Current Affairs लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Current Affairs लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०४ एप्रिल २०२५

ठळक बातम्या. ०४ मार्च २०२५.

१.छत्तीसगडचा पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प.


- कोरबा जिल्ह्यात पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट (SCTPP) स्थापन होणार.

- आधीच अस्तित्वात असलेल्या १,३४० मेगावॅट क्षमतेच्या प्लांटमध्ये १,३२० मेगावॅट (Mw) ची क्षमता जोडली जाईल.


२. वक्फ कायद्याचे कलम ४०


- वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ हे १९९५ च्या विद्यमान वक्फ कायद्यात सुधारणासाठी. 

-सर्वात वादग्रस्त बदल म्हणजे कलम ४० काढून टाकणे.

- वक्फ कायद्याच्या कलम ४० नुसार वक्फ बोर्डाला मालमत्ता वक्फ आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे.

- वक्फ ट्रिब्यूनलमध्ये आव्हान दिल्याशिवाय मंडळाचे निर्णय अंतिम असतात.


३. राजस्थान.


- २७५ रेल्वे स्थानकांसह राजस्थान हे सौरऊर्जा प्रकल्प असलेल्या सर्वाधिक रेल्वे स्थानकांमध्ये देशात आघाडीवर.

- महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता, राज्यातील २७० रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले.

- भारतीय रेल्वेने २०२५-२६ पर्यंत १००% विद्युतीकरण साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे . 

- २०३० पर्यंत रेल्वेने निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारे बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 


४. बाकू ते बेलेम रोडमॅप


- ब्राझीलमध्ये झालेल्या ११ व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भारताने सर्व ११ ब्रिक्स राष्ट्रांना 'बाकू ते बेलेम रोडमॅप'ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

-ज्याचा उद्देश हवामान कृतीसाठी २०३५ पर्यंत दरवर्षी १.३ ट्रिलियन डॉलर्स जमवणे आहे.


५. ChaSTE


- चांद्रयान-३ मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून मौल्यवान थर्मल डेटा प्रदान करून, कोणत्याही खगोलीय पिंडाच्या पृष्ठभागाखाली यशस्वीरित्या प्रवेश करणारे आणि तापमान मोजणारे ChaSTE हे पहिले उपकरण बनले.

- १ सेमी अंतराने ते १० सेमी खोलीपर्यंत तापमानातील फरक मोजते .


६.कन्नडिप्पया जीआय टॅग


- केरळमधील पारंपारिक आदिवासी चटई असलेल्या कन्नडिप्पयाला भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.

- ज्यामुळे अशी मान्यता मिळालेली ही राज्यातील पहिली आदिवासी हस्तकला आहे.

- कन्नडिप्पया , ज्याचा अर्थ "आरशाची चटई" आहे, ही एक हाताने विणलेली चटई आहे जी रीड बांबूच्या मऊ आतील थरांपासून बनवली जाते .


बांगलादेशातील घटनांचे दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांवरील प्रतिबिंब


🔹 बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, विशेषतः ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गमावल्यावर हिंदूंवरील वाढलेला हिंसाचार, यामुळे धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

🔹 संपूर्ण दक्षिण आशियात अल्पसंख्याकांच्या परिस्थितीचा सातत्याने ऱ्हास होत आहे, ज्यामुळे या भागातील शांतता आणि स्थिरता धोक्यात आली आहे.


🔥 फाळणी आणि तिचे परिणाम

📌 1947 ची फाळणी धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आली होती, विशेषतः हिंदू-मुस्लिम वाद सोडवण्यासाठी.

📌 परंतु, यामुळे धार्मिक ध्रुवीकरण वाढले आणि भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अन्याय आणि हिंसा वाढली.

📌 मोहाजिर, निर्वासित हिंदू आणि निर्वासित मुस्लिम यांच्या विस्थापनामुळे मोठे सामाजिक आणि राजकीय तणाव निर्माण झाले.


💢 फाळणीचे परिणाम:

✅ भारतात मुस्लिम अल्पसंख्यांकांसाठी काही प्रमाणात सुरक्षितता होती, पण पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंची स्थिती खूपच बिकट झाली.

✅ हिंदू आणि ख्रिश्चन यांसारख्या इतर अल्पसंख्याकांवरही हल्ले होत राहिले.


🤝 नेहरू-लियाकत करार आणि त्याचे अपयश

📜 1950 मध्ये नेहरू-लियाकत करार झाला, जो भारत-पाकिस्तान दरम्यान अल्पसंख्याकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला होता.

