Saturday, 14 December 2024

राज्यघटना निर्मिती


1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? 

एन् एम् राॅय(1934)


2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता? 

नेहरू रिपोर्ट

 

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली? 

कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना) 


4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते? 

1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स


5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? 

24 मार्च 1946


6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली? 

16 मे 1946


7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती? 

389


8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या? 

जुलै -आॅगस्ट 1946


9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या? 

296


10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या? 

काँग्रेस 208


11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची  सदस्य संख्या किती झाली? 

299


12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते? 

70


13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते? 

संयुक्त प्रांत(55)


14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला? 

10 लाख

 

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या? 

15


16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे  भरले होते? 

दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात) 


17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? 

9ते23 डिसेंबर 1946


18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते? 

211


19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? 

सच्चिदानंद सिन्हा 


20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते? 

ए के अँथनी 


21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली? 

राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)


22)घटना समितीचे सल्लागार कोण होते? 

बी एन राव

 

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? 

हरेंद्र मुखर्जी 


24)घटना समितीचे सचिव कोण होते? 

व्हि आर अय्यंगार

 

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले. 

11.


महाजनपदे



१.    काशी – हे पुरातन महाजनपद आहे. याचे बौद्ध जातक कथांमध्ये वर्णन आहे. सध्याच्या वाराणसी या शहाराजवळ हे राज्य होते. काशीच्या शेजारी कोशलचे राज्य होते.


२.    कोशल- सध्याच्या उत्तर प्रदेशातील अवध परिसरात हे महाजनपद होते. काशी शाक्य जमातीचा पराभव या राज्याने केला होता. याचा विस्तार करण्यामध्ये प्रसेनजीत राजाचा मोठा वाटा होता.


३.    अंग – सध्याच्या बिहार राज्यातील भागलपूर व मोंगीर जिह्य़ात हे महाजनपद होते. चंपा हे राजधानीचे ठिकाण होते. व्यापारउदिमासाठी प्रसिद्ध होते. बिंबिसाराने अंग हे राज्य मगध साम्राज्यात जिंकून विलीन केले.


४.    वज्जी किंवा वृज्जी – सध्याच्या उत्तर बिहारमध्ये आठ जमातींचे हे एक गणतंत्र होते. वैशाली ही या गणतंत्राची राजधानी होती. वज्जीची राजधानी मिथिला होती. वैशाली ही लिच्छिवीची राजधानी होती. वर्धमान महावीराची आई लिच्छिवी वंशातली होती. वैशाली येथे दुसरी बौद्ध परिषद पार पडली होती. 


५.    मल्ल – प्रजातंत्रीय राज्य म्हणून प्रसिद्ध. या राज्याच्या कुशीनगर आणि पावा या दोन राजधान्या होत्या. कुशीनगर येथे गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. 


६.    चेदी – सध्याच्या बुंदेल खंड भागात हे राज्य होते.


७.    वत्स – सध्याच्या अलाहाबादजवळ होते. याची कौशम्बी ही राजधानी होती. उदयन हा पराक्रमी राजा या राज्यात होऊन गेला.


८.    कुरू – सध्याच्या दिल्ली मेरठ परिसरातील ठिकाण. येथे कुरू जमातीचे राज्य होते. वैदिक काळातच याला महत्त्व आले होते. 


९.    पांचाल- दिल्लीच्या उत्तरेस व पूर्वेस हिमालयाच्या पायथ्यापासून चंबळपर्यंत पांचालांचे राज्य पसरले होते.


१०.    मत्स्य – आधुनिक राजस्थानातील जयपूर, भरतपूर, अल्वा येथे हे राज्य होते.


११.    शूरसेन – मथुरा याची राजधानी होती.


१२.    अस्मक किंवा अश्मक – अवंत राज्याच्या शेजारीचे राज्य व गोदावरी नदीच्या तटापर्यंत पसरलेले होते. हे राज्य अवंती राज्यात विलीन झाले.


१३.    गांधार – सध्याच्या पेशावर व रावळिपडी या ठिकाणी हे राज्य होते. तक्षशिला याची राजधानी होती.


१४.    कंबोज – आधुनिक पाकिस्तान व गुजरातमधील भूप्रदेश मिळून हे राज्य होते.


१५.    अवंती – उज्जन ही याची राजधानी होती.


