१९ सप्टेंबर २०१९

आयफा पुरस्कार 2019:-


● सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी)
● सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (संजू)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- इशान खट्टर
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – सारा अली खाल (केदारनाथ)
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर
● गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम
● गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू)
● सर्वोत्कृष्ट संगीत- ‘सोनू के टिटू की स्वीटी’
● सर्वोत्कृष्ट कथा- ‘अंधाधुन’
● जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी
● सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (धडक)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राझी)

आजचे प्रश्न

📌___________ पर्यंत स्वच्छ आणि हागणदारी मुक्त (ODF) भारत बनविणे हे स्वच्छ भारत अभियानाचे उद्दीष्ट आहे.

(A) 2021
(B) 2020
(C) 2019✅✅✅
(D) 2025

📌मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स ___ ह्यांचा वार्षिक गोलकीपर ग्लोबल गोल पुरस्कार देऊन गौरव करणार आहेत.

(A) बोरिस जॉनसन
(B) नरेंद्र मोदी✅✅✅
(C) जस्टिन ट्रूडो
(D) स्कॉट मॉरिसन

📌सेंट्रल ईक्विपमेंट आयडेनटिटी रजिस्टर (CEIR) याच्या संबंधित कोणते विधान चुकीचे आहे?

(A) हा केंद्र सरकारचा नवा प्रकल्प आहे, जो मुळात सर्व मोबाइल कंपन्यांकडून मिळणार्‍या IMEI क्रमांकांचा डेटाबेस असणार.

(B) हे व्यासपीठ सर्व दूरसंचार कंपन्यांना निलंबित केलेल्या मोबाइल हँडसेटविषयी माहिती सामायिक करण्यासाठी एक केंद्रीय प्रणाली म्हणून असणार, जेणेकरुन हँडसेटमधले सिमकार्ड बदलल्यानंतरही हँडसेट दुसर्‍या नेटवर्कमध्ये कार्य करणार नाहीत.

(C) हा प्रकल्प सध्या तामिळनाडूमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालविला जात आहे.✅✅✅

(D) जेव्हा वापरकर्ता संपर्क करतो तेव्हा व्यासपीठावरील कॉल रेकॉर्डर संपर्क करणार्‍याचा फोन क्रमांक आणि ज्या हँडसेटमधून आला आहे त्याचा IMEI क्रमांक दर्शवितो.

📌कोणत्या बँकेनी इंडियन बँकेसोबतच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे?

(A) अलाहाबाद बँक✅✅✅
(B) बँक ऑफ बडोदा
(C) बँक ऑफ इंडिया
(D) पंजाब नॅशनल बँक

📌BBPS याचे पूर्ण नाव काय आहे?

(A) भारत बिल पेमेंट सिस्टम✅✅✅
(B) भारती भीम पोर्टल सिस्टम
(C) भारत बँक पेमेंट सिस्टम
(D) भीम बिल पेमेंट सिस्टम

📌कोणती व्यक्ती परदेशात भारतीय मिशनमध्ये सैन्य मुत्सद्दी म्हणून प्रथम महिला अधिकारी आहे?

(A) प्रेरणा पाठक
(B) राधिका शुक्ला
(C) अंजली सिंग✅✅✅
(D) देवंशी श्रीवास्तव

📌LRO याचे पूर्ण नाव काय आहे?

(A) लुनार रिवॉल्विंग ऑर्बिटर
(B) लोकल रिकोनैसेन्स ऑर्बिटर
(C) लेव्हल रिकोनैसेन्स ओझोन
(D) लुनार रिकोनैसेन्स ऑर्बिटर✅✅✅

भारताच्या विक्रम लँडरसोबत संपर्क स्थापित करण्याच्या प्रयत्नासाठी नासा(NASA)ची LRO ही चांद्रमोहिम 17 सप्टेंबर 2019 रोजी पाठविण्यात आली..

📌कोणत्या संघटनेनी गुरु नानक देव यांच्या 550व्या जयंतीच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या लिखिताचे जागतिक भाषांमध्ये अनुवाद आणि प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला?

(A) संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO)✅✅✅
(B) संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संघटना (UNIDO)
(C) आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)
(D) जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)

📌कोणत्या व्यक्तीची हरियाणाच्या सोनीपत शहरातल्या राय क्रिडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली?

