२९ मे २०२४

विठ्ठल रामजी शिंदे :



जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

मृत्यू - 2 जानेवारी 1944.

1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.

'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.

'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.

जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.

अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान :


1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.

1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.

द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने 'सेवा सदन' ही संस्था.

अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.

ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.

1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

1923 - तरुण ब्रहयो संघ.

1937 - बहुजन पक्षाची स्थापना.

स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.

वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन :


प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.

1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.

Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

Untouchable India,

History Of Partha,

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न

माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .

वैशिष्ट्ये :


शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.

अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

1904 - मुंबई धर्म परिषद.

1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.

शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.

प्राचीन भारत इतिहास:

* वेद काल

०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.
०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.
०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.
०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.
०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे.  ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.
०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.

* ऋग्वैदिक काळ

०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.
०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.
०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.
१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.
११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.
१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.
१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.
१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.
१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.
१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.
१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.
१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.
१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.
२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.

* उत्तर वैदिककाळ 

२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.
२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.
२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.
२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.
२५.  उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.
२६.  उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.
२७.  उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे. व्यापारासाठी निष्क, शतमान आणि कृष्णाल या मुद्रांचा वापर केला जात असे.
२८. उत्तर वैदिक काळात ऋग्वैदिक काळाच्या तुलनेत धर्माचे स्वरूप अधिकच जटील होत गेले. यज्ञात बळींचे तसेच पुरोहितांचे महत्व वाढत गेले. या काळात अनेक प्रकारचे यज्ञ केले जाऊ लागले.

फाजल अली आयोग

▪️राज्यपुनर्रचना आयोग

▪️PAK आयोग

▪️अध्यक्ष : फाजल अली


💥सदस्य :

1. के. एम. पण्णीकर

2. हृदयनाथ कुंझरू


▪️सथापना :- 29 डिसेंबर 1953 .

▪️अहवाल :-  सप्टेंबर 1955.


1) भाषावर पुनर्रचना मान्य

2) फक्त एक राज्य एक भाषा तत्त्वाचा भारताच्या एकतेसाठी अस्वीकार

3) देशाची एकता व सुरक्षा टिकवणे.

4) भाषिक व सांस्कृतिक एकसंघपणा

5) वित्तीय, आर्थिक व प्रशासकीय कारणे 

6) मूळ घटनेतील राज्यांचे 4 भागातील वर्गीकरण रद्द केले.

7) 16 घटक राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती. 

৪) उत्तरेतील हिंदी भाषिक पट्ट्याचे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान असे 4 भाग करावे. 

9) अल्पसे बदल करून पूर्वेकडील राज्ये आहे तशीच राहू द्यावी.

10) बिहार, आसाम, मधून अनुसूचित (Tribal) राज्ये बनवण्याची मागणी फेटाळली.

11) शिख राज्य निर्मितीस विरोध.


राज्यघटना टेस्ट


1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. मानवेंद्र नाथ रॉय✅

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅

४. पं मोतीलाल नेहरू


3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी✅


4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.

१. कलम न 1✅

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4


5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?

१. यु एस ए 

२. जपान

३.जर्मनी

४. ब्रिटिश✅


6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?

१. बी एन राव

२. जवाहरलाल नेहरू

३. के एम मुन्शी

४. एच सी मुखर्जी✅


7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.

१. २२ जुलै १९४७✅

२. १७ नोव्हेंबर १९४७

३. २४ जानेवारी १९५०

४. ४ नोव्हेंबर१९४८


8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?

१. डॉ बाबासाहेब आंबेडकर

२. पं मोतीलाल नेहरू

३. डॉ राजेंद्र प्रसाद

४. जवाहरलाल नेहरू✅


9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.

१. २६/०१/१९५०✅

२. २६/११/१९४९

३. २६/०८/१९४७

४. ०४/११/१९४८


10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?

१. डॉ के एम मुन्शी

२. एन गोपालस्वामी अय्यंगार

३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

४. बी एन राव✅


1. खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेले राज्य ओळखा.

१. अंदमान निकोबार 

२. दादर नगर हवेली 

३. दीव दमण

४. सिक्किम✅


2. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?

१. गृहमंत्री 

२. पंतप्रधान 

३. राष्ट्रपती ✅

४. उपराष्ट्रपती


3. राज्यघटनेनुसार शेषाधिकार कोणाच्या हाती असतात?

१. राष्ट्रपती 

२. संसद ✅

३. सर्वोच्च न्यायालय 

४. पंतप्रधान


4. खालील विधाने विचारात घ्या.

१. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली 

२. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिचे अध्यक्ष होते 

३. बी एल मित्तर हे घटना समितीचे सदस्य होते

१. 1

२. 1, 2

३.1, 2, 3✅

४. 3


5. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आला कलम 371 (अ)नुसार विशेष अधिकार आहेत?

१. हरियाणा 

२. नागालँड ✅

३. आसाम 

४. अरुणाचल प्रदेश


6. राज्यघटनेच्या 7 व्या परिशिष्टात कशाचा समावेश होतो?

१. केंद्रशासित प्रदेश

२. राष्ट्रपतींचे वेतन 

३. केंद्र राज्य व समवर्ती सूची✅

४. राज्यसभेतील प्रतिनिधित्व


7. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?

१. सिमला परिषद 

२. कॅबिनेट मिशन ✅

३. क्रिप्स योजना 

४. ऑगस्ट प्रस्ताव


8.  राज्यघटनेत जातीला स्थान नाही कारण.

१. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे

२. जातीव्यवस्था विषमता कारक आहे 

३. जातीव्यवस्थेत अस्पृश्यतेचा उगम आहे 

४. वरीलपैकी सर्व✅


9. भारतीय राज्य घटनेचे वर्णन कसे करता येईल 

१. अधिक ताठर कमी लवचिक

२ अधिक लवचिक कमी ताठर ✅

३. ना लवचिक ना ताठर 

४. वरीलपैकी नाही


10. 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना स्वीकृत करण्यात आली त्यावेळी घटनेत किती कलमे आणि परिशिष्ट अंतर्भूत होती?

१. 315 कलमे व 7 परिशिष्टे

२. 395 कलमे व 8 परिशिष्ट✅

३. 398 कलमे व 6 परिशिष्टे

४. 398 कलमे व 8 परिशिष्टे


यूपीएससी अभ्यासक्रम मराठी मध्ये

 नमस्कार मित्रानो आज आपण या लेखात ( UPSC syllabus ) यूपीएससी अभ्यासक्रम बघणार आहोत. तसेच या लेखात आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम, आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तसेच यूपीएससी मुलाखत या सर्व घटकांची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू.


यूपीएससी परीक्षा अभ्यासक्रम:

 देशात यूपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये IAS ची परीक्षा हि सर्वोच्य स्थानी मानली जाते. आज आपण या मधील IAS च्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेऊया. सध्याच्या वेळेला आणि भूतकाळाला जोडणारा यूपीएससी अभ्यासक्रमाचा उच्च स्तर म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काठीण्य पातळी असलेला अभ्यासक्रम आहे. Upsc.gov.in वर जाहीर केलेल्या यूपीएससीच्या अधिकृत अधिसूचने मध्ये यूपीएससी अभ्यासक्रमाचा उल्लेख केलेला आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम हा IAS च्या तयारीचा मूळ आणि IAS परीक्षेत निवडलेला पहिला घटक आहे. UPSC परीक्षेतील प्रत्येक गोष्ट आपण UPSC च्या अभ्यासक्रमामधून आपण समजून घेऊ शकतो. यूपीएससी चा अभ्यासक्रम समजून घेणे ही आयएएस परीक्षेत यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. उमेदवारांना हे समजून घेणे आवश्यक आहे की सध्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्ताची घटना ही सामान्य अध्ययन अभ्यासक्रमाच्या मूलभूत विषयांशी निगडीत आहे आणि सध्याच्या घडामोडींच्या सहाय्याने उमेदवार या प्रकरणाची प्रासंगिकता समजून घेऊ शकतात.

IAS प्रिलिम्स आणि IAS मुख्य परीक्षेसाठी दरवर्षी यूपीएससीच्या अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम अधिसूचित केला जातो.IAS तयारीचा पहिला आवश्यक घटक म्हणजे IAS अभ्यासक्रमाची आपणास स्पष्ट समज असणे आवशक आहे. IAS प्रिलिम्स अभ्यासक्रम आणि IAS मुख्य अभ्यासक्रमाचा स्वतंत्रपणे यूपीएससी अधिसूचनेमध्ये उल्लेख केला आहे. परंतु IAS मुख्य परीक्षा अभ्यासक्रम म्हणजे IAS प्रिलिम्स अभ्यासक्रमाचा विस्तृत विस्तार आहे. उमेदवारने IAS अभ्यासक्रमाची खोली समजून घेणे आवश्यक आहे. यूपीएससी अभ्यासक्रम समजण्यासाठी मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका टॉर्च म्हणून काम करतात. याशिवाय आयएएस च्या तयारीच्या मार्गावर राहण्यासाठी उमेदवारांना दररोजच्या चालू घडामोडींचा आभ्यास करणे आवश्यक आहे.

