२२ ऑगस्ट २०१९

राज्यातील १२ मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित

◼️सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई येथे केली. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने खालील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

◼️नाटक विभागासाठी सतीश पुळेकर ,
     कंठ संगीतासाठी कमल भोंडे ,
     उपशास्त्रीय संगीतासाठी मंगलाताई जोशी ,
     मराठी चित्रपटासाठी मनोहर आचरेकर ,
     कीर्तनासाठी तारा राजाराम देशपांडे ,
     शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे ,
     नृत्यासाठी रत्नम जनार्धनम् ,
     आदिवासी गिरीजनसाठी नीलकंठ शिवराम उईके ,                             वाद्यसंगीतासाठी अप्पा वढावकर ,
     तमाशासाठी हसन शहाबुद्दीन शेख ,
     लोक कलेसाठी लताबाई सुरवसे
     कलादानसाठी सदाशिव देवराम कांबळे

यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

◼️१ लाख रुपये , मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

◼️नाटक , कंठसंगीत , उपशास्त्रीय संगीत , चित्रपट (मराठी) , कीर्तन , शाहिरी , नृत्य , आदिवासी गिरीजन , कलादान , वाद्यसंगीत , तमाशा लोककला या बारा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला सन १९७६ पासून राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कार घोषित झालेल्या सर्व मान्यवरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

चालू घडामोडी 22/08/2019

📕 *पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुटानमध्ये मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन*

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

● 4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे.

●  प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे.

● 2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.

● मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा भुटान-भारत मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. हा भुटानमधल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे.

●  हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तपुरवठा करण्यात येत आहे.

● बांधकाम खर्चाच्या 70 टक्के कर्जस्वरुपात तर 30 टक्के अनुदान अश्या स्वरुपात भारताकडून वित्तपुरवठा केला जात आहे.

● भुटान हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देश आहे.

●  थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे. भारतीय रुपया, भुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात. झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर* #Brand_Ambassador

● स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे.

●  ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.

● 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

● 2 ऑक्टोबर 2019 ऐवजी 18 एप्रिल 2018 रोजीच ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला.

● 34 जिल्हे, 351 तालुके व 27 हजार 667 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित केल्या. https://t.me/TargetMpscMh

● स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी यापूर्वी चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. ते आते आता बारा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड* #Sports

● महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

● मंगळवारी या स्पर्धेसाठी पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला.

● 14 सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

● ही स्पर्धा 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची पायरी आहे.
त्यामुळे राहुलकडून अनेकांच्या अपेक्षा लागल्या आहेत.

● संघटनेतील राजकारणाचा बळी पडल्यानं राहुलला 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही.

●  त्यानंतर त्यानं 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले आणि विरोधकांना चपराक लगावली.

● राहुलने राष्ट्रकुल स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

● आता त्यानं निवड चाचणी स्पर्धेत 61 किलो वजनी गटात बाजी मारून जागतिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली आहे.

● उपांत्य फेरीत त्यानं नवीन कुमारवर 9-4 असा मोठा विजय मिळवला होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *India Economic Summit 2019*

◆-  भारत आर्थिक शिखर परिषद २०१९
◆-  ठिकाण : नवी दिल्ली
◆-  कालावधी : ३-४ ऑक्टोबर २०१९
◆-  आयोजक : जागतिक आर्थिक मंच आणि भारतीय उद्योग संघ (CII )
◆-  उदघाटन : शेख हसीना (बांगलादेशच्या पंतप्रधान) आणि सानिया मिर्झा
◆-  संकल्पना : Innovating for India: Strengthening South Asia, Impacting the World’.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *बुलडाण्याच्या महिला पोलिसाचा चीनमध्ये डंका; दोन सुवर्णासह तीन पदके*

◆ चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी करत दोन सुवर्ण पदक व एक कांस्य पदक मिळविले. तिने 'टार्गेट आर्चरी'मध्ये ७२० पैकी ७१६ गुण मिळवित विक्रम नोंदविला.

