२८ जून २०२४

polity questions for mpsc exam practice

1.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा किंवा विचार-विनिमय करण्याचा अधिकार आहे?

A) कलम 124 B) कलम 130 C) कलम 143 D) कलम 147

उत्तर – कलम 143


2. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्र संबंधी योग्य विधाने ओळखा.

अ) संसद न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात केवळ वाढ करू शकते मात्र घट घडवू शकत नाही.

ब) भारताचे सर्वोच्च न्यायालय अमेरिकन न्यायालयात प्रमाणे फेडरल कोर्ट म्हणून कार्य करते.

क) ब्रिटिश न्यायालयाचा प्रमाणे अपिलाचे अंतिम न्यायालयाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.

A) अ आणि ब

B) अ आणि क

C) अ ब आणि क

D) ब आणि क

उत्तर – अ, ब आणि क


3. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयांचे कार्य स्थान त्यांच्या राजधानीच्या शहरात नाही?

अ) उत्तर प्रदेश ब) मध्य प्रदेश

क) छत्तीसगड ड) सिक्किम

A) अ आणि ब

B) क आणि ड

C) अ,ब आणि क

D) अ ब आणि ड

उत्तर – अ ब आणि क


४.भारतीय राज्यघटनेच्या ह्या कलमानुसार दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.

A) कलम 214 B) कलम 226 C) कलम 230 D)कलम 231

उत्तर – कलम 231


५. गावातील अनुभवी ज्येष्ठांकडून तक्रार निवारणाच्या भारतातील पारंपरिक व्यवस्थेची सुधारित व गांधीवादी तत्त्वावर आधारित व्यवस्था म्हणजे काय?

A) लोकायुक्त B) लोक अदालत

C) लोकपाल D) कौटुंबिक न्यायालय

उत्तर – लोकअदालत


६. राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात योग्य पर्याय निवडा.

अ)कॅबिनेट ने केवळ लेखी स्वरुपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात.

ब) अशी तरतूद घटनेत 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली.

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ,ब

D) वरीलपैकी एकही नाही

उत्तर – फक्त अ


७. उच्च न्यायालयाच्या त्या खालच्या न्यायालया वरील प्रशासकीय नियंत्रणात कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?

A) नेमणुका

B) निवृत्ती वेतन

C) बदली

D) सक्तीची निवृत्ती

उत्तर – निवृत्तीवेतन


८.73 व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबद्दल च्या कोणत्या तरतुदी राज्यसरकार साठी  ऐच्छिक आहेत?

अ) दोन-तीन स्तरीय रचना ब) निश्चित कार्यकाळ

क) ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती ड) जिल्हा नियोजन समिती

A) क आणि ड

B) अ आणि ब

C) ब आणि ड

D) अ आणि क

उत्तर – क आणि ड


९.केंद्रीय निवडणूक आयोगा संबंधित अयोग्य विधान ओळखा.

अ) याला अखिल भारतीय स्वरूप आहे

ब)देशात मुक्त व न्याय निवडणुका घेणे हेतू आहे.

क) राष्ट्रपती किंवा राज्यपाल आयोगास त्यांच्या मागणीनुसार स्टाफ उपलब्ध करून देते.

ड)राज्यपाल आयोगास मदत करण्यासाठी प्रादेशिक आयुक्त नेमू शकतात.

पर्यायी उत्तरे

A) अ , ब

B) ड

C) अ

D) अ ब क ड

उत्तर – ड


१०. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते?

A) राज्यपाल  B) संसद  C) विधिमंडळ  D) राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर – विधिमंडळ


११. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे?

A) कलम 165 B) कलम 166 C) कलम 164 D) कलम 76

उत्तर – कलम 165


१२.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात उच्च न्यायालय व कनिष्ठ न्यायव्यवस्था यांच्या संदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत?

A) भाग 4 B) भाग 5 C) भाग 6 D) भाग 7

उत्तर – भाग 6


१३.न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत पुढील विधाने विचारात घ्या.

अ)केवळ संसदीय व राज्य विधिमंडळाचे कायदे नव्हे तर शासकीय कार्यकारी आदेशाची ही तपासणी करणे न्यायिक पुनर्विलोकन याच्या साह्याने शक्य आहे.

ब)राज्यघटनेच्या तत्वांचे चुकीच्या कायद्यापासून संरक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट आहे.

A) फक्त अ बरोबर

B) फक्त ब बरोबर

C) दोन्ही बरोबर

D) दोन्ही चूक

उत्तर – दोन्ही बरोबर


१४. खालील विधाने विचारात घ्या.

अ) राज्य विधिमंडळाचे कायदे केवळ राज्याच्या परिक्षेत्रा साठीच लागू असतात

ब) संसदेचे कायदे भारतीय नागरिकांच्या परदेशातील संपत्तीला लागू असतात वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

A) फक्त अ

B) फक्त ब

C) अ आणि ब

D) वरीलपैकी नाही

उत्तर – अ आणि ब


१५.आदिवासी क्षेत्रांना संसदीय कायदा लागू होणार नाही असे निर्देश देण्याचे अधिकार अनुक्रमे कोणाला आहेत?

A) राष्ट्रपती, राज्यपाल

B) राज्यपाल, राष्ट्रपती

C) केवळ राज्यपाल

D) पंतप्रधान, राष्ट्रपती

उत्तर – राज्यपाल राष्ट्रपती


१६. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या परिशिष्टात केंद्र व राज्यांच्या कायदेविषयक विषयांची विभागणी दिलेली आहे?

A) परिशिष्ट 4 B) परिशिष्ट 2

C) परिशिष्ट 7 D) परिशिष्ट 8

उत्तर – परिशिष्ट 7


17. शेषाधिकार संबंधित खालील विधाने विचारात घ्या.

