Geography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Geography लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२९ मार्च २०२५

ब्रह्मपुत्र नदी



◆आशियातील ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. लांबी २,९०० किमी. पाणलोट क्षेत्र ९,३५,५०० चौ. किमी. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत सस. पासून ७,२०० मी. उंचीवर (८२० १०’ पू. रेखांश व ३०० ३१ ’ उ. अक्षांश) चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्रा उगम पावते.

◆हे उगमस्थान मानसरोवरापासून सु. १०० किमी. तर सिंधू नदीच्या उगमापासून सु. १६० किमी. अंतरावर आहे. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांतील उल्लेखांनुसार ब्रह्मपत्रेचा उगम मिचिनू पर्वतातल्या ब्रह्मकुंडातून झाल्याचे मानले जाते. कुबी, आंगसी व चेमा-युंगडुंग हे या नदीचे तीन शीर्ष प्रवाह होत.

◆भारतात ब्रह्मपुत्र महानद असाच या नदीचा निर्देश करण्यात येत असे. या नदीशी अनेक आख्यायिका निगडित असून त्या महाभारत कालिकापुराण कालिदासाचा रघुवंश यांसारख्या संस्कृत साहित्यातूनआढळतात. ‘लौहित्य’ (म्हणजे लाल रंगाची) असेही तिचे नाव असून परशुरामाने क्षत्रिय संहाराने रक्तरंजित झालेला परशू ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहात धुतल्याने तिचे पाणी लाल झाले, अशी एक आख्यायिका आहे.

◆आसाममधील आहोमांच्या राजवटीत रूढ असलेल्या आहोम भाषेत तिला ‘नाम-दाओ-फी’ म्हणजे ‘तारकांची नदी’ असे नाव होते. ‘बुलुम बुथुर’ म्हणजे बुडबुड्यांची नदी या तिच्या मूळ नावाचे संस्कृतीकरण होऊन ब्रह्मपुत्र हा शब्द बनला असावा. आसामी लोक अनेकदा ‘दर्याच’ म्हणून तिचा उल्लेख करतात.

◆ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये त्सांगपो (म्हणजे शुद्ध करणारी), भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखत असून तिबेटमध्ये तिला काही स्थानिक नावेही आहेत.

◆उगमानंतर ही नदी दक्षिणेकडील हिमालयाची मुख्य पर्वतश्रेणी व उत्तरेकडील नीएन-चेन-टांगला पर्वतश्रेमी यांच्यामधून हिमालयाच्या मुख्य श्रेणीला समांतर अशी पश्चिम-पूर्व देशेने वाहत जाते. तिबेट मधील ब्रह्मपुत्रा नदीचा एकूण प्रवाह सु. १,२९० किमी. आहे.

◆या भागातील पी ठिकाणापासून पुढे ती एकदम ईशान्यवाहिनी होऊन ग्याल परी व नामचा बारवा या पर्वतीय प्रदेशातील मोठमोठ्या खोल व अरुंद निदऱ्यांमधून उड्या घेत वाहू लागते. तेथे प्रवाहमार्गात अनेक द्रुतवाह व प्रपातमाला आढळतात. नंतर ती दक्षिणवाहिनी होऊन हिमालय पार करते व भारतात प्रथम सिआँग व पुढे दिहांग नावांनी प्रवेश करते. तिबेटमध्ये त्सांगपोला डावीकडून जो-का त्सांगपू (रागा त्सांगपो), ला-सा हो(चीचू), नि-यांग हो (ग्यामडा चू) तर उजवीकडून न्येन-चू हो (न्यांग) ह्या उपनद्या येऊन मिळतात. चीचू या उपनदीतीरावरच ल्हासा हे तिबेटच्या राजधानीचे ठिकाण आहे.

◆भारतात सदियाजवळ तिला दिबांग व लुहित या उपनद्या मिळाळ्यावर ती नैऋत्यवाहिनी होते व येथून पुढे ती ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. येथूनच तिचे पात्र विशाल होऊन त्यात अनेक बेटांचीही निर्मिती झाल्याचे आढळते. माजुली हे अंतर्गत मोठ्या बेटांपैकी एक बेट या नदीमुळेच निर्माण झाले आहे.

