०२ जुलै २०१९

प्रधानमंत्री मोदी के द्वारा घोषित योजना

➡️

👉 प्रधानमंत्री जनधन योजना
28 अगस्त 2014

👉 डिजिटल इंडिया
21 अगस्त 2014

👉 मेक इन इण्डिया
25 सितम्बर 2014

👉 स्वच्छ भारत मिशन
2 अक्टूबर 2014

👉 सांसद आदर्श ग्राम योजना
11 अक्टूबर 2014

👉 श्रमेव जयते -
16 अक्टूबर 2014

👉 जीवन प्रमाण (पेंशन भोगियों के लिए)
10 नवम्बर 2014

👉 मिशन इंद्र धनुष (टीकाकरण)
25 दिसम्बर 2014

👉 नीति (NITI) आयोग -
1 जनवरी 2015

👉 पहल (प्रत्यक्ष हस्तांतरण)
1 जनवरी 2015

👉 हृदय(समृध्द सांस्कृतिक विरासत संरक्षण व कायाकल्प)
21जनवरी 2015

👉 बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ
22 जनवरी 2015

👉 सुकन्या समृद्धि योजना
22 जनवरी 2015

👉 मृदा स्वास्थय कार्ड
19 फरवरी 2015

👉 प्रधानमंत्री कौशल विकास
20 फरवरी 2015

👉 प्रधानमंत्री जीवन ज्योति
9 मई 2015

👉 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा
9 मई 2015

👉 अटल पेंशन योजना -
9 मई 2015

👉 उस्ताद(usttad)(अल्पसंख्यक कारीगर)
14 मई 2015

👉 कायाकल्प (जन स्वास्थ)
15 मई 2015

👉 डीडी किसान चैनल -
26 मई 2015

👉 स्मार्ट सिटी मिशन , सबके लिए आवास योजना
25 जून 2015

👉 दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना
25 जुलाई 2015

भारतातील जागतिक वारसा स्थळे

🔺भारतातील जागतिक वारसा स्थळे🔺

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

भारताच्या नकाशावर युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने

★ भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत.

◆ ताज महाल

◆ खजुराहो मंदिर

◆ आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश

◆ फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदे

◆ जुना गोवा

◆ सांची स्तूप, मध्य प्रदेश

◆ खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश

◆ भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश

◆ चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

◆ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

◆ एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

◆ अजिंठा लेणी, महाराष्ट्र

◆ वेरूळ लेणी, महाराष्ट्र

◆ चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू

◆ महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु

◆ हंपीमधील मंदिरे, कर्नाटक

◆ पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

◆ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

◆ मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

◆ केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

◆ कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओरिसा

◆ महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

◆ भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी

आधुनिक भारताचा इतिहास

💎 आधुनिक भारताचा इतिहास 💎

भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).

१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.

२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.

लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.

भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०२ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०२ जुलै २०१९ .

● ०२ जुलै : World UFO Day

● राज्यसभेतही जम्मू-काश्मीरमध्ये ६ महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढीचा प्रस्ताव मंजूर

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर २३ धावांनी विजय मिळवला

● विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा अविष्का फर्नांडो (२१) तरुण श्रीलंकन फलंदाज ठरला

● विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा अविष्का फर्नांडो (२१) जगातील तिसरा तरुण फलंदाज ठरला

● सर्वात जलद २५ शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला

● अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे आयसीसी २०१९ विश्वचषक स्पर्धेतुन बाहेर पडला

● विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवालला संधी दिली जाण्याची शक्यता आहे

● मराठा समाजाला शिक्षणात १२% तर नोकरीत १३% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला

● अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत सरकार २०२४ पर्यंत " प्रॉक्सी वोटींग " चा पर्याय उपलब्ध करून देणार

● केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज राज्यसभा सदस्याची शपथ घेतली

● रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन एस विश्वनाथन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली

● दक्षिण आफ्रिकेच्या क्रीस्टियान बेझिडेनहॉउटने युरोपियन गोल्फ टुर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● बेंगळुरू एफसी पुणे येथे फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारणार

● पंकज अडवानी व लक्ष्मण रावत आयबीएसएफ स्नूकर विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ओएनजीसी व इंडियन ऑइलने करार केला

● जागतिक आर्थिक मंचाची (डब्ल्यूईएफ) वार्षिक बैठक चीनमध्ये आयोजित करण्यात आली

● बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ३ दिवसीय चीन दौऱ्यावर रवाना

● नेपाळमध्ये ४ जी सेवा सुरू करण्यासाठी सीजी ग्रुपने हुवाईबरोबर सामंजस्य करार केला