IAS टॉपर्स केलेल्या उमेदवारांचे योग्य विश्लेषण आणि IAS च्या मागील प्रश्नपत्रिकां मधून आयएएस तयारीला दिशा प्रदान करते. परीक्षेची खोली समजून घेण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास नेहमीच आयएएस अभ्यासक्रमाच्या विषयाशी संबंधित ठेवण्यासाठी उमेदवारांना यूपीएससी अभ्यासक्रम अंतर्भूत करणे आवश्यक आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम IAS च्या तयारीची मर्यादा ठरवते. यूपीएससी मध्ये IAS अभ्यासक्रम वेगळ्या अस्तित्वात नसतो, ही त्यांची गतिशीलता आहे जी IAS परीक्षा अधिक जटिल बनवते. यूपीएससी परीक्षेत IAS अभ्यासक्रमात नमूद केलेले सर्व विषय IAS बनू पाहणारया परीक्षार्थींना, तसेच सामान्य माणसाला समजून घेण्याची मागणी करतात.


आयएएस अभ्यासक्रम 2022 – पूर्व परीक्षा

पेपरप्रश्न आणि वेळमार्क
सामान्य अध्ययन पेपर – ११०० प्रश्न200
सामान्य अध्ययन पेपर – २ (CSAT – Qualifying only)८० प्रश्न200 ( या मार्कांचा विचार केला जात नाही )
एकूण200




IAS – आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर १

  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व असणार्‍या सध्याच्या घटना.
  • भारत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास.
  • भारतीय आणि जागतिक भूगोल – भौतिक, सामाजिक, भारत आणि जगाचा आर्थिक भूगोल.
  • भारतीय राज्य व राज्यशास्त्र-राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण, मुलभूत हक्कांचे प्रश्न इ.
  • आर्थिक आणि सामाजिक विकास, टिकाऊ विकास, गरीबी, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इ.
  • पर्यावरणीय विषय, जैव-विविधता आणि हवामान बदल – या विषयावर विषय विशेषतेची आवश्यकता नाही.
  • सामान्य विज्ञान.

प्रीलिम्स परीक्षेसाठी यूपीएससीने आयएएस अभ्यासक्रमातील चालू घडामोडींना अव्वल स्थान दिले आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. आपण असे म्हणू शकतो की आयएएस तयारीच्या दिशेने निर्णय घेण्यामध्ये हा एक घटक महत्वाचा आहे. आयएएसच्या इच्छुकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या सद्य घटनांचा विचार करून सर्व विषयांचा अभ्यास केला पाहिजे.

इतर सर्व विषय आयएएसच्या पूर्वपरीक्षा परीक्षेसाठी तितकेच महत्वाचे आहेत, परंतु उमेदवाराने आयएएसच्या तयारीत असंबद्ध विषय सोडण्याची सवय विकसित केली पाहिजे. भारतीय राजकारण हा असा एक विषय आहे जिथे उमेदवार नेत्यांच्या राजकीय विधानांबद्दल वाचण्यात वेळ वाया घालवतात. परंतु ही सवय मर्यादित ठेवण्याची आणि केवळ घटनात्मक कार्या पुरती मर्यादीत ठेवण्याची सूचना देते.


आयएएस प्रिलिम्स अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर -2 (CSAT)

  • आकलन.
  • संवाद कौशल्यासह परस्पर वैयक्तिक कौशल्ये.
  • तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता.
  • निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे.
  • सामान्य मानसिक क्षमता.
  • मूलभूत संख्या (संख्या आणि त्यांचे संबंध, परिमाण च्या ऑर्डर इ.) (दहावी ची पातळी), डेटा स्पष्टीकरण (चार्ट, आलेख, सारण्या इ. – (दहावी ची पातळी)

IAS – आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक ( पारंपारिक ) पेपर-आधारित परीक्षा आहे. ज्यात उमेदवारांना प्रश्नांसाठी लांब उत्तरे लिहिण्याची आवश्यकता असते. सामान्य अध्ययनच्या पेपर व्यतिरिक्त, एक निबंध पेपर आहे ज्यामध्ये उमेदवारांना दोन निबंध लिहिणे आवश्यक आहे.

आयएएस मुख्य परीक्षा विषय व त्यांचे गुण खाली दिले आहेत.