◆आसाममध्ये ब्रह्मापुत्रेचा एक फाटा खेरकुटिया नावाने ब्रह्मपुत्रेपासून वेगळा होतो. पुढे हा फाटा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या सुबनसिरी नदीसह धनसिरीच्या मुखासमोरच मूळ प्रवाहाला येऊन मिळतो. यामुळे ब्रह्मपुत्रेचा मूळ प्रवाह व तिचा खेरकुटिया हा फाटा यांदरम्यान माजुली या १,२५६.१५ चौ. किमी. क्षेज्ञाच्या बेटाची निर्मिती झाली आहे. ब्रह्मपुत्रेला भारतात उत्तरेकडून सुबनसिरी, भरेळी, मानस, चंपावती, सरलभंगा, कोपिली या उपनद्या येऊन मिळतात. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे ‘आसामचे खोरे’ म्हणून ओळखले जाते. या खोऱ्याची लांबी सु. ७५० किमी. व रुंदी सरासरी ८०
बांगला देशात प्रवेश करताच जमुनेला उत्तरेकडून तोरसा, जलढाका, तिस्ता या उपनद्या येऊन मिळतात. पुढे गायबांडच्या दक्षिणेस जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीपासून जुनी ब्रह्मपुत्रा हा नदीप्रवाह वेगळा होतो. हाच ब्रह्मपुत्रा नदीचा मूळ प्रवाहमार्ग होय. हा प्रवाहमार्ग जमालपूर व मैमनसिंगवरून आग्नेय दिशेने वाहत गेल्यावर पुढे भैरवबाझारजवळ मेघना नदीला मिळतो; तर जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीचा सध्याचा मुख्य प्रवाह दक्षिणेस वाहत जाऊन ग्वालंदोच्या उत्तरेस गंगा नदीला मिळतो. तत्पूर्वी जमुनेला बारल, अत्राई, हुरासागर यांचा संयुक्त प्रवाह उजवीकडून येऊन मिळतो.

◆तसेच धालेश्वरी व बडी गंगा या शाखा तिच्यापासून वेगळ्या होऊन स्वतंत्रपणे मेघना नदीला मिळतात. ग्वालंदोपासूनचा गंगा-जमुना यांचा संयुक्त प्रवाह पद्मा नदी म्हणून ओळखला जातो. पुढे पद्मा नदीला उत्तरेकडून मेघना येऊन मिळाल्यावर त्यांचा संयुक्त प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो. मेघना खाडीमधून व इतर उपप्रवाहांमधून ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.

◆एकोणिसाव्या शतकापर्यंत ब्रह्मपुत्रेच्या वरच्या टप्प्याविषयी अज्ञानच होते. किंबहुना त्सांगपो व दिहांग (ब्रह्मपुत्रा) ही एकच नदी आहे. या

नदया व त्यांचे उगमस्थान:-



गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )

यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )

सिंधू => मानसरोवर (तिबेट )


नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )

तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )

महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )

ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )


सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )

व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )

गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक

कृष्णा => महाबळेश्वर


कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )

साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )

रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )

पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )

_______________________________

पृथ्वीचे अंतरंग



🏆 'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.

🏆 पथ्वीच्या आंतरांगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत.

🏆 पष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.

🏆 अतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.

प्राथमिक लहरी (P Waves)
दुय्यम लहरी (S Waves)
पृष्ठीय लहरी (L Waves)
या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.

✅ पराथमिक लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 भकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.

🏆 पराथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात. प्राथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.

✅ दय्यम लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 पराथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते. प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात. दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. मध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.

✅ पष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 पथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात. या लहरींचा वेग कमी असतो. या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते. या लहरी अतिशय विध्वंसख असतात. पृथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष


🏆 पथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.

🏆 भगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.

🏆 बाह्य गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.

🏆 कठीण घन पदार्थाचा आंतगाभा:- अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा. कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- 'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.

२३ मार्च २०२५

अत्यंत महत्त्वाचे.

𝟏)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

𝟐)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

𝟑)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

𝟒)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी- हिमाचल प्रदेश

𝟓)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ नदी - मध्य प्रदेश

𝟔)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

𝟕)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

𝟖)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

𝟗)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

𝟏𝟎)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟏𝟏)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

𝟏𝟐)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟏𝟑)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र 

𝟏𝟒)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

𝟏𝟓)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

𝟏𝟔)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

𝟏𝟕)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

𝟏𝟖)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

𝟐𝟏)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

𝟐𝟎)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

𝟐𝟏)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

𝟐𝟐)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

𝟐𝟑)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟐𝟒)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

𝟐𝟓)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

𝟐𝟔)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

𝟐𝟕)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक


महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर)

◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे)

◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा)

◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे जिल्हा)

◾️तोतलाडोह : मेघदूत जलाशय (नागपूर जिल्हा)

◾️भाटघर : येसाजी कंक (पुणे जिल्हा)

◾️मुळा : ज्ञानेश्वर सागर (अहमदनगर जिल्हा)

◾️मांजरा : निजाम सागर (लातूर जिल्हा)

◾️कोयना : शिवाजी सागर ( सातारा जिल्हा)

◾️राधानगरी:  लक्ष्मी सागर (कोल्हापूर )

◾️तानसा : जगन्नाथ शंकरशेठ (ठाणे)

◾️तापी प्रकल्प : मुक्ताई सागर (जळगाव)

◾️माणिक डोह : शहाजी सागर (पुणे )

◾️चांदोली : वसंत सागर ( सांगली, कोल्हापूर)

◾️उजनी : यशवंत सागर (सोलापूर)

◾️दूधगंगा : राजर्षी शाहू सागर ( कोल्हापूर)

◾️विष्णुपुरी : शंकर सागर (नांदेड)

◾️वैतरणा : मोडक सागर (ठाणे)


🟢भंडारदरा जलाशयाला अगोदर आर्थर जलाशय नावाने ओळखला जात होता

भारतीय पर्जन्याचे (पावसाचे) खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये


1. मानसूनप्रधान पर्जन्य: भारतातील प्रमुख पर्जन्य मानसूनवर अवलंबून असतो. मुख्यतः दक्षिण-पश्चिम आणि काही प्रमाणात उत्तर-पूर्व मानसून भारतात पाऊस घडवतात.