◆ चेंगडू येथे ८ ते १८ आॅगस्ट दरम्यान या स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनिकाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले.

◆ मोनिका या बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून आंतरराष्ट्रींय खेळाडू आहे. फिर्ल्ड आर्चरीमध्ये सुवर्ण, तर 'थ्रीडी' आर्चरी प्रकारात कांस्य पदक मिळविले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

प्रथम तिमाहीत भारताचा GDP वृद्धीदर 5.7% पर्यंत आणखी मंदावला आहे: नोमुरा अहवाल

✍नोमुरा या सल्लागार संस्थेच्या “कॉम्पोजिट लिडिंग इंडेक्स (CLI)” शीर्षकाच्या अहवालानुसार, कमी मागणी, कमकुवत गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रातल्या कमकुवत कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या काळात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर आणखी कमी होणार असून तो 5.7 टक्क्यांवर जाणार असा अंदाज बांधण्यात आला आहे.

✍असे असूनही अर्थव्यवस्था जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत काही प्रमाणात सुधारणार अशी अपेक्षा आहे.

🔴अहवालातले ठळक मुद्दे :-

👇👇👇👇👇👇

✍जुलै महिन्यातल्या आकडेवारीत असे दिसून आले आहे की जूनमधील 31 टक्क्यांच्या तुलनेत 53 टक्के निर्देशके सुधारले आहेत.

✍जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतला कॉम्पोजिट लिडिंग इंडेक्स द्वितीय तिमाहीच्या 99.8 वरून किंचित वाढीसह 99.9 वर झाला आहे. हा उच्च औद्योगिक उत्पादनातल्या वाढीचा परिणाम आहे.

✍2018-19 या आर्थिक वर्षातला भारताचा आर्थिक वाढीचा दर 6.8 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, जो 2014-15च्या तुलनेत सर्वाधिक कमी आहे.

दिनविशेष : 22 ऑगस्ट 


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  22/08/2019  ■
                        वार :-  गुरुवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ १९७२ : वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्‍होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

◆ १९६२ : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

◆ १९४४ : दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

◆ १९४२ : दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

◆ १९४१ : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.

◆ १९०२ : कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना

◆ १८४८ : अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९६४ : मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू

◆ १९५५ : चिरंजीवी – अभिनेते व केंद्रीय मंत्री

◆ १९३५ : पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्यप्रकारांतही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. १९५७ मध्ये त्यांनी ८२ दिवसांत ८७ कार्यक्रम करुन विक्रम केला. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)

◆ १९२० : डॉ. डेंटन कूली – ह्रुदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद

◆ १९१९ : गिरीजाकुमार माथूर – हिन्दी कवी (मृत्यू: १० जानेवारी १९९४)

◆ १९१८ : डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. (मृत्यू: १५ जुलै २००४)

◆ १९१५ : शंभू मित्रा – बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (मृत्यू: १९ मे १९९७)

◆ १९०४ : डेंग जियाओ पिंग – सुधारणावादी चिनी नेते (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ १९९९ : सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३). त्यांच्या ’धाकटी पाती’ या आत्मचरित्राला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

◆ १९९५ : पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत. (जन्म: ? ? ????)

◆ १९८९ : पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता. (जन्म: २६ जुलै १८९३)

◆ १९८२ : एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

◆ १९८० : चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचे बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)

◆ १९७८ : जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० आक्टोबर १८९३)

◆ १८१८ : वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (जन्म: ६ डिसेंबर १७३२)

◆ १३५० : फिलिप (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ?? १२९३)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

19 वर्षांत दोन हजार वाघांची शिकार!

