०४ फेब्रुवारी २०२२

जीवनसत्त्वे

·         सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला. 

·         सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे. 

·         आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते. 

1. सत्व - अ  

·         शास्त्रीय नांव - रेटीनॉल  

·         उपयोग - डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता 

·         अभावी होणारे आजार - त्वचा, रोग व रात आंधळेपणा 

·         स्त्रोत - टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

2. सत्व - ब1

·         शास्त्रीय नांव - थायमिन  

·         उपयोग - चेतासंस्थेचे आरोग्य 

·         अभावी होणारे आजार - बेरीबेरी 

·         स्त्रोत - धन्य, यीस्ट, यकृत, 

3. सत्व - ब2

·         शास्त्रीय नांव - रायबोफ्लेविन  

·         उपयोग - चयापचय क्रियेकरिता 

·         अभावी होणारे आजार - पेलाग्रा 

·         स्त्रोत - अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे 

4. सत्व - ब3

·         शास्त्रीय नांव - नायसीन 

·         उपयोग - त्वचा व केस 

·         अभावी होणारे आजार - त्वचारोग व केस पांढरे 

·         स्त्रोत - दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी 

5. सत्व - ब6  

·         शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन  

·         उपयोग - रक्त संवर्धनाकरिता 

·         अभावी होणारे आजार - अॅनामिया

·         स्त्रोत - यकृत व पालेभाज्या 

6. सत्व - ब10  

·         शास्त्रीय नांव - फॉलीक  

·         उपयोग - अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे 

·         अभावी होणारे आजार - अॅनामिया 

·         स्त्रोत - यकृत 

7. सत्व - क  

·         शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड  

·         उपयोग -  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

·         अभावी होणारे आजार - स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

·         स्त्रोत - लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि 

8. सत्व - ड  

·         शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल  

·         उपयोग - दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य 

·         अभावी होणारे आजार - अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

·          

·         स्त्रोत - मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे 

9. सत्व - इ  

·         शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल 

·         उपयोग - योग्य प्रजननासाठी  

·         अभावी होणारे आजार - वांझपणा 

·         स्त्रोत - अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या 

10. सत्व - के  

·         शास्त्रीय नांव - नॅप्थोक्विनान  

·         उपयोग - रक्त गोठण्यास मदत 

·         अभावी होणारे आजार - रक्त गोठत नाही 

·         स्त्रोत - पालेभाज्या व कोबी

विज्ञान व तंत्रज्ञान

प्रतिजैविकांच्या सुरक्षित वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) नवा उपक्रम – AwaRe.

या भारतीय संस्थेमधील शास्त्रज्ञांनी अँथ्रॅक्स रोगावर अधिक शक्तिशाली लस विकसित केली - संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU).

सामान्य ज्ञान

पेनिसिलीन शोधणारे शास्त्रज्ञ - एर्न्स्ट बोरिस चेन (इंग्लंड) आणि हॉवर्ड वॉल्टर फ्लोरी (ऑस्ट्रेलिया).

जागतिक आरोग्य संघटना (WHO) – स्थापना वर्ष: सन 1948; मुख्यालय: जिनेव्हा (स्वित्झर्लंड).

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचे स्थापना वर्ष – सन 1958.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले गव्हर्नर - सर ओसबोर्न स्मिथ (1935 - 1937).

संयुक्त राष्ट्रसंघ (UN) - स्थापना वर्ष: सन 1945; मुख्यालय: न्यूयॉर्क (अमेरीका).

वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग

1) नाव मिळवणे. 
अर्थ :- कीर्ती मिळविणे. 
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम 
            येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 

2) रक्ताचे पाणी करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी 
     केले आणि स्वराज्याची स्थापना केली. 

3) सोंग काढणे. 
अर्थ :- नक्कल करणे. 
वाक्य :-  सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब 
            सोंग काढतो. 

4) रात्रीचा दिवस करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले. 

