०८ एप्रिल २०२२

वृत्तपत्र : संस्थापक


🌹🌹   वृत्तपत्र : संस्थापक    🌹🌹

🌷 प्रभाकर   :   भाऊ महाजन

🌷 ज्ञानदर्शन  :  भाऊ महाजन

🌷 हिंदू         :   बी राघवाचार्य

🌷 दिनबंधु    : कृष्णराव भालेकर

🌷 तेज         : दिनकरराव जवळकर

☘☘☘🌷🌷☘☘☘🌷🌷☘☘

🌹🌹  वृत्तपत्र : संस्थापक 🌹🌹

🌷 निंबधमला : विष्णुशास्त्री चिपळूणकर

🌷 ज्ञानसिंधु   : विरेश्वर छत्रे

🌷 दिनमित्र    : मुकुंदराव पाटील

🌷 इंडिया      : दादाभाई नौरोजी

☘☘☘🌷☘☘☘🌷☘☘🌷☘

दादाभाई नौरोजी


🌺🌺  दादाभाई  नौरोजी 🌺🌺

इंग्लंडमधील कॉमर्स, इंडिया, कंटेंपररी रिव्ह्यू, द डेली न्यूज, द मँचेस्टर गार्डियन, पिअर्सन्स मॅगझीन  ह्यांसारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून दादाभाईंचे अनेक लेख व निबंध प्रसिद्ध झाले.

१८४८ साली स्थापन झालेल्या ‘स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेच्या स्ट्यूडंट्स लिटररी मिसेलनी या मासिकामधून (१८५०) त्यांचे नियमित लेख येत असत. 

ज्ञानप्रकाश नावाचे एक गुजराती नियतकालिक त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होई.

१८८९ मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने दादाभाईंनी रास्त गोफ्तार (ट्रूथ टेलर) नावाचे एक गुजराती साप्ताहिक सुरू करून त्याचे दोन वर्षे संपादन केले. हे साप्ताहिक पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध होते.

🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸

माऊंट एल्फिन्स्टन :

मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर

त्यांनी इ.स. 1818 पासून इ.स. 1827 पर्यंत गव्हर्नर म्हणून कार्य

इंग्लंडमधील उदारमतवादी विचारांचा प्रभाव

लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे '  या संस्थेचे सदस्य

महादेव गोविंद रानडे


महादेव गोविंद रानडे :

(१८ जानेवारी १८४२ – १६ जानेवारी १९०१).

🌸   भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थसास्त्रज्ञ आणि द्रष्टे पुरूष.

अनेक वेळा महादेवच्या ऐवजी त्यांना माधवराव म्हणत असत. मातेचे नाव गोपिका. त्यांचा जन्म नासिक जिल्ह्यातील निफाड गावी झाला.

मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले. त्यांचे शरीर भरदार व डोके मोठे होते. वृत्ती लहानपणापासूनच शांत, सहिष्णू, निरहंकारी, उदार व ऋजू असल्यामुळे लोकांना ते फार आवडत. ते नेहमी उद्योगात रमलेले, शीलसंपन्न व सत्यवादी होते. 

न्यायमूर्ती रानडे माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईस झाले. शिक्षण चालू असताना भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाचे विशेष अध्ययन केले व विद्यालयीन अभ्यासक्रमाच्या बाहेर इतर विषयांचेही अनेक ग्रंथ अभ्यासले. इ. स. १८६२ मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पुन्हा बी. ए. (ऑ.) परीक्षा दिली.

त्यांची विद्वत्ता पाहून प्राध्यापक-विद्वान मंडळी व गुरुजन यांना त्यांचे थोर भवितव्य दिसू लागले होते. इतिहास, भूगोल, गणित, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, इंग्लिश, निबंधलेखन इ. विषयांचे ते एल्फिन्स्टनमध्ये अध्यापन करू लागले.

१८६४ साली एम्. ए. ची परीक्षा दिली व १८६५ साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाच्या फेलोंमध्ये या तरुण पदवीधराचा समावेश झाला.

🌸  इ. स. १८६६ च्या जूनमध्ये त्यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली.