❌ परंतु, पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य धोरणामुळे बांगलादेशातील बंगाली मुस्लिमांचे हक्क डावलले गेले.

⚠️ परिणामी, 1971 मध्ये बांगलादेशचा जन्म झाला.


🚨 महत्त्वाचा धडा:

🔹 केवळ राजकीय करार आणि करारपत्रे पुरेसे नाहीत!

🔹 लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समरसता हीच अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची खरी हमी ठरू शकते.


🇮🇳🤝🇧🇩 भारत-बांगलादेश संबंध आणि हिंदूंची स्थिती

🔹 1971 मध्ये भारताने बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात मोठी भूमिका बजावली, पण सध्या दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत.

🔹 बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक सतत अत्याचाराचा बळी ठरत आहेत.

🔹 काही विश्लेषकांचे मत आहे की ही हिंसा फक्त शेख हसीनाच्या पतनानंतरची राजकीय उलथापालथ नसून, बांगलादेशातील वाढत्या धार्मिक कट्टरतेचे प्रतिबिंब आहे.


💡 भारताची भूमिका:

✅ भारताने हिंदूंच्या सुरक्षेच्या मुद्द्याला केवळ द्विपक्षीय संबंधांच्या चौकटीत पाहू नये.

✅ बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण हे संपूर्ण दक्षिण आशियाच्या शांततेसाठी आवश्यक आहे.

🏛️ दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांचे भविष्य


💡 सुधारणा कशा करता येतील?

🔹 🆕 नवीन धोरणे आणि कायदे – धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करणाऱ्या सुधारित धोरणांची आवश्यकता आहे.

🔹 📚 इतिहासाचा योग्य अभ्यास – फाळणीमधील चुकीच्या निर्णयांपासून धडा घेऊन नव्या पिढीला सर्वसमावेशक दृष्टिकोन शिकवला पाहिजे.

🔹 🤝 एकत्रित प्रयत्नांची गरज – भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी संयुक्त प्रयत्न करायला हवेत.


🚨 भारताची जबाबदारी:

❌ केवळ बांगलादेशातील हिंदूंसाठी चिंता व्यक्त करून भारतीय मुस्लिमांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.

✅ सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी तटस्थ आणि प्रभावी धोरण हवे.


📢 निष्कर्ष

✅ धार्मिक अल्पसंख्यांकांचा प्रश्न हा केवळ इतिहासातील घटना नसून, तो दक्षिण आशियातील शांततेसाठी निर्णायक मुद्दा आहे.

✅ धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक समरसता वाढवण्यासाठी प्रभावी धोरणे आवश्यक आहेत.

✅ राजकीय पक्षांनी केवळ बहुसंख्याकांच्या भावनांवर राजकारण न करता, सर्वधर्मीयांना समान अधिकार मिळतील याकडे लक्ष द्यावे.

📌 शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी एकत्र येऊन अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे! ✊🔥


ISRO महत्त्वपूर्ण मोहीमा



🔹आर्यभट्ट (1975)  :- पहिला भारतीय उपग्रह.

🔸INSAT (1983)  : दूरसंचार, प्रसारण, आणि हवामानशास्त्र यासाठी उपग्रह मालिका.

🔹चांद्रयान-1 (2008)  :- चंद्रावर पाण्याचा शोध.

🔸मंगलयान (2014) :- पहिली भारतीय मंगळ मोहीम.

🔹PSLV (2017)  : एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित केले.

🔸चांद्रयान-2 (2019)  :- चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण.

🔹चांद्रयान-3 (2023)  :- चंद्रावर यशस्वी उतरण.

🔸आदित्य-L1 (2023)  : पहिली सौर मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी.

🔹NISAR (2024)  :- 12 दिवसांत पृथ्वीचे mapping करणार (संयुक्त NASA-ISRO मोहीम).

🔸गगनयान (2024)  :- पहिली मानव अवकाश मोहीम.

🔹SPADEX (2024)  : जुळी उपग्रह मोहीम.

🔸मंगलयान-2 (2024)  : दुसरी मंगळ मोहीम.

🔹शुक्रयान-1 (2031)  : पहिली शुक्र ग्रह मोहीम.

🔸चांद्रयान-4 (2027)  : चंद्रावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी मोहीम, JAXA सह सहयोगाने.