2. हंगामानुसार बदलणारा पर्जन्य: भारतात पर्जन्य मुख्यतः जून ते सप्टेंबर या कालावधीत होतो. या कालावधीत सुमारे 75% पाऊस पडतो.


3. असमान वितरण: भारतात पर्जन्याचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते. उदा. मेघालयातील चेरापुंजी/मौसिनराम येथे सर्वाधिक पर्जन्य होतो, तर राजस्थानमधील थार वाळवंटात अतिशय कमी पावसाची नोंद होते.


4. चक्रीवादळांमुळे होणारा पाऊस: बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या चक्रीवादळांमुळे किनारपट्टी भागांत जास्त पाऊस होतो.


5. अनियमितता: पर्जन्याचा वेळ, प्रमाण आणि कालावधी यामध्ये वर्षानुवर्षे चढ-उतार असतो. त्यामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ पडतो.


6. पर्वतीय भागांवर अधिक पर्जन्य: घाटमाथा, हिमालयाच्या पायथ्याशी आणि पूर्वेकडील पर्वत रांगांमध्ये अधिक पर्जन्य होतो, कारण वाऱ्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन पाऊस पडतो.


7. दोन मुख्य पर्जन्य ऋतू:


दक्षिण-पश्चिम मानसून (जून - सप्टेंबर) – मुख्य पावसाळा

उत्तर-पूर्व मानसून (ऑक्टोबर - डिसेंबर) – विशेषतः तामिळनाडूमध्ये महत्त्वाचा

०३ मार्च २०२५

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार एकूण महानगरपालिका


✳️ एकूण प्रशासकीय विभाग = 6 ✳️
✳️ एकूण प्रादेशिक विभाग = 5 ✳️
✳️ एकूण प्राकृतिक विभाग = 3 ✳️

📌 कोकण प्रशासकीय विभाग
एकूण 9 महानगरपालिका

📌 पुणे प्रशासकीय विभाग
एकूण 6 महानगरपालिका

📌 नाशिक प्रशासकीय विभाग
एकूण 5 महानगरपालिका

📌 छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग
एकूण 5 महानगरपालिका

📌 अमरावती प्रशासकीय विभाग
एकूण 2 महानगरपालिका

📌 नागपूर प्रशासकीय विभाग
एकूण 2 महानगरपालिका

✳️ कोकण प्रशासकीय विभाग
1) बृहन्मुंबई महानगरपालिका
2) नवी मुंबई महानगरपालिका
3) ठाणे महानगरपालिका
4) भिवंडी महानगरपालिका
5) कल्याण - डोंबिवली महानगरपालिका
6) उल्हासनगर महानगरपालिका
7) पनवेल महानगरपालिका
8)  वसई - विरार हानगरपालिका
9) मीरा - भयंदर महानगरपालिका

✳️ पुणे प्रशासकीय विभाग
1) पुणे महानगरपालिका
2) पिंपरी - चिंचवड महानगरपालिका
3) सांगली - मिरज - कुपवाडा महानगरपालिका
4) सोलापूर महानगरपालिका
5) कोल्हापूर महानगरपालिका
6) इचलकरंजी महानगरपालिका

✳️ नाशिक प्रशासकीय विभाग
1) नाशिक महानगरपालिका
2) मालेगाव महानगरपालिका
3) अहमदनगर महानगरपालिका
4) धुळे महानगरपालिका
5) जळगाव महानगरपालिका

✳️ संभाजीनगर प्रशासकीय विभाग
1) संभाजीनगर महानगरपालिका
2) नांदेड - वाघेला महानगरपालिका
3) परभणी महानगरपालिका
4) लातूर महानगरपालिका
5) जालना महानगरपालिका

✳️ अमरावती प्रशासकीय विभाग
1) अमरावती महानगरपालिका
2) अकोला महानगरपालिका

✳️ नागपूर प्रशासकीय विभाग
1) नागपूर महानगरपालिका
2) चंद्रपूर महानगरपालिका

🖌 सर्वाधिक महानगरपालिका असलेला एकमेव प्रशासकीय विभाग
कोकण विभाग = 9 महानगरपालिका

🖌 सर्वाधिक महानगरपालिका असलेला एकमेव जिल्हा
ठाणे जिल्हा..