🍀  मराठी भाषेत जे ग्रंथ त्या वेळी प्रसिद्ध होत होते, त्यांच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करीत. साहित्य, इतिहास, समाजशास्त्र विषय यासंबंधी त्यांच्या अभिप्रायांत विस्तृत विवेचन केलेले आढळते. १८६८ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली.
🌸   पुण्यास न्यायखात्यात १८७१ पासून न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यावेळी त्यांनी अ‍ॅडव्होकेटची परीक्षा दिली.

🍀   न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर १८९३ साली रानड्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली. त्या काळात भारतीयाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद दुर्लभ होते.

🌸  त्या प्रसंगी पुण्यातील जनतेने आठ दिवस मोठा उत्सव केला व पुण्यातील महत्त्वाच्या संस्थांनी त्यांचा गौरव केला. अनेक सत्कारसमारंभ होऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली.

🍀   न्यायदानाच्या कामात परिश्रम, निस्पृहपणा, कायदेशास्त्राचे सखोल ज्ञान व न्यायनिष्ठा हे त्यांचे गुण प्रकर्षाने दिसून आले. उच्च न्यायासनावर ते विराजमान झाल्याने न्यायासनाचाच बहुमान झाला, असे सरन्यायाधीश सर मायकेल वेस्ट्राप यांनी उद्‌गार काढले.

🌸🌸🌸🌺🌺🌸🌸🌸🌺🌺🌸🌸🌸🌺🌺

रानड्यांनी १८९० साली औद्योगिक परिषद स्थापली. त्यावेळच्या प्रास्ताविक भाषणात आणि त्यानंतरच्या भाषणांमध्ये त्यांनी हिंदी अर्थशास्त्रावर अनेक उद्‌बोधक व्याख्याने दिली.

कंगाल हिंदुस्थानला स्वतंत्र अर्थशास्त्र असावे, असे त्यांनी प्रतिपादिले.

मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे (११ मे १८७८) न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते.

🌸🌸🌸🍀🌸🌸🌸🌸🍀🍀🍀🌸🌸🌸🍀

नेताजी सुभाषचंद्र बोस


नेताजी सुभाषचंद्र बोस

यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. 
जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते.
आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता.

प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.

 प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते.

सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते. आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.

आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

१९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.

नोव्हेंबर ५, १९२५ च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.

मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.

१९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.

१९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.

महत्त्वाची माहिती

1)"डू यू नो" ट्विटर शृंखला _ याच्याशी संबंधित आहे.
(A) बँकिंगविषयी जागृती
(B) कौटुंबिक निवृत्तीवेतन.  √
(C) भारताविषयी जाणून घेण्यासाठी
(D) यापैकी नाही

2)भारतीय रेल्वेनी  या शहरात त्याचे पहिले ‘फिरते उपहारगृह’ उघडले.
(A) असनसोल स्थानक.  √
(B) नवी दिल्ली स्थानक
(C) जयपूर स्थानक
(D) लखनऊ स्थानक

3)2020 या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना काय आहे?
(A) विमेन एम्पोवरमेन्ट अँड जेंडर इक्वलिटी
(B) जेंडर इक्वलिटी अँड विमेन एम्पोवरमेन्ट
(C) आय एम जेनेरेशन इक्वलिटी: रियलाईजिंग विमेन्स राइट्स.  √
(D) आय एम रियलाईजिंग विमेन्स राइट्स: जेनेरेशन इक्वलिटी

4)संशोधकांना ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ नावाचा जीव आढळला. ‘हेनेगुया साल्मीनिकोला’ हा __ आहे.
(A) ऑक्सिजनद्वारे जीवंत राहू शकणारा प्राणी
(B) ऑक्सिजनशिवाय जीवंत राहू शकणारा प्राणी.  √
(C) विषाणूचा एक प्रकार
(D) जिवाणूचा एक प्रकार

5)“RAISE 2020” कार्यक्रम _ या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे.
(A) लखनऊ
(B) नोएडा
(C) शिमला
(D) नवी दिल्ली.  √

6)‘राष्ट्रीय तपास संस्था’ (NIA) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ही केंद्रीय दहशतवादरोधी कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून काम करते.

2. ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही.  √
(D) ना (1), ना (2)

7)कोणत्या राज्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत सहा उपकरणे व्यवस्थापन केंद्रांची उभारणी करण्यासाठी सामंजस्य करार केला?
(A) मेघालय
(B) त्रिपुरा.  √
(C) आसाम
(D) उत्तरप्रदेश

8)‘ऑफशोअर पेट्रोल व्हसेल-6’ या जहाजाचे _ येथे अनावरण झाले.
(A) गोवा
(B) चेन्नई.  √
(C) मुंबई
(D) केरळ

9)अकरावी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद 2020’ _ या शहरात आयोजित करण्यात आली.
(A) पुणे
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली.  √

10)29 फेब्रुवारी 2020 रोजी _ या शहरात ‘पेन्शन अदालत’ आणि ‘नॅशनल पेन्शन सिस्टम’ (NPS) जागृती व तक्रार निवारण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
(A) जम्मू.  √
(B) दिल्ली
(C) हैदराबाद
(D) चेन्नई

_________________


​🎇 दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या स्थानावर घसरण 🎇

- राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज राज्यविधानसभेत सादर झाला.

- राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज राज्यविधानसभेत सादर झाला.

-  राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूट देखील वाढली आहे.

- दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

-  राज्यावर चार लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. महसूली तूट २० हजार २९३ कोटी रुपयांनी वाढली आहे.
——————————————————

भारतातील 10 सर्वात मोठी राष्ट्रीय उद्याने , भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे, भारत के प्रमुख नगरों के संस्थापक, जगातील सर्वात उंच 10 शिखर

​​🎇भारतातील 10 सर्वात मोठी राष्ट्रीय उद्याने🎇

🔰1. Hemis National Park
- जम्मू आणि काश्मीर
- 4400 KM²

🔰2. Desert National Park
- राजस्थान
- 3162 KM²

🔰3. Gangotri National Park
- उत्तराखंड
- 2390 KM²

🔰4. Mamdapha National Park
- अरूणाचल प्रदेश
- 1985 KM²

🔰5. Khangchendzonga National Park
- सिक्किम
- 1784 KM²

🔰6. Guru Ghasidas (Sanjay) National Park
- छत्तीसगढ
- 1440 KM²

🔰7. Gir Forest National Park
- गुजरात
- 1412 KM²

🔰8. Sundarbans National Park
- पश्चिम बंगाल
- 1330 KM²

🔰9. Jim Corbet National Park
- उत्तराखंड
- 1318 KM²

🔰10. Indravati National Park
- छत्तीसगढ
- 1258 KM²

__________________________

🎇.उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम 🎇

1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल

🎇 खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे  🎇

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी

🎇कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :🎇
[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]

1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⛰ *भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे*

🧐 *शिखराचे नाव : उंची मीटरमध्ये (जिल्हे)*

▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)
______________________

🍁🌻भारत के प्रमुख नगरों के संस्थापक🍁🌻

1. कोलकाता - जॉब चारनाक

2. मुंबई - ओनाल्ड ऑग्जिअ
🍁
3. भोपाल - राजा भोज

4. नई दिल्ली - एडविन लुट्यन्स

5. आगरा - सिकंदर लोदी
🌻
6. इंदौर - अहिल्या बाई

7. धार - राजा भोज

8. तुगलकाबाद - मोहम्मद तुगलक
🌻
9. जयपुर - सवाई राजा जयसिंह

10. सागर {MP }- उदालशाय

11. लखनऊ - आसफ़ुद्दौला

12.इलाहाबाद - अकबर

13. झाँसी -वीरसिंह जूदेव

14. अजमेर - अजयराज सिंह

15. उदयपुर - राणा उदय सिंह

16. टाटानगर - जमशेदजी टाटा

17. भरतपुर - राजा सूरजमल

18. कुम्भलगढ़ - राजा कुम्भा

19. पटना - उदयन

20. मुंगेर - चन्द्रगुप्त मौर्य

21. नालंदा - राजा धर्मपाल

22. रायपुर - ब्रम्हदेव

23. दुर्ग - जगतपाल

24. देहरादून - राजा जौनसार बाबर

25. पुरी - गंग चोल

26. द्वारका - शंकराचार्य

27. जम्मू - राजा जम्मू लोचन

28. पूना - शाह जी भोसले

29. हैदराबाद - कुली क़ुतुब शाह

30. अमृतसर - गुरु रामदास

31. दिल्ली - अन्नंतपाल तोमर

__________________

♻️ वाचा :- भूगोल जगातील सर्वात उंच 10 शिखर

(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848.86 मीटर. ( 0.86 ने वाढ झाली आहे )

(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.