दोन मार्क साठी फिक्स हे लक्षातच ठेवा :


✅ पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर ( सातारा )

✅ दुसरा मधुबन हनी पार्क - बोरिवली ( मुंबई )


✅ पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी ( सातारा )

✅ पहिले फळाचे गाव - धुमाळवाडी ( सातारा )


✅ पहिले पुस्तकाचे गाव - भिलार ( सातारा )

✅ पहिले मधाचे गाव - मांघर ( सातारा )


✅ पहिले झाडांचे पुनर्वसन गाव - म्हसवे ( सातारा )

✅ पहिले डिजिटल गाव - हरिसाल ( अमरावती )


✅ पहिले कॅशलेस गाव - घसई ( ठाणे )

✅ पहिले वायफाय गाव - पाचगाव ( नागपूर ) 


✅ पहिले आधार गाव - टेंभली ( नंदुरबार )

✅ पहिले कवितांचे गाव - उभादांडा ( सिंधुदुर्ग )

✅ भारताचे पहिले गाव - माना ( उत्तराखंड )

काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा


◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे

◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य

◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले

◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य

◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य

◾️त्रिपुरा : प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य 

◾️आंध्रप्रदेश : जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य 

◾️महाराष्ट्र - गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे देशातील पहिले राज्य 

◾️पश्चिम बंगाल : मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल

◾️उत्तराखंड : लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य

◾️हिमाचल प्रदेश : भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य

◾️दिल्ली : भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️पश्चिम बंगाल : भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️सिक्कीम : मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : 'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य 

◾️सिक्कीम : भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य

◾️पंजाब : निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य 

◾️केरळ : सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य 

◾️हरियाणा : बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य

◾️पंजाब : मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य 

◾️मध्यप्रदेश : सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली : ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य

◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य

◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य 

◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य 

◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य 

◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य

◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य 

◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य

◾️दिल्ली : देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर 

◾️केरळ:  हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे

◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले 

◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य

◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे  पहिले राज्य

◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक 

◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे

◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे

◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य

◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य


शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोवा(802 किलोमीटर)


◾️महाराष्ट्रात : 700 किलोमीटर आहे 

◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.


◾️6 पदरी चा महामार्ग

📌 सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र

शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा


एकूण 9385 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. 


◾️1 हेक्टर म्हणजे = 2.471 एकर होते


◾️अपेक्षित खर्च - 86,300 कोटी


📌 महामार्गात येणारी महत्वाची देवस्थाने 

🦙सवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड शक्ततपीठ, सचखंड गुरुद्वारा, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट,औदुंबर दत्त मंदिर सांगली,8 नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा - आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही दवस्थाने जोडली जाणार आहेत

समृद्धी महामार्ग....

📌 मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो 


जिल्हे :  हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो

अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

◾️6 पदरी महामार्ग


सुरवात  : आमणे गाव, ठाणे जिल्हा

शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा


🛑 असा आहे समृद्धी महामार्ग

- नागपूर ते मुंबई  

- लांबी : 701 किलोमीटर

- 120 मीटर रुंदीचा महामार्ग

- मार्गिका : 4 + 4

- वाहन वेगमर्यादा : सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी 150 किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी 100 किमी असेल.

- हा महामार्ग 10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल 

- समृद्धी महामार्गाचे नवीन नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग  

- समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले आहे  

२३ मार्च २०२५

ऑस्ट्रेलियन ओपन 2025 संपूर्ण विजेत्यांची यादी


🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष 2025 

1) पुरुष विजेता - जॅनिक सिनर (इटली) 

2) पुरुष उपविजेता -अलेक्झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी)



🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन महिला 2025 

1) महिला विजेता - मॅडिसन कीजने ( अमेरिका)

2) महिला उपविजेता - आर्यना सबालेन्का



🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन पुरुष दुहेरी 2025

1) विजेता - हॅरी हेलिओवारा(फिनलँड) आणि ग्रेट हेन्री पॅटेन (ब्रिटन)

2) उपविजेता -  सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी 



🖋️ ऑस्ट्रेलिया ओपन महिला दुहेरी 2025

1) विजेता - कॅटेरिना सिनियाकोवा आणि टेलर टाऊनसेंड

2) उपविजेता - हसिह सु-वेई आणि जेलेना ओस्टापेन्को 


ऑस्ट्रेलिया ओपन मिश्र दुहेरी 2025

1) विजेता-  ऑलिव्हिया गाडेकी (ऑस्ट्रेलिया) आणि जॉन पीर्स 

2) उपविजेता - किम्बर्ली बिरेल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ

19 वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार यांना जाहीर


👉 व्यक्तीशः ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे 21 वे व्यक्ती


👉पुरस्कार वर्ष - 2024 

◾️गाव - गोंदूर धुळे महाराष्ट्र

◾️वय - 100 वर्षे

◾️जगातील सर्वात उंच मूर्ती "स्टॅच्यू ऑफ युनिटी"(182 मीटर - 597 फूट) 

◾️1954 ते 1958 पर्यंत राज्याच्या पुरातत्व विभागात मॉडेलिंग म्हणून सेवा देऊन आपल्या कारकिर्दीची सुरुवात 

◾️1959 मध्ये -  दिल्लीत माहिती वर दूरसंचार मंत्रालयात नोकरी केली.