अ) भारतीय घटनेत शेषाधिकार याची तरतूद ऑस्ट्रेलियन घटनेवरून घेतली आहे.

ब) भारतात असे शेषाधिकार यांचे अधिकार संसदेस आहेत.

क)  स्वित्झर्लंड मध्ये शेषाधिकार केंद्राकडे आहेत.

ड) स्पेनमध्ये शेषाधिकार केंद्र व राज्य दोघांकडेही आहेत.

A) वरील सर्व योग्य

B) केवळ ब योग्य

C) ब आणि ड योग्य

D) ब आणि क योग्य

उत्तर ब आणि ड योग्य


18. भारतीय निवडणूक आयोगामार्फत खालीलपैकी कोणत्या निवडणुका घेतल्या जातात?

अ) भारताचा राष्ट्रपती ब) भारताचे उपराष्ट्रपती

क) संसद ड) राज्यविधी मंडळ

इ) नगरपालिका

A) अ,ब,क, इ

B) ब,क,ड

C) अ,क,ड

D) अ,ब,क,ड

उत्तर – अ, ब,क,ड


१९.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांना हस्तक्षेपास मनाई आहे?

A) कलम 326 B) कलम 328

C) कलम 329 D) कलम 330

उत्तर – कलम 329


२०. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष तसेच सदस्यांच्या सेवाशर्ती ठरवण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

A) संघ लोकसेवा आयोग B) संसद

C) राष्ट्रपती D) वरीलपैकी नाही

उत्तर – राष्ट्रपती


२१. राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल कोणास सादर करतो?

A) संबंधित राज्याचे राज्यपाल

B) संबंधित राज्याचे विधिमंडळ

C) संबंधित राज्याचे मुख्यमंत्री

D) संबंधित राज्याचे विधिमंडळ अध्यक्ष

उत्तर – संबंधित राज्याचे राज्यपाल


२२. राज्याच्या कार्यकारी विभागात कोणाचा समावेश होतो?

अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री मंत्रिमंडळ

क) महाधिवक्ता ड) विधानसभा अध्यक्ष


A) अ आणि ब

B) ब आणि क

C) अ, ब, आणि क

D) अ,ब,क,ड

उत्तर – D. अबकड


२३. भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयी ची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे?

A) अमेरिका B) ब्रिटन

C) कॅनडा D) ऑस्ट्रेलिया

उत्तर – कॅनडा


२४.कोणत्या घटना दुरुस्तीने दोन किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याची तरतूद संविधानात केली?

A) चौथी घटनादुरुस्ती

B) सहावी घटनादुरुस्ती

C) सातवी घटना दुरुस्ती

D) आठवी घटनादुरुस्ती

उत्तर 7 वी घटना दुरुस्ती


२५. 73 व्या घटनादुरुस्तीने कायद्यातील कोणत्या कलमाला मूर्त स्वरूप दिले?

A) कलम 19

B) कलम 40

C) कलम 45

D) कलम 21

उत्तर – कलम 40


२६. पंचायत समिती सभापती स्वतःचा राजीनामा कोणाकडे सादर करतात?

A) विभागीय आयुक्त

B) जिल्हाधिकारी

C) पंचायत समितीचा उपसभापती

D) जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

उत्तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष


२७. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 50 टक्के आरक्षण कधी मिळाले?

A) 2000

B) 2005

C) 2007

D)2011

उत्तर – 2011


28. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला?

A) अशोक राव मेहता समिती

B) एल एम सिंघवी समिती

C) दिनेश गोस्वामी समिती

D) ताखत्मल जैन समिती

उत्तर एम सिंघवी समिती

सराव प्रश्नसंच


1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

 उत्तर............ क) कलम ३६० 

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

 उत्तर......... क) अंतर्गत अशांतता 

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

 उत्तर....... क) चार महिने  

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

 उत्तर..... क) दिल्ली  

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

 उत्तर........ अ) उच्च न्यायालय 

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर....... क) कलम २२६  

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

 उत्तर....... क) सरकारिया आयोग 

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

 उत्तर....... अ) कलम २८० 

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

 उत्तर....... ब) कलम २६२ 

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

 उत्तर........ अ) कलम ३२४ 

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

 उत्तर....... अ) संथानाम समिती 

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

 उत्तर........ अ) पाच वर्षे  

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

 उत्तर...... पर्याय (ड) 

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

 उत्तर....... ड) निवडणूक आयोग 

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर.......... ब) राज्य  

लोकसभा

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:


लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.


सभासदांची संख्या :

घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.


मतदारसंघ निर्धारण आयोग :

या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.


उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


निवडणूक पद्धत :

लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.


लोकसभेचा कार्यकाल :

पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.


सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.


बैठक किंवा अधिवेशन :

घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


गणसंख्या :

कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.


पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)


लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.


कार्य :

1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.

2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.

3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.

4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.

5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.

6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.

7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.

8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.

जिल्हा_परिषद



जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:


जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.


रचना :- 

प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.


सभासद संख्या - 

प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.


सभासदांची निवडणूक - 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.


पात्रता (सभासदांची) - 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.


आरक्षण : 

1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.


कार्यकाल : 

5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.


अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :

 जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.


कार्यकाल :

अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.


राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे


मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.


बैठक : 

जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.


मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:


घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत


विधानसभेची रचना :

170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.


राखीव जागा :

घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.


निवडणूक : 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.


उमेदवारांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.


गणसंख्या : 1/10

अधिवेशन : 

दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


सभापतीचे कार्य आणि अधिकार :

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.

2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.

3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.

4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.


जनरल माहिती :

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.

2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.

3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.

4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.

6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.

7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.

