Thursday, 6 February 2025

Mpsc Notes


►1904 ~ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित
►1905 ~ बंगाल का विभाजन
►1906 ~ मुस्लिम लीग की स्थापना
►1907 ~ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फूट
►1909 ~ मार्ले-मिंटो सुधार
►1911 ~ ब्रिटिश सम्राट का दिल्ली दरबार
►1916 ~ होमरूल लीग का निर्माण
►1916 ~ मुस्लिम लीग-कांग्रेस समझौता (लखनऊ पैक्ट)
►1917 ~ महात्मा गाँधी द्वारा चंपारण में आंदोलन
► 1918 ~ खेड़ा सत्याग्रह
►1919 ~ रौलेट अधिनियम
►1919 ~ जलियाँवाला बाग हत्याकांड
►1919 ~ मांटेग्यू-चेम्सफोर्ड सुधार
►1920 ~ खिलाफत आंदोलन
►1920 ~ असहयोग आंदोलन
► 1921 ~ एका आंदोलन
►1922 ~ चौरी-चौरा कांड
►1927 ~ साइमन कमीशन की नियुक्ति
►1928 ~ साइमन कमीशन का भारत आगमन
► 1928 ~ बारडोली सत्याग्रह
►1929 ~ भगतसिंह द्वारा केन्द्रीय असेंबली में बम विस्फोट
►1929 ~ कांग्रेस द्वारा पूर्ण स्वतंत्रता की माँग
►1930 ~ सविनय अवज्ञा आंदोलन
►1930 ~ प्रथम गोलमेज सम्मेलन
►1931 ~ द्वितीय गोलमेज सम्मेलन
►1932 ~ तृतीय गोलमेज सम्मेलन
►1932 ~ सांप्रदायिक निर्वाचक प्रणाली की घोषणा
►1932 ~ पूना पैक्ट
►1942 ~ भारत छोड़ो आंदोलन
►1942 ~ क्रिप्स मिशन का आगमन
►1943 ~ आजाद हिन्द फौज की स्थापना
► 1946 ~ तेभागा आंदोलन
►1946 ~ कैबिनेट मिशन का आगमन
►1946 ~ भारतीय संविधान सभा का निर्वाचन
►1946 ~ अंतरिम सरकार की स्थापना
►1947 ~ भारत के विभाजन की माउंटबेटन योजना
►1947 ~ भारतीय स्वतंत्रता प्राप्ति
► 1948-50 ~ देशी रियासतों का विलय
► 26 जन. 1950 ~ भारतीय गणराज्य का गठन

वाचा :- हंटर कमीशनचे भारतीय सदस्य



√ १८५४ च्या वुडच्या खलित्याने
   सुचवलेल्या सुचनांची झालेली
   अंमलबजावणी पाहणे आणि प्राथमिक
   शिक्षणांसदर्भात सुधारणा
   सुचविण्यासाठी १८८२ साली नेमण्यात
   आलेल्या विल्यम हंटर साहेबांच्या
   कमिशन मधे भारतीय मंडळींचा
   सहभाग होता.

√ हि भारतीय मंडळी या कमिशनच्या
   कामात सहभागी झाली आणि त्यांनी
   महत्वपूर्ण योगदान दिले..

√१) के.टी.तेलंग

√२) सय्यद महमुद (सय्यद अहमद खान
       यांच्या ऐवजी)

√३) आनंद मोहन बोस

√४) भुदेव सिंह मुखर्जी

√५) पी.रंगनाथ मुदलीयार

√६) हाजी गुलाम

√७) महाराज जितेंद्र मोहन टागोर

√ या कमीशन चे अध्यक्ष हंटर साहेब तर
   सेक्रेटरी बी.एल.राईस होते.

√ हे कमीशन लाॕर्ड रिपन यांच्या काळात
   आले होते..

लॉर्ड कर्झन (1899 - 1905)



●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.

भारतीय संविधानाची निर्मिती


📜 कॅबिनेट मिशन योजना:

- एकूण जागा: ३८९

  - ब्रिटिश भारत: २९६ जागा (२९२ जागा ११ राज्यपाल प्रांतांमधून, ४ मुख्य आयुक्त प्रांतांमधून)

  - संस्थाने: ९३ जागा (मुस्लिम लीग सदस्यांच्या माघारीमुळे ७० जागा)



🏛️ संविधान सभेची रचना:

- मूळ जागा: २९९

- ब्रिटिश भारत प्रांत: २२९ जागा

- संस्थाने: ७० जागा



⚖️ सार्वभौम संस्था:

- पूर्णपणे सार्वभौम आणि विधायी अधिकार असलेली संस्था.

