२९ मार्च २०२५

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या?

अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला.

ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न  भीमजी पारेख ता गुजराती व्यक्तीने केला.

क  हुगळी येथे बंगाली  भाषेचे व्याकरण 1778 ला छापले गेले.

वरीलपैकी कोणते विधान/ने  योग्य आहे/आहेत?

1  फक्त  अ

2  फक्त  ब  व क

3  फक्त  ब

4  वरील सर्व✅🙏


 1780 साली जेम्स हिकी याने दि बेंगोल गॅझेट नावाचे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले ते इंग्रजी भाषेतील......... होते?

1  दैनिक

2  साप्ताहिक✅🙏

3  मासिक

4  त्रैमासिक


 दि कलकत्ता गॅझेट कोणत्या साली सुरू करण्यात आले?

1    1782

2    1784✅🙏

3    1781

4    1783


 वृत्तपत्र व साल याबाबतची  अयोग्य जोडी ओळखा?

अ   दि बॉम्बे कुरियर   1790

ब   दि बॉम्बे  गॅझेट    1792✅

क  द कलकत्ता क्रॉनिकल  1786

ड  द मद्रास कुरियर   1788


अ.  1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली

ब.  1824 ला भारतीय सुती  कापडाच्या आयातीवर 67.5 टक्के इतका कर आकारला जात होता

क  भारतीय मलमलीच्या कापडावर 35% इतका कर आकारला जात होता 

वरील पैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा?

1 फक्त अ

2 फक्त ब

3. ब आणि क

4   फक्त क✅🙏


 कमिटी ऑफ सर्किट खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे,,?

A   विल्यम बेंटिक

B   लोर्ड कॉर्नवॉलीस

C   वॉरन हेस्टींग✅🙏

D   लॉर्ड क्लाइव्ह


 सर सय्यद अहमद खान यांना सर ही पदवी कोणी बहाल केली?

1 मुस्लिम जनता

2 मुस्लिम खलिफा

3 ब्रिटिश प्रशासन✅🙏

4. यापैकी नाही


हेन्री डेरोझिओ यांच्या विषयी खालील विधाने विचारात घ्या?

अ. ते पुरोगामी विचाराचे होते.

ब. ते महिलाच्या हक्कांचे पुरस्कर्ते होते.

वरीलपैकी योग्य असलेली विधाने कोणती ?

1. फक्त अ

2. फक्त ब

3. फक्त अ आणि ब✅🙏

4. वरीलपैकी एकही नाही


 हेन्री डेरोझिओ यांनी सुरु केलेली तरुण बंगाल चळवळ विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले.

ब. ही चळवळ राजा राममोहन राय यांच्या पेक्षाही आधुनिक आहे.

1. फक्त अ

2. फक्त ब✅🙏

3. फक्त अ, ब

4. दोन्ही नाहीत


 तत्त्वबोधिनी सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली ?

1. राजाराम मोहन राय

2. द्वारकानाथ टागोर

3. देवेंद्रनाथ टागोर✅🙏

4. रवींद्रनाथ टागोर


तत्त्व बोधिनी पत्रिका” हे खालीलपैकी काय होते ?

1. बंगाली मासिक✅🙏

2. बंगाली साप्ताहिक

3. संस्कृत मासिक

4. संस्कृत साप्ताहिक


 खालीलपैकी कोणते पुस्तक देवेंद्रनाथ टागोर यांनी लिहिले ?

अ. ब्रम्ह धर्म

ब. ब्राम्हो धर्म  विजम

1. फक्त अ

2. फक्त ब

3. फक्त अ, ब✅🙏

4.  दोन्ही नाहीत


 नियामक कायदा १७७३ विषयी खालील विधाने विचारात घ्या.

अ. बंगालच्या गव्हर्नरला “बंगालचा गव्हर्नर जनरल” बनविण्यात आले.

ब. त्याला मदत करण्यासाठी पाच सदस्यीय “कार्यकारी परिषद” बनविण्यात आले.

1. फक्त अ✅🙏

2. फक्त ब

3. फक्त अ, ब

4. दोन्ही नाहीत



*वेद भाष्य भूमिका हा ग्रंथ कोणी लिहिला?*

*उत्तर स्वामी दयानंद सरस्वती*

🦋


जैन तत्वज्ञानाचा असा दावा आहे की जग निर्माण आणि राखून ठेवलेले आहे?

अ) सार्वभौम कायदा.🍫🍫

ब) सार्वभौम सत्य.

क) सार्वभौम विश्वास.

ड) सार्वभौमिक आत्मा.



प्रश्न 1.अलेक्झांडर ने जेव्हा प्राचीन भारतावर आक्रमण केले त्यावेळी मगध साम्राज्यचा राजा कोण होता?

1)चंद्रगुप्त मौर्य

2)महापदमानंद

3)धनानंद✅✅

4)कालअशोक



2.तुघलक वंशाचा संस्थापक कोण?

1)मोहम्मद तुघलक✅✅

2)फिरोज तुघलक

3)जल्लाउद्दीन तुघलक

4)गाझी मलिक


खालील पैकी कोणत्या राजाने गंगैकोड हे बिरुद स्वतःस लावून घेतले?

1)पहिला राजराजा

2)दुसरा राजराजा

3)पहिला राजेंद्र✅

4)दुसरा राजेंद्र


4.चंद्रगुप्ताने धनानंदचा कसा पराभव केला याचे सविस्तर वर्णन कोणत्या ग्रंथात आहे?

1)इंडिका

2)अर्थशास्त्र

3)मुद्रा राक्षस✅

4)यापैकी नाही


5 सिंधू संस्कृतीतील अति दक्षिणेकडे असलेले ठिकाण कोणते?

1)उज्जैन

2)लोथल

3)आलमगिरपूर

4)दायामाबाद✅



6 गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामध्ये आहे?

1)ऋग्वेद✅✅

2)यजुर्वेद

3)सामवेद

4)अथर्ववेद



7 खालील विधाने पाहा.

अ)युआन श्वान्ग हा यात्री चंद्रगुप्त द्वितीय च्या काळात भारतात आला होता

ब)फाहिआण हा यात्री हर्षवर्धन च्या काळात भारतात आला होता


M)फक्त अ बरोबर ब चूक.