5)भांबावून जाणे. 
अर्थ :- गोंधळून जाणे. 
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात 
           आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो  भांबावून गेला.

6)डोक्यावर घेणे. 
अर्थ :- अतिलाड करणे. 
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला 
    आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर 
    घेतले. 

7) आळा घालणे. 
अर्थ :- बंदी आणणे. 
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा 
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला. 

8) तीरासारखे धावणे. 
अर्थ:- खूप वेगाने धावणे. 
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश 
       स्पर्धेत तीरासारखा धावतो. 

9) मर्जी राखणे. 
अर्थ :- खूश ठेवणे. 
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी 
      जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली. 

10) संगोपन करणे. 
अर्थ :- पालनपोषण करणे. 
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने 
          तिचे संगोपन केले.

11) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.

12) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

13)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

14) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

15) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

16) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

17) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

18) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

19)अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

20) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

दहा वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग

-------------------------------------------------
(१) नाव मिळवणे.
अर्थ :- कीर्ती मिळविणे.
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम
            येऊन सुप्रियाने नाव मिळविले.
-------------------------------------------------
(२) रक्ताचे पाणी करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी
     केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
-------------------------------------------------
(३) सोंग काढणे.
अर्थ :- नक्कल करणे.
वाक्य :-  सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब
            सोंग काढतो.
------------------------------------------------
(४) रात्रीचा दिवस करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलांनी
          सानियाला शिकवले.
-------------------------------------------------
(५)भांबावून जाणे.
अर्थ :- गोंधळून जाणे.
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात
           आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो
           भांबावून गेला.
-------------------------------------------------
(६)डोक्यावर घेणे.
अर्थ :- अतिलाड करणे.
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला
    आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर
    घेतले.
------------------------------------------------
(७) आळा घालणे.
अर्थ :- बंदी आणणे.
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला.
--------------------------------------------------
(८) तीरासारखे धावणे.
अर्थ:- खूप वेगाने धावणे.
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश
       स्पर्धेत तीरासारखा धावतो.
--------------------------------------------------
(९) मर्जी राखणे.
अर्थ :- खूश ठेवणे.
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी
      जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली.
--------------------------------------------------
(१०) संगोपन करणे.
अर्थ :- पालनपोषण करणे.
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने
          तिचे संगोपन केले.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

🔰1) पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?
     ‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.’

▪️1) ती गाडी  
▪️ 2) शिगोशिग   
▪️3) भरली होती  
▪️ 4) बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ✅

🔰2) ‘आजी दृष्ट काढते’ वाक्यातील प्रयोग ओळखा.

◾️ 1) कर्मणी प्रयोग  
◾️ 2) कर्तरी प्रयोग    ✅
◾️ 3) भावे प्रयोग  
◾️ 4) शक्यकर्मणी प्रयोग

🔰3) ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.

▪️ 1) मध्यमपद लोपी समास    
▪️ 2) समाहार व्दंव्द
▪️ 3) इतरेतर व्दंव्द      
▪️ 4) कोणताही नाही✅

🔰4) विरामचिन्हांचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो.’

▪️अ) दोन शब्द जोडताना       
▪️ब) संबोधनाकरिता वापर केला जातो▪️क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी  
▪️ ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास

▪️1) ब बरोबर
▪️2) ब, ड बरोबर
▪️3) क     
▪️4) अ, ड बरोबर ✅

🔰5) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! (अलंकार ओळखा.)

▪️1) श्लेष अलंकार   
▪️2) यमक अलंकार  
▪️ 3) अतिशयोक्ती अलंकार
▪️4) उपमा अलंकार ✅

🔰6) सिध्द शब्द ओळखा.
  
▪️1) येऊन  
▪️2) ये      ✅
▪️3) येवो    
▪️4) येणार

🔰7) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

▪️1) व्यागार्थ  
▪️ 2) लक्षार्थ    ✅
▪️3) वाच्यार्थ   
▪️4) संकेतार्थ

🔰8) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :

▪️1) जल      ✅
▪️2) जलद    
▪️3) ढग     
▪️4) क्षार

🔰9) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा.

