नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
१५ एप्रिल २०२५
ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.
१३ एप्रिल २०२५
ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.
१२ एप्रिल २०२५
ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.
०४ एप्रिल २०२५
महत्त्वाच्या आयोगांची माहिती
📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)
- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,
📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)
🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)
- कलम: 324
- स्थापना: 26 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.
🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)
- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.
💰 CAG (महालेखा परीक्षक)
- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.
⚖️ Lokpal (लोकपाल)
- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013
- स्थापना: 2019
- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.
⚖️ Lokayukta (लोकायुक्त)
- कायदा: राज्यस्तरीय कायदे
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980
- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल
👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)
- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: 1993
- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.
👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)
- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.
🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)
- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003
- स्थापना: 1964
- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.
👨⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)
- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1985
- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:
👨⚖️ MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)
- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1991
- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:
📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)
- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978
- स्थापना: 1966
- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:
📋 Administrative Reforms Commission (प्रशासनिक सुधार आयोग)
- कायदा: प्रशासनिक सुधार आयोग कायदा, 1966
- स्थापना: 1966
- कामाचा ध्येय: सरकारी प्रणालीचे सुधार आणि महत्त्वाच्या प्रशासनिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान
- संरचना: 1 अध्यक्ष + अनेक सदस्य
ठळक बातम्या. ०४ मार्च २०२५.
१.छत्तीसगडचा पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प.
- कोरबा जिल्ह्यात पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट (SCTPP) स्थापन होणार.
- आधीच अस्तित्वात असलेल्या १,३४० मेगावॅट क्षमतेच्या प्लांटमध्ये १,३२० मेगावॅट (Mw) ची क्षमता जोडली जाईल.
२. वक्फ कायद्याचे कलम ४०
- वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ हे १९९५ च्या विद्यमान वक्फ कायद्यात सुधारणासाठी.
-सर्वात वादग्रस्त बदल म्हणजे कलम ४० काढून टाकणे.
- वक्फ कायद्याच्या कलम ४० नुसार वक्फ बोर्डाला मालमत्ता वक्फ आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे.
- वक्फ ट्रिब्यूनलमध्ये आव्हान दिल्याशिवाय मंडळाचे निर्णय अंतिम असतात.
३. राजस्थान.
- २७५ रेल्वे स्थानकांसह राजस्थान हे सौरऊर्जा प्रकल्प असलेल्या सर्वाधिक रेल्वे स्थानकांमध्ये देशात आघाडीवर.
- महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता, राज्यातील २७० रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले.
- भारतीय रेल्वेने २०२५-२६ पर्यंत १००% विद्युतीकरण साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे .
- २०३० पर्यंत रेल्वेने निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारे बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
४. बाकू ते बेलेम रोडमॅप
- ब्राझीलमध्ये झालेल्या ११ व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भारताने सर्व ११ ब्रिक्स राष्ट्रांना 'बाकू ते बेलेम रोडमॅप'ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
-ज्याचा उद्देश हवामान कृतीसाठी २०३५ पर्यंत दरवर्षी १.३ ट्रिलियन डॉलर्स जमवणे आहे.
५. ChaSTE
- चांद्रयान-३ मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून मौल्यवान थर्मल डेटा प्रदान करून, कोणत्याही खगोलीय पिंडाच्या पृष्ठभागाखाली यशस्वीरित्या प्रवेश करणारे आणि तापमान मोजणारे ChaSTE हे पहिले उपकरण बनले.
- १ सेमी अंतराने ते १० सेमी खोलीपर्यंत तापमानातील फरक मोजते .
६.कन्नडिप्पया जीआय टॅग
- केरळमधील पारंपारिक आदिवासी चटई असलेल्या कन्नडिप्पयाला भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.
- ज्यामुळे अशी मान्यता मिळालेली ही राज्यातील पहिली आदिवासी हस्तकला आहे.
- कन्नडिप्पया , ज्याचा अर्थ "आरशाची चटई" आहे, ही एक हाताने विणलेली चटई आहे जी रीड बांबूच्या मऊ आतील थरांपासून बनवली जाते .