पेपरपेपर चे नावमार्क
घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या भाषांमधून उमेदवाराने
निवडलेल्या भारतीय भाषेपैकी एक भाषा. (केवळ पात्रता )
३०० (केवळ पात्रता)
इंग्रजी (केवळ पात्रता)३०० (केवळ पात्रता)
निबंध लेखन२५०
सामान्य अध्ययन पेपर – १२५०
सामान्य अध्ययन पेपर – २२५०
सामान्य अध्ययन पेपर – ३२५०
सामान्य अध्ययन पेपर – ४२५०
पर्यायी – विषय पेपर १२५०
पर्यायी – विषय पेपर २२५०
आयएएस मुख्य (लेखी)१७५०
आयएएस मुलाखत२७५
एकूण२०२५
UPSC syllabus in Marathi PDF

नावाप्रमाणेच आयएएस मुख्य परीक्षा ही उमेदवारांची सुध्दा मुख्य परीक्षा आहे. आयएएस निवड केवळ आयएएस मुख्य (लेखी) आणि आयएएस मुख्य (मुलाखत) मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित आहे. यूपीएससी अधिकृत अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम विषयाची यादी वेळोवेळी प्रदान करते. यूपीएससी अभ्यासक्रम पेपरनिहाय स्वरुपात देण्यात आला आहे आणि उमेदवारांना त्याच पद्धतीने आयएएस परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.

आयएएस अभ्यासक्रम – निबंध पेपर

यूपीएससीच्या अधिसूचनेत आयएएस निबंध पेपर अभ्यासक्रमाचा उल्लेख नाही. अधिकृत अधिसूचनेमध्ये फक्त एक विस्तृत रूपरेषा प्रदान केली गेली आहे. परंतु उमेदवारांकडून मिळालेल्या अपेक्षेचा उल्लेख अधिसूचनेत करण्यात आला आहे. “त्यांच्या कल्पना सुव्यवस्थित पद्धतीने मांडण्यासाठी आणि संक्षिप्तपणे लिहिण्यासाठी त्यांनी निबंधाच्या विषयाशी जूळून जाणे अपेक्षित आहे.

यूपीएससी ने नेहमीच तत्वज्ञान, लोक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यावर विषय दिला आहे. या निबंधातून उमेदवारांच्या जागतिक दृष्टिकोनाची चाचणी घेतली जाते. उमेदवाराने गुंतलेली समस्या कशी पाहिली आणि त्या समस्येचे निराकरण कसे सुचविले यावर या विषयातील यश अवलंबून असते.

आयएएस अभ्यासक्रम – सामान्य अध्ययन पेपर  


इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड भूगोल ऑफ द वर्ल्ड सोसायटी.

  • भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत, कला, साहित्य आणि आर्किटेक्चरच्या मुख्य पैलूंचा समावेश.
  • आधुनिक भारतीय इतिहास अठराव्या शतकाच्या मध्य काळा पासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्तिमत्त्व, आणि मुद्दे.
  • स्वातंत्र्य चळवळ – त्याचे विविध टप्पे आणि देशातील विविध भागातील महत्त्वपूर्ण योगदानकर्ते / योगदान.
  • देशातील स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि पुनर्रचना.
  • जगाच्या इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती, महायुद्धे, राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, विस्तारवाद, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी घटनांचा समावेश आहे.
  • भारतीय समाजातील विविध वैशिष्ट्ये आणि विविधता.
  • महिलाची भूमिका आणि महिलांची संघटना, लोकसंख्या आणि संबंधित समस्या, दारिद्र्य आणि विकासात्मक समस्या, शहरीकरण, त्यांच्या समस्या आणि त्यांचे उपाय.
  • भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम.
  • सामाजिक सशक्तीकरण, जातीयवाद, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता.
  • जगाच्या भौतिक भूगोलातील ठळक वैशिष्ट्ये.
  • जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यांचा समावेश असलेले ) जगातील विविध भागात (भारतासह) प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या स्थानासाठी जबाबदार घटक.
  • भूकंप, सुनामी, ज्वालामुखीय, चक्रीवादळ इत्यादी, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे भौगोलिक वैशिष्ट्यांमधील बदल, वनस्पती आणि जीव-जंतु आणि अशा बदलांचा परिणाम यासारख्या महत्त्वपूर्ण भौगोलिक घटना.

सामान्य अध्ययन पेपर – 

शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध.

