Indian Polity लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Indian Polity लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०४ एप्रिल २०२५

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- स्थापना: 1926

- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 


 📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- संरचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)


 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324

- स्थापना: 26 जानेवारी 1950

- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK

- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 💰 CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148

- स्थापना: 1858

- संरचना: 1 महालेखा परीक्षक

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.


 ⚖️ Lokpal (लोकपाल)

- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013

- स्थापना: 2019

- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.




⚖️ Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980

- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल 


 👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: 1993

- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.


👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001

- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.


🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003

- स्थापना: 1964

- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त

- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.




👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1985

- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1991

- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978

- स्थापना: 1966

- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार:



 📋 Administrative Reforms Commission (प्रशासनिक सुधार आयोग)

- कायदा: प्रशासनिक सुधार आयोग कायदा, 1966

- स्थापना: 1966

- कामाचा ध्येय: सरकारी प्रणालीचे सुधार आणि महत्त्वाच्या प्रशासनिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान

- संरचना: 1 अध्यक्ष + अनेक सदस्य

भारतीय संघाची एकात्मक वैशिष्ट्ये


१) राज्यघटनेची लवचिकता

2) केंद्राकडे अधिक अधिकार

३) राज्यसभेत राज्यांचे असमान प्रतिनिधित्व 

४) कार्यपालिका हा विधिमंडळाचा एक भाग आहे 

5) राज्यसभेपेक्षा लोकसभा अधिक शक्तिशाली 

६) आणीबाणीचे अधिकार 

7) एकात्मिक न्यायपालिका 

8) एकल नागरिकता   

९) राज्यपालांची नियुक्ती

10) नव्या राज्यांची निर्मिती                                                                                                                                                                                                                                                                                                 11) अखिल भारतीय सेवा 

12) एकात्मिक निवडणूक यंत्रणा  

13) राज्यांच्या विधेयकांवरील VETO  

14) इंटिग्रेटेड ऑडिट मशिनरी 

15) प्रमुख अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :


संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

२३ मार्च २०२५

कलम 14

भारतीय संविधानाचा कलम 14 (Article 14) हा समानतेच्या हक्कांशी (Right to Equality) संबंधित आहे. हा कलम भारतातील सर्व नागरिकांना कायद्याच्या दृष्टीने समानता आणि कायद्याच्या समान संरक्षणाची हमी देतो.


कलम 14 चे महत्त्वाचे मुद्दे:


समानतेचा अधिकार: भारतातील कोणत्याही व्यक्तीला (नागरिक असो वा परदेशी) कायद्याच्या आधी समान वागणूक दिली जाईल. कोणत्याही व्यक्तीला लिंग, जात, धर्म, वंश, जन्मस्थान इत्यादी आधारावर भेदभाव केला जाणार नाही.


कायद्याचे समान संरक्षण: देशातील प्रत्येक व्यक्तीस कायद्याचे समान संरक्षण मिळेल. याचा अर्थ असा की, जेव्हा एखादी व्यक्ती समान परिस्थितीत असेल, तेव्हा तिला समान कायद्याचे संरक्षण मिळायला हवे.


समानता आणि तर्कसंगत वर्गीकरण: 

जरी कलम 14 सर्वांसाठी समानतेचा अधिकार देतो, तरीही तर्कसंगत वर्गीकरण (Reasonable Classification) अनुमत आहे. म्हणजे, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या गटांसाठी भिन्न कायदे असू शकतात, पण ते तर्कसंगत आणि न्याय्य असले पाहिजेत.

यासाठी दोन अटी पूर्ण कराव्या लागतात: 

समूहामध्ये समरसता असावी – म्हणजे, गटामध्ये असलेल्या लोकांमध्ये समान वैशिष्ट्ये असावी.

वर्गीकरणाचा उद्देश न्याय्य आणि तार्किक असावा – म्हणजे, त्यामागे वैध आणि न्याय्य कारण असावे.


कलम 14 अंतर्गत महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय:

State of West Bengal v. Anwar Ali Sarkar (1952) – यात सांगितले गेले की, कोणत्याही कायद्याने किंवा धोरणाने अवैध भेदभाव निर्माण होऊ नये.

E.P. Royappa v. State of Tamil Nadu (1974) – यात सांगितले गेले की, समानता म्हणजे केवळ भेदभावाचा अभाव नव्हे, तर याद्वारे स्वेच्छाचारी निर्णयांना आळा बसला पाहिजे.