8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

भारतीय संविधान प्रश्नसंच :


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

 19 ते 22

 31 ते 35

 22 ते 24

 31 ते 51

उत्तर : 19 ते 22


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 राज्यपाल

उत्तर : राष्ट्रपती


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 पंतप्रधान

 सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर : सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

 11 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 10 जानेवारी 1947

 9 डिसेंबर 1946

उत्तर : 11 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

 परिशिष्ट-1

 परिशिष्ट-2

 परिशिष्ट-3

 परिशिष्ट-4

उत्तर : परिशिष्ट-3


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 47

 48

 52

 यापैकी नाही

उत्तर : 47


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. आंबेडकर

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 पंडित नेहरू

 लॉर्ड माऊंटबॅटन

उत्तर : डॉ. राजेंद्रप्रसाद


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 डॉ. आंबेडकर

 महात्मा गांधी

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

 लोकसभा

 विधानसभा

 राज्यसभा

 विधानपरिषद

उत्तर : राज्यसभा


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

 लोकसभा सदस्य

 मंत्रीमंडळ

 राज्यसभा सदस्य

 राष्ट्रपती

उत्तर :  लोकसभा सदस्य


11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

 1.8 वर्षे

 6 वर्षे

 4 वर्षे

 5 वर्षे

उत्तर : 5 वर्षे


12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

 राष्ट्रपती

 सभापती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

उत्तर : उपराष्ट्रपती


13. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

 संरक्षण

 तार

 पोस्ट

 जमिनमहसूल

उत्तर : जमिनमहसूल


14. लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ----- पासून मिळतात.

 कुटुंब

 शाळा

 दोन्हीही

 मंदिर

उत्तर : दोन्हीही


15. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 सरन्यायधीश

उत्तर : राष्ट्रपती


16. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

 लष्करी

 अध्यक्षीय

 हुकूमशाही

 संसदीय

उत्तर : संसदीय


17. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

 18

 12

 16

 20

उत्तर : 12


18. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

 2

 1

 3

 4

उत्तर : 3


19. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 अर्थमंत्री

उत्तर : पंतप्रधान


20. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

 4 वर्षे

 5 वर्षे

 6 वर्षे

 कायमस्वरूपी

उत्तर : 6 वर्षे

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

> घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. 

> विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत


✅ विधानसभेची रचना :

> 170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.


✅ राखीव जागा :

> घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. 

> अनुसूचीत जातींसाठी 33 तर अनुसूचीत जमातीसाठी 14 राखीव जागा आहेत.


✅ निवडणूक : प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.


✅ उमेदवारांची पात्रता :

> तो भारताचा नागरिक असावा.

> त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.

> संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


✅ सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

✅ गणसंख्या : 1/10

✅ अधिवेशन : दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

✅ सभापती व उपसभापती :

> विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


✅ सभापतीचे कार्य आणि अधिकार :

> विधानसभेत मांडण्यात येणार्‍या प्रस्तावाला संमती देणे.

> विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.

> सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.

> जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.


✅ जनरल माहिती :

> धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.

> धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.

> धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.

> मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

> घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.

> मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.

> मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.

> स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.


लोकपाल

🔰 पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष

📚 गर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम

📚 नयायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी


✅ लोकपाल निवड समिती:-

1)पंतप्रधान

2)सरन्यायाधीश

3)लोकसभा अध्यक्ष

4)लोकसभा विरोधी पक्षनेते

5)कायदेतज्ज्ञ


✅ लोकपाल पात्रता

1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश

2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव


✅ अध्यक्ष अपात्रता

- 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती

- लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती

- संसद व विधिमंडळ सदस्य

- अपराधी दोषी


✅ कार्यकाल

5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो

- पगार

अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे

सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे


✅ लोकपाल कायदा 2013

- राज्यसभा:-17 डिसेंबर 2013

- लोकसभा:-18 डिसेंबर 2013

- राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014

- अंमल:-16 जानेवारी 2014


- रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

लोकसंख्या बाबत IMP POINTS


•हेन्री वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जातात.

•जनगणना प्रथम 1872 मध्ये ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या अंतर्गत सुरू झाली.

• पहिली जनगणना ब्रिटिश राजवटीत १७ फेब्रुवारी १८८१ रोजी W.C. प्लॉडेन, भारताचे जनगणना आयुक्त.

• त्या काळात लॉर्ड रिपन भारताचे व्हाईसरॉय होते.

• स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये आयोजित करण्यात आली होती, जी त्याच्या सलग मालिकेतील सातवी जनगणना होती.

• जनगणना 2011 ही 1872 पासूनची देशाची 15वी राष्ट्रीय जनगणना होती आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी होती.

परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न

• ग्रेट डिव्हाइडचे वर्ष - 1921

• सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य - बिहार (1102)

• सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य - अरुणाचल प्रदेश (17)

• सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – नवी दिल्ली (11320)

• कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – लक्षद्वीप

• सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य – उत्तर प्रदेश

• सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य – सिक्कीम

• सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य – केरळ

• सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य – हरियाणा

• सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य – केरळ

• सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य – बिहार

• राज्याची सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या –
UP> महाराष्ट्र> MP> पंजाब

• भारतातील साक्षरता दर (श्रेणी)
• 74.04 % एकूण आहे
• 82.14% पुरुषांसाठी
• 65.46% महिलांसाठी
• M आणि F मधील 16.68% अंतर

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती

पदाचे नाव  :-
1] मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) :- 4887 पदे
2] हवालदार (CBIC & CBN) :- 3439 पदे

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1 & 2 :- 10वी उत्तीर्ण  किंवा समतुल्य.