P)फक्त ब बरोबर अ चूक

S)दोन्ही विधाने बरोबर✅✅

C)दोन्ही विधाने चूक.



8.राज्याचे सप्ताअंग हा सिद्धांत कोणी दिला आहे?


1)समुद्रगुप्त

2)मॅगेस्थिनस

3)चंद्रगुप्त

4)विष्णुगुप्त✅



खालील महाजनपदांचा उत्तेरकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.

A. कंभोज B. गांधार C. अश्मक D. अवंती

1)A,B,C,D

2)A,B,D,C✅

3)B,A,D,C

4)B,A,C,D


कोणत्या युद्धाने दिल्लीच्या सुल्तानशाहीचा आरंभ झाला?

ऊत्तर= तराई चे द्वितीय युद्धाने


तराई चे पाहिले युद्ध कधी व कोनाकोणामध्ये झाले?

उत्तर = 1191

            पृथ्वीराज चौहान (विजयी) वि मोहम्मद घोरी (पराभूत)


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


शिक्षण हा समाज क्रांतीचा पाया आहे, असे कोण म्हणाले???


A】 कर्मवीर भाऊराव पाटिल🎂🎁

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


शाक्य दंडपाणी आणि यशोधरा यांचे नाते काय???

A】 सासरा - सुन

B】 मित्र - मैत्रीण

C】 भाऊ - बहिण

D】 बाप - मुलगी🎂



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भागवत गीता म्हणजे दूसरे तिसरे काही नसून बौद्धांच्या धर्म ग्रंथातील चोरी आहे असे कोणी म्हटले???

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर🎂

D】 शाहू महाराज

 

🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁



विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचे एम.ए चे शिक्षण केंव्हा पूर्ण झाले???

A】 १९१४

B】 १९१५🎂

C】 १९१६ 

D】 १९१७


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भगवान बुध्द यांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली???

A】 पाच🎂

B】 दोन

C】 सात

D】 तीन


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


मुक्ता साळवे ही कोणाची विद्यार्थिनी होती???

A】राष्ट्रपिता फुले

B】 केळूसकर गुरूजी

C】 सावित्रीआई फुले🎂

D】 फातिमा शेख


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


१०】 शहाजी राजे यांच्या वडिलांचे नाव काय???

A】 रामजी

B】 संताजी

C】 लहुजी

D】 मालोजी🎂


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


पुणे करार केंव्हा झाला ?

 24 सप्टेंबर 1932




Police Bharti

#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक


#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी


#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम


#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली


#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश


#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित


#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट


#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? -  हर्षवर्धन 


#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय


#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन


#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी


#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र


#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा


#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त


#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी


#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य


#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर


#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा


#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्‍या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान


#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क


#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी


#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध


#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर


#43. ​​'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद


#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन


#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर

आर्य


◾️जवळपास 4000 वर्षापूर्वी वायव्येकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या. 


◾️या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते. 


◾️आर्यांनी सिंधू / हडप्पा संस्कृतीवर हल्ला करून नवी आर्य संस्कृती स्थापन केली


◾️या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत. 


◾️गुरे ही त्यांची संपत्ती होती. 


◾️ सिंधु नदी ही त्याच्या इच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली. 


◾️त्यानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या. 


◾️आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या. 


◾️आर्य लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली. 


◾️त्यांच्या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय. 


◾️आर्यांनी चार वेद लिहिले

1)........

2)........

3)........

4)........


◾️आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते. 


◾️ वैदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.


◾️ आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला. 


◾️ जनावरे  ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सिंधुच्या खोर्‍यात स्थायिक झाले. 


◾️ हे टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे. 


◾️यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.


◾️सिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली. 


◾️म्हणून या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.


◾️देशाला सद्या 4 नावांनी ओळखले जाते. 

भारत, India, आर्यावर्त, हिंदुस्थान


Decline of Mughal power – मुघल सत्तेचा ऱ्हास

● पार्शभूमी

● १२ च्या शतकाच्या अखेरीस घुरचा महमूद (Mahamud of Ghur) याने भारतावर हल्ले केले. त्यांच्या परिणामस्वरूप सन १२०६ मध्ये त्याचा गुलाम कुत्बुद्दिन ऐबक याने ‘दिल्ली सल्तनत’ (Delhi Sultanate) ची स्थापना केली.

● सन १२०६ ते १५२६ दरम्यान दिल्ली सल्तनतच्या पाच घराण्यांनी राज्य केले: गुलाम घराणे, खल्जी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे व लोधी घराणे. तुघलक घराण्याच्या हासानंतर १४ व्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेत बहमनी राज्य (१३४७ ते १५ व्या शतकाची अखेर) व विजयनगर साम्राज्य (१३३६ ते १६ व्या शतकाची अखेर) या राज्यांची निर्मिती झाली.


● पुढे १५ व्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्याचे तुकडे होऊन पाच राज्यांची निर्मिती झाली: अहमदनगरची निझामशाही (१४९०-१६३३), विजापूरची अदिलशाही (१४९०१६८६), व-हाडची इमादशाही (१४९०- १५७४),गोवळकोंड्याची कुतुबशाही (१५१८-१६८७), व बिदरची बारिदशाही (१५२८-१६१९).

● पानिपतच्या पहिल्या युद्धात (१५२६) दिल्लीचा सुलतान इब्राहिम खान लोधी याचा पराभव बाबरने केला. (बाबर हा मध्य आशियातील समरकंदचा शासक होता, मात्र पराभवामुळे त्याला राज्य गमवावे लागले होते. त्यामुळे त्याला दक्षिणेकडे २ स्थलांतर करावे लागले. त्याने प्रथम काबूल काबीज करून
नंतर भारतावर स्वारी केली.) अशा रितीने बाबरने भारतात मुघलांची सत्ता प्रस्थापित केली. बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून (१५३०-४० व १५५५-५६) याने राज्य केले.मुघल साम्राज्याचा खरा विस्तार अकबर (१५५६-१६०५),जहांगीर (१६०५-२७), शहाजहान (१६२७-५८) व औरंगजेब (१६५८-१७०७) यांच्या काळात घडून आला.त्यामुळे औरंगजेब पर्यंतच्या मुघल बादशाहांना ‘साम्राज्यवादी मुघल’ (Imperial Mughals) असे म्हणतात.

● औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर (१७०७) मात्र मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. औरंगजेबानंतरच्या बादशाहांना ‘उत्तर मुघल’ (Later Mughals) म्हणतात. १८५७ च्या उठावापर्यंत मुघल बादशहांनी दिल्लीहून राज्य केले, मात्र ते केवळ नावाचेच ‘बादशाह’ होते. त्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेश सतत कमी होत गेला. शाहआलम दुसरा तर ‘निर्वासित बादशाह’ (fugitive emperor) होता,
त्याला महादजी शिंदेंनी दिल्लीच्या गादीवर पुन्हा प्रस्थापित (reinstate) केले.

● औरंगजेबानंतरच्या मुघल बादशाहांबद्दल थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे:

◆ १)बहादूर शाह पहिला (१७०७-१२)

● औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल गादीसाठी त्याच्या तीन मुलांमध्ये झालेल्या युद्धानंतर बहादूर शाह बादशाह बनला. सत्तेवर ते आल्यावर त्याने शाहआलम पहिला हे नाव धारण केले.

● त्याच्या काळात शिखांबरोबर समझौता होऊन गुरू गोविंद सिंह यांना मुघल सेवेत घेण्यात आले. मात्र ही युद्धबंदी तात्पुरती ठरली. गुरू गोविंद सिंह यांच्या मृत्यूनंतर (१७०८) शिखांनी बंदा बहादूरच्या नेतृत्वाखाली मुघलांविरूद्ध बंड केले.

● बुदेला व जाट यांबरोबरही मुघलांचा समझौता होऊन त्यांचे प्रमुख अनुक्रमे छत्रसाल व चुडामण यांना मुघल सेवेत घेण्यात आले.

● बहादूर शाहाने छ. शाहू राजांना (संभाजी महाराजांचा पुत्र) कैदेतून मुक्त केले. शाहू राजे महाराष्ट्रात परतल्याने ताराबाई व शाहू यांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले.

◆ २)जहांदर शाह (१७१२-१३)

● बहादूर शाहाच्या चार मुलांमध्ये गादीसाठी झालेल्या संघर्षात जहांदर शाह यशस्वी ठरला. झुल्फिकार खान या मुघल सरदाराने (nobles)किंग-मेकर म्हणून कार्य कगागात्ती हाशा केलेल्या मदतीने तो गादीवर आला.

◆ ३)फारूक सियार (१७१३-१९)


•फारूक सियार सय्यद बंधू (अब्दुल्ला खान व हुसून अली) या सरदारांच्या मदतीने गादीवर आला. अब्दुल्ला खानला वझीर तर हुसेन अलीला मीर बक्षी बनविण्यात आले. मात्र त्याचबरोबर बादशाह व सय्यद बंधू यांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. सय्यद बंधूंनी फारूकचा खून घडवून आणला व बहादूर शाहचा नातू रफी-उद-दरजत याला बादशाह बनविले. मात्र त्याला लवकरच मृत्यू झाला.

● फारूक सियारच्या काळात शिखांचा नेता बंदा बहादूर यास पकडण्यात आले व मारण्यात आले.

● १७१७ चे फर्मान: १७१७ मध्ये फारुक सियारने फर्मान जारी करून ईस्ट इंडिया कंपनीला गुजराथ व दख्खनमध्ये व्यापारी विशेषाधिकार प्रदान केले.

◆ ४)मुहम्मद शाह (१७१९-४८)

● रफीच्या मृत्यूनंतर सय्यद बंधूंच्या मदतीने मुहम्मद शाह गादीवर आला. १७२० मध्ये इतर सरदारांनी सय्यद बंधूंविरूद्ध कट रचून त्यांचा खून घडवून आणला.

● ऐशोआराम व राज्य कारभाराकडे दुर्लक्ष यांमुळे मुहम्मद शाहला (मुहम्मद शाह ‘रंगिला असे नाव पडले. त्याच्या काळात १७३८ मध्ये पहिल्या बाजीरावाने दिल्लीवर हल्ला करून दिल्लीत प्रवेश केला.

● मुहम्मद शाहच्या काळातच हैद्राबाद, अवध व बंगाल ही प्रादेशिक स्वायत्त राज्ये निर्माण झाली. मुघलांच्या सेवेत असलेल्या सरदारांनी/सुभेदारांनी मुघलांपासून विभक्त होऊन त्यांची स्थापना केली.

● १७३८-३९ मध्ये अफगाणिस्तानचा शासक नादीर शाह याने भारतावर हल्ला केला व दिल्लीची कठोरपणे लूट केली. त्याने मुघलांकडून सिंधू नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश काढून घेतला. तसेच नादीर शाहने मुघलांकडून कोहीनूर हिरा, मयुरासन (Peacock Throne) व इतर मौल्यवान वस्तू बळकावल्या.

◆ ५)अहमद शाह (१७४८-५४)

● अहमद शाहच्या काळात अहमद शाह अब्दालीचे
(अफगाणिस्थानचा शासक व नादीर शाहचा पूर्वीचा जनरल) भारतावरील हल्ले. सुरू झाले. अहमदशाहाचा वझीर इमादउल-मुल्क याने त्यास आंधळे बनवून आलमगीर दुसरा यास गादीवर बसविले.

◆ ६)आलमगीर, दुसरा (१७५४-५९)

● त्यास १७५९ मध्ये त्याचा वझीर इमाद-उल-मुल्क याने ठार केले.

◆ ७)शाहआलम, दुसरा (१७५९-१८०६)

● तो आलमगीर, दुसरा याचा मुलगा होता. सत्तेवर आल्यावरही १२ वर्षे तो त्याच्या वझीराच्या भितीमुळे आपल्या राजधानीत राहत नव्हता.

● १७६४ मध्ये बक्सरच्या लढाईत मीर कासीम व शुजा उद्दौल्ला यांच्या बरोबर शाहआलम पराभूत झाला. १८०३ मध्ये इंग्रजांनी दिल्लीवर कब्जा मिळविला व शाहआलमला अटक केला.
जारी इंग्रजांच्या कैदेतच त्याचा १८०६ मध्ये मृत्यू झाला.

◆ ८)अकबर, दुसरा (१८०६-३७)

● अकबर, दुसरा याने राम मोहन रॉय यांना राजा’ ही पदवी देऊन त्यांना इंग्लंडला पेन्शन वाढीसाठी स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पाठविले.

