२४ ऑगस्ट २०१९

UAE मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान 🎇

🎯 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🎯दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

🎯पंतप्रधान मोदींच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

🎯यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो.

🎯या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. यूएईने एप्रिल महिन्यात या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा केली होती.

🎯आमचे भारताबरोबर ऐतिहासिक आणि व्यापक रणनितीक संबंध आहेत. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संबंध बळकट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असे अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

🎯 यूएई इस्लामिक देश असला तरी आज पाकिस्तानपेक्षा भारताबरोबर त्यांचे संबंध बळकट आहेत. जम्मू-काश्मीर मुद्दावर जाहीरपणे यूएईने भारताचे समर्थन केले आहे.

🎯जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे हा भारताचा अंतर्गत विषय आहे अशी यूएईची भूमिका आहे.

 

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं आज (24 ऑगस्ट) निधन झालं.



📚 दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.

श्वसनाचा त्रास होत असल्याने आणि हृदयाचे ठोके वाढल्यामुळे जेटली यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काही दिवसांपासून त्यांना लाईफ केअर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. अखेर वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

किडनी ट्रान्सप्लांटनंतर अरुण जेटली यांचा आजार बळावला होता. 2019 च्या निवडणुकीत तर ते बाहेरही पडू शकले नाहीत.

निवडणूक जिंकल्यानंतर पत्र लिहून जेटलींनी आपला मंत्रिमंडळात समावेश करु नये अशी विनंती केली. मोदींनीही ती मान्य केली. "गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारी आहे.

माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये," असं स्वत: जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

     लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |

   1) उपमा    2) दृष्टांत     
   3) उत्प्रेक्षा    4) अतिशयोक्ती

उत्तर :- 2

2) परभाषी शब्द ओळखा.

   1) बक्षीस    2) इनाम      3) भेटवस्तू    4) दान

उत्तर :- 2

3) धन्वन्यर्थ करणे ......................

   1) ‘अभिधा’ शक्तीमुळे जाणवणारा अर्थ    2) ‘व्यंजना’ शब्दशक्तीमुळे सुचित होणार अर्थ
   3) ‘लक्षणा’ शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ    4) भाषेतील मूलध्वनीचा अर्थ

उत्तर :- 2

4) ‘वारा’ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?

   1) शैल      2) अनल     
   3) अनिल    4) सलील

उत्तर  :- 2

5) ‘आवक’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द सांगा.

   1) श्रावक    2) भावक     
   3) जावक    4) वाहक

उत्तर :- 3

6) योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा.

     शहाण्याला .................. मार.
   1) काठीचा    2) हंटरचा   
   3) चाबकाचा    4) शब्दांचा

उत्तर :- 4

7) ‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

   1) दोडक्यावानी फुगणे    2) दोन बोटे स्वर्ग उरणे
   3) दोन हात करणे    4) दगडाखालून हात काढून घेणे

उत्तर :- 2

8) अनेक गोष्टीत एकाचवेळी लक्ष देणा-यास ....................... म्हणतात.

   1) कामसू    2) अष्टावधानी   
   3) कार्यरत    4) चौकस

उत्तर :- 2

9) खालील पर्यायी उत्तरातील शुध्द पर्यायी शब्द सांगा.

   1) अग्नीहोत्री    2) अग्निहोत्री   
   3) आग्नीहोत्री    4) आग्निहोत्री

उत्तर :- 2

20) संयुक्त स्वर म्हणजे -

   1) सर्व स्वर एकत्र करणे        2) सर्वांनी मिळून आवाज काढणे
   3) दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले    4) –हस्व उच्चार असलेले

उत्तर :- 3

लिओनेल मेस्सी : 2018-19 सालासाठी UEFAच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड'चा विजेता

▪️बार्सिलोना फूटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता ठरला.

▪️2015 आणि 2016 सालीही मेस्सीने हे विशेष पारितोषिक जिंकले होते.

▪️ गेल्या पाच हंगामात हा पुरस्कार मिळविण्याची ही  तिसरी वेळ  आहे.

▪️त्याने त्याचा प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डोला पराभूत केले.