- अध्यक्षता करणारे:

  - विधायी सत्र: जी.व्ही. मावळंकर

  - संविधान सत्र: डॉ. राजेंद्र प्रसाद



🗓️ महत्वाच्या तारखा:

- पहिलं सत्र: ९ डिसेंबर १९४६

- अंतिम सत्र: २४ जानेवारी १९५०

- स्वीकारणे: २६ नोव्हेंबर १९४९

- अंमलबजावणी: २६ जानेवारी १९५०



📝 मसुदा समिती:

- अध्यक्ष: डॉ. बी.आर. आंबेडकर

- सदस्य:

  - एन. गोपालस्वामी आयंगार

  - अलादी कृष्णस्वामी अय्यर

  - डॉ. के.एम. मुंशी

  - सैयद मोहम्मद सादुल्लाह

  - एन. माधव राव

  - टी.टी. कृष्णमाचारी



📘 संविधानाची माहिती:

- प्रारंभिक सामग्री: उद्देशिका, ३९५ कलमे, ८ अनुसूचियां

- सभेचे अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद

- उपाध्यक्ष: एच.सी. मुखर्जी, वी.टी. कृष्णमाचारी

- तात्पुरते अध्यक्ष: डॉ. सच्चिदानंद सिन्हा

- प्रतीक: 🐘

- संवैधानिक सल्लागार: बी.एन. राव

- सचिव: एच.व्ही.आर. आयंगार

- मुख्य मसुदाकार: एस.एन. मुखर्जी

- कॅलिग्राफर: प्रेम बिहारी नारायण रायझादा

- सजावट: नंदलाल बोस, ब्योहर राममनोहर सिन्हा



🗳️ मतदान आणि प्रतिनिधित्व:

- मुसलमान, शीख, आणि सामान्य श्रेणींना जागा वाटप.

- प्रातिनिधिक मतदान प्रणालीद्वारे मतदान.

- संस्थानामधून नामांकित सदस्य होते.

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स


.

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स 

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी

76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे

77) महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकॅवणारी मंडळी —- 1853--- महात्मा फुले

78) दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ —1910— कर्मवीर भाऊराव पाटील

79) गुरुदेव सेवा मंडळ (मोझरी) —- संत तुकडोजी महाराज

80) भिल्ल सेवा मंडळ — 1922 — ठक्कर बाप्पा

81) ग्रामोउद्धार मंडळ —- पंजाबराव देशमुख

82) महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडळ —- महर्षि धो.के.कर्वे

83) ग्रामरचना (ग्रंथ) — गो.ह.देशमुख (लोकहीतवादी) 

84) ग्रामगीता (साहित्य) —- संत तुकडोजी महाराज

85) गीता प्रवचने —- विनोबा भावे


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 7)

86) मानवी समता (मासिक) —- 1937— महर्षी धो.के.कर्वे

87) समता (वृत्तपत्र) — 1927 — बाबासाहेब आंबेडकर

88) समता संघ / मंच — 1944 — महर्षी धो.के.कर्वे

89) समाज समता संघ — 1927 — बाबासाहेब आंबेडकर

90) जाती निर्मूलन संघ — 1948 — महर्षी धो.के.कर्वे

91) शेतकरी संघ — 1927 — पंजाबराव देशमुख

92) प्राथमिक शिक्षण संघ — पंजाबराव देशमुख

93) तरुण आस्तिकांचा संघ — 1905 — वि.रा.शिंदे

94) अस्पृश्यता निवारन संघ — 1918 — वि.रा.शिंदे

95) मराठा राष्ट्रीय संघ — 1918 — वि.रा.शिंदे

96) अखिल भारतीय दलित संघ — 1956 — पंजाबराव देशमुख

97) आल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन — 1942 — बाबासाहेब आंबेडकर

98) डिप्रेसड क्लासेस मिशन — 1906 — मुंबई — वि.रा.शिंदे

99) ब्रह्म पोस्टल मिशन — वि.रा.शिंदे

100) रामकृष्ण मिशन — 1897 — स्वामी विवेकानंद


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 8)