● अनधिकृत मालमत्ता घोषित करण्यासाठी पाकिस्तान सरकारने ३ जुलैपर्यंतची मुदत वाढवली आहे

● अमीरातने दुबई - मस्कट दरम्यान जगातील सर्वात छोटी फ्लाइट सुरू केली

● अजय रात्रा यांची आसाम रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली

● साईराज बहुतुले यांची गुजरात रणजी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली

● २०१९ कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून कॅनडा येथे सुरु झाली

● ऑलंपिक व पॅरा ऑलंपिक स्पर्धामध्ये पदक विजेत्यां खेळाडूंना प्रति महिना २० हजार रुपये पेंशन देण्यात येणार

● पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली

● पुरामुळे प्रचंड नुकसान झालेल्या केरळ राज्यासाठी जागतिक बँकेकडून २५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर

● भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमात महाराष्ट्र अव्वल स्थानावर

● भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमात कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर

● भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमात गुजरात आठव्या क्रमांकावर

● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारच्या कृषि सुधारणा समितीचे संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● एस कुमार यांची भारतीय स्टाईल रेसलिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली

● २ री संयुक्त राष्ट्र ग्लोबल सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट परिषद २०२० बीजिंग मध्ये आयोजित करण्यात येणार

● ३० व्या हाँगकाँग पुस्तक मेळाव्याचे आयोजन १७ जुलैपासून हाँगकाँग येथे करण्यात येणार

● एअर मार्शल (सेवानिवृत्त) शिरीष देव यांना वर्ष २०१७ साठीच्या " नाग भूषण " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांना वर्ष २०१८ साठीच्या " नाग भूषण " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● जल संरक्षणासाठी केंद्र सरकारने ' जल शक्ती अभियान ' सुरू केले

● केरळमध्ये स्मार्ट फार्मिंग इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना करण्यासाठी सिस्को आणि केरळ सरकारने करार केला

● २१ व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन १७ जुलैपासून कटक येथे करण्यात येणार

● भारतीय प्रो बॉक्सर वैभव यादवने डब्ल्यूबीसी एशिया टाइटल जिंकला

● ११ ऑक्टोबर २०१९ रोजी दिल्लीत भारत आंतर्राष्ट्रीय सहकारी व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार

● ३० व्या आफ्रिका इंटरनेट समिट २०१९ चे आयोजन कंपालामध्ये करण्यात आले

● चौथी दक्षिण आशियाई स्पीकर परिषद मालदीवमध्ये आयोजित करण्यात येणार

● ७ वी आशियाई राष्ट्रीय संग्रहालय संघटनेची बैठक ऑक्टोबर मध्ये मलेशिया मध्ये आयोजित करण्यात येणार

● बांगलादेश ऑक्टोबर २०१९ मध्ये एबीयू रेडिओ एशिया परिषद आयोजित करणार

● २०१९ जून महिन्यात ९९ हजार ९३९ कोटी रुपयांचे जीसटी कर संकलन झाले आहे

● आयआयटी गांधीनगरचे अंतरिम संचालक म्हणून अमित प्रशांत यांची नियुक्ती करण्यात आली

०१ जुलै २०१९

वसंतराव नाईक

वसंतराव नाईक

(०१ जुलै. १९१३:पुसद, यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र - इ.स. १८ ऑगस्ट १९७९)

 हे मराठी राजकारणी होते. डिसेंबर ५, इ.स. १९६३ ते फेब्रुवारी २०, इ.स. १९७५कालखंडादरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते.

 त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. वसंतराव नाईककांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याश्या खेड्यात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते.
 ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते.

 हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०१ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०१ जुलै २०१९ .

● ०१ जुलै : जीएसटी दिन

● ०१ जुलै : चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) दिन

● ०१ जुलै : राष्ट्रीय डॉक्टर दिन

● संकल्पना २०१९ : " Zero Tolerance To Violence Against Doctors & Clinical Establishment "

● २०१८ मध्ये जगातून स्विस बँकांत ठेवण्यात आलेला निधी ९९ लाख कोटींनी कमी झाला

● २०१८ मध्ये भारतीय संस्था व व्यक्ती यांनी स्विस बँकात ठेवलेला निधी कमी होऊन ६७५७ कोटी रूपयांवर आला

● स्विस बँकेत जास्त पैसा जमा असलेल्या देशांमध्ये ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे

● स्विस बँकेत जास्त पैसा जमा असलेल्या देशांमध्ये भारत ७४ व्या क्रमांकावर आहे

● स्विस बँकेत जास्त पैसा जमा असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान ८२ शर्मा क्रमांकावर आहे

● स्विस बँकेत जास्त पैसा जमा असलेल्या देशांमध्ये बांगलादेश ८९ व्या क्रमांकावर आहे