Maneka Gandhi v. Union of India (1978) – या प्रकरणात कलम 14 चे अधिक विस्तृत अर्थ लावण्यात आले आणि याला कलम 19 आणि कलम 21 सोबत वाचले पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले.


कलम 14 चा अपवाद:

कलम 14 सर्वसामान्य नियम सांगतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये काही अपवाद देखील आहेत:

President आणि Governors यांना काही घटनात्मक विशेषाधिकार आहेत.

संसद आणि विधिमंडळ सदस्यांना विशिष्ट अधिकार आणि विशेष संरक्षण दिले जाते.

आरक्षण धोरणांमध्ये (SC, ST, OBC साठी) समानतेचा तत्त्व लवचिक पद्धतीने वापरला जातो.


निष्कर्ष:

कलम 14 हा भारतीय लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे. तो प्रत्येक व्यक्तीस कायद्याच्या आधी समानता देतो, पण त्याच वेळी तर्कसंगत वर्गीकरणाची संकल्पना देखील मान्य करतो, जेणेकरून सामाजिक न्याय व वास्तववादी व्यवस्थापन शक्य होईल.


१३ फेब्रुवारी २०२५

राज्य पुनर्रचना आयोग -1953


सदस्य - 

1) फझल अली ( अध्यक्ष)

2) के एम पन्नीकर

3) हच. कुंझरू 


➡️अहवाल - 30 सप्टेंबर 1955 सादर 

➡️या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली.


✅आयोगाच्या शिफारशी -

1. यात मुख्यतः भाषावार पुनर्रचनेला पाठिंबा. त्या आधारावर 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे.

2. उत्तर भारत-बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे चार भाग करावे.

3. थोडे बदल करून पूर्वेकडील राज्ये आहे तशीच राहू दिली. बिहार आणि आसाम मधून 'ट्रायबल' राज्ये बनवावीत, ही मागणी आयोगाने फेटाळून लावली.

4. मुंबई व पंजाब यांच्या विभाजनाला आयोगाचा विरोध, गुजरात व महाराष्ट्र मिळून मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे.

5. एकभाषी राज्यातील अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ नये म्हणून प्रत्येकाला मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण द्यावे.

6. राष्ट्रऐक्यासाठी अखिल भारतीय सेवांमध्ये निम्मे (अर्धे) उमेदवार राज्याबाहेरील असावेत. त्यांच्या केंद्रातून प्रांतात व प्रांतातून केंद्रात बदल्या व्हाव्यात.

7. उच्च न्यायालयातील 1/3 न्यायाधीश राज्याबाहेरील असावेत.


नागरिकत्व

👉घटनेत तरतुदी: भाग II मधील कलम 5 ते 11 मध्ये दिले आहेत.

👉विषय : घटनेतील संघराज्य सूचीतील विषय आहे. 

म्हणून केवळ संसदेला नागरिकत्वाबाबत नियम करण्याचा व प्रशासनाचा अधिकार आहे.

👉नागरिकत्वाची व्याख्या घटनेत दिलेली नाही.

👉नागरिकत्वाबाबतच्या तरतूदी 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू झाल्या आहेत.

👉 'नागरिक 'म्हणजे : राज्यसंस्थेचा सदस्य व 'नागरिकत्व' म्हणजे राज्यसंस्थेचे सदस्यत्व होय.

👉भारताचे राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असतात.

👉 नागरिकत्व कायदा- 1955 चा आहे. यानुसार-


🌸भारतात एकेरी नागरिकत्व मिळते. या कायदयात नागरिकत्व मिळवणे, त्याचे नियम व रद्द करण्याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. तसेच यात 9 वेळा (1957, 1960, 1985, 1986, 1992, 2003, 2005, 2015, 2019) दुरुस्ती करण्यात आली.

🌸 एकेरी नागरिकत्व भारतात आहे ते ब्रिटनकडून घेतले आहे.

42वी घटनादुरुस्ती 1976: या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते

1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले.

शिक्षण ,जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण , वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना.


15) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


16) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

भारतीय भूगोलवर वनलाइनर क्विझ

● क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचे स्थान काय आहे - सातवे


● लोकसंख्येच्या बाबतीत भारताचे जगात स्थान काय आहे - दुसरे


●भारताच्या उत्तरेला कोणते देश आहेत - चीन, नेपाळ, भूतान


● भारताच्या पूर्वेस कोणता देश आहे - बांगलादेश


● भारताच्या पश्चिमेस कोणता देश आहे - पाकिस्तान


●भारताच्या नैऋत्येस कोणता समुद्र आहे - अरबी समुद्र


● भारताच्या आग्नेयेस कोणता उपसागर आहे - बंगालचा उपसागर


● भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे - हिंदी महासागर


● पूर्वांचलच्या टेकड्या भारताला कोणत्या देशापासून वेगळे करतात - म्यानमार


● मन्नारचे आखात आणि पाल्क सामुद्रधुनी भारताला कोणत्या देशापासून वेगळे करतात - श्रीलंका


● संपूर्ण भारताची अक्षांश लांबी किती आहे - ८° ४' ते ३७° ६' उत्तर अक्षांश


● भारताच्या मध्यभागी कोणती रेषा जाते - कर्क वृषभ


● भारताचा उत्तरेकडून दक्षिणेकडे विस्तार किती आहे - ३२१४ किमी


● भारताचा पूर्वेकडून पश्चिमेकडे विस्तार किती आहे - २९३३ किमी


बंगालच्या उपसागरात - अंदमान-निकोबार बेटे कुठे आहेत?


लक्षद्वीप कुठे आहे - अरबी समुद्रात


भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात - इंदिरा पॉइंट


● इंदिरा पॉइंटला दुसऱ्या नावानेही ओळखले जाते - पिग्मॅलियन पॉइंट


● जगाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत भारताचे क्षेत्रफळ किती आहे - २.४२%


●जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात राहतात - १७%


● भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे - ३२,८७,२६३ चौरस किमी?


● भारताशी कोणत्या देशांची सीमा आहे - बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, बर्मा, भूतान


●भारताची सागरी सीमा कोणत्या देशांशी आहे - मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान


● कर्कवृत्त कोणत्या राज्यांमधून जाते - राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम


●भारताच्या मुख्य भूमीच्या दक्षिणेकडील सीमेचे अक्षांश किती आहे - ८° ४'


●भारताची प्रमाणवेळ कुठून घेतली जाते - अलाहाबादजवळील नैनी नावाच्या ठिकाणावरून


● भारताच्या प्रमाण वेळेत आणि ग्रीनविच वेळेत काय फरक आहे - ५ १/२


● विषुववृत्तापासून भारताच्या दक्षिण टोकापर्यंतचे अंतर किती आहे - ८७६ किमी


● भारताच्या भू-सीमेची लांबी किती आहे - १५२०० किमी


● भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी किती आहे - ६१०० किमी

०६ फेब्रुवारी २०२५

भारतीय संविधानाची निर्मिती


📜 कॅबिनेट मिशन योजना:

- एकूण जागा: ३८९

  - ब्रिटिश भारत: २९६ जागा (२९२ जागा ११ राज्यपाल प्रांतांमधून, ४ मुख्य आयुक्त प्रांतांमधून)

  - संस्थाने: ९३ जागा (मुस्लिम लीग सदस्यांच्या माघारीमुळे ७० जागा)



🏛️ संविधान सभेची रचना:

- मूळ जागा: २९९

- ब्रिटिश भारत प्रांत: २२९ जागा

- संस्थाने: ७० जागा



⚖️ सार्वभौम संस्था:

- पूर्णपणे सार्वभौम आणि विधायी अधिकार असलेली संस्था.

- अध्यक्षता करणारे:

  - विधायी सत्र: जी.व्ही. मावळंकर

  - संविधान सत्र: डॉ. राजेंद्र प्रसाद



🗓️ महत्वाच्या तारखा:

- पहिलं सत्र: ९ डिसेंबर १९४६

- अंतिम सत्र: २४ जानेवारी १९५०

- स्वीकारणे: २६ नोव्हेंबर १९४९

- अंमलबजावणी: २६ जानेवारी १९५०



📝 मसुदा समिती:

- अध्यक्ष: डॉ. बी.आर. आंबेडकर

- सदस्य:

  - एन. गोपालस्वामी आयंगार

  - अलादी कृष्णस्वामी अय्यर

  - डॉ. के.एम. मुंशी

  - सैयद मोहम्मद सादुल्लाह

  - एन. माधव राव

  - टी.टी. कृष्णमाचारी



📘 संविधानाची माहिती:

