१९ ऑगस्ट २०१९

​​🚂 'मुंबई सेंट्रल' ठरले सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक 🚂

🚇 अस्वच्छ फलाट, सदोष तिकीट मशिनमुळे झालेली गर्दी, स्वच्छतागृहांत दुर्गंधी... अशी ओळख असलेल्या मुंबई रेल्वेवरील स्टेशनांमध्ये मुंबई सेंट्रलने आदर्श स्थानक म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे.

🚇आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणपूरकतेच्या तब्बल १२ कसोट्यांवर पात्र ठरल्याने स्थानकाची दखल आतंरराष्ट्रीय संस्थेने घेत स्थानकाला iso 14001 : 2015 या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.

🚇विशेष म्हणजे, आयएसओ प्रमाणित मुंबई सेंट्रल स्टेशनाचा पॅटर्न अन्य ३८ रेल्वे स्टेशनांवर राबवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

🚇रेल्वेच्या निकषांनुसार रेल्वे स्टेशनातील एकूण जागेपैकी ३० टक्के जागेवर उद्यान उभारणे आवश्यक आहे. मुंबई सेंट्रलमध्ये जागेची अडचणी असल्याने टप्प्या टप्प्यांमध्ये छोटेखानी उद्यानांची निर्मिती करण्यात आली.

🚇स्टेशन आणि फलाटाची स्वच्छता, कचरा आणि मलजलाच्या विल्हेवाटीसाठी बायोगॅस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. विजेच्या बचतीसाठी सूर्यप्रकाश परावर्तित करणारे दिवे छतावर बसविण्यात आले.

🚇या दिव्यांचे आयुर्मान २० वर्षांपेक्षा अधिक असल्याने वीज संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. या पर्यावरणीय प्रकल्पांमुळे आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेत मुंबई सेंट्रल स्टेशनाला गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

🚇 मे-२०१९ ते मे-२०२२ पर्यंत पर्यावरण प्रकारातील आयएसओ प्रमाणपत्रधारक स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मुंबई रेल्वेवरील हे एकमेव स्टेशन आहे.

🚇एटीव्हीएम, तिकीट खिडकी यांसह दिव्यांगासाठी रॅम्प, कार्यरत असणाऱ्या लिफ्ट यांमुळे प्रवाशांना स्थानकात आल्यानंतर दिलासा मिळतो. मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व मेल-एक्स्प्रेसमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे.

🚇आंतरराष्ट्रीय आयएसओ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वे मुख्यालय आणि मुंबई विभागाने विशेष प्रयत्न केले होते. पर्यावरण आणि प्रवासी सुविधा दर्जेदार असल्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ प्रमाणपत्र मिळाले.

🚇 येणाऱ्या काळात या सुविधा टिकवणे अधिक गरजेचे आहे. मुंबई रेल्वेवरील अनेक रेल्वे स्टेशनांत पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट या सुविधा आहेत.

🚇मात्र देखभालीअभावी त्या सुविधाच गैरसोयीचे मुख्य कारण ठरत आहेत.

  🚆आयएसओ म्हणजे काय 🚆

🚇 देशातील एखाद्या गुणवत्तेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डडायझेशन' मानांकन घेतले जाते.

🚇आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता १२० देशांनी एकत्र येऊन एक प्रमाण निश्चित केलेले आहे. 

     🚀आयएसओचे प्रकार🚀

🚇 आयएसओ ९००१ - गुणवत्ता व्यवस्थापन
🚇आयएसओ १४००१ - पर्यावरण व्यवस्थापन
🚇 आयएसओ २७००१ - माहिती सुरक्षा व्यवस्थापन
🚇आयएसओ २२००८ - अन्न सुरक्षा व्यवस्थापन

🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃

नागालँडची पहिली महिला ऑलिम्पियन- चेक्रोवोलू सुरो

◼️चेक्रोवोलू सुरो- या नावाचे भारताच्या आणि नागालँडच्या ऑलिंपिक इतिहासात विशेष स्थान आहे. विशेष स्थान यासाठी की या नावाची ही महिला नागालँडची पहिली महिला अॉलिम्पियन आणि या राज्यातून ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेली केवळ दुसरीच खेळाडू आहे. तिचा खेळ…तिरंदाजी!

◼️वयाच्या 13 व्या वर्षीच 1994 मध्ये तिने पहिल्यांदा धनुष्यबाण हाती घेतला आणि 2011 पर्यंत देशातील आघाडीची तिरंदाज असा तिने नावलौकिक कमावला.