०४ फेब्रुवारी २०२५

महाराष्ट्र : प्रमुख नद्या व त्यावरील धरणे


1. धरण: राधानगरी  

   - नदी: भोगावती  

   - जिल्हा: कोल्हापूर


2. धरण: कोयना (हेळवाक)  

   - नदी: कोयना  

   - जिल्हा: सातारा


3. धरण: वालदेवी  

   - नदी: वालदेवी  

   - जिल्हा: नाशिक


4. धरण: अरुणावती  

   - नदी: अरुणावती  

   - जिल्हा: यवतमाळ


5. धरण: इसापूर  

   - नदी: पेनगंगा  

   - जिल्हा: हिंगोली-यवतमाळ


6. धरण: वीर धरण  

   - नदी: नीरा  

   - जिल्हा: पुणे


7. धरण: भंडारदरा (विल्सन)  

   - नदी: प्रवरा  

   - जिल्हा: अहमदनगर


8. धरण: गंगापूर  

   - नदी: गोदावरी  

   - जिल्हा: नाशिक


9. धरण: जायकवाडी  

   - नदी: गोदावरी  

   - जिल्हा: छ. संभाजीनगर


10. धरण: भाटघर (लॉइड धरण)  

    - नदी: नीरा  

    - जिल्हा: पुणे


11. धरण: माजलगाव  

    - नदी: सिंधफणा  

    - जिल्हा: बीड


12. धरण: मोडकसागर  

    - नदी: वैतरणा  

    - जिल्हा: ठाणे


13. धरण: धोम  

    - नदी: कृष्णा  

    - जिल्हा: सातारा


14. धरण: दारणा  

    - नदी: दारणा  

    - जिल्हा: नाशिक


15. धरण: बिंदुसरा  

    - नदी: बिंदुसरा  

    - जिल्हा: बीड


16. धरण: सिद्धेश्वर  

    - नदी: दक्षिण-पूर्णा  

    - जिल्हा: हिंगोली


17. धरण: येलदरी  

    - नदी: दक्षिण-पूर्णा  

    - जिल्हा: परभणी


18. धरण: डिंभे  

    - नदी: घोडनदी  

    - जिल्हा: आंबेगाव (पुणे)


19. धरण: भुशी, वळवण  

    - नदी: इंद्रायणी  

    - जिल्हा: लोणावळा (पुणे)


20. धरण: निळवंडे (अप्पर प्रवरा)  

    - नदी: प्रवरा  

    - जिल्हा: अकोले (नगर)


21. धरण: पानशेत (तानाजीसागर)  

    - नदी: अंबी (मुठा)  

    - जिल्हा: पुणे


22. धरण: खडकवासला  

    - नदी: मुठा  

    - जिल्हा: पुणे


23. धरण: चाणकपूर  

    - नदी: गिरणा  

    - जिल्हा: नाशिक


24. धरण: मुळशी  

    - नदी: मुळा  

    - जिल्हा: पुणे


25. धरण: तोतलाडोह, कामठीखैरी  

    - नदी: पेंच  

    - जिल्हा: नागपूर


26. धरण: पुरमेपाडा  

    - नदी: बोरी  

    - जिल्हा: धुळे


27. धरण: भातसा (शहापूर)

    - नदी: भातसा  

    - जिल्हा: ठाणे


28. धरण: उजनी  

    - नदी: भीमा  

    - जिल्हा: सोलापूर

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

1) गोंडवाना श्रेणीचे खडक  - यवतमाळ , गडचिरोली

 ◾️ विंध्य श्रेणीचे खडक - चंद्रपूर 

 ◾️ आर्कियन  श्रेणीचे खडक - सावंतवाडी,  वेंगुर्ला 

 ◾️ धारवाड श्रेणीचे खडक - भंडारा,  गोंदिया

2) दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे पुरावे  - गरम पाण्याचे झरे

3) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना  - 1 नोव्हेंबर 1956 

4) महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टेकड्या -   दरेकसा

5) खलाशी - कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग

6) मोमिनाबाद - आंबेजोगाई  

7) औरंगाबाद - वेरूळ टेकड्या 

  ◾️ नांदेड - मुदखेड टेकड्या

  ◾️ गडचिरोली - सुरजागड टेकड्या 

  ◾️ धुळे - गाळणा डोंगर 

8) कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त -  पश्चिमेकडील

9) दुधा-तुपाचा जिल्हा - धुळे

10) भारतातील सर्वात प्राचीन लेणी - पितळखोरा   

11) सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा -  नांदेड आणि यवतमाळ 

12) महाराष्ट्र पठाराची निर्मिती  - भ्रूश्यमूलक उद्रेक

13) जोगेश्वरी लेणी - मुंबई उपनगर

14) महाराष्ट्र सीमेलगत राज्य  - 6 ( गुजरात,  मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक , गोवा व दादर आणि नगर हवेली