- प्रारंभिक सामग्री: उद्देशिका, ३९५ कलमे, ८ अनुसूचियां

- सभेचे अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद

- उपाध्यक्ष: एच.सी. मुखर्जी, वी.टी. कृष्णमाचारी

- तात्पुरते अध्यक्ष: डॉ. सच्चिदानंद सिन्हा

- प्रतीक: 🐘

- संवैधानिक सल्लागार: बी.एन. राव

- सचिव: एच.व्ही.आर. आयंगार

- मुख्य मसुदाकार: एस.एन. मुखर्जी

- कॅलिग्राफर: प्रेम बिहारी नारायण रायझादा

- सजावट: नंदलाल बोस, ब्योहर राममनोहर सिन्हा



🗳️ मतदान आणि प्रतिनिधित्व:

- मुसलमान, शीख, आणि सामान्य श्रेणींना जागा वाटप.

- प्रातिनिधिक मतदान प्रणालीद्वारे मतदान.

- संस्थानामधून नामांकित सदस्य होते.

०४ फेब्रुवारी २०२५

संविधानाचे स्रोत

1. भारत सरकार कायदा, 1935

- फेडरल यंत्रणा, राज्यपाल कार्यालय, न्यायपालिका, लोकसेवा आयोग, आपत्कालीन तरतुदी आणि प्रशासकीय तपशील.

- फेडरल सिस्टम, गव्हर्नरचे कार्यालय, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी आणि प्रशासकीय तपशील.


2. ब्रिटनची राज्यघटना

- संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, विधान प्रक्रिया, एकल नागरिकत्व, मंत्रिमंडळ प्रणाली, सल्लागार लेख, संसदीय विशेषाधिकार आणि ऐतिहासिक प्रणाली.

- संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, विधान प्रक्रिया, एकल नागरिकत्व, मंत्रिमंडळ प्रणाली, सल्लागार लेख, संसदीय विशेषाधिकार आणि कार्यपद्धती.


3. युनायटेड स्टेट्सची राज्यघटना

- मूलभूत अधिकार, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनरावलोकनाचे तत्त्व, उपराष्ट्रपती पद, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची हकालपट्टी आणि राष्ट्रपतींवर महाभियोग.

- मूलभूत अधिकार, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनरावलोकनाचे तत्त्व, उपराष्ट्रपतींचे पद, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना काढून टाकणे आणि राष्ट्रपतींवर महाभियोग.


4. आयर्लंडची राज्यघटना

- राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत आणि राज्यसभेसाठी सदस्यांचे नामांकन.

- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेसाठी सदस्यांचे नामांकन.


5. कॅनडाची राज्यघटना

- मजबूत केंद्र असलेली फेडरल प्रणाली, केंद्रात अवशिष्ट अधिकारांची नियुक्ती, केंद्राद्वारे राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार निर्णय.

- मजबूत केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था, केंद्राकडे निहित अवशिष्ट अधिकार, केंद्राद्वारे राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र.


6. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना

- समवर्ती यादी, व्यापार स्वातंत्र्य, वाणिज्य आणि निष्कर्ष कायदे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.

- समवर्ती यादी, व्यापार, वाणिज्य आणि परस्परसंबंध स्वातंत्र्य आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.


7. जर्मनीची वायमर राज्यघटना

- आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन.


8. सोव्हिएत युनियनची राज्यघटना

- प्रास्ताविकेत मूलभूत कर्तव्ये आणि न्यायाचा आदर्श (सामाजिक, आर्थिक आणि राजकीय)


9. फ्रान्सची राज्यघटना

- प्रजासत्ताक 

- प्रास्ताविकातील रिपब्लिकन आदर्श आणि स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचे आदर्श.


10. दक्षिण आफ्रिकेचे संविधान 

- घटना दुरुस्ती आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया.


11. जपानची राज्यघटना

- कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया.

नेमणुका आणि नियुक्त्या 2024

◾️ओम बिर्ला : 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष

◾️डी वाय चंद्रचूड : भारताचे 50 वे मुख्य सरन्यायाधीश

◾️हिरालाल सामरिया : भारताचे मुख्य माहिती आयुक्त

◾️नरेंद्र मोदी : नीती आयोगाचे अध्यक्ष

◾️अजित दोवल : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

◾️पंकज कुमार सिंह : उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

◾️ व्ही अनंत नागेश्वरन : भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

◾️जया वर्मा सिंह : भारतीय रेल्वे बोर्ड चे अध्यक्ष

◾️रेखा शर्मा : राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष

◾️डॉक्टर उन्नीकृष्णन नायर : विक्रम साराभाई अंतराळ केंद्राची संचालक आहेत

◾️हिमांशू पाठक : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष

◾️मनोज यादव :  रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे प्रमुख

◾️ पी टी उषा :भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष

◾️ सिद्धार्थ मोहंती : LIC चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

◾️धीरेंद्र ओझा : प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) चे महासंचालक