◼️1999 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणातच तिचे सुवर्ण पदक अगदी थोडक्यात हुकले. बँकाॕक येथील आशियाई ग्रँड प्रिक्स स्पर्धेत तिचा समावेश असलेला संघ रौप्यपदक विजेता ठरला होता. त्यानंतर 2002 व 2006 च्या आशियाडसह बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. 2012 च्या अॉलिम्पिकसाठी भारताच्या तिरंदाजी चमूत ती होती.

◼️त्याच्या तब्बल 64 वर्ष आधी म्हणजे 1048 मध्ये नागालँडच्याच डॉ. तालिरमेन ऐओ यांनी भारतीय फूटबॉल संघाचे अॉलिम्पिकमध्ये नेतृत्व केले होते. विशेष म्हणजे डॉ. तालिरमेन अनवाणी पायाने खेळले होते. ईशान्येकडील राज्यातून भारतासाठी अॉलिम्पिक खेळलेले ते पहिले खेळाडू होते.

◼️चेक्रोवोलू ही फेक जिल्ह्यातील खेडूत. गावात अंगा नावाने ती लोकप्रिय. तिची मोठी बहिणसुध्दा तिरंदाज. तिला बघून बघूनच हीसुध्दा नेम साधायला लागली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली. 2011 मध्ये भारतीय संघाने ट्युरिन येथे तिरंदाजीच्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आणि चेक्रोवालू प्रकाशझोतात आली. 2012 च्या आॉलिम्पिकमध्ये तिला यश मिळाले नाही. 2013 मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

🔰 मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर

◼️ राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ संत साहित्याचे अभ्यासक श्री.म.रा.जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. रुपये ५ लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.

◼️मधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक असून या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याच्या ज्ञानकोषाचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी आणि एम.फिलचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

◼️मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उज्जैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. श्री जोशी संत साहित्य विषयाचे पीएचडी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे २०० हून अधिक लेख ‘एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम’ कडून प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘सार्थ तुकाराम गाथे’ची ४०० हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत.

◼️नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील ३५०० मराठी हस्तलिखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.

◼️संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी श्री. रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यू. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते आणि डॉ.किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

◼️सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधील डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड या सदस्यांनी श्री मधुकर जोशी यांची निवड केली.

✅✅एका ओळीत सारांश,19 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉भारतीय नौदल आणि ब्रिटनची रॉयल नेव्ही यांचा वार्षिक ‘कोकण 2019’ नावाचा सराव आयोजित करण्यात आला ते ठिकाण - इंग्लिश खाडी.

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉हवामानातल्या बदलांमुळे गमावलेल्या हिमनदीचे जगातले पहिले स्मारक - ओकेजोकुल हिमनदी (आइसलँड).

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉8 ते 17 ऑगस्ट दरम्यान झालेल्या 'वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2019' याचे ठिकाण – चेंगडू, चीन.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉17 ते 25 ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या "आदी महोत्सव" याचे ठिकाण – लेह, लदाख.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉17 ऑगस्ट 2019 रोजी निधन झालेल्या दुरदर्शनच्या ज्येष्ठ सूत्रसंचालक - नीलम शर्मा.

👉17 ऑगस्ट 2019 रोजी छत्तीसगडमध्ये निधन झालेले प्रख्यात समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्ता - दामोदर गणेश बापट.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉नोव्हेंबर 2021 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक - रवी शास्त्री.

👉फ्रँकफर्ट (जर्मनी) येथे 2019 ज्युनियर विश्व अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धेत किरीन प्रकारात वैयक्तिक कास्य, स्प्रिंटमध्ये सांघिक सुवर्ण पदक आणि स्प्रिंटमध्ये वैयक्तिक रौप्यपदक जिंकणारा भारतीय सायकलपटू - एसो अल्बेन.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉चीनचा पहिला अग्निबाण जो व्यवसायिक वापरासाठी तयार केला गेला - स्मार्ट ड्रॅगन-1.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) याचे स्थापना वर्ष – सन 1987.

👉भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) – स्थापना वर्ष: सन 1928; मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र.

👉दूरदर्शनचे स्थापना वर्ष – सन 1959.

👉इंग्लंड व फ्रान्स ह्या देशांना वेगळा करणारा अटलांटिक महासागराचा एक भाग, जो उत्तरी समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडतो - इंग्लिश खाडी.

