विज्ञान युगात अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन आहे कि, २१ सप्टेबर १९९५ मध्ये गणपती दुध प्यायला अशी भली मोठी अफवा पसरवली होती, तिचे उच्चाटन व प्रबोधन करून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सत्यशोधन करून हि निव्वळ अफवा आहे हे सिद्ध केले होते, त्या दिवसापासून अंनीस ने २१ सप्टेबर हा दिवस "चमत्कार सत्यशोधन दिन "
म्हणजेच जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून घोषित केला आहे. श्रद्धा तपासून पाहण्याचं भान ठेवा. 'विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' असे डॉ.दाभोळकर नेहमी म्हणत असे. समाजात वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या रुढी-परंपरांचा पगडा आहे, त्या रुढी हद्दपार करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहत असताना होणाऱ्या त्रासाचं, येणाऱ्या अडचणीना न जुमानता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांसारख्या समाजसुधारकांचे विचार प्रत्यक्षात यावेत, हाच या परिवर्तनवादी चळवळीमागचा हेतू आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२१ सप्टेंबर २०२१
आज २१ सप्टेबर जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन...
२० सप्टेंबर २०२१
शब्दाच्या जाती
1)नाम -
जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर, आकाश, गोड
2)सर्वनाम-
जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरण - मी, तू, आम्ही
3) विशेषण-
जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच
4)क्रियापद-
जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.
उदाहरण - बसणे, पळणे
5)क्रियाविशेषण-
जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या
6) शब्दयोगी अव्यय-
जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी
7) उभयान्वयी अव्यय-
जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - व, आणि, किंवा
8) केवलप्रयोगी अव्यय-
जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - अरेरे, अबब
___________________________________
सह्याद्रीतील प्रमुख घाट
घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे
आंबाघाट (११) रत्नागिरी-कोल्हापूर
आंबेनळी घाट () महाबळेश्वर-पोलादपूर
आंबोली-रामघाट (१२) सावंतवाडी– कोल्हापूर
कुंभार्ली घाट() चिपळूण-कराड
खंबाटकी-खंडाळा () पुणे-सातारा
चंदनापुरी घाट () नाशिक-पुणे
ताम्हिणी घाट () माणगाव (कोकण)-पुणे
दिवा घाट() पुणे-सासवड
थळघाट-कसार्याचा घाट (७)
नाशिक-मुंबई (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)
पसरणी घाट () वाई-महाबळेश्वर
पारघाट (१०) सातारा-रत्नागिरी
फोंडाघाट (९) कोल्हापूर-गोवा
बोरघाट-खंडाळ्याचा घाट (१५)
पुणे-मुंबई (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४)
माळशेज घाट() आळेफाटा-कल्याण
रणतोंडी घाट () महाड-महाबळेश्वर
वरंधा घाट (६) भोर-महाड
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
नाईल (4,132 मैल)
2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
आशिया
3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
रशिया
4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
थ्री गोर्जस डँम (three gorges dam)
5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)
6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
ग्रीनलँड (Greenland)
7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)
8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
माउंट एव्हरेस्ट
9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
मौसीमराम
10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
जेफ बेझोस
11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)
12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
बुर्ज खलिफा
13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी
14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे?
5
15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
वॉल-मार्ट
16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
कतर
17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
कांगो
18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे?
एंजल फॉल्स
19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
जपानमधील बुलेट ट्रेन
20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)
21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
चीन
22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे?
इनलंड ताईपान
23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
गुरु
24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
बुध
25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
21 जून
26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
22 डिसेंबर
27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
पॅसिफिक समुद्र
28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
आर्टिक समुद्र
29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
बी हमिंग बर्ड
30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
शहामृग
31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
नील आर्मस्ट्रॉंग
32) विमानाचा शोध कोणी लावला?