◾️न्यायमूर्ती बीआर सारंगी : झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती

◾️मसूद पेझेश्कियान : इराणचे नवे अध्यक्ष म्हणून निवड

◾️हेमंत सोरेन : तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री

◾️डॉ.बी.एन.गंगाधर : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी

◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव

◾️IAS अधिकारी मनोज कुमार सिंह : UP चे नवे मुख्य सचिव

◾️विक्रम मिसरी : भारताचे नवे परराष्ट्र सचिव

◾️अतुल चौधरी : ट्रायचे नवे सचिव

◾️IAS राकेश रंजन : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) चे अध्यक्ष

◾️मार्क रूट्टे : NATO चे महासचिव

◾️एंटोनियो कोस्टा - युरोपियन युनियन चे अध्यक्ष

◾️नवाफ सलाम : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष

◾️रॉजर बिन्नी : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे (BCCI) चे अध्यक्ष

◾️समीर कामत : DRDO चे अध्यक्ष

◾️दिनेश कुमार :विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष

◾️प्रवीण सूद : CBI अध्यक्ष

◾️गिरीश चंद्र मुर्मु :  नियंत्रण आणि महालेखा परीक्षक 

◾️प्रवीण गौड :रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) चे अध्यक्ष

◾️रवी सिन्हा : RAW चे अध्यक्ष

◾️इकबाल सिंग लालपुरा : राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष

◾️गौतम गंभीर : क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक

◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)

◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)

◾️वायुदल प्रमुख : विवेक .राम. चौधरी (27 वे)

◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)

◾️भूदल उपप्रमुख :एनएस राजा सुब्रमण (47 वे)

◾️NSA : अजित डोवल

◾️नितीन अग्रवाल : BSF चे अध्यक्ष

◾️नलीन प्रभात :NSG चे  अध्यक्ष

◾️अरविंद पनगरिया : 16 वा वित्त आयोग अध्यक्ष

भारतीय संसदेमधील विविध प्रकारचे बहुमत


🔥 साधारण बहुमत:

- साधारण बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: सर्वसाधारण विधेयक, ठराव, नवीन राज्य निर्मिती, विधान परिषदांची निर्मिती, नागरिकत्व कायदे, इ. (कलम 2/3, कलम 368 वगळता).


🔥 प्रभावी बहुमत:

- प्रभावी बहुमत: सर्व सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.(vacancy deducted)

- वापर: अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची हटवणूक.


🔥 संपूर्ण बहुमत:

- संपूर्ण बहुमत: सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: महत्त्वपूर्ण ठराव पास करण्यासाठी आवश्यक.


🔥 विशेष बहुमत:

📌 विशेष बहुमत प्रकार 1:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3.

- वापर: सर्व भारतीय सेवा निर्मिती (कलम 312), राज्यसभेचा ठराव (कलम 249).


📌 विशेष बहुमत प्रकार 2:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाचा एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: न्यायाधीशांची व CEC ची हटवणूक, दुरुस्ती (कलम 368(1)).


📌 विशेष बहुमत प्रकार 3:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक आणि साधारण बहुमताने निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचे बहुमत.

- वापर: संविधानातील दुरुस्ती (कलम 368), 4था अनुसूची, 7वा अनुसूची, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या शक्ती, राष्ट्रपती निवडणूक (कलम 54/55), केंद्र-राज्य संबंध, संसदेमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व.


🔥 राष्ट्रपती महाभियोग:

- महाभियोग: सर्व सदस्यांच्या 2/3.***

- वापर: राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी आवश्यक.

मसुदा समिती (Drafting Committee)


◆ घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.


◆ 29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.


◆  मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.


◆ घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.


◆ पुढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.


◆ मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


❇️ मूळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 


(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


❇️ मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल


(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.


(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


❇️ मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -


(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


◆ मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.


◆ 26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात

आली.

२६ डिसेंबर २०२४

स्वतंत्र भारताची राज्यघटना

🔅लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.