  • भारतीय राज्यघटना – ऐतिहासिक अधोरेखित, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्ती, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना.
  • संघ आणि राज्ये यांची कार्ये आणि जबाबदारया, फेडरल स्ट्रक्चरशी संबंधित मुद्दे आणि आव्हाने, स्थानिक पातळीवरील अधिकार आणि वित्तपुरवठा आणि त्यातील आव्हाने.
  • विवाद निराकरण यंत्रणा यांचे विविध अवयव आणि संस्था यांच्यात शक्तींचे पृथक्करण.
  • लैंगिक संतुलन प्रतिबिंबित करणारे एक कार्यबल असण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि महिला उमेदवारांना प्रोत्साहित केले जाते.
  • भारतीय घटनात्मक योजनेची इतर देशांच्या घटनेशी तुलना.
  • संसद व राज्य विधिमंडळ – रचना, कार्यप्रणाली, व्यवसायाचे आचरण, अधिकार व सुविधा व त्याद्वारे उद्भवणारे प्रश्न.
  • कार्यकारी आणि न्यायपालिकेची रचना, संघटना आणि कार्य-सरकारची मंत्रालये आणि विभाग, दबाव गट आणि औपचारिक / अनौपचारिक संघटना आणि त्यांची लोकसभेमधील भूमिका.
  • लोकप्रतिनिधी कायद्याची ठळक वैशिष्ट्ये.
  • विविध घटनात्मक पदाची कार्ये, अधिकार, कार्ये व जबाबदारया, विविध नेमणुका. वैधानिक, नियामक आणि विविध अर्ध-न्यायिक संस्था.
  • सरकारची धोरणे आणि विविध क्षेत्रातील विकासासाठी हस्तक्षेप आणि त्यांच्या अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे.
  • विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग – स्वयंसेवी संस्था, बचत गट, विविध गट आणि संघटना, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्था आणि इतर भागधारकांची भूमिका.
  • केंद्र व राज्ये यांनी असुरक्षित लोकसंख्ये साठी कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, या असुरक्षित विभागांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सुधारणेसाठी यंत्रणा, कायदे, संस्था स्थापन केले आहेत.
  • आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन संबंधित सामाजिक क्षेत्र / सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे.
  • दारिद्र्य आणि उपासमारीशी संबंधित मुद्दे.
  • शासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, ई-गव्हर्नन्स अप्लिकेशन्स, मॉडेल्स, यश, मर्यादा आणि संभाव्यतेचे महत्त्वपूर्ण पैलू. नागरिकांची सनद, पारदर्शकता आणि जबाबदारी आणि संस्थात्मक आणि इतर उपाय.
  • लोकशाहीमध्ये नागरी सेवांची भूमिका.
  • भारत आणि त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध.
  • द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गटबाजी, आणि भारत किंवा भारताच्या हितावर परिणाम करणारे करार.
  • विकसनशील देशांच्या राजकारणाचा आणि भारताच्या हितावर आधारित राजकारणाचा प्रभाव, भारतीय डायस्पोरा.
  • महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, आणि त्यांची रचना.

सामान्य अध्ययन पेपर – ३

  • तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन.
  • भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, गतिशीलता, संसाधनांचा विकास, विकास आणि रोजगाराशी संबंधित मुद्दे.
  • समावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे.
  • सरकारी बजेट.
  • देशातील विविध भागात मुख्य पीक-पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली, साठवण, शेती उत्पादनांचे वाहतूक आणि विपणन मुद्दे व संबंधित अडचणी, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ई-तंत्रज्ञान.
  • प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किंमतींशी संबंधित मुद्दे. सार्वजनिक वितरण प्रणाली- उद्दीष्टे, कामकाज, मर्यादा, सुधार, बफर साठा आणि अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान मोहिम, पशु संगोपन अर्थशास्त्र.
  • भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.
  • भारतातील जमीन सुधारना.
  • अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणात बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम.
  • पायाभूत सुविधा: ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इ.
  • गुंतवणूक मॉडेल.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान- घडामोडी आणि त्यांचे अनुप्रयोग आणि दैनंदिन जीवनातील प्रभाव.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारतीयांची उपलब्धि; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
  • आयटी, स्पेस, कॉम्प्यूटर्स, रोबोटिक्स, नॅनो-टेक्नॉलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित विषयांमध्ये जागरूकता.
  • संवर्धन, पर्यावरण प्रदूषण आणि र्‍हास, पर्यावरणाचा प्रभाव मूल्यांकन.
  • आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन
  • विकास आणि अतिरेकी प्रसार यांच्यात दुवा.
  • अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि राज्य-नसलेल्या इतर घटकांची भूमिका.
  • संप्रेषण नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सची भूमिका, सायबर सुरक्षाच्या मूलभूत गोष्टी, मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध.
  • सुरक्षा आव्हाने आणि सीमाभागातील त्यांचे व्यवस्थापन – दहशतवादासह संघटित गुन्ह्यांचा दुवा.
  • विविध सुरक्षा दले आणि एजन्सी आणि त्यांचा आदेश.

