Thursday, 2 January 2025

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठेचा सन्मान लाभला आहे.

◆ भारताच्या आर. वैशाली ला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक मिळाले आहे.

◆ जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा न्युयॉर्क येथे पार पडली.

◆ यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची संकल्पना मधाचे गाव ही असणार आहे.

◆ ICC ने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराह ने विक्रमी 907 रेटिंग गुण मिळवून आर अश्विन चा विक्रम मोडला आहे.

◆ संतोष ट्रॉफी 2024 स्पर्धेचे विजेतेपद पश्चिम बंगाल ने केरळ(उपविजेता) राज्याचा पराभव करून पटकावले आहे.

◆ संतोष ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना तेलंगणा राज्यात खेळवण्यात आला.

◆ SAIL भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क Certificate देण्यात आले आहे.

◆ वितूल कुमार यांची CRPF संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ RBI ने 2025 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.6 टक्के वर्तविला आहे.

◆ येमेन देशाने भारतीय नर्स निमिषा प्रिया ला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे.

◆ वाव थराद नावाचा नविन जिल्हा गुजरात राज्यात होणार आहे.

◆ केंद्रिय संरक्षण मंत्रालयाने 2025 हे सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे
.

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...