🔅 तरिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.


🔅 घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.


🔅 महणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.


🔶 भारताचे संविधान


🔅 आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,

आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.



💠 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-



(१) लिखित घटना


भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.



(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना


भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.



(३) लोकांचे सार्वभौमत्व


घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.


(४) संसदीय लोकशाही


स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.


(५) संघराज्यात्मक स्वरूप


भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.



(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ


लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.


(७) मूलभूत हक्क


भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.


(८) धर्मनिरपेक्ष राज्य


भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.



(९) एकेरी नागरिकत्व


अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली .


(१०) एकच घटना


ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे



(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ


देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.


(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती


भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.


(१३) मार्गदर्शक तत्वे


व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे


(१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात 

(२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा 

(३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. 

(४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे 

(५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये 

(६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. 

(७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.



(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था


लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.



(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार


भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आह


(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा


भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.


(१७) प्रौढ मताधिकार


भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली आह

१४ डिसेंबर २०२४

राज्यघटना निर्मिती


1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? 

एन् एम् राॅय(1934)


2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता? 

नेहरू रिपोर्ट

 

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली? 

कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना) 


4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते? 

1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स


5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? 

24 मार्च 1946


6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली? 

16 मे 1946


7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती? 

389


8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या? 

जुलै -आॅगस्ट 1946


9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या? 

296


10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या? 

काँग्रेस 208


11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची  सदस्य संख्या किती झाली? 

299


12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते? 

70


13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते? 

संयुक्त प्रांत(55)


14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला? 

10 लाख

 

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या? 

15


16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे  भरले होते? 

दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात) 


17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? 

9ते23 डिसेंबर 1946


18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते? 

211


19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? 

सच्चिदानंद सिन्हा 


20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते? 

ए के अँथनी 


21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली? 

राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)


22)घटना समितीचे सल्लागार कोण होते? 

बी एन राव

 

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? 

हरेंद्र मुखर्जी 


24)घटना समितीचे सचिव कोण होते? 

व्हि आर अय्यंगार

 

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले. 

11.


भारतीय संसदेमधील विविध प्रकारचे बहुमत✅

🔥 साधारण बहुमत:

- साधारण बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: सर्वसाधारण विधेयक, ठराव, नवीन राज्य निर्मिती, विधान परिषदांची निर्मिती, नागरिकत्व कायदे, इ. (कलम 2/3, कलम 368 वगळता).


🔥 प्रभावी बहुमत:

- प्रभावी बहुमत: सर्व सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.(vacancy deducted)

- वापर: अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची हटवणूक.


🔥 संपूर्ण बहुमत:

- संपूर्ण बहुमत: सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: महत्त्वपूर्ण ठराव पास करण्यासाठी आवश्यक.


🔥 विशेष बहुमत:

📌 विशेष बहुमत प्रकार 1:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3.

- वापर: सर्व भारतीय सेवा निर्मिती (कलम 312), राज्यसभेचा ठराव (कलम 249).


📌 विशेष बहुमत प्रकार 2:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाचा एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: न्यायाधीशांची व CEC ची हटवणूक, दुरुस्ती (कलम 368(1)).


📌 विशेष बहुमत प्रकार 3:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक आणि साधारण बहुमताने निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचे बहुमत.

- वापर: संविधानातील दुरुस्ती (कलम 368), 4था अनुसूची, 7वा अनुसूची, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या शक्ती, राष्ट्रपती निवडणूक (कलम 54/55), केंद्र-राज्य संबंध, संसदेमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व.


🔥 राष्ट्रपती महाभियोग:

- महाभियोग: सर्व सदस्यांच्या 2/3.***

- वापर: राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी आवश्यक.