(A) कपिल देव✅✅✅
(B) सुनील गावस्कर
(C) रवी शास्त्री
(D) गौतम गांगुली

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : जागतिक स्पर्धेतून हिमा दासची माघार

▪️जागतिक कनिष्ठ विजेत्या हिमा दासने पाठीच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून माघार घेतली आहे.‘‘दोहा येथे होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून हिमाला पाठीच्या दुखापतीमुळे दुर्दैवी माघार घ्यावी लागत आहे,’’ अशी माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिली. २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत हिमाचा ४ बाय ४०० मीटर महिला आणि ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघात समावेश करण्यात आला होता.
▪️जिस्ना मॅथ्यू, एमआर पूवम्मा, रेवती वीरमणी, शुभा व्यंकटेशन, व्ही. के. विस्मया आणि राजराज विथया यांचा महिलांच्या रिले संघात समावेश आहे. याचप्रमाणे मिश्र संघात जिस्ना, पूवम्मा, विस्मया, जेकॉब अमोज, मोहम्मद अनास आणि नोआह तोम निर्मल यांचा समावेश आहे. धावपटू द्युती चंदला १०० मीटर शर्यतीसाठी नंतर भारतीय संघात स्थान देण्यात आले.
दोहा येथे एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीतून हिमाला अर्धवट माघार घ्यावी लागली होती.

सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा सन्मान!


🔺 या चित्रपटामध्ये एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची कथा दाखविण्यात आली आहे

◾️एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची हेलावणारी कथा असलेल्या ‘माई घाट : क्राइम नं. 103/2005’ या मराठी चित्रपटाने ‘सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात’ बेस्ट चित्रपटाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळविणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही मराठी चित्रपटाला हा सन्मान मिळालेला नाही.
आठ देशांमधून चौदा चित्रपटांची निवड करण्यात आली होती. या चौदा चित्रपटांपैकी ६ बेस्ट चित्रपट निवडले. या ६ चित्रपटांमधून ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’, ‘संकलन’ व ‘छायाचित्रण’ असे पहिल्या श्रेणीतील तीन महत्वाचे पुरस्कार ‘माई घाट : क्राइम नं. 103/2005’ या चित्रपटाने पटकावून बाजी मारलेली आहे.
महिला सशक्तीकरणाची कथा सांगणारा हा चित्रपट युवा निर्माती मोहिनी रामचंद्र गुप्ता त्यांच्या ‘अलकेमी व्हिजन वर्क्स’ची निर्मिती असून अत्यंत वेगळ्या जातकुळीच्या अंतर्मुख करणाऱ्या सत्यघटनेवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटात एका महिलेनी दिलेला विलक्षण लढा, त्यावर तिने मिळविलेला रोमहर्ष विजयाची गाथा काळजाला हात घालणारी असल्यानं हे निर्मितीचं शिवधनुष्य मोहिनी गुप्ता या तरुणीने उचललं आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या कथालेखन आणि संकलनही त्यांनीच केलं आहे.

दरम्यान,अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘सिंगापूर साऊथ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘माई घाट’नं सात विभागांमध्ये तब्बल सहा नामांकनं मिळवत ‘बेस्ट फिल्म’, ‘बेस्ट एडिटींग’, ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’चे पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. हाँगकाँग अँण्ड चायनाचे फिल्ममेकर आणि फेस्टिव्हल अॅथॅारिटी असलेल्या रॅाजर गार्सीया यांनीही ‘माई घाट’च्या पाठीवर कौतुकाची थाप मारत न्याय व्यवस्थेतील ढिलाई दर्शवणाऱ्या या वास्तवदर्शी सिनेमावर स्तुती सुमनांची उधळण केली आहे.

राणी रामपालकडे हॉकीचे नेतृत्व

📌स्टार फॉरवर्ड राणी रामपाल हिच्याकडे इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाºया या दौºयात पाच सामने खेळविले जातील.

📌४ ऑक्टोबरपर्यंत चालणाºया या दौºयात उपकर्णधार गोलकिपर सविता असेल. सविता आणि रजनी इतिमारपू यांनी स्वत:चे स्थान पक्के केले. बचावफळीत दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, निरा खोखर आणि सलिमा टेटे, नमिता टोप्पो, सुशीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंझ यांना स्थान देण्यात आले आहे.

📌मुख्य कोच शोर्ड मारिन म्हणाले, ‘आम्ही टोकियो आलिम्पिकसाठी पात्रता गाठण्यात महत्त्वाच्या वळणावर आहोत. या दौºयाचा लाभ ओडिशात होणाºया एफआयएच हॉकी आॅलिम्पिक पात्रता फेरीत अमेरिकेविरुद्ध खेळताना निश्चित होणार आहे.’