  ◾️ केंद्रशासित प्रदेश - 1

15) अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर - वैराट

16) कृष्णा व भीमा जलविभाजक - शंभू महादेव डोंगररांग  

17)  मांजरा पठार - मराठवाडा 

18) महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी 52 - 60 km

19) भामरागड टेकड्या - गडचिरोली जिल्हा

20) अजिंठा लेणी - वाघुर नदीच्या तीराव

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प 🔴

⬜️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प


🅾️खोपोली - रायगड              

🅾️भिरा अवजल प्रवाह - रायगड                              

🅾️कोयना - सातारा                

🅾️तिल्लारी - कोल्हापूर          

🅾️पेंच - नागपूर                      

🅾️जायकवाडी - औरंगाबाद



🟧 महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प

                 

🅾️तारापुर - ठाणे                    

🅾️जैतापुर - रत्नागिरी              

🅾️उमरेड - नागपूर(नियोजित)



🟨 महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प  

                   

🅾️जमसांडे - सिंधुदुर्ग             

🅾️चाळकेवाडी - सातारा           

🅾️ठोसेघर - सातारा               

🅾️वनकुसवडे - सातारा           

🅾️ब्रह्मनवेल - धुळे                 

🅾️शाहजापूर - अहमदनगर

राष्ट्रीय उद्याने (एकूण ६)

१. ताडोबा राष्ट्रीय उद्यान (महाराष्ट्रतील पहिले उद्यान चंद्रपूर )

 स्थापना१९५५


२. नावेगाव बांध राष्ट्रीय उद्यान

 गोंदिया 

स्थापना १९७२


३. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान (पेंच)

(लहान )

नागपूर    स्थापना१९८३


४. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 

मुंबई उपनगर (बोरीवली) स्थापना१९६९


५. गुगामल राष्ट्रीय उद्यान

(सर्वात मोठे)

अमरावती   स्थापना १९७४


६. चांदोली राष्ट्रीय उद्यान 

सांगली सातारा कोल्हापूर रत्‍नागिरी  

स्थापना२००४

१४ डिसेंबर २०२४

Combine 2024 Geography खालीलप्रमाणे....


संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम व्यवस्थित अभ्यासा 📚📖✌️


🔅महाराष्ट्र स्थापना..

महसूल विभाग, जिल्हा,तालूके, घनता,साक्षरता,स्ञी-पुरूष प्रमाण...


🔅महाराष्ट्र :स्थान ,विस्तार व आकार

महाराष्ट्र व भारत अक्षवृत्त व रेखावृत्त विस्तार, महाराष्ट्र व भारताचे  क्षेञफळ,महाराष्ट्र व भारत विस्तार (पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण)


🔅महाराष्ट्र राजकीय भूगोल 


प्रशासकीय विभाग, क्षेञफळानुसार क्रम,तालुका क्रम ,प्रादेशिक विभागानुसार क्रम,विभाग व त्यांच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके

जिल्हांची सरहद्द ,जिल्हा व त्याला लागून असणाऱ्या जिल्हांची सीमा


🔅प्राकृतिक भूगोल(रचनात्मक)

कोकण किनारपट्टी सह्याद्री/पश्चिम घाट,देश/महाराष्ट्र पठार/दख्खन पठार, खलाशी,वलाटी, डोंगर रांगा,खडक आढळ,शिखरे,घाट,लेण्या.....


🔅भारताची व महाराष्ट्राची जनगणना..


एकूण लोकसंख्या,स्ञी-पुरूष प्रमाण, साक्षरता,घनता,SC व ST लोकसंख्या,जिल्हे अनुसूचित जमाती,लोकसंख्या वाढ,जनगणना..


🔅स्थलांतर 


स्थलांतर शेती शेती (प्रकार) ,सर्वाधिक स्थलांतर क्रम, 


🔅नदीप्रणाली 


पूर्व वाहिनी नद्या(गोदावरी,भीमा,कृष्णा) ,पश्चिम वाहिनी नद्या (तापी ,कोकण,नर्मदा)..

कोकणातील नद्या:उत्तर कोकण-मध्य कोकण-दक्षिण कोकण....उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा..लांबीनुसार व क्षेञफळानुसार क्रम..


🔅खनिज संपत्ती .


🔅धरणे,पठार, धबधबे,हवामान,


🔅वनसंपत्ती,महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने,अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प 


🔅महाराष्ट्रातील उर्जा साधन संपत्ती


औष्णिक विद्युत केंद्र(प्रकल्प), जलविद्युत, खनिज तेल व नैसर्गिक वायू,अणुऊर्जा प्रकल्प, अणुभट्या ,पवनउर्जा 


🔅राष्ट्रीय महामार्ग 44,53

रेल्वे ,पर्यटन 


🔅कृषी(min 2 question)...रोग ,रासायनिक खत, शेळी, मेंढ्या,म्हैस,  यांच्या जाती किंवा विविध पिकांची जात याच्यावरती प्रश्न येतो ...त्याचबरोबर वनस्पती(मुख्य पीके) Scientific Name, सुद्धा विचारू शकतात..etc


🔅india मधील..कर्कवृत्त क्रम, सरहद्द,मृदा,खनिज, खिंडी,महत्वाच्या नद्या...हवामान, महत्वाचे प्रकल्प,...व्यवस्थित करा..