◾️त्यांनी वेरूळ आणि अजिंठा लेण्यांमधील अनेक शिल्पांची पुनर्बांधणी केली. 


👉त्यांनी बनवलेले महत्वाचे पुतळे 👇


◾️संसदेतील महात्मा गांधीजींचा पुतळा

◾️बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 108 फूट उंच केम्पे गौडा पुतळा

◾️ मध्य प्रदेशातील गांधी सागर धरणावरील 45 फूट उंच चंबळ स्मारक

◾️ब्रह्मा सरोवर येथील कृष्ण अर्जुन स्मारक

◾️राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा ते बनवणार आहेत

◾️भाक्रा नांगल धरणावर  कामगारांच्या स्मरणार्थ 50 फूट उंच कांस्य स्मारक

◾️26 जानेवारी 1959 रोजी कामगारांचा विजय पुतळा बसवण्यात 

◾️दिल्लीतील गोविंद वल्लभ पंत यांची 10 फूट लांबीची कांस्य मूर्ती

◾️ बिहारमधील कर्पुरी ठाकूर पुतळा

◾️ बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा यांची मूर्ती

◾️अमृतसरमधील महाराजा रणजीत सिंह यांची 21 फूट उंच मूर्ती 

◾️भगवान श्रीरामाची 251 मीटर उंच मूर्ती (अयोध्या)

◾️153 फूट उंच भगवान शिव मूर्ती (बेंगळुरू)

◾️100 फूट उंच छत्रपति संभाजी महाराज यांची प्रतिमा (मोशी, पुणे)

◾️मुंबईतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सध्या बनवत आहेत


👉श्री राम सुतार यांना मिळालेले पुरस्कार 

◾️1999 - पद्मश्री पुरस्कार

◾️2016 - टागोर पुरस्कार

◾️2016 - पद्मभूषण पुरस्कार

◾️2025 - महाराष्ट्र भूषण पुरस्कार

👉फ्रान्समधील इकोल सुपेरिअर रॉबर्ट डी सोर्बन विद्यापीठाकडून डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे


👉 महाराष्ट्र भूषण पुरस्कार

●2022 - अप्पासाहेब धर्माधिकारी

●2023 - अशोक सराफ 

●2024 - राम सुतार 


👉 महाराष्ट्र भूषण पुरस्कार बद्दल ✅


◾️महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे

◾️स्थापना : 1995

◾️आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रसाठी दिला जातो

◾️पुरस्कार स्वरूप : 25 लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

👉पहिला पुरस्कार : पू.ल.देशपांडे (साहित्य) 1996

👉 4 महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार लता मंगेशकर,राणी बंग,सुलोचना लाटकर,आशा भोसले

परीक्षाभिमुख AI बाबत महत्वाची माहिती :


➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस 

➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका 

➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI)

➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ

➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ

➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह 

➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ

➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)

➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका 

➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा 

➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत 

➡️ पहिली AI ब्युटी क्वीन - जारा शतावरी

➡️ मिस AI 2024 - केंझा झायली

➡️ भारतातील पहिली AI MOM इन्फ्लुएन्सर - काव्या मेहरा

➡️ भारतातील पहिली AI हिंदी सिंगर - माया 

काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा


◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे

◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य

◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले

◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य

◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य

◾️त्रिपुरा : प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य 

◾️आंध्रप्रदेश : जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य 

◾️महाराष्ट्र - गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे देशातील पहिले राज्य 

◾️पश्चिम बंगाल : मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल

◾️उत्तराखंड : लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य

◾️हिमाचल प्रदेश : भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य

◾️दिल्ली : भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️पश्चिम बंगाल : भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️सिक्कीम : मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : 'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य 

◾️सिक्कीम : भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य

◾️पंजाब : निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य 

◾️केरळ : सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य 

◾️हरियाणा : बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य

◾️पंजाब : मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य 

◾️मध्यप्रदेश : सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली : ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य

◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य

◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य 


◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य 


◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे 

करणारे पहिले राज्य 


◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य 


◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य


◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य 


◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य


◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य


◾️दिल्ली

 : देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर 


◾️केरळ:  हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे


◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले 


◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य


◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.


◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे  पहिले राज्य


◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक 


◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे


◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे


◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य


◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य


आय.सी.सी चॅम्पियन्स ट्रॉफी - 2025


👉 आयोजक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद 

👉 प्रकार - एक दिवसीय आंतरराष्ट्रीय

👉 आयोजित - दर 4 वर्षांनी 

👉 विजेता संघ - भारत 

👉 उपविजेता संघ - न्युझीलँड 

👉 एकूण संघ - 8

👉 एकूण सामने - 15 

👉 2025 चे आयोजन - पाकिस्तान 

👉 भारताचे सर्व सामने - दुबई 

👉 प्रथम आयोजन 1998 - बांगलादेश 

👉 प्रथम विजेता - दक्षिण आफ्रिका 

👉 पुढील आयोजन 2029 - भारत 

👉 मॅन ऑफ द मॅच - रोहित शर्मा

👉 मॅन ऑफ द सिरीज - रचीन रवींद्र 


प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय

 1).  GATT चे मुख्यालय कोठे आहे? 

 उत्तर - जिनिव्हा (1947)


 2).  G-8 देशांची स्थापना कधी झाली?

 उत्तर - 1975


 3).  UNCTAD चे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - जिनिव्हा (1964)


 4).  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? 

 उत्तर - वॉशिंग्टन (1945)


 ५).  अन्न आणि कृषी संघटना (FAO) कोठे आहे? 

 उत्तर - रोम (1945)


 ६).  जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - जिनिव्हा 1948


 7).  रेडक्रॉसचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - जिनिव्हा (1863)


 8).  जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - वॉशिंग्टन (1945)


 9).  G-15 देशांचे मुख्यालय कोठे आहे? 

 उत्तर - जिनिव्हा (1989)


 10).  जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - जिनिव्हा (1995)


 11).  नाटो देशांची मुख्यालये कोठे आहेत?

 उत्तर - ब्रुसेल्स (1949)


 १२).  सार्क देशांचे मुख्यालय कोठे आहे? 

 उत्तर - काठमांडू (1985)


 13).  आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - मनिला (1966)


 14).  आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?

 उत्तर - हेग (1946)


 १५).  इंटरपोल कुठे आहे?  

 उत्तर - लियोन पॅरिस (1923)


महत्वाच्या संस्था , अध्यक्ष , स्थापना मुख्यालय

💡 IOC - international Olympic committee 

⭐️मुख्यालय : लुझने (Lausanne) स्वित्झर्लंड

⭐️स्थापना : 23 जून 1894

⭐️अध्यक्ष : थॉमस बॅच


💡 BIMSTEC - ( Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation)

◾️मुख्यालय : ढाका बांगलादेश

◾️स्थापना : 6 जून 1997

◾️अध्यक्ष : इंद्रा मणी पांडे

◾️सदस्य : 7 ( भारत आहे)


💡 ASEAN - Association Of South East Asian Nation's

⭐️मुख्यालय : जकर्ता ( इंडोनेशिया)

⭐️स्थापना : 8 ऑगस्ट 1967

⭐️अध्यक्ष :डॉ काओ किम हॉर्न


💡 ICJ - ( international Court of Justice)

◾️मुख्यालय : हेग नेदरलँड

◾️स्थापना : 1945 ( सुरवात एप्रिल 1946)

◾️अध्यक्ष :नवाफ सलाम


💡 NATO - (North Atlantic Treaty Organization)

⭐️मुख्यालय : ब्रुसेल्स ( बेल्जियम)

⭐️स्थापना : 4 एप्रिल 1949

⭐️अध्यक्ष : जेन्स स्टोलटेंबर्ग


💡 IMF(International Monetary Fund

◾️मुख्यालय : वॉशिंग्टन डीसी अमेरिका

◾️स्थापना : 27 डिसेंबर 1945

◾️अध्यक्ष : क्रिस्टलीना जॉर्जिवा (Georgieva)


💡 ISA (International Solar Alliance)

⭐️मुख्यालय : गुरुग्राम भारत

⭐️स्थापना : 30 नोव्हेंबर 2015

⭐️अध्यक्ष :अजय माथूर


💡 ADB (Asian Development Bank)

◾️मुख्यालय : फिलिपिन्स

◾️स्थापना : 19 डिसेंबर 1966

◾️अध्यक्ष : Masatsugu Asakawa


💡 FATF ( Financial Action Task Force) 

⭐️मुख्यालय : पॅरिस ( फ्रांस)