१६.    मगध – हे बिहार राज्यातील पाटणा आणि गया या जिल्ह्य़ात होते. मगधाचा उदय सर्वात शक्तिशाली साम्राज्य म्हणून झाला.

सिंधू संस्कृतीतील महत्त्वाची ठिकाणे


१) हडप्पा :- रावी नदीच्या डाव्या किनाऱ्यावर पाकिस्तानातील पूर्व पंजाबमधील मॉण्टगोमरी जिल्ह्य़ात आहे. याचा शोध १९२१ मध्ये दयाराम साहनी यांनी लावला. येथे धान्याचे कोठार सापडले आहे. तसेच दफनभूमी, दगडाची मानवी नृत्य करणारी मानवी मूर्ती सापडली आहे. येथे मानवी सांगाडे सापडले आहेत.


२) मोहोंजोदरो :- याचा अर्थ ‘मृताची टेकडी’ असा होतो. याचा शोध १९२२ मध्ये आर. डी. बॅनर्जी यांनी लावला. हे ठिकाण सिंधू नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हे सर्वात मोठे नगर असावे. शहराचा आकार आयताकृती होता. कांस्य समिश्राचे नर्तिकेची मूर्ती येथे सापडलेली आहे. दाढी असलेली दगडी मूर्ती देखील सापडली आहे. भांडय़ात कपडय़ाचा तुकडा सापडलेला आहे. भांडय़ाच्या तुकडय़ावर जहाजाचे चित्र आढळून आले आहे.


३) चन्होदारो :- ( chanhudaro) :- पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सिंध नदीवर वसलेले होते. याचा शोध  एम. जी. मुजुमदार यांनी लावला. हडप्पा संस्कृतीतील एकमेव ठिकाण जेथे Citadel  ( किल्ला ) आढळलेला आहे. येथे बांधकामाचे दगड मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. हे मनी तयार करण्याचे प्रसिद्ध ठिकाण असावे.


४) कालिबंगन  ( kalibangan) :- राजस्थानातील घग्गर नदीवर वसलेले ठिकाण. याचा शोध ए. घोष यांनी लावला. कालिबंगन म्हणजे काळ्या बांगडय़ा येथे उंटाचे हाड सापडले आहे. येथे पूर्व हडप्पा व परिपक्व हडप्पा अशा दोन्ही अवस्था आढळून आल्या आहेत.


५) लोथल :- गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्य़ातील भोगावा नदीतीरावरील वसलेले ठिकाण. याचा शोध एस. आर. राव यांनी लावला. हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर होय. येथे कृत्रिम जहाज बोट सापडली आहे. येथील मुद्रांवर जहाजाची चित्रे आहेत.


६) बनवाली :- याचा शोध आर. एस. बिस्त यांनी लावला. हरियाणातील हिस्सार जिल्ह्य़ातील हे ठिकाण. येथे यव ( बार्ली) हे धान्य सापडलेले आहे.


७) धोलवीरा :- गुजरातमधील हे ठिकाण. याचा शोध डॉ. जे. पी. जोशी व आर. एस. बिस्त यांनी लावला. 


८) राखीगड :- घग्गर नदीवरील हरियाणातील हे शहर धोलवीरापेक्षाही मोठे होते.


९) रोपार :- पंजाबमधील सतलज नदीवरील ठिकाण. याचा शोध यज्ञदत्त शर्मा यांनी लावला.मृतांसोबत कुत्रा पुरल्याचे अवशेष येथे सापडलेले आहेत.


१०) सुरकोटाडा :- गुजरातमधील कच्छ जिल्ह्य़ातील हे ठिकाण. याचा शोध जगपती जोशी यांनी लावला.


११) कोटदिजी :-पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सिंधू नदीवरील हे ठिकाण. येथे परिपक्व हडप्पा संस्कृती असावी. येथे चाकावरील मृद भांडी व तीही रंगवलेली आढळून आलेली आहे.


१२) सुतकागेंडोर :-पाकिस्तानातील बलुचिस्तानातील ठिकाण. याचा शोध औरेल स्टेईन याने लावला.

Combine 2024 Geography खालीलप्रमाणे....


संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम व्यवस्थित अभ्यासा 📚📖✌️


🔅महाराष्ट्र स्थापना..

महसूल विभाग, जिल्हा,तालूके, घनता,साक्षरता,स्ञी-पुरूष प्रमाण...


