समाजसुधारक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समाजसुधारक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२८ जानेवारी २०२५

पंडिता रमाबाई

★ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला.


★ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावले)


★ बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते.


★ परंतु त्यांनी आपल्या बंधूचे मित्र विपीन बिहारीदास मेघावी या बंगाली वकीलाशी पण शूद्र व्यक्तीशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.


★ दुर्दैवाने रमाबाईंचे पती हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले.


★ रमाबाईला "मनोरमा" नावाची एक कन्या झाली होती.


★ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.


★त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली,

 हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.


★ 1882 - हंटर कमिशनपुढे साक्ष


★ 1883 - त्यांनी वॉटीज चर्च (इंग्लंड) येथे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.


★ मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले.


★ आत्मचरित्र - माझी साक्ष


★ स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ लिहिला.


★ High Caste Hindu Women या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांची दुःख स्थिती मांडली.


🎯 पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था

१) आर्य महिला समाज

२) शारदा सदन 👉 विधवा स्त्रियांसाठी

३) कृपा सदन 👉 पतीत स्त्रियांसाठी

४) बातमी सदन 👉 अंधांसाठी

५) प्रीतिसदन 👉 वृद्ध,अशक्त,अपंगांसाठी

६) मुक्तीसदन 👉 विधवांसाठी


★ त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी "कैसर-ए-हिंद" किताब देण्यात आला.


🎯 सेवासदन :-

★ स्थापना-1908 (मुंबई)

★ संस्थापक - रमाबाई रानडे,


👉 बेहरामजी मलबारी, दयाराम नारीडुमल यांच्या मदतीने


★ उद्देश -हिंदू मुस्लिम &पारशी स्त्रियांना शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करने.


________

०३ ऑक्टोबर २०२४

महादेव गोविंद रानडे :



जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू - 16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 - सामाजिक परिषद.

1890 - औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :


1865 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.

1867 - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.

1870 - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.

उद्दीष्ट - थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.

वकृत्वोत्तेजक सभा - पुणे.

नगर वचन मंदिर - पुणे.

1875 वसंत व्याख्यान - माला (पुणे).

1882 - हुजूरपागा शाळा (पुणे).

31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.

1896 - हिंदू विडोज होम.

इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .

मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.

पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.

1889 - Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :


इंदु प्रकाश (मासिक).

एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.

1874 - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.

1888 - ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.

मराठी सत्तेचा उदय.

मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

निबंध - प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.

'तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य' हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये :

ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.

भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.

1873 - 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.

पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.

संमतीवय विधेयकास पाठिंबा.

इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.

दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.

'महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.' टिळकांचे मत.

०५ सप्टेंबर २०२४

भाऊराव पायगौंडा पाटील


(२२ सप्टेंबर १८८७–९ मे १९५९). 


महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून गाडगे महाराज (Gadge Maharaj) यांनी त्यांना कर्मवीर पदवी दिली.  ते अण्णा या नावानेही परिचित आहेत.

 जन्म:


कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ घराणे मूडब्रिदी (जि. दक्षिण कन्नड – कर्नाटक) गावचे. देसाई हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु पुढे त्यांच्या घराण्याला पाटीलकी मिळाल्याने ते देसाईचे पाटील झालेत. 


शिक्षण:

एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. राजर्षी शाहूमहाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.


भाऊराव हे ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत फिरल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. 


कार्य:

१९०९ मध्ये दादा जिनप्पा मद्वण्णा यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दूधगाव (जि. सांगली) येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. या शिक्षण संस्थेपासून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी १९१९ मध्ये कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता. पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. त्या वेळी गांधीजींनी ‘भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तीस्तंभ है’ अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले. गोरगरीब पण हुशार मुले जेथेजेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, या मंत्राबरोबरच भाऊरावांनी ‘तुम्हास एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा’ हा संदेश दिला.

सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य पतकरून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले.वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले (Mahatma Jyotirao Govindrao Phule) व राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Mharaj) यांची शिक्षणाप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ते सत्यशोधक समाज (Satyashodhak Samaj) याचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. 