बांगलादेशातील घटनांचे दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांवरील प्रतिबिंब
🔹 बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, विशेषतः ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गमावल्यावर हिंदूंवरील वाढलेला हिंसाचार, यामुळे धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
🔹 संपूर्ण दक्षिण आशियात अल्पसंख्याकांच्या परिस्थितीचा सातत्याने ऱ्हास होत आहे, ज्यामुळे या भागातील शांतता आणि स्थिरता धोक्यात आली आहे.
🔥 फाळणी आणि तिचे परिणाम
📌 1947 ची फाळणी धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आली होती, विशेषतः हिंदू-मुस्लिम वाद सोडवण्यासाठी.
📌 परंतु, यामुळे धार्मिक ध्रुवीकरण वाढले आणि भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अन्याय आणि हिंसा वाढली.
📌 मोहाजिर, निर्वासित हिंदू आणि निर्वासित मुस्लिम यांच्या विस्थापनामुळे मोठे सामाजिक आणि राजकीय तणाव निर्माण झाले.
💢 फाळणीचे परिणाम:
✅ भारतात मुस्लिम अल्पसंख्यांकांसाठी काही प्रमाणात सुरक्षितता होती, पण पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंची स्थिती खूपच बिकट झाली.
✅ हिंदू आणि ख्रिश्चन यांसारख्या इतर अल्पसंख्याकांवरही हल्ले होत राहिले.
🤝 नेहरू-लियाकत करार आणि त्याचे अपयश
📜 1950 मध्ये नेहरू-लियाकत करार झाला, जो भारत-पाकिस्तान दरम्यान अल्पसंख्याकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला होता.
❌ परंतु, पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य धोरणामुळे बांगलादेशातील बंगाली मुस्लिमांचे हक्क डावलले गेले.
⚠️ परिणामी, 1971 मध्ये बांगलादेशचा जन्म झाला.
🚨 महत्त्वाचा धडा:
🔹 केवळ राजकीय करार आणि करारपत्रे पुरेसे नाहीत!
🔹 लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समरसता हीच अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची खरी हमी ठरू शकते.
🇮🇳🤝🇧🇩 भारत-बांगलादेश संबंध आणि हिंदूंची स्थिती
🔹 1971 मध्ये भारताने बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात मोठी भूमिका बजावली, पण सध्या दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत.
🔹 बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक सतत अत्याचाराचा बळी ठरत आहेत.
🔹 काही विश्लेषकांचे मत आहे की ही हिंसा फक्त शेख हसीनाच्या पतनानंतरची राजकीय उलथापालथ नसून, बांगलादेशातील वाढत्या धार्मिक कट्टरतेचे प्रतिबिंब आहे.
💡 भारताची भूमिका:
✅ भारताने हिंदूंच्या सुरक्षेच्या मुद्द्याला केवळ द्विपक्षीय संबंधांच्या चौकटीत पाहू नये.
✅ बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण हे संपूर्ण दक्षिण आशियाच्या शांततेसाठी आवश्यक आहे.
🏛️ दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांचे भविष्य
💡 सुधारणा कशा करता येतील?
🔹 🆕 नवीन धोरणे आणि कायदे – धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करणाऱ्या सुधारित धोरणांची आवश्यकता आहे.
🔹 📚 इतिहासाचा योग्य अभ्यास – फाळणीमधील चुकीच्या निर्णयांपासून धडा घेऊन नव्या पिढीला सर्वसमावेशक दृष्टिकोन शिकवला पाहिजे.
🔹 🤝 एकत्रित प्रयत्नांची गरज – भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी संयुक्त प्रयत्न करायला हवेत.
🚨 भारताची जबाबदारी:
❌ केवळ बांगलादेशातील हिंदूंसाठी चिंता व्यक्त करून भारतीय मुस्लिमांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.
✅ सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी तटस्थ आणि प्रभावी धोरण हवे.
📢 निष्कर्ष
✅ धार्मिक अल्पसंख्यांकांचा प्रश्न हा केवळ इतिहासातील घटना नसून, तो दक्षिण आशियातील शांततेसाठी निर्णायक मुद्दा आहे.
✅ धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक समरसता वाढवण्यासाठी प्रभावी धोरणे आवश्यक आहेत.