● भारताने रशियासोबत २०० कोटी रुपयांचा " रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे " खरेदी करण्याचा करार केला

● आजपासून प्रतिष्ठित विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा , लंडन येथे आयोजित करण्यात येणार

● एका विश्वचषक स्पर्धेत ३ शतके ठोकणारा रोहीत शर्मा चौथा फलंदाज ठरला

● विश्वचषक स्पर्धेत सलग ५ अर्धशतक ठोकणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे

● विश्वचषक स्पर्धेत सलग ३ सामन्यांमध्ये ४ बळी घेणारा मोहम्मद शमी दुसरा गोलंदाज ठरला आहे

● उत्तर कोरियात जाणारे डोनाल्ड ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत

● २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताला ३१ धावांनी पराभूत केले

● ओडिशा स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स असोसिएशन कडून अमित रोहिदासला " २०१८ वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू " म्हणून सन्मानित करण्यात आले

● ओडिशा स्पोर्ट्स जर्नलिस्ट्स असोसिएशन कडून बाॅक्सिंग प्रशिक्षक भुषण मोहंती यांना " लाईफटाईम अचिवमेंट " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● नेदरलँड संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत महिला एफआयएच प्रो लीग २०१९ चे विजेतेपद पटकावले

● डीआयजी अपर्णा कुमार यांनी अमेरिकेतील माऊंट डेनाली शिखर सर केले

● हिमाचल प्रदेशने " ड्रग-फ्री हिमाचल " अॅपचे अनावरण केले

● हिमाचल प्रदेशने ड्रग सेवन करणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनसाठी टोल-फ्री हेल्पलाइन १९०८ सुरु केली

● जर्मनीने युरोपियन अंडर-२१ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● आयबीएसएफ स्नूकर वर्ल्ड कपचे आयोजन दोहा , कतार येथे करण्यात आले

● १९९२ च्या विश्वचषकानंतर इंग्लंडने पहिल्यांदा भारताला विश्वचषक सामन्यात पराभूत केले

● स्वीडन संघाने २०१९ महिला फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

● माजी भारतीय क्रिकेटपटू राकेश शुक्ला यांचे निधन , ते ८२ वर्षांचे होते

● एस डी प्रजवल आणि ऋषी रेड्डी यांनी हरारे टेनिस स्पर्धेत दुहेरीत विजेतेपद पटकावले

● विश्वचषक स्पर्धेत यजुवेंद्र चहल भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला ( १० षटक : ८८ धावा )

● न्यूझीलंडने एकल-प्लॅस्टिक बॅग वापरावर पुर्णपणे बंदी घातली

● कराचीमध्ये सार्वजनिक परिवहन सुविधा सुधारण्यासाठी जागतिक बँकेने ७२२ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले

● जपानने इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशनमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले

● मकाऊमध्ये आयोजित एशियन स्क्वॅश जुनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत वीर चोट्रानीने सुवर्णपदक पटकावले

● पी बी आचार्य यांनी मणिपुरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

● २० वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळा नेपाळमध्ये आयोजित करण्यात येणार

● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन पार्लियामेंट " यादीत रवांडा अव्वल स्थानावर

● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन पार्लियामेंट " यादीत भारत १४९ व्या क्रमांकावर

● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन पार्लियामेंट " यादीत पाकिस्तान १०१ व्या क्रमांकावर

● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन मिनिस्ट्रियल पोझिशन " यादीत भारत ७८ व्या क्रमांकावर

● २०१९ संयुक्त राष्ट्र " वुमन इन मिनिस्ट्रियल पोझिशन " यादीत पाकिस्तान १३६ व्या क्रमांकावर

● भारतीय महिला हॉकी संघाची ताज्या एफआयएच रँकिंगवर दहाव्या स्थानावर घसरण झाली

● भारतीय पुरुष हॉकी संघाने ताज्या एफआयएच रँकिंगवर पाचवे स्थान कायम राखले

● मॅक्स व्हर्स्टप्पनने २०१९ ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली

● केशनी आनंद अरोरा यांची हरियाणाच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली

● प्रणव दास यांची जागतिक सीमाशुल्क संस्थेचे संचालक म्हणून निवड करण्यात आली

● २१ जुलै २०१९ पासून आंतरराष्ट्रीय रेती मूर्तिकला स्पर्धा अमेरिकेत आयोजित करण्यात येणार

● के नटराजन यांनी भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला .

३० जून २०१९

चालु घडामोडी वन लाईनर्स , ३० जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
३० जून २०१९ .