निधन:

भाऊराव यांचे हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले.

२६ जून २०२४

थोर भारतीय विचारवंत



(१) राजा राममोहन राॅय :--
           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली.
मृत्यू २७ सप्टेंबर १८३३

(२) स्वामी विवेकानंद :--
            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे
भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण.

(३) रवींद्रनाथ टागोर :--
            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली
हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१.

(४) न्यायमूर्ती रानडे :--
           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१.

(५)लोकमान्य टिळक :--
             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.

(६) महात्मा गांधी :--
            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली
लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८.

(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--
              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे
पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार.

(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--
         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६.

(९) सुभाषचंद्र बोस :--
               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते.

(१०) इंदिरा गांधी :--
               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या
पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.

२४ जून २०२४

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर



जन्म - 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.
मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.

 त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.
तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.
1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.
हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.
सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.
आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.

संस्थात्मक योगदान :

1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.
1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.
20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.
25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.
2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)
24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.
1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.
ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.
1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.
1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.
मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.
20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.

आंबेडकरांचे लेखन :

The Problem Of Rupee
1916 - Cast In India
1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)
1946 - The Untouchables
1956 - Thoughts on pakisthan.
1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.
'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.
1920 - मुकनायक.
1927 - समता.
1946 - Who Were Shudras?

वैशिष्ट्ये :

गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.
1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.
1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.
1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.
29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.
1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.
14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

२१ जून २०२४

रघुनाथ धोंडो कर्वे

✅ रघुनाथ धोंडो कर्वे ✅

✅  (जानेवारी १४, इ.स. १८८२ - ऑक्टोबर १४, इ.स. १९५३)

✅ हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते.

✅ हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होत.

✅बालपण आणि तारुण्य ✅

र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली.

 इ.स. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४०च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.. इ.स. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी या मुलाखतींमध्ये नोंदविल्या आहेत.

 याशिवाय अण्णांशी त्यांचे संबंध कसे राहिले, यावरही या मुलाखतींमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. आणखी काही दुर्मिळ माहितीही तिथे निश्चितच मिळते.

इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत.

✅संततिनियमन: रघुनाथ धोंडो कर्वे ✅

संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले.

 वाचनाची अफाट गोडी आणि लहानपणापासून जडलेली अवांतर वाचनाची सवय यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयांतून आणून वाचली.

स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले.

नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली.

स्वत:ला एकही मूल नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व त्यांच्या बायकोनेही त्याला थोर मनाने संमती दिली.

इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले.


  •  स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या दशकात धरला होता. लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे मानसिक विकृतीनिर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला

१२ एप्रिल २०२४

महात्मा जोतिबा फुले

�दि. ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती�


��या महामानवाचा जीवनपट��


इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा

इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.

इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी

इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

१८ मार्च २०२४

स्वामी विवेकानंद

✅स्वामी विवेकानंद ✅

१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२)

 हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते.

 तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिनम्हणून साजरा केला जातो

✅✅स्वामी विवेकानंद यांचे बालपण✅✅

उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.

त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली.
त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळआदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई.

 जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता.

 विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.

✅✅शिक्षण: स्वामी विवेकानंद✅✅

नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला.

 येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.[संदर्भ हवा ]

नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता.

 हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता.

काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, "नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे.
मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही."
 त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते

महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले :



मूळ आडनाव – गोह्रे
जन्म – 11 मे 1827
मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.
1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.
21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. जीवन परिचय :

आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

शिक्षण:

फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.
परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.
अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.