🔅महाराष्ट्र :स्थान ,विस्तार व आकार

महाराष्ट्र व भारत अक्षवृत्त व रेखावृत्त विस्तार, महाराष्ट्र व भारताचे  क्षेञफळ,महाराष्ट्र व भारत विस्तार (पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण)


🔅महाराष्ट्र राजकीय भूगोल 


प्रशासकीय विभाग, क्षेञफळानुसार क्रम,तालुका क्रम ,प्रादेशिक विभागानुसार क्रम,विभाग व त्यांच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके

जिल्हांची सरहद्द ,जिल्हा व त्याला लागून असणाऱ्या जिल्हांची सीमा


🔅प्राकृतिक भूगोल(रचनात्मक)

कोकण किनारपट्टी सह्याद्री/पश्चिम घाट,देश/महाराष्ट्र पठार/दख्खन पठार, खलाशी,वलाटी, डोंगर रांगा,खडक आढळ,शिखरे,घाट,लेण्या.....


🔅भारताची व महाराष्ट्राची जनगणना..


एकूण लोकसंख्या,स्ञी-पुरूष प्रमाण, साक्षरता,घनता,SC व ST लोकसंख्या,जिल्हे अनुसूचित जमाती,लोकसंख्या वाढ,जनगणना..


🔅स्थलांतर 


स्थलांतर शेती शेती (प्रकार) ,सर्वाधिक स्थलांतर क्रम, 


🔅नदीप्रणाली 


पूर्व वाहिनी नद्या(गोदावरी,भीमा,कृष्णा) ,पश्चिम वाहिनी नद्या (तापी ,कोकण,नर्मदा)..

कोकणातील नद्या:उत्तर कोकण-मध्य कोकण-दक्षिण कोकण....उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा..लांबीनुसार व क्षेञफळानुसार क्रम..


🔅खनिज संपत्ती .


🔅धरणे,पठार, धबधबे,हवामान,


🔅वनसंपत्ती,महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने,अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प 


🔅महाराष्ट्रातील उर्जा साधन संपत्ती


औष्णिक विद्युत केंद्र(प्रकल्प), जलविद्युत, खनिज तेल व नैसर्गिक वायू,अणुऊर्जा प्रकल्प, अणुभट्या ,पवनउर्जा 


🔅राष्ट्रीय महामार्ग 44,53

रेल्वे ,पर्यटन 


🔅कृषी(min 2 question)...रोग ,रासायनिक खत, शेळी, मेंढ्या,म्हैस,  यांच्या जाती किंवा विविध पिकांची जात याच्यावरती प्रश्न येतो ...त्याचबरोबर वनस्पती(मुख्य पीके) Scientific Name, सुद्धा विचारू शकतात..etc


🔅india मधील..कर्कवृत्त क्रम, सरहद्द,मृदा,खनिज, खिंडी,महत्वाच्या नद्या...हवामान, महत्वाचे प्रकल्प,...व्यवस्थित करा..


जास्तीत जास्त revision करा ....भरपूर मार्क मिळवून देणारा विषय आहे....

परिक्षाभिमुख महत्वाचे निर्देशांक :


◾️हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 : 7 वा क्रमांक

◾️ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2024 : 29 वा क्रमांक

◾️मानव विकास निर्देशांक (2023-2024) : 134 वा क्रमांक

◾️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 : 111 वा क्रमांक

◾️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 : 126 वा क्रमांक

◾️लैंगिक असमानता निर्देशांक 2022 (GII) : 108 (193 पैकी)

◾️ग्लोबल पीस इंडेक्स 2024 : 116 वा क्रमांक

◾️जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 : 13 वा क्रमांक

◾️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 :  82 वा क्रमांक

◾️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक : 40 वा क्रमांक

◾️आंतरराष्ट्रीय आयपी निर्देशांक : 42 वा क्रमांक

◾️लोकशाही निर्देशांक 2023 : 41 वा क्रमांक

◾️मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग 2024 : 4 था क्रमांक

◾️WEF चा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स : 129 वा क्रमांक

◾️जागतिक सायबर क्राइम इंडेक्स :10 वा क्रमांक

◾️जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2024 : 3 (सर्वात प्रदूषित तिसरा देश)