◆ ९)बहादूरशाह जफर, दुसरा (१८३७-६२)

● हा शेवटचा मुघल बादशाह ठरला. १८५७ च्या उठावानंतर त्याला १८५८ मध्ये रंगूनला हद्दपार करण्यात आले, जेथे त्याचा १८६२ मध्ये मृत्यू झाला. बादशाह बहादूरशाह जफर हा उच्च प्रतिभेचा कवी होता. त्याने आपल्या व्यथा ‘गझलां’मधून नोंदवून ठेवल्या आहेत. रंगूनच्या तुरुंगात अत्यंत दयनीय जीवन जगणारा हा कविमनाचा बादशाह उद्याच्या आपल्या दशनीय मृत्यूचे उद्धस्त चिंतन करतांना म्हणतो,
“कितना है बदनसीब जफर दफन के लिये
दो गज जमीन भी न मिली कोई यार में”
(अरे जफर किती दुदैवी आहेस, तुला तुझ्या आप्त, मित्रांच्या साक्षीने तुझ्या मातृभूमीत तुला पुरण्यासाठी दोन हात जमीनदेखील नाही.)

Mpsc pre exam samples question


1) सिंधू संस्कृतीतील लोकांनी _______ पाळलेला होता किंवा नाही या बद्दल शंका आहेत.

 A. कुत्रा

 B. घोडा✍️

 C. हत्ती

 D. ऊंट.

____________________________

2) कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते ?

विशेषतः भारतात, सुखवस्तू कुटुम्बाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते.”

 A. जवाहरलाल नेहरू✍️

 B. मोहनदास करमचंद गांधी

 C. नसीरूद्दीन शहा

 D. जे.आर.डी. टाटा.

____________________________

3) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे

 A. अ, ब आणि क

 B. अ, क आणि ड

 C. अ, ब आणि ड

 D. अ, ब, क आणि ड. ✍️


____________________________

4) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

 A. फक्त अ

 B. फक्त ब✍️

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.

____________________________

5) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

 A. फक्त अ

 B. फक्त ब

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.✍️

____________________________

6) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

 A. 1 लीटर✍️

 B. 0.75 लीटर

 C. 0.50 लीटर

 D. 0.25 लीटर.

____________________________

7) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे

 A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते

 B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते

 C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️

 D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.

____________________________

8) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ________ .

 A. मंदावतो✍️

 B. वाढतो

 C. बदलत नाही

 D. खूप वेगाने वाढतो.

____________________________

9) नैसर्गिक रबर हा एक _________ चा पॉलिमर आहे.

 A. प्रोपीन

 B. आइसोप्रीन✍️

 C. फॉर्माल्डिहाइड

 D. फिनॉल.

____________________________

10) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

 A. ग्लुकोज

 B. फ्रक्टोज

 C. सुक्रोज✍️

 D. सेल्युलोज.



◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड हार्डिंग II ☑️


◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?

A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी ☑️
D. बल्बन

◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा
B.कावेरी☑️
C. नर्मदा
D. तुंगभद्रा


◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815
B. 1812
C. 1828 ☑️
D. 1830


 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

तैनाती फौज पद्धत (Subsidiary Force)

💥1. लॉर्ड वेलस्ली


०१. रिचर्ड वेलस्लीचा जन्म १७६० मध्ये झाला. तो इंग्लंडच्या संसदेचा सदस्य होता. कंपनीच्या नियंत्रण मंडळाचाही तो सदस्य होता. १७९८ मध्ये सर जॉन शोअर नंतर वेलस्लीला गवर्नर बनविण्यात आले.


०२. शांततेच्या धोरणाचा त्याग करीत वेलस्लीने सरळ सरळ युद्धनीतीचा अवलंब केला. शांततेच्या व अलिप्ततेच्या धोरणाचा कंपनीच्या शत्रुना फायदा मिळेल असे त्याचे मत होते. तत्कालीन इंग्लंड मंत्रीमंडळानेही वेलस्लीच्या धोरणाला पाठींबा दिला.


०३. मराठा प्रदेशावर विजय म्हणजे भारतीय जनतेवर उपकार आहे असे वेलस्लीचे मत होते. इंग्रजांच्या कल्याणकारी सत्तेचे वर्चस्व मराठे का मान्य करीत नाहीत हे वेलस्लीला न उलगडलेले कोडे होते. स्वतःच्या धोरणाला न्याय्य, तर्कसंगत, संयमी व शांत अशी विशेषणे लाऊन वेलस्ली मराठ्यांच्या राजकारणाला 'विकृत, कारस्थानी व कपटी अशी संभावना करत होता.

2. तैनाती फौज पद्धत (Subsidiary Force)


०१. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली. १७४८४९ मध्ये डूप्ले व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने डूप्लेला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.


१८ व्या शतकाच्या अखेरच्या काळात शांततामय वातावरण निर्माण झाले तर इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर तयार झालेले अतिरिक्त उत्पादन भारताच्या बाजारात खपवता येईल असा ब्रिटीश व्यापाऱ्यांचा कयास होता. यासाठी कंपनीने तीन मार्ग अवलंबिले. थेट युद्ध पुकारणे व पूर्वी अंकित केलेल्या प्रदेशावरील आपली पकड मजबूत करणे. यासोबतच तैनाती फौज पद्धत त्यापैकी एक होती.


०२. वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती. पण वेलस्लीने भारतात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय संस्थानिकांना ब्रिटिश अंमलाखाली आणले व भारताचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले.


०३. वेलस्लीने प्रथम निजामाकडची फ्रेंच फौज काढून टाकण्यास सांगून त्या जागी इंग्रज फौज ठेवून तैनाती फौजेच्या योजनेला मूर्त स्वरूप दिले. पुढे त्याने या योजनेची सक्ती केली व जे एतद्देशीय संस्थानिक फौज ठेवून घेणार नाहीत, अशांबरोबर काहीतरी निमित्त काढून युद्धे केली.


०४. आल्फ्रेड लायलने भारतीय युद्धात कंपनीच्या भाग घेण्याबाबत चार अवस्था सांगितल्या आहेत.