101) लोकहीतवादी (मासिक) — गो.ह.देशमुख

102) हितवदी (दैनिक) — गोपाळ कृष्ण गोखले

103) बहिष्कृत भारत (ग्रंथ) — वि.रा.शिंदे

104) बहिष्कृत भारत (पक्षिक)  — बाबासाहेब आंबेडकर

105) बहिष्कृत हितकारिणी सभा —1924 — बाबासाहेब आंबेडकर

106) संवाद कौमूदी — राजा राम मोहन रॉय

107) तत्व कौमूदी — साधारण ब्राह्मो समाजाचे मुखपत्र

108) तत्व बोधिनी सभा — देवेंद्रनाथ टागोर

109) यंग इंडिया - - महात्मा गांधी

110) न्यू इंडिया (साप्ताहिक) — अँनी बेज़ंट 

111) गुलामगिरी (ग्रंथ) — महात्मा फुले

112) गुलामंचे राष्ट्र (पुस्तक) — गो.ग,आगरकर

113) अनटचबल इंडिया — वि.रा.शिंदे

114) द अनटचबल्स — बाबासाहेब आंबेडकर


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 9)

115) आद्य इतिहास संशोधक — बाळशास्त्री जांभेकर 

116) पहिले इतिहास  संशोधक — रा.गो.भांडारकर

117) प्राचीन इतिहासाचे संशोधक — रा.गो.भांडारकर

118) इतिहासाचार्य — वि.का.राजवाडे

119) चतु:श्लोकी भागवत — संत एकनाथ

120) चतु:श्लोकी भागवताचा अर्थ — विष्णुबुवा ब्रह्मचारी

121) शेषाद्रई प्रकरण — बाळशास्त्री जांभेकर

122) पंचहौद मिशन प्रकरण — न्या.म.गो.रानडे

123) बर्वे प्रकरण — गो.ग.आगरकर / टिळक

124) वेदोक्त प्रकरण — शाहू महाराज / टिळक

125) वेदोक्त धर्म प्रकाश (ग्रंथ) — विष्णुबुवा ब्रह्मचारी

126) सत्यतर्थ धर्मप्रकाश — स्वामी दयानंद सरस्वती

गोलमेज परिषद बद्दल माहिती

गोलमेज परिषद बद्दल माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.

नेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.

1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.
सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)
12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्‍यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

साबरमती ते दांडी अंतर – 385 कि.मी.
6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.
धारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)
याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.

या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)
पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.
काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
गांधी आयर्वीन करार – 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.

दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास
सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932
सविनय कायदेभंगाची समाप्ती – 1934
17 ऑगस्ट 1932 रोजी रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. या व्दारे अश्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊ केले.

विधीमंडळातील विभक्त मतदार संघाविषयी गांधीजीचे प्राणांतीक उपोषण.
24 सप्टेंबर 1932 या दिवशी म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार (येरवडा करार) झाला. त्यान्वये अश्पृश्यांना विभक्त मतदार संघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचे मान्य केले गेले.

तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये भरली.
सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार नावाची लाल शर्ट वाल्यांची संघटना सुरू केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1853 चा चार्टर अ‍ॅक्ट :-

 कंपनीला दिलेल्या सनदेची मुदत 1853 मध्ये संपली, कंपनीकडे राजकीय सज्ञ्ल्त्;ाा ठेवण्यास अनेक संसद सदस्यांचा विरोध होता. त्यातून आज्ञापत्र मंजूर करण्यात आले.


· त्यातील तरतुदी -


(1) आज्ञापत्रांची 20 वर्षाची मुदत रद्द केली. संसद कंपनीचे अधिकार रद्द करत नाही. तोपर्यत सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून कंपनीने भारतात कारभार करावा


(2) कंपनीच्या संचालकांची संख्या 18 करण्यात आली. त्यामध्ये 10 वर्षासाठी सम्राटाकडून 6 तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून 12अशी निवड करावी


(3) नियंत्रण मंडळाच्या गव्हर्नरची नेमणूक करण्याची परवानगी दिली. प्रत्यक्षात 1912 मध्ये गव्हर्नरची नेमणूक झाली.


(4) भारतीय कायद्यांचे संहितीकरण करण्यासाठी इंडियन लॉ कमिशनची नेमणूक करण्यात आली.


(5) विधीनिर्मितीसाठी कार्यकारणी परिषदेची सदस्य संख्या 12 निश्चित करण्यात आली.


· यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश इतर एक न्यायाधीश आणि चांर प्रांताचे मुंबई, मद्रास, आग्रा, बंगाल चा सदस्य असे 6 सदस्य व इतर 6 सरकारी सदस्य असे.