सामान्य अध्ययन पेपर – ४

नीतिशास्त्र, अखंडता आणि योग्यता या पेपरमध्ये उमेदवारांची वृत्ती आणि त्यांची अखंडता, सार्वजनिक जीवनातील संभाव्यता आणि त्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्नांशी संबंधित असलेल्या समस्यांविषयी आणि समाजाशी वागताना होणारया संघर्षांबद्दलच्या प्रश्नांचा अभ्यास यात समावेश असेल. त्यासोबत खालील विस्तृत क्षेत्रे कव्हर केली जातील.

  • नीतिशास्त्र आणि मानवी इंटरफेस: मानवतेच्या नीतीमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र – खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमध्ये. मानवी मूल्ये – महान नेते, सुधारक आणि प्रशासकांचे जीवन आणि शिकवण्यांचे धडे, मूल्यमापन करण्यामध्ये कौटुंबिक समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका.
  • वृत्ती: सामग्री, रचना, कार्य त्याचा प्रभाव आणि विचार आणि वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय दृष्टीकोन, सामाजिक प्रभाव आणि मन वळवणे.
  • नागरी सेवा, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेचे समर्पण, दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती, सहिष्णुता आणि करुणेसाठी योग्यता आणि मूलभूत मूल्ये.
  • भावनिक बुद्धिमत्ता-संकल्पना आणि प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि अनुप्रयोग.
  • भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
  • सार्वजनिक / नागरी सेवेची मूल्ये आणि सार्वजनिक प्रशासनात नीतिशास्त्र. स्थिती आणि समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, नियम आणि विवेक, जबाबदारी आणि नैतिक कारभार. प्रशासनात नैतिक आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक मुद्दे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स.
  • कारभाराची शक्यता: सार्वजनिक सेवेची संकल्पना, शासन आणि संभाव्यतेचा तात्विक आधार, सरकारमधील माहिती सामायिकरण आणि पारदर्शकता, माहितीचा अधिकार, संहिता.
  • नीतिशास्त्र, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा वितरणाची गुणवत्ता, सार्वजनिक निधीचा उपयोग, भ्रष्टाचाराची आव्हाने.
  • वरील मुद्द्यांवरील केस स्टडीज.

UPSC मध्ये पर्यायी विषय कोणते असतात?

पर्यायी – विषय पेपर १


आयएएस मुख्य परीक्षेत 25 पर्यायी विषय आहेत आणि त्यातील फक्त एक विषय उमेदवार निवडू शकतो. पर्यायी विषयाला एकून १७५० पैकी ५०० गुण आहेत. हे एकूण ३० % च्या आसपास आहे. म्हणून उमेदवारांना पर्यायी विषयांची काळजीपूर्वक निवड करण्याची सूचना देण्यात आली आहे कारण ते आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते किंवा तोडू शकते.

खाली आयएएस मुख्य वैकल्पिक विषयांची अधिकृत यादी आहे. उमेदवार पर्यायी विषय म्हणून कोणत्याही एका विषयाची निवड करू शकतात.


शेतीपशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानमानववंशशास्त्र
वनस्पतिशास्त्ररसायनशास्त्रसिव्हिल अभियांत्रिकी
वाणिज्य आणि लेखाअर्थशास्त्रविद्युत अभियांत्रिकी
भूगोलइतिहासभूशास्त्र
कायदाव्यवस्थापनगणित
वैद्यकीय विज्ञानयांत्रिकी अभियांत्रिकीतत्वज्ञान
भौतिकशास्त्रराज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधमानसशास्त्र
सार्वजनिक प्रशासनसमाजशास्त्रसांख्यिकी
प्राणीशास्त्र




पर्यायी – विषय पेपर 

उमेदवार त्यांच्या वैकल्पिक विषय म्हणून पुढीलपैकी कोणत्याही भाषेचे साहित्य निवडू शकतात.

आसामीबंगालीडोगरी
बोडोहिंदीगुजराती
काश्मिरीकन्नडकोंकणी
मैथिलीमल्याळममणिपुरी
नेपाळीमराठीपंजाबी
संस्कृतओडियासंथाली
तामिळउर्दूतेलगू
सिंधीइंग्रजी

अधिक माहिती साठी या संकेत स्थळाला भेट देऊ शकता . संघ लोक सेवा आयोग

आपणास  हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. जर आपणास इतर कोणत्याही विषया बद्दल माहिती हवी असेल तर आपण कमेंट करू शकता. जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी त्या विषयावर लेख उपलब्ध करून देऊ.

भारताची राज्यघटना भारतीय संविधान

भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.

नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.

1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.

ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.
अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.
यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.
संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.

त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.

सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.

मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.
राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

________________________________________

काही महत्वपूर्ण वैशिट्ये :

मूलभूत आधिकार
सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे
संघराज्य प्रणाली
प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये.
विभाग :

प्रशासकीय (Executive)
विधीमंडळे (Legislative)
न्यायालयीन (Judicial).

भारताचा राष्ट्रध्वज

● सिस्टर निवेदिता यांनी तयार केलेल्या ध्वज

- 1904

- लाल रंग हा स्वातंत्र्य आणि विजयाचे प्रतिक 

- वज्र हे शक्तीचे प्रतीक आहे 

- वंदे मातरम् हे बंगाली भाषेत लिहिले आहे.


● वंदे मातरम् ध्वज

- 1906

- हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचे आडवे पट्टे

- 8 कमळाची फुले जी 8 प्रांताची प्रतिक

- वंदे मातरम् हे हिंदीतील शब्द, सूर्य आणि चंद्र 


● बर्लिन समितीचा ध्वज

- 1907

- मादाम भिकाजी कामा यांनी बर्लिनमध्ये अनावरण केले

- केशरी, पिवळा, हिरवा रंग आणि 8 कमळाची फुले. माहिती संकलन वैभव शिवडे. 

- वंदे मातरम् हे हिंदीतील शब्द आणि सूर्य आणि चंद्राचे प्रतिक 


● होमरूल चळवळीतील ध्वज

- 1917

-युनियन जॅक हा ब्रिटिश सत्तेचा भाग होता 

- 7 स्टार (सप्तर्षी/उर्षा मुख्यतः)

- क्रिसेंट आणि वरती चंद्र आणि चांदणी


● काँग्रेसेचा ध्वज

- 1921

- पांढरा, लाल आणि हिरवा रंग

- या झेंड्यासाठी गांधीजींनी पांढरा पट्टा आणि चरखा सुचवला होता


● स्वराज ध्वज

- 1931

- तीन रंगाचा ध्वज स्विकारला

- धर्मनिरपेक्ष ध्वज केशरी, पांढरा, हिरवा आणि यावरती चरखा होता


● स्वतंत्र भारताचा ध्वज

- 1947

- 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेत हा ध्वज स्विकारण्यात आला 

- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.

- मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.

- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीचा बोध होतो.

- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. माहिती वैभव शिवडे. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला 'अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.


मूलभूत संरचनेशी संबंधित खटले व मूळ संरचनेतील घटक (सर्वोच्च न्यायालय ठरविल्याप्रमाणे)

📌दिल्ली जुदिशियल सर्विसेस असोसिएशन खटला ( 1991)

1)कलम ३२, १३६, १४१ व १४२ अनुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार.


📌इद्र सहानी खटला (1992)

 -मंडल खटला या नावाने ओळखला जातो.

1)कायद्याचे राज्य


📌कमार पद्मा प्रसाद खटला 1992

स्वतंत्र न्यायव्यवस्था.


📌कीहोतो हॉलोहोन खटला (1993 )

- पक्षांतर खटला नावाने ओळखला जातो

१. मुक्त व न्याय्य निवडणुका 

२. सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक संरचना.


📌रघुनाथराव खटला (1993)

१. समानतेचे तत्त्व

२. भारताची एकात्मता व अखंडता


📌एस. आर. बोम्मई. खटला (1994)

१. संघराज्यीय प्रणाली

२. धर्मनिरपेक्षता

३. लोकशाही

४. देशाची एकात्मता व अखंडता

५. सामाजिक न्याय

६. न्यायालयीन पुनर्विलोकन


📌एल. चंद्रकुमार खटला (1997)

कलम २२६ व २२७ अनुसार उच्च न्यायालयाचे अधिकार.


📌इद्र सहानी खटला ( 2000)

समानतेचे तत्त्व


📌ऑल इंडिया जजेस असोसिएशन खटला 2002.

1)स्वतंत्र न्यायव्यवस्था


📌कलदीप नायर खटला (2006)

१. लोकशाही

२. मुक्त व न्याय्य निवडणुका


📌एम नागराज खटला(2006)

समानतेचे तत्त्व

२७ मे २०२४

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो.

2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला आहे.

3) फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी 'अनुसया सेनगुप्ता' ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.

4) इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टसचे सांस्कृतिक कार्यक्रम दर रविवारी डीडी भारतीवर प्रसारित केले जातील.

5) कार्ड पेमेंटसाठी भारताची RuPay सेवा लवकरच मालदीवमध्ये सुरू होणार आहे.

6) भारताच्या 'सिमरन शर्मा'ने जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

7) दक्षिण कोरियातील इंचॉन येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 मध्ये महिलांच्या कंपाउंड सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले आहे.