✅ राजकीय पक्षांनी केवळ बहुसंख्याकांच्या भावनांवर राजकारण न करता, सर्वधर्मीयांना समान अधिकार मिळतील याकडे लक्ष द्यावे.
📌 शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी एकत्र येऊन अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे! ✊🔥
भारतीय संघाची एकात्मक वैशिष्ट्ये
१) राज्यघटनेची लवचिकता
2) केंद्राकडे अधिक अधिकार
३) राज्यसभेत राज्यांचे असमान प्रतिनिधित्व
४) कार्यपालिका हा विधिमंडळाचा एक भाग आहे
5) राज्यसभेपेक्षा लोकसभा अधिक शक्तिशाली
६) आणीबाणीचे अधिकार
7) एकात्मिक न्यायपालिका
8) एकल नागरिकता
९) राज्यपालांची नियुक्ती
10) नव्या राज्यांची निर्मिती 11) अखिल भारतीय सेवा
12) एकात्मिक निवडणूक यंत्रणा
13) राज्यांच्या विधेयकांवरील VETO
14) इंटिग्रेटेड ऑडिट मशिनरी
15) प्रमुख अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार
काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ?
👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये )
✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ?
👉 360 ग्रॅम
✏️ पक्ष्यांचे हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ?
👉 4 चेंबर
✏️ वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून कशाचा उल्लेख कराल ?
👉 युग्लिना
✏️ चिंच आणि द्राक्ष मध्ये कोणते आम्ल असते ?
👉 टॉर्टरिक आम्ल
✏️ अन्न पचवण्यासाठी _ आम्लाचा उपयोग होतो ?
👉 हायड्रोक्लोरिक आम्ल ( HCL )
✏️ ' बेकिंग पावडर ' तयार करण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते ?
👉 टोर्टरिक आम्ल
✏️ ' तडीत वाहक ' बनवण्यासाठी कशाचा वापर करतात ?
👉 तांबे
✏️ ' तडीत वाहकाचा ' शोध कोणी लावला ?
👉 बेंजामिन फ्रँकलिन
✏️ ' Islets of Langerhans ' शरीरातील कोणत्या भागाशी संबंधित आहे ?
👉 Pancreas ( स्वादुपिंड )
✏️ हृदयापासून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात ?
👉 Artery ( धमनी )
✏️ मानवी हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ?
👉 4 चेंबर
✏️ मृत RBC नष्ट करण्याचे काम शरीरातील कोणता भाग करतो ?
👉 यकृत
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
👉 फिमर
✏️ ' ग्लूकोज + ग्लूकोज ' ह्या दोन रेणू पासून बनणारी शर्करा कोणती ?
👉 माल्टोज
✏️ सशामध्ये किती गुणसूत्रे असतात ?
👉 44 गुणसूत्र
✏️ गुणसूत्र ( Cromosome ) ही संज्ञा कोणी दिली ?
👉 डब्ल्यू. वॉल्टेयर
✏️ ' Entomology ' मध्ये कशाचा अभ्यास केला जातो ?
👉 कीटकांचा
✏️ Pisum sativa हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे ?
👉 वाटाणा
✏️ Centrosome ( तारकाकाय ) शोध कोणी लावला ?
👉 बोबेरी
✏️ ' Factory of protein ' कशाला म्हटले जाते ?
👉 रायबोसोम्स ( Ribosome )
✏️ पेशींमधील ' निर्जीव रचना ' म्हणून कशाचा उल्लेख केला जातो ?
👉 Vacuoles
✏️ निष्क्रिय म्हणजेच नोबेल वायूचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ?
👉 Ramsay ( रॅम्से )
✏️ वायुमंडळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा निष्क्रिय वायू कोणता ?
👉 ऑरगॉन ( Ar )
✏️ विमानांच्या टायरमध्ये कोणता वायू भरलेला असतो ?
👉 हेलियम
✏️ गॅमा किरणांचे नामकरण कोणी केले होते ?
👉 रुदरफोर्ड
✏️ सर्व विद्युत चुंबकीय तरंग कशाच्या बनलेल्या असतात ?
👉 फोटॉन
✏️ मानवाची कमाल श्राव्य सीमा किती ( डेसिबल ) असते ?