▪️1) उन्नत   
▪️2) अवनत  
▪️ 3) आरोहण    ✅
▪️4) प्रारंभ

🔰10) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.

▪️1) हात ओला तर मित्र भला    ✅
▪️2) मूल होईना सवत साहीना
▪️3) मनास मानेल तोच सौदा  
▪️ 4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

०३ फेब्रुवारी २०२२

UPSC 2022

पदे - 861🛑
Last Date :- {22 Feb 2022}

UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 (पूर्व परीक्षा) अधिसूचना प्रकाशन तारीख - 2 फेब्रुवारी, 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2022

पूर्व परीक्षेची तारीख - 5 जून, 2022

मुख्य परीक्षेची तारीख - 16 सप्टेंबर 2022

येमेनने यूएईच्या रोखाने डागलेले क्षेपणास्त्र नष्ट.

🔰इस्रायलचे पंतप्रधान इसाक हझरेग हे संयुक्त अरब अमिरातीच्या ऐतिहासिक भेटीवर आलेले असतानाच, येमेनच्या हुथी दहशतवादी गटाने या देशाच्या रोखाने डागलेले एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र यूएईच्या हवाई संरक्षण दलांनी सोमवारी अडवून नष्ट केले, असे देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

🔰या हल्ल्यामुळे काहीही नुकसान झाले नाही व या क्षेपणास्त्राचे तुकडे वर्दळीच्या भागांच्या बाहेर पडले, असे संरक्षण मंत्रालयाने ‘डब्ल्यूएएम’ या देशाच्या अधिकृत वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात सांगितले.

🔰‘येमेनमधील ज्या ठिकाणावरून क्षेपणास्त्र डागले गेले, त्या ठिकाणांचा शोध घेतल्यानंतर मिसाईल लाँचर नष्ट करण्यात यूएईचे हवाई संरक्षण दल व कोअ‍ॅलिशन कमांड यांना यश मिळाले,’ असे मंत्रालयाने सांगितले. येमेनमधील अल जौफ येथील आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागण्याचे फलाट स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.५० वाजता नष्ट करण्यात आल्याचे सांगताना याचा व्हिडीओही मंत्रालयाने प्रसारित केला.

राज्यातील निर्बंध शिथिल ; सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी.

🔰करोनाची विशेषत: ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

🔰राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू  लागताच सरकारने नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबरपासून राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली.

🔰त्याचप्रमाणे लग्नसमारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील करोनाबाधितांचा आलेख घसरत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेने सर्वोच्च शिखर बिंदू केव्हाच गाठला असून  आता ही लाट उतरणीला लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने उच्च न्यायालयातही केला आहे.

महाविद्यालयांमध्ये लशीचे २ डोस घेतलेल्यांनाच प्रवेश.

🔰विद्यार्थ्यांचे आठवडय़ाभरात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश राहणार आहे. तर, लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

🔰सामंत म्हणाले, की उद्या एक फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. पण, लशीचे दोन डोस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश राहणार असल्यानेच या विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचे आहेत. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असून, त्यांनी गतीने लसीकरण होण्यासाठी शिबिरे घ्यावीत. ठोसकृती करावी असे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले. खासगी महाविध्यालयांसाठीही विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के लसीकरणाची सक्ती राहणार आहे. राज्यातील करोनाचा आढावा व कुलगुरुंशी बोलून १५ फेब्रुवारीनंतर पुढील परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायच्या याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे प्राचार्य, जॉइंट डायरेक्टर, डायरेक्टर यांना खर्च करण्याची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. महाविद्यालयांमधील कंत्राटी कर्माच्याऱ्यांना किमान वेतनात वाढ देण्यात आल्याचे सामंत म्हणाले.