१८ ऑगस्ट २०१९

🌸💕वॉर रुममधून अभिनंदन यांना मार्गदर्शन करणाऱ्या IAF च्या महिला अधिकाऱ्याला ‘युद्ध सेवा मेडल’

✍विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान आकाशात झेपावल्यानंतर त्यांच्याबरोबर माझा संवाद चालू होता.

✍बालाकोट एअर स्ट्राइक आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमानांबरोबरच्या डॉगफाइटमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आयएएफच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती.

✍त्यावेळी झालेल्या डॉगफाइटमध्ये मिंटी यांनी वॉर रुममधून विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना मार्गदर्शन केले होते. युद्धाच्या काळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केले जाते..

✍मिंटी अग्रवाल या त्या टीममध्ये होत्या. पाकिस्तानी फायटर विमानांना रोखण्यासाठी आकाशात झेपावलेल्या इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांच्या त्या कंट्रोलर होत्या.

🌸💕रिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना लुटणाऱ्या बँकांना झटका; एटीएम ट्रांझेक्शन लिमिटवर दिला इशारा💕🌸

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍बऱ्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल होतात.

✍आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रांझेक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे.

✍बँकांकडून महिन्याला केवळ 5 ट्रान्झेक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 ते 25 रुपयांचे शुल्क आकारले जात होते.

✍बऱ्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल होतात. ही ट्रान्झेक्शनही बँका पहिल्या 5 ट्रान्झेक्शनमध्ये धरत होत्या. यामुळे पुढील एटीएम ट्रान्झेक्शनवर बँका शुल्क आकारत होत्या. यामुळे ग्राहकांची लूट होत होती.

✍तांत्रिक गोष्टी किंवा एटीएममध्ये पैसे नसल्याने ट्रान्झेक्शन फेल झाल्यास मोफत ट्रान्झेक्शनमध्ये मोजू नये. तसेच नॉन कॅश ट्रान्झेक्शनही या श्रेणीमध्ये पकडू नये अशा सूचना आरबीआयने बँकांना दिल्या आहेत.

*चालू घडामोडी वन लाइनर्स, 16 ऑगस्ट 2019.*


✳ शिब शंकर पॉल यांची बंगाल महिला प्रमुख प्रशिक्षक म्हणून नेमणूक

✳ मध्य प्रदेश सरकारने आदिवासींकडून घेतलेले कर्ज माफ केले

✳ ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2019 श्रीनगर, जम्मू व के येथे आयोजित केले जाईल

✳ अ‍ॅक्सिस बँक आणि आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सने बॅंकासुरन्स करारावर स्वाक्षरी केली

✳ 96 पोलिस कर्मचार्‍यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्टतेसाठी तपासणी 2019 मध्ये मेडल प्रदान करण्यात आले

✳ दशकातील 20000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली प्रथम खेळाडू बनला

✳ पाकिस्तानने 14 ऑगस्ट रोजी काश्मीर एकता दिन म्हणून आपला स्वतंत्र दिवस पाळला

✳ 22 ऑगस्टपासून हैदराबाद येथे तेलंगणा राज्य रँकिंग बुद्धिबळ स्पर्धा

✳ उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला बीसीसीआयचे सदस्यत्व मिळते

✳ बीसीसीआयने चंदीगडच्या केंद्र शासित प्रदेश क्रिकेट संघटनेसाठी असोसिएट सदस्यता देखील मंजूर केली

✳ आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने डेव्हिस चषक टाय पाकिस्तानबाहेर जाण्याची विनंती नाकारली

✳ वर्ल्ड कनिष्ठ कुस्ती स्पर्धा एस्टोनियामध्ये पार पडली

✳ वर्ल्ड कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत दीपक पुनियाने 86 केजी गटात सुवर्ण जिंकले

✳ दीपक पुनिया 18 वर्षांत प्रथम भारतीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनला

✳ वर्ल्ड ज्युनियर रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये विकीने 92 केजी प्रकारात कांस्य जिंकले

✳ जागतिक पोलिस आणि फायर गेम्स चीनमध्ये सुरू होतात

✳ जागतिक पोलिस आणि फायर गेम्समध्ये मंदार डिव्हेज 400 मी स्विमिंगमध्ये सुवर्ण जिंकला

✳ वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्समधील महिला 400 मी स्विमिंगमध्ये रीचा शर्मा सुवर्ण जिंकली

