१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला.
- सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील कामगार शक्ती निर्देशक (CWS):
१. अखिल भारतीय कामगार दल सहभाग दर (LFPR): ५६.२% वर स्थिर राहिला.
२. कामगार लोकसंख्या प्रमाण (WPR): अखिल भारतीय WPR ५३.५% वर जवळजवळ अपरिवर्तित राहिला.
३. बेरोजगारी दर (UR): अखिल भारतीय बेरोजगारी दर ५.०% वरून ४.९% पर्यंत घसरला.
२. नवीन पांबन पूल.
- रामेश्वरम आणि भारताच्या मुख्य भूमीमधील संपर्क वाढवणारा भारतातील पहिला उभ्या लिफ्ट रेल्वे सागरी पूल.
- रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे डिझाइन.
- जुन्या पांबन पुलाचे बांधकाम १९११ मध्ये सुरू झाले आणि १९१४ मध्ये वाहतुकीसाठी खुले करण्यात आले . हा भारतातील पहिला समुद्री पूल होता.
३. जगातील पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन
-जपानमध्ये फक्त 6 तासांत बांधले.
- जगात प्रथमच, वेस्ट जपान रेल्वे कंपनीने अरीदा सिटीमध्ये 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले.
- नवीन हत्सुशिमा स्टेशन 1948 पासून अस्तित्वात असलेल्या जुन्या लाकडी रचनेच्या जागी बांधण्यात आले.
४. महाराष्ट्र.
-' ई-कॅबिनेट’ असणारे महाराष्ट्र सातवे राज्य
- उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि त्रिपुरा यांच्यानंतर ‘ई-कॅबिनेट’ प्रणाली लागू करणारे सातवे राज्य.
- ई-कॅबिनेट हे राज्य सरकारांना इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन पद्धतीने कॅबिनेट बैठका आयोजित करण्यासाठी एक शक्तिशाली सॉफ्टवेअर.
- एनआयसीने विकसित केलेले, ते बैठकांमध्ये तंत्रज्ञानाचा जास्त वापर.