◾️Corruption Perceptions Index 2023 : 93 वा क्रमांक

◾️ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 : 63 वा क्रमांक

◾️Artificial Intelligence Preparedness Index 2024 : 72 वा क्रमांक

◾️Sustainable Development Report 2024 : 109 वा क्रमांक

◾️भारतात थेट परकीय गुंतवणुक 2023 : 15 वा क्रमांक

◾️हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 : 3 रा क्रमांक (67 युनिकॉर्न स्टार्टअप्स)

◾️World Happiness Index 2024 : 126 वा क्रमांक

◾️लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 : 38 वा क्रमांक

◾️ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 :  40 वा क्रमांक

◾️जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 : 159 वा क्रमांक

हे पुरस्कार एकदा वाचून जावा


🎯टाइम मॅगझिन एथिलिट ऑफ द इयर 2023 :-

लिओनेल मेस्सी

🎯टाइम पर्सन ऑफ द इयर 2023

टेलर स्विफ्ट

🎯पाहिला वणभुषण 2024

चैत्राम पवार

🎯महाराष्ट्र भूषण 2024

प्रदीप महाजन

🎯महाराष्ट्र भूषण 2023

अशोक सराफ

🎯पुण्यभूषण पुरस्कार 2024

डॉ विजय भटकर

🎯पाहिला उद्योगरत्न पुरस्कार

रतन टाटा 

🎯33 वा व्यास सन्मान पुरस्कार

पुष्या भरती

🎯 वि. दा.करंदीकर 2023 पुरस्कार

डॉ.रवींद्र शोभणे

🎯58 वा ज्ञानपीठ पुरस्कार

जगद्गुरु रामभद्राचार्य व गुलजार

🎯 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार 

प्रभा वर्मा

🎯लोकमान्य टिळक पुरस्कार2023

नरेंद्र मोदी 

🎯लता मंगेशकर पुरस्कार 2024

अमिताभ बच्चन 

🎯नॉर्मन बोरलॉग पुरस्कार

बी. आर.कंबोज

🎯ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2923

नारायण जाधव

🎯महर्षी पटवर्धन पुरस्कार

मिलिंद निकुंभ

🎯एम एस स्वामिनाथन पुरस्कार

स्वाती नायक

🎯 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 

वहिदा रहेमान

🎯पंडित भिमसेन जोशी पुरस्कार 2024

शशिकांत मुळे 

🎯अबेल पुरस्कार 2024

मिशेल टेलाग्रांड 

🎯 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 

जेनी इर्पेनबेक 

🎯ग्रीन नोबेल पुरस्कार 

आलोक शुक्ला

🎯 आ.भा.नाट्य परिषद जीवनगौरव

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी 

🎯महाराष्ट्र शासन महागौरव पुरस्कार 2024निखिल वाघ

🎯जनस्थान पुरस्कार 2023

अशा बगे

🎯मिस इंडिया2024

सिनी शेटी 

🎯मिस युनिव्हर्स 2024

शेनिस पॅलेसिओस 

🎯विष्णुदास भावे पुरस्कार 2024

अमोल पालेकर 

🎯ग्लोबल टीचर पुरस्कार 2024

सिस्टर जेफ

🎯शांततेचा नोबेल पुरस्कार

नर्गिस  मोहम्मद 

🎯साहित्याचा पुरस्कार

युवान फॉस

🎯के.पी.नेंबियार पुरस्कार

आर माधवन

🎯अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार

क्लोडिय गोल्डीन 

🎯साऊथ येशियन पर्सन ऑफ द इयर2024

अवंतिका वंदणापू

🎯जागतिक विश्र्वसहित्या पुरस्कार

ममता सागर

🎯गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 

सुरेश वाडकर 

🎯 आर्यभट्ट पुरस्कार 2024

पावुलुरी सुब्बाराव

🎯पाहिला डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार2024

शरद पवार

🎯पाहिला शिवसन्मान नाम पुरस्कार

नरेंद्र मोदी

जगातील सर्वात मोठे

● जगातील सर्वात मोठा महासागर : पॅसिफिक महासागर

● सर्वात मोठे आखात : मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.

● सर्वात मोठा उपसागर : हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.

● सर्वात मोठा व्दिपकल्प : अरेबिया

● सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश : सुंदरबन (प.बंगाल)

● सर्वात मोठे भूखंड : युरेशिया (युरोप+आशिया) 

● सर्वात लहान भूखंड : ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.