✳ रीचा शर्मा वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्समधील 4 × 50 रिलेमध्ये रौप्य जिंकली

✳ इराणचे अध्यक्ष एच रोहानी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत संबोधित करणार आहेत

✳ यूएनएससी 16 ऑगस्ट रोजी जे-के वर एक सत्र घेण्याची शक्यता आहे

✳ सुपर कप 2019 जिंकण्यासाठी पेनल्टीवर लिव्हरपूल बीट चेल्सी

✳ उद्घाटन युरो टी 20 स्लॅम 2020 पर्यंत पुढे ढकलला

✳ "ट्रिपल-डबल" ट्विस्ट बनविणारी सिमोन पित्त पहिली महिला ठरली

✳ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, यूएन फंडने भारताद्वारे योगदान दिले

✳ ईस्ट बंगाल डुरंड चषक 2019 ची उपांत्य फेरी गाठली

✳ सहाव्या आशियाई स्कूल टेबेल टेनिस स्पर्धेची सुरुवात वडोदरामध्ये होईल

✳ फ्रॅंकफर्ट येथे जागतिक कनिष्ठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धा

✳ वेस्ट इंडीज विरूद्ध भारत एकदिवसीय मालिका 2-0 ने जिंकला

✳ घरांमध्ये पाईपयुक्त पाणी पोचविण्यासाठी जल जीवन मिशन सुरू करणार

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ गटाची घोषणा केली

✳ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लखनऊमधील कार्यालय बुलेटप्रुफ बनले जाईल

✳ इंडोनेशियात आशियाई टेबल टेनिस स्पर्धा होणार आहेत

✳ ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले

✳ कोलकाता नाइट रायडर्सने ब्रेंडन मॅक्युलम हेड कोच म्हणून नियुक्ती केली

✳ असित त्रिपाठी यांना ओडिशाचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले

✳ मिंटी अग्रवाल हे युथ सेवा पदकाची प्रथम महिला पुरस्कार प्राप्त

✳ जैव-इंधन धोरण जारी करणारे राजस्थान पहिले राज्य बनले

✳ 14 वे जागतिक शिक्षण परिषद (डब्ल्यूईएस) नवी दिल्ली येथे आयोजित

✳ चौदाव्या जागतिक शिक्षण परिषदेमध्ये राजस्थानला सर्वोत्कृष्ट नाविन्य आणि पुढाकार नेतृत्व पुरस्काराने सन्मानित केले

✳ कर्नाटक सरकारने विद्यार्थी उद्योजकांसाठी "ई चरण" कार्यक्रम सुरू केला

✳ एनकेशने एसएमईसाठी भारताचे पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड "फ्रीडम कार्ड" सुरू केले

✳ विम्बाई चपंगू मिस लंडनच्या मुकुटवढी असणारी पहिली काळा महिला बनली

✳ एअर इंडियाचे पहिले उड्डाण ओव्हर उत्तर ध्रुव ते दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को

✳ मांजरींच्या सुट्टीवर बंदी घालण्यासाठी न्यूयॉर्क हे पहिले राज्य बनले

✳ स्वातंत्र्यसैनिक दयानिधी नायक यांचे निधन

✳ माजी भारतीय क्रिकेटर व्ही.बी. चंद्रशेखर यांचे निधन.

*चालू घडामोडी वन लाइनर्स 17 ऑगस्ट 2019.*


✳ फिनलँडच्या लाहिटी येथे आयएसएसएफ शॉटगन विश्वचषक स्पर्धेस प्रारंभ

✳ वर्ल्ड ज्युनियर ट्रॅक सायकलिंग चँपियनशिप फ्रँकफर्ट मध्ये सुरू

✳ वर्ल्ड ज्युनियर ट्रॅक सायकलिंग चँपियनशिपमध्ये भारताचा एसो जिंकलेला कांस्य

✳ जागतिक पोलिस आणि फायर गेम्स चीनमध्ये सुरू होतात

✳ अनूप गोदाराने वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्समध्ये 400 मी हर्डल्समध्ये गोल्ड जिंकला

✳ आयएएफ विंग कमांडर अभिनंदन वर्थमन यांनी वीर चक्रशी चर्चा केली

✳ इस्रोचे अध्यक्ष के. शिवान यांना टीएन सरकारचा अब्दुल कलाम पुरस्कार

✳ हरियाणा आणि रशियाने व्यापार आणि गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार केला