1909 चा कायदा ,1919 चा कायदा ,

1909 चा कायदा


भारतीय सुधारणा चळवळीला सुरुवात

1909 च्या कायदयास मोर्ले – मिंटो सुधारणा कायदा असे ही म्हणतात.
मोर्ले हे भारतमंत्री तर मिंटो हे व्हाईसरॉय होते.
1909 च्या कायद्याने लंडनमधील भारतमंत्र्यांच्या इंडिया कॉन्सिल मध्ये दोन हिंदी लोकांचा समावेश करण्यात आला.
के.जी. गुप्ता
सय्यद हुसेन बिलग्रामी
1909 च्या कायद्याने भारतातील गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक जागा हिंदी सभासंदासाठी राखून ठेवण्याची तरतूद केली गेली. त्यानुसार रायपूरचे ‘लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा’ यांची नेमणूक करण्यात आली.
1909 च्या कायद्याने मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले.
गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाची संख्या या कायद्याने आठ वर नेली.
केंद्रीय कायदे मंडळाची संख्या 68 केली.
1909 च्या कायद्यातील दोष पुढीलप्रमाणे :

संसदीय पद्धत लागू पण उत्तरदायीत्वाचा अभाव.
निवडणूक पद्धत काही अंशी मान्य करण्यात आली.
प्रांतात भारतीयांचे बहुमत पण केंद्रात बहुमत नाही.
1909 च्या कायद्याने सभासदांना प्रश्न विचारण्याचा, अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला परंतु त्यावर मतदान करण्याचा अधिकार दिला नाही.

_____________________________________

1919 चा कायदा


Must Read (नक्की वाचा):

1919 चा सुधारणा कायदा मॉन्टेग्यु – चेम्सफोर्ड नावानेही ओळखला जातो. मॉन्टेग्यु हे भारतमंत्री तर चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय होते.


20 ऑगस्ट 1917 – भारतमंत्री मॉन्टेग्युची घोषणा – भारताला ‘साम्राज्यअंतर्गत स्वराज्य’ टप्याटप्याने दिले जाईल. या घोषणेचे स्वागत मवाळांनी ‘मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया’ असे केले.


1919 च्या कायद्याने भारतमंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून सुरू केला.


इंडिया कौन्सिलच्या सभासंदांची संख्या आठ ते बारा करण्यात आली त्यात तीन भारतीय सदस्यांचा समावेश करण्यात आला.


1919 च्या कायद्याने हायकमिशन ऑफ इंडिया हे पद निर्माण करून त्यांचा पगार भारतीय तिजोरीवर लादला.


केंद्रीय कायदेमंडळ व्दिगृही केले.


कनिष्ठ सभा (Legislative Assembly – 143)


वरिष्ठ सभा (Council state -60)


1919 च्या कायद्याने मुस्लिमांबरोबर शीख, युरोपीय आंदिना स्वतंत्र मतदार संघ दिले.


या कायद्याने प्रांतात व्दिदल शासनाचा प्रारंभ केला.


वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 5 वर्षाचा तर कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाल 3 वर्षाचा करण्यात आला.


निवडणुकीचा नागरिकांना देण्यात आलेला मतदानाचा


गांधी युगाचा उदय



सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -


चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -


1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 


गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 


शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 


हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -


भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 


या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 


या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 


13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 


या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 


फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 


या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.


या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 


असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

 


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 


या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 


या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 


या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 


राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 


नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :


1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 


या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 


12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 


385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 


यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 


महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.


सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 


6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 


आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 


महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 


विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 


14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 


8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -


इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 


प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 


महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -


सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.


या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -


चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 


नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 


सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 


मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -


या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 


या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -


त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -


24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 


भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 


3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 


मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

सायमन कमिशन महत्वाचे मुद्दे

  सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.


  वसाहतीच्या स्वराज्याची मागणी. २६ जाने. १९३० रोजी पहिल्या स्वातंत्र्यदिन पाळला गेला.


  नेहरू अहवालातील तत्त्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची धमकी गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्विन यांना दिली. (२३ डिसेंबर १९२९), आयर्विन यांचा प्रतिसाद नाही.


  १९२९च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.


  सविनय कायदेभंग (१२ मार्च १९३० ते ५ मार्च १९३१)


 १२ मार्च १९३० रोजी आपल्या ७८ सहकाऱ्यांनिशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.


 साबरमती ते दांडी अंतर – ३८५ कि.मी.


  ६ एप्रिल १९३० रोजी मिठाचा कायदा मोडला.


  धरासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (२१ मे १९३०)


  याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.


  या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (१९३०)


पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर १९३०मध्ये भरली.


 काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.


  गांधी आयर्विन करार – ५ मार्च १९३१, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसऱ्या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.


  दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर १९३१मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास


  सविनय कायदेभंगाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रारंभ - ३ जाने. १९३२


  सविनय कायदेभंगाची समाप्ती – १९३४

विज्ञान प्रश्नसंच


🌸*मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?*

१) कोरनिआ  

२) इरीस✅✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸*सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?*

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸 *अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?*

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸*१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.*

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 *स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.*

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?*

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 *खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.*

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸*वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?*

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸*इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?*

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान


इतिहास महत्त्वाचे उठाव


🔹ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :


संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

 

🔹दक्षिण भारतातील उठाव  -

पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 -           रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

१) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे.

ब) अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते. 

क) या हजार वर्षांत महाराष्ट्राची अस्मिता विविध अंगांनी संपन्न होत गेलेली आहे. 

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त क योग्य 

४. वरील सर्व योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 


२) महाराष्ट्राची भूमी याबद्दल खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

अ) महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे. 

ब) सुमारे नऊ कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.

१. विधान : अ योग्य 

२. विधान : ब योग्य 

३. वरील दोन्ही विधान योग्य 

४. वरील दोन्ही विधान अयोग्य 

उत्तर : १. विधान : अ योग्य 

[ब) सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.]


३) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) सह्याद्रीच्या पूर्वेकडील जमीन मात्र सावकाश सपाटीकडे जाणारी आहे. 

ब) या पठाराच्या प्रदेशाला देश महणतात. 

क) देशावरील जमिनीचा पोत आणि कस यांत फार विविधता आहे.

१. फक्त अ व ब योग्य

२. फक्त ब व क योग्य 

३. फक्त अ व क योग्य 

४. वरील सर्व विधान योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व विधान योग्य 


४) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सांगली-सोलापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.

ब) नगर-सोलापूरकडाची जमीन बव्हंशी कोरडी, रूक्ष आणि परिणामी नापीक, कोकणच्या मानाने देशावरची शेती अधिक बरकतीची आहे.

क) एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील लोकांना शेतीभाती पिकविण्यासाठी फार मेहनत करावी लागते.

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त ब व क योग्य 

४. फक्त अ व क योग्य 

उत्तर : ३. फक्त ब व क योग्य 

[अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सातारा-कोल्हापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.]


५) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

१. भूमीच्या वैशिष्ट्यांबरोबर सृष्टी आणि हवामान यांतही विविधता निर्माण होणे स्वाभाविक आहे. 

२. पावसाचे प्रमाण सर्वत्र भिन्नभिन्न असल्यामुळे महाराष्ट्राला अर्थातच एकजिनसी रूप नाही.

३. वरील दोन्ही योग्य 

४. वरील दोन्ही अयोग्य 

उत्तर : ३. वरील दोन्ही योग्य 


६) कितव्या शतकात उद्योतनसूरी या जैन ग्रंथकाराने कुवलय माला नामक ग्रंथात रेखलेली मराठ्यांची प्रतिमा आजही यथातथ्य वाटते ?

१. सहाव्या 

२. सातव्या 

३. आठव्या 

४. नवव्या 

उत्तर : ३. आठव्या 


७) खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते सांगा.

अ) मराठे कलहप्रिय अभिमानी असलेल्या प्रसंग ओढवल्याशिवाय ते लढायला बाहेर पडत नाहीत.

ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा शेतकरी समाज आहे. 

क) वायव्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही. 

ड) वैऱ्याचा सूड घ्यावा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करावे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा ही मराठ्यांची जीवनमूल्ये आहेत.

१. फक्त अ व ब अयोग्य 

२. फक्त ब व क अयोग्य 

३. फक्त अ व ड अयोग्य 

४. फक्त क व ड अयोग्य 

उत्तर : २. फक्त ब व क अयोग्य 

[ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा कृषीवेल समाज आहे. 

क) ईशान्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही.]


८) खाली काही सातवाहन बद्दल कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

१. ख्रिस्ती कालगणनेच्या सुरवातीच्या काळात गोदातीरावरील प्रतिष्ठान म्हणजेच आताचे पैठण या ठिकाणाहून राज्य करणार्‍या सातवाहन राजघराण्यापासून महाराष्ट्राच्या इतिहासाची संगती सहजपणे लावला येते.

२. सातवाहन हे पहिले महाराष्ट्रीय राज्यकर्ते.

३. सातवाहनांनंतर पश्चिम महाराष्ट्रात त्रैकूटक, भांदकचे वाकाटक, चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि देवगिरीचे यादव हि राजघराणी विशेषत्वाने नावारूपास आली.

४. वरील सर्व योग्य

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 

Latest post

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या

◾️5 जून 2024 - ला अंतराळात गेल्या होत्या ◾️26 जून 2024 - ला परत येणार होत्या  ◾️18 मार्च 2025 - ला प्रत्यक्षात परत आल्या (भारतीय वेळेनुसार 1...