👉 95 dB
✏️ पाऱ्यापासून ( mercury ) तयार होणाऱ्या थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
👉 फॅरेनहाईट
✏️ बेंझिनचा शोध कोणी लावला ?
👉 मायकल फॅरेडे
✏️ आधुनिक आवर्त सारणी मध्ये एकूण किती अधातू मूलद्रव्य आहेत ?
👉 22 अधातू
✏️ अन्नधान्यांचे संरक्षक म्हणून कशाचा वापर केला जातो ?
👉 ॲल्युमिनियम फॉस्फाईड
✏️ गन पावडर ( बारुद ) चा शोध कोणी लावला ?
👉 रॉजर बेकन
विशेषणाचे प्रकार
विशेषण म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या गुण, संख्या, प्रमाण, स्वरूप, रंग, अवस्था किंवा इतर वैशिष्ट्यांचे वर्णन करणारे शब्द. विशेषणांचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
१. गुणवाचक विशेषण (Adjective of Quality)
• जे विशेषण एखाद्या नामाचा गुणधर्म किंवा स्वरूप दर्शवतात.
• उदा: सुंदर (सुंदर फुल), मोठा (मोठा डोंगर), थंड (थंड पाणी)
२. संख्यावाचक विशेषण (Adjective of Number)
• जे नामांची संख्या किंवा क्रम दर्शवतात.
• प्रकार:
• निश्चित संख्यावाचक: जे ठरावीक संख्या दर्शवतात.
• उदा: एक (एक मुलगा), दोन (दोन झाडे), पाच (पाच पुस्तके)
• अनिश्चित संख्यावाचक: जे अचूक संख्या न दर्शवता काही प्रमाणात असण्याचा अंदाज देतात.
• उदा: काही (काही मुले), बरेच (बरेच लोक)
• क्रमवाचक: जे नामांचा क्रम दर्शवतात.
• उदा: पहिला (पहिला क्रमांक), तिसरा (तिसरा दिवस)
३. प्रमाणवाचक विशेषण (Adjective of Quantity)
• जे एखाद्या वस्तूचे प्रमाण दर्शवतात.
• उदा: थोडे (थोडे दूध), पुरेसे (पुरेसा वेळ), संपूर्ण (संपूर्ण गाव)
४. दर्शक विशेषण (Demonstrative Adjective)
• जे एखाद्या नामाचा निर्देश करतात.
• उदा: हा (हा मुलगा), ती (ती स्त्री), ते (ते घर)
५. संबंधवाचक विशेषण (Possessive Adjective)
• जे कोणत्या तरी व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या मालकीचा संबंध दर्शवतात.
• उदा: माझा (माझा मित्र), तुझी (तुझी वहिनी), त्यांचे (त्यांचे घर)
६. प्रश्नार्थक विशेषण (Interrogative Adjective)
• जे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात.
• उदा: कोणता (कोणता रंग?), किती (किती वेळ?), कसला (कसला खेळ?)
७. सार्वनामिक विशेषण (Relative Adjective)
• जे वाक्यात आधी आलेल्या नामाशी संबंधित असतात.
• उदा: जसा (जसा गुरु, तसे शिष्य), जितका (जितका अभ्यास, तितका फायदा)
खाली ५० महत्त्वाचे मराठी वाकप्रचार आणि त्यांचे अर्थ दिले आहेत:
१. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीत सापडलेला कोणाकडूनही मदत घेतो.
२. अंधारात तीर मारणे – अंदाजाने काही करणे.
३. अक्कल गहाण टाकणे – विचार न करता वागणे.
४. आगीतून फुफाट्यात पडणे – एका संकटातून बाहेर येताच दुसऱ्या संकटात अडकणे.
५. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन – अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळणे.
६. उगाच तोंडाला फेस आणणे – विनाकारण वाद घालणे.
७. उचलले पाउल आणि लागली बेडी – काही करण्याआधीच अडचण येणे.
८. एखाद्याच्या तोंडाला पाने पुसणे – कुणाला काहीच न मिळू देणे.
९. ओसरीला कुत्रे भुंकत नाही – कोणतीही किंमत न उरणे.
१०. काकास हेवा करणे – आपल्यापेक्षा कमी असलेल्या व्यक्तीचा हेवा करणे.