वयाची अट :- 01 ऑगस्ट 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1] MTS & हवालदार (CBN) :- 18 ते 25 वर्षे
2] हवालदार (CBIC) :- 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT) :- ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
Apply Link :- https://ssc.gov.in/


जाहिरातीसाठी पाहण्यासाठी:- click here 

२७ जून २०२४

लोकसभा महिती


🔖अध्यक्ष : ओम प्रकाश बिर्ला
🔖सभागृह नेते : नरेंद्र मोदी
🔖विरोधी पक्षनेते : राहुल गांधी
🔖लोकांचे प्रतिनिधित्व करते

📝 राज्यसभा माहिती :
🔖सभापती : जगदीप धनखड( उपराष्ट्रपती)
🔖सभागृह नेते : जे पी नड्डा
🔖विरोधी पक्षनेते : मल्लिकार्जुन खर्गे
🔖राज्याचे प्रतिनिधित्व करते

📝 स्मृती मानधना, वनडेमध्ये सलग शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू
🔖मंधानाने 17 जून रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर
🔖दक्षिण आफ्रिकेविरद्ध

📝एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत भारतीय महिलांच्या सर्वाधिक धावा
🔖स्मृती मानधना: दक्षिण आफ्रिका विरुद्ध 3 डावात 343 धावा (2024)
🔖जया शर्मा: न्यूझीलंड विरुद्ध 5 डावात 309 धावा (2003-04)
🔖मिताली राज: ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 डावात 289 धावा (2004-05)
🔖मिताली राज: इंग्लंड विरुद्ध 4 डावात 287 धावा (2009-10)
🔖पुनम राऊत: दक्षिण आफ्रिका विरुद्ध 5 डावात 263 धावा (2020-21)

📝  मार्क रुटे हे NATO चे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती
🔖ते 2010 पासून नेदरलँड चे पंतप्रधान
🔖मार्क रुट्टे 1 ऑक्टोबर 2024 पासून सरचिटणीस म्हणून त्यांची कार्ये स्वीकारतील

📝 उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO).
🔖 निर्मिती : ४ एप्रिल १९४९.
🔖 मुख्यालय : ब्रसेल्स, बेल्जियम
🔖 एकूण सदस्य : 32 (स्वीडन).
🔖वॉशिंग्टन कराराद्वारे स्थापित.

📝 भरत लाल यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) सरचिटणीस म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली
🔖गुजरात केडरचे 1988 च्या बॅचचे (निवृत्त) भारतीय वन सेवा (IFoS) अधिकारी
🔖 गेल्या वर्षी जूनमध्ये या पदावर नियुक्त झाले होते.

📝 कपिल देव बनले प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष (PGTI)
🔖2021 मध्ये PGTI बोर्डाचा सदस्य झाले
🔖1983 क्रिकेट विश्वचषक विजेता कर्णधार
🔖HR श्रीनिवासन यांच्या जागी त्यांची नियुक्ती
🔖PGTI, 2006 मध्ये स्थापन झाली

महाराष्ट्रातील पहिले गाव


1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)

6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
12) पहिले तंटामुक्त गाव: मळेगाव (बारामती - पुणे)
13) पहिले सौरऊर्जा गाव: धरणगाव (सोलापूर)
14) पहिले महिला बचत गटाचे गाव: पाणीव (जळगाव)
15) पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)

16) पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव: कोल्हार (राहता - अहमदनगर)
17) पहिले हरित गाव: कोरडगाव (कराड - सातारा)
18) पहिले स्मार्ट गाव: कनेसर (बारामती - पुणे)
19) पहिले बायोफ्युएल गाव: बारड (चंद्रपूर)
20) पहिले साक्षर गाव: देवगाव (सातारा)

21) पहिले कीटकनाशकमुक्त गाव: हरदा (यवतमाळ)
22) पहिले कार्बन नकारात्मक गाव: इन्नेरवाडी (पुणे)
23) पहिले शून्य कचरा गाव: मौजे कळंब (कोल्हापूर)
24) पहिले ई-लर्निंग गाव: साखरवाडी (सातारा)
25) पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)

26) पहिले हायटेक कृषी गाव: सलेहवाडी (जुन्नर - पुणे)
27) पहिले खादी ग्रामोद्योग गाव: बरसिंगे (लातूर)
28) पहिले जलसंधारणाचे गाव: राजापूर (नाशिक)
29) पहिले स्वच्छता मोहीम राबवलेले गाव: पन्हाळगड (कोल्हापूर)
30) पहिले जैवविविधता संवर्धन गाव: चंद्रपूर (चंद्रपूर)

31) पहिले सीएनजी चालवलेले गाव: वलण (सांगली)
32) पहिले ग्रीन हाऊस गाव: पिंपळनेर (धुळे)
33) पहिले जीआयएस तंत्रज्ञान वापरलेले गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
34) पहिले 100% लसीकरणाचे गाव: खेड (रत्नागिरी)
35) पहिले जलशुद्धीकरण प्रकल्पाचे गाव: वरवंटी (सोलापूर)

36) पहिले हर्बल औषधी वनस्पती संवर्धन गाव: अडूर (गडचिरोली)
37) पहिले अंगणवाडी नर्सरीचे गाव: निरगुडसर (पुणे)
38) पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्र असलेले गाव: मळेगाव (नाशिक)
39) पहिले वनौषधी प्रयोगशाळा असलेले गाव: शिरपूर (धुळे)
40) पहिले सेंद्रिय शेती करणारे गाव: कासारवाडी (सांगली)

41) पहिले स्वयंपूर्ण ग्राम पंचायत: परळी (बीड)
42) पहिले ड्रिप सिंचन प्रणाली वापरणारे गाव: येरळवाडी (सातारा)
43) पहिले समाजवादी गाव: सरसोली (नाशिक)
44) पहिले आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
45) पहिले आदिवासी ग्रामविकास प्रकल्प गाव: मेंढा (गडचिरोली)