● सर्वात मोठे बेट : ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.

● सर्वात मोठे व्दिपसमूह : इंडोनेशिया (13,000) बेटे

● सर्वात मोठे व उंचीवरील पठार : तिबेटचे पठार.

● सर्वात मोठी नदी व खोरे : अ‍मेझोन (द. अमेरिका)

● सर्वात लांब नदी : नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.

● सर्वात लांब हिमनदी : लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.

● सर्वात उंच धबधबा : एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.

● सर्वात मोठे वाळवंट : सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.

● सर्वात कमी तापमानाचे ठिकाण : वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.

● सर्वात उष्ण ठिकाण : डेथ व्हॅली (अमेरिका)

● सर्वात मोठा देश (आकारमान) : रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.

● सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) : टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.

● सर्वात छोटा देश (आकारमान) : व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)


सरकरिया आयोग -


•अध्यक्ष : आर. एस. सरकारिया.

•सदस्य : बी. शिवरामन, एस. आर. सेन.

•स्थापना : १९८३ एका वर्षासाठी परंतु वाढ करण्यात आली.

•अहवाल : १९८७ 

•शिफारशी - एकूण २४७

१. कलम 263 अन्वये आंतर राज्य परिषद स्थापन करणे.

नाव - आंतर - शासन परिषद.

२. अखिल भारतीय सेवा अधिक प्रबळ करणे व नवीन सेवा निर्माण करणे.

३. राज्य विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी आली असल्यास व ती राखून ठेवली असल्यानं त्याचे कारण कळवणे.

४. राज्यपालांच्या नियुक्तीसाठी राष्ट्रपतींनी संबंधित मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करावा हे घटनेत मांडणे.

५. अत्यंत अपरिहार्य करणे वगळता राज्यपालांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात बदल करू नये.

६. कठीण परिस्थितीत अखेरचा उपाय म्हणून राष्ट्रपती शासनचा वापर करावा. कलम 356.

७. कर आकारण्याचा उर्वरित अधिकार संसदेकडे तसेच राहू द्यावे. व उर्वरित अधिकार समावर्ती सूचित अंतर्भूत करावे.

८. राष्ट्रीय विकास परिषद नामांतर - राष्ट्रीय अर्थ व विकास परिषद.

९. विधानसभेत बहुमत असे पर्यंत राज्यपाल मंत्रिमंडळ बरखास्त करू शकत नाही.

१०. भाषिक अल्पसंख्यांक आयुक्त - पद - पुन्हा कर्यांवयित.

