Monday, 13 January 2025

चालू घडामोडी :- 12 & 13 जानेवारी 2025



◆ 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.[स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस :- 12 जानेवारी]

◆ भारतीय हवामान विभाग (IMD) ची स्थापना 1875 साली झाली.[यावर्षी भारतीय हवामान विभागाचा 150वा वर्धापन दिन आहे.]

◆ आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत देश जास्त नोकरदारांचा वाटा असणारा आणि कमी पगार असणारा देश आहे.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिव पदी देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आली आहे.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्ष पदी प्रभतेज सिंह यांची निवड करण्यात आली आहे.

◆ राज्य क्रीडा दिवस 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो.[15 जानेवारी हा खाशाबा जाधव या खेळाडूंचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात.]

◆ यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा 457वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे.[12 जानेवारी]

◆ लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून जोसेफ आऊन यांची निवड करण्यात आली.

◆ राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासाचा दर 6.4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

◆ 2035 या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

◆ भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.

◆ देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 01 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणार आहे.

◆ अमेरिकेचे 47वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत.

◆ शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील 19 देवस्थानांना जोडणार आहे.[शक्तिपीठ महामार्ग हा 802 किलोमीटर लांबीचा असणार आहे.]

Latest post

चालू घडामोडी :- 12 & 13 जानेवारी 2025

◆ 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.[स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस :- 12 जानेवारी] ◆ भारतीय हवामान विभाग (I...