैकी ‘गुळांबा’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) कर्मधारय      2) तत्पुरुष   
   3) मध्यमपदलोपी    4) बहुव्रीही

उत्तर :- 3

3) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – अबब ! केवढी मोठी ही भिंत.

   1) -      2) ?     
   3) !      4) ”

उत्तर :- 3

4) उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा .................. हा अलंकार होतो.

   1) श्लेष      2) आपन्हुती   
   3) यमक      4) दृष्टांत

उत्तर :- 2

5) ‘तद्भव’ शब्द निवडा.

   1) ओठ    2) आठव   
   3) आयुष्य    4) आठशे

उत्तर :- 1

6) खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा.

     ‘माझा आनंद व्दिगुणीत झाला.’
   1) पृथकत्ववाचक संख्याविशेषण    2) अनिश्चित संख्याविशेषण
   3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण    4) सार्वजनिक विशेषण

उत्तर :- 3

7) ‘येते’ या क्रियापदाला मूळ शब्द .................... हा आहे.

   1) ते      2) येते      3) ये      4) येणे

उत्तर :- 3

8) दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
     जेवताना सावकाश जेवावे.

   1) स्थिती दर्शक    2) गतिदर्शक   
   3) रितीवाचक    4) निश्चयार्थक

उत्तर :- 3

9) ‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

   1) विरोधवाचक    2) विनिमयवाचक   
   3) कैवल्यवाचक    4) तुलनावाचक

उत्तर  :- 2

10) ‘लांबचा प्रवास बसने करावा की कारने’ या वाक्यातील ‘की’ हे अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

स्मार्ट सिटीत नागपूर दुसऱ्या स्थानी

दर शुक्रवारी होणाऱ्या कामकाज तपासणी व गुणांकनात नागपूरचे दुसरे स्थान कायम आहे. अहमदाबाद ३७१.१७ गुण घेऊन पहिल्या, तर नागपूर ३६८.५५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोन शहरांमध्ये गेल्या वर्षभरापासून सर्वोत्कृष्टची स्पर्धा सुरू आहे.

यापूर्वी नागपूर शहर वर्षभर पहिल्या क्रमांकावर होते. उत्तरप्रदेशातील कानपूर हे शहर यापूर्वी १३ व्या क्रमांकावर होते. आता या शहराने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. याचाच अर्थ या शहरानेही स्मार्ट सिटीच्या कामात नव्या कल्पनांचा समावेश केला आहे. नागपूर शहराचा स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामात बराच वेग आहे.

भरतवाडा, पुनापूर व पारडी या भागात स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले आहे. अनेक कामांच्या निविदा प्रक्रिया निघाल्या आहेत. शहरात स्मार्ट अॅण्ड सेफ सिटीचा प्रयोगही बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहे. पोलिसांनाही या प्रकल्पात मोठे सहकार्य मिळत आहे. ठिकठिकाणी स्मार्ट सिटी म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा लाभ मोठ्या संख्येत नागपूरकर करीत आहे. एवढेच नव्हे तर गेल्या काही दिवसात स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील अनेक उद्यानांमध्ये नागरिकांसाठी ग्रीन जीम व इतर अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या संकल्पना राबविण्यात उपराजधानी देशात अव्वल ठरत आहे.

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागातील पथक दर शुक्रवारी देशभरातील स्मार्ट सिटी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत गुणांकन देत असते. त्यानुसार, नागपूर शहराचा क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. अहमदाबाद व नागपूर अशीच स्पर्धा देशपातळीवर सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकावरील रांचीला ३१३.३७ आणि चौथ्या स्थानावरील भोपाळ शराला ३१२.४५ गुण आहे.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...