Friday, 10 January 2025
🔷 चालू घडामोडी :- 10 जानेवारी 2025
◆ हिंदीचे जागतिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो.
◆ 1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ 2006 मध्ये पहिला जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला.[राष्ट्रीय हिंदी दिवस :- 14 सप्टेंबर]
◆ जागतिक हिंदी दिवस 2025 ची थीम "एक जागतिक आवाज: एकता आणि सांस्कृतिक अभिमान" ही आहे.
◆ Henley Passport Index 2025 मध्ये भारत 85व्या स्थानी असून भारतीय पासपोर्ट धारक 57 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकतात.
◆ अयोध्येत 11 ते 13 जानेवारी दरम्यान प्रतिष्ठा द्वादशी महोत्सव आयोजित केला जाईल, जो रामलल्लाच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आहे.
◆ मायक्रोसॉफ्ट या संस्थेने भारताच्या AI मिशनसोबत AI-सक्षम भागीदारीची घोषणा केली आहे. [मायक्रोसॉफ्टचे सीईओ :- सत्या नडेला]
◆ युनायटेड स्टेट्समधील लॉस एंजेलिस शहरात अलीकडेच जंगलात लागलेल्या आगीमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली.
◆ वित्त मंत्रालयात महसूल सचिव म्हणून तुइन कांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ जानेवारी 2025 मध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश राज्याने सर्वाधिक रूग्णालय नोंदणी केली आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी केली.
◆ इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात.
◆ गोव्याने विमा सखी योजना सुरू केली आणि ती लागू करणारे हरियाणा नंतर दुसरे राज्य बनले. [ही योजना पंतप्रधान मोदींच्या "सर्वांसाठी विमा" या व्हिजन अंतर्गत आहे आणि 10वी उत्तीर्ण झालेल्या 18 ते 70 वयोगटातील महिलांना सक्षम करते.]
◆ NITI Aayog च्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म (WEP) ने अवॉर्ड टू रिवॉर्ड (ATR) कार्यक्रमांतर्गत न्यू शॉपसोबत भागीदारीत "EmpowHER Biz सपना की उडान" लाँच केले.
◆ पुंटसांगचुह हा चर्चेत असलेला जलविद्युत प्रकल्प (PHEP-II) भूतान देशात आहे.
◆ लोहाच्या कमतरतेचे मूल्यांकन करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठ, युनायटेड स्टेट्स ही संस्था ॲनिमियाफोन तंत्रज्ञान विकसित करते.
◆ भारतातील पहिली व्यावसायिक उपयुक्तता-स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) किलोकारी, दक्षिण दिल्ली या ठिकाणी आहे.
◆ फ्लेमिंगो फेस्टिव्हल 2025 आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो.
◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) संस्थेने फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025 जारी केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
🔷 चालू घडामोडी :- 10 जानेवारी 2025
◆ हिंदीचे जागतिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. ◆ 1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्...
-
विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...
-
1) ............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. 1) सातारा 2) कोल्हापूर 3) कराड 4) महाबळेश्वर उत्तर :- 3 2) महा...
-
◆ "नेट-झिरो बँकिंग अलायन्स" संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) या संस्थेद्वारे आयोजित केले जाते. ◆ गुजरात राज्य 74व्या वरिष...
No comments:
Post a Comment