1) एखाद्या विषयाची आवड असेल तर तो विषय घेऊ शकता (उदा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र)
2) कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार : मराठी / English : उपलब्ध संदर्भ साहित्य
3) syllabus : इतर विषयांच्या तुलनेने कमी असलेला विषय / खूपच किचकट संकल्पना नसलेला विषय
मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देणार असाल तर खालील विषयांसाठी चांगले संदर्भ / पुस्तके मिळू शकतात.
1) इतिहास : syllabus खूप जास्त
upsc तील trend - इतर विषयांच्या तुलनेत कमी मार्क्स मिळतात. पण मराठीतून भरपूर संदर्भ पुस्तके उपलब्ध.
2) भूगोल : objective साठी वाचलेल्या बऱ्याच गोष्टी Descriptive मध्ये फायदेशीर ठरू शकतात. बरेच सिद्धांत, भौगोलिक संकल्पना खूप detail मध्ये कराव्या लागतील.
Mapping वर प्रश्न असतात.
3) राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध (PSIR) : core polity सगळ्यांचं वाचून झालेलं असतं, बऱ्याच गोष्टी / facts तोंडपाठ असतात. याचा फायदा राज्यशास्त्रात होऊ शकतो. इथे extra फक्त आंतरराष्ट्रीय संबंध हा घटक करायचा आहे. पण सर्व गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. Thinkers हा घटक बऱ्याच विषयात थोडयाफार प्रमाणात आहे. संकल्पना, कारणे, परिणाम या मुद्द्यांवर लक्ष द्यावे लागेल (इतर विषयांमध्ये सुद्धा)
4) लोकप्रशासन (Pub Ad) : या विषयाचा अभ्यासक्रम आत्ताच्या objective mains मधील Polity Part 2 शी मिळताजुळता आहे. पण इथे facts पेक्षा Concepts वर जास्त focus पाहिजे. Syllabus इतर विषयांपेक्षा बऱ्यापैकी कमी आहे.
प्रशासनाशी संबंधित विषय आहे. बऱ्याच गोष्टी आपण polity, पंचायतराज मध्ये वाचलेल्या असतात.
5) समाजशास्त्र (Sociology) :
मराठीतून बरेच संदर्भ उपलब्ध आहेत. Syllabus देखील खूप जास्त नाही. काही thinkers / किचकट सिद्धांत, संकल्पना सोडल्या तर दैनंदिन /सामाजिक जीवनावरील घडामोडिंवर आधारित विषय आहे.
वरील सर्वच विषयांसाठी मराठी मध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत. मराठी माध्यमातून अभ्यास करणाऱ्यांसाठी वरील optional विषय चांगले आहेत. तुमच्या आवडीनुसार आणि इतर घटकांचा विचार करून optional विषय निवडू शकता.
Descriptive मुख्य परीक्षेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे Writing practice.
तुम्ही कितीही वाचन केलात, पाठांतर केलात पण writing जमत नसेल तर मार्क्स मिळणार नाहीत.
इतर काही विषय : मराठी साहित्य, अर्थशास्त्र, विधी, व्यवस्थापन
पूर्व परीक्षेचा अर्ज भरतेवेळेस Optional विषय कोणता घेणार हे अर्जात नमूद करावे लागेल.
No comments:
Post a Comment