काय आहे "आयएनएक्स" प्रकरण

चिदंबरम यांच्याविरोधात ईडीची लूकआऊट नोटीस जारी. INX मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचाही तत्काळ दिलासा देण्यास नकार

✍ त्यामुळे आता हे प्रकरण सरन्यायाधीश रंजन गोगोईंकडे सोपवण्याचा न्यायाधीशांचा निर्णय

✍ देशाबाहेर पळून जाण्याची भीती असल्याने CBIकडून चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी 

✍ CBIची टीम चिदंबरम यांच्या घरी हजेरी लावत असून ते बेपत्ता असल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता

INX मीडिया प्रकरण काय आहे?:

✍ पी चिदंबरम अर्थमंत्री (2007) असताना INX मीडिया ग्रुपमध्ये 305 कोटींची गुंतवणूक परदेशातून झाली होती
✍ या गुंतवणुकीस परवानगी देताना गैरव्यवहार झाल्याचा चिदंबरम यांच्यावर आरोप आहे
✍ सीबीआयने याप्रकरणी 15 मे 2017 ला तक्रार दाखल केली
✍ तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने 2018 मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला

WTO बद्दल :-


▪️ जागतिक व्यापार संघटना (WTO) ही आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. 

▪️ त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि त्याचे 164 देश सभासद आहेत.

▪️  1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत

शिवराम हरी राजगुरु

        जन्म : 24 आॕगष्ट 1908  
(खेड, पूणे, बाॕम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत)

        फाशी : 23 मार्च 1931
                   (वय : 22 वर्षे)
(लाहोर, ब्रिटिश भारत - सध्या पंजाब, पाकिस्तान)

              भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वापैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली आणि बलिदान स्विकारले. त्या क्रांतिकारकांची आठवण होताच तीन चेहरे आपसुकच डोळ्यांसमोर येतात. ते म्हणजे - भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव.  राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढयातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. अचूक नेमबाजी आणि दांडगी स्मरणशक्ती या दोन गुणांचे त्यांना जणू वरदानच लाभले होते.
             राजगुरू यांचा जन्म 24 ऑगष्ट 1908 ला पुणे जिल्हयातील, खेड येथे झाला होता. ते अवघे 6 वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे अल्प वयातच ज्ञानार्जन व संस्कृत शिकण्यासाठी काशी येथे गेले होते. तेथे त्यांनी हिंदु धर्मग्रंथांसोबतच वेदांचाही अभ्यास केला होता, परंतु 'लघु सिध्दान्त कौमुदी' सारखा क्लिष्ट ग्रंथसुध्दा अल्प वयातच मुखपाठ केलेला होता. त्यांना व्यायामाची आवड होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे प्रशसंक होते.
           वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी घर सोडले. घर सोडण्यामागे त्यांचे कारण देखील वेगळे होते. इंग्रजी विषयात नापास झाल्याने मोठ्या भावाने त्यांना आपल्या नववधूसमोर इंग्रजी धडा वाचायची शिक्षा सुनावली. अर्थातच राजगुरूंना ते काही जमले नाही आणि झाला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. शेवटी संधी साधून जसे होते तसे, आईने तेल आणायला दिलेले 9 पैसे आणि बहिणीने अंजीर आणायला दिलेले 2 पैसे असे एकूण 11 पैसे घेऊन त्यांनी घरातून धूम ठोकली ती कायमचीच.
             सर्वप्रथम त्यांनी नाशिकला काही काळ वास्तव्य केले आणि नंतर शिक्षणाच्या उद्देशाने ते काशीला पोहोचले. तेथे पुस्तकांत, राजकीय आणि व्यायामशाळेत लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या खेळात ते रमून गेले. काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हे सा-या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जायचे. तेथे अनेक गुप्त खलबतेही होत असत. याच काळात काशीमध्येच राजगुरूंची भेट चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत झाली. राजगुरूचे निडर व्यक्तीमत्व पाहून आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामिल करुन घेतले. त्या क्रांतिमय वातावरणात वावरतांना राजगुरूंमधील क्रांतिकारक घडत गेला. कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.
             याचवेळेस शिव शर्मा नावाच्या एका सहका-यासोबत दिल्लीमधील एका फितुराला ठार करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली. पण पिस्तुल एकच असल्याने पंचाईत होती.
कारण तो फितुर क्वचितच घराबाहेर पडत असे. त्यामुळे तेव्हा तो बाहेर पडेल तेव्हाच त्याला मारणे सोयीचे होते. त्यासाठी दोघाकडे पिस्तुल असणे आवश्यक होते. अन्यथा जोखीम पत्करावी लागली असती. राजगुरूंना थांबायला सांगून शिव शर्मा पिस्तुल आणण्यासाठी लाहोरला गेले. पण त्यांना पिस्तुल काही मिळाली नाही. जवळपास तीन दिवसांनी ते दिल्लीहून परतले आणि फितुराच्या घराजवळ पाहतात तो काय भलामोठा पोलीस पहारा आणि सर्चलाईट्स होत्या. शिव शर्मा काय समजायचे ते समजले. तो फितुर संध्याकाळच्या वेळेस 7 ते 8 च्या दरम्यान बाहेर पडत असे. त्याच संधीचा फायदा घेऊन राजगुरूंनी एकटयाने मोहिम फत्ते केली होती !  पाठी लागलेल्या पोलिसांचा ससेमिरा चुकवीत राजगुरू पळत मथुरेच्या दिशेने निघाले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी दिल्लीच्या पुढील दोन स्थानके  काळयाकुट्ट अंधारात रेल्वे पटरींतून पळत पार केली.
          सायमन कमिशनविरूध्द 30 ऑक्टोबर 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. "गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचे निधन झाले.
            पंजाबकेसरी लाला लजपतराय यांच्यावर निर्दयीपणे लाठीहल्ला करून त्यांना ठार मारणा-या पोलीस अधिकारी स्कॉटला जगण्याचा अधिकार नाही अशी गर्जना करीत भगतसिंगांनी त्याचा वध करण्याचा विडा उचलला. राजगुरूंनी हट्ट केल्यामुळे भगतसिंगांनी त्यांना देखील आपल्या बरोबर सामील करून घेतले. त्यांचा अजून एक साथीदार जय गोपाळ पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालींवर पाळत ठेवून होता. पण 4 - 5 दिवस स्कॉट त्या भागात आलाच नाही.
            अखेर दुस-या दिवशी एक गोरा अधिकारी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. जय गोपाळला वाटले की हाच स्कॉट आहे, म्हणून दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरुंना खूण केली. पण भगतसिंगांनी हा स्कॉट नसावा अशी प्रतिक्रिया दिली. परंतु राजगुरूचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरुंनी त्या गो-या अधिका-यावर गोळी झाडली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग आठ गोळ्या झाडत त्या गो-या अधिका-याला यमसदनी धाडले. त्या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यात मात्र ते यशस्वी झाले . नंतर दोघांनाही कळले की तो स्कॉट नसून साँडर्स होता.
            माणूस चुकला पण मोहीम अयशस्वी राहिली नाही यातच भगतसिंग आणि राजगुरू या दोघांनीही समाधान मानले. इकडे मारेक-यांच्या मागावर पोलीस हात धुवून लागले होते. पण शेवटी वेषांतर करून भगतसिंग आणि राजगुरू दोघेही दिवसाढवळया एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्यात मिसळू लागले. परंतु फार काळ ते पोलिसांना गुंगारा देऊ शकले नाहीत, आणि 1929 सालच्या सप्टेंबर महिन्यात ते पोलिसांच्या हाती लागले.

            त्यांनी साथीदारांची नावे सांगावीत म्हणून कारागृहात त्यांचा अमानवी छळ करण्यात आला. शेवटी छळ करणारे थकले पण राजगुरुंनी त्यांना आपल्या साथीदारांच्या नावाची साधी पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते.
             पुढे कारावासात शिक्षा भोगत असतांना भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या सहाकाच्या सोबत त्यांची पुन्हा भेट झाली. तेथेही त्यांनी आपला क्रांतिकारी बाणा ढळू दिला नाही. अखेर लाहोर खटल्याचा निकाल आला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये 23 मार्च 1931 ला संध्याकाळी 7.33 ला फासावर चढवण्यात आले आणि तीन पेटत्या  निखान्यांची धग विझली. त्यांच्या बलिदानाचा 23 मार्च हा दिवस आपल्याकडे शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
             स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणाची आहुती देणा-या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपर्वात अढळ करणा-या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा !!
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 स्वातंत्र्य वेदीवर शहीद झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन🙏

एका ओळीत सारांश, 24 ऑगस्ट 2019

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉आंतरराष्ट्रीय गुलामगिरीविरोधी दिन - 23 ऑगस्ट.