जास्तीत जास्त revision करा ....भरपूर मार्क मिळवून देणारा विषय आहे....

जगातील सर्वात मोठे

● जगातील सर्वात मोठा महासागर : पॅसिफिक महासागर

● सर्वात मोठे आखात : मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.

● सर्वात मोठा उपसागर : हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.

● सर्वात मोठा व्दिपकल्प : अरेबिया

● सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश : सुंदरबन (प.बंगाल)

● सर्वात मोठे भूखंड : युरेशिया (युरोप+आशिया) 

● सर्वात लहान भूखंड : ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.

● सर्वात मोठे बेट : ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.

● सर्वात मोठे व्दिपसमूह : इंडोनेशिया (13,000) बेटे

● सर्वात मोठे व उंचीवरील पठार : तिबेटचे पठार.

● सर्वात मोठी नदी व खोरे : अ‍मेझोन (द. अमेरिका)

● सर्वात लांब नदी : नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.

● सर्वात लांब हिमनदी : लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.

● सर्वात उंच धबधबा : एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.

● सर्वात मोठे वाळवंट : सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.

● सर्वात कमी तापमानाचे ठिकाण : वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.

● सर्वात उष्ण ठिकाण : डेथ व्हॅली (अमेरिका)

● सर्वात मोठा देश (आकारमान) : रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.

● सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) : टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.

● सर्वात छोटा देश (आकारमान) : व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)


राष्ट्रीय उद्याने/व्याघर प्रकल्प यादी


🎯 उत्तराखंड  

   - जिम कॉर्बेट / कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प 🐅🌳  


🎯 राजस्थान  

   - रणथंभोर / रणथंभोर व्याघ्र प्रकल्प 🐯🏞  


🎯 मध्यप्रदेश  

   - बांधवगड / बांधवगड व्याघ्र प्रकल्प 🐅🌄  

   - कान्हा / कान्हा व्याघ्र परकल्प 🐅🍃  

   - सतपुडा / सतपुडा व्याघ्र परकल्प 🌲🦌  


🎯 महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश  

   - पेंच / पेंच व्याघ्र प्रकल्प 🐾🌴  


🎯 पश्चिम बंगाल  

   - सुंदरबन / सुंदरबन व्याघ्र प्रकल्प 🌊🐅  

   - बुक्सा / बुक्सा व्याघ्र परकल्प 🌿🐾  


🎯 कर्नाटक  

   - बांदीपूर / बांदीपूर व्याघ्र प्रकल्प 🐘🌳  

   - नागरहोल / नागरहोल व्याघ्र प्रकल्प 🌲🐅  


🎯 आसाम  

   - काझीरंगा / काझीरंगा व्याघ्र प्रकल्प 🐃🌾  

   - मानस / मानस व्याघ्र प्रकलप 🦏🐅  


🎯 तामिळनाडू  

   - मुदुमलाई / मुदुमलाई वयाघ्र प्रकल्प 🐾🌳  


🎯 केरळ  

   - पेरियार / पेरियार व्याघ्र प्रकल्प 🐅💧  


🎯 ओडिशा  

   - सिमलीपाल / सिमलीपाल व्याघर प्रकल्प 🌳🐅  


🎯 उत्तर प्रदेश  

   - दुधवा / दुधवा व्याघ्र प्रकल्प 🌾🐅  

   - पिलिभीत / पिलिभीत व्याघ्र प्रकल्प 🌿🐾  


🎯 बिहार  

   - वाल्मिकी / वाल्मिकी व्याघर प्रकल्प 🐾🌲  


🎯 छत्तीसगड  

   - इंद्रावती / इंद्रावती व्याघ्र प्रकल्प 🌲🐅  


🎯 अरुणाचल प्रदेश  

   - नामदाफा / नामदाफा व्याघ्र प्रकल्प 🌿🐅

१० डिसेंबर २०२४

वातावरणाविषयी माहिती


पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.


1. तपांबर


भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.


समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत.


2. तपस्तब्धी


भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.


3. स्थितांबर


तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.

ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.

मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.


4. आयनाबंर


मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.


इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.


एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.


5. बाहयांबर


आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

१७ सप्टेंबर २०२४

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.


➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

➡️ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे, दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

➡️ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

➡️ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

➡️ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

➡️ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

➡️ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

➡️ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.



➡️ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ⬅️

    क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

   मि - मिझोराम
   त्र - त्रिपुरा
   म - मध्य प्रदेश
  झा - झारखंड
   रा - राजस्थान
   गु - गुजरात
  छा - छत्तीसगड
  प - पश्चिम बंगाल.