राईट बंधू
33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
सनातन धर्म
34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
हिरोशिमा
35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
एस. भंडारनायके (लंका)
36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
टोकियो
37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
महाभारत
38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
द टाइम्स ऑफ इंडिया
39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
नार्वे सुरंग
40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
ग्रेट वॉल ऑफ चीन
41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
चीन
42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
पंडित जवहरलाल नेहरू
43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
सिकंदर
45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
दयाराम साहनी
46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
गुरुगोविंद सिंग
47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
रझिया सुलतान
48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
राजा हरिश्चंद्र
49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
झाशीची राणी
50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
लॉर्ड मेकॉले
स्पर्धा परीक्षा तयारी-चालू घडामोडी प्रश्न
१) ‘हूरुन इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट २०२१’ याच्यानुसार, कोणता देश जगातील तिसरी सर्वात मोठी युनिकॉर्न/स्टार्टअप परिसंस्था ठरते?
उत्तर :- भारत
२) कोणत्या खेळाडूने ‘२०२० टोकियो पॅरालिम्पिक’मध्ये, पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले?
उत्तर :- हरविंदर सिंग
३) कोणत्या राज्यात ‘बैरासिउल वीजनिर्मिती केंद्र’ आहे?
उत्तर :- हिमाचल प्रदेश
४) कोणत्या संस्थेला 'ड्युन अँड ब्रॅडस्ट्रीट - कॉर्पोरेट अवॉर्ड २०२१' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला?
उत्तर :- SJVN लिमिटेड
५) कोणत्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १२ सदस्यांच्या समितीची स्थापना केली, जी पत्रकार कल्याण योजनेच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करणार आहे?
उत्तर :- अशोक कुमार टंडन
६) भारतीय हवाईदलाचे प्रमुख _ येथे ३० ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २१ या कालावधीत झालेल्या ‘पॅसिफिक एअर चीफ्स सिम्पोजियम २०२१ (PACS-२१) या कार्यक्रमात उपस्थित होते.
उत्तर :- जॉइंट बेस पर्ल हार्बर-हिकम
७) कोणत्या रेल्वे स्थानकांना ५-स्टार 'ईट राइट स्टेशन' प्रमाणपत्र देण्यात आले आहे?
उत्तर :- चंदीगड रेल्वे स्थानक
८) कोणत्या ठिकाणी ३ सप्टेंबर २०२१ रोजी ६ वी ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) शिखर परिषद’ याचे उद्घाटन झाले?
उत्तर :- व्लादिवोस्तोक ( रशिया )
९) कोणत्या अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावरील खडकाचा पहिला नमुना यशस्वीरित्या गोळा केले?
उत्तर :- नासा ( अमेरिका )
१०) कोणत्या संघटनेने जगभरातून लीड-मिश्रित पेट्रोलचा वापर पूर्णपणे बंद झाला असल्याची घोषणा केली?
उत्तर :- UNEP ( संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम )
अनुशीलन समिती
🔸विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था
🔸युवकांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेतर्फे मंडळे स्थापण्यात येत व त्यांत शारीरिक कवायत, हत्यारे वापरणे, घोड्यावर बसणे, पोहणे, मुष्टियुद्ध इ. प्रकार शिकवले जात.
🔸गुप्त कार्यक्रमात निवडक लोकच घेतले जात. जे प्राणार्पणाची शपथ घेत त्यांना क्रांतिकारक चळवळीचे प्रशिक्षण देण्यात येत असे.
🔸वंगभंगाविरूद्ध झालेल्या प्रचंड चळवळीमुळे (१९०५) अनुशीलन समितीच्या कार्यास फार प्रोत्साहन मिळाले. ह्याच सुमारास अरविंद घोष, त्यांचे धाकटे बंधू बारिंद्रकुमार घोष व इतर अनेक देशाभिमानी लोक समितीच्या कार्यात सामील झाले.
🔸अध्यक्ष पी. मित्र ह्यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये समितीच्या अनेक शाखा स्यापन झाल्या. त्यातील प्रमुख शाखा डाक्का येथे पुलीनदास ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापण्यात आली.
🔸पुढे समितीत कार्यपद्धतीसंबंधी मतभेद होऊ लागले. बारिंद्रकुमार व त्यांचे तरुण सहकारी ह्यांना बाँब तयार करणे हे समितीचे आद्य कर्तव्य असावे असे वाटे,
तर समितीचे अध्यक्ष पी. मित्र ह्यांचे मत तात्कालिक हिंसक क्रंतीच्या विरुद्ध होते.