खटल्यांचे वर्गीकरण


💥 प्रस्तावनेसंदर्भातील खटले

1. बेरुबारी यूनियन वि. भारतीय संघ (1960)

2. गोलखनाथ वि. पंजाब राज्य (1967)

3. केशवानंद भारती वि. केरळ राज्य (1973)

4. इंदिरा नेहरू गांधी वि. राजनारायण (1975) 

5. मिनर्वा मिल वि. भारतीय संघ (1978)


💥घटनादुरुस्ती संदर्भातील खटले

▪️कलम 368

1. शंकरी प्रसाद वि. भारतीय संघ (1951)

2. सज्जन सिंग वि. राजस्थान (1954)

3. गोलकनाथ वि. पंजाब राज्य (1967) 

4. केशवानंद भारती वि. केरळ (1973)


💥मूलभूत हक्कांसंदर्भातील खटले

1. ए. के. गोपालन वि. मद्रास राज्य (कलम 13) (1950)

2. चंपकम दोराइराजन वि. मद्रास राज्य (कलम 15) (1951)

3. इंद्रा सहानी वि. भारतीय संघ (कलम 15) (1993)

4. मनेका गांधी वि. भारतीय संघ (कलम 21) (1978)

5. एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (कलम 25 ते 28) (1994)


💥आणीबाणी संदर्भातील खटले

▪️कलम 352 ते 360

1. मिनव्हा मिल वि. भारतीय संघ (1980)

2. एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (1994)


👉 यापूर्वी आपण basic structure संदर्भात सर्व खटले दिलेले आहेत ते सुद्धा परीक्षेपूर्वी वाचून घ्या.

आरक्षणासंबंधीचे महत्वाचे खटले

✅ श्रीमती चंपकम दोराईजन वि. मद्रास राज्य (1951)

👉 जाती आधारित आरक्षण घटनेच्या कलम 15 (1) चे उल्लंघन करते.


✅ एम. आर. बालाजी वि. म्हैसूर राज्य (1962)

▪️शासनाच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी 68% इतक्या आरक्षणास अत्याधिक व वास्तव मानन्यात आले.


✅ इंद्र सहानी वि. भारतीय संघ (1992)

👉 घटनेने सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाला मान्यता दिली परंतु आर्थिक मागासलेपणाला नाही. 

👉 सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा नोकऱ्यांमध्ये OBC साठी आरक्षण कायम ठेवले परंतु क्रिमीलेअरला वगळण्यास सांगितले.


✅ अखिल भारतीय शोसित कर्मचारी संघ (रेल्वे) वि. भारतीय संघ.

▪️50% आरक्षणापेक्षा जास्त पदांच्या निवडीमध्ये रेल्वे बोर्डाचा "कॅरी फॉरवर्ड नियम" कायम ठेवला जाईल, (परंतु तो काही विशिष्ट स्थितीमध्ये) बढतींमध्ये आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही.


✅ एम. नागराज आणि इतर वि. भारत संघ (2006)

▪️77 व्या दुरुस्तीची घटनात्मकता कायम ठेवली. परंतु सुप्रीम कोर्टने भरतीतील आरक्षण मान्य केले आणि प्रतिनिधित्व कमी असल्याने संख्यात्मक माहिती देणे गरजेचे आहे असे सांगितले तसेच मागासलेपणा सिद्ध करावा लागेल आणि कामाची कार्यक्षमता कमी होता कामा नये.


✅ बी. के. पवित्रा वि. कर्नाटक राज्य (2019).

कर्नाटक शासनाचा बढतीतील आरक्षणाचा नियम योग्य ठरवला आणि कलम 335 मधील कामातील गुणवत्तेचा मुद्दा जो नागराज खटल्यात महत्त्वाचा मानला गेला होता, त्यात सुप्रीम कोर्टने बदल करून म्हटले की गुणवत्तेसोबतच संविधानातील मूल्ये व ध्येये पूर्ण करणेही आवश्यक आहे. (कर्नाटक शासनाने कमी प्रतिनिधित्वाची संख्यात्मक माहिती दिली होती.)

भारतीय संविधानाची निर्मिती

📜 कॅबिनेट मिशन योजना:

- एकूण जागा: ३८९

  - ब्रिटिश भारत: २९६ जागा (२९२ जागा ११ राज्यपाल प्रांतांमधून, ४ मुख्य आयुक्त प्रांतांमधून)

  - संस्थाने: ९३ जागा (मुस्लिम लीग सदस्यांच्या माघारीमुळे ७० जागा)


---


🏛️ संविधान सभेची रचना:

- मूळ जागा: २९९

- ब्रिटिश भारत प्रांत: २२९ जागा

- संस्थाने: ७० जागा


---


⚖️ सार्वभौम संस्था:

- पूर्णपणे सार्वभौम आणि विधायी अधिकार असलेली संस्था.

