०३ डिसेंबर २०१९

झटपट चालु घडामोडी प्रश्न उत्तरे


1) ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ कोणत्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे?
उत्तर : इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस

2) ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

3) यावर्षी ‘इंडिया फॉर ह्युमॅनिटी - जयपूर फूट’ कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

4) "अरुंधती सुवर्ण योजना" कोणत्या राज्यसरकारद्वारे लागू केली जाणार आहे?
उत्तर : आसाम सरकार

5) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोणत्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले?
उत्तर : किरण मजुमदार-शॉ

6) नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड प्रकल्प कधीपासून कार्यरत केला जाणार आहे?
उत्तर : 31 डिसेंबर 2020

7) राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था (NISR) याची स्थापना कोठे होणार आहे?
उत्तर : लडाख

8) ‘मिस्टर युनिव्हर्स 2019’ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर : चित्रेश नतेसन

9) "डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट" महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : वाराणसी

10) ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
उत्तर : Climate Emergency

📍 कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे?

(A) सुदर्शन पटनाईक✅✅
(B) एम. एफ. हुसेन
(C) राजा रवी वर्मा
(D) नंदालाल बोस

📍 कोणत्या देशाच्या नागरिकांना भारत सरकारने व्हिसा-ऑन-अराईव्हल सुविधा प्रदान केली आहे?

(A) कॅनडा
(B) ऑस्ट्रेलिया
(C) संयुक्त अरब अमिराती✅✅
(D) कुवैत

📍 कोणत्या न्यायमूर्तींनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली?

(A) न्या. अपरेश कुमार सिंग
(B) न्या. एस. चंद्रशेखर
(C) न्या. सुजित नारायण प्रसाद
(D) न्या. डॉ. रवी रंजन✅✅

📍 कोणत्या तेल कंपनीने हिमाच्छादित प्रदेशात सुद्धा वापरले जाऊ शकणारे विशेष हिवाळी डिझेल तयार केले?

(A) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड✅✅
(B) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(C) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(D) गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड

📍 कोणत्या मंत्रालयाच्या वतीने दुसऱ्या दक्षिण आशियाई सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले?

(A) वित्त मंत्रालय
(B) पर्यटन मंत्रालय
(C) महिला आणि बाल विकास मंत्रालय✅✅
(D) गृह मंत्रालय

📍 कोणत्या शहरात ‘मुख्यमंत्री सेप्टिक टँक सफाई योजना’ सुरू करण्यात आली?

(A) जयपूर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) गुरुग्राम
(D) झुंझुनू

📍 कोणता राज्य क्रिकेट संघ त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंसाठी करार पद्धतिची घोषणा करणारा पहिला राज्य क्रिकेट संघ ठरला?

(A) उत्तरप्रदेश
(B) कर्नाटक
(C) महाराष्ट्र
(D) उत्तराखंड✅✅

📍 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मते, 2019 या वर्षाच्या द्वितीय तिमाहीत शहरी बेरोजगारीचा दर किती आहे?

(A) 9.5%
(B) 10%
(C) 11.6%
(D) 9.3%✅✅

📍 बेंगळुरूच्या झेंडूच्या फुलांचा वापर करून "फ्लावर्स ऑफ टॉलरन्स" या नावाने तयार केलेले कार्पेट ___ येथे प्रदर्शनास ठेवले गेले.

(A) दुबई✅✅
(B) कतार
(C) इस्त्राएल
(D) मेक्सिको

📍 कोणत्या देशाने 21 व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाऊंड मिश्र जोडी प्रकारात सुवर्णपदक पटकवले?