46) पहिले वनधन योजना लागलेले गाव: नवल (नाशिक)
47) पहिले पॅकेजिंग सुविधा असलेले गाव: वाडी (नागपूर)
48) पहिले अन्न प्रक्रिया केंद्र असलेले गाव: खराड (रायगड)
49) पहिले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले गाव:- कुडाळ (सिंधुदुर्ग)
50) पहिले सार्वजनिक वाचनालय असलेले गाव: पाटोदा (अहमदनगर)

51) पहिले अक्षय ऊर्जा वापरणारे गाव: बनकरवाडी (पुणे)
52) पहिले हरित क्रांती राबवणारे गाव: मालेगाव (पुणे)
53) पहिले ग्रामस्वराज्य योजना गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)
54) पहिले पॉलिहाऊस शेतीचे गाव: अरण (पुणे)
55) पहिले पूर्ण साक्षर गाव: गढेगाव (सातारा)

56) पहिले अन्न सुरक्षा योजना राबवलेले गाव: भोर (पुणे)
57) पहिले कृषी पर्यटन गाव: बारामती (पुणे)
58) पहिले इको-फ्रेंडली गाव: लवासा (पुणे)
59) पहिले अन्नप्रक्रिया उद्योग संकुल: लातूर (लातूर)
60) पहिले झीरो बजेट नैसर्गिक शेतीचे गाव: बेलवंडी (अहमदनगर)

61) पहिले प्रायोगिक जैवविविधता पार्क: सिरोंचा (गडचिरोली)
62) पहिले पवन ऊर्जा प्रकल्पाचे गाव: चाळीसगाव (जळगाव)
63) पहिले ग्रीन बिल्डिंग प्रकल्पाचे गाव: कोथुर्वे (सातारा)
64) पहिले जलसंधारणाचे गाव: कडूस (पुणे)
65) पहिले शाश्वत ऊर्जा वापरणारे गाव: करमाळा

66) पहिले पूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध गाव: राजुरी (सातारा)
67) पहिले जलशुद्धीकरण प्रणाली असलेले गाव: वळवंडी (अहमदनगर)
68) पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी संशोधन केंद्र असलेले गाव: नारायणगाव (पुणे)
69) पहिले जैविक खत वापरणारे गाव: येवलेवाडी (पुणे)
70) पहिले जलशेतीचे गाव: निरगुडसर (पुणे)

71) पहिले कृषी उद्योग संकुल असलेले गाव: शिरूर (पुणे)
72) पहिले उर्जा बचत प्रकल्प राबवलेले गाव: दरेकरवाडी (पुणे)
73) पहिले आदर्श ग्राम हायवे: हिवरे बाजार ते राळेगण सिद्धी (अहमदनगर)
74) पहिले जैविक शेती आणि सेंद्रिय उत्पादनांचे गाव: पिंपळगाव (सांगली)
75) पहिले शाश्वत जल व्यवस्थापन प्रकल्प असलेले गाव: वडगाव मवाळ (पुणे)

76) पहिले शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केलेले गाव: भोर (पुणे)
77) पहिले आदिवासी कल्याण प्रकल्प गाव: धानोरा (गडचिरोली)
78) पहिले सौरऊर्जा चालित शाळा: चांदोरी (नाशिक)
79) पहिले पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र: ठोसेघर (सातारा)
80) पहिले कौशल्य विकास केंद्र असलेले गाव: पिंपळनेर (धुळे)

81) पहिले वन्यजीव संवर्धन प्रकल्प: टाडोबा (चंद्रपूर)
82) पहिले नदीजोड प्रकल्पाचे गाव: खेड (रत्नागिरी)
83) पहिले ग्रामीण उद्योजकता विकास केंद्र: वरवंटी (सोलापूर)
84) पहिले शैक्षणिक असलेले गाव: कुडाची (कोल्हापूर)
85) पहिले कॅशलेस व्यवहार स्वीकारणारे गाव: म्हसवे (सातारा)

86) पहिले स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण केंद्र: विटा (सांगली)
87) पहिले बायोगॅस आधारित उर्जा उत्पादन: मळेगाव (नाशिक)
88) पहिले पवन ऊर्जा प्रकल्प: शिराळा (सांगली)
89) पहिले हरित तंत्रज्ञान वापरणारे गाव: वडगाव मवाळ (पुणे)
90) पहिले पर्यावरणपूरक वस्ती योजना: रांजणी (सोलापूर)

91) पहिले वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प: मेलघाट (अमरावती)
92) पहिले पशुधन विकास प्रकल्प: पंढरपूर (सोलापूर)
93) पहिले जलवायू परिवर्तन अनुकूलन प्रकल्प: आंबेगाव (पुणे)
94) पहिले पूर्णतः सौरऊर्जा चालवलेले गाव: मोहितेवाडी (सातारा)
95) पहिले डिजिटल शिक्षण प्रकल्प: साखरवाडी (सातारा)

96) पहिले कुटीर उद्योग प्रकल्प: शिरगाव (रायगड)
97) पहिले कृषी औद्योगिक संकुल: कराड (सातारा)
98) पहिले हरित ऊर्जा प्रकल्प: वरवंटी (सोलापूर)
99) पहिले ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प: पुणे-नाशिक मार्ग
100) पहिले जैवविविधता पार्क: रांजणी (सांगली)

101) पहिले ई-कचरा व्यवस्थापन प्रकल्प: सांगली
102) पहिले आदर्श ग्रीन व्हिलेज: कोळेवाडी (पुणे)
103) पहिले पूर्णपणे सौरऊर्जा वापरणारे ग्राम पंचायत: येरळवाडी (सातारा)
104) पहिले हायटेक वसाहत प्रकल्प: पिंपळगाव (नाशिक)
105) पहिले स्वच्छ व पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र: सागरेश्वर (सांगली)

106) पहिले सेंद्रिय मांस उत्पादन: शिरूर (पुणे)
107) पहिले जलसंवर्धन योजना: महाबळेश्वर (सातारा)
108) पहिले सौर ऊर्जा शाळा प्रकल्प: रांजणगाव (पुणे)
109) पहिले सर्वसमावेशक शैक्षणिक केंद्र: वाडा (ठाणे)
110) पहिले बहुउद्देशीय कृषी केंद्र: करमाळा (सोलापूर)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

२६ जून २०२४

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947



- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपविली जाईल असे २० फेब्रुवारी, १९४७ रोजी घोषित केले.

- माउंटबॅटन योजना: 3 जून 1947 भारताचा व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याने फाळणीची योजना सादर केली. योजना काँग्रेस व मुस्लिम लीम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (१९४७ संमत करून योजना लगेच अमलात आणली गेली.


- भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट, १९४७ पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले.

- भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला.

- व्हाइसरॉय हे पद रद्द करण्यात आले 

- आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभाना देण्यात आले. 

- नवीन राज्यघटना तयार करून अमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचे अधिकार दोनी देशांच्या सविधान सभांना देण्यात आले. 

- भारतमंत्री हे पद रद्द करण्यात आले.

- भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली.

- नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशातील व त्याच्या प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा १९३५ नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली.

- इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले

कोण होते फिरोज गांधी: जाणून घेऊया....



● फिरोज गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 रोजी मुंबईतील पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जहांगीर आणि आईचे नाव रतिमाई होते .


● ते मुंबईतील खेतवाडी परिसरातील नौरोजी नाटकवाला भवनात राहत असत. फिरोजचे वडील जहांगीर किलिक निक्सन येथे अभियंता होते, नंतर त्यांची वॉरंट अभियंता म्हणून पदोन्नती झाली.


● फिरोज त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात लहान होता; त्यांना दोराब आणि फरीदुन जहांगीर, अशी दोन भाऊ आणि , तहमिना कार्शश अशा दोन बहिणी होत्या. 


● फिरोज यांचे कुटुंबीय मूळचे दक्षिण गुजरातमधील भरुचचे असून त्यांचे वडिलोपार्जित घर अजूनही कोटपारीवाडमध्ये आहे.


● 1920 च्या दशकाच्या सुरूवातीच्या वडिलांच्या निधनानंतर, फिरोज आपल्या आईसह अलाहाबादमधील आपल्या अविवाहित काकू, शिरीन कमिश्शरी यांच्या कडे राहिला गेले.


● फिरोज यांचे प्रारंभिक शिक्षण अलाहाबादमधील विद्या मंदिर हायस्कूलमध्ये झाले आणि त्यानंतर त्यांनी इव्हिंग ख्रिश्चन कॉलेजमधून शिक्षण घेतले.


● फिरोज हे तेथील लेडी डफरीन रुग्णालयात कामाला होते. तेथे त्यांची ओळख इंदिरा नेहरू यांच्याशी झाली. त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी लग्न केले. इंदिरा गांधी या पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कन्या होत्या. त्यांना राजीव गांधी आणि संजय गांधी असे दोन मुले झाली.


● फिरोज गांधी हे एक भारतीय राजकारणी आणि पत्रकार होते . ते लोकसभेचे सदस्यही देखील होते. 


तलाठी विशेष


 *भारतातील  पहिली रेल्वे लाइन? Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*


 *भारतातील  पहिले तारायंत्र? Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*


*भारतातील  पहिली सूत गिरणी? Answer- मुंबई (१८५४)*


*भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध? Answer- इ.स. १८५७*


 *भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र? Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*


*भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र? Answer- मुंबई (१९२७)*


*भारतातील  पहिला बोलपट? Answer- आलमआरा (१९३१)*


 *भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना? Answer- १९५१*


 *भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका? Answer- १९५२*


*भारतातील  पहिली परमाणु चाचणी? Answer- पोखरण, राजस्थान*


 *भारतातील  पहिले क्षेपणास्त्र? Answer- (पृथ्वी १९८८)*


*भारतातील  पहिला उपग्रह? Answer- आर्यभट्ट (१९७५)*


 *भारतातील पहिली अणुभट्टी? Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*


 *भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना? Answer- दिग्बोई (१९०१)*


*भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना? Answer- दुल्टी (१८८७)*


*🌷भारतातील सर्वप्रथम घटना :*🌷


 *पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*


*पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*

 

 *पहिले पोस्टाचे तिकीट* *१*

 *ऑक्टोबर १८५४* 


*पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)* 


 *पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*


 *पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*

 

 *पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*

 

*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*

 

 *पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*


*पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*

 

 *पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*

 

 *पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*

 

*पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*

 

*भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*

 

 *पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*

 

*पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*


🌷*भारतातील पहिले :* 🌷

 

 *भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*

 

*पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*

 

*पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*

 

 *राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*

 

 *पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*

 

 *पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*

 

 *पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

 

 *पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*

 

*स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*

 

 *पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*

 

*भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*

 

*इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*


*सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*


 *सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*


*सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*


*भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ? Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*


   *सर्वात उंचवृक्षकोणते ? Answer- देवदार*


 *भारतातील सर्वात मोठेसरोवर? Answer वुलर सरोवर (काश्मीर)*


 *भारतातील सर्वात मोठा जिल्हा? Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*


  *भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा? Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*


 *भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)? Answer- राजस्थान*


*भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य? Answer- उत्तर प्रदेश*


*भारतातील सर्वात मोठे धरण? Answer- भाक्रा (७४० फूट)*


*भारतातील सर्वात मोठा धबधबा? Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*


 *भारतातील सर्वात मोठे वाळवंट? Answer- थर (राजस्थान)*


*भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म? Answer- खरगपूर (प. बंगाल)*


 *भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण? Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*


 *भारतातील सर्वात मोठी मस्जिद? Answer- जामा मशीद*


*भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य? Answer- मध्य प्रदेश*


*भारतातील सर्वात उंच दरवाजा? Answer- बुलंद दरवाजा*


*भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा? Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*


*भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? Answer- मावसिनराम (मेघालयं)


थोर भारतीय विचारवंत



(१) राजा राममोहन राॅय :--
           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली.
मृत्यू २७ सप्टेंबर १८३३

(२) स्वामी विवेकानंद :--
            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे
भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण.

(३) रवींद्रनाथ टागोर :--
            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली
हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१.

(४) न्यायमूर्ती रानडे :--
           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१.

(५)लोकमान्य टिळक :--
             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.

(६) महात्मा गांधी :--
            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली
लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८.

(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--
              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे
पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार.

(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--
         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६.

(९) सुभाषचंद्र बोस :--
               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते.

(१०) इंदिरा गांधी :--
               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या
पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.

बस्टील



 बॅस्टील पॅरिसच्या पूर्वबाजूस असलेला व ब्रिटिशांच्या हल्ल्यापासून पॅरिसचे रक्षण करण्यासाठी बांधलेला फ्रान्समधील इतिहास प्रसिद्ध किल्ला.
बॅस्टील या शद्बाचे दोन अर्थ आहेत : तटबंदीयुक्त इमारत व शस्त्रागार. याची उभारणी ह्यूजिस ऑब्रिएट याच्या मार्गदर्शनाखाली १३६९-१३७० मध्ये शतवार्षिक युद्धाच्या वेळी झाली.

 पाचव्या चार्ल्सच्या राजवाड्याच्या संरक्षणार्थ ती करण्यात आली. या आयताकृती किल्ल्याला २३ मी. उंचीचे आठ बुरूज असून ते सलग भिंतीने जोडलेले होते. किल्ल्याच्या सभोवती रुंद खंदक होता. फ्रान्सचा शासकीय तुरुंग म्हणून याची प्रसिद्धी होती.

तेथे राजकीय व संकीर्ण स्वरुपाचे गुन्हेगार कैदी म्हणून ठेवीत. सोळाव्या शतकापर्यंत त्याचा लष्करी दृष्ट्या उपयोग केला जाई. त्यानंतर १६२० पासून फ्रान्सचा पंतप्रधान आर्मां झां रीशल्य याने त्याचा कारागृह म्हणून प्रथम वापर करण्यास सुरुवात केली. सुमारे ४० कैदी येथे असत. त्यांचा येथे अनन्वित छळ केला जाई.

राजाच्या विरोधकांची न्यायालयीन चौकशी न करता त्यांच्या कारवासाची मुदत राजाच्या मर्जीवर अवलंबून असे. येथे जप्त केलेली पुस्तकेही आणून ठेवीत. या किल्ल्याच्या व्यवस्थापनास फार खर्च येऊ लागला; म्हणून तो पाडण्यात यावा, अशा प्रकारचे विचारही १७८४ मध्ये प्रसृत झाले.


फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात बॅस्टील हे अनियंत्रित राज्यसत्तेच्या अन्यायाचे व जुलमाचे प्रतीक मानले गेले. जुलै १७८९ च्या सुरुवातीस १६ व्या लूईने राष्ट्रीय सभा (नॅशनल असेंब्ली) नेस्तनाबूत करण्यासाठी पॅरिसच्या आसपास लष्कराची जमवाजमव सुरू केली, तेव्हा राष्ट्रीय सभेने त्याला लष्कर मागे घेण्यास सांगितले; पण लुईने ह्या कृतीस नकार दिला व त्या वेळचा लोकप्रिय झालेला अर्थमंत्री झाक नेकेर यास बडतर्फ केले (१७८१).

राजाच्या बेमुर्वतपणामुळे चिडून जाऊन कॅमिल देमुलच्या नेतृत्वाखाली जनतेने जोराचा उठाव केला व केला व १४ जुलै १७८९ रोजी तेथील कैदी सोडविण्यासाठी व युद्धसामग्री हस्तगत करण्यासाठी बॅस्तीलच्या किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्यावरील प्रमुख अधिकारी व राज्यपाल बेरनार रने झॉरदां लोनो याच्या मदतीस यावेळी फक्त १३० फ्रेंच सैनिक होते.

त्यास पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा तेथे नव्हता. थोड्याशा प्रतिकारानंतर दुपारच्या सुमारास लोनोने किल्ला क्रांतिकारकांच्या ताब्यात दिला. क्रांतिकारकांनी किल्ल्यात प्रवेश केल्यावर तुरुंग फोडून तेथील कैद्यांस मुक्त केले आणि किल्ल्याच्या मोडतोडीस प्रारंभ केला. त्या वेळी आत फक्त सात कैदी होते. प्रक्षुब्ध जमावाने लोनोचा बळी घेतला.

बॅस्टीलचा पाडाव हा लष्करी दृष्ट्या फारसा महत्त्वाचा नसला, तरी त्याचे राजकीय महत्त्व मोठे आहे. यामुळे क्रांतीकारकांना लुईविरुद्ध महत्त्वाचा विजय मिळाला. लोकांचा लूईबद्दलचा आदर कमी झाला. बॅस्तीलच्या पाडावामुळे पॅरिसच्या जनतेत स्वसामर्थ्याची प्रखर जाणीव झाली.