🔸 ह्या मतभेदांमुळे अनुशीलन समितीतच अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.
🔸पुढे समितीत तात्त्विक मतभेद वाढू लागले आणि त्यांतून तीन गट निर्माण झाले. डाक्का येथील पुलीनदास ह्यांचा, कलकत्त्यात पी. मित्र ह्यांचा व राशबिहारी बोस ह्यांचा असे तीन गट कार्य करू लागले; तथापि एकमेकांशी संपर्क मात्र ठेवला जात असे. आर्थिक व इतर स्वरूपाचा मदतही एकमेकांस देण्यात येई.
संगणक या विषयावर सर्वात महत्वाचे प्रश्न 𝗽𝗮𝗿𝘁-1
Q : खालीलपैकी कोणाला कॉम्प्यूटरचा पीतामह म्हटले जाते?
(अ) हरमन गोलेरिथ
(ब) चार्ल्स बेबेज ✅✅
(क) बेल्स पास्कल
(ड) जोसेफ जॅकवर्ड
Q : संगणकांच्या विकासात अधिकांश कोणाचे योगदान मोलाचे आहे?
(अ) हरमन गोलेरिथ
(ब) चार्ल्स बेबेज
(क) सॅबल्स पास्कल
(ड) वाँन न्यूमन✔️✔️
Q : सर्व प्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला?
(अ) इ.स 1946 ✔️✔️
(ब) इ.स 1950
(क) इ.स1960
(ड) इ.स 1965
Q : संगणकाच्या भौतिक (ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो) रचनेला काय म्हणतात?
(अ) सॉफ्टवेयर
(ब) हार्डवेयर ✔️✔️
(क) फर्मवेयर
(ड) वरील सर्व
Q : संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणार्या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्यांशी संबंधित इतर लिखित सामग्रीला म्हणतात
(अ) सॉफ्टवेअर✔️✔️
(ब) हार्डवेअर
(क) नेटवर्क
(ड) फर्मवेअर
Q : संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात?
(अ) प्रिंटर
(ब) की बोर्ड
(क) सीपीयू✔️✔️
(ड) हार्ड डिस्क
Q : खालीलपैकी कोणते हार्डवेयर डिवाइस आहे, ज्याला कॉम्पुटरचा मेंदू म्हटले जाते?
(अ) RAM
(ब) CPU✔️✔️
(क) ALU
(ड) ROM
Q : ___________ हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे?
(अ) हार्ड डिस्क
(ब) CPU✔️✔️
(क) NIC
(ड) मदर बोर्ड
Q : संगणक हार्डवेअर जे मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतो त्याला__________ म्हणतात?
(अ) हार्ड डिस्क✔️✔️
(ब) चिप
(क) व्हॅक्युम ट्यूब
(ड) यापैकी नाही
Q : खालीलपैकी कोणी पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्लू प्रिंटच्या विकासासाठी सर्वाधिक योगदान दिले?
(अ) हरमन गोलेरीथ
(ब) चार्ल्स बेबेज✔️✔️
(क) बेल्स पास्कल
(ड) विलियम बुरोस
मराठी व्याकरण
📚 चला ग्रंथकार ओळखू या📚
१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
o विश्वास पाटील
o आनंद यादव
o रणजीत देसाई
o शिवाजी सावंत ✅
२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o यशवंत कानेटकर
o वि. स. खांडेकर ✅
o व्यंकटेश माडगुळकर
o आण्णाभाऊ साठे
३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?
o आण्णाभाऊ साठे ✅
o बा. भ. बोरकर
o गौरी देशपांडे
o व्यंकटेश माडगुळकर
४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?
o लक्ष्मीकांत तांबोळी
o प्रा. व. भा. बोधे
o विश्वास महिपाती पाटील ✅
o वा. म. जोशी
५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?
o गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o चंद्रमुखी
o ग्रंथकाली
o मंजुघोषा
६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .
o नामदेव ढसाळ ✅
o दया पवार
o जोगेंद्र कवाडे
o आरती प्रभू
७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o झाडाझडती
o संभाजी
o बनगरवाडी ✅
o सात सक त्रेचाळीस
८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o श्री. ना, पेंडसे
o भालचंद्र नेमाडे ✅
o रा. रं. बोराडे
o ग.ल. ठोकळ
९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?
o मुक्तामाला
o बळीबा पाटील
o यमुना पर्यटन ✅
o मोचनगड
१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o एकेक पान गळावया ✅
o स्फोट
o कल्याणी
o झाड
११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?
o गौरी देशपांडे
o शैला बेल्ले
o जोत्स्ना देवधर
o सुमती क्षेत्रमाडे ✅
१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?
o डॉ. यशवंत पाटणे ✅
o आशा कर्दळे
o ह.ना.आपटे
o व.ह. पिटके
१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?
o वामन परत आला
o जगबुडी
o एक होता फेंगाड्या
o गावपांढर ✅
१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o राजेंद्र मलोसे ✅
o भाऊ पाध्ये
o दादासाहेब मोरे
o जयंत नारळीकर
१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o कल्पनेच्या तीरावर ✅
o गारंबीचा बापू
o पांढरे ढग
o वस्ती वाढते आहे
आर्थिक आणीबाणी
संविधानाच्या कलम ३६० अनुसार राष्ट्रपतींची अशी खात्री झाली की, भारताचे किंवा भारताच्या एखाद्या भागाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आहे, तर आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती जाहिर करु शकतात
१) आर्थिक आणीबाणीची घोषणा केल्यापासून २ महिन्याच्या आत संसदेने मान्यता देणे आवश्यक आहे असे न झाल्यस घोषणा देणे रद्द होते
२) आर्थिक आणीबाणीची घोषणा केलेल्या कालावधीत जर लोकसभा विसर्जित असेल तर राज्यसभेची मान्यता घेणे आवश्यक असते.
■ आर्थिक आणीबाणीचे परिणाम:–
१. केंद्र व राज्य सरकारांना आर्थिक बाबतीत राष्ट्रपती योग्य ते आदेश देतात.
२. राज्य सरकारांना आपली आर्थिक विधेयके राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवावी लागतात
३. कोणत्याही अधिका-याचे किंवा पदाधिका-यांचे वेतन वा भत्ते कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस आहे. आर्थिक वर्षातील महसूल – उत्पन्नाच्या वाटणीमध्ये राष्ट्रपती सुधारणा करु शकतात (आत्तापर्यत भारतात एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली नाही.)
यात भारताचा सर्व प्रकारच्या महसूलातून मिळालेले उत्पन्न कर्ज व सार्वजनिक उद्योगांचा नफा सरकार ने दिलेल्या कर्जाची आलेली परत फेड इतर उत्पन्नाचा समावेश होतो.
सरकारचा पुर्ण खर्च एकत्रित व संचित निधीतुन केला जातो.
भारताच्या एकत्रित व संचित निधी खर्चासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता असते.
■ संसदेच्या संमतीची आवश्यकता नसलेले खर्च:–
१. राष्ट्रपतीचे वेतन, भत्ते व राष्ट्रपतींच्या कार्यालयावरील खर्च
२. सर्वोच्च न्यायालयच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते.
३. CAG चे वेतन, भत्ते व निवृत्ती वेतन.
४. न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे द्याव्या लागणा-या रकमा
५. घटना/संसद यांनी मान्य केलेल्या खर्चाच्या बाबी
वरील सर्व बाबी वरील खर्चावर संसदेत चर्चा होते पण मतदान होत नाही.
भारताचा आकस्मित खर्च निधी – कलम २६७
■ रचना – १९५०
या प्रकारच्या खर्चास प्रथम राष्ट्रपती परवानगी देतात, नंतर संसद मंजूरी देते.
केंद्र सरकारचा कर उभारणीचा अधिकार घटनेच्या कलम २९२ अन्वये आहे तर घटक राज्यांना कर आकारणीचा अधिकार कलम २९३ अन्वये आहे
जेवढी रक्कम या निधीतुन काढली जाते त्यांची पुन्हा पुर्ती केली जाते. सध्या हा निधी ५०० कोटी इतका आहे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
44वी घटनादुरुस्ती 1978
1) लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.