* आपल्या भारतीय मित्रांना युद्धात मदत करण्यासाठी कंपनी आपली फौज किरायाने पाठवत असे. ह्याअंतर्गत १७६८ मध्ये निजामाशी तह झाला होता.


* आपल्या मित्रांच्या मदतीने कंपनी स्वतःच युद्धात भाग घेऊ लागली


* कंपनीची मित्रराज्ये कंपनीला सैनिकाऐवजी पैसा पुरवू लागली. ज्याच्या आधारावर कंपनीने इंग्रज अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सानिक भरती करून त्यांना प्रशिक्षण देऊन शस्त्रसज्ज करण्यास प्रारंभ केला. पुढे गरजेनुसार हेच प्रशिक्षित सैन्य मित्रराज्यांना देऊन त्याऐवजी कंपनी पैसा घेऊ लागली. उदा. १७९८ चा हैद्राबाद तह


* शेवटच्या अवस्थेत कंपनीने मित्रराज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पत्करून त्याकरिता तैनाती फौज त्या राज्यात ठेवणे सुरु केले. त्याऐवजी कंपनी पैसे न घेता त्या राज्यातून काही प्रदेश घेऊ लागली. १८०० मध्ये निजामाशी झालेला तह.


०५. सर्वप्रथम प्रयोग १७६५ मध्ये अवधसोबत केला. यावेळी राजधानी लखनौत इंग्रज रेसिडेंट ठेवण्याचे अवधने मान्य केले. १७८७ मध्ये कंपनीने कर्नाटक नवाबाला विनंती केली कि त्याने इंग्रजान्शिवाय दुसऱ्या युरोपियन शक्तीशी संबंध ठेऊ नये.


०६. १७९८ मध्ये सर जॉन शोअरने अवधच्या नवाबाशी तह करताना अशी अट घातली कि नवाबाने इंग्रजांव्यतिरिक्त इतर युरोपियनांना सेवेत घेऊ नये व कोणताही संबंध ठेऊ नये.


०७. पैशाऐवजी प्रदेशाची मागणी करणे हा एक नैसर्गिक टप्पा होता. भारतीय राज्ये धन कबुल करीत असत पण त्यांची फेड न झाल्याने रक्कम वाढत जाई. म्हणून कंपनीने तैनाती फौजेचा खर्च म्हणून प्रदेशाची मागणी सुरु केली. ह्या प्रदेशावर कंपनीची सार्वभौम सत्ता प्रस्थापित होत असे.


०८. ब्रिटिशांनी आपल्या सहा बटालियन हैदराबादेत ठेऊन फ्रेंचांना हाकलून दिले. या फौजेचा खर्च म्हणून ब्रिटिशांनी २ लाख ४१ हजार ७१० पौंड निजामकडून वसूल केले. फौजेचा वाढता खर्च झेपेनासा झाल्याने निजामाने आपल्या संस्थानचा काही भाग ब्रिटीशांच्या हवाली केला.


3. तैनाती फौजेच्या अटी


०१. भारतीय राज्यांच्या परराष्ट्र संबंधावर कंपनीचे नियंत्रण राहील. दुसऱ्या राज्यांशी बोलणी, युद्ध वगैरे कंपनीच्या माध्यमातून होईल. संस्थानांनी परस्पर कोणतेही युद्ध करू नये व कुणाशीही परस्पर बोलणी करू नये. आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा.


०२. संस्थानिकांनी आपली स्वतःची फौज ठेऊ नये. त्याऐवजी राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी कंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल. ह्या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकाऱ्याच्या हातात राहील. त्याऐवजी ती राज्ये कंपनीला पूर्ण अधिकारयुक्त प्रदेश देईल. लहान राज्ये मात्र धन देत असत.


०३. ह्या राज्यांना आपल्या राजधानीत इंग्रज रेसिडेंट ठेवावा लागेल. तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रजच असावेत.


०४. कंपनीच्या परवानगीशिवाय राज्यांना दुसऱ्या युरोपियनांना सेवेत ठेवता येणार नाही.


०५. राज्याच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही.


०६. राज्याचे अंतर्गत व बाह्य शत्रूपासून कंपनी संरक्षण करेल.


4. तैनाती फौजेचे कंपनीला झालेले फायदे


०१. तैनाती फौज पद्धतीने साम्राज्य निर्मितीच्या प्रक्रियेत फितूर शत्रूसारखी भूमिका पार पाडली. कंपनीचे संरक्षण असल्याने भारतीय राज्ये दुर्बल बनली. हि पद्धती स्वीकृत केलेल्या राज्यात गवर्नर जनरल आपल्या प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहत असे. आता ही राज्ये आपसात विशेषतः इंग्रजांविरुद्ध कोणताही संघ बनवू शकत नसत.


०२. ह्यामुळे कंपनीला भारतीय राज्यांच्या खर्चात एक महान सैन्य उपलब्ध झाले.


०३. राज्यांच्या राजधानीत कंपनीचे सैन्य राहत असल्याने देशातील मोक्याच्या जागांवर कंपनीचे नियंत्रण प्रस्थापित झाले.


०४. ह्या पद्धतीमुळे कंपनीचे सैन्य आपल्या राजकीय सीमांच्या बराच दूर निघून गेले. परिणामी युद्ध झालेच तर त्याचा कोणताही आर्थिक भार कंपनीवर पडत नव्हता. तसेच युद्धक्षेत्र बरेच दूर असल्याने कंपनीचा प्रदेश सुरक्षित राहिला.


०५. तैनाती फौज पद्धतीमुळे कंपनीला वाटत असलेली फ्रेंचांची भीती नेहमीकरिताच नाहीशी झाली. कारण तहानुसार कोणतेही तैनाती फौज स्वीकारलेले राज्य कंपनीच्या अनुमतीशिवाय कोणत्याही युरोपियनाला सेवेत ठेऊ शकत नव्हते.


०६. राज्यांचे परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात आल्याने भारतीय राज्यांच्या भांडणात कंपनी मध्यस्थ बनली


०७. तैनाती फौजेच्या अधिकाऱ्यांना भरपूर वेतन मिळू लागले. तसेच ह्या राज्यातील इंग्रज रेसिडेंट अतिशय प्रभावशाली बनून कालांतराने राज्याच्या अंतर्गत कार्भाराठी हस्तक्षेप करू लागले.