✳ पंजाबमध्ये भारताला दुसरा हायपरलूप प्रकल्प मिळणार आहे

✳ अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेंस यांनी 6 सप्टेंबर रोजी आयर्लंड दौर्‍याची पुष्टी केली

✳ अलेम डार इक्विलेड स्टीव्ह बकनरची 128 कसोटी सामने खेळण्याची वर्ल्ड रेकॉर्ड

✳ भारतीय दुहेरीची जोडी चिराग शेट्टी आणि एस रणकीरेड्डी पुल आउट ऑफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप

✳ व्ही.जी. सोमानी यांना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून नियुक्त केले गेले आहे

✳ डेन्मार्कच्या जिस्के बँकेने जगातील प्रथम नकारात्मक व्याज दर गृह कर्जाचे अनावरण केले

✳ पाकिस्तान सरकारने सर्व कर्मचार्‍यांना 1 सप्टेंबरपर्यंत मालमत्ता घोषित करण्याचे आदेश दिले आहेत

✳ अभिनेता स्टीव्ह कूगनचा सन्मान 2019 चार्ली चॅपलिन पुरस्काराने होईल

✳ जपानी डिफेन्स शिप 'जेएस सझनामी' 2 दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी कोचीला भेट दिली

✳ हैदराबाद येथे प्रथम क्रमांकाचे भारतीय अंतराळ संग्रहालय उद्घाटन झाले

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी 17-18 ऑगस्ट रोजी भूतान दौर्‍यावर येणार आहेत

✳ व्हीपी वेंकैया नायडू लिथुआनिया, लाटव्हिया, एस्टोनिया 17-21 ऑगस्ट दरम्यान भेट देणार आहेत

✳ नेपाळचे ज्येष्ठ पत्रकार मदन मणी दीक्षित यांचे निधन

✳ पाकिस्तानावर बंदी घातलेल्या जाहिराती, ज्यामध्ये भारतीय कलाकार आहेत

✳ आरसीईपी सदस्य देश पुढच्या आठवड्यात इंडोनेशियामध्ये भेटणार आहेत

✳ मेस्सी, रोनाल्डोला यूईएफए प्लेयर ऑफ द इयर अवॉर्डसाठी नामित केले

✳ नोवाक जोकोविच सिनसिनाटी ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करा

✳ विराट कोहलीने आयसीसी बॅट्समन एकदिवसीय क्रमवारीत प्रथम स्थान मिळविला

✳ रोहित शर्माने आयसीसी बॅट्समन वन डे रँकिंगमध्ये दुसरा क्रमांक मिळविला

✳ पाकिस्तानच्या बाबर आझमने आयसीसी बॅट्समन एकदिवसीय क्रमवारीत तिसरा क्रमांक पटकावला

✳ जसप्रीत बुमराह आयसीसी बॉलर एकदिवसीय क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे

✳ रेल्वे सुरक्षेसाठी "सीओआरएएस" कमांडो भारतीय रेल्वेने सुरू केले

✳ बजरंग पुनिया राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी नामांकित

✳ पंतप्रधान मोदी भूतानच्या रॉयल युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करतील

✳ पाक सुपर गिलियर्सने त्यांचे द्वितीय तमिळनाडू प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले

✳ विराट कोहली एके दशकात 20,000 आंतरराष्ट्रीय धावा गाठणारा पहिला खेळाडू बनला

✳ एच पी ठाकूर यांची राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संचालक म्हणून नियुक्ती झाली

✳ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सरकारमधील पारदर्शकतेसाठी 'मो सरकार' उपक्रमाची घोषणा केली.

✳ कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी 16 राज्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाशी सामंजस्य करार केला

✳ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी "व्हिलेज वॉलंटियर्स सिस्टम" सुरू केले.

✳ भारतीय सैन्याने आंतरराष्ट्रीय आर्मी स्काऊट मास्टर्स स्पर्धा जिंकली

✳ जपानने चीनला अमेरिकेचा सर्वात मोठा परदेशी लेनदार म्हणून मागे टाकले

✳ फिफाने नायजेरियनचे माजी प्रशिक्षक सियासिया ओव्हर मॅच फिक्सिंगवर बंदी घातली

✳ रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सुरू ठेवतील.

*चालू घडामोडी वन लाइनर्स,18 ऑगस्ट 2019.*


✳ दिब्रुगडमध्ये आसामला आपले पहिले सीएनजी इंधन स्टेशन मिळते

✳ रवि शास्त्री नोव्हेंबर 2021 पर्यंत भारत प्रमुख प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्त झाले

✳ ओडिशा बंदरे विकासासाठी सागरी मंडळ स्थापन करणार आहे

✳ पीएमजेडीवाय खात्यांमध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त

✳ झांबियचे राष्ट्राध्यक्ष एडगर चागवा लुंगू पुढच्या आठवड्यात भारताच्या पहिल्या भेटीवर येतील

✳ केंद्राने दिव्यांग प्रवेशयोग्य शौचालयांसाठी सॅन-साधना हॅकाथॉन सुरू केले

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी भूटानच्या 2 दिवसाच्या राज्य भेटीसाठी रवाना

✳ भारताने जोधपूर-कराची थार एक्स्प्रेस ट्रेन निलंबित केली

✳ पुडुचेरीने स्वातंत्र्यसैनिकांना राज्य निवृत्तीवेतनासाठी 1000 रुपये वाढ देण्याची घोषणा केली

✳ आयआयटी-गुवाहाटीने समस्या सोडवण्याच्या कौशल्यासाठी आशिया-पॅसिफिकमधील सर्वोच्च विद्यापीठांच्या यादीमध्ये प्रथम स्थान मिळविला आहे.

✳ हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचार्‍यांना 4% वाढीव महागाई भत्ता (डीए) जाहीर केला

✳ अॅथलेटिक्स मिटिंक रीटर 2019 झेक प्रजासत्ताकमध्ये प्रारंभ करा

✳ चेक प्रजासत्ताकमध्ये अॅथलेटिक्स मिटिंक रीटर 2019 मध्ये हिमा दास 300 मी महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकले

✳ पंतप्रधान मोदी, व्लादिमीर पुतीन 4 सप्टेंबर रोजी चर्चा करणार: अहवाल

✳ ईस्टर्न एअर कमांड कमांडर्स कॉन्क्लेव स्टार्ट इन शिलॉंग

✳ तामिळनाडू शाळांमध्ये जातीच्या मनगटावर बंदी घालणार आहे

✳ भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक कसोटी स्पर्धेत जपानला 2-1 असे पराभूत केले

✳ ऑलिम्पिक कसोटी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियाला 6-0 ने पराभूत केले

✳ नाओमी ओसाका गुडघा समस्येसह सिनसिनाटी मास्टर्समधून निवृत्त झाले

✳ मोहन बागानने 129 व्या डुरंड चषक उपांत्य फेरीत प्रवेश केला

✳ 2 वेळ वेल्टरवेट वर्ल्ड चॅम्पियन जोस नेपोलस यांचे 79 व्या वर्षी निधन

✳ पंजाबच्या पटियालामध्ये इंडियन ग्रँड प्रिक्स 5 वी प्रारंभ

✳ दुती चंदने 5 व्या भारतीय ग्रांप्रीमध्ये 100 मी सुवर्ण जिंकले

✳ विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयात भारत आणि भूतानचे सामंजस्य करार

✳ बजरंग पुनिया राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी नामांकित

✳ दीपा मलिक राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी नामांकित

✳ विमल कुमार (बॅडमिंटन) द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकित

✳ संदीप गुप्ता (टेबल टेनिस) द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकित

✳ एम एस ढिल्लन (thथलेटिक्स) द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकित

✳ आर एस खोखर (कबड्डी) द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकित

✳ मर्झबान पटेल (हॉकी) द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकित

✳ संजय भारद्वाज (क्रिकेट) द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकित

✳ अजय ठाकूर (कबड्डी) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

✳ गौरव गिल (मोटर्सपोर्ट) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

✳ गुरप्रीत संधू (फुटबॉल) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

✳ हरमीत देसाई (टेबल टेनिस) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

✳ अंजुम मौदगिल (शूटिंग) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

✳ पूजा धंदा (कुस्ती) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

✳ रवींद्र जडेजा (क्रिकेट) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

✳ पूनम यादव (क्रिकेट) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

✳ स्वप्ना बर्मन (अॅथलेटिक्स) अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

✳ बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रसेल डोमिंगो यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले

✳ 9 दिवसीय राष्ट्रीय आदिवासी महोत्सव "आदि महोत्सव" लेहमध्ये सुरू झाला

✳ वर्ल्ड कनिष्ठ कुस्ती स्पर्धा एस्टोनियामध्ये पार पडली

✳ वर्ल्ड ज्युनियर रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये  77 केजी गटात साजनने कांस्य जिंकला.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...