♦️महिला हॉकी संघ :

✍सविता (उपकर्णधार), रजनी इतिमारपू बचावफळी : दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना

📌खोखर, सलिमा टेटे.मधली फळी : सुशीला चानू पुखराम्बाम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल,

📌लिलिमा मिंझ, नमिता टोप्पो आक्रमक फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर व शर्मिला देवी.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

   1) पाटील    2) सोमवार    3) श्रीमंत      4) पौरुषत्व

उत्तर :- 4

2) ‘हा-ही-हे’, ‘तो-ती-ते’, ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे होत ?

   1) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे      2) संबंधी सर्वनामे
   3) प्रश्नार्थक सर्वनामे        4) दर्शक सर्वनामे

उत्तर :- 4

3) अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.

     ‘राम एकवचनी राजा होता.’

   1) नामसाधित क्रियापद      2) प्रयोजक क्रियापद
   3) सर्वनामिक क्रियापद      4) समासघटित विशेषण

उत्तर :- 4

4) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
     मला आता काम करवते.

   1) शक्य क्रियापद    2) भावकर्तृक क्रियापद   
   3) अनियमित क्रियापद    4) साधे क्रियापद

उत्तर :- 1

5) क्रियाविशेषण अव्यये ही :

   अ) क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात.    ब) क्रियाविशेषण विकारी असतात.
   क) एका वाक्याची दुस-या वाक्याशी सांगड घालतात.
   1) फक्त अ बरोबर    2) फक्त क बरोबर   
   3) अ आणि ब बरोबर    4) अ आणि क बरोबर

उत्तर :- 3

6) अचूक विधाने निवडा.

   अ) च, ना, पण, मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यये आहेत.
   ब) च, ना, पण, मात्र हे कैवल्य वाचक शब्दयोगी अव्यये आहेत.

   1) फक्त अ अचूक    2) फक्त ब अचूक   
   3) दोन्ही अचूक      4) दोन्ही चूक

उत्तर :- 3

7) उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’

   1) विकल्पबोधक    2) समुच्चयबोधक   
   3) न्युनत्वबोधक      4) परिणामबोधक

उत्तर :- 2

8) चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे
      वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.

   1) चार      2) पाच      3) तीन      4) एक

उत्तर :- 1

9) ‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.

   1) मी निबंध लिहिला    2) मी निबंध लिहित जाईन
   3) मी निबंध लिहित असेन  4) वरील एकही पर्याय योग्य नाही

उत्तर :- 3

10) ‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) पंडिता    2) विदुषी      3) हुषार      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

पुरंदर विमानतळाचे ‘टेकऑफ’

◾️ पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणा’चे (एसपीव्हीए) रूपांतर कंपनीत करण्यास नुकतीच कायद्यानुसार मान्यता मिळाली आहे.

◾️त्यामुळे यापुढे विमानतळासाठी भूसंपादन, निधीसह विविध कामे ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी’च्या माध्यमातून होणार आहेत.

◾️पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

◾️ त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

◾️प्राधिकरणाचे विस्तारीकरण करून त्यामध्ये सिडको, पीएमआरडीए आणि एमआयडीचा समावेश करण्यात आला या संस्थांचा हिस्सादेखील राज्य सरकारकडून निश्‍चित कण्यात आला होता.

◾️त्यानुसार एसपीव्हीमध्ये सर्वाधिक ५१ टक्के वाटा हा सिडकोचा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा १९ टक्के आणि पीएमआरडीए व एमआयडीसीचे प्रत्येकी १५ टक्के हिस्सा असणार आहे.

◾️पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ विकसित करण्यासाठी ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट’ या नावाने कंपनीची नोंदणी करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 18 सप्टेंबर 2019.


✳  एअर-टू-एअर मिसाईल अ‍ॅस्ट्रा यशस्वीपणे एसयू -30 एमकेआय कडून उड्डाण चाचणी केली गेली: डीआरडीओ

✳  पुरुष वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेची सुरुवात रशियामध्ये

✳  अमित पन्हाळ यांनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या क्वार्टर-फायनलमध्ये प्रवेश केला

✳  मनीष कौशिक वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या क्वार्टर-फायनलमध्ये प्रवेश

✳  दक्षिण कोरिया जपानला त्याच्या विश्वासार्ह व्यापार भागीदारांच्या 'व्हाईट लिस्ट' मधून खाली करते

✳  रामकुमार रामामूर्ती यांनी सीएमडी कॉग्निझंट इंडिया नियुक्त केले

✳  रजत शर्मा न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशनचे अध्यक्ष निवडले