- अध्यक्षता करणारे:

  - विधायी सत्र: जी.व्ही. मावळंकर

  - संविधान सत्र: डॉ. राजेंद्र प्रसाद


---


🗓️ महत्वाच्या तारखा:

- पहिलं सत्र: ९ डिसेंबर १९४६

- अंतिम सत्र: २४ जानेवारी १९५०

- स्वीकारणे: २६ नोव्हेंबर १९४९

- अंमलबजावणी: २६ जानेवारी १९५०


---


📝 मसुदा समिती:

- अध्यक्ष: डॉ. बी.आर. आंबेडकर

- सदस्य:

  - एन. गोपालस्वामी आयंगार

  - अलादी कृष्णस्वामी अय्यर

  - डॉ. के.एम. मुंशी

  - सैयद मोहम्मद सादुल्लाह

  - एन. माधव राव

  - टी.टी. कृष्णमाचारी


---


📘 संविधानाची माहिती:

- प्रारंभिक सामग्री: उद्देशिका, ३९५ कलमे, ८ अनुसूचियां

- सभेचे अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद

- उपाध्यक्ष: एच.सी. मुखर्जी, वी.टी. कृष्णमाचारी

- तात्पुरते अध्यक्ष: डॉ. सच्चिदानंद सिन्हा

- प्रतीक: 🐘

- संवैधानिक सल्लागार: बी.एन. राव

- सचिव: एच.व्ही.आर. आयंगार

- मुख्य मसुदाकार: एस.एन. मुखर्जी

- कॅलिग्राफर: प्रेम बिहारी नारायण रायझादा

- सजावट: नंदलाल बोस, ब्योहर राममनोहर सिन्हा


---


🗳️ मतदान आणि प्रतिनिधित्व:

- मुसलमान, शीख, आणि सामान्य श्रेणींना जागा वाटप.

- प्रातिनिधिक मतदान प्रणालीद्वारे मतदान.

- संस्थानामधून नामांकित सदस्य होते.


आणीबाणी


1. आणीबाणीचे प्रकार

   - कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी (युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड).

   - कलम 356: राष्ट्रपती राजवट (राज्य शासन).

   - कलम 360: आर्थिक आणीबाणी (आजपर्यंत लागू नाही).


2. घोषणेसाठी आधार

   - भारताची सुरक्षा: 

   - 42 वी घटनादुरुस्ती: विशिष्ट भागात आणीबाणी.

   - 44 वी घटनादुरुस्ती: "आंतरर्गत गोंधळ" चे "सशस्त्र बंड" मध्ये बदल; मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता.


3. न्यायालयीन पुनरावलोकन

   - 38 वी घटनादुरुस्ती: राष्ट्रीय आणीबाणी पुनरावलोकनापासून मुक्त.

   - 44 वी घटनादुरुस्ती: तरतूद हटविली.

   - मिनर्वा मिल्स प्रकरण (1980): आणीबाणीची घोषणा न्यायालयात आव्हान दिली जाऊ शकते.


4. मंजुरी प्रक्रिया

   - संसद मंजुरी: एका महिन्याच्या आत (पूर्वी दोन महिने होते).

   - लोकसभा विसर्जन असल्यास: नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठक पासून 30 दिवस टिकेल, राज्यसभेची मंजुरी आवश्यक.

   - वाढ: दर सहा महिन्यांनी संसदेच्या मंजुरीने अनिश्चित काळासाठी वाढवता येते.


5. मंजुरीसाठी बहुमत

   - एकूण सदस्य: बहुमत आवश्यक.

   - उपस्थित आणि मतदान करणारे: दोन-तृतीयांश बहुमत.


6. राष्ट्रीय आणीबाणीचे रद्दीकरण

   - राष्ट्रपतींचे रद्दीकरण: कधीही शक्य.

   - लोकसभा ठराव: सतत चालू ठेवण्याचे नकार.

   - लेखी सूचना: एक-दशांश सदस्यांनी सूचना द्यावी; 14 दिवसांत विशेष बैठक बोलवावी.

   - साधे बहुमत: नकारासाठी.


7. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम

   - केंद्र-राज्य संबंध: कार्यकारी, विधायी, आर्थिक बदल.

   - आयुष्य वाढ: लोकसभा आणि राज्य विधानमंडळांचे कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.

   - मूलभूत अधिकार:

     - कलम 19: स्वयंचलित निलंबन (कलम 358).

     - कलम 32: राष्ट्रपतींच्या परवानगीने निलंबन (कलम 359).


8. ऐतिहासिक उदाहरणे

   - 1962, 1971, 1975: राष्ट्रीय आणीबाणी घोषित.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...