🔰विधानसभेतील गैरवर्तनप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. तसाच न्याय राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भातही व्हायला हवा अशी आपली व्यक्तीगत भावना आहे.

🔰आमदार नियुक्तीचा हा मुद्दा घेऊन आपण न्यायालयात जाण्याचा विचार करीत असून, त्याबाबत उद्या मुंबईत कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करून निर्णय घेणार आहे. त्यात राज्यपालांचा अनादर करण्याचा हेतू नसून भाजपाच्या निलंबित आमदारांना न्यायालयाचा जसा दिलासा मिळतो तसाच तो राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या प्रलंबित प्रकरणातही मिळायला हवा अशी आपली व्यक्तीगत भावना असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

समान कामासाठी समान वेतन; हे सरकारचं घटनात्मक उद्दिष्ट - सर्वोच्च न्यायालय.

🔰सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या एका निकालामध्ये असं म्हटलं आहे की समान कामासाठी समान वेतन हे सरकारचं घटनात्मक उद्दिष्ट आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि बेला एम. त्रिवेदी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की पद आणि वेतनश्रेणीचे समीकरण हे न्यायपालिकेचे नसून कार्यपालिकेचे प्राथमिक कार्य आहे. त्यामुळे सामान्यत: न्यायालये नोकरीच्या मूल्यमापनाच्या कामात हस्तक्षेप करणार नाहीत जे सामान्यत: वेतन आयोगासारख्या तज्ञ संस्थांवर सोपवले जाते, असे न्यायालयाने नमूद केले.

🔰खंडपीठाने म्हटले, कारण अशा नोकरीच्या मूल्यांकनामध्ये विविध घटकांचा समावेश असू शकतो, ज्यामध्ये संबंधित डेटा आणि कर्मचाऱ्यांच्या विविध गटांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी स्केल यांचा समावेश असू शकतो.असे मूल्यांकन आर्थिक परिणामांशिवाय कठीण आणि वेळखाऊ दोन्ही असेल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जोपर्यंत एखाद्या पदासाठी वेतनश्रेणी निश्चित करताना गंभीर त्रुटी झाल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी ठोस सामग्री उपलब्ध नाही आणि अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयाचा हस्तक्षेप अत्यंत आवश्यक आहे, तोपर्यंत न्यायालय अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांना सामोरे जाण्यास सक्षम असेल.

🔰प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) म्हणून काम करणार्‍या व्यक्तीच्या निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्याच्या याचिकेला परवानगी देणार्‍या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या अपीलाच्या सुनावणीदरम्यान ही निरीक्षणे नोंदवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, रिट याचिका तसेच पुनर्विलोकन याचिकेत दिलेल्या आदेशांमध्ये समान कामासाठी समान वेतन हे तत्त्व लागू करून उच्च न्यायालयाने स्वतःला पूर्णपणे चुकीची दिशा दिली आहे.

लसीमुळे कोविड १९ सह ‘या’ २१ आजारांपासून संरक्षण, WHO चं लसीकरणासाठी आवाहन.


🔰जगभरात करोनाने थैमान घातलं, लाखो लोकांचे जीव घेतले. अनेक ठिकाणी तर कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. याशिवाय जगाचं आर्थिक चक्रही बिघडलं. मात्र, आता करोना लसीकरणाच्या मोहिमेमुळे हाच करोना आता नियंत्रणात येत आहे. करोना लस हेच करोनावरील परिणामकारक उत्तर आहे असं जाणकार सांगत आहेत.

🔰मात्र, तरीही अनेक ठिकाणी करोना लसीविषयी अनेक गैरसमज आणि अफवा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लसींबाबत जनजागृती करत आतापर्यंत लसीमुळे संरक्षण मिळालेल्या एकूण २१ आजारांची माहिती दिली आहे. तसेच सर्वांनी लसीकरण करावं असं आवाहन केलंय.

🔰व्हॅक्सिन्स वर्क (Vaccines Work) या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या २० पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केलीय. तसेच सर्वांनी वेळेवर करोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन WHO ने केलंय.