११. कापसाला आग लागणे – विनाकारण मोठे नुकसान होणे.
१२. काडीमोड करणे – संबंध तोडणे.
१३. काठावरचे लोणी खाणे – दुसऱ्याच्या श्रमावर आपले पोट भरणे.
१४. कानाला खडा लावणे – पुन्हा अशी चूक न करण्याची शपथ घेणे.
१५. कुळकर्णीपेक्षा शिपाई मोठा – लहान व्यक्तीकडे अधिक सत्ता असणे.
१६. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – ऐषारामात जगायचे नाहीतर काहीच नाही.
१७. खाल्ल्या मिठाला जागणे – प्रामाणिक राहणे.
१८. गाढवाला गुळाचा गोडवा काय? – अज्ञानी व्यक्तीला चांगल्या गोष्टीचे महत्त्व नसते.
१९. गुळाला मुंगळ्यांची लागण होणे – चांगल्या गोष्टीकडे अनेक जण आकर्षित होणे.
२०. गोऱ्ह्याला गोचीड न लागणे – कोणतीही अडचण न येणे.
२१. चोराच्या उलट्या बोंबा – चुकी करणारी व्यक्तीच इतरांना दोष देणे.
२२. चोराच्या हाती काठी – चोरालाच अधिकार मिळणे.
२३. चार लोकांत नाचणे – इतरांसमोर अपमान होणे.
२४. झाडून टाकणे – पूर्ण साफसफाई करणे किंवा काढून टाकणे.
२५. टाळी दोन हातांनी वाजते – भांडणात दोघेही जबाबदार असतात.
२६. डोक्यावरून पाणी जाणे – परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणे.
२७. तोंड चालवणे – फक्त बोलणे पण कृती न करणे.
२८. तोंड उघडता तोच घोळ – ज्या व्यक्तीने काही बोलले की अडचण निर्माण होते.
२९. तोंडपाटी करणे – पाठांतर करणे.
३०. तोंडाला पाने पुसणे – काहीच न मिळणे.
३१. दगड उचलून पायावर मारणे – स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे.
३२. दुधाची तहान ताकावर भागवणे – गरजेची गोष्ट न मिळाल्यावर दुसऱ्याच गोष्टीवर समाधान मानणे.
३३. डोंगर पोखरून उंदीर निघाला – खूप मेहनत घेतल्यावर काहीही उपयोग न होणे.
३४. देव तारी त्याला कोण मारी – नशिबाने ज्याचे रक्षण केले आहे त्याला कोणीही नुकसान पोहोचवू शकत नाही.
३५. नाचता येईना अंगण वाकडे – स्वतःला काही येत नसताना बाहेरच्या गोष्टींवर दोष देणे.
३६. पाय आपटणे – हट्टीपणा करणे.
३७. पाठ थोपटणे – कौतुक करणे.
३८. पाय घसरला की डोक्यावर आपटतो – चुकीचे पाऊल उचलल्यावर मोठे नुकसान होणे.
३९. पीळ पडणे – क्रोध येणे किंवा वैतागणे.
४०. फडतूस माणूस – साधी किंवा कमी महत्त्वाची व्यक्ती.
४१. बकरीसारखे वागणे – भित्रेपणाने वागणे.
४२. बैल गेला आणि झोपा केला – वेळ निघून गेल्यावर उपाय शोधणे.
४३. भाजीला मीठ जसे – जसे शोभून दिसते तसे.
४४. माथी मारणे – जबरदस्तीने जबाबदारी घालणे.
४५. माकडाच्या हाती कोलीत – अज्ञान व्यक्तीकडे मोठी सत्ता देणे.
४६. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? – कठीण काम करायला कोणी पुढे येत नाही.
४७. मुसळ केरात टाकणे – उपयुक्त वस्तू फेकून देणे.
४८. रांगोळी उठवणे – नाश करणे.
४९. लंगडी मारणे – कपट करणे.
५०. वेळेवर तुरी सांडणे – योग्य वेळी काम न होणे.
ISRO महत्त्वपूर्ण मोहीमा
🔹आर्यभट्ट (1975) :- पहिला भारतीय उपग्रह.
