२८ ऑगस्ट २०१९

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018:-

● 2018 या वर्षासाठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

● पुरस्कार विजेते –

● जीवनगौरव पुरस्कार - वांगचूक शेर्पा
● भू साहस – गिर्यारोहक अपर्णा कुमार, दिवंगत दिपंकर घोष, मनिकंदन के.
● जल साहस - जलतरणपटू प्रभात राजू कोळी
● हवाई साहस - रामेश्वर जांग्रा

● राष्ट्रपती भवनात 29 ऑगस्ट 2019 रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात इतर क्रिडा पुरस्कारांसह हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

●पुरस्काराबद्दल

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार दरवर्षी साहसी क्षेत्रात व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने दिला जातो.

तरुणांना धीर देण्याची, जोखीम घेण्याची, सहकार्याची आणि आव्हानात्मक परिस्थितीत तयार राहण्याची भावना उत्पन्न करण्यासाठी प्रोत्साह देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार तयार करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे भू, जल, हवाई साहस आणि जीवन गौरव पुरस्कार अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येते.

हिमालयाच्या शिखरावर पहिली चढाई 1953 साली ब्रिटिश मोहिमेतले न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी केली होती. त्यांच्या स्मृतीत हा पुरस्कार दिला जात आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘तिने भिका-याला पैसा दिला’, हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विधानपूरक      2) फक्त सकर्मक      3) व्दिकर्मक    4) उभयविध

उत्तर :- 3

2) अ) त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुध्द होते.
    ब) सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावाविरुध्द मत नोंदवले.

          या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत ?

   1) शब्दयोगी व क्रियाविशेषण    2) क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी
   3) दोन्ही शब्दयोगी      4) दोन्ही क्रियाविशेषण अव्यये

उत्तर :- 2

3) वाघ माझ्यासमोरून गेला – या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा.

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

4) ‘देह जावो अथवा राहो | पांडूरंगी दृढ भावो’
      या संतवचनात .................... या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.

   1) विकल्पबोधक    2) न्यूनत्वबोधक      3) कारणबोधक    4) उद्देशबोधक

उत्तर :- 1

5) खालील किती शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यये आहे.

     ऊं, ॲ:, अरेरे, अयाई, अगाई, हाय
   1) पाच        2) चार        3) सर्व      4) तीन

उत्तर :- 3

6) ‘कर’ या धातूपासून ‘मी करा’ या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात रुपांतर कसे होईल. बरोबर पर्याय निवडा.

   1) आम्ही करू    2) मी करीन   
   3) मी करून    4) आम्ही करावे

उत्तर :- 1

7) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – पुरणपोळी

   1) स्त्रीलिंगी    2) पुल्लिंग   
   3) नपुंसकलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

8) षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत ?

   1) ने, ए, ई, शी    2) ऊन, हून   
   3) त, ई, आ    4) चा, ची, चे

उत्तर :- 4

9) वाक्याचा प्रकार ओळखा. – ‘सर्वांनी शांत बसा.’

   1) संकेतार्थी    2) विध्यर्थी   
   3) संयुक्त    4) आज्ञार्थी

उत्तर :- 4

10) ‘एके दिवशी युध्द बंद झाल्याची बातमी येऊन धडकली,’ या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ?

   1) धडकली    2) युध्द बंद झाल्याची    
   3) बातमी     4) येऊन, एके दिवशी

उत्तर :- 4

२७ ऑगस्ट २०१९

दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव


◾️नवी दिल्ली : दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव देण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून हा निर्णय घेण्यात आला. येत्या 12 सप्टेंबरला कोटला स्टेडियमच्या नामांतरणाच्या समारंभात हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू उपस्थित राहणार आहेत.

माजी अर्थमंत्री जेटली हे 1999 ते 2012 पर्यंत दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच जेटलींच्या स्मरणार्थ कोटला स्टेडियमचं नामकरण करण्याचा निर्णय डीडीसीएनं घेतला आहे.

