०२ ऑगस्ट २०१९

Current affairs

📌 NASAची प्रथम महिला अंतराळवीर जेरी कॉब यांचे निधन

अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेची प्रथम महिला अंतराळवीर ठरलेली जेरी कॉब यांचे दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या.

जेरी कॉब ह्या 1961 साली अंतराळवीर बनण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करणार्‍या प्रथम महिला होत्या.

कॉब ह्यांनी अनेक दशके अॅमेझोनच्या जंगलामध्ये मदत पोहचविण्यासाठी विमानचालक म्हणून काम केले होते.

मुस्लिम महिला अधिकार संरक्षण(तिहेरी तलाक) विधेयक 2018

• लोकसभेत 303  विरुद्ध 82 मतांनी मंजूर (25 जुलै 2019)

• राज्यसभेत 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर (30 जुलै 2019)

✅ कायद्यातील तरतुदी

1. पतीस 3 वर्ष कैद व दंड
2. तलाकपीडित स्त्री व अपत्यांसाठी निर्वाह भत्यास पात्र
3. खटला तडजोडीने मिटवणे शक्य
4. 19 सप्टेंबर 2018 पासून जम्मू अँड काश्मीर वगळता भारतभर लागू
5. गुन्हा अजामीनपात्र मात्र, दंडाधिकारी जामीन देऊ शकणार

सीएट इंटरनॅशनल क्रिकेट पुरस्कार 2019:-

● जीवनगौरव पुरस्कार – मोहिंदर अमरनाथ
● आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम फलंदाज – विराट कोहली
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज – जसप्रीत बुमराह
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम कसोटीपटू – चेतेश्वर पुजारा
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू – रोहित शर्मा
● आंतरराष्ट्रीय टी-२० सर्वोत्तम क्रिकेटपटू – ऍरॉन फिंच
● उल्लेखनीय कामगिरी – कुलदीप यादव
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम टी २० गोलंदाज – रशीद खान
● देशांतर्गत सर्वोत्तम खेळाडू – आशुतोष अमन
●आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू – स्मृती मंधाना
● सर्वोत्तम युवा (कनिष्ठ) क्रिकेटपटू – यशस्वी जैस्वाल
● क्रिकेट पत्रकारिता पुरस्कार – श्रीराम वीरा आणि स्नेहल प्रधान
● विशेष मानवंदना – स्व. अजित वाडेकर

आशियाई विकास बँक (ADB) #Bank
ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे.

“फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.

✅✅चालू घडामोडी,2 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) या स्वरुपात रूपांतरीत करण्याच्या निर्णय टपाल विभागाने घेतला - लघू वित्त बँक.

👉जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2018 साली भारत 2.73 लक्ष कोटी डॉलरची अर्थव्यवस्था झाली आणि आता ती जागतिक स्तरावरील या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखली गेली - सातवी.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘QS बेस्ट स्टूडेंट सिटीज रॅंकिंग 2019’ यानुसार, विद्यार्थ्यांसाठी जगातले सर्वोत्तम शहर – लंडन(ब्रिटन).

👉पश्चिम आफ्रिकेच्या या देशात कौशल्य विकास आणि कॉटेज उद्योग प्रकल्पांना पाठिंबा म्हणून 31 जुलै रोजी भारताने 500,000 डॉलरची मदत दिली - गॅम्बिया.

👉या ठिकाणी आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) परराष्ट्र मंत्री शिखर परिषद 2019 भरविण्यात आली - बँकॉक (थायलंड).

👉हा देश जुलै 2020 मध्ये मंगळ ग्रहावर अरबी जगतातले पहिले अंतराळ यान 'होप प्रोब' पाठवविणार आहे – संयुक्त अरब अमिरात (UAE).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘QS बेस्ट स्टूडेंट सिटीज रॅंकिंग 2019’ यानुसार, विद्यार्थ्यांसाठी भारतातले सर्वोत्तम शहर – बेंगळुरू(जागतिक पातळीवर 81 वा).