विवाह:

महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.
त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

पुढील शिक्षण :

इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

संस्थात्मक योगदान :

3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.
1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.
10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.
व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.
1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).
1868 - 'ब्राम्हणांचे कसब'
1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.
1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.
1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.
1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.
1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.
1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.
अस्पृश्यांची कैफियत.
शिवाजी महाराजांचा पोवाडा.
वैशिष्ट्ये :

थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.
1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.
1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.
2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.
ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.
उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.
सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.
सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

१७ मार्च २०२४

लोकमान्य बाळ गंगाधर :-


🔸भारतीय असंतोषाचे जनक

 (व्हॅलेंटाईन चिरोल द्वारे उपमा)

🔸भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार...

🔸तल्या तांबोळ्यांचे पुढारी...

🔸महाराष्ट्र केसरी-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती...

🔸1 जानेवारी 1880 रोजी 'न्यू इंग्लिश स्कूल,पुणे' ची स्थापना संस्थापक-टिळक,आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर...

🔸 कसरी व मराठा वृत्तपञांची सुरुवात

2Jan1881-मराठा(इं):-संपादक-टिळक

4Jan1881-केसरी(म):-संपादक-आगरकर

🔸जलै 1882-कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक व आगरकर 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगात कैद...

🔸24 ऑक्टोबर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना (टिळक व आगरकर)...

🔸दादाजी विरुद्ध पत्नी रखमाबाई प्रकरण...

🔸महाविद्यालयीन मित्र असणाऱ्या टिळक व आगरकर यांच्यात 'आधी सामाजिक की राजकीय सुधारणा' यावरून वितुष्ट...

🔸1893-मुस्लिमांच्या मोहर्रम सणावरून प्रेरणा घेत सार्वजनिक गणेश उत्सव सुरुवात...

🔸1895-सार्व. शिवजयंती उत्सव सुरुवात...

🔸1896-97 मधील साराबंदी मोहिम...

🔸1897-चाफेकर बंधूंनी केलेल्या प्लेग कमिशनर रँड हत्तेच्या समर्थनात केलेल्या लिखनाबद्दल दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

🔸1901-'आर्टिक होम इन वेदाज' ग्रंथ...

🔸1901 ते 1904 -ताई महाराज प्रकरण...

🔸1905-बंगालच्या फाळणीनंतर जहालवादाचा जोरदार पुरस्कार...

🔸''स्वदेशी,स्वराज्य,राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार'' या चतु:सुञीचा पुरस्कार...

🔸किंग्जफोर्ड प्रकरणानंतर केसरीत ''देशाचे दुर्दैव" या अग्रलेखा मुळे 6 वर्षे मंडाले येथे काळ्या पाण्याची शिक्षा...

🔸 1911-मंडालेच्या तुरुंगात 'गीतारहस्य' ग्रंथ पूर्ण..

🔸28 एप्रिल 1916-टिळकप्रणित होमरूल लीगची स्थापना...

🔸1916-टिळकांच्या मध्यस्थीने मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यात येथे होऊन लखनौ अधिवेशन संपन्न...

🔸डिसेंबर 1916- बेळगाव येथे होमरूल लीगच्या प्रचारादरम्यान "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच" ही घोषणा...

🔸मार्च 1918- मुंबईतील अस्पृश्यता निवारण परिषदेत भाषण-"जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही"...

🔸जानेवारी 1919- व्हॅलेंटाईन चिरोल विरोधात अब्रुनुकसानीचा खटला...

🔸1919 च्या माँटेग्यू-चेम्सफर्ड कायद्यावर 'हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे','उजाडले पण सूर्य कोठे आहे','दिल्ली तो बहुत दूर आहे' अशा शब्दात लोकमान्यांची टीका...

🔸1920-गांधीजी व टिळकांची सिंहगडावर भेट...

 🔸फब्रुवारी 1920 टिळकांचा काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष...

🔸1 ऑगस्ट 1920-टिळकांचे मुंबई येथे निधन...


👉टिळकांविषयी शब्दगौरव:-

🔸"असे महापुरुष मरत नसतात.त्यांच्या कार्याच्या रुपाने ते अमर झालेले असतात"- महात्मा गांधी...

🔸"राष्ट्रीय चळवळीचा मनू"-न.र.फाटक...