⭐️स्थापना : 1989

⭐️अध्यक्ष : टी राजा कुमार

💡 WHO ( World Health Organisation )

◾️मुख्यालय : जीनेव्ह ( स्वित्झर्लंड)

◾️स्थापना : 7 एप्रिल 1948

◾️अध्यक्ष :टेड्रोस अधानंम

◾️सदस्य :194 देश


💡 UNICEF (United Nation's children's Fund)

⭐️मुख्यालय : न्यूयॉर्क अमेरिका

⭐️स्थापना : 11 डिसेंबर 1946

⭐️अध्यक्ष : कॅथरीन रसल


💡 SCO - (Shanghai Cooperation Organization )

◾️मुख्यालय : बीजिंग (चायना)

◾️स्थापना : 15 जून 2001

◾️अध्यक्ष : Zhang Ming

◾️सदस्य : 9 ( भारत आहे)

💡 SAARC (South Asian Association for Regional Cooperation )

⭐️स्थापना 8 डिसेंबर 1985 

⭐️मुख्यालय काठमांडू नेपाळ


💡 UNSCO (United Nations Educational Scientific and cultural Organization)

◾️मुख्यालय : पॅरिस फ्रान्स

◾️स्थापना : 16 नोव्हेंबर 1945

◾️अध्यक्ष : आंद्रे अझुले (Audrey Azouley )


💡 FIFA ( Federation International de Football Association)

⭐️मुख्यालय : झुरिच  स्विझर्लंड

⭐️स्थापना : 21 मे 1904

⭐️अध्यक्ष :गियानी अनफेंटिनो (Gainni Infantino)


💡 ICC ( international Cricket Council)

◾️ स्थापना 15 जून 1909

◾️ मुख्यालय : दुबई (UAE)

◾️ अध्यक्ष : ग्रेग बारकले (Greg Barclay)

चालू घडामोडी :- 21 & 22 मार्च 2025

◆ ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि देशाचे धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2025 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.


◆ जागतिक जल दिन 22 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.


◆ जागतिक जल दिन 2025 ची थीम "ग्लेशियर प्रिझर्वेशन" [Glacier Preservation.] ही आहे.


◆ पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील 100 जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे.


◆ भारत देश प्रथमच अँटी ड्रोन लेझर डोम विकसित करणार आहे.


◆ जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो? [पहिला जागतिक हिमनदी दिन :- 2025]


◆ पश्चिम बंगाल राज्यात देशातील पहिले Frozen zoo स्थापन करण्यात आले आहे.


◆ 57व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन ओडिशा येथे करण्यात येणार आहे.


◆ भारताने हॉकी वर्ल्ड कप जिंकून 50 वर्षे झाल्यानिमित्ताने के अरुमुगम आणि एरोल डी क्रुझ यांनी March of Glory Book लिहिले आहे.


◆ नेतुम्बो नंदी नदैतावाह यांची नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.


◆ Knights Cross of the Order of डेन्मार्क सन्मान विजय शंकर यांना प्रदान करण्यात आला आहे.


◆ तेलगू अभिनेता चिरंजीवी ला UK देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे.


◆ State of Climate report 2024, WMO या संस्थेने जारी केला आहे.


◆ ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी हरीश टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

०३ मार्च २०२५

आंतरराष्ट्रीय घडामोडी

📚कोणत्या भारतीय वंशीय कलाकाराला ब्रिटनच्या टर्नर पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले?
-जसलिन कौर

📚 वर्ल्ड बुकर फेअर 2025 चे उद्घाटन कोठे होणार आहे? 
-नवीं दिल्ली

📚भारत आणि कोणत्या देशात दरम्यानच्या सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे?
-इंडोनेशिया

📚कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे?
-जॉर्जिया

📚पहिले रायसीना मध्यपूर्व संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?
-अबुधाबी

📚जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? 
-दक्षिण सुदान

📚एच.एस.बी.सी.अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण?
-सत्या नडेला

📚 संयुक्त राष्ट्र महासभेची आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची आतापर्यंतची कितवी वेळ आहे?
 -दुसरी (पहिल्यांदा 2012)

📚टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कोणते विद्यापीठ आहे?
-मेसाचुसेट्स इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (प्रथम स्थानी ऑक्सफर्ड विद्यापीठ)

📚 वल्र्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक संपन्न झालेले दावोस हे शहर कोणत्या देशात आहे?
-स्वित्झर्लंड

१५ फेब्रुवारी २०२५

फेब्रुवारी २०२५ | चालू घडामोडी

१. १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान भारतात एअरो इंडिया शो कुठे आयोजित केला जाईल?

