◆ मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
◆ सेंद्रिय खत उत्पादनात देशात पंजाब राज्य प्रथम स्थानावर आहे.[महाराष्ट्र :- दुसरा]
◆ नविन प्राप्तिकर विधेयक 2025 हे आयकर कायदा 1961 कायद्याची जागा घेणार आहे.
◆ नविन प्राप्तिकर विधेयक 2025 लोकसभेत निर्मला सीतारामन यांनी सादर केले आहे.
◆ नविन प्राप्तिकर विधेयक 2025, 01 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.
◆ आशियाई ट्रायथलॉन स्पर्धा चेन्नई येथे सुरु होत आहे.
◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या स्वाती शिंदे(कोल्हापूर) ने 53 किलो वजनी गटात कुस्ती मध्ये सुवर्ण पदक जिंकले.
◆ उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 53 सुवर्ण पदके जिंकली आहेत.
◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.
◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत सेनादल संघाने सर्वाधिक 67 सुवर्ण पदके जिंकली आहेत.
◆ 38व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 195 पदके जिंकले आहेत.
◆ 38वी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा 2025 उत्तराखंड राज्यात पार पडली आहे.
◆ रजत पाटीदार याची RCB आयपीएल संघांच्या कर्णधार पदी नियुक्ती झाली आहे.
◆ ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी 2025 अवॉर्ड जोमेल अँड्रेल वॉरिकन(वेस्ट इंडिज) ला जाहीर करण्यात आला आहे.
◆ "आई एम?(I am?)" या पुस्तकाचे लेखक गोपीचंद पी. हिंदुजा हे आहेत.
◆ जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.[राष्ट्रीय महिला दिन :- 13 फेब्रुवारी]
◆ सामाजिक न्याय वर पहिला क्षेत्रीय संवाद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.
◆ कॉन्सन्टेटाइन तसुलास यांची ग्रीस देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे.
◆ ICC ने भ्रष्टाचाराच्या कारणावरून शोहेली अख्तर या महिला क्रिकेटपटूला निलंबित केले आहे.
◆ रोमानिया देशाचे राष्ट्रपती क्लाऊस इओहानिस यांनी राजीनामा दिला आहे.
No comments:
Post a Comment