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं शनिवार 25 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. जेटली यांचं दिल्ली क्रिकेटसाठी केलेलं काम महत्त्वाचं आहे. त्यामुळेच राजकीय क्षेत्रासह क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच स्टेडियममधील एका स्टँडला भारतीय कर्णधार विराट कोहलीचं नाव देण्यात येण्यात येणार आहे.

जाणून घ्या, झेड प्लस सुरक्षेबद्दल 'सर्वकाही'

*🔮✍️एसपीजी अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ही देशातील सर्वात मोठी आणि क्रमांक १ ची सुरक्षा मानली जाते. ती भेदणे अतिशय कठीण असते असेही बोलले जाते. त्यानंतर, दुसरा क्रमांक झेड प्लस आणि झेड सुरक्षाचा असा आहे. तसं, आणखी दोन प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था असतात. त्या म्हणजे, एक्स (X )आणि वाय(Y) होय.*

*झेड प्लस सुरक्षा म्हणजे नेमकी काय असते..? यामध्ये किती सुरक्षा जवान असतात..?*

*देशातील सर्वात महत्वाच्या नेत्यांना, व्यक्तींना, अधिकाऱ्यांना त्यांची सुरक्षा आणखी मजबूत होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा पुरवली जाते. तसेच देशाचे पूर्व प्रधानमंत्री, देशातील महत्वाचे मंत्री, यांना साधारणपणे झेड प्लस सुरक्षा दिली जाते. या मध्ये सुरक्षेचे मजबूत कव्हर दिले जाते. हि देशातील एसपीजी नंतरची दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. झेड प्लस सुरक्षा कोणाला द्यायची हे केंद्र सरकार ठरवत असते. झेड सुरक्षेमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. ते म्हणजे, एक झेड प्लस (Z Plus) आणि दूसरी झेड (Z Security) सुरक्षा. साधारणपणे केंद्रातील मोठे मंत्री आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते.*

*(उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा आहे झेड प्लस सुरक्षा )*

*किती प्रकारची असते सुरक्षा व्यवस्था*

*भारतात साधारणतः सुरक्षा व्यवस्था चार श्रेणीत विभागली गेली आहे. ती म्हणजे, झेड प्लस (Z+), (उच्च स्तर) झेड (Z), वाय (Y) आणि एक्स (X) श्रेणी. या चार प्रकारात कोणत्या स्तराची सुरक्षा द्यायची हे सर्वतोपरी सरकार ठरवत असते. एखाद्याला एखाद्या प्रकरचा धोका असेल तर सरकार व्ही.व्ही.आय.पी सुरक्षा देऊ शकते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, अधिकारी, माजी अधिकारी , न्यायाधीश, माजी न्यायाधीश, उद्योगपती, क्रिकेटपटू, चित्रपट कलाकार, साधू – संत अथवा नागरिक यापैकी कोणालाही हि सुरक्षा पुरवली जाऊ शकते.*

*अशी असते झेड प्लस सुरक्षेची रचना*

*झेड प्लस सुरक्षा देशातील दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामध्ये एकूण ३६ सुरक्षा कर्मचारी असतात. त्यातील १० दहा जवान (National Security Guards) आणि SPG (Special Protection Group) चे कमांडो असतात. सोबतच काही पोलिसांचा समावेश असतो. या सुरक्षेमध्ये पहिल्या घेऱ्याची जबाबदारी हि एनएसजी (NSG ) ची असते. तर दुसरी एसपीजी (SPG ) कमांडोंची जबाबदारी असते. सोबतच झेड प्लस सुरक्षेमध्ये एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहन सुद्धा दिलेले असते.*

*झेड प्लस सुरक्षा या लोकांना मिळते*

*उपराष्ट्रपति, माजी प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल, मुख्यमंत्री, महत्वाचे केंद्रीय मंत्री, प्रमुख नेते, प्रसिद्ध कलाकार,खेळाडू, देशातला एखादा प्रसिद्ध व्यक्ती किंवा नागरिक.*

*अशी असते झेड सुरक्षा*

*झेड सुरक्षेमध्ये एकूण 22 सुरक्षा कर्मचारी असतात. त्यामध्ये ५ एनएसजी कमांडो असतात. तसेच आयटीबीपी (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस) आणि सीआरपीएफ च्या अधिकाऱ्यांचा सुरक्षेमध्ये समावेश असतो. या सुरक्षेमध्ये एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनेही पुरविली जातात. तसेच दिल्ली पोलिस किंवा स्थानिक पोलिसांचे सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश असतो.*