राष्ट्रीय उद्याने/व्याघर प्रकल्प यादी


🎯 उत्तराखंड  

   - जिम कॉर्बेट / कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प 🐅🌳  


🎯 राजस्थान  

   - रणथंभोर / रणथंभोर व्याघ्र प्रकल्प 🐯🏞  


🎯 मध्यप्रदेश  

   - बांधवगड / बांधवगड व्याघ्र प्रकल्प 🐅🌄  

   - कान्हा / कान्हा व्याघ्र परकल्प 🐅🍃  

   - सतपुडा / सतपुडा व्याघ्र परकल्प 🌲🦌  


🎯 महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश  

   - पेंच / पेंच व्याघ्र प्रकल्प 🐾🌴  


🎯 पश्चिम बंगाल  

   - सुंदरबन / सुंदरबन व्याघ्र प्रकल्प 🌊🐅  

   - बुक्सा / बुक्सा व्याघ्र परकल्प 🌿🐾  


🎯 कर्नाटक  

   - बांदीपूर / बांदीपूर व्याघ्र प्रकल्प 🐘🌳  

   - नागरहोल / नागरहोल व्याघ्र प्रकल्प 🌲🐅  


🎯 आसाम  

   - काझीरंगा / काझीरंगा व्याघ्र प्रकल्प 🐃🌾  

   - मानस / मानस व्याघ्र प्रकलप 🦏🐅  


🎯 तामिळनाडू  

   - मुदुमलाई / मुदुमलाई वयाघ्र प्रकल्प 🐾🌳  


🎯 केरळ  

   - पेरियार / पेरियार व्याघ्र प्रकल्प 🐅💧  


🎯 ओडिशा  

   - सिमलीपाल / सिमलीपाल व्याघर प्रकल्प 🌳🐅  


🎯 उत्तर प्रदेश  

   - दुधवा / दुधवा व्याघ्र प्रकल्प 🌾🐅  

   - पिलिभीत / पिलिभीत व्याघ्र प्रकल्प 🌿🐾  


🎯 बिहार  

   - वाल्मिकी / वाल्मिकी व्याघर प्रकल्प 🐾🌲  


🎯 छत्तीसगड  

   - इंद्रावती / इंद्रावती व्याघ्र प्रकल्प 🌲🐅  


🎯 अरुणाचल प्रदेश  

   - नामदाफा / नामदाफा व्याघ्र प्रकल्प 🌿🐅

गुप्त साम्राज्य


🤺संस्थापक श्री गुप्त

  

🤺चंद्रगुप्त १

 

महाराजाधिराज

लीछवी कूळातील कुमार देवी हिच्याशी विवाह.


🤺समुद्रगुप्त 


 सर्व राजांचे आज्ञा संपुष्टात आणणारा असा.

 त्यांनी मिळवलेले विजय आणि त्याचे पराक्रम हे प्रयाग प्रशस्ती व अलाहाबाद प्रशस्ती येथे नमूद केलेले आहेत.

तो विनावादनात प्रवीण होता.

वाकाटक राज्य वगळता कांचीपर्यंतचा प्रदेश हा त्याच्या under होता.

 अश्वमेध यज्ञ केले व स्वतःला चक्रवर्ती घोषित केले.

शक कुशाण श्रीलंकाराजे सर्वांनी त्याची अधिसत्‍ता स्वीकारली. 

याला भारताचा नेपोलियन म्हटले जाते 

तो अशोकाच्या अगदी उलट होता.


🤺 दुसरा चंद्रगुप्त


याने शकांचा पराभव केला म्हणून त्याचा उल्लेख शकारी असा केला जातो.

 त्याने विक्रमादित्य हे बिरूद धारण केलीत.

याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन यांच्याशी झाला.


 🤺कुमार गुप्त 


यांनी हुणांची आक्रमण थोपावली.


दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये नवरत्न होती 👇

धन्वंतरी वैद्य 

क्षपणाक फल ज्योतिषी 

अमरसिंह कोषकार 

शंकू शिल्पज्ञ 

वेताळभट्ट मांत्रिक

 घटकपूर रथपती लेखक 

कालिदास महाकवी 

वराहमवीर खगोलशास्त्रन

 वररूची वैयाकरणी


गुप्त काळ हा अभिजात संस्कृतीचा काळ म्हणून ओळखला जातो.

भारतातील मंदिर स्थापत्याचा पाया घातला गेला. 

दिल्ली महरौली लोहस्तंभ या स्तंभावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे.

या काळात स्मृती ग्रंथांची निर्मिती झाली.

कापडाचे विविध प्रकार.

कालिदासाचे शाकुंतल हे नाटक.


फाहीयान हा चिनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात आला होता.

१४ वर्ष भारतात होता.

गांधार तक्षशिला पेशावर मथुरा कनोज श्रावस्ती कपिल वस्तू कुशीनगर वैशाली पाटलीपुत्र अशा सर्व ठिकाणी तो जाऊन आला.

भारतीय संसदेमधील विविध प्रकारचे बहुमत✅

🔥 साधारण बहुमत:

- साधारण बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: सर्वसाधारण विधेयक, ठराव, नवीन राज्य निर्मिती, विधान परिषदांची निर्मिती, नागरिकत्व कायदे, इ. (कलम 2/3, कलम 368 वगळता).


🔥 प्रभावी बहुमत:

- प्रभावी बहुमत: सर्व सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.(vacancy deducted)

- वापर: अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची हटवणूक.


🔥 संपूर्ण बहुमत:

- संपूर्ण बहुमत: सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: महत्त्वपूर्ण ठराव पास करण्यासाठी आवश्यक.


🔥 विशेष बहुमत:

📌 विशेष बहुमत प्रकार 1:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3.

- वापर: सर्व भारतीय सेवा निर्मिती (कलम 312), राज्यसभेचा ठराव (कलम 249).


📌 विशेष बहुमत प्रकार 2:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाचा एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.

- वापर: न्यायाधीशांची व CEC ची हटवणूक, दुरुस्ती (कलम 368(1)).


📌 विशेष बहुमत प्रकार 3:

- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक आणि साधारण बहुमताने निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचे बहुमत.