● ३० जून : International Day Of Parliamentarism

● ३० जून : International Asteroid Day 

● ०१ जुलै : जीएसटी दिन

● ०१ जुलै : राष्ट्रीय डॉक्टर दिन

● संकल्पना २०१९ : " Zero Tolerance To Violence Against Doctors Clinical Establishment "

● विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ट न्युझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे

● २०१९ विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ट दुसरा खेळाडू ठरला आहे

● विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ट अकरावा खेळाडू ठरला आहे

● २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ३ गडी राखून मात केली

● २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने न्युझीलंडवर ८६ धावांनी विजय मिळवला

● मर्सरच्या सर्वेनुसार आशियातल्या टाॅप २० महाग शहरांमध्ये मुंबईचं स्थान १२ वं आहे

● मर्सरच्या सर्वेनुसार जगातील सर्वात महाग शहरांमध्ये हाँगकाँग अव्वल स्थानी आहे

● " एक देश - एक रेशन कार्ड " योजना जून २०२० पासून सुरु करण्यात येणार आहे

● राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली

● एसएफसी एनवायरमेंटल टेक्नॉलॉजी कंपनीला असोकॅम इंडीयाचा वॉटर मॅनेजमेंट एक्सलेंस पुरस्कार प्रदान

● भूपेंद्र सिंह यांची राजस्थानचे पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● केरळमधील पहिले इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन एडापल्ली येथे सुरू करण्यात आले

● डीडी न्यूजचे कॅमरामन अच्युतानंद साहू यांना मरणोत्तर " नारद सन्मान " जाहीर

● उत्तर प्रदेश सरकाराने अनुसूचित जाति सूचीमध्ये १७ अति मागास जातींचा समावेश केला

● राष्ट्रीय ग्रीन मेन्टर कॉन्फरन्स २०१९ गांधीनगर , गुजरात येथे आयोजित करण्यात आली

● नेदरलँड्स संघाने फिफा महिला विश्वचषक २०१९ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

● ३ रा सीएसआर हेल्थ इंपॅक्ट पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे पार पडला

● हिंदुस्तान झिंकला महिला व बालकल्याण क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल सीएसआर हेल्थ इंपॅक्ट पुरस्कार प्रदान

● ६ वी राष्ट्रीय व्हीलचेयर बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा मोहाली , पंजाब येथे आयोजित करण्यात आली

● ६ व्या राष्ट्रीय व्हीलचेयर बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी विजेतेपद पटकावले

● आशियाई जूनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा मकाऊ येथे आयोजित करण्यात आली

● करोलिना प्लिस्कोवाने २०१९ ईस्टबॉर्न आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● भारत - फ्रान्स संयुक्त हवाई अभ्यास " गरुड VI " उद्यापासून फ्रांन्समध्ये सुरु होणार

● ३० वी जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स २०१९  इटली येथे आयोजित करण्यात येणार

● ३० व्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स २०१९ स्पर्धेसाठी ध्वजवाहक म्हणून द्युती चंदला नामांकित करण्यात आले

● वार्षिक भारत - युके पुरस्कार सोहळा लंडन येथे आयोजित करण्यात आला

● यूके-भारत संबंधासाठी केलेल्या कामाबद्दल पत्रकार मार्क टुली यांना लाईफटाइम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● अभिनेता कुणाल नायर यांना ' ग्लोबल इंडियन आयकन ऑफ द ईयर ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● श्री श्री रवी शंकर यांना रशियास्थित युरल फेडरल विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

● फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष म्हणून के के सराफ यांची नियुक्ती करण्यात आली

● बीएसईएस यमुना पॉवर लिमिटेड ने " Susthome " ऊर्जा बचत अॅपचे अनावरण केले

● क्रिकेटपटू श्याम सुंदर मित्रा यांचे निधन झाले , ते ८२ वर्षांचे होते

● पेरुने उरुग्वेला ५-४ ने पराभूत करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

● जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला ' द बेस्ट पोर्ट ऑफ द ईयर - कंटेनरलाइज्ड ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी बिहार सरकारने " सेवा समाधान " पोर्टलचे अनावरण केले

● ३२ वी आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धा इजिप्तमध्ये सुरु

● प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत सरकाराने २.५ लाख अधिक घरांना मंजूरी दिली

● तेलंगाना सरकार लवकरच प्रवासासाठी ' वन तेलंगाना कार्ड ' लॉन्च करणार आहे

● टी के राजेंद्रन यांची तमिळनाडुचे मुख्यमंत्री यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली

● गुजरात सरकारने महागाई भत्ता (डीए) मध्ये ३ टक्क्यांने वाढ केली

● पश्चिम बंगाल सरकार पर्यंटनामध्ये वाढ करण्यासाठी हेरिटेज स्थळांचे हाॅटेल्समध्ये रुपांतर करणार

● पाकिस्तान संघाने भारताला पराभूत करत एशियन टीम स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● डॉ. सुभ्रा शंकर धर यांना सी आर राव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...