2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.
3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.
4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.
5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.
6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.
7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.
8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.
9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.
10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.
11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.
12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.
13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना :
ही योजना 25 डिसेंबर 2005 पासून 100 टक्के केंद्र-पुरस्कत म्हणून सुरू करण्यात आली.
सर्व न जोडलेल्या खेडे गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे.
निधी पुरवठा; केंद्रीय रस्ते निधीमध्ये जमा झालेल्या हाय स्पीड डिझेल वरील उपकराच्या 50% रक्कम या योजनेसाठी वापरली जाते.त्याचबरोबर देशी तसेच परदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदतही यासाठी घेतली जाते.
या योजनेचे उद्दिष्ट सपाट प्रदेशातील 500 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या तर डोंगराळ/ आदिवासी/ वाळवंटी/ डाव्या अतिरेकाने प्रभावी प्रदेशातील 250 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या वस्त्यांना
सिंगल बारमाही रस्त्याने जोडणे, हे आहे. या योजनेत आतापर्यंत रस्त्यांनी न जोडण्यात आलेल्या वस्त्यांचाच समावेश करण्यात आला आहे.
आतापर्यंत 3,41,257 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले असून 82,019 वस्त्यांना नवीन रस्त्यांनी जोडण्यात आले आहे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना (SJSRY):
भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंतीच्या वर्षी 1 डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तीन योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली आहे.
नेहरू रोजगार योजना
अर्बन बेसिक सर्विस फॉर पुअर
प्राईम मिनिस्टर इंटिग्रटेड अर्बन प्रॉव्हर्टी
ही योजना शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करते. तसेच, योजनेत माजुरी रोजगाराचीही तरतूद करण्यात आली आहे.
लाभर्थ्यांची निवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत घरोघरी जाऊन केली जाते.
योजनेचा वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकारमध्ये 75:25 या प्रमाणात केला जातो.
या योजनेत पुढील दोन उप-योजना राबविल्या जातात
अर्बन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम
अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
इंदिरा आवास योजना (IAY):
1985-86 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. एप्रिल 1989 पासून तिची अंमलबजावणी जवाहरलाल रोजगार योजनेचा भाग म्हणून करण्यास सुरुवात झाली. 1 जानेवारी 1966 पासून
भारत सरकारने तिला स्वातंत्र्य दर्जा दिला आहे.
या योजेनेअतर्गत अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व मुक्त वेठबिगर या गटांतील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबीयांना घरे बांधण्यासाठी/सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जाते.
ही केंद्र पुरस्कार योजना असून वित्तीय संसाधनांची विभागणी केंद्र व राज्यांमध्ये 75:25 प्रमाणात केली जाते.पूर्वात्तर राज्यांसाठी हे प्रमाण 90:10 असे आहे.
टिकाऊ पदार्थाची घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल 2010 पासून प्रत्येक घराची किमत प्रत्येकी रु. 45000 इतकी निश्चित केली आहे. राज्य शासनाने ही किंमत प्रत्येकी रु. 70,000 एवढी सुधारित केली आ
१८ सप्टेंबर २०२१
महाराष्ट्र - जलाशय व धरणे.
🔶कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
🔶जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
🔶बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
🔶 भडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
🔶गगापूर - (गोदावरी) नाशिक
🔶 राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
🔶मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
🔶 उजनी - (भीमा) सोलापूर
🔶तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
🔶यशवंत धरण - (बोर) वर्धा
🔶 खडकवासला - (मुठा) पुणे
🔶 यलदरी - (पूर्णा) परभणी
Online Test
Latest post
१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५
१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...
-
टेस्ट क्रमांक :-08( तलाठी भरती) http://testmoz.com/12912916 ✅Passcode - 111 ------------------------------------------------ टेस्ट क्...
-
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात. 1. डोंगरी वारे 2. दारिय वारे ✅ 3. स्थानिक वारे 4. या पैकी नाही 2⃣ पथ्वीवर चंद्राचे आ...
-
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा? उत्तर- सोलापूर 2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर...