०९ नोव्हेंबर २०२१

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?

💁‍♂ देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात.

● संविधानाच्या कलम 356 नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.

● संविधानाच्या कलम 365 नुसार, एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असते.

● राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते.
संसदेच्या मंजूरीनंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते.

● संसदेने पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो.

● संसदेची मान्यता मिळत असली, तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य असते.

● राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते.

● राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे शासन चालवतात.

● राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात.

● राष्ट्रपती राजवटीत संबंधित राज्याच्या विधिमंडळाची कार्ये, अधिकार संसदेकडे सोपवले जातात.

● राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात.

● लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या
कालावधीमध्ये देऊ शकतात.

● राष्ट्रपती राजवटीतही उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित असतात.

● संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.

महत्वाचे खटले

🌻केशवानंद भारती खटला 1973:-

👉भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे

👉प्रास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले

👉मूलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल

🌻मिनर्व्हा मिल खटला 1980:-

👉भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे

👉घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही

👉राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल

🌻बेरुबारी युनियन खटला 1960:-

👉प्रास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले

🌻ए के गोपालन खटला 1950:-

👉कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही

🌻मेनका गांधी खटला1978:-

👉कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले

🌻आय आर कोहेल्लो खटला 2007:-

👉नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही.

🌻एस आर बोंमई खटला 1994:-

विविध समित्याविषयी थोडक्यात माहिती

1) रंजन गोगोई समिती: मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणासाठी नेमलेली समिती.

2) परमराजसिंग उमरानंगल समिती: भारतीय हॉकी कर्णधार सरदारसिंगवर ब्रिटिश युवतीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

3) एच.एस. बेदी समिती: शिखावरील सोशल मीडिया व सार्वजनिकरित्या केले जाणारे विनोदी किस्से बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.

4) गोपाळ सुब्रमण्यम समिती: दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

5) दीपक मोहांती समिती: वित्तीय समायोजनाचे धोरण या नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली समिती.

6) श्याम बेनेगल समिती: सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती.

7) अरविंद पनगारिया समिती: जपान बरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समस्या सोडविण्यासाठी

8) एम. वेंकच्या नायडू समिती: जाट समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती

9) बी.के. प्रसाद समिती: इशरत जहां प्रकरणातील गहाळ फायलींचा शोध घेण्यासाठी नेमलेली समिती.

10) डॉ. हर्षदीप कांबळे समिती: ऑनलाइन औषध खरेदी गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.

11) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समिती: राज्यातील डान्सबार बंदीसाठी नवा कायदा करण्यासाठी नेमलेली

12) प्रो. राकेश भटनागर समिती: जेएनयू विद्यापीठ (दिल्ली) मधील चिथावणीजनक दिलेल्या घोषाणांच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती

13) विलास बर्डेकर समिती: राज्याच्या शाश्वत विकासाबरोबरच जैववैविध्याचे सर्वेक्षण करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कृती आराखडा करण्याच्या सुचना सुचविण्यासाठी नेमलेली समिती.

14) भगवान सहाय्य समिती: राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषधी खरेदी घोटाळा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती.

ऊर्जा ही अदिश राशी आहे

व्याख्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय SI पद्धतीत उर्जेचे एकक जीवन ज्यूल आहे, तर CGS पद्धतीत अर्ग आह विविध क्षेत्रातील ऊर्जेच्या वापरानुसार  एकके बदलत जातात जसे की Kilowatt – Hour, Kilocalories इत्यादी

ऊर्जेचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहे

यांत्रिक ऊर्जा
रासायनिक ऊर्जा
Prakash ऊर्जा
उष्णता ऊर्जा
ध्वनि ऊर्जा
भू-औष्णिक ऊर्जा
जलविद्युत ऊर्जा इत्यादी
भौतिक शास्त्राच्या दृष्टीने ऊर्जेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ऊर्जेचे विविध प्रकार असले तरी भौतिक दृष्टीने यांत्रिक ऊर्जेत प्रमुख दोन प्रकार पडतात.

गतिज ऊर्जा

व्याख्या पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात.

सूत्र   K.E. = ½ mv2

, वरील सूत्रात m = वस्तुमान (Mass)

v = वेग (Velocity)

उदाहरण व स्पष्टीकरण

1 समजा आपण वाहन चालवताना ब्रेक दाबला तर ज्या ठिकाणी ब्रेक दाबतो तिथेच वाहन थांबत नाही तर थोडे अंतर पुढे जाऊन थांबते कारण त्या वाहनाला गती असते आपण ब्रेक दाबतो म्हणजे गतीला विरोध करतो मात्र वाहनाला प्राप्त गतिज ऊर्जा संपल्या थोडे अंतर पुढे जावे लागते जडत्व

2 लोकल ट्रेनने प्रवास करताना गतिज ऊर्जेचा गमतीशीर अनुभव येतो लोकल ट्रेन काही सेकंदांसाठी रेल्वेस्थानकावर थांबते एवढ्या कमी वेळात उतरणे व चढणे अवघड असते म्हणून उत्तर त्यांना ट्रेनच्या दिशेने धावत उतरावे लागते व चढतानाही ट्रेनच्या दिशेने धावत चढावे लागते स्थिर स्थितीत गतिमान लोकल मध्ये चढताना अथवा उतरतांना अपघाताची दाट शक्यता असते

स्थितीज ऊर्जा

व्याख्या एखाद्या संस्थेतील निरनिराळ्या घटकांच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे वत या घटकांच्या अन्योन्य क्रियांमुळे त्या संस्थेत निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे स्थितिज ऊर्जा होय

सूत्र P. E. =mgh

m = वस्तुमान (mass)

g = गुरुत्व बल ( gravitational force)

h =  उंची (Height)

उदाहरण व स्पष्टीकरण

1)गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी असते त्यात पाणी साठवले जाते या साठलेल्या पाण्यात स्थितिज ऊर्जा असते गावच्या पाईपलाईनचे व्हाॅल्व्ह उघडल्यानंतर साठलेले पाणी वेगाने गावातील घराघरात पोहोचते.

साठलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा = पाण्याचे वस्तुमान (m) * गुरुत्व बल (g) * टाकीची उंची (h) = mgh.

2) चावीचे घड्याळ जुन्या काळातील चावीच्या घड्याळाला चावी दिल्यानंतर घड्याळातील काट्यांचा स्प्रिंग गुंडाळला जातो यामुळे त्या स्प्रिंगमध्ये स्थितिज ऊर्जा साठवली जाते नंतर याच ऊर्जेचे रूपांतर घडाळ्याच्या काट्यांना गती देतांना गतिज ऊर्जेत होते

3 बॉम्ब मधील स्फोटक


नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत

दोन कृत्रिम ऊर्जास्त्रोत असे दोन प्रकार पडतात तसेच ऊर्जास्त्रोतांचा निर्माणा नुसार दोन गट पडतात

1 पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्त्रोत

ज्या ऊर्जा स्रोतांपासून पुन्हा पुन्हा ऊर्जा मिळवता येते अशा उर्जा स्त्रोतांना  पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्रोत असे म्हणतात.

उदाहरण 1 सौर ऊर्जा

2 पवन ऊर्जा

3 लाटांपासून ऊर्जा

4 भू-औष्णिक ऊर्जा

5 जैविक ऊर्जा

या उर्जास्त्रोतांना अपारंपारिक ऊर्जास्त्रोत असे म्हणतात

या प्रकारांमध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा भोजने kurja इत्यादींचा समावेश होतो

पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोतांचे फायदे

1 या प्रकारच्या ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा अखंड मिळत राहणार आहे

2 या प्रकारची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबदला अथवा गुंतवणूक करावी लागत नाही 3 प्रकारच्या ऊर्जेचा वापर केल्यामुळे प्रदूषण होत नाही

रक्तपट्टीका


🔻आकार द्विबहिर्वक्र व रंगहीन

🔻सस्तन प्राण्यातच आढळतात

🔻केंद्रक नसते व अतिशय लहान

🔻5 ते 10 दिवस जगतात

👉अस्थीमज्जा मध्ये तयार होतात

👉रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात

👁‍🗨यांना Thrombocytes म्हणतात

👁‍🗨डेंग्यू मलेरिया मध्ये यांचे प्रमाण कमी होते

🔰लाल रक्त पेशी🔰

🔘गोलाकार व द्विअंतरावर्क असतात

🔘केंद्रक नाही

🔘आकाराने खूप लहान

🔘हिमोग्लोबीन मुळे लाल रंग

🔘स्त्री मध्ये प्रमाण कमी

🔘127 दिवस जगतात

🔘प्लिहा मध्ये मरतात

👉गर्भात यकृत मध्ये तयार होतात

👉प्रौढ माणसात अस्थी मज्जा मध्ये तयार होतात

👉यांना Erythrocytes म्हणतात

🔴पांढऱ्या पेशी🔴

👁‍🗨आकाराने मोठ्या,अमिबासदृश

👁‍🗨केंद्रक असते व रंगहीन

👁‍🗨3 ते 4 दिवस जगतात

👁‍🗨अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार

👁‍🗨5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात

👉आजारामध्ये यांची संख्या वाढते

👉यांना Leucocytes म्हणतात

संयुगांची निर्मिती

व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात.

1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी

1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण

इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण धातू आणि अधातू यामध्ये होते.

धातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातूंच्या  बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन कमावतात

धातु (Metal):

आपल्या बाह्यतम कक्षेतील  इलेक्ट्रॉन गमावून धन आयनांची निर्मिती करतात त्यांनाच कॅटायन असे म्हणतात आणि धातूंचा या गुणधर्माला विद्युत धन गुणधर्म असे म्हणतात

2) इलेक्ट्रॉनची भागीदारी

समान किंवा भिन्न अधातूमध्येच इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. समांतर धातूमध्ये भागीदारी झाल्यास रेणू तयार होतात तर भिन्न अधातूमध्ये भागीदारी झाल्यास  संयुगे तयार होतात.

अधातूमध्ये भागीदारी होताना त्यांच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात. त्यानंतर प्रत्येक अधातू बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉंन भागीदारीमध्ये वापरतात आणि ते इलेक्ट्रॉन दोन्ही मूलद्रव्यासाठी सामाईक असतात.

रासायनिक बंध:

संयुगातील तसेच रेणूतील दोन किंवा अधिक अणूंना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कारणीभूत असलेल्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध असे म्हणतात.

रासायनिक बंध इलेक्ट्रॉनची देवाण-घेवाण होऊन किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन तयार होतो त्यानुसार रासायनिक बंधाचे दोन प्रकार पडतात.

1) आयनिक बंध:

दोन किंवा अधिक धातू – अधातू मध्ये इलेक्ट्रॉन ची देवाण-घेवाण होऊन तयार होणाऱ्या रासायनिक बंधास  आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात.

उदा: सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड

सोडियम अणूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 1 असून क्लोरीन अणूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 7 आहे.

सोडियम आपल्या बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला  देतो, व दोघांच्या बाह्यतम कक्षेत पूर्ण होऊन अष्टक स्थिती प्राप्त होते.

सोडियम ने एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयनाची निर्मिती होते, त्यालाच सोडियम आयन असे म्हणतात. तर क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन कमावल्यामुळे ऋण आयनांची निर्मिती होते त्यालाच क्लोराईड आयन असे म्हणतात.

तसेच त्यांच्यातील या रासायनिक बंधाला आयनिक बंध असे म्हणतात.

2) सहसंयुज बंध

दोन किंवा अधिक अधातूमध्ये भागीदारी होऊन तयार होणाऱ्या रासायनिक बंधास सहसंयुज बंध असे म्हणतात.

दोन हायड्रोजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन हायड्रोजन रेणू तयार होतो.

हायड्रोजन व क्लोरिन मध्ये इलेक्ट्रॉन ची भागीदारी होऊन हायड्रोजन क्लोराईड तयार होते.

भागीदारी करतांना त्या अधातूंच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात व त्यानंतर त्या अधातूंना स्थिर होण्यासाठी आवश्यक असणारे इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये वापरतात.

भागीदारीतील इलेक्ट्रॉन दोन्हीही अधातूंसाठी सामाईक असतात.

बाह्यतम कक्षेलाच संयुजा कक्षा असे म्हणतात. तसेच त्यांच्यातील रासायनिक बंधाला सहसंयुज बंध असे म्हणतात.

समान व भिन्न अधातू मध्ये भागीदारी मध्ये किती इलेक्ट्रॉन भाग घेतात त्यानुसार सहसंयुज बंधाचे तीन प्रकार पडतात.

1)  एकेरी सहसंयुज बंध

समान किंवा भिन्न अधातूमध्ये दोन इलेक्ट्रॉनची किंवा एका जोडीची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला एकेरी सहसंयुज बंध असे म्हणतात. या बंधाला ‘-’ या चिन्हाने दर्शवितात.

2) दुहेरी सहसंयुज बंध

समान किंवा भिन्न अधातूमध्ये चार इलेक्ट्रॉनची किंवा दोन जोडीची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला दुहेरी सहसंयुज बंध असे म्हणतात. या बंदला बंधाला ‘=’ या चिन्हाने दर्शवितात.

3) तिहेरी सहसंयुज बंध

समान किंवा भिन्न अधातू मध्ये सहा इलेक्ट्रॉनची किंवा तीन जोडीची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला तिहेरी सहसंयुज बंध असे म्हणतात.

याबंधाला ‘==’ या चिन्हाने दर्शवितात.

आयनिक संयुगे आणि सहसंयुजी संयुगे

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स :

सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.

 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.
 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.
 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.

 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

 प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.
  बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.

 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात.
 मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.

  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु
 गुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.
 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.
 हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.

 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.
 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.
 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.

 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.
टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे.

जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

  ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.
 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.

 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ
 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment)
 मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.

 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.
 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.   

दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity)

तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.

· वातावरणात असणार्‍या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.

· जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात.

· ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास 'दवबिंदू तापमान' म्हणतात. हवेमध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.

· हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच 'आर्द्रता' म्हणतात.

· ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.

· एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास 'निरपेक्ष आर्द्रता' असे म्हणतात.

· सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

· हवा संतृप्त होण्यासाठी लागणार्‍या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे.

· हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावले असेल तर ती हवा 'असंतृप्त' आहे असे म्हटतात.

· जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.

· याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.

· हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.

· हवेमध्ये ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुमान व तेच आकारमान त्याच तापमानास संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणार्याआ पाण्याचे वस्तुमान याच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात.

· सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात.

· दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.

· जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.

· थंड जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.

· जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.

· उंचावरून जाणार्‍या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा(त्राईल) दिसते. विमान उडत असताना इंजीनापासून निघणार्‍या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात.

जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर तेजोरेखा लांबच लांब दिसते.

· जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान तेजोरेखा तयार होते किंवा तयार सुद्धा होत नाही.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...