___________________________

सह्याद्रि



पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. 

भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.


▪️भवैज्ञानिक इतिहास


सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.


ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.


अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे. पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे. भूकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अ‍ॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.


▪️भविशेष


सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.


पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे. पूर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.

सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.


सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी गिरिस्थाने वसली आहेत. कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत.


सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.

म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.


तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.


पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम्‌ (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.


चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.


पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.


▪️नदया


भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.


सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा,मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.


कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात.


तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत.


पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे.


सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.


▪️हवामान


समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते.


बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो.


▪️वने


पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात.


सस.पासून  सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात. केरळमधील सदाहरित वने व राष्ट्रीय उद्याने, केरळ व तमिळनाडूमधील वायनाड व मदुमलाई राष्ट्रीय उद्याने, हे पश्र्चिम घाटातील संरक्षित जंगलमय प्रदेश आहेत. पश्चिम घाटाचा संरक्षित ‘ वर्ल्ड हेरिटेज साइट ’मध्ये समावेश करावा अशी मागणी भारत सरकारने २००६ मध्ये ‘युनेस्को मॅब ’कडे केली आहे. अशा स्थळांमध्ये पुढीलप्रमाणे सात प्रमुख विभागांचा व त्यांतील वेगवेगळ्या उपविभागांचा समावेश असेल :


(१) अगस्त्यमलई विभाग : यात पुढील पाच उपविभागांचा समावेश असेल : तमिळनाडूमधील अगस्त्यमलई जीवावरणीय राखीव प्रदेश ( क्षेत्र ९०० चौ. किमी.); कालकाड मुदननुराई व्याघ राखीव प्रदेश (८०६ चौ. किमी.); केरळमधील नेय्यर, पेप्परा व शेंदूर्णे वन्यजीव अभयारण्य; त्यालगतचे आचेनकोइल, थेनमाला, कोन्नी, पुनालूर, तिरूअनंतपुरम् विभाग आणि अगस्त्य वनम् विशेष विभाग.


(२) पेरियार विभाग : यामध्ये सहा उपविभागांचा समावेश असेल : केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान व निसर्ग राखीव प्रदेश (७७७ चौ. किमी.), रन्नी, कोन्नी व आचनकोइल अरण्य विभाग. पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील प्रामुख्याने शुष्क अरण्यमय प्रदेशातील श्रीविल्लिपुत्तूर वन्यजीव अभयारण्य आणि तिरूनेलवेली अरण्य विभागातील राखीव जंगलांचा प्रदेश.


(३) अन्नमलई विभाग : यात सात उपविभागांचा अंतर्भाव असेल : तमिळनाडूमधील चिन्नर वन्यजीव अभयारण्य, एर्नाकुलम् राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), विस्तीर्ण अशा इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य प्रदेशात (९५८ चौ. किमी.) समाविष्ट असणारी इंदिरा गांधी गास हिल्स व करिअन शोला राष्ट्रीय उद्याने, पलनी हिल्स राष्ट्रीय उद्यान (७३७ चौ. किमी.), केरळमधील पेरांबीकुलम् वन्यजीव अभयारण्य (२८५ चौ. किमी.).


(४) निलगिरी विभाग : हा विभाग सु. ६,००० चौ. किमी.पेक्षाही अधिक क्षेत्रात विस्तारला आहे. यात सहा उपविभाग समाविष्ट असतील : केरळमधील निलगिरी जीवावरणीय राखीव प्रदेश आणि करिम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० चौ. किमी.), सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), वायनाड वन्यजीव अभयारण्य (३४४ चौ. किमी.), तमिळनाडूमधील बंदीपूर (८७४ चौ. किमी.), माकूर्ती (७८ चौ. किमी.) व मदुमलाई (३२१ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने व न्यू अमरम्बलम् राखीव जंगल. हा विभाग अतिशय जटिल, सुरक्षित व जगातील एक वैशिष्टयपूर्ण अरण्यमय प्रदेश आहे. आशियाई हत्ती, वाघ, गवा व इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांचे हे आश्रयस्थान आहे.


(५) तळकावेरी विभाग : यात सहा उपविभाग आहेत. कर्नाटकातील बह्मगिरी (१८१ चौ. किमी.), पुष्पगिरी (९३ चौ. किमी.) व तळकावेरी (१०५ चौ. किमी.) ही वन्यजीव अभयारण्ये, राजीव गांधी  राष्ट्रीय उद्यान ( नागरहोळे ३२१ चौ. किमी.) आणि केरळमधील अलाराम राखीव जंगल.


(६) कुद्रेमुख विभाग : यामध्ये कर्नाटकातील पाच उपविभाग येतात. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान(६०० चौ. किमी.), सोमेश्र्वर वन्यजीव अभयारण्य व सभोवतालची सोमेश्वर, अगुंबे व बाळहळ्ळी राखीव जंगले.