*वाय सुरक्षेची रचना*

*हा सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. ज्या लोकांना थोडा कमी धोका असतो. त्या लोकांना हि सुरक्षा दिली जाते. यामध्ये सर्व मिळून ११ सुरक्षा कर्मचारी असतात. ज्यामध्ये दोन कमांडोंचा समावेश असतो.*

*एक्स श्रेणी ची सुरक्षा*

*या सुरक्षा व्यवस्थेमध्ये २ सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये १ पीएसओ (व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी) असतो. देशातील खूप लोकांना हि सुरक्षा दिली गेली आहे. या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एकाही कमांडोचा समावेश नसतो.*

*या ४ ठिकाणाहून निवडले जातात या सुरक्षा व्यवस्थेतील जवान*

*१. एसपीजी (Special Protection Group)*
*२. एनएसजी (National Security Guard)*
*३. आईटीपीबी (Indo- Tibetan Border Police)*
*४. सीआरपीएफ* *(Central Reserve Police Force)*

G7 Summit 2019

- 45 वी परीषद फ्रान्समधील बिआरेत्झ या शहरात 24 ते 26 ऑगस्ट 2019 या कालावधीत पार पडली.
- 44 वी परीषद ला मालबाई, क्युबेक कॅनडा येथे पार पडली होती.
- भारत G7 चा सदस्य नसला तरी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यक्तिगतरित्या या परीषदेसाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिषदेला पर्यावरण, हवामान बदल, महासागर आणि डिजिटल बदल यांसंदर्भात संबोधित केले.
- जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द, राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करणे या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्या संदर्भात प्रमुख जागतिक सत्तांच्या नेत्यांशी चर्चा करून या प्रश्नांसंदर्भात त्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न होता.
---------------------------------------------------------
● G7 [Group of Seven Countries]

- स्थापना: 1975, प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली.
- 1976 साली कॅनडा सामील झाला त्यामुळे समूहाचे नाव ‘जी-7’ असे झाले.
- सन 1997 ते सन 2014 या काळात, या गटात रशियाचा समावेश होता आणि त्यामुळे हा ‘ग्रुप ऑफ एट’ म्हणून ओळखला जात होता. 2014 मध्ये या गटाची पुनर्रचना झाली, म्हणून हे स्थापना वर्ष मानले जाते.
- IMF च्या मते हे सात देश म्हणजे जगातील बलाढ्य अर्थव्यवस्था आहेत.
- जगाच्या अर्थव्यवस्थांपैकी 58% संपत्ती या सात राष्ट्रांकडे आहे.
- जागतिक GDP च्या 46% पेक्षा जास्त GDP या सात देशांचा आहे.

US ओपन: सुमित हरला; पण फेडररला भिडला.

✍ भारताच्या सुमित नागलला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत पुरुष एकेरीत महान खेळाडू रॉजर फेडररसमोर पराभव पत्करावा लागला.

✍ पण पहिलाच सेट मात्र सुमितने ६-४ असा जिंकला. कडवी झुंज देत ६-४, १-६, २-६, ४-६ ने नागल हरला.

✍ सुमितबरोबरच भारताचा प्रज्ञेशही अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत खेळतो आहे. भारताचे दोन खेळाडू एका ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीत खेळण्याची ही भारताची
१९९८नंतरची पहिलीच वेळ आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळायला मिळणे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते.

✍ पात्रता फेरी जिंकून सुमितने यूएस ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेशाचे स्वप्न पूर्ण केले.

✍ २० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या दिग्गज फेडररसमोर टिकाव लागणे ही सोपी गोष्ट नसतानाही सुमीतने या सामन्यात अखेरपर्यंत चिवट झुंज दिली.

✍ २२ वर्षीय सुमित हा मुळचा हरयाणाचा आहे.

◾️रिझव्‍‌र्ह बँकेकडून सरकारला अखेर १.७६ लाख कोटी


रिझव्‍‌र्ह बँकेच्या गंगाजळीतील वरकड रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय अखेर सोमवारी घेण्यात आला. याबाबत जालान समितीने केलेल्या शिफारसीनुसार १.७६ लाख कोटी रुपये हे लाभांश आणि वरकडपोटी सरकारला मिळणार आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २०१८-१९ मधील वरकड १,२३,४१४ कोटी रुपये आणि सुधारित आर्थिक भांडवली आराखडय़ानुरूप ५२,६३७ कोटी रुपये केंद्र सरकारला देण्याची शिफारस मंजूर करण्यात आली. ही शिफारस करणाऱ्या जालान समितीला यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

वित्तीय तुटीच्या रूपातील सरकारच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे असलेली वरकड रक्कम मिळण्याबाबत केंद्र सरकार आग्रही होते. यातून उभयतांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना मुदतीपूर्वीच राजीनामा देणे भाग पडले होते. तथापि, रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनेही अखेर अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याची शिफारस केली आहे. या सहा सदस्यीय  समितीच्या शिफारशीवर रिझव्‍‌र्ह बँकेने अखेर सोमवारी शिक्कामोर्तब केले.हस्तांतरित करण्यात येणारी एकूण १,७६,०५१ कोटी रुपये वरकड रक्कम सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात १.२५ टक्के इतकी आहे. अर्थव्यवस्था मंदावली असताना कर महसुली उत्पन्न अपेक्षेप्रमाणे येईल, याबाबत साशंकता असताना आणि वित्तीय तुटीचा ताण सोसणाऱ्या तिजोरीसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. सरकारने चालू वित्तीय वर्षांसाठी वित्तीय तुटीचे प्रमाण आधीच्या ३.४ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ३.३ टक्केपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य राखले आहे. वस्तू आणि सेवा कर रूपात सरकारला अपेक्षित महसूल मिळत नसल्याने तूट कमी करण्यासाठी सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे.

कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्री


 
🔰 कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापन करण्याची संधी न मिळालेल्या भाजपनं एचडी कुमारस्वामी यांचं सरकार कोसळताच राज्यात सरकार स्थापन केलं आहे.

🔰 बरं सरकार स्थापन करून नुसते थांबतील तर ते मुख्यमंत्री येडियुरप्पा कसले?

🔰आपल्या सरकारचाही कार्यकाळ अल्पावधीचा ठरू नये म्हणून येडियुरप्पा यांनी अफलातून शक्कल लढवत एक-दोन नव्हे तर तीन उपमुख्यमंत्री नेमून सरकार भोवती भक्कम तटबंदी निर्माण केली आहे.

🔰एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस आघाडीचं सरकार कोसळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं.

🔰पण कुमारस्वामी सरकारप्रमाणं आपल्याही सरकारचा कार्यकाळ अल्पावधीचा ठरू नये म्हणून त्यांनी तीन उपमुख्यमंत्री नियुक्त केले आहेत.

💢गोविंद करजोल,
💢अश्वथ नारायण आणि
💢लक्ष्मण सावदी
      यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

🔰तसेच नवनियुक्त १७ मंत्र्यांची खाती वाटप करण्यात आली आहेत. या मंत्र्यांना एक आठवड्यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती.

🔰तीन उपमुख्यमंत्र्यांपैकी गोविंद रजोल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण खातं देण्यात आलं आहे.

🔰अश्वथ नारायण यांच्याकडे उच्च शिक्षण, आयटी, औद्योगिक-विज्ञान खातं तर लक्ष्मण सावदी यांच्याकडे परिवहन खातं देण्यात आलं आहे.

🔰तर बसवराज बोम्मईंकडे गृहविभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलं आहे.

🔰या शिवाय के. एस. ईश्वरप्पा आणि आर. अशोक या दोन्ही माजी उपमुख्यमंत्र्यांकडे क्रमश: ग्रामीण विकास, पंचायती राज आणि महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

🔰विशेष म्हणजे सावदी हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सर दोराबजी टाटा

जन्म : 27 ऑगस्ट 1859
       (बॉम्बे , ब्रिटिश भारत)

मृत्यू : 3 जून 1932 (वय 72)
           (बॅड किसिंगेन , जर्मनी)

जोडीदार : मेहेरबाई भाभा
पालक : हिराबाई आणि
                   जमसेटजी टाटा
गुरुकुल : केंब्रिज युनिव्हर्सिटी
                         ऑफ बॉम्बे
व्यवसाय : उद्योजक
साठी प्रसिद्ध : संस्थापक टाटा स्टील, संस्थापक टाटा पॉवर,
संस्थापक टाटा केमिकल्स

  हे एक भारतीय व्यापारी आणि टाटा समूहाच्या इतिहासाच्या आणि विकासाची प्रमुख व्यक्ती होती . 1910 मध्ये ब्रिटीश भारतातील उद्योग क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना नाइट केले गेले .

💁‍♂ प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

डोराब हिराबाई आणि पारसी झारोस्ट्रिस्टियन जमसेटजी नुसरवानजी टाटा यांचा मोठा मुलगा होता .

1875 मध्ये इंग्लंडला जाण्यापूर्वी टाटा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील प्रोप्रायटरी हायस्कूल (आताचे मुंबई) येथे झाले. तेथे त्यांचे खासगी शिक्षण घेण्यात आले. 1877 मध्ये त्यांनी केंब्रिजच्या गॉनविले आणि कैस कॉलेजमध्ये प्रवेश केला. त्यांनी सेंट जेव्हियर्स कॉलेज, बॉम्बे येथे शिक्षण सुरू ठेवले , जिथे त्यांनी 1882मध्ये पदवी मिळविली.

पदवीनंतर, दोरबने बॉम्बे गॅझेटमध्ये दोन वर्षे पत्रकार म्हणून काम केले . 1884 मध्ये, तो त्याच्या वडिलांच्या फर्मच्या सूती व्यवसाय विभागात सामील झाला. कापूस गिरणी तेथे फायदेशीर ठरू शकते की नाही हे ठरवण्यासाठी त्याला प्रथम फ्रेंच वसाहत पोंडिचेरी येथे पाठवले गेले . त्यानंतर वडिलांनी स्थापन केलेल्या एम्प्रेस मिल्स येथे कापसाचा व्यापार जाणून घेण्यासाठी त्याला नागपूरला पाठवले गेले.

👫 विवाह

दोरबजीचे वडील जमशेतजी हे व्यवसायासाठी दक्षिण भारतातील म्हैसूर राज्यात गेले होते. तसेच पारसी आणि त्या राज्याचे पहिले भारतीय महानिरीक्षक डॉ. होर्मसजी भाभा यांना भेटले होते. भाभाच्या घरी भेट देताना त्यांनी भाभाची एकुलती मुलगी तरुण मेहेरबाई यांची भेट घेतली व त्यांना मान्यता दिली. मुंबईला परतल्यावर जमशेतजींनी दोराब यांना म्हैसूर राज्यात विशेषत: भाभा परिवाराशी बोलण्यासाठी पाठवले . दोरबने तसे केले आणि मेहेरबाईशी विधिवत लग्न केले.  जोडप्याला मुलं नव्हती.

मेहेरबाई यांचे भाऊ जहांगीर भाभा नामांकित वकील झाले. ते होमी जे भाभा या शास्त्रज्ञांचे वडील होते. टाटा समूहाने भाभा यांच्या संशोधन आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चसह भाभा यांनी स्थापन केलेल्या संशोधन संस्थांना भव्यपणे  वित्तपुरवठा केला.

🏭 व्यवसाय कारकीर्द

आधुनिक लोह व पोलाद उद्योगाविषयी वडिलांच्या कल्पनांच्या पूर्ततेमध्ये डोराबजींचा जवळून सहभाग होता, आणि उद्योगात वीज निर्माण करण्यासाठी जलविद्युत आवश्यक असण्यावर सहमती दर्शविली. 1907 मध्ये टाटा स्टीलची स्थापना  आणि 1911 मध्ये टाटा पॉवर ही सध्याच्या टाटा समूहाची प्रमुख संस्था असलेल्या संस्थेच्या स्थापनेचे श्रेय दोरब यांना जाते . लोह शेतात शोध घेण्यासाठी खनिज शास्त्रज्ञांसोबत वैयक्तिकरित्या दोरबजी आले असे म्हणतात आणि असे म्हटले जाते की त्यांच्या उपस्थितीने संशोधकांना अशा भागात लक्ष देण्यास प्रोत्साहित केले जे त्याकडे दुर्लक्ष केले गेले असते. दोरबजींच्या व्यवस्थापनाखाली ज्या उद्योगात एकेकाळी तीन कॉटन मिल आणि ताज हॉटेल बॉम्बेचा समावेश होता. भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील स्टील कंपनी, तीन इलेक्ट्रिक कंपन्या आणि भारतातील आघाडीच्या विमा कंपन्यांपैकी एकाचा समावेश आहे. 1911  मध्ये न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स को. लि. ची संस्थापक , ही भारतातील सर्वात मोठी जनरल विमा कंपनी आहे. जानेवारी 1910 मध्ये दोरबजी टाटा सर एड डोव्हब द्वारा सर दोराबजी टाटा बनले.

⛹ व्यवसाय नसलेले व्याज

दोरबजी यांना खेळाची आवड होती आणि ते भारतीय ऑलिम्पिक चळवळीतील प्रणेते होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1924 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय तुकडीला अर्थसहाय्य दिले. टाटा कुटुंब, बहुतेक बड्या उद्योजकांप्रमाणेच भारतीय राष्ट्रवादी होते पण त्यांना कॉंग्रेसवर विश्वास नव्हता कारण ते खूपच आक्रमकपणे प्रतिकूल दिसत होते. खूप समाजवादी आणि कामगार संघटनांचे खूप समर्थक होते.

⌛ मृत्यू

1931 मध्ये  मेहेरबाई टाटा यांचे रक्ताच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या काही काळानंतर, डोराबजीने रक्ताच्या आजारांकडे अभ्यास करण्यासाठी लेडी टाटा मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली.

11 मार्च 1932 रोजी मेहेरबाईच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर आणि स्वत: च्या थोड्या वेळापूर्वी, त्यांनी एक विश्वस्त फंड स्थापित केला जो शिक्षण आणि संशोधनाच्या प्रगतीसाठी, आपत्ती निवारणासाठी आणि "कोणत्याही प्रकारचे स्थान, राष्ट्रीयत्व किंवा पंथ न वापरता" वापरला जायचा. इतर परोपकारी हेतू हा विश्वास आज सर दोराबजी टाटा ट्रस्ट म्हणून ओळखला जातो . दोराबजींनी याव्यतिरिक्त अव्वल वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी संशोधन संस्था,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स , बंगलोर स्थापन करण्यात सिंहाचा वाटा आहे. आज टाटा समूहाच्या अनेक संस्था उत्कृष्टपणे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतांना भारतभर दिसत आहेत.

दोराबजी वयाच्या 73 व्या वर्षी  3 जून 1932 मध्ये  किसींगेन जर्मनीं येथे मरण पावले.  त्यांना मूलबाळ नव्हते.

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 भारताच्या औद्योगिक जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या दोराबजी टाटा यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
                

"कलवी तोलाईकाच्ची" TV :- तामिळनाडू सरकारची विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी

🔗 राज्यातल्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने, 26 ऑगस्ट 2019 रोजी तामिळनाडू राज्य सरकारने एक विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी (टीव्ही चॅनेल) सुरू केले.

🔗 "कलवी तोलाईकाच्ची" (एज्युकेशन टीव्ही) असे या वाहिनीचे नाव आहे.

🔗चेन्नई येथे राज्याचे मुख्यमंत्री के. पालानीस्वामी यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने या वाहिनीचे उद्घाटन केले गेले.

🔗या वाहिनीच्या माध्यमातून नोकरी आणि संबंधित मुद्द्यांच्या व्यतिरिक्त शालेय मुलांना उद्देशून विविध शैक्षणिक मालिका प्रस्तुत केल्या जातील. त्यामुळे विद्यार्थी आता घरून शिकू शकण्यास सक्षम होतील.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...