📍 गत 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977 वाघांची शिकार, तर 382 वाघांना जीवंत पकडण्यात आले

👀 केवळ भारतातच 626 वाघांची शिकार, याबाबत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती

📝 केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हे अहवालात माहिती नमूद

🔎 साल 2000 ते 2018 पर्यंत हा सर्व्हे करण्यात आला होता

🤔 वाघांची शिकार का होते? :

● आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी
● चीनची छुपी बाजारपेठ वाघांची मोठी ग्राहक
● अवयवांपासून औषधांची निर्मिती केली जाते
● कातड्याला लाखो रुपये किंमत मोजली जाते  
● नखांचा दागिन्यांमध्ये वापर, हाडांची पूड करून औषधात मिसळली जाते

झांबिया आणि भारत  या देशांच्या दरम्यान सहा  करार झाले


झांबियाचे राष्ट्राध्यक्ष एडगर चागवा लुंगु यांनी 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2019 या काळात भारताला भेट दिली. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर भारत दौऱ्यावर आलेले ते आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.

👉राष्ट्राध्यक्ष लुंगु यांचा हा पहिलाच भारत दौरा होता.

👉भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष लुंगु आणि त्यांच्या समवेत आलेल्या प्रतिनिधी मंडळासोबत झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

🌹🌳🌴चर्चेमधले ठळक मुद्दे🌴🌹

👉भारताच्या सहकार्यात आरोग्य, ऊर्जा निर्मिती तसेच ल्युसाकामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भातल्या प्रकल्पात उत्तम प्रगती होत आहे.

👉झांबियामध्ये इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी भारत सहकार्य करणार आहे. 

👉याशिवाय कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी 100 सौर सिंचन पंप भारत उपलब्ध करुन देणार आहे. झांबियाला 1000 टन तांदूळ आणि 100 टन दूध भुकटीही भारत पाठविणार आहे.

🌹🌳🌴झांबिया आणि भारत  यांच्यात झालेले करार 🌴🌳🌹

1.भूगर्भ आणि खनिज संसाधन या क्षेत्रातल्या सहकार्याबाबतचा सामंजस्य करार

2.संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार

3.कला आणि संस्कृती क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

4.भारतीय परराष्ट्र व्यवहार सेवा आणि झांबियामधली राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्था यामधला सामंजस्य करार  

5.ई-विद्याभारती आणि ई-आरोग्यभारती (e-VBAB) नेटवर्क प्रकल्पाबाबत सामंजस्य करार

6..भारतामधले निवडणूक आयोग आणि झांबियामधले निवडणूक आयोग यांच्यादरम्यानचा सामंजस्य करार

🌹🌳🌴भारत-झांबिया संबंध🌴🌳🌹

👉झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातला एक भूपरिवेष्ठित देश आहे.

👉त्याला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, टांझानिया, मलावी, मोझांबिक, झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया आणि अँगोला या देशांचा वेढा आहे.

👉लुसाका ही झांबियाची राजधानी असून झांबियाई क्वाचा हे राष्ट्रीय चलन आहे.

👉भारत आणि झांबिया यांच्यात प्राचीन काळापासून संबंध आहेत.

👉झांबिया हा भारताचा महत्वाचा मित्र आणि विश्वासू भागीदार आहे.

👉व्यापार, वाणिज्य, गुंतवणूक आणि पायाभूत संरचनेपासून विकासात्मक सहकार्य, क्षमतावृद्धी तसेच दृढ सांस्कृतिक संबंधांपर्यंत उभय देशातली भागीदारी व्यापक झाली आहे.

👉झांबिया हा खनिजसमृद्ध देश आहे.

👉इतर खनिजांबरोबरच भारत झांबियाकडून मोठ्या प्रमाणात तांबे धातूची आयात करतो.