अ. नोएडा

बी. नवी दिल्ली

सी. बेंगळुरू ✅

डी. चेन्नई


स्पष्टीकरण: एअरो इंडिया शो हा भारतात आयोजित एक प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन आहे, जो यावेळी बेंगळुरूमध्ये होणार आहे.


२. कोणत्या देशाने अलीकडेच गुगलविरुद्ध अँटी-ट्रस्ट चौकशी सुरू करण्याची घोषणा केली आहे?

अ. रशिया

ब. चीन ✅

C. भारत

D. जपान

स्पष्टीकरण: चीनने बाजारपेठेतील आपल्या मक्तेदारीच्या पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली गुगलविरुद्ध विश्वासघातविरोधी चौकशी सुरू केली आहे.


४. अलीकडेच कोणत्या देशाने आठवड्यातून कर्मचाऱ्यांचे कामाचे तास (४० ऐवजी ३७.५ तास) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे?

अ. नॉर्वे

B. स्वित्झर्लंड

C. फिनलंड

ड. स्पेन ✅


स्पष्टीकरण: कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्पेनने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याचे कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.


५. कोणत्या राज्याने अलीकडेच गुन्री येथील अंतर्देशीय खारफुटीच्या जंगलाला राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले ?

अ. कर्नाटक

बी. तामिळनाडू

क. गुजरात ✅

D. पश्चिम बंगाल


स्पष्टीकरण: गुजरात सरकारने अंतर्देशीय खारफुटीच्या गुन्री स्थळाला राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.


६. मतदार जागरूकता वाढवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 'चांद्रयान से चुनव तक' हा उपक्रम कोठे सुरू केला?

अ. महाराष्ट्र

ब. दिल्ली ✅

क. पश्चिम बंगाल

डी. ओडिशा


स्पष्टीकरण: मतदार जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने दिल्लीत 'चांद्रयान से चुनव तक' उपक्रम सुरू केला.


७. 'एकुवेरिन' लष्करी सरावाची १३ वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे?

अ. भारत

ब. मालदीव ✅

क. श्रीलंका

D. इंडोनेशिया


स्पष्टीकरण: 'एकुवेरिन' हा भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सराव आहे, जो यावेळी मालदीवमध्ये आयोजित केला जात आहे.

चालू घडामोडी :- 14 फेब्रुवारी 2025

◆ मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.


◆ सेंद्रिय खत उत्पादनात देशात पंजाब राज्य प्रथम स्थानावर आहे.[महाराष्ट्र :- दुसरा]


◆ नविन प्राप्तिकर विधेयक 2025 हे आयकर कायदा 1961 कायद्याची जागा घेणार आहे.


◆ नविन प्राप्तिकर विधेयक 2025 लोकसभेत निर्मला सीतारामन यांनी सादर केले आहे.


◆ नविन प्राप्तिकर विधेयक 2025, 01 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.


◆ आशियाई ट्रायथलॉन स्पर्धा चेन्नई येथे सुरु होत आहे.


◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या स्वाती शिंदे(कोल्हापूर) ने 53 किलो वजनी गटात कुस्ती मध्ये सुवर्ण पदक जिंकले.


◆ उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 53 सुवर्ण पदके जिंकली आहेत.


◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.


◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत सेनादल संघाने सर्वाधिक 67 सुवर्ण पदके जिंकली आहेत.


◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 195 पदके जिंकले आहेत.


◆ 38वी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा 2025 उत्तराखंड राज्यात पार पडली आहे.


◆ रजत पाटीदार याची RCB आयपीएल संघांच्या कर्णधार पदी नियुक्ती झाली आहे.


◆ ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी 2025 अवॉर्ड जोमेल अँड्रेल वॉरिकन(वेस्ट इंडिज) ला जाहीर करण्यात आला आहे.


◆ "आई एम?(I am?)" या पुस्तकाचे लेखक गोपीचंद पी. हिंदुजा हे आहेत.


◆ जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.[राष्ट्रीय महिला दिन :- 13 फेब्रुवारी]


◆ सामाजिक न्याय वर पहिला क्षेत्रीय संवाद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.


◆ कॉन्सन्टेटाइन तसुलास यांची ग्रीस देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे.


◆ ICC ने भ्रष्टाचाराच्या कारणावरून शोहेली अख्तर या महिला क्रिकेटपटूला निलंबित केले आहे.


◆ रोमानिया देशाचे राष्ट्रपती क्लाऊस इओहानिस यांनी राजीनामा दिला आहे.

भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024

 ⭕️♦️⚠️भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) 2024

          👉भारत- 96 वा क्रमांक 

          👉एकूण देश - 180 देश

          👉भारताचा गुण= 38 

          👉भारत =93 वा (2023)

                        


🎯 सर्वात कमी भ्रष्टाचार करणारे देश 

         1)पहिला देश= डेन्मार्क 

         2) दुसरा देश =  फिनलंड 

         3)तिसरा देश =सिंगापूर


🎯 सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारे देश 

        1) दक्षिण सुदान =  (8 गुण)

        2)सोमालिया = 9 गुण

        3)व्हेनेझुएला = 10 गुण

१३ फेब्रुवारी २०२५

ठळक बातम्या 13 फेब्रुवारी 2025

1. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) २०२४ मध्ये भारताचा क्रमांक.

-ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने प्रसिद्ध केलेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI) २०२४ मध्ये भारत १८० देशांपैकी ९६ व्या स्थानावर आहे, ज्याचा गुणांक ३८ आहे. 

-सर्वात कमी भ्रष्ट देश म्हणजे डेन्मार्क (पहिला) , त्यानंतर फिनलंड (दुसरा) आणि सिंगापूर (तिसरा) आहे.

-दक्षिण सुदान, सोमालिया, व्हेनेझुएला आणि सीरिया हे सर्वात भ्रष्ट देशांमध्ये स्थान मिळवतात.


2.जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स (LPI) 2023

-आंतरराष्ट्रीय शिपमेंट श्रेणीमध्ये २२ वे स्थान मिळवले आहे आणि १३९ देशांमध्ये एकूण ३८ वे स्थान मिळवले आहे .

-भारत सागरी अमृत काल व्हिजन २०४७ अंतर्गत लॉजिस्टिक्समध्ये दीर्घकालीन सुधारणांची योजना आखत आहे , ज्याचा उद्देश देशाला जागतिक लॉजिस्टिक्स हब म्हणून स्थान देणे आहे.


3.मेघालय २०२७ च्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार आहे.

-भारतीय ऑलिंपिक असोसिएशन (IOA) ने फेब्रुवारी/मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या ३९ व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मेघालयाला दिले आहे.

-उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात मेघालयला आयओएचा ध्वज प्रदान केला जाईल.

- अलीकडील ठिकाणे -

३८ वी आवृत्ती (२०२४): उत्तराखंड (सात शहरांमध्ये आयोजित, मुख्य ठिकाण: डेहराडून)

३७ वी आवृत्ती (२०२३) : गोवा (पाच शहरांमध्ये आयोजित)

३६ वी आवृत्ती (२०२२): गुजरात

३५ वी आवृत्ती (२०१५): केरळ

३९ वी आवृत्ती (२०२७): मेघालय


4.सृजनम ऋग

- केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी नवी दिल्लीतील एम्स येथे भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट, सृजनम, सुरू केला.

-सृजनम हे एक स्वयंचलित, पर्यावरणपूरक जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया उपकरण आहे जे रोगजनक वैद्यकीय कचरा जाळल्याशिवाय निर्जंतुक करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

-स्थळ: एम्स, नवी दिल्ली.

-विकसित: CSIR-NIIST (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरडिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी), तिरुवनंतपुरम.

-मंत्रालयाच्या अंतर्गत: विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय.


5.शक्ती सेमी-कंडक्टर चिप्स

- भारतातील पहिली स्वदेशी एरोस्पेस-ग्रेड सेमीकंडक्टर चिप, 'शक्ती', आयआयटी मद्रास आणि इस्रोने डिजिटल इंडिया आरआयएससी-व्ही उपक्रम (डीआयआरव्ही) अंतर्गत विकसित केली आहे.

-शक्ती हा RISC-V ओपन-सोर्स इंस्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर (ISA) वर आधारित एक स्वदेशी मायक्रोप्रोसेसर आहे 

-हे भारताच्या अवकाश, संरक्षण आणि संगणकीय उद्योगांच्या उच्च-विश्वसनीयता आणि सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे .

-डिजिटल इंडिया RISC-V (DIRV) उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) द्वारे समर्थित, ISRO च्या सहकार्याने IIT मद्रास .


6. भारत प्रथमच प्रशासनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहे.

-भारत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या (IIAS ) वार्षिक परिषदेचे आयोजन करत आहे. IIAS-DARPG (प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग) भारत परिषद २०२५ ही परिषद १०-१४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली जात आहे . 

-ही परिषद आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था (IIAS) आणि भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (DARPG) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे .

-उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...