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉‘रेडी टू मूव्ह इन’ प्रकल्प तयार करण्यासाठी भारतीय सैन्याने या कंपनीसोबत सामंजस्य करार केला - टाटा रियल्टी अँड हाऊसिंग.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉RBIने ग्राहकांना ई-जनादेश देऊन एवढ्या रुपयांपर्यंतचे आवर्ती आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी दिली – 2000 रुपये.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉या देशाने पाण्यावर तरंगणारी जगातली पहिली अणुभट्टी तयार केली - रशिया (अकाडेमिक लोमोनोसोव्ह).

👉या देशाने ऑगस्टमध्ये हवाई, जहाज-रोधी आणि पाणबुडीविरोधी मोहीम राबविण्यास सक्षम असलेली मानवरहित युद्धनौका तयार केली - चीन.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉अक्षय ऊर्जेचे नवे रूप ज्यास ऊर्जा मंत्रालयाने निर्मितीसाठी मंजुरी दिली - महासागर ऊर्जा.

👉वित्त मंत्रालयाच्या “सबका विश्वास-लेगसी डिस्पुट रिझोल्युशन स्कीम 2019” याने इतकी रक्कम असल्यास ड्युटी डिमांडच्या 70% सवलत देण्यात आली आहे - रू. 50 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉गृह मंत्रालयाचे नवे गृहसचिव - अजय कुमार भल्ला.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉रशियाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनावर (ISS) पाठविलेला मानवी-आकाराचा रोबोट - फेडर.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) कार्यक्रम सुरू करण्यात आला ते वर्ष - सन 1998.

👉इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) कार्यक्रमाचे भागीदार - संयुक्त राज्ये अमेरिका, रशिया, जपान, युरोप आणि कॅनडा.

👉चीन - राजधानी: बिजींग; राष्ट्रीय चलन: रेन्मिन्बी (युआन).

👉रशिया - राजधानी: मॉस्को; राष्ट्रीय चलन: रशियाई रूबल.

२३ ऑगस्ट २०१९

इंजीती श्रीनिवास समिती

⏩कंपनी कामकाज मंत्रालायचे सचिव इंजीती श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखालील CSRसाठी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने नुकताच आपला अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सादर केला.

✅इंजीती श्रीनिवास समिती या समितीच्या शिफारशी :

● CSR वर केला जाणारा खर्च कराच्या रक्कमेतून वजा करण्यात यावा.

● ज्या कंपन्यांची CSR रक्कम 50 लाखांपेक्षा कमी असेल त्या कंपनीला CSR समितीच्या स्थापनेतून सूट देण्यात यावी.

● CSRचे पालन न करणे, दंडाची शिक्षा असलेला नागरी गुन्हा

● वापर न करण्यात आलेली CSRची रक्कम सामाजिक प्रभाव असणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.

● कंपनी कायद्याचे 7वे परिशिष्ट (जे CSR म्हणून पात्र ठरलेल्या क्रियांच्या रूपरेषा दर्शविते) संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी पुर्तता करणे.

आवर्ती आर्थिक व्यवहारांसाठी कार्डवर ई-जनादेशाच्या प्रक्रियेला RBI ने मंजुरी दिली

👉भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) ई-जनादेश संबंधी नोंदणी, दुरूस्ती आणि निरस्तीकरण प्रक्रियेच्या दरम्यान प्रमाणीकरणाचा अतिरिक्त घटक (additional factor of authentication - AFA) यासह आवर्ती आर्थिक व्यवहारांसाठी (मर्चंट पेमेंट्स) कार्डवर ई-जनादेशाच्या प्रक्रियेला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

👉RBI कडून दिलेले निर्देश 1 सप्टेंबर 2019 पासून लागू होतील.

👉RBIने ग्राहकांना सप्टेंबर 2019 पासून ई-जनादेश देऊन 2000 रुपयांपर्यंतचे आवर्ती आर्थिक व्यवहार (recurring payments) करण्यास परवानगी दिली.