(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.

(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.

(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच

(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.

(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.

(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच

(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.

(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.

(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.

(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.

(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच

(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच.

जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.
_____________________

नविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ ,तीन भारतीय कलाविष्कारांचा

❇ *​नविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ*

- देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्य उद्योगपती म्हणून 'डीमार्ट'चे संस्थापक राधाकिशन दमाणी यांचे नाव चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर 'डीमार्ट'ची प्रमुख कंपनी असणाऱ्या 'अॅव्हेन्यू सुपरमार्ट'चे सीईओ नविल नरोन्हा देशातील सर्वांत श्रीमंत सीईओ बनले आहेत.

- देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्य उद्योगपती म्हणून 'डीमार्ट'चे संस्थापक राधाकिशन दमाणी यांचे नाव चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर 'डीमार्ट'ची प्रमुख कंपनी असणाऱ्या 'अॅव्हेन्यू सुपरमार्ट'चे सीईओ नविल नरोन्हा देशातील सर्वांत श्रीमंत सीईओ बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३१०० कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. 'अॅव्हेन्यू सुपरमार्ट'च्या माध्यमातून देशभरातील २०० 'डीमार्ट'चे संचलन केले जाते.

- नरोन्हा यांच्याबाबत बोलायचे झाल्यास ते कुणी दिग्गज आयटी तंत्रज्ञही नाहीत आणि बँकरही नाहीत. त्यांनी कोणत्याही आयआयटी आणि आयआयएममधून पदवीही घेतलेली नाही. मात्र, पारंपरिक किराणा मालाच्या संघटित व्यवसायाद्वारे ते देशातील सर्वांत श्रीमंत सीईओ बनले आहेत. त्यांचे बॉस राधाकिशन दमाणी १७.८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह देशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. देशातील तिसरे सर्वांत श्रीमंत नोकरदार बनण्याचा मानही 'अॅव्हेन्यू सुपरमार्केट'चे सीएफओ रमाकांत बाहेती यांनी मिळवला आहे.

▪️देशातील श्रीमंत सीईओ
नाव पद कंपनी शेअर्सची संख्या शेअर्सचे मूल्य (कोटी रुपये)

- नविल नरोन्हा सीईओ अॅव्हेन्यू सुपरमार्केट १,३३,८८,५६१ ३१२८

- आदित्य पुरी सीईओ एचडीएफसी बँक ७७,४५,०८८ ९४३

- रमाकांत बाहेती सीएफओ अॅव्हेन्यू सुपरमार्केट २८,५०,३३९ ६६६

- सी. पी. गुरनानी सीईओ टेक महिंद्र ७१,३९,०५९ ५९४

- आर. एक. कर्नाड एमडी एच़डीएफसी २३,२६,६७२ ५४७

- मिलिंद बर्वे सीईओ एचडीएफसी एएमसी १०,४०,००० ३३७

- दीपक पारेख चेअरमन एचडीएफसी ११,६०,००० २७३

- कैझाद भरूचा संचालक एचडीएफसी बँक २१,०२७,१०२ २५६

- शांती एकंबरम अध्यक्ष कोटक बँक १४,८५,८६५ २५१

- मुकुंद भट्ट सीएफओ कोटक बँक १३,१९,०७९ २२३

- दीपक गुप्ता संयुक्त एमडी कोटक बँक ११,३४,७६१ १९२

- केकी मिस्त्री उपाध्यक्ष एचडीएफसी ६,५६,५०० १

_________________________

​​📕 तीन भारतीय कलाविष्कारांचा
      गिनीज विश्वविक्रम

- त्यागया चॅरिटेबल ट्रस्टचा एक भाग असलेल्या त्यागया टीव्ही वाहिनीच्या पुढाकारामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यात तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे.

- कर्नाटीक संगीत, भरतनाट्यम आणि कुचीपुडी या कलाविष्कारांचा एकजुटीचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. या तीनही श्रेणींमध्ये एकाच मंचावर सर्वाधिक कलाकारांनी कलेचे सादरीकरण करून हा विक्रम नोंदवला.

- 1 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नईच्या रामचंद्र कन्व्हेन्शन सेंटर येथे एका स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली.

- त्यागराज पंचरत्नम संगीतावरचे नृत्यदिग्दर्शन पार्वती, कुचीपुडी तज्ञ एम.व्ही.एन. मूर्ती आणि कृष्णकुमार ह्यांनी केले होते. त्यांनी 1200 लोकांच्या बँडला प्रशिक्षण दिले.

🚦 भारतीय नृत्यशैली

- भारतात दोनशेहून अधिक लोकनृत्ये प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातल्या कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

🚦 राज्यात रुजलेले नृत्यप्रकार

-अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
-आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
-आसाम - बिहू, जुमर नाच
-उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
-उत्तराखंड - गढवाली
-उत्तरांचल - पांडव नृत्य
-ओरिसा - ओडिसी, छाऊ
-कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
-केरळ - कथकली
-गुजरात - गरबा, रास
-गोवा - मंडो
-छत्तीसगढ - पंथी
-जम्मू व काश्मीर - रौफ
-झारखंड - कर्मा, छाऊ
-मणिपूर - मणिपुरी
-मध्यप्रदेश - कर्मा, चरकुला
-महाराष्ट्र - लावणी
-मिझोरम - खान्तुम
-मेघालय - लाहो
-तामिळनाडू - भरतनाट्यम
-पंजाब - भांगडा, गिद्धा (गिद्दा)
-पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
-बिहार - छाऊ
- राजस्थान - घूमर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

General Knowledge

💁‍♂ *General Knowledge*

▪ कोणत्या शहरात 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण केले गेले?
उत्तर : पणजी

▪ IBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
उत्तर : अरविंद कृष्ण

▪ ऑस्कर पुरस्काराच्या सोहळ्यात ऑर्केस्ट्राची जबाबदारी स्वीकारणारी प्रथम महिला कोण ठरल्या?
उत्तर : एमियर नून

▪ कोणत्या राज्याने देशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’ रवाना केली?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪ कोणत्या राष्ट्राध्यक्षाने ‘अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करार’ या नव्या त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली?
उत्तर : डोनाल्ड ट्रम्प

▪ भारतात कोणत्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो?
उत्तर : 30 जानेवारी

▪ कोणता खेळाडू ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अ‍ॅथलीट’चा पुरस्कार जिंकणारा प्रथम हॉकीपटू ठरला?
उत्तर : राणी रामपाल

▪ ‘संप्रीती’ हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा युद्ध सराव आहे?
उत्तर : भारत आणि बांग्लादेश

▪ कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
उत्तर : फरीदाबाद

▪ कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
उत्तर : तेलंगणा

*विज्ञान : धातू व त्यांचे उपयोग, Science Fatcs

🔍 *विज्ञान : धातू व त्यांचे उपयोग*

1⃣ *तांबे :*

▪ भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.
▪ विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

2⃣ *लोखंड :*

▪ ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता
▪ ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता

3⃣ *अॅल्युमिनीअम :*

▪ घरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता
▪ चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता
▪ विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.

4⃣ *जस्त :*

▪ लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.
▪ विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.
▪ धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.

5⃣ *चांदी :*

▪ दागिने तयार करण्याकरिता
▪ दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता
▪ छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता
▪ विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता
_____________________________  




IMP Science Fatcs :-
Cryptophytes : बर्फावर आढळणारे शैवाल
Lithophytes : दगडांवर आढळणारे शैवाल
Macrocistus : सर्वांत लांब शैवाल
Chlorella : अंतरीक्ष यानात अन्न म्हणून वाढविण्यात येणारे शैवाल
Protoderma : कासवाच्या पाठीवर आढळणारे शैवाल
Cladophora : गोगलगायींच्या पाठीवर आढळणारे शैवाल
Zoocholorella : हायड्राच्या शरीरात आढळणारे शैवाल
Oscillatoria : मानव व प्राण्यांच्या शरीरात आढळणारे शैवाल

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...