- वापर: संविधानातील दुरुस्ती (कलम 368), 4था अनुसूची, 7वा अनुसूची, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या शक्ती, राष्ट्रपती निवडणूक (कलम 54/55), केंद्र-राज्य संबंध, संसदेमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व.


🔥 राष्ट्रपती महाभियोग:

- महाभियोग: सर्व सदस्यांच्या 2/3.***

- वापर: राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी आवश्यक.

वेदोक्त प्रकरण


1899 साली हे प्रकरण कोल्हापूरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत.


एकेदिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.


त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं.


हे उत्तर शाहू महाराजांसाठी एक मोठ्या विचारमंथनाचं कारण ठरलं. त्या वाक्यानं ते अंतर्मूख तर झालेच त्याहून पुढील मोठ्या सामाजिक चळवळीसाठी सिद्ध झाले.


क्षत्रियकुलावतंस हिंदुपदपातशहा असं बिरुद लावणाऱ्या राजालाही दर्जा मिळत नसेल तर बाकी लोकांवर काय अन्याय होत असेल याची त्यांना जाणीव झाली.


वेदोक्ताचं असं प्रकरण उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीही असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी काशीहून गागाभट्टांना बोलावून राज्याभिषेक करवून घेतला होता.


साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही वेदोक्ताधिकाराचा तंटा निर्माण झाल्यावर त्यांनी पंडितांची एक निर्णयसभा बोलावली आणि त्यामध्ये मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध होऊन त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य केला गेला.


1896 साली बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्याकडील धार्मिक विधी महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिल्यावर सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकरवी ते करवून घेतले होते.


या वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात न पडते तरच नवल. यातून एकप्रकारचा संघर्षच निर्माण झाले. महाराष्ट्रातील तत्कालीन वर्तमानपत्रांतून, सभा-भाषणांतून त्याची दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ लागली.


ऑक्टोबर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे दोन अग्रलेख लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती थोडक्यात अशी होती, “या युगात ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ण राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहिती होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करुन गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला; पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही.”


नवा राजवाडा, कोल्हापूर

छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय इतर घराण्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणं हे शाहू महाराजांना अस्वस्थ करणारं होतं. आधी फक्त आपल्यापुरते राजवाड्यासाठी वेदोक्ताचा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसेही प्रयत्नही केले.


पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतींल मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले.


ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.


संस्थानचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30 हजारांचे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50 हजार रुपयांचे उत्पन्न सरकारजमा करण्यात आले. इतरही शेकडो ब्राह्मणांची उत्पन्नं आणि इनाम सरकारजमा करण्यात आले.


हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलपर्यंतही गेले. वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा, टीका घडत राहिली. 1905 साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण निवळले.

2024 मधील महत्त्वाचे युद्ध सराव :-


•  Desert Cyclone : भारत ×UAE (2 ते 15 जानेवारी 2024)


•  Exercise CYCLONE : भारत× इजिप्त (22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024)


•  खंजर युध्दाभ्यास : भारत × कझाकीस्थान (22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024)


•  सदा तानसीक : भारत × सौदी अरेबिया (29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024)


•  धर्मा गार्डियन : भारत × जपान (25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2024)


•  समुद्र लक्ष्मण : भारत× मलेशिया (28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024)


•  TIGER TRIUMPH : भारत× अमेरिका (18 ते 25 मार्च 2024)


•  लॅमितिये युध्दाभ्यास : भारत × सेशेल्स ( 28 ते 27 मार्च 2024)


•  डस्टलिक युध्दाभ्यास : भारत × उझबेकिस्थान (15 ते 28 एप्रिल 2024)


•  शक्ती युध्दाभ्यास : भारत× फ्रान्स (13 ते 26 मे 2024)


•  Nomadic Elephant 2024 : भारत×मंगोलिया (3 ते 16 जुलै 2024)


•  वरूण युध्दाभ्यास : भारत × फ्रान्स (2 ते 4 सप्टेंबर 2024)


•  उदारा शक्ती 2024 : भारत×मलेशिया  (5 ते 9 ऑगस्ट 2024)


•  मित्र शक्ती (10 वा) : भारत×श्रीलंका (12 ते 25 ऑगस्ट 2024)


