◆ "नेट-झिरो बँकिंग अलायन्स" संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) या संस्थेद्वारे आयोजित केले जाते.
◆ गुजरात राज्य 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करत आहे.
◆ मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना झारखंड राज्य सरकारने सुरू केली.
◆ जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक तिसरा आहे.
◆ दरवर्षी 6 जानेवारी हा जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून साजरा केला जातो.
◆ जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया देश अधिकृतपणे BRICS मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे.
◆ 14 जानेवारी 2024 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा अंदाजे GDP वाढीचा दर 6.4% आहे.
◆ ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषित केले.
◆ विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी आसाम सरकारने सुरू केलेल्या गुणोत्सव 2025 ची थीम "दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करणे" ही आहे.
◆ जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या भारतातील पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पुलाचे नाव "अंजी खड्डा पूल" आहे.
◆ "मकरविलक्कू" हा केरळमधील सबरीमाला मंदिरात मकर संक्रांतीला साजरा होणारा वार्षिक उत्सव आहे.
◆ केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी 8 जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा येथे IndusFood 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले.
◆ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील सिंहाचलम मंदिरात 13व्या शतकातील संत नरहरी तीर्थ यांची तीन फूट उंचीची मूर्ती सापडली आहे.
◆ सशस्त्र सेना न्यायाधिकरण (एएफटी) संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
◆ IIT मद्रासने थायूर येथील डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये आशियातील सर्वात मोठी शॅलो वेव्ह बेसिन संशोधन सुविधा सुरू केली आहे.
◆ पोलाद आणि अवजड उद्योग मंत्रालयाने स्पेशालिटी स्टीलसाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना (PLI स्कीम 1.1) सुरू केली.
No comments:
Post a Comment