*चालू घडामोडी वन लाइनर्स, 22 ऑगस्ट 2019.*

✳ यूएन च्या विशेष उद्देश ट्रस्ट फंडात भारत $1 दशलक्ष योगदान देतो

✳ अमेरिकेने 125 दशलक्ष डॉलर्स अफगाणिस्तानास मदत केली

✳ अमेरिकेने पाकिस्तानला 440 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत कपात केली: अहवाल

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 7 समिट 2019, फ्रान्समध्ये सामील झाले

✳ जी -7 शिखर परिषदेत भारताला भागीदार देश म्हणून आमंत्रित केले गेले आहे

✳ पंतप्रधान मोदी रशियामधील 5 व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (ईईएफ) मध्ये उपस्थित होते

✳ उत्तर प्रदेश मंत्रिमंडळ 21 ऑगस्ट रोजी (आज)

✳ झांबियाचे अध्यक्ष एडगर चागवा लुंगू 20 ऑगस्टपासून भारत दौर्‍यावर आहेत

✳ भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानला 2-1 ने पराभूत केले

✳ मार्क रॉबिन्सन इंग्लंडच्या महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून पद सोडतील

✳ आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर बुद्धिबळ मुक्त स्पर्धा हैदराबादमध्ये सुरू

✳  माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक

✳  प्रणय, प्रणीथ वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या प्री-वुअर्टर्समध्ये दाखल

✳  नेपाळला पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी भारत 233 कोटी रुपयांची आर्थिक मदत देते

✳  "FASTags" डिसेंबर 2019 पासून सर्व वाहनांसाठी अनिवार्य होईल

✳ डक-ही एटीपी मेन-ड्रॉ सामना जिंकण्यासाठी पहिला बधिर खेळाडू ठरला

✳ एस श्रीशांतची स्पॉट फिक्सिंग बंदी ऑगस्ट 2020 मध्ये संपली: बीसीसीआय लोकपाल

✳ शॉटगन विश्वचषक स्पर्धेची सुरुवात फिनलंडच्या लाहिटी येथे होईल

✳ आयआयटी, उत्तर प्रदेशातील आयआयएम अभ्यासक्रमात योगाचा समावेश करतात

✳  ओडिशा सरकार पीडब्ल्यूडींसाठी विशेष सेल सुरू करणार आहे

✳  गोवा लोकसेवा आयोग परीक्षा कोंकणीत घेण्यात येईल

✳  एफसी गोवा फुटबॉल संचालक म्हणून रवी पुस्कुर यांची नियुक्ती करते

✳ डॉ. एस. जयशंकर काठमांडू येथे 2 दिवसाच्या नेपाळ दौर्‍यावर येतील

✳  महाराष्ट्र शासनाने एमएसआरटीसी बसेससाठी लाइव्ह ट्रॅकिंग सिस्टम सुरू केली

✳  लोकसभा सचिवालयानं संसदेमध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली

✳  ओडिशात 1 सप्टेंबरपासून 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजना राबविण्यात येईल

✳  भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियोमध्ये ऑलिम्पिक कसोटी स्पर्धे जिंकल्या

✳  जगातील सर्वात कमी भारतीय पॅकेज्ड फूड्स: सर्वेक्षण

✳  2025 पर्यंत भारताचे सॉफ्टवेअर उद्योग $ 80 अब्ज डॉलर्स वर जाईल: सीआयआय

✳  मोफत औषध योजना अंमलबजावणीमध्ये राजस्थानचा पहिला क्रमांक आहे

✳  कर्नाटक भारतातील शीर्ष सौर सौर्य म्हणून उत्कृष्ट राज्य म्हणून उदयास आले

✳  अमेरिकेने आज भारतासमवेत २+२ वार्तालापांची अंतरराष्ट्रीय बैठक आयोजित केली आहे

✳  आज तक 20 दशलक्ष सदस्यांना ओलांडण्यासाठी प्रथम वृत्त चॅनेल बनले

✳ मेझॉनने हैदराबादमधील जगातील सर्वात मोठ्या कॅम्पसचे उद्घाटन केले

✳  राजीव गौबा यांची 30 ऑगस्टपासून कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती

✳  अजय कुमार यांची नेक्स्ट डिफेन्स सेक्रेटरी म्हणून नेमणूक

✳  काठमांडू येथे भारत नेपाळ संयुक्त कमिशनची पाचवी बैठक

✳  बीएसएनएल आता भारतात सर्वात जलद 3 जी नेटवर्कः ट्राय

✳  JIO जुलैमध्ये सर्वात वेगवान 4G नेटवर्क बनले आहे: ट्राय

✳  एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम "निष्ठा" सुरू

✳  अब्दल्ला हॅमडोक यांनी सुदानचे नवीन पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला

✳  20 सप्टेंबर रोजी भारत पहिला रफाळे जेट मिळवणार आहे

✳ इंडिया-एस्टोनिया बिझिनेस फोरम आयोजित

मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्कार

👉प्रत्येक सत्रातील ४५०पेक्षा अधिक परीक्षांच्या संपूर्ण मूल्यांकनाची प्रक्रिया ‘ओएसएम’ पद्धतीद्वारे करणारे मुंबई विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्याने ते या पुरस्कारासाठी पात्र ठरले.

👉उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार - २०१९’ प्राप्त झाला आहे.

👉राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेटर फेस्टिव्हलमध्ये सोनम वायचुंग व लक्षराजसिंग मेवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

👉मुंबई विद्यापीठाने २०१७ साली उन्हाळी सत्राच्या परीक्षांपासून सर्व परीक्षांसाठी संगणकाधारीत मूल्यांकन पद्धत म्हणजेच (आॅनस्क्रीन मार्किंग) सुरू केली. प्रत्येक परीक्षेला जवळपास १३ ते १६ लाख उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून, त्याचे शिक्षकांमार्फत आॅनलाइन मूल्यांकन करून घेतले.

👉‘ओएसएम’बरोबरच मुंबई विद्यापीठाकडून सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ‘डिजिटल पेपर डिलिव्हरी’मार्फत ८१९पेक्षा जास्त महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका आॅनलाइन पाठविली जाते.

👉प्रश्नपत्रिका छपाईचा, वाहतुकीचा खर्च व वेळ यातून वाचला जातो, तसेच सुरक्षितरीत्या या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी महाविद्यालयाकडे पोहोचतात.

👉 सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर त्या-त्या महाविद्यालयाचे नाव छापले जाते, तसेच आॅनलाइन पुनर्मूल्यांकन, आॅनलाइन पीएच.डी प्रवेश परीक्षा, आॅनलाइन परीक्षा अर्ज, आॅनलाइन प्रवेश, आॅनलाइन संलग्नता अशा अनेक तंत्रज्ञानयुक्त सोईसुविधा मुंबई विद्यापीठाने केल्या आहेत व करीत आहे.यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रकन्या’ मोनिकाने रोवला अटकेपार झेंडा

चीनमध्ये झालेल्या World Police and Fire Games स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाच्या महिला प्रतिनिधीने भारताची मान उंचावली.

या स्पर्धेत भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली.

तिने World Police and Fire Games स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली.

मोनिका बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. मोनिका जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग,सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.

८ ते १८ ऑगस्ट या कालावधी दरम्यान चीनमध्ये World Police and Fire Games या स्पर्धा रंगल्या होत्या. यामध्ये मोनिकाने अतिशय चांगली कामगिरी केली.

 ‘टार्गेट आर्चरी’ या प्रकारात मोनिकाने ७२० पैकी ७१६ गुण मिळवित विक्रम नोंदविला. फिर्ल्ड आर्चरीमध्ये तिने सुवर्ण, तर ‘थ्रीडी’ आर्चरी प्रकारात कांस्यपदक मिळविले.

२०१३ मध्ये मोनिका पोलीस दलात भरती झाली होती. त्यानंतर मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना तिने जागतिक स्तरावर नववे स्थान पटकावले होते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...