👉ही सुविधा डिजिटल वॉलेट्ससह डेबिट, क्रेडिट, आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स अश्या सर्व प्रकाराच्या कार्डांचा वापर करुन केलेल्या व्यवहारांसाठी लागू आहे.

👉यामुळे एखादी व्यक्ती छोट्या-छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी स्वयंचलितपणे इन्सट्रक्शन्स देऊ शकते.

👉कार्डांवर ई-जनादेशास परवानगी देण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय देशभरात डिजिटल देयकांना वाढविण्यास सक्षम करणारा ठरणार आहे.

राज्य - राजधानी

(1)मध्यप्रदेश   🇮🇳   भोपाल

(2) राजस्थान   🇮🇳  जयपुर

(3)महाराष्ट्र      🇮🇳    मुंबई

(4) उत्तर प्रदेश 🇮🇳 लखनऊ

(5)आंध्र प्रदेश  🇮🇳 हैदराबाद

(6)जम्मू कश्मीर🇮🇳श्रीनगर ,जम्मू

(7)गुजरात     🇮🇳 गांधीनगर

(8)कर्नाटक    🇮🇳    बेंगलूरु

(9) बिहार       🇮🇳      पटना

(10)उड़ीसा   🇮🇳 भुवनेश्वर

(11) तमिलनाडु   🇮🇳 चेन्नई

(12) पश्चिम बंगाल    🇮🇳 कोलकाता

(13)अरुणाचल प्रदेश  🇮🇳  ईटानगर

(14)असम     🇮🇳    दिसपुर

(15) हिमाचल प्रदेश    🇮🇳 शिमला

(16)पंजाब    🇮🇳    चंडीगढ़

(17) हरियाणा 🇮🇳  चंडीगढ़

(18) केरल          🇮🇳 तिरुवनंतपुरम

(19) मेघालय  🇮🇳   शिलांग

(20) मणिपुर   🇮🇳     इंफाल

(21) मिजोरम  🇮🇳 आईजोल

(22) नागालैंड  🇮🇳  कोहिमा

(23)त्रिपुरा   🇮🇳  अगरतला

(24)सिक्किम        🇮🇳   गंगटोक

(25)गोवा      🇮🇳     पणजी

(26)छत्तीसगढ़     🇮🇳 रायपुर

(27) उत्तराखंड       🇮🇳  देहरादून

(28) झारखंड     🇮🇳    रांची

(29)तेलंगणा   🇮🇳  हैद्राबाद

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली


1) खालील दोन विधान / ने कोणते अयोग्य आहे / त ?
   अ) छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई हे भारतातील दुसरे व्यस्त एयरपोर्ट आहे.
   ब) वरील एअरपोर्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सहित दक्षिण आशियाचा एक तृतीयांश हवाई वाहतुक
        हाताळतात.
   1) अ      2) ब      3) दोन्ही नाही      4) दोन्हीही
उत्तर :- 2

2) भारतात चहा उत्पादनात ................. राज्यांचा प्रथम क्रमांक आहे.
   1) आसाम    2) बिहार      3) महाराष्ट्र      4) ओरिसा
उत्तर :- 1

3) .................. हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.
   1) आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र    3) कर्नाटक      4) गुजरात
उत्तर :- 1

4) चहाची लागवड ..................... या राज्यात सर्वात प्रथम झाली.
   1) कर्नाटक    2) केरळ      3) आसाम      4) तामिळनाडू
उत्तर :- 3

5) कृषी दुष्काळाची कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत ?
   अ) अपुरे पर्जन्यमान    ब) पावसाचा दीर्घ खंड (पावसाळयात)
   क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त 
   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क
उत्तर :- 1

✳️✳️Antonyms✳️✳️

Necessary (अत्यावश्यक ) × Useless ( निरुपयोगी)

Nimble ( क्रियाशील ) × Sluggish ( आळशी )

Noble ( उदात्त ) × Ignoble (अप्रगल्भ)

Notorious ( कुप्रसिद्ध ) × Famous ( सुप्रसिद्ध)

Exploit (शोषण करणे) × Nourish ( पोषण करणे)

Obvious ( स्पष्ट ) × Hidden ( छुपा , अस्पष्ट )

Irritate ( क्रोधीत करणे ) × Pacify ( शांत करणे )

Outspoken ( स्पष्टवक्तेपणा ) × Reserved ( संकोची )

Obligatory ( अनिवार्य ) × Voluntary ( ऐच्छिक )

Seldom (क्वचित ) × Often ( नेहमी)

भारतात तयार होणारे पॅकेजिंग फूड सर्वात हलक्या दर्जाचे

▪️ एका सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे की, जगभरातील पँकेट बंद अन्न आणि पेयच्या बाबतीत भारताची स्थिती सर्वाधिक खराब आहे.

