०३ सप्टेंबर २०१९

महत्त्वाचे आयोग

● विमल जालन:-
रिझर्व्ह बँकेने सर्व खर्च, तरतुदी व सर्व देणी दिल्यानंतर उरणाऱ्या या निधीवर केंद्र सरकारचा हक्क असतो. या पार्श्वभूमीवर आर्थिक भांडवल आराखड्याचा आढावा घेऊन यातील नेमका किती निधी सरकारच्या तिजोरीत वर्ग करता येईल, हे निश्चित करण्यासाठी केंद्र सरकाने विमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
( राखीव निधीबाबत निर्णय घेण्यासाठी यापूर्वी व्ही. सुब्रमण्यम (१९९७),उषा थोरात (२००४) आणि वाय. एच. मालेगाम (२०१३) अशा तीन समित्या नेमण्यात आल्या होत्या. तातडीचा निधी म्हणून रिझर्व्ह बँकेच्या एकूण मालमत्तेच्या १८ टक्के निधी राखीव ठेवावा,अशी शिफारस थोरात समितीने केली होती. तर, हा निधी १२ टक्के असावा असे सुब्रमण्यम समितीने सुचविले होते.)

● व्ही. जी. कन्नन समिती :-
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांच्या एटीएम व्यवहाराकरिता लागू असलेल्या शुल्काचा आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने इंडियन बँक्स असोसिएशन या देशाच्या बँकिंग जगताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. जी. कन्नन यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समितीची स्थापन केली.

● न्या. रोहिणी:-
इतर मागास जाती/समुदायांमध्ये लाभांचे समान वितरण होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन संविधानाच्या 340 कलमाअंतर्गत, न्या. रोहिणी आयोग केंद्र सरकाने नेमला हा आयोग केंद्रीय सुचीमधल्या इतर मागास वर्गातल्या उप वर्गीकरणाच्या मुद्याची समीक्षा करणार आहे.

● नंदन निलेकणी :-
देशातील डिजिटल पेमेंटची सद्यस्थिती जाणून या पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीवर नेमणूक केली आहे. तसेच डिजिटल पेमेंट पद्धती अधिक बळकट व सुरक्षित करण्यासाठी आणखी काय करण्याची आवश्यकता आहे, याचा ही समिती आढावा घेईल. निलेकणी यांच्याशिवाय आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान, किशोर सन्सी, अरुणा शर्मा, संजय जैन यांचा समावेश आहे.

● डॉ. तात्याराव लहाने:-
रॅगिंग प्रतिबंधक कायद्यात रॅगिंगला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक तरतुदी करण्यासाठी वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली

● श्याम तागडे :-
अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम , १९८९ मधील कलम १५ अन्वये अत्याचार झालेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी. प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्य समिती गठित करण्यात आली.

● डॉ. शीतल आमटे – करजगी अभ्यासगट :-
मियावाकी या जपानी वनस्पती शास्त्रज्ञाने कमी जागेमध्ये घनवन (Dense Forest) संकल्पना विकसित केली असून जागतिक स्तरावर हा प्रकल्प रूजत आहे. महाराष्ट्रातील सध्याचे २० टक्क्यांचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी वन विभागाने लोकसहभागातून ५० कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत मियावाकी घनवन प्रकल्पाची आनंदवन प्रकल्प म्हणून अंमलबजावणी करण्यासंदर्भात वन विभागास शिफारसी करण्यासाठी डॉ. शीतल आमटे – करजगी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

● बाबा कल्याणी:-
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाने भारतातील सेझ धोरणाचा अभ्यास करण्याकरीता भारत फोर्ज लिमिटेडचे’ प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली सेझ संबंधितांचा गट स्थापन केला

● सुशील मोदी :-
वस्तू व सेवा कर लागू केल्यानंतर सोसाव्या लागलेल्या महसूल तुटीवर उपाययोजना करून कर संकलन वाढविण्याचे प्रयत्न करण्यासाठी जीएसटी परिषदेने सुशील मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली ७ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली

● दीपाली मोकाशी:-
प्रज्वला योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य महिला आयोगाने दीपाली मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.आयोग महिला संरक्षणाबरोबर “प्रज्वला योजने”च्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात देखील उतरत आहे.

● विवेक पंडीत:-
आदिवासीसाठी कल्याणकारी योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आमदार विवेक पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यीय समितीची स्थापना केली.