 🔸"लोकमान्य" ही पदवी तसेच "टिळक हे भारतीय नेपोलियनच"-शिवराम परांजपे

🔸"टिळक म्हणजे सूर्याचे पिल्लू"-केरूनाना छत्रे (टिळकांचे शिक्षक).

१६ मार्च २०२४

आचार्य विनोबा भावे



जन्म - 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).
मृत्यू - 11 नोव्हेंबर 1982.

🔰 आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.
🔰 भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.

संस्थात्मक योगदान :

📌 1921 - वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.
संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.
📌 18 एप्रिल 1951- भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.
📌 कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.

आचार्य यांचे लेखन :

📌 1923-महाराष्ट्र धर्म मासिक.
📌 गीताई - भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.
📌 मधुकर(निबंधसंग्रह)
📌 गीता प्रवचने.
📌 'स्वराज्य शस्त्र' हा ग्रंथ.
📌 विचर पोथी.
📌 जीवनसृष्टी.
📌 अभंगव्रते.
📌 गीताई शब्दार्थ कोश.
📌 गीताई - धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.

वैशिष्टे :

🎇 वयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.
🎇 गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.
🎇 चबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.
🎇 मगरौठ - उत्तरप्रदेश येथे 'सब भूमी गोपाल की' हा नारा दिला.
🎇 'जय जगत' घोषणा

१२ मार्च २०२४

नारायण मेघाजी लोखंडे

नारायण मेघाजी लोखंडे (१८४८-१८९७)
जन्म: ८ फेब्रुवारी १८४८
मृत्यू : ९ फेब्रुवारी १८९७ प्लेगमुळे (ठाणे)

✍मूळ गाव : कव्हेरसर ता. सासवड जि. पुणे फुलमाळी शेतकरी कुटूंब पत्नी गोपिकाबाई, मुलगा गोपीनाथ
✍अतिशय गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

✍सुरूवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात नोकरी केली. नंतर मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.
मांडवी येथे नोकरी करत असताना तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले. त्यांना आठवड्याची सुट्टी नसे परिणामी त्यांनी नोकरी सोडून स्वतः कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.
✍१८७३ लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे निष्ठावंत सहकारी.
✍१८७५ मुंबईतील कापडगिरणीच्या कामगारांच्या आंदोलनामुळे ब्रिटीश सरकारने कामगारांच्या स्थितीचा व त्यात सुधारणा करण्यासाठी आयोग नेमला.
✍१८८० दीनबंधू सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र मुंबईमध्ये पुन्हा सुरू केले.
१८८१ इंग्रज सरकारला कारखाना कायद्यात सुधारणा करणे भाग पाडले. चार भरपगारी महिन्यातून सुट्ट्या कामगारांना मिळू लागल्या.
✍१८८३ टिळक व आगरकरांची बर्वे प्रकरणात सुटका झाल्यावर त्यांचा सत्कार केला.
✍१८८४ दुसरा कामगार कायदा आयोग नेमण्यात आला. या अयोगामुळे कामगारांच्या स्थितीत सुधारणा घडल्या नाहीत.
✍सप्टेंबर १८८४ पहिली मोठी कामगार परिषद मुंबई येथे भरवली. (५५०० कामगारांचे लेखी निवेदन पाठवले.)
✍️ १८९० मुंबई गिरणी कामगार संघ नावाची देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. (बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन)
१० जून १८९० पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली.
✍१८९१ कामगार कायदा संमत करून त्यात लोखंडे यांच्या काही सूचनांचा समावेश केला.
✍१८९१ ब्रिटीश सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन (J. P. Justice of Pience) हा किताब दिला.
✍ १८९३-९४ मुंबईतील हिंदू-मुस्लीम दंगल मिटवण्यात मोठी भूमिका त्यामुळे सरकारने रावबहादूर ही पदवी बहाल केली.
✍ते निर्भिड वक्ते, झुंझार लेखक, संपादक, मुद्रक होते.
✍लोखंडे हे महात्मा फुलेंच्या सत्याशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते.
भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळख.
✍• प्लेग ग्रस्तांसाठी मराठा हॉस्पिटल काढले.
पंचदर्पण हे पुस्तक व गुराखी हे दैनिक काढले.
✍ सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांच्या समस्या यांना दीनबंधूतून वाचा फोडली
✍. • मृत्यू ९ फेब्रुवारी १८९७ (प्लेगमुळे ठाणे)

११ जानेवारी २०२४

महादेव गोविंद रानडे



जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू - 16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 - सामाजिक परिषद.