✳  हेव्हल्सने विक्की कौशलची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली

✳  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान 19 सप्टेंबर रोजी सौदी अरेबियाला भेट देणार आहेत

✳  पोप फ्रान्सिस नोव्हेंबरमध्ये थायलंड आणि जपानला भेट देतील

✳  बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्राईल निवडणुकीमुळे भारत दौरा रद्द केला

✳  अमेरिकन महिला सारा थॉमस इंग्लिश चॅनल 4 टाईम्स स्विमसाठी पहिली बनली

✳  एअरटेल पेमेंट्स बँकेने 'भारोसा' बचत खाते सुरू केले

✳  ड्यूश बँकने परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी अ‍ॅक्सेस इंडिया लाँच केली

✳  तेलंगणा सरकारने नोकरी-शोधकर्त्यांशी नियोक्तांना जोडण्यासाठी डीईईटी सुरू केली

✳  'क्यूआर कोड योजना' दिल्ली उपराज्यपालांनी सुरू केली

✳  जागतिक बँकेने टांझानियासाठी 450 दशलक्ष डॉलर्स कर्ज मंजूर केले

✳  एडीबी पाकिस्तानच्या ऊर्जा क्षेत्रासाठी 350 दशलक्ष डॉलर्स कर्ज मंजूर करील

✳  भारत - सिंगापूर - थायलंड सैन्य व्यायाम "मैदान एसआयटीएमएक्स -19" "पोर्ट ब्लेअरमध्ये प्रारंभ

✳  हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मुखमंत्री सेवा संकल्प हेल्पलाईन 1100 सुरू केली

✳  आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी सभापती कोडेला शिव प्रसाद राव यांचे निधन

✳  अ‍ॅग्नेस खार्शींग यांना 11 वा आंतरराष्ट्रीय हरंट डिंक पुरस्कार प्रदान

✳  बांगलादेशच्या पंतप्रधानांना डॉ कलाम स्मृती आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार

✳  ईसीजीसीने कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी योजना “निर्विक” सुरू केली

✳  कोलकाता येथे भारताचे पहिले राष्ट्रीय अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स हब

✳  भारत - थायलंड संयुक्त सैन्य व्यायाम "MAITREE 2019" मेघालयात प्रारंभ

✳  एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष तेहिको नाकाओ यांनी राजीनामा दिला

✳  केंद्र सरकारने स्टील आयात देखरेख प्रणाली सुरू केली

✳  अलाहाबाद बँक बोर्डाने भारतीय बँकेत विलीनीकरणाला मान्यता दिली

✳  एअरोस्पेस एआय आणि थ्रीडी प्रिंटिंगमध्ये एकत्र काम करण्यासाठी बीईएमएल आणि विप्रो

✳  सुनील पालीवाल यांनी कामराजर बंदराचे अध्यक्ष आणि एमडी म्हणून प्रभार स्वीकारला

✳  व्हिसा, बिलडेस्क भागीदार पेमेंट्सच्या आवर्तींसाठी रोलआउट इंटरफेस

✳  छाया शर्मा यांना 2019 एशिया एशिया सोसायटी गेम चेंजर्स पुरस्काराने सन्मानित केले गेले

✳  38 वा शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा ऑक्टोबरपासून आयोजित करण्यात येणार आहे

✳  38 व्या एसआयबीएफ थीम 2019: "ओपन बुक्स, ओपन माइंड्स"

✳  युनेस्कोने 2019 साठी शारज्याला वर्ल्ड बुक कॅपिटल सिटी असे नाव दिले आहे

✳  केरळ सरकार आणि आरसीसीने संयुक्तपणे मालदीव कर्करोगाच्या काळजीवर सामंजस्य करार केला

✳  एससीओ व्यायाम "टीएसईएनटीआर 2019" रशियामध्ये सुरू झाला

✳  आरबीआय बीबीपीएसद्वारे सर्व आवर्ती बिल देयके परवानगी देते

✳  दिनेश मोंगियाने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्तीची घोषणा केली

✳  मेघालयने बांगलादेशला 1-0 ने अंडर -17  सुब्रोटो कप जिंकला

✳  वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2019 थायलंडमध्ये प्रारंभ

✳  2016 मध्ये अमेरिकेतील चार रहिवासी एक भारतीय होता: अहवाल

✳ डीआरडीओ भारताच्या पहिल्या मानवनिर्मित अंतराळ मोहिमेसाठी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी.