देशाच्या आर्थिक विकासाचे चित्र होणार स्पष्ट; अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार जाणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल.

🔰संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमपासून सुरू होत असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने त्याची सुरुवात होईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केले जाईल. देशाच्या आर्थिक विकासाचे चित्र स्पष्ट करणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.

🔰चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आर्थिक सर्वेक्षण करोनाच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग स्पष्ट करेल. आर्थिक सर्वेक्षण सर्वेक्षण हा चालू आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असेल आणि यामध्ये देशाचा जीडीपी नऊ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देशाचे आर्थिक सर्वेक्षण आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे.

🔰करोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालेल.

🔰राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाईल. १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.

०२ फेब्रुवारी २०२२

राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नसंच

1)"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर
शास्त्री

2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942
उत्तर : 1942

3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती

4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि
तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी

6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)
A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे

उत्तर : लालबहादूर शास्त्री

7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)
A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945

उत्तर : 1942

8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)
A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे

उत्तर : दयानंद सरस्वती

9) "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.

(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)

A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक

10)खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही? (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P8 - 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी

11)ब्रह्म समाज (Brahma Samaj) के संस्थापक कौन थे? (SSC CHSL Exam )
(a) राजा राम मोहन राय
(b) दयानंद सरस्वत
(c) महात्मा गांधी
(d) लोकमान्य तिलक

Ans: (a)

12) स्वतंत्रता काल अवधि के दौरान कांग्रेस के अध्यक्ष कौन थे?
(a) जवाहर लाल नेहरू
(b) अबुल कलाम आजाद
(c) पट्टाभि सीतारमैय्या
(d) जे.बी. कृपलानी

Ans: (d)  (SSC CGL Teir-1)

13) भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रथम मुस्लिम अध्यक्ष कौन था?
(a) रहीमतुल्ला एम सयानी
(b) नवाब सैयद मुहम्मद बहादुर
(c) बदरूद्‌दीन तैयबजी
(d) अबुल कलाम आजाद

Ans: (c) SSC CPO Tier-1

14) "थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान

B. बॅ. महमद अली जीना

C. मौलाना अब्दुल करीम आझाद

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

15) लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅

B. समता

C. सुलभ समाचार

D. बहिष्कृत भारत

16) महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873

B. 10 ऑक्टोबर, 1873

C. 14 सप्टेंबर, 1873 ✅

D. 15 ऑगस्ट, 1873

17) सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅

B. विरेंद्रकुमार घोष

C. अरविंदो घोष

D. हेमचंद्र दास

18) प्रधानमंत्री पीक विमा योजना विषयी योग्य विधान ओळखा?
अ) ही योजना कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकरऱ्यांना
अनिवार्य आहे.
ब) योजनेतंर्गत सर्व खरीप आणि रब्बी
पिकासाठी अनुक्रमे 1.5 आणि 2% प्रिमियम
भरावा लागतो.
क) या योजनेमध्ये वार्षिक पिके आणि
फळबागांचा समावेश करण्यात आला नाही

1) अ
2 ) अ,ब
3) ब,क
4) अ,क

योग्य पर्याय : 1

19) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?
१) १८ एप्रिल - जागतिक वारसा दिवस
२) ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिवस
३) ८ एप्रिल - जागतिक महिला दिवस
४) २५ एप्रिल जागतिक मलेरिया दिवस

योग्य पर्याय : 3

20) 'जागतिक नागरी संरक्षण दिवस' केव्हा पाळला जातो?
१) ४ मार्च
२) १ मार्च
३) ३ मार्च
४) ७ मार्च

योग्य पर्याय : 2

(स्पष्टीकरण -: २०१९ ची थीम : "मुलांची सुरक्षा, आपली जबाबदारी )

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला?
1) जपान
2) थायलंड
3) भारत
4) चीन

योग्य पर्याय : 4

स्पष्टीकरण : > कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण
चीनमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी
आढळला.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...