(A) भारत✅✅
(B) चीन
(C) जापान
(D) इंडोनेशिया

महत्त्वाचे 10 चालुघडामोडी प्रश्न उत्तरे


1) भारतीय अन्नपदार्थ महामंडळाचे (FCI) अधिकृत भांडवल किती रुपयांपर्यंत पर्यंत वाढविण्यात आले आहे?
उत्तर : 10,000 कोटी रुपये

2) 15 वी उच्च शिक्षण शिखर परिषद कोणातर्फे भरविण्यात आली?
उत्तर : FICCI

3) “ISROने ‘कार्टोसॅट-3’ उपग्रह कोणत्या केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला?
उत्तर : सतीश धवन अंतराळ केंद्र

4) भारत-श्रीलंका यांच्यादरम्यान ‘मित्र शक्ती’ नावाचा संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम कुठे होणार आहे?
उत्तर : पुणे

5) नागालँडमध्ये कितव्या ‘हॉर्नबिल महोत्सव’चा शुभारंभ झाला?
उत्तर : 20 व्या

6) पहिली ‘भारत-जापान 2+2 परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री बैठक’ कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

7) "सेल इंडिया 2019" हा नौकानयन कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : मुंबई

8) कामगार मंत्रालयाद्वारे कोणत्या काळात निवृत्तीवेतन आठवडा पाळला जात आहे?
उत्तर : 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर

9) फास्टॅगची सक्ती करण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीसाठी वाढीव मुदत किती आहे?
उत्तर : 15 डिसेंबर 2019

10) कोणत्या दिवशी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो?
उत्तर : 1 डिसेंबर

चालू घडामोडी प्रश्न

• जुलैमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने या दलाला संघटीत गट ‘ए’ चा दर्जा देण्यास मंजुरी दिली
- भारतीय रेल्वे सुरक्षा दल (RPF)

• 2 ते 13 सप्टेंबर 2019 या काळात संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD) याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन या ठिकाणी होणार
- ग्रेटर नोएडा, दिल्ली, भारत.

• इटलीमध्ये 30 व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावणारी भारताची धावपटू
- द्युती चंद

•  महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिल्याप्रमाणे, शेतकऱ्यांना शाश्वत व संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने राज्यातल्या अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणारी योजना
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना.

• रानीदुगमा (गम्पाहा येथे)'---------- हे भारताच्या साहाय्याने बनविलेले पहिले मॉडेल गाव या देशात आहे
- श्रीलंका.

• एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 100 बळी टिपण्याचा टप्पा पार करणारा दुसरा खेळाडू
- भारताचा जसप्रित बूमरा (57 सामने).

• हेनली पासपोर्ट निर्देशांक 2019’ याच्यानुसार जगातला सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेला देश
- जपान आणि सिंगापूर (संयुक्तपणे)

• भारतीय विशिष्ट  ओळख प्राधिकरण (UIDAI) याचे पहिले आधार सेवा केंद्र (ASK) उघडण्यात आले ते ठिकाण
- दिल्ली आणि विजयवाडा.

• 2020 सालापर्यंत विजेवर चालणार्या  वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनसह विकसित केली जाणारी भारताचा पहिला महामार्ग (ई-कॉरिडॉर)
- दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा महामार्ग (500 किमी).

• 2050 सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कायदा करणारे जी-7 समुहामधील पहिला देश
– ब्रिटन.

• तामिळनाडूचे राज्य फुलपाखरू------------ हे आहेत
- तामिळ योमन (सिरोक्रोआ थेइस).

* IIT मद्रासने विकसित केलेले RISC-C इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चरवर आधारीत असलेली भारताची प्रथम स्वदेशी इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर चीप
– शक्ती प्रोसेसर.

* 'गगनयान' अंतराळ मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याकरिता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) या देशाच्या कंपनीसोबत करार केला
– रशिया (ग्लॅवकोसमोस कंपनी).

*  या कंपनीने भारतात 'डिजिटल उडान' नावाचा डिजिटल साक्षरता उपक्रम जाहीर केला
- जियो.

*  नासाची कोणती अंतराळ दुर्बीण २० जानेवारी २०२० रोजी बंद पडणार आहे
- स्पीटझर

*  इस्रोच्या चांद्रयान २ या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या महिला शास्रज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे
- रितू करीधल व मुथय्या वनिथा

*  जगातील सर्वात लांब पूल कोणता
-हाॅगकाॅग-झुहाई पूल

* रुस्तम काय आहे
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले मानवरहित हवाई वाहन आहे

*  दस्तक अभियान काय आहे
- उत्तर प्रदेश राज्य शासनाने युनिसेफच्या सहकार्याने घरोघरी पोहचणारे दस्तक नामक अभियान आहे. त्याचे उद्दिष्टे हे जपानी मेंदुज्वाराचे राज्यातून उच्चाटन करणे हा आहे.

* मंत्रालयातील महिला कर्मचारी तसेच मंत्रालयात स्तनदा मातांना आपल्या बाळांना स्तनपान करणे सुलभ व्हावे यासाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षाचे नाव काय आहे
- हिरकणी कक्ष

एड्स ची संपूर्ण माहिती (AIDS)Aquired Immuno Dfficiency Syndrome

🎆 एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus)

🎆 एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला.

🎆 जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला.

🎆 भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. ➕ रुग्ण आढळला.

🎆 भारतामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.

🎆 जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – भारत

🎆 भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – महाराष्ट्र

🎆 महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुंग – सांगली

🎆 जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर

   ‼️ 🦠 रोगप्रसाराचे मार्ग 🦠 ‼️

📌 H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध.

📌 H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास..

📌 H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत) .

📍 H.I.V.बाधित व्यक्तीशी चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही.

            ‼️ 🦠 लक्षणे 🦠 ‼️

💉 वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.

💉 सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे.

💉 तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.

💉 नुमोनिया

💉 मेंदूज्वर

💉 हरपीस

💉 विविध प्रकारचे कर्करोग

💉 क्षयरोग .

🎆 वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी.

🎆 इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते..

🎆 मार्च 1985 – एलयाझा तपासणीची उपलब्धता.

🎆 जुलै 1987 – ‘झिडोव्ह्युडीन’ हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध.

🎆 एड्सवरील औषधे – झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.

📍 एड्स प्रतिबंधाकत्मक लस अध्याप उपलब्ध नाही.(संशोधन चालू आहे)

2 डिसेंबरला घडली होती सर्वात भीषण दुर्घटना

2 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमध्ये एक दुर्घटना घडली होती. ज्याबाबत भारतच काय तर संपूर्ण जग कधीच विसरु शकत नाही. कारण जगाच्या इतिहासातील हि सगळ्यात मोठी दुर्घटना होती.

3 डिसेंबर 18984 ची सकाळ भोपाळसाठी अंगावर शहारे आणणारी अशीच होती. संपूर्ण शहरात प्रेतांचा खच- खचच होता. जे लोक यातून वाचले होते त्यातील अनेकजण जन्मभरासाठी अपंग तर दृष्टिहीन झाले होते. 

या दुर्घटनेत तब्बल 15 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता तर लाखों लोकांना कायमचे निकामी केले होते. यानंतर त्यांच्या पुढच्या दोन पिढ्या आजही या दुर्घटनेचे दुष्परिणाम भोगत आहेत.

2 डिसेंबरची रात्र हजारों लोकांसाठी काळरात्रच होती. 'युनियन कार्बाईड' या कंपनीत 'मिथिल आयसोसायनाइट (एमआयस‍ी) या विषारी वायूची भीषण गळती झाली होती. यामुळे लोक गाढ झोपेत असताना अचानक त्यांचा दम कोंडला जाऊ लागला.

काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले होते. भोपाळमधील सगळे रस्ते आणि घरांमध्ये मृतदेहाचा अक्षरश: सडा पडला होता. रस्त्यावरील मृतदेह रुग्णालयात ट्रकमध्ये भरून आणण्यात आले होते. पोस्टमार्टम करून बहुतांश मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आला होता.

कामगारांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली नाही तर काय होते याचा जगाने चांगलाच धडा घेतला. यानंतर विविध देशातील सरकारे जागे झाली आणि त्यांनी कामगारांसाठी विविध आपत्कालीन यंत्रणा बनवल्या.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅगची सक्ती करण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीसाठी दिलेली मुदत _ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

(A) 1 डिसेंबर 2019
(B) 15 डिसेंबर 2019✅✅
(C) 1 जानेवारी 2020
(D) 26 जानेवारी 2020

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कामगार मंत्रालयाद्वारे _ या काळात निवृत्तीवेतन आठवडा पाळला जात आहे.

(A) 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर
(B) 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर✅✅
(C) 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर
(D) 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘ग्लोबल ऑब्झर्व्हेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन’ याच्यानुसार, प्रत्यारोपण करण्यामध्ये भारत जगात _ क्रमांकावर आहे.

(A) चौथा
(B) तिसरा
(C) पहिला
(D) दूसरा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 पर्यावरण या विषयावर आधारित असलेल्या ‘CMS-वातावरण 2019’ नावच्या लघुपट स्पर्धेत व्यवसायिक या श्रेणीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणी पटकविला?

(A) प्रसाद पांडुरंग महेकर✅✅
(B) अंशुल सिन्हा
(C) अजय शर्मा
(D) निशांत कुमार निशू

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 "सेल इंडिया 2019" हा भारतातला सर्वात मोठा नौकायन कार्यक्रम _ येथे आयोजित केला गेला.

(A) कोची
(B) मुंबई✅✅
(C) चेन्नई
(D) पणजी

© संकलन - राम कवले & तुषार शिरगीरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 डिसेंबर 2019 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यादरम्यान आयोजित केल्या जाणार्‍या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे?

(A) युद्ध अभ्यास
(B) इंद्र
(C) सूर्य किरण✅✅
(D) नोमेडिक एलिफेंट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 भारतीय अन्नपदार्थ महामंडळाचे (FCI) अधिकृत भांडवल ____ पर्यंत वाढविण्यात आले आहे.

(A) 10,000 कोटी रुपये✅✅
(B) 3,500 कोटी रुपये
(C) 5,000 कोटी रुपये
(D) 7,500 कोटी रुपये

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या पत्रकाराने या वर्षीचा ‘CPJ आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य पुरस्कार’ जिंकला?

(A) राजदीप सरदेसाई
(B) बरखा दत्त
(C) अर्नब गोस्वामी
(D) नेहा दिक्षित✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ____ येथे NuGen मोबिलिटी शिखर परिषदेचे उद्घाटन झाले.

(A) हरयाणा✅✅
(B) उत्तरप्रदेश
(C) उत्तराखंड
(D) गुजरात

© संकलन - राम कवले & तुषार शिरगीरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ____ तर्फे ‘युवाह’ नावाचा युवा कौशल्य उपक्रम राबवण्यास सुरूवात झाली.

(A) संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)✅✅
(B) आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (AIIB)
(C) आशियाई विकास बँक (ADB)
(D) जागतिक बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतील उद्देशदर्शक क्रियाविशेषणाचे वाक्य कोणते?

   1) शरीर घाटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो.    2) जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
   3) तुला जसे वाटेल तसे वाग        4) जेव्हा घाम गाळवा तेव्हाच खायला भाकरी मिळते.

उत्तर :- 1

2) ‘ऐवजी’ या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

   1) तुलनावाचक    2) विरोधवाचक    3) कैवल्यवाचक    4) विनिमयवाचक

उत्तर :- 4

3) ‘लोक आपली निंदा करोत किंवा स्तुती’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

   1) समुच्चबोधक    2) परिणामबोधक    3) न्यूनत्वबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 4

4) योग्य जोडया लावा.

   अ) संबोधनदर्शक – अहो
   ब) संमतिदर्शक – बराय
   क) प्रशंसादर्शक – यंवं
   1) अ      2) अ, क      3) अ, ब, क    4) अ, ब

उत्तर :- 3

5) रीती वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.
   1) मी लेखन करीत राहीन      2) मी लेखन केले आहे
   3) माझे लेखन झाले आहे      4) मी लेखन करीत असतो
उत्तर :- 4

6) खालील ‘अनुकरणवाचक शब्द’ कोण्या शब्दाच्या जातीचा आहे ? ‘सुटसुटीत’
   1) नाम      2) विशेषण    3) क्रियापद    4) क्रियाविशेषण

उत्तर :-  2

7) ज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात ?

   1) उभयविध    2) व्दिकर्मक    3) विधानपुरक    4) अपूर्णविधान

उत्तर :- 2

8) दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

     ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात.
   1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय    2) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
   3)  परिणामवाचक ‍क्रियाविशेषण अव्यय    4) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 3

9) दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     ‘पावेतो’
   1) कालवाचक    2) स्थलवाचक   
   3) संग्रहवाचक    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

10) ‘आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.’ या मिश्र वाक्यातील अव्यय गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाच्या
     कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) उद्देशबोधक      2) कारणबोधक   
   3) स्वरूपबोधक    4) संकेतबोधक

उत्तर :- 1

०२ डिसेंबर २०१९

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे?

(A) सुदर्शन पटनाईक✅✅
(B) एम. एफ. हुसेन
(C) राजा रवी वर्मा
(D) नंदालाल बोस

📍 कोणत्या देशाच्या नागरिकांना भारत सरकारने व्हिसा-ऑन-अराईव्हल सुविधा प्रदान केली आहे?

(A) कॅनडा
(B) ऑस्ट्रेलिया
(C) संयुक्त अरब अमिराती✅✅
(D) कुवैत

📍 कोणत्या न्यायमूर्तींनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली?

(A) न्या. अपरेश कुमार सिंग
(B) न्या. एस. चंद्रशेखर
(C) न्या. सुजित नारायण प्रसाद
(D) न्या. डॉ. रवी रंजन✅✅

📍 कोणत्या तेल कंपनीने हिमाच्छादित प्रदेशात सुद्धा वापरले जाऊ शकणारे विशेष हिवाळी डिझेल तयार केले?

(A) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड✅✅
(B) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(C) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(D) गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड

📍 कोणत्या मंत्रालयाच्या वतीने दुसऱ्या दक्षिण आशियाई सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले?

(A) वित्त मंत्रालय
(B) पर्यटन मंत्रालय
(C) महिला आणि बाल विकास मंत्रालय✅✅
(D) गृह मंत्रालय

📍 कोणत्या शहरात ‘मुख्यमंत्री सेप्टिक टँक सफाई योजना’ सुरू करण्यात आली?

(A) जयपूर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) गुरुग्राम
(D) झुंझुनू

📍 कोणता राज्य क्रिकेट संघ त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंसाठी करार पद्धतिची घोषणा करणारा पहिला राज्य क्रिकेट संघ ठरला?

(A) उत्तरप्रदेश
(B) कर्नाटक
(C) महाराष्ट्र
(D) उत्तराखंड✅✅

📍 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मते, 2019 या वर्षाच्या द्वितीय तिमाहीत शहरी बेरोजगारीचा दर किती आहे?

(A) 9.5%
(B) 10%
(C) 11.6%
(D) 9.3%✅✅

📍 बेंगळुरूच्या झेंडूच्या फुलांचा वापर करून "फ्लावर्स ऑफ टॉलरन्स" या नावाने तयार केलेले कार्पेट ___ येथे प्रदर्शनास ठेवले गेले.

(A) दुबई✅✅
(B) कतार
(C) इस्त्राएल
(D) मेक्सिको

📍 कोणत्या देशाने 21 व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाऊंड मिश्र जोडी प्रकारात सुवर्णपदक पटकवले?

(A) भारत✅✅
(B) चीन
(C) जापान
(D) इंडोनेशिया

पोलिस भरती साठी आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) ‘युरोपियन ओपन 2019’ ही स्पर्धा कुणी जिंकली?
उत्तर : अँडी मरे

2) आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटने (ISSA)ची स्थापना कोणत्या साली झाली?
उत्तर : सन 1927

3) भारतीय बँक संघाचे (IBA) अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : रजनीश कुमार

4) ‘एशियन ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक पटकावले?
उत्तर : रोनाल्डो सिंग

5) ‘स्टार्टअप शिखर परिषद’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर : नवी दिल्ली

6) ‘नॉन-अलाइन्ड मूव्हमेंट (NAM) शिखर परिषद 2019’ कुठे भरणार आहे?
उत्तर : बाकू

7) वित्तीय कृती दलाच्या (FATF) ‘ग्रे लिस्ट’ मधून कोणत्या देशाला हटविण्यात आले आहे?
उत्तर : श्रीलंका

8) सुलतान ऑफ जोहोर चषक या पुरुष हॉकी स्पर्धेत कोणत्या संघाने भारताला पराभूत केले?
उत्तर : ग्रेट ब्रिटन

9) फेब्रुवारी 2020 मध्ये ‘डिफेन्स एक्सपो’ कुठे भरवण्यात येणार आहे?
उत्तर : लखनऊ

10) सॅंटियागो शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर : चिली

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.

   1) पाय घसरला म्हणून पडलो    2) पाय घसरून पडलो
   3) पाय घसरला व पडलो      4) यापैकी नाही

उत्तर :- 2

2) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

   1) विलासरावांचा थोरला    2) मुलगा   
  3) क्रिकेटचा सामना    4) चांगला खेळला

उत्तर :- 4

3) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी प्रयोग    2) कर्तरी प्रयोग    3) भावे प्रयोग    4) संकरित प्रयोग

उत्तर :- 2

4) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............

   1) कर्मधारय    2) व्दंव्द      3) व्दिगू      4) अव्ययीभाव

उत्तर :- 1

5) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –

     ‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?

   1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह      2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
   3) स्वल्पविराम वा पूर्णविराम    4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह

उत्तर :- 2

6) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता?

   1) मूळुमूळु    2) मूळुमूळू   
   3) मुळूमुळू    4) मुळुमुळु

उत्तर :- 3

7) ‘च’ या वर्गातील च्, छ्, ज्, झ – या वर्णांचा उच्चार ......................... असा दुहेरी होतो.

   1) कंठय व तालव्य    2) मूर्धन्य व कंठय
   3) तालव्य व दंत तालव्य    4) दंत्य व औष्ठय

उत्तर :- 3

8) पुढीलपैकी ‘पूर्वरूप संधी’ चे योग्य उदाहरण कोणते ?

   1) खिडकी + आत = खिडकीत    2) न + उमजे = नुमजे
   3) घाम + डोळे = घामोळे      4) एक + एक = एकेक

उत्तर :- 1

9) खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते  ?

   1) रस्ता    2) भारत     
   3) हिमालय    4) गंगा

उत्तर :- 1

10) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. – आपण गरीबांना मदत करावी.

   1) गरीबांना    2) आपण   
   3) जो      4) करावी

उत्तर :- 2

भारताच्या GDP मध्ये मोठी घसरण, दुसऱ्या तिमाहीत विकासदर 4.5 टक्क्यांवर

◾️ तिमाहीला जीडीपी जाहीर केला जातो.

◾️भारताच्या विकासदरात मोठी घसरण झाली आहे.

◾️चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतले विकासदराचे आकडे जाहीर झाले आहेत.

◾️ त्यानुसार दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 4.5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे.

◾️गेल्या आर्थिक वर्षात याच दरम्यान हा आकडा 7.1 टक्के होता.

◾️सलग दुसऱ्या तिमाहीत विकासदाराच्या आकड्यांमध्ये घट झाली आहे.

◾️ जीडीपीच्या आकड्यातली ही गेल्या 6 वर्षांतली सर्वांत मोठी घसरण आहे. पहिल्या तिमाहीत हा आकडा 5 टक्के होता.

✍GDP म्हणजे नेमकं काय, तो कसा ठरवला जातो?

✍जीडीपी म्हणजे नेमकं काय?

◾️कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे.

◾️एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय.

◾️जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते. देशांतर्गत झालेलं उत्पादन आणि सेवांचाच जीडीपीसाठी विचार होतो.

◾️कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारलं किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो.

✍ प्रमाण वर्ष कोणतं?

◾️भारतात कॉन्स्टंट प्राइस अर्थात कायमस्वरूपी दरांच्या गणनेसाठी 2011-12 हे वर्ष प्रमाण मानण्यात येतं.

◾️उदाहरणार्थ 2011 मध्ये शंभर रुपये किमतीच्या तीन वस्तू तयार झाल्या तर एकूण जीडीपी 300 रुपये होतो. 2019 वर्षापर्यंत उत्पादन दोनवर आलं मात्र किंमत दीडशे रुपये झाली तर नॉमिनल जीडीपी तीनशे रुपये झाला. मात्र प्रत्यक्षात देशाची आर्थिक वृद्धी झाली का?

◾️केंद्रीय सांख्यिकी संस्था ही सगळी माहिती एकत्रित करून जीडीपी जाहीर केला जातो.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...