आता 70 किमी अंतरावरुनही F-16 पाडणं शक्य.

संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे डीआरडीओने विकसित केलेल्या अस्त्र मिसाइलमुळे भारताची हवाई सुरक्ष अधिक बळकट होणार आहे. अस्त्र हे एअर टू एअर हल्ला करणारे मिसाइल  आहे.

तर इंडियन एअर फोर्सच्या सुखोई-30 एमकेआय या अत्याधुनिक फायटर विमानामधून ‘अस्त्र’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सुखोईमधून डागण्यात आलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राने हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

क्षेपणास्त्राची वैशिष्टये :

अस्त्र हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे पहिले बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे दृष्टीपलीकडचा लक्ष्यभेद करणारे एअर तो एअर मिसाइल आहे.

अस्त्र ताशी 5,555 किलोमीटर वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावते.

अस्त्रमध्ये 70 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.

अस्त्र 15 किलोपर्यंत वॉरहेड म्हणजे स्फोटके वाहून नेऊ शकते.

अस्त्रची रचनाच लघु आणि दीर्घ पल्ला तसेच वेगवेगळया उंचीवरील लक्ष्यभेदण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

अस्रची सुखोई-30 एमकेआयमधून चाचणी करण्यात आली असली तरी मिराज-2000 आणि मिग-29 विमानांमध्येही हे मिसाइल बसवण्यात येईल.

डीआरडीओने अस्त्रची निर्मिती 50 अन्य सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने केली आहे.

सुखोईला अस्त्र मिसाइलने सुसज्ज करण्यासाठी एचएएलने या फायटर विमानामध्ये काही बदल केले आहेत.

भविष्यात अस्त्रचा पल्ला 300 किलोमीटरपर्यंत करण्याची डीआरडीओची योजना आहे.

पंतप्रधान मोदी यांना गेट्स फाउंडेशनचा पुरस्कार

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील आठवडय़ात ‘ग्लोबल गोलकीपर’ पुरस्कार देऊन बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वतीने गौरवण्यात येणार आहे. 

◾️ नेतृत्व व भारतातील स्वच्छता उद्दिष्टांची वचनबद्धता यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

◾️पंतप्रधान मोदी हे त्यांच्या अमेरिका दौऱ्यात ब्लूमबर्ग ग्लोबल बिझिनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलणार आहेत.

◾️त्यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही त्यांचे भाषण होणार आहे.

◾️ २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांना गेट्स फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

◾️ आतापर्यंत स्वच्छ भारत मोहिमेत ९ कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली असून २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भारत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते.

◾️भारतातील ९८ टक्के खेडय़ात सध्या शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून चार वर्षांपूर्वी हे प्रमाण ३८ टक्के होते. 

◾️बिल गेट्स फाउंडेशनने २४ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे.

◾️२०१४ मध्ये मोदी सत्तेवर आल्यानंतर मानवी हक्कांचे उल्लंघन जास्त प्रमाणात झाल्याने हा पुरस्कार रद्द करण्यात यावा अशी मागणी दक्षिण आशियायी अमेरिकी गटाने केली आहे.

◾️त्यांनी मोदी यांना पुरस्कार देण्याबाबत टीका करणारे खुले पत्र जारी केले आहे. दरम्यान सीएनएनला बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनने पाठवलेल्या निवेदनात मोदी यांना पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

◾️स्वच्छ भारत योजनेपूर्वी ५०कोटी लोकांना स्वच्छतागृहाची सुविधा नव्हती आता त्यातील बहुतांश लोकांना ती मिळाली आहेत ही मोठी कामगिरी आहे असे गेटस फाउंडेशनचे म्हणणे आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१८ सप्टेंबर २०१९

पोलीस भरती प्रश्नसंच

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती?
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - पुणे. 

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद, केंद्राची राज्यांना सूचना

🅱 पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असं आवाहन  ➖ पंतप्रधान नरेंद्र मोदी

🅱 ग्राहक आणि दुकानदारही काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्यावर भर

🅱 केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले असून, प्लास्टिक बंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

🅱 प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचं उत्पादन २ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंद करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.

🅱 केंद्रानं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना दिली आहे.

🅱 पर्यावरण मंत्रालयानंही या महिन्याच्या सुरुवातीला मार्गदर्शक सूचना दिल्या

🅱 सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या वस्तू उदा. कृत्रिम फुले, बॅनर, फ्लॅग, फुलदाणी, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक स्टेशनरी साहित्य आदींचा वापर करू नये, असं त्यात म्हटलं होतं.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...