👉31 जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतराळाचा शांततापूर्ण हेतूंसाठी वापर करण्यासाठी सहकार्यासाठी भारत आणि या देशादरम्यान झालेल्या सामंजस्य करारास मान्यता दिली - बहरीन.

👉नवी दिल्ली येथे 1 ते 4 नोव्हेंबर 2019 या काळात आयोजित केल्या जाणार्‍या ‘वर्ल्ड फूड इंडिया (WFI) 2019’ या कार्यक्रमाचा भागीदार राज्य - जम्मू वकाश्मीर.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉30 जुलै रोजी अमेरिकेत निधन झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत (IMF) भारताचे कार्यकारी संचालक असलेल्या व्यक्तीचे नाव - डॉ. सुबीर विठ्ठल गोकर्ण.

👉अर्थ मंत्रालयाचे नवे सचिव - राजीव कुमार.

👉हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (बेंगळुरू) याचे नवे संचालक (ऑपरेशन्स) – एम. एस. वेल्पारी.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉ICCने 2019-20 च्या हंगामासाठी नेमण्यात आलेल्या अमिराती ICC एलिट पॅनेलच्या दोन नवीन पंचांची नावे - मायकेल गफ (इंग्लंड) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडीज).

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN) याचे - स्थापना वर्ष: सन 1967; आणि मुख्यालय: जकार्ता (इंडोनेशिया).

👉आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) – स्थापना वर्ष: सन 1945; मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका).

👉आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना वर्ष: सन 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिरात (UAE).

👉गाम्बिया - राजधानी: बंजूल; राष्ट्रीय चलन: डलासी.

👉बहरीन - राजधानी: मनामा; राष्ट्रीय चलन: बहरैनी दिनार.

👉जागतिक बँक - स्थापना वर्ष: सन 1944; मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी (अमेरिका).

०१ ऑगस्ट २०१९

📚 *चालू घडामोडी (01/08/2019)*📚


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *लाहोर येथील बायोमेकॅनिक्स लॅबला ICC ची मान्यता.*

◆ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनी (ICC) पाकिस्तान देशातल्या लाहोर या शहरात पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (PCB) उभारण्यात आलेल्या “बायोमेकॅनिक्स लॅब” याला मान्यता दिली.

◆ पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) संशयास्पद वाटणारी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी एक तपास केंद्र म्हणून “बायोमेकॅनिक्स लॅब” उभारलेली आहे.

◆ ही प्रयोगशाळा लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) येथे उभारण्यात आली आहे आणि ICC या संस्थेद्वारे मान्यता देण्यात आलेली पाचवी बायोमेकॅनिक्स लॅब आहे.

◆ या ठिकाणी इतर मान्यताप्राप्त केंद्रासारखी प्रगत उपकरणे आणि सॉफ्टवेअर आहेत. या ठिकाणी तीन मापदंडांच्या अंतर्गत माहिती तयार करण्यास सक्षम असलेली किमान 12 हायस्पीड कॅमेरासह मोशन अनॅलिसिस सिस्टम बसविण्यात आली आहे.

◆ शाहरीर खान PCBचे अध्यक्ष असताना 2015-16 या वर्षी प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या बेकायदेशीर गोलंदाजीची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *गोव्यातील भाजप सरकारनेही खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याचे निश्चित केले आहे*

◆ आंध्र प्रदेशच्या पावलावर पाऊल ठेवत गोव्यातील भाजप सरकारनेही खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याचे निश्चित केले आहे.

◆ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत याबाबत माहिती दिली. गोवा सरकारकडून सवलती घेणाऱ्या सर्व उद्योगांना नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देणं बंधनकारक राहील, असेही सावंत यांनी यावेळी नमूद केले.

◆ राज्यातील सर्व कंपन्या व कारखान्यांनी सरकारकडे नोंदणी करावी तसेच कर्मचाऱ्यांचा तपशील सादर करावा, असे नमूद करतानाच पुढील सहा महिन्यांत राज्याच्या कामगार व रोजगार धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

◆ भूमिपुत्रांसाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या ८० टक्के नोकऱ्यांपैकी ६० टक्के नोकऱ्या कायमस्वरूपी असाव्यात, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले आहे.

◆ काँग्रेस आमदार अॅलिक्सो लोरेन्को यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना खासगी नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षणाचा मानस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला. सरकारचं नवं धोरण अमलात येताच भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या देणे उद्योगांना बंधनकारक होईल, असे सावंत म्हणाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *गुगल, फेसबुकवर सरकार डिजिटल टॅक्स लावण्याच्या तयारीत ?

◆ या कंपन्यांना भारतातून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो.

◆ केंद्र सरकार गुगल, फेसबुक आणि ट्विटरसारख्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याचा विचार करत आहे.

◆ यासाठी वार्षिक 20 कोटी रूपयांचे उत्पन्न आणि 5 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असल्यास हा कर लागण्याची शक्यता आहे.

◆ गेल्या वर्षी सरकारने ‘सिग्निफिकंट इकोनॉमिक प्रझेन्स’ची (एसइपी) कॉन्सेप्ट आणली होती. परंतु यावर अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. ‘सिग्निफिकंट इकोनॉमिक प्रझेन्स’नुसार कोणतीही कंपनी भारतातून नफा कमवत असेल तर त्याला कर भरणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

◆ या कॉन्सेप्टनुसारच केंद्र सरकार आता देशात नफा कमावणाऱ्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याचा विचार करत आहे. सध्या अनेक देशांमध्ये ‘सिग्निफिकंट इकोनॉमिक प्रझेन्स’बाबत चर्चा सुरू आहेत.

◆ युरोपियन युनियन अशा डिजिटल कंपन्यांवर 3 टक्के कर लावण्याचा विचार करत आहे. तर फ्रान्ससारख्या देशाने आपला नवा नियम तयार केला आहे. जर हा नियम पारित झाला, तर परदेशी डिजिटल कंपन्यांनाही देशांतर्गत कंपन्यांप्रमाणे 30 टक्के कर द्यावा लागेल.

◆ दरम्यान, गुगल, फेसबुक आणि ट्विटरसारख्या कंपन्यांना भारतातून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. परंतु त्या नफ्यातला मोठा वाटा या कंपन्या आपल्या परदेशातील सहकारी कंपन्या किंवा मूळ कंपन्यांना पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

◆ यापूर्वी आयकर विभागाने गुगलविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली होती. आता सरकार लवकरच येणाऱ्या डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये या कराचा समावेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✅✅चालु घडामोडी,1 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉29 जुलै 2019 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमण्यात आलेले संचालक - अतनू चक्रवर्ती.

👉उद्योग व अंतर्गत व्यापार जाहिरात विभागाच्या ‘वार्षिक अहवाल 2018-19’ याच्यानुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूकीची (FDI) नोंद झाली, जी – 64.37 अब्ज डॉलर होती.

👉अमेरिकेच्या Mad*Pow या धोरणात्मक सल्लागार संस्थेला खरेदी करणारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली भारतीय कंपनी - टेक महिंद्रा.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘डेल ग्लोबल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ या यादीत प्रथम स्थान - सॅन फ्रान्सिस्को बे एरिया (अमेरीका).

👉‘डेल ग्लोबल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ या यादीत आशियामध्ये अग्रस्थान - सिंगापूर (21 वा).

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉‘डेल ग्लोबल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ या यादीत भारतातले अव्वल ठरलेले शहर – बेंगळुरू (कर्नाटक) (जागतिक: 43 वे आणि आशियात 7 वे).

👉8 आणि 9 ऑगस्ट 2019 रोजी 22 वी ‘राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2019’ आयोजित करण्यात येत असलेले ठिकाण - शिलाँग, मेघालय.

👉‘ग्राहक संरक्षण विधेयक-2019’ याच्या अंतर्गत केंद्र सरकारला ही संस्था स्थापन करण्याविषयी तरतूद आहे - केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA).

👉या ठिकाणी ‘डोंगराळी लसूण (कोडाईकनाल मलाई पुंडू) या नावाने प्रसिद्ध असलेल्या लसणाला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला - कोडाईकनाल (तामिळनाडू).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉30 जुलै रोजी निधन झालेले माजी RBI गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ - सुबीर गोकर्ण.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉30 जुलै 2019 रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करणारा भारताचा माजी फलंदाज आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कर्णधार - वेणुगोपाल राव.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात येणार असलेली संस्था - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), पुणे.

👉पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातल्या मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्प - आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी.

👉मंजुरी देण्यात आलेला महाराष्ट्र राज्यातला पहिला हायपरलूप प्रकल्प - मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड दरम्यान 117.50 कि.मी. अंतरासाठी).

👉“विधानगाथा” या पुस्तकाचे लेखक - हर्षवर्धन पाटील (माजी संसदीय कार्य मंत्री).

👉गुन्हेगारांच्या जैविक वैशिष्ट्यांची एकत्रित माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देणारी ॲम्बिस (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली वापरणारे भारतातले पहिले राज्य – महाराष्ट्र.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले गव्हर्नर - सर ओसबोर्न स्मिथ (1935 - 1937).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (1943-1949).

👉मेघालय राज्याची राजधानी - शिलाँग.

३१ जुलै २०१९

🌸🌸 चालू घडामोडी ३१ जुलै २०१९ 🌺 वन लायनर 🌸🌸

1. The Deep Ocean Mission (DOM) to be led by the Union Earth Sciences Ministry will commence from 31 October 2019.

✍ केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नेतृत्वात असणारी दीप महासागर मिशन (DOM) 31 ऑक्टोबर 2019 पासून सुरू होणार आहे.

2. Scientists at IIT Hyderabad have developed low-cost, environment-friendly solar cells by employing an off-the-shelf dye used to make kumkum or vermilion in India.

✍ आयआयटी हैदराबादच्या वैज्ञानिकांनी भारतात कुमकुम किंवा सिंदूर तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ऑफ-द-शेल्फ डाई देऊन कमी किमतीच्या, पर्यावरणास अनुकूल सौर पेशी विकसित केल्या आहेत.

3. Within three years of starting its commercial operations, Reliance Jio has become the country’s largest telecom operator. Jio has a subscriber base of 331.3 million, surpassing Vodafone Idea which reported a decline in its user base to 320 million by June 2019.

✍ आपली व्यावसायिक कामे सुरू केल्याच्या तीन वर्षांत रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर बनली आहे. जियोची ग्राहक संख्या 331.3 दशलक्ष आहे जो व्होडाफोन आयडियाला मागे टाकत आहे. जून 2019 पर्यंत व्होडाफोन आयडियाची ग्राहक संख्या घटून 320 दशलक्ष झाली आहे.

4. Mr. Jagdeep Dhankar has been sworn in as the State Governor of West Bengal.

✍ श्री जगदीप धनकर यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे.

5. DD News(Doordarshan)news channel of India awarded “Champions of Empathy Award” The award is given for spreading awareness about hepatitis. Mayank Agrawal, Director General of DD News received the Award from Lok Sabha Speaker Om Birla.

✍ डीडी न्यूज (दूरदर्शन) इंडियाच्या न्यूज चॅनेलला “चॅम्पियन्स ऑफ एम्पैथी अवॉर्ड” देण्यात आला हा पुरस्कार हेपेटायटीसविषयी जागरूकता वाढवण्यासाठी देण्यात आला आहे. डीडी न्यूजचे महासंचालक मयंक अग्रवाल यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. For more Click here

6. Indian Institute of Technology (IIT) Madras have developed a Smart agricopter. The innovation aims to eliminate manual spraying of pesticides in agricultural fields.

✍ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासने एक स्मार्ट अग्रीकॉप्टर विकसित केली आहे. या नावीन्यपूर्ण उद्दीष्टे कृषी क्षेत्रात कीटकनाशकांचे मॅन्युअल फवारणी दूर करणे आहे.

7. The Rajya Sabha has passed the Banning of Unregulated Deposit Schemes Bill, 2019. The Bill aims to introduce a mechanism that will curb the ponzi schemes.

✍ राज्यसभेने अनियमित ठेवी योजना विधेयक 2019 ला बंदी घातली आहे. या विधेयकाचा उद्देश पोंझी योजनांना आळा घालणारी एक यंत्रणा आणण्याचे आहे.

8. The Centre is to organize the 22nd National Conference on e-Governance 2019 on 8-9th August, 2019 at Shillong, Meghalaya. For the first time ever, the event is being organized in North-Eastern region of the country.

✍ मेघालयातील शिलाँग येथे 8-9 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकार ई-गव्हर्नन्स 2019 वर 22 वी राष्ट्रीय परिषद आयोजित करणार आहे. प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन देशाच्या ईशान्य भागात केले जात आहे.

9. Indian Federation of Sports Gaming (IFSG), country’s self-regulatory industry body for the online fantasy sports gaming sector announced the appointment of Justice Arjan Kumar Sikri as its ombudsman and ethics officer.

✍ ऑनलाईन कल्पनारम्य क्रीडा गेमिंग क्षेत्रासाठी इंडियन फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स गेमिंग (आयएफएसजी) ने देशाच्या स्वयं-नियामक उद्योग संस्थेने न्यायपालिका अर्जन कुमार सिक्री यांची लोकपाल व नीतिशास्त्र अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली.

10. Tamil Nadu girl Jerlin Anika has won the gold medal in the World Deaf Youth Badminton Championships held in Taipei.

✍ तामिळनाडूतील जर्लिन आणिकाने ताइपे येथे आयोजित वर्ल्ड डेफ युथ बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

'जगन्नाथ शंकरशेठ'

      थोर समाजसुधारक जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव. त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती, त्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनाच्या प्रमुख क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतला. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी”,“एल्‌फिन्स्टन कॉलेज”,“ग्रेट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्‌स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी” या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे नाना शंकरशेठ यांची दुरदृष्टी होती.नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत सुरू आहे.
नाना शंकरशेठ काऊंसिलमध्ये असतानाच १८६४ साली मुंबई शहरातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबर आरोग्य-सुखसोयी मिळवण्यासाठी मुंबईसाठी स्वतंत्र म्युनिसपल आयोग नेमला. त्याचे पुढे मुंबई म्युनिसिपल कॉपरेरेशनमध्ये रूपांतर केले गेले. आज मुंबई महानगरपालिकेचा जो भव्य-दिव्य वटवृक्षाचा डोलारा वाढला ते रोपटे नानांनी लावले होते. नानांनी इंग्रजांच्या व राजा राममोहन रॉय यांच्या साहाय्याने बालविवाह, सती या रुढी समाजाला किती घातक आहेत, हे ठिकठिकाणी व्याख्याने देऊन पटवून देण्याचे काम केले. अंधश्रद्धा आणि ताठर धार्मिक चालीरितींवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. या चालीरितींमुळे समाजाचे होत असलेले नुकसान त्यांनी समाजाच्या निदर्शनाला आणून दिले. याची दखल इंग्रजी राजवटीने घेऊन १८३०मध्ये इंग्रजांनी अंधश्रद्धेबरोबर जुन्या रुढींना आळा घालण्यासाठी सतीची चाल, बालविवाह या चाली कायद्याने बंद केल्या. तसेच विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी कायद्याने संरक्षण दिले. अशा तर्‍हेने बालविवाह, सतीची चाल या हिंदू धर्मातील अरिष्ठ रुढींवर बंदी आणण्यात नानांचा मोलाचा वाटा होता.
एकशेसाठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना प्रगतीपथावर नेणार्‍या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. या उद्घघाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्याशिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला. तेव्हापासूनच नाना शंकरशेठ यांना “भारतीय रेल्वेचे जनक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.
पूर्वजांप्रमाणे भटभिक्षुकी न करता नानांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. त्यामुळे अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेठ यांच्याकडे सोपवत.मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणा-या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यतक्षात उतरवणार्‍या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे.
३१ जुलै १८६५ रोजी जगन्नाथ नाना शंकरशेठ यांचा मृत्यू झाला.
नानांना भावपुर्ण अभिवादन
🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻

📚 *चालू घडामोडी (31/07/2019)* 📚


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *मुस्लिम महिला अधिकार संरक्षण(तिहेरी तलाक) विधेयक 2018 राज्यसभेत मंजूर*

◆ लोकसभेत 303  विरुद्ध 82 मतांनी मंजूर (25 जुलै 2019)

◆ राज्यसभेत 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर (30 जुलै 2019)

◆ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेत झाले मंजूर

◆ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार. 

◆ तत्काळ तिहेरी तलाकविरोधातील विधेयकाच्या बाजूने 99 तर विरोधात 84 मते पडली.

◆ तत्काळ तिहेरी तलाक बंदी करणारा भारत जगातला 21 वा देश ठरला.

● इजिप्त, सुदान, श्रीलंका, इराक, सायप्रस, जॉर्डन, अल्जेरिया, इराण, ब्रुनेई, मोरोक्को, कतार, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश,पाकिस्तानातही तिहेरी तलाकवर बंदी आहे.
https://t.me/TargetMpscMh
★ तिहेरी तलाक ?

◆ ' तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची आहे.हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.

★ मुस्लिम महिला अधिकार संरक्षण (तिहेरी तलाक) विधेयक 2018 तरतुदी

1.तत्काळ तिहेरी तलाक देणाऱ्यांना पोलीस तातडीने अटक करु शकतात, मात्र त्यासाठी स्वतः महिलेने तक्रार करायला हवी.

2.महिलेच्या रक्ताचे नातेवाईकही तक्रार दाखल करु शकतात, परंतु शेजारी -किंवा अनोळखी व्यक्तींना तक्रार करता येणार नाही.

3. तोंडी, लेखी, व्हॉट्सअ‍ॅपवर तलाक देणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

4.पीडित महिलेची बाजू ऐकल्यानंतर आरोपीला तात्काळ जामीन दिला जाऊ शकतो.

5.महिलेने तयारी दर्शवली तर मॅजिस्ट्रेट समजुतीने प्रकरण सोडवण्याची मुभा देतील.

6. पीडित महिला पोटगी मागू शकते.

7.पीडित महिलेला किती नुकसान भरपाई द्यावी हे न्यायालयातील सुनावणीनंतर निश्चित केले जाईल.

8. पीडितेची मुलंअज्ञान असतील तर त्यांची कस्टडी कोणाकडे असेल? हे न्यायाधीश ठरवतील.

9. पतीस 3 वर्ष कैद व दंड

10. तलाकपीडित स्त्री व अपत्यांसाठी निर्वाह भत्यास पात्र

11. 19 सप्टेंबर 2018 पासून जम्मू अँड काश्मीर वगळता भारतभर लागू

12. गुन्हा अजामीनपात्र मात्र, दंडाधिकारी जामीन देऊ शकणार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास
पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता*
        
◆ मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

◆ मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प हा मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा प्रस्तावित अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड) दरम्यान 117.50 कि.मी. अंतरासाठी राबविला जाणार आहे. सुमारे 70 हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

◆ विशेष म्हणजे, अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रस्तावित गती 496 किमी प्रतितास अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते मुंबई यामधील प्रवासाचा कालावधी फक्त 23 मिनिटांचा होणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...