Thursday, 9 January 2025

Combine Group B पूर्व 2 Feb च्या दृष्टीकोनातून ....

1. जे अगोदरपासून अभ्यासले आहे तेच पुस्तक (घटक/उपघटक) पुन्हा पुन्हा revise करा.

2. इथून पुढे 2 Feb पर्यंत अभ्यास Selective पाहिजे...(focus point ) 

3. पाठीमागील पेपर मध्ये केलेल्या चूकांवर जोरदार काम या 20 ते 21 दिवसात झालं पाहिजे.

4. Combine group B आणि group C चे 2017 ते 2023 Combine Prelims चे पेपर सतत Solve करा.

5. दररोज दिवसात आयोगाचा पेपर सोडून आभ्यास नको...! आयोगाचे सर्व पेपरचे बारकाईने स्वतः Analysis करा.

6. Elemination method आणि Logic या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत.कारण त्या परिपूर्ण अभ्यास आणि जास्तीत जास्त MCQ Solve करून आपोआप समजत असतात.

7. Elemination ने तुमचे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असते पण logic ने तुमचा प्रश्न चूकण्याची शक्यता जास्त असते. ( त्याच्यामुळे तुक्के मारायचे नाहीत.)

8. कोणतीही एखादी method use करताना विचारपूर्वक use करा ... शक्यतो logic वाचण्यात न आलेल्या प्रश्नांनाच apply करा.

9.आपली exam Combine पूर्व ची आहे... त्याच्यामुळे One liner प्रश्नात marks गेले नाही पाहिजेत.लक्षात असूद्या. नुसतं लक्षात नाही तर राहिलेल्या दिवसात चांगली तयारी करा.

10. Current आणि Math +reasoning च्या बाबतीत इथून पुढे आयोगाच्या Selective Points वरती Focus करा.

11. इथून पुढे जास्तीत जास्त revision अपेक्षित आहेत.(Focus area)

12. जूने लोकं इथून पुढे तुम्हाला खूप काहीही सूचत असतं ( हा शेवटचा Chance आहे..या वेळी तरी होईल का माझं..) एक गोष्ट लक्षात घ्या Mpsc मध्ये फक्त मनगटात धमक लागते ... बाकी माझा तरी इतर कारणांवरती विश्वास नाही..

13. शेवटी आयोगाचा पूर्व चा कोणताही पेपर हा syllabus आणि exam चा विचार करूनच सेट होत असतो हे इथे लक्षात घ्या.

14. जास्त Form आले म्हणून राज्यसेवा पूर्व सारखा पेपर येणे अपेक्षित आहे का तर कधीच नाही... त्याच्यामुळे आपल्याला एक तास वेळ आणि त्या एका तासाच्या दृष्टिकोनातूनच पेपर सेट होत असतो.

 15. म्हणून कितीही अर्ज आले तरी चमकणारे हिरे बोटावर मोजण्याइतकेच असतात.

इथून पुढे एकदम शांततेत स्वतःच काम करा .


No comments:

Post a Comment

Latest post

Combine Group B पूर्व 2 Feb च्या दृष्टीकोनातून ....

1. जे अगोदरपासून अभ्यासले आहे तेच पुस्तक (घटक/उपघटक) पुन्हा पुन्हा revise करा. 2. इथून पुढे 2 Feb पर्यंत अभ्यास Selective पाहिजे...(focus p...