🔸INSAT (1983) : दूरसंचार, प्रसारण, आणि हवामानशास्त्र यासाठी उपग्रह मालिका.
🔹चांद्रयान-1 (2008) :- चंद्रावर पाण्याचा शोध.
🔸मंगलयान (2014) :- पहिली भारतीय मंगळ मोहीम.
🔹PSLV (2017) : एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित केले.
🔸चांद्रयान-2 (2019) :- चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण.
🔹चांद्रयान-3 (2023) :- चंद्रावर यशस्वी उतरण.
🔸आदित्य-L1 (2023) : पहिली सौर मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी.
🔹NISAR (2024) :- 12 दिवसांत पृथ्वीचे mapping करणार (संयुक्त NASA-ISRO मोहीम).
🔸गगनयान (2024) :- पहिली मानव अवकाश मोहीम.
🔹SPADEX (2024) : जुळी उपग्रह मोहीम.
🔸मंगलयान-2 (2024) : दुसरी मंगळ मोहीम.
🔹शुक्रयान-1 (2031) : पहिली शुक्र ग्रह मोहीम.
🔸चांद्रयान-4 (2027) : चंद्रावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी मोहीम, JAXA सह सहयोगाने.
दोन मार्क साठी फिक्स हे लक्षातच ठेवा :
✅ पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर ( सातारा )
✅ दुसरा मधुबन हनी पार्क - बोरिवली ( मुंबई )
✅ पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी ( सातारा )
✅ पहिले फळाचे गाव - धुमाळवाडी ( सातारा )
✅ पहिले पुस्तकाचे गाव - भिलार ( सातारा )
✅ पहिले मधाचे गाव - मांघर ( सातारा )
✅ पहिले झाडांचे पुनर्वसन गाव - म्हसवे ( सातारा )
✅ पहिले डिजिटल गाव - हरिसाल ( अमरावती )
✅ पहिले कॅशलेस गाव - घसई ( ठाणे )
✅ पहिले वायफाय गाव - पाचगाव ( नागपूर )
✅ पहिले आधार गाव - टेंभली ( नंदुरबार )
✅ पहिले कवितांचे गाव - उभादांडा ( सिंधुदुर्ग )
✅ भारताचे पहिले गाव - माना ( उत्तराखंड )
काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे
◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य
◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले
◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य
◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य
◾️त्रिपुरा : प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य
◾️आंध्रप्रदेश : जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य
◾️महाराष्ट्र - गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे देशातील पहिले राज्य
◾️पश्चिम बंगाल : मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल
◾️उत्तराखंड : लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य
◾️राज्यस्थान : जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य
◾️हिमाचल प्रदेश : भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य
◾️दिल्ली : भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य
◾️पश्चिम बंगाल : भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य
◾️सिक्कीम : मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य
◾️कर्नाटक : 'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य
◾️सिक्कीम : भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य
◾️पंजाब : निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य
◾️केरळ : सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य
◾️कर्नाटक : कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य
◾️हरियाणा : बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य
◾️राज्यस्थान : पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य
◾️पंजाब : मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य
◾️मध्यप्रदेश : सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य
◾️दिल्ली : ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य
◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य
◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य
◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य
◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य
◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य
◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य
◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य
◾️दिल्ली : देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर
◾️केरळ: हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे
◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले
◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य
◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे पहिले राज्य
◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक
◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे
◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे
◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य
◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य
शक्तिपीठ महामार्ग...
◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोवा(802 किलोमीटर)
◾️महाराष्ट्रात : 700 किलोमीटर आहे
◾️जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.
◾️6 पदरी चा महामार्ग
📌 सुरवात : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र
शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा
एकूण 9385 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे.
◾️1 हेक्टर म्हणजे = 2.471 एकर होते
◾️अपेक्षित खर्च - 86,300 कोटी
📌 महामार्गात येणारी महत्वाची देवस्थाने
🦙सवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड शक्ततपीठ, सचखंड गुरुद्वारा, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट,औदुंबर दत्त मंदिर सांगली,8 नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा - आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही दवस्थाने जोडली जाणार आहेत
समृद्धी महामार्ग....