बॅस्टीलचा किल्ला पुढे संपूर्णपणे पाडण्यात येऊन त्या जागी १७८९ व १८३० मध्ये झालेल्या क्रांत्यांमधील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एक ब्राँझचा स्तंभ उभारण्यात आला. पुढे १४ जुलै हा बॅस्तीलदिन म्हणून राष्ट्रीय सुटीचा दिवस जाहीर करण्यात आला (१८८०). तो दिवस मिरवणुका, भाषणे, नृत्य इत्यादींनी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

मराठी व्याकरण - काळ ओळखा.


● *क्रिया चालू असते, तेव्हा क्रियापद वर्तमानकाळी असते.*

● *क्रिया पूर्वी झालेली असते, तेव्हा क्रियापद भूतकाळी असते.* 

● *क्रिया पुढे व्हायची असते, तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते.*


🔹 *खालील वाक्यांचा काळ ओळखा.*


*(१) सुप्रिया पुस्तक वाचते.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(२) सुमितने पुस्तक वाचले.*

उत्तर -- भूतकाळ


*(३) चंदना पुस्तक वाचील.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(४) आर्यन चित्र काढतो.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(५) धिरजने चित्र काढले.*

उत्तर -- भूतकाळ


*(६) आदित्य चित्र काढील.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(७) सानिया साखर खाते.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(८) सृष्टीने साखर खाल्ली.*

उत्तर -- भूतकाळ


*(९) रोहिणी साखर खाईल.* 

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१०) ताई शाळेत जाते.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(११) माई शाळेत गेली.* 

उत्तर -- भूतकाळ


*(१२) बाई शाळेत जाईल.*

उत्तर -- भविष्याकाळ


*(१३) आम्ही अभ्यास करतो.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(१४) आम्ही अभ्यास केला.*

उत्तर -- भूतकाळ


*(१५) आम्ही अभ्यास करू.* 

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१६) पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते.*

उत्तर -- भूतकाळ


*(१७) उद्या आमची सहल जाईल.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१८) मी अभ्यास करतो.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(१९) गाय चारा खाते.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(२०) म्हैस चारा खाईल.* 

उत्तर -- भविष्यकाळ

पंतप्रधान बाबत मते

❇️ लॉर्ड मोर्ले:-

समानातील प्रथम

मंत्रिमंडळ रुपी कमानीच्या आधारभूत शिळा


❇️ हर्बर्ट मॅरीसन:-

सरकारचा प्रमुख या नात्याने तो समानातील प्रथम आहे पण आजच्या काळात हे वर्णन तोकडे आहे.


❇️ विल्यम हारकोर्ट:-

कमी तेजस्वी ताऱ्यामधील चंद्र


❇️ जेनिग्ज:-

ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा हा सूर्य आहे.


❇️ एच जे लास्की:-

ज्या केंद्राभोवती संपूर्ण सरकारी यंत्रणा फिरते असा हा केंद्रबिंदू आहे.


❇️ एच आर जी ग्रीवझ:-

सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान सरकारचा स्वामी आहे.


❇️ मनरो:-

हा राज्याच्या नौकेचा कप्तान आहे.


❇️ रमसे मुर:-

राज्याच्या नौकेचा सुकाणू चालवणारा खलाशी आहे.

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे :-


1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ ग्रीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जेफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बुर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ व्हॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एंजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गुरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बुध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पॅसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ ग्रेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पंडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गुरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

ससदीय प्रणाली व अध्यक्ष प्रणालीचा तुलनात्मक अभ्यास.

🔵 ससदीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️या प्रणालीमध्ये धोरणे व कृतींसाठी कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते.

1. बहुमताच्या पक्षाची सत्ता

2. सामूहिक जबाबदारीचे तत्त्व

5. राजकीय एकजिनसीपणा : एकच राजकीय विचारसरणी

4. दुहेरी सदस्यत्व : संसद सदस्य मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळ व कायदेमंडळ दोहोंचे सदस्यत्व.

5. पंतप्रधानाचे नेतृत्व

6. कनिष्ठ गृहाचे विसर्जन करता येते

7. अधिकारांचे एकत्रीकरण.


🔵 अध्यक्षीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️यथे घटनात्मकदृष्ट्या कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळापासून स्वतंत्र असते.

1. अध्यक्ष आणि सभासद यांची निश्चित

कालावधीसाठी निवड.

2. सामूहिक जबाबदारी नाही.

3. राजकीय एकजिनसीपणा असेलच असे नाही.

4. एकेरी सदस्यत्व

5. अध्यक्षाचे नेतृत्त्व

6. अधिकारांची विभागणी


✅ ससदीय प्रणालीचे फायदे

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात सामंजस्य.

2. उत्तरदायी सरकार.

3. विस्तृत प्रतिनिधित्व


✅ अध्यक्षीय प्रणालीचे फायदे

1. स्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये निश्चितता.

3. अधिकार विभागणीवर आधारित.

4. तज्ज्ञांचे सरकार.


🔴 ससदीय प्रणालीमधील उणीवा

1. अस्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये सातत्याचा अभाव.

3. अधिकार विभागणीच्या तत्त्वाविरोधी.

4. नवशिक्यांचे सरकार.

👉 उदा.बहुतांशी युरोपीय राष्ट्र, जपान, कॅनडा, भारत, मलेशिया, स्वीडन.


🔴 अध्यक्षीय प्रणालीमधील उणीवा

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात संघर्ष.

2. उत्तरदायी सरकार नाही.

3. एकाधिकारशाही 

4. संकुचित प्रतिनिधित्व.

👉 उदा :- अमेरिकन राष्ट्रे काही अपवादसह (उदा. कॅनडा), अफगाणिस्तान, ब्राझील, घाना, मालदीव, रशिया, फिलिपिन्स, तुर्की, बेलारुस, सायप्रस, श्रीलंका.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...