1890 - औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :


1865 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.

1867 - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.

1870 - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.

उद्दीष्ट - थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.

वकृत्वोत्तेजक सभा - पुणे.

नगर वचन मंदिर - पुणे.

1875 वसंत व्याख्यान - माला (पुणे).

1882 - हुजूरपागा शाळा (पुणे).

31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.

1896 - हिंदू विडोज होम.

इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .

मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.

पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.

1889 - Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :


इंदु प्रकाश (मासिक).

एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.

1874 - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.

1888 - ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.

मराठी सत्तेचा उदय.

मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

निबंध - प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.

'तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य' हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये :

ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.

भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.

1873 - 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.

पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.

संमतीवय विधेयकास पाठिंबा.

इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.

दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.

'महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.' टिळकांचे मत.

०५ जानेवारी २०२४

अण्णाभाऊ साठे


 (१ ऑगस्ट १९२०–१८ जुलै १९६९). 


🔸कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. 


🔸मळ नाव तुकाराम

🔸जन्मस्थळ वाटेगाव 

(ता.वाळवा; जि. सांगली )

🔸तयांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले


🔸परभाव - 

अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स यांचे साहित्य वाचून मिळाली.


🔸 मबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले


🔸 वाटेगावात बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभाग ,अटक 


🔸तयांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. 


🔸तयांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली


🔸‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.


🔸सयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील अण्णाभाऊ साठेंचं योगदान मोठं आहे. आपल्या शाहिरीतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ज्योत पेटती ठेवली. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.


👉मोरारजी देसाई सरकारने त्यांच्या ‘माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची?’ या नाटिकेवर बंदी आणली होती. मात्र अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बंदी झुगारत तिचे प्रयोग सुरूच ठेवले आणि महाराष्ट्र पेटता ठेवला. ‘माझी मैना’ हे गाजलेलं गीत लिहून अण्णाभाऊंनी मुंबईबद्दलच्या सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.


🔸'लोकयुद्ध' साप्ताहिकात - वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले.


🔸‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. 


🔸अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.


🔸तयांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले 

🎬 वजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता )

🎬टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी )

🎬डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ )

🎬मरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ )

🎬वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ )

🎬अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज )

🎬फकिरा (कादंबरी फकिरा ).


🔸इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.


👉तयांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २७ परकीय भाषांत भाषांतरे


🔸पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ( 1958,मुंबई )

" पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या व कामगारांच्या तळहातावर तरली आहे" असे त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितले


🔸मार्क्सवादी पक्षाच्या

 "Indian People's Theater Association"(IPTA) या सांस्कृतिक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले.


🔸रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली कॉ.श्रीपाद अमृत डांगे यांच्याबरोबर मॉस्को(रशिया) दौरा.

 तेथील अनुभवांवर आधारित "माझा रशियाचाप्रवास" हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.


🔸 ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला


🔸आपल्या लेखनाबद्दल

 'मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो तेच लिहितो, मला कल्पनेचे पंख लावता येत नाहीत, त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो' अशी स्वतःबद्दल अण्णाभाऊ साठे यांनी प्रांजळ कबुली दिली आहे.


🏵गौरवोद्वार

११ ऑक्टोबर २०२३

वि.दा. सावरकर विषयी माहिती

▪️वि.दा. सावरक यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.

▪️प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी

▪️विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.

▪️1900 रोजी पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.

▪️1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.

▪️‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.

▪️वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.

▪️सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.