सुरक्षित शहर निर्देशांक 2019

●निर्देशांक जारी करणारी संस्था - The Economist Intelligence Unit

●5 खंडातील एकूण 60 देशांच्या शहरांचा अभ्यास

●जगातील सर्वात सुरक्षित शहर - टोकियो (निर्देशांकात प्रथम स्थानी)

●द्वितीय स्थान - सिंगापूर

●तृतीय स्थान - ओसाका

🏅 भारतातील मुंबई 45 व्या स्थानी
🏅दिल्ली - 52 व्या स्थानी

●4 निकषांच्या आधारे निर्देशांक काढला जातो.
1. डिजिटल सुरक्षा
2. पायाभूत संरचनांची सुरक्षितता
3. आरोग्य सुरक्षितता
4. व्यक्तिगत संरक्षण

मनोज नरवणे यांनी स्वीकारली लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे.



✔️लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.

✔️ विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर वरिष्ठ कमांडंट या नात्याने पदाच्या शर्यतीत नरवणे आघाडीवर असणार आहेत.

✔️तसेच लेफ्टनंट जनरल डी.अंबू शनिवारी लष्कर उपप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

✔️तर लष्कराच्या पूर्वेकडील कमांडचे प्रमुख म्हणून मनोज नरवणे चार हजार किलोमीटरच्या भारत-चीन सीमेवर तैनात होते.

✔️ 37 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कमांडचे नेतृत्व केले आहे. जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील दहशतवादी कारवायांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आहे.

०२ सप्टेंबर २०१९

दत्तक वारसा नामंजूर तत्वानुसार महाराष्ट्रातील खालसा संस्थाने

1. सातारा (1848 साली - देशातील खालसा झालेले प्रथम संस्थान)

2. नागपूर (1854 साली खालसा - भोसले संस्थान)
3. कोल्हापूर

4. सावंतवाडी

5. इचलकरंजी

6. गगनबावडा (महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस दिन - जवळपास 129 दिवस याच ठिकाणी)

7. कापशी

8. कागल

9. विशाळगड

लसिथ मलिंगाने रचला इतिहास

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातला पहिला गोलंदाज ठरला. मलिंगाने (36 वर्षीय) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना हा इतिहास रचला. यासह मलिंगाने सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पाकिस्तानचा गोलंदाज शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला

टॉप 3 गोलंदाज

लसिथ मलिंगा : 74 सामने I 99 विकेट्स, शाहिद आफ्रिदीने : 99 सामने I 98 विकेट्स, शाकिब अल हसन : 72 सामने 88 विकेट्स

आर.अश्विन टॉपवर : भारतीय संघातर्फे टी-20 त सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आर.अश्विनच्या नावावर असून त्याने 46 सामन्यात 52 गडी टिपले आहेत

प्राचीन भारताचा इतिहास :

▪️सिंधू संस्कृती

1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

2) सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

3) १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

4) नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

5) १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

6) रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.

7) प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

8) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.

9) सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.

10) सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.

11) भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.

12) अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.

13) सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.

14) हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.

15) सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.

16) हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.

17) राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.

18) माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.
-----------------------------------------------------------

मुख्यमंत्र्यांची यादी

🔴 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

▪️यशवंतराव चव्हाण
(मे १, १९६० - नोव्हेंबर १९, १९६२)

▪️मारोतराव कन्नमवार
(नोव्हेंबर २०,१९६२ - नोव्हेंबर २४, १९६३)

▪️वसंतराव नाईक
(डिसेंबर ५, १९६३ - फेब्रुवारी २०, १९७५)

▪️शंकरराव चव्हाण
(फेब्रुवारी २१, १९७५ - मे १७, १९७७)

▪️वसंतदादा पाटील
(मे १७, १९७७ - जुलै १८, १९७८)

▪️शरद पवार
(जुलै १८, १९७८ - फेब्रुवारी १७, १९८०)

▪️अब्दुल रहमान अंतुले
(जून ९, १९८० - जानेवारी १२, १९८२)

▪️बाबासाहेब भोसले
(जानेवारी २१, १९८२ - फेब्रुवारी १, १९८३)

▪️वसंतदादा पाटील
(फेब्रुवारी २, १९८३ - जून १,१९८५ )

▪️शिवाजीराव निलंगेकर
(जून ३, १९८५ - मार्च ६, १९८६)

▪️शंकरराव चव्हाण
(मार्च १२, १९८६ - जून २६, १९८८)

▪️शरद पवार
(जून २६, १९८८ - जून २५, १९९१)

▪️सुधाकरराव नाईक
(जून २५, १९९१ - फेब्रुवारी २२, १९९३)

▪️शरद पवार
(मार्च ६, १९९३ - मार्च १४, १९९५)

▪️मनोहर जोशी
(मार्च १४, १९९५ - जानेवारी ३१, १९९९)

▪️नारायण राणे
(फेब्रुवारी १, १९९९ - ऑक्टोबर १७, १९९९)

▪️विलासराव देशमुख
(ऑक्टोबर १८, १९९९ - जानेवारी १६, २००३)

▪️सुशील कुमार शिंदे
(जानेवारी १८, २००३ - ऑक्टोबर ३०, २००४ )

▪️विलासराव देशमुख
(नोव्हेंबर १, २००४ - डिसेंबर ५, इ.स. २००८)

▪️अशोक चव्हाण
(डिसेंबर ५, इ.स. २००८ - नोव्हेंबर ९, इ.स. २०१०)

▪️पृथ्वीराज चव्हाण
(नोव्हेंबर १०, इ.स. २०१० - सप्टेंबर १६, इ.स. २०१४)

▪️देवेंद्र फडणवीस (३१ ऑक्टोबर, इ.स. २०१४ - विद्यमान

एव्हरेस्टवर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारले.

● एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे.

● नॅशनल जियोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी तेथे एका अंतराने दोन हवामान केंद्रांची स्थापना केली आहे.

● एक केंद्र 8,430 मीटर (27,657 फूट) आणि दुसरे 7,945 मीटर (26,066 फूट) उंचीवर उभारण्यात आले आहे. तसेच, आणखी तीन केंद्र उभारले जात आहे.

● जागतिक तापमान वाढीचा हिमनद्यांवर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती गोळा करण्याचा उद्देश आहे.

● हिमालय ही आशिया खंडात पसरलेली जगातली सर्वांत उंच पर्वतरांग आहे.

●  हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. येथे ‘एव्हरेस्ट’ (उंची 8848 मीटर) हे जगातले सर्वोच्च शिखर आहे. ह्या पर्वतरांगेची लांबी 2400 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे.

● ही पर्वतरांग भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भुटान या देशांमधून जाते.

मराठी व्याकरण प्रश्नमालिका 2/9/2019


1. या ठिकाणी माझे काय काम?
उद्गारवाचक 
नकरार्थी
प्रश्नार्थक
होकारार्थी

* उत्तर - प्रश्नार्थक

2. ‘पाणउतारा करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा .
पाणी उतारावर वाहणे
पायऱ्या उतरणे
पाय उतार होणे
अपमान करणे

* उत्तर - अपमान करणे

3. अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा दाढी धरणे
पकडून ठेवणे
कचाट्यात पकडण
आळवणी करणे
शरण आणणे

* उत्तर - आळवणी करणे

4. केशवकुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे?
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
कृष्णाजी केशव दामले
राम गणेश गडकरी
प्रल्हाद केशव अत्रे

* उत्तर -प्रल्हाद केशव अत्रे

5. ..... जळले तरी पीळ जात नाही.
दोरखंड
चऱ्हाट
घर
सुंभ

* उत्तर - सुंभ

6. मी घरीच शिकलो
अकर्मक कर्तरी
सकर्मक कर्तरी
सकर्मक भावे
अकर्मक भावे

* उत्तर - अकर्मक कर्तरी

7. मी पुस्तके वाचली
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही

* उत्तर -  कर्मणी प्रयोग

8. 'हात दाखविणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
कर्तबगारी दाखविणे
फसविणे
प्रकृती दाखविणे
हात दाखऊन भविष्य पाहणे

* उत्तर -  फसविणे

9. रात्र संपता संपत नाही
साधा वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमानकाळ
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ

* उत्तर -  अपूर्ण वर्तमानकाळ

10. कपिलाषष्टीचा योग - या शब्दाचा अर्थ कोणता?
ऋणानुबंध
दुर्मिळ योग
योगायोगाने होणारी भेट
कपिल मुनींचा जन्मदिवस

* उत्तर - दुर्मिळ योग
----------------------------------------------------------

यूईएफए 2018-19 चॅम्पियन्स लीगचे पुरस्कार जाहीर

​​​

🅱 लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला.

🅱 गुरुवारी रात्री झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (2018-19 या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

🅱 त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.

🅱 लिव्हरपूलला 2018-19 च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता.

🅱 बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

🅱 यापूर्वी 2012 मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.

🅱 आंतरराष्ट्रीय पातळीवर नेदरलँड्स फुटबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या व्हॅन डिकला मे महिन्यात प्रीमियर फुटबॉल लीगचासुद्धा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते.

🅱 28 वर्षीय व्हॅन डिकने युव्हेंटसच्या रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा मेसी यांना मागे टाकले.

🅱 गेल्या आठ वर्षांत मेसी अथवा रोनाल्डो यांच्यापैकीच एकाने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. याव्यतिरिक्त, मेसीने सर्वोत्तम आक्रमक, तर लिव्हरपूलच्याच अ‍ॅलिसन बेकरने सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळवला.

❇️ पुरस्कार विजेते :

▪️सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू : व्हॅन डिक

▪️गोलरक्षक :अ‍ॅलिसन बेकर

▪️मध्यरक्षक : फ्रँक डी जाँग

▪️आक्रमणपटू : लिओनेल मेसी

▪️बचावपटू : व्हॅन डिक

राष्ट्रीय पोषण आठवडा


- 1 ते 7 सप्टेंबर
- 1982 पासून केंद्र सरकारकडून साजरा केला जातो.
- लोकांच्या आरोग्यसंबंधी आणि सुदृढपणासाठी जागृकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
----------------------------------------------
● उद्देश

- आहार आणि पोषणाची वारंवरता यांचा आढावा घेणे
- राष्ट्रीय पोषण कार्यक्रमासंबंधी संशोधन आणि मजबुतीवर लक्ष्य ठेवणे
- लोकांच्या आहार आणि पोषणासंबंधीच्या स्थितीचे निरीक्षण करणे
- पोषणविषयक समस्यांचे निर्मूलन करणे
- आरोग्य आणि पोषणविषयक शिक्षण देवून जागृकता निर्माण करणे

मराठी प्रश्नसंच 2/9/2019

1) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?
   1) अपसरण चिन्ह    2) स्वल्पविराम    3) अपूर्ण विराम    4) संयोग चिन्ह
उत्तर :- 4

2) पुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा.
     भाषेच्या अलंकाराचे ................ हे दोन मुख्य प्रकार आहेत.
   1) यमक – अनुप्रास    2) अनन्वय – दृष्टान्त  3) अन्योक्ती – स्वभावोक्ती  4) शब्दालंकार आणि अर्थालंकार
उत्तर :- 4

3) ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे  ?
   1) अभ्यस्त      2) सामासिक    3) प्रत्ययसाधित    4) यापैकी कोणताही नाही
उत्तर :- 1

4) ‘माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला’
      वरील विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?
   1) अभिधा      2) लक्षणा    3) व्यंजना    4) धववाणी
उत्तर :- 3

5) ‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
   1) जलद      2) कसर      3) पथ      4) वीज
उत्तर :- 4

1) ‘इ, ई’ – या स्वरांची उच्चारस्थाने लिहा.
   1) तालव्य    2) मूर्धव्य      3) दन्त्य      4) ओष्ठय

उत्तर :- 1

2) ‘मनोरथ’ या शब्दाचा विग्रह –

   1) मन + रथ    2) मनो + रथ    3) मन + ओरथ    4) मन: + रथ

उत्तर :- 4

3) ज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून येतो किंवा बदल करता येते त्या शब्दांना ........... असे म्हणतात.

   1) विकारी    2) अविकारी    3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 1

4) पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा.

   1) वकिली    2) गुलाम      3) गायक      4) लबाड

उत्तर :- 1

5) ‘मी स्वत: त्याला पाहिले,’ या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) अनिश्चित    2) संबंधी      3) दर्शक      4) आत्मवाचक

उत्तर :- 4

डिजी ठाणेला स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार

🔰इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित "डिजी ठाणे' या भारतातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाला "स्कॉच राष्ट्रीय सुवर्ण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

🔰इस्राईलची राजधानी तेल अविवमध्ये हा प्रकल्प पाहिल्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले.

🔰"स्कॉच' या संस्थेकडून दरवर्षी पर्यावरण, स्मार्ट सिटी व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचे मूल्यमापन करून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला जातो.

🔰"डिजी ठाणे' या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवक यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.

🔰डिजी प्रकल्प उभारणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे.

लिव्हरपूलचा व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी

लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला.

गुरुवारी झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (2018-19 या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.

तर लिव्हरपूलला 2018-19च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता.

बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2012मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला


◾️मनोज नरवणे हे आता लेफ्टनंट जनरल डी अंबू यांची जागा घेणार आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे हे लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीत सुद्धा दिसतील.

◾️नरवणे मराठमोळे असून ते मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले.

◾️आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली.

◾️ परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गिनीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान


● राष्ट्रीपती रामनाथ कोविंद यांना गिनी या प्रजासत्ताकचा सर्वोच्च सन्मान "नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट" देण्यात आला आहे.

● गिनी आणि भारतामधील विकास आणि संबंधांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

गिनी

● गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याला पूर्वी फ्रेंच गिनी म्हणून ओळखले जात असे.

● गिनी 2 ऑक्टोबर 1958 रोजी फ्रान्सपासून स्वतंत्र झाला

● गिनीचे क्षेत्रफळ 2,45,836 चौरस किलोमीटर आहे.

● त्याची राजधानी कोनाक्री आहे.

● गिनीची अधिकृत भाषा फ्रेंच आहे.

● गिनियाचे सध्याचे अध्यक्ष अल्फा कांडे आहेत, तर अब्राहम कसुरी फोफाना हे गिनियाचे पंतप्रधान आहेत.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...