Saturday, 22 March 2025

चालू घडामोडी :- 21 & 22 मार्च 2025

◆ ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि देशाचे धोरणात्मक सुधारक डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2025 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.


◆ जागतिक जल दिन 22 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.


◆ जागतिक जल दिन 2025 ची थीम "ग्लेशियर प्रिझर्वेशन" [Glacier Preservation.] ही आहे.


◆ पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील 100 जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे.


◆ भारत देश प्रथमच अँटी ड्रोन लेझर डोम विकसित करणार आहे.


◆ जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो? [पहिला जागतिक हिमनदी दिन :- 2025]


◆ पश्चिम बंगाल राज्यात देशातील पहिले Frozen zoo स्थापन करण्यात आले आहे.


◆ 57व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन ओडिशा येथे करण्यात येणार आहे.


◆ भारताने हॉकी वर्ल्ड कप जिंकून 50 वर्षे झाल्यानिमित्ताने के अरुमुगम आणि एरोल डी क्रुझ यांनी March of Glory Book लिहिले आहे.


◆ नेतुम्बो नंदी नदैतावाह यांची नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.


◆ Knights Cross of the Order of डेन्मार्क सन्मान विजय शंकर यांना प्रदान करण्यात आला आहे.


◆ तेलगू अभिनेता चिरंजीवी ला UK देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे.


◆ State of Climate report 2024, WMO या संस्थेने जारी केला आहे.


◆ ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी हरीश टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

इंग्रजीतील 100 समानार्थी शब्द (Synonyms) आणि त्यांचे मराठीत अर्थ खाली दिले आहेत:

1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior)  1. Brave – Courageous (शूर)  2. Honest – Truthful (प्रामाणिक)  3. Happy – Joyful (आनंद...