▪️1908 – सावरकरांच्या घरावर धाड गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.

▪️अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.

▪️न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.

▪️1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.

▪️वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.

१९ ऑगस्ट २०२३

महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले :



मूळ आडनाव – गोह्रे

जन्म – 11 मे 1827

मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890


1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.


उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. जीवन परिचय :


आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.


शिक्षण:


फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.

परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.

अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.


विवाह:


महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.

त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.


पुढील शिक्षण :


इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.


संस्थात्मक योगदान :


3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.

1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.

10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.

व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.

1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :


1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

1868 - 'ब्राम्हणांचे कसब'

1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.

1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.

1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.

1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

अस्पृश्यांची कैफियत.

शिवाजी महाराजांचा पोवाडा. 

वैशिष्ट्ये :


थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.

1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.

2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.

ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.

सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

११ जून २०२३

धोंडो केशव कर्वे



जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.
मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.
1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.
1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

◽️ कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.
◾️ सत्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.
◽️ विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :

📌 1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.
📌 1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.
📌 1907 - हिंगणे महिला विद्यालय.
📌 1910 - निष्काम कर्मकठ.
📌 1916 - महिला विद्यापीठ, पुणे.
📌 1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.
📌 1 जानेवारी 1944 - समता संघ.
📌 1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.
📌 1948 - जातींनीर्मुलन संघ.
📌 1918 - पुणे - कन्याशाळा.
📌 1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :

📌 मानवी समता - मासिक.
📌 1893 - विधवेशी पुनर्विवाह.
📌 1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.
📌 1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.
📌 1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.
जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.

🔳 'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

१६ मार्च २०२३

विठ्ठल रामजी शिंदे :



जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.
मृत्यू - 2 जानेवारी 1944.
1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.
'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.
जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.
अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.
संस्थात्मक योगदान :

1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.
18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.
1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.
द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने 'सेवा सदन' ही संस्था.
अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.
23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.
1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.
1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.
1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.
1923 - तरुण ब्रहयो संघ.
1937 - बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.
वृद्धंनसाठि संगत सभा.
लेखन :

प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.
1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.
1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.
Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.
Untouchable India,
History Of Partha,
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .
वैशिष्ट्ये :

शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.
अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.
1904 - मुंबई धर्म परिषद.
1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.
1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.
1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.
1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.
स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.
शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.

०३ मार्च २०२३

कर्मवीर भाऊराव पाटील



बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहीरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.


पुढील काळात ते सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मद्वान्नामास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातीधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.


दिनांक ४ ऑक्टोबर, १९१९ रोजी कर्मवीरांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही उद्दिष्टे होती -

मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना शक्यतो मोफत शिक्षण देणे.
निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान, उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आयुष्यभर अमाप कष्ट केले. केवळ क्रमिक शिक्षण नव्हे तर, समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.


सातार्‍यात त्यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचे दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. १६ जून, १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.


भाऊरावांनी देशातलं ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वानुसार चालणारे पहिले ‘फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली कर्मवीरांनी सातार्‍यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कर्‍हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.  शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची वानवा पडू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावानं ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीरांच्या डोळ्यासामेर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


१९५९ साली त्यांना पुणे विद्यापीठाकडून ‘डी.लिट्’ पदवी बहाल करण्यात आली. भारत सरकारनेही ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृती भवन - यांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या -शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणार्‍या- आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, १९५९ रोजी मालवली.

२१ फेब्रुवारी २०२३

गाडगे महाराज




गाडगे महाराज (जन्म: फेब्रुवारी २३, १८७६- मृत्यु: २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

बालपण :
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.
डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा :
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

संक्षिप्त चरित्र :-
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]
आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :
१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

गाडगेबाबांचे विचार :
एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ?

त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."

गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :
The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)
श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)
श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)
श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)
संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

संकीर्ण :
डेबू हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.
देवकीनंदन गोपाळा हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.

पुरस्कार :
गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...