8) क्लाइमवर्क्सने वातावरणातून कार्बन डायऑक्साइड शोषण्यासाठी जगातील सर्वात मोठा ऑपरेशनल डायरेक्ट एअर कॅप्चर (डीएसी) प्लांट (आइसलँड) उघडला आहे.

9) जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी 25 मे रोजी थायरॉईड ग्रंथी आणि त्यावर परिणाम करणाऱ्या विविध परिस्थितींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो.

10) भारताने 'वन नेशन, वन एअरस्पेस'साठी "मिशन इशान" लाँच केले आहे.

11) नवी दिल्ली येथील सौरभ एच मेहता यांनी जगातील पहिले पूर्णपणे बायोडिग्रेडेबल पेन सादर केले आहे, ज्याचे नाव NOTE पेन आहे.

12) नॉर्वेस्टर्सचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिले संशोधन चाचणी कक्ष तैनात केले जाईल

13) अभिनेता रजनीकांत यांना संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

14) AI निवेदक वापरणारी दूरदर्शन किसान ही देशातील पहिली दूरदर्शन वाहिनी असणार आहे.

15) IPL मध्ये सर्वाधिक Orange Cap जिंकणारा विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू आहे.

थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक


🌀भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई

🌀भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम

🌀भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर

🌀भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा

🌀भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन

🌀भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा

🌀भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके

🌀आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय

🌀भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक

🌀भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🌀भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी

🌀भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन

🌀आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू

🌀भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर

🌀पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे

🌀भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे

🌀पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता

🌀भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा

🌀आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी

🌀मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर

🌀भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज

🌀आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर

🌀महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक ➖ वसंतराव नाईक

🌀भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल 

🌀आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत

२५ मे २०२४

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 22 मे

प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयीचा संशोधन अहवाल कोणी सादर केला आहे?
उत्तर - IIT जयपूर

प्रश्न – नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या एकता भयाने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - सुवर्ण

प्रश्न – अलीकडे भारताचे आणि कोणत्या देशाचे सैन्य शक्ती या संयुक्त सरावात भाग घेत आहेत?
उत्तर - फ्रान्स

प्रश्न – नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडेक्समध्ये कोणत्या शहराला स्थान मिळाले आहे?
उत्तर- अमेरीका

प्रश्न – कान्सच्या रेड कार्पेटवर नुकताच पहिला भारतीय तमाशा दिग्दर्शक कोण बनला आहे?
उत्तर - उर्मिमाला बरुआ

प्रश्न – आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय ग्लोबल फोरम नुकतेच कुठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर - सेऊल

प्रश्न – IAF इमर्जन्सी मेडिकल प्रोसिजर सिस्टीमचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर - बेंगळुरू

🔖 प्रश्न.1) नुकतेच मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर - अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी

🔖 प्रश्न.2) जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हॉफमन यांना कोणत्या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे ?

उत्तर - कैरोस (Kairos)

🔖 प्रश्न.3) शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले ?

उत्तर – दिव्या देशमुख

🔖 प्रश्न.4) जैविक विविधतेच्या (COP 16) परिषदेच्या पक्षांची 16 वी बैठक कोणता देश आयोजित करेल ?

उत्तर – कोलंबिया

🔖 प्रश्न.5) कोणत्या राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत ?

उत्तर – कर्नाटक

🔖 प्रश्न.6) जगातील सर्वोच्च पाच क्रूड स्टील उत्पादक देशांपैकी कोणत्या देशाने एप्रिल 2024 मध्ये स्टील उत्पादनात सकारात्मक वाढ नोंदवली ?

उत्तर – भारत

🔖 प्रश्न.7) भगवान बुद्धांच्या आत्मज्ञानासाठी सिक्कीममध्ये साजऱ्या होणाऱ्या बौद्ध उत्सवाचे नाव काय आहे ?

उत्तर – सागा दावा

🔖 प्रश्न.8) नुकताच अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणत्या भारतीय महिलेला देण्यात आला ?

उत्तर – उत्तर प्रदेशची, आरती

🔖 प्रश्न.9) दक्षिण कोरिया, चीन आणि जपान देशाची त्रिपक्षीय शिखर परिषद कोठे होणार ?

उत्तर – सेऊल

🔖 प्रश्न.10) युएफा युरोपालीग फुटबॉलचे जेतेपद जिंकणारा पहिला इटालियन संघ कोणता ठरला ?

उत्तर – अटलांटा

🔖 प्रश्न.11) दरवर्षी राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर – २४ मे

🪀 तुमच्या मित्रांना ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक शेअर करा.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...