(७) सह्याद्री विभाग : यात महाराष्ट्रातील चार उपविभाग येतात. आन्शीप (३४० चौ. किमी.) व चांदोली (३१८ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने. कोयना व राधानगरी ही वन्यजीव अभयारण्ये.


सह्याद्री हा जैवविविधतेचा एक खजिना आहे. तेथील सु. २,००० जातींच्या वनस्पतींचा औषधांसाठी वापर केला जातो. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ’ने केलेल्या एका अभ्यासानुसार महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री प्रदेशात देवदेवतांच्या नावाने श्रद्धेने संरक्षित केलेल्या वनविभागांत १,६०० पेक्षा जास्त ‘देवराया ’ आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी, अभयारण्ये, राखीव व संरक्षित वने निर्माण करणे शक्य झाले आहे. येथील पर्यटनाची अनेक ठिकाणे आर्थिक क्षेत्रे असल्याने पश्र्चिम घाट विकसित होत आहे.


सह्याद्रीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे नदयांच्या खोऱ्यांत जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पांची निर्मिती सुलभ झाली आहे. येथील जंगलांतून लाकूड व इतर अनेक वनोत्पादने तसेच दक्षिण सह्याद्रीतून चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ इ. उत्पादने मिळतात. वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने पश्र्चिम घाटातील खिंडी व घाट महत्त्वाचे ठरले आहेत. अनेक कवींनी व लेखकांनी सह्याद्रीचे सौंदर्य वर्णिले आहे.


वायनाड अरण्याचा प्रदेश म्हणजे उत्तरेकडील व दक्षिणेकडील घाट प्रदेशाचा संक्रमण भाग आहे. दक्षिणेकडील भाग आर्द्र असल्याने तेथे वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात. केरळमध्ये या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे दाट अरण्ये आहेत. ‘ सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान ’ हा भारतातील अतिशय महत्त्वाचा, विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांचा प्रदेश आहे. वृक्षतोडीमुळे उघडया पडलेल्या प्रदेशात गवताळ प्रदेशांची निर्मिती झालेली दिसते. मुख्यत: कर्नाटकातील पश्र्चिम घाट प्रदेश व निलगिरी पर्वतीय प्रदेशात असे विस्तृत गवताळ प्रदेश आहेत.

पूर्वी पश्र्चिम घाट प्रदेशात घनदाट अरण्ये होती. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींना उदरनिर्वाहासाठी पुरेशा प्रमाणात फळे, कंदमुळे इ. सहज उपलब्ध होत असत. प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे सखल भागातील लोकांना अशा अरण्यमय भागात येऊन शेती करणे किंवा वसाहती स्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे जंगले सुरक्षित होती. परंतु ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर प्रामुख्याने मळ्यांच्या लागवडीसाठी व त्यानंतर इतर कारणांसाठी मोठया प्रमाणावर जंगलतोड केली गेली.


▪️जवविविधता


पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.


भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.


पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल - स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात.


निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे.


कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत.


ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे.


गाळाची मृदा

गाळाची मृदा

◆या मृदेने गंगा ब्रह्मपुत्रेचा मैदानी भाग व्यापलेला आहे.

◆पश्चिमेकडील पंजाबच्या काही भागात नदी आणि वारा दोहोंनी वाहून आणलेली मिश्र मृदा आढळते.

◆मैदानाचा उर्वरित भाग मात्र नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने बनलेला आहे.

★या थरांचे दोन उपप्रकार पडतात.

 1) भांगर
2) खादर

 1)भांगर म्हणजे पूर्वी केव्हा तरी संचित झालेली माती होय.

- ही माती राखट रंगाची जाड थरांची असून नद्यापासून दूर जास्त उंचीच्या प्रदेशात आढळते.

 2)खादर म्हणजे नवी गाळमाती. ही गाळमाती नद्या लगतच्या सखल मैदानी भागात दिसते.

- दरवर्षी पावसाळ्यात नवीन थरांची भर पडताना आढळून येते.

महत्वाचे दरी


🚣🏻काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे. 


🚣🏻कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

 

🚣🏻कलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.


🚣🏻काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.


🚣🏻शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) : हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात.

 हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते. 

📚🙏

हिमालयीन शिखरे

🔳एव्हरेस्ट:-8850 मी


🔳K2:-8611 मी


🔳कांचनगंगा:-8598 मी


🔳वहॉटसे:-8501 मी


🔳मकालु:-8421 मी


🔳धवलगिरी:-8172 मी


🔳मसलू:-8163


🔳चो आया:-8153 मी


🔳अन्नपूर्णा:-8078 मी


🔳नदादेवी:-7817 मी


🔳कामेत:-7756 मी


🔳गरला मंधता:-7694 मी


🔳तरिशूल:-7140 मी


🔳बद्रीनाथ:-7138 मी

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...