▪️भारतातील पॅकिंग केलेले खाद्य आरोग्याला धोकादायक आहे. 12 देशांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे.

✅ भारतातील खाद्य पदार्थांमध्ये ट्रांस फॅट, मीठ आणि साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते.हा परिणाम 12 देशांमधील 4 लाख खाद्य पदार्थांचे विश्लेषण केल्यानंतर समोर आला आहे.

▪️सर्वेमध्ये प्रामुख्याने साखर, सॅच्युरेटेड फॅट, मीठ आणि कँलेरीच्या मात्रेवर लक्ष्य देण्यात आले होते.

✅ पहिल्या स्थानावर ब्रिटन असून, त्यानंतर अनुक्रमे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आहे. चीन आणि भारत या यादीत सर्वात शेवटी आहे.

▪️भारतात 100 ग्राम खाद्य पदार्थामध्ये साखरेचे प्रमाण हे 7.3 ग्राम आहे. तसेच सर्वेक्षणानुसार, भारतातील पॅकेजिंग पदार्थ हे अधिक उर्जा प्रदान करतात.

▪️रिपोर्टनुसार, ही चिंतेची बाब आहे की, अधिक उत्पन्न असणाऱ्या देशाच्या तुलनेत कमी उत्पन्न असणाऱ्या चीन आणि भारतातील पॅकेजिंग फूडमुळे धोका निर्माण होत आहे.

महाराष्ट्रातील समाज सुधारक :- गोपाळ गणेश आगरकर

🔘 जीवन परिचय 🔘

◼️आगरकरांचा जन्म १४ जुले १८५६ रोजी सातारा जिल्ह्यात कऱ्हाडजवळ असलेल्या टेंबू या गावी झाला. ब्राम्हणकुटुंबात जन्म झालेल्या आगरकरांच्या आईचे नाव हे सरस्वती होते, तर वडिलांचे नाव गणेश होते.

◼️अकोला येथे जाऊन दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे पुणे येथे आल्यावर डेक्कन कॉलेजात प्रवेश घेऊन १८७८ मध्ये बि ए ची पदवी संपादन केली.

◼️इतिहासात व तत्वज्ञान हे विषय घेऊन एम ए  ची पदवी संपादन केली. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली.पुणे येथे फर्गुसन कॉलेजात प्राध्यापक झाले.

🔘 समाजसुधारणा 🔘

◼️१८८१ मध्ये केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरु केली. १८८१ पर्यंत त्यांनी केसरीचे संपादन सुद्धा केले.

◼️कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात आगरकर व लोकमान्य टिळकांनी १०१ दिवसांची कारावासाची शिक्षा झाली. तुरुंगात असताना आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस  हे पुस्तक लिहिले.

◼️१८८८मध्ये त्यांनी सुधारक हे पुस्तक लिहिले.

◼️ १८८० मध्ये मुंबई येथे विष्णुशात्री चिपळूणकर लोकमान्य टिळकांच्या सहकार्याने न्यू  इंग्लिश स्कूलची स्थापना केली.आपल्या जीवनाचे देखील इष्ट असे बोलावे, .सांगावे व करावे या वृत्तीचा स्वीकार केला.

◼️आगरकरांनी १८९३ च्या सुधारक अंकात आगरकरांनी म्युन्सिपल हौद व गदा हा लेख लिहून अस्पृश्यता यावर टीका केली.

◼️महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळी ही संस्था उभारली.

◼️ आगरकरांच्या बाबतीत वि स खांडेकर असे म्हणतात  की आगरकर म्हणजे देव न मानणारा देवमाणूस होय.

स्रोत:-  PSI STI ASO ठोकळा बी पब्लिकेशन

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...