📌 मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो
जिल्हे : हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो
अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
◾️6 पदरी महामार्ग
सुरवात : आमणे गाव, ठाणे जिल्हा
शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा
🛑 असा आहे समृद्धी महामार्ग
- नागपूर ते मुंबई
- लांबी : 701 किलोमीटर
- 120 मीटर रुंदीचा महामार्ग
- मार्गिका : 4 + 4
- वाहन वेगमर्यादा : सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी 150 किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी 100 किमी असेल.
- हा महामार्ग 10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल
- समृद्धी महामार्गाचे नवीन नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग
- समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले आहे
भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :
संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
मूलभूत हक्क : अमेरिका
न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
कायदा निर्मिती : इंग्लंड
लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
संघराज्य पद्धत : कॅनडा
शेष अधिकार : कॅनडा
जीवनसत्त्वे आणि त्यांची रासायनिक नावे
👉जीवनसत्व- ए A
🔺रासायनिक नाव= रेटिनॉल
🔺 कमतरता रोग= रात्री अंधत्व
🔺 स्त्रोत= 🥕 गाजर, 🥛 दूध, 🥚 अंडे, 🍓 फळ🍉
👉 जीवनसत्व – बी 1
🔺रासायनिक नाव= थायमिन
🔺 कमतरता रोग= बेरी-बेरी
🔺 स्रोत= 🥜 शेंगदाणे, बटाटे, 🥦 भाज्या🍆
👉 जीवनसत्व - B2
🔺 रासायनिक नाव= Riboflavin
🔺 कमतरतेचे रोग= त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांचे रोग
🔺स्रोत= अंडी, दूध, हिरव्या भाज्या
👉 जीवनसत्व – B3
🔺रासायनिक नाव= पॅन्टोथेनिक ऍसिड
🔺 कमतरता रोग= जळणारे पाय, राखाडी केस
🔺 स्रोत= 🍗 मांस🍖,🥛 दूध, 🍅 टोमॅटो, शेंगदाणे🥜
👉 जीवनसत्व- B5
🔺 रासायनिक नाव = निकोटीनामाइड (नियासिन)
🔺 कमतरता रोग= मासिक पाळीचे विकार (पेलाग्रा)
🔺 स्रोत = 🍗Meat🍖, 🥜शेंगदाणे, बटाटे
👉 जीवनसत्व- B6
🔺रासायनिक नाव = पायरिडॉक्सिन
🔺 कमतरता रोग = अशक्तपणा, त्वचा रोग
🔺 स्रोत = 🥛 दूध, 🍗 मांस, 🥦 भाजीपाला 🍆
👉 जीवनसत्व – H/B7
🔺रासायनिक नाव= बायोटिन
🔺 कमतरता रोग= केस गळणे, त्वचा रोग
🔺 स्रोत= यीस्ट, गहू, अंडी
👉 व्हिटॅमिन - B12
🔺 रासायनिक नाव= सायनोकोबालामिन
🔺 कमतरतेचे रोग= अशक्तपणा, पांडू रोग
🔺 स्रोत= 🍗मांस, 🍖काजेली, 🥛दूध
👉 व्हिटॅमिन सी C
🔺रासायनिक नाव= एस्कॉर्बिक ऍसिड
🔺 कमतरता रोग= स्कर्वी, हिरड्यांना आलेली सूज
🔺स्रोत= आवळा, 🍋 लिंबू, 🍑 संत्रा, 🍊 संत्रा
👉 जीवनसत्व - डी D
🔺रासायनिक नाव=कॅल्सीफेरॉल
🔺 कमतरता रोग=मुडदूस
🔺स्रोत=सूर्यप्रकाश, दूध, अंडी
👉 जीवनसत्व - ई E
🔺 रासायनिक नाव= टेकोफेरॉल
🔺 कमतरता रोग= प्रजनन क्षमता कमी होणे
🔺 स्रोत= 🥦हिरव्या भाज्या, 🍚लोणी, दूध🥛
👉 जीवनसत्व- के K
🔺रासायनिक नाव= Phylloquinone
🔺कमतरता रोग= रक्त गोठण्यास अपयश
🔺 स्रोत = 🍅 टोमॅटो, 🥦 हिरव्या भाज्या, 🥛 दूध
Latest post
ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...
-
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...