०८. सार्वभौमत्वसंपन्न असा बराच प्रदेश कंपनीला मिळाल्याने कंपनीचे साम्राज्य वाढले. १७९२ आणि १७९९ मध्ये युद्धात म्हैसूरचा मिळालेला प्रदेश निजामाने १८०० मध्ये कंपनीला दिला. १८०१ मध्ये अवधच्या नवाबाने रोहिलखंड आणि दक्षिण दोआब प्रदेश कंपनीला देऊन टाकला.



तैनाती फौजेमुळे झालेली भारतीय राज्यांची हानी


०१. परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात गेल्याने भारतीय राज्ये आपले सार्वभौमत्व गमावून बसली. लष्करीदृष्ट्याही राज्ये दुर्बल बनली. परिणामी भारतीय राज्यांचे मानसिक बळ खच्ची झाले. त्यामुळे भारतीय राज्यांना अंततः ते अतिशय हानिकारक ठरले. प्रजेलाही त्याचा त्रास भोगावा लागला.


०२. राज्यांच्या दैनंदिन कारभारात इंग्रज रेसिडेंटचा हस्तक्षेप इतका वाढला कि प्रशासन चालविणे कठीण होऊन बसले.


०३. ही पध्दती स्वीकारलेली राज्ये लवकरच दिवाळखोर बनली. कंपनी या राज&##2381;यांच्या उत्पन्नाचा अंदाजे १ भाग घेत होती, पण ही रक्कम इतकी जास्त असे की बहुतेक राज्यांकडे रक्कम थकीत राहू लागली. इंग्रज लष्करी अधिकाऱ्यांचे वेतन प्रचंड होते आणि लष्करी साहित्य इतके महाग होते की राजांना आपल्या प्रजेवर मोठया प्रमाणावर कर लादणे भाग पडले.


०४. रक्कम देणे शक्य झाले नाही तर कंपनी राजाकडून त्याच्या राज्याच्या प्रदेशाची मागणी करीत असे. पण हा भूप्रदेश फार मोठा असे. वेलस्लीच्या कंपनीच्या संचालकांना एका प्रसंगी लिहिले की ४० लक्ष रु ऐवजी आम्ही ६२ लक्ष वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश मागितला आहे.


* तैनाती फौजेची ही पद्धत निजाम (१७९८ व १८००), म्हैसूर (१७९९), तंजावर (१७९९), सुरत (१७९९), बडोदा (१८००), कर्नाटक (१८०१), अवध (१८०१), पेशवा (१८०२), नागपूरचे भोसले (१८०३), शिंदे (१८०४), जोधपुर, जयपूर, मछेरी, बुंदी व भरतपूर या राज्यांनी स्वीकारली.


6. १८०० नंतर भारताच्या सीमा


०१. १८०५ मध्ये कंपनीचे नियंत्रण भारताच्या पश्चिम तटासह सिंधू नदीच्या मुखापासून कन्याकुमारीपर्यंत, बंगालची खाडी आणि ब्रह्मदेशच्या सीमेपर्यंत व तेथून थेट पंजाबपर्यंत होते. अवध, नागपूर, ग्वाल्हेर, इंदोर, बडोदा, हैद्राबाद, मैसूर , त्रावणकोर ही राज्ये कंपनीची संरक्षित राज्ये बनली होती.


०२. नाशिकपासून कोंकण किनारपट्टीसह कोल्हापूरपर्यंत पेशव्यांचे वर्चस्व, गुजरातमध्ये गायकवाड, मध्यभारतात होळकर व शिंदे आणि नागपूर भागात भोसले असा मराठ्यांचा प्रदेश होता.


०३. सतलज नदीच्या दोन्ही काठावर मिसल (म्हणजे शिखांची लहान लहान राज्ये) बऱ्याच मोठ्या प्रदेशावर होती. पंजाबमध्ये शक्तिशाली राजा म्हणून रणजीतसिंगचा उदय होत होता.


०४. मुलतान, सिंध, पश्चिम पंजाब आणि काश्मीरमध्ये मुसलमान सरदार राज्य करीत होते.


०५. वेलस्लीनंतर तटस्थ धोरणाचा पुरस्कार करणारा र्लॉड कॉर्नवॉलिस दुसर्‍यांदा भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला पण येथे लवकरच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागेवर सर बार्लो (१८०५-१८०७) हा गव्हर्नर जनरल म्हणून आला. त्याने शिंदे व होळकर यांच्याशी समझोत्याचे करार करुन त्यांचे काही प्रदेश परत केले.


०६. बर्लोनंतर र्लॉड मिंटो हा गव्हर्नर जनरल झाला (१८०७-१८१३) यानेही तटस्थतेचे धोरण स्वीकारले. याच्या कारकिर्दीतचत शिख राजा रणतिजसिंग याच्यांशी करार होऊन इंग्रजी राज्य व शीख राज्य यांच्यात सतलज नदी ही हद ठरविण्यात आली होती.


०७. याच सुमारास इंग्रज सरकारने १८१३ चा सनदी कायदा पास करुन कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आणली आणि र्बोड ऑफ कंट्रोल मार्फत इंग्रज सरकार कंपनीच्या कारभारावर अंतिम अधिकार गाजवेल असे जाहीर केले.


ब्रह्मपुत्र नदी



◆आशियातील ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. लांबी २,९०० किमी. पाणलोट क्षेत्र ९,३५,५०० चौ. किमी. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत सस. पासून ७,२०० मी. उंचीवर (८२० १०’ पू. रेखांश व ३०० ३१ ’ उ. अक्षांश) चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्रा उगम पावते.

◆हे उगमस्थान मानसरोवरापासून सु. १०० किमी. तर सिंधू नदीच्या उगमापासून सु. १६० किमी. अंतरावर आहे. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांतील उल्लेखांनुसार ब्रह्मपत्रेचा उगम मिचिनू पर्वतातल्या ब्रह्मकुंडातून झाल्याचे मानले जाते. कुबी, आंगसी व चेमा-युंगडुंग हे या नदीचे तीन शीर्ष प्रवाह होत.

◆भारतात ब्रह्मपुत्र महानद असाच या नदीचा निर्देश करण्यात येत असे. या नदीशी अनेक आख्यायिका निगडित असून त्या महाभारत कालिकापुराण कालिदासाचा रघुवंश यांसारख्या संस्कृत साहित्यातूनआढळतात. ‘लौहित्य’ (म्हणजे लाल रंगाची) असेही तिचे नाव असून परशुरामाने क्षत्रिय संहाराने रक्तरंजित झालेला परशू ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहात धुतल्याने तिचे पाणी लाल झाले, अशी एक आख्यायिका आहे.

◆आसाममधील आहोमांच्या राजवटीत रूढ असलेल्या आहोम भाषेत तिला ‘नाम-दाओ-फी’ म्हणजे ‘तारकांची नदी’ असे नाव होते. ‘बुलुम बुथुर’ म्हणजे बुडबुड्यांची नदी या तिच्या मूळ नावाचे संस्कृतीकरण होऊन ब्रह्मपुत्र हा शब्द बनला असावा. आसामी लोक अनेकदा ‘दर्याच’ म्हणून तिचा उल्लेख करतात.

◆ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये त्सांगपो (म्हणजे शुद्ध करणारी), भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखत असून तिबेटमध्ये तिला काही स्थानिक नावेही आहेत.

◆उगमानंतर ही नदी दक्षिणेकडील हिमालयाची मुख्य पर्वतश्रेणी व उत्तरेकडील नीएन-चेन-टांगला पर्वतश्रेमी यांच्यामधून हिमालयाच्या मुख्य श्रेणीला समांतर अशी पश्चिम-पूर्व देशेने वाहत जाते. तिबेट मधील ब्रह्मपुत्रा नदीचा एकूण प्रवाह सु. १,२९० किमी. आहे.

◆या भागातील पी ठिकाणापासून पुढे ती एकदम ईशान्यवाहिनी होऊन ग्याल परी व नामचा बारवा या पर्वतीय प्रदेशातील मोठमोठ्या खोल व अरुंद निदऱ्यांमधून उड्या घेत वाहू लागते. तेथे प्रवाहमार्गात अनेक द्रुतवाह व प्रपातमाला आढळतात. नंतर ती दक्षिणवाहिनी होऊन हिमालय पार करते व भारतात प्रथम सिआँग व पुढे दिहांग नावांनी प्रवेश करते. तिबेटमध्ये त्सांगपोला डावीकडून जो-का त्सांगपू (रागा त्सांगपो), ला-सा हो(चीचू), नि-यांग हो (ग्यामडा चू) तर उजवीकडून न्येन-चू हो (न्यांग) ह्या उपनद्या येऊन मिळतात. चीचू या उपनदीतीरावरच ल्हासा हे तिबेटच्या राजधानीचे ठिकाण आहे.

◆भारतात सदियाजवळ तिला दिबांग व लुहित या उपनद्या मिळाळ्यावर ती नैऋत्यवाहिनी होते व येथून पुढे ती ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. येथूनच तिचे पात्र विशाल होऊन त्यात अनेक बेटांचीही निर्मिती झाल्याचे आढळते. माजुली हे अंतर्गत मोठ्या बेटांपैकी एक बेट या नदीमुळेच निर्माण झाले आहे.

◆आसाममध्ये ब्रह्मापुत्रेचा एक फाटा खेरकुटिया नावाने ब्रह्मपुत्रेपासून वेगळा होतो. पुढे हा फाटा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या सुबनसिरी नदीसह धनसिरीच्या मुखासमोरच मूळ प्रवाहाला येऊन मिळतो. यामुळे ब्रह्मपुत्रेचा मूळ प्रवाह व तिचा खेरकुटिया हा फाटा यांदरम्यान माजुली या १,२५६.१५ चौ. किमी. क्षेज्ञाच्या बेटाची निर्मिती झाली आहे. ब्रह्मपुत्रेला भारतात उत्तरेकडून सुबनसिरी, भरेळी, मानस, चंपावती, सरलभंगा, कोपिली या उपनद्या येऊन मिळतात. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे ‘आसामचे खोरे’ म्हणून ओळखले जाते. या खोऱ्याची लांबी सु. ७५० किमी. व रुंदी सरासरी ८०
बांगला देशात प्रवेश करताच जमुनेला उत्तरेकडून तोरसा, जलढाका, तिस्ता या उपनद्या येऊन मिळतात. पुढे गायबांडच्या दक्षिणेस जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीपासून जुनी ब्रह्मपुत्रा हा नदीप्रवाह वेगळा होतो. हाच ब्रह्मपुत्रा नदीचा मूळ प्रवाहमार्ग होय. हा प्रवाहमार्ग जमालपूर व मैमनसिंगवरून आग्नेय दिशेने वाहत गेल्यावर पुढे भैरवबाझारजवळ मेघना नदीला मिळतो; तर जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीचा सध्याचा मुख्य प्रवाह दक्षिणेस वाहत जाऊन ग्वालंदोच्या उत्तरेस गंगा नदीला मिळतो. तत्पूर्वी जमुनेला बारल, अत्राई, हुरासागर यांचा संयुक्त प्रवाह उजवीकडून येऊन मिळतो.

◆तसेच धालेश्वरी व बडी गंगा या शाखा तिच्यापासून वेगळ्या होऊन स्वतंत्रपणे मेघना नदीला मिळतात. ग्वालंदोपासूनचा गंगा-जमुना यांचा संयुक्त प्रवाह पद्मा नदी म्हणून ओळखला जातो. पुढे पद्मा नदीला उत्तरेकडून मेघना येऊन मिळाल्यावर त्यांचा संयुक्त प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो. मेघना खाडीमधून व इतर उपप्रवाहांमधून ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.

◆एकोणिसाव्या शतकापर्यंत ब्रह्मपुत्रेच्या वरच्या टप्प्याविषयी अज्ञानच होते. किंबहुना त्सांगपो व दिहांग (ब्रह्मपुत्रा) ही एकच नदी आहे. या

पोलीस भरती प्रश्नसंच

 महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

उत्तर--नाशिक💐✅


 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? 

उत्तर----सातपुडा💐✅


महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर--यवतमाळ💐✅


 महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ? 

उत्तर---national highway 6 💐✅


स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? 

उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅

 

महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? 

उत्तर--नांदेड💐✅

 

छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली? 

उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅


महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? 

उत्तर--अमरावती💐✅

 

पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर--जुन्नर💐✅


पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? 

उत्तर---भीमा💐✅


 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?

उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅


 महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---

>>>36💐✅


महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

उत्तर ---- गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? 

उत्तर---गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?

उत्तर---अहमदनगर💐✅


संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?

उत्तर---अमरावती💐✅

 

भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर

--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅

 

यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?

उत्तर---प्रीतिसंगम💐✅

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? 

उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅

 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? 

उत्तर--कोयना प्रकल्प💐✅


 महाराष्ट्रातील मातीचे धरण ? 

उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅


 महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? 

उत्तर--औरंगाबाद💐✅


 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर---बुलढाणा💐✅


(०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

नदया व त्यांचे उगमस्थान:-



गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )

यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )

सिंधू => मानसरोवर (तिबेट )


नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )

तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )

महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )

ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )


सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )

व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )

गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक

कृष्णा => महाबळेश्वर


कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )

साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )

रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )

पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )

_______________________________

पृथ्वीचे अंतरंग



🏆 'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.

🏆 पथ्वीच्या आंतरांगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत.

🏆 पष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.

🏆 अतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.

प्राथमिक लहरी (P Waves)
दुय्यम लहरी (S Waves)
पृष्ठीय लहरी (L Waves)
या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.

✅ पराथमिक लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 भकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.

🏆 पराथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात. प्राथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.

✅ दय्यम लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 पराथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते. प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात. दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. मध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.

✅ पष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 पथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात. या लहरींचा वेग कमी असतो. या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते. या लहरी अतिशय विध्वंसख असतात. पृथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष


🏆 पथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.

🏆 भगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.

🏆 बाह्य गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.

🏆 कठीण घन पदार्थाचा आंतगाभा:- अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा. कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- 'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.

महत्वाच्या योजना आणि त्यांची सुरुवात


✍️📚 MPSC चा सर्वात आवडता प्रश्न आहे.सर्व योजना आणि त्यांच्या तारखा लक्षात असू द्या.


💯 दर वर्षी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व मध्ये योजना वर 2/3 प्रश्न Fix असतातच..


1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014


2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014


3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014


4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014


5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014

 

6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014


7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014


8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015


9) पहल  योजना — 1 जानेवारी 2015

 

10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015


11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015 


12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015 


13) राष्ट्रीय कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015 


14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015


15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015


16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015


17) उस्ताद योजना — 14 मे 2015


18) कायाकल्प योजना — 15 मे 2015


19) D D किसान वाहिनी — 26 मे 2015


20) डिजिटल इंडिया — 1 जुलै 2015


21) किसान सन्मान निधी योजना — 24 फेब्रुवारी 2019


22) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना — 1 मे 2016


राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विशेषतः

🔹 सिंधू संस्कृती:


०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती. 


०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही. 


०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

ठळक बातम्या २९ मार्च २०२५.



१.एबेल पुरस्कार २०२५

- मसाकी काशीवारा यांना
- ७८ वर्षीय जपानी गणितज्ञांना बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील योगदानाबद्दल.

२. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५

- १५ वी आवृत्ती.
- मुंबईला मागे टाकून आशियातील अब्जाधीशांची राजधानी शांघाय ठरले.
- रोशिनी नादर या जगातील टॉप १० श्रीमंत महिलांमध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.
- अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक अब्जाधीशांचा देश म्हणून भारत.

३. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन.

- संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १४ डिसेंबर २०२२ रोजी एक ठराव मंजूर केला.
-३० मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन म्हणून घोषित.
- शून्य-कचरा उपक्रम शाश्वत विकासाच्या २०३० च्या अजेंडाशी सुसंगत आहेत.
SDG ११: शाश्वत शहरे आणि समुदाय
SDG १२: जबाबदार वापर आणि उत्पादन.
- या वर्षीचा आंतरराष्ट्रीय कचरामुक्त दिवस फॅशन आणि कापड क्षेत्रातील कचरा सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतो.

४. सिल्वागार्ड.

- एक एआय-चालित स्वायत्त ड्रोन प्रणाली जी जंगलातील आगी शोधण्यास आणि दाबण्यास सक्षम आहे, वाढत्या जंगलातील आगीवर नियंत्रण आणणे.
- निर्मिती ड्रायड नेटवर्क्सने केली.

५.खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ची दुसरी आवृत्ती.

- हरियाणाने अव्वल स्थान मिळवले, एकूण 104 पदकांसह (34 सुवर्ण, 39 रौप्य आणि 31 कांस्य).
- तामिळनाडू (74 पदके) आणि उत्तर प्रदेश (64 पदके) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान.
- स्पर्धा नवी दिल्लीतील तीन  स्थळांवर झाली – जवाहरलाल नेहरू इंडोअर स्टेडियम, IG इंडोअर स्टेडियम आणि कर्णी सिंग शूटिंग रेंज.

चालू घडामोडी :- 28 मार्च 2025



◆ महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने कनिष्ठ गृहमंत्री नित्यानंद राय यांनी यांनी लोकसभेत इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल-2025 विधेयक सादर केले.

◆ इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास सात वर्षाची शिक्षेची तरतूद आहे.

◆ इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास 10 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

◆ इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून ते गृह मंत्रालयाशी संबधित आहे.

◆ महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

◆ नाशिकमध्ये 2027 वर्षी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे.

◆ भारतीय स्वदेशी बनावटीच्या लुकॲप सर्च इंजिन चे उद्घाटन रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ तामिळनाडू राज्याने केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे.

◆ भारतीय स्वदेशी बनावटीचे लुकॲप सर्च इंजिन पुणे ठिकाणच्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीने बनवले आहे.

◆ रोशनी नाडर जागतिक स्तरावर पाचव्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत.[सर्वात श्रीमंत भारतीय महिला :-रोशनी नाडर]

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने पाचवे स्थान पटकावले आहे.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण 43 पदके जिंकली आहेत.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण 18 सुवर्ण पदक मिळवले आहेत.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने टेबल टेनिस मध्ये 3 सुवर्ण पदक जिंकले आहेत.

◆ एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुनील कुमार ने 87 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे.

◆ ICC One Day Women World Cup 2025 चे आयोजन भारत देशात करण्यात येणार आहे.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये हरियाणा राज्याने सर्वाधिक 104 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...