•  काकडू युध्दाभ्यास 2024 : ऑस्ट्रेलिया × बहुराष्ट्रीय (7 ते 20 सप्टेंबर 2024)


•  युद्ध अभ्यास - भारत × अमेरिका (9 ते 24 सप्टेंबर)


•  इस्टर्न ब्रिज :  भारत×ओमान (11 ते 22 सप्टेंबर 2024)


•  अल नजाह 2024 : भारत × ओमान (13 ते 26 सप्टेंबर 2024)


•  काझिंद 2024 - भारत × कझाकीस्थान ( उत्तराखंड- 7 ते 13 ऑक्टोबर 2024)


•  नसीम अल बहर नौदल सराव 2024 - भारत×ओमान ( गोवा- 13 ते 18 ऑक्टोबर 2024)


•  SIMBEX 2024 (31वा) - भारत × सिंगापूर ( विशाखापट्टणम - 23 ते 29 ऑक्टोबर 2024 )


•  ऑस्ट्रेहिंद 2024 : भारत × ऑस्ट्रेलिया (पुणे - 8 ते 21 नोव्हेंबर 2024)


•  VINBAX- 2024 (5th) - भारत × व्हिएतनाम (अंबाला - 4 ते 23 नोव्हेंबर 2024)


•  गरुड शक्ती (9th) - भारत × इंडोनेशिया (सिजंटुंग, जकार्ता, इंडोनेशिया 1 ते 12 नोव्हेंबर 2024)


•  अंतरिक्ष अभ्यास 2024 - पहिला अंतराळ संरक्षण सराव (11 ते 13 नोव्हेंबर 2024)


•  संयुक्त विमोचन 2024 - भारतीय लष्कर (गुजरात - 18 - 19 नोव्हेंबर)


•  सी व्हिजिल-24 -भारतीय नौदल सर्वात मोठा तटीय संरक्षण सराव (20 -21 नोव्हेंबर 2024)

राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाबद्दल या गोष्टी लक्षात ठेवा यावर प्रश्न असतोच


◾️पाहिले अधिवेशन - 1885 - मुंबई (व्योमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते (पाहिले ख्रिश्चन अध्यक्ष)

◾️ पहिले अधिवेशन मुंबईत गोपाळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले

◾️ पहिल्या अधिवेशनात एकूण 72 प्रतिनिधी होते

◾️पहिल्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते

◾️ राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ऑलन ह्युम,  हेन्री कॉटन , विल्यम वेडर बर्न हे इंग्रज अधिकारी उपस्थित होते

◾️दुसरे अधिवेशन - 1886 - कोलकाता दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते

◾️सी शंकरन नायर - हे  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष 1897 (13 वे ) - अमरावती

◾️1924 (40 वे) - महात्मा गांधी (बेळगाव) - महात्मा गांधी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले( आणि हे एकमेव अधिवेशन आहे अध्यक्ष म्हणून)

◾️1896 कलकत्ता अधिवेशन - रहिमतुल्ला एम. सयानी (राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' पहिल्यांदा गायले गेले)

◾️1911कलकत्ता अधिवेशन - बिशन नारायण धर अध्यक्ष ('जन गण मन' पहिल्यांदा गायले)

◾️1917 कलकत्ता अधिवेशन ॲनी बेझंट - पहिल्या महिला अध्यक्ष (भारतीय नाही)

◾️1925 कानपूर अधिवेशन - सरोजिनी नायडू - पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष

◾️1929 लाहोर अधिवेशन - अध्यक्ष जवाहरलाल नेहरू' पूर्ण स्वराज' ठराव

◾️1936 : फैजपूर अधिवेशन - जवाहरलाल नेहरू अध्यक्ष - पहिले ग्रामीण अधिवेशन अधिवेशन

◾️ 1907 सुरत अधिवेशनात जहाल गट आणि मवाळ गट अशी फूट पडली

◾️1916 : लखनऊ अधिवेशनात जहाल गट आणि मवाळगट पुन्हा एकत्र आले

◾️ घ.दा बिर्ला आणि वालचंद हिराचंद हे राष्ट्रीय महासभेत सामील झाले नाहीत परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक मदत केली

◾️ काँग्रेसचे 4 थे अधिवेशन अलाहाबाद - अध्यक्ष जॉर्ज युल या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले होते

◾️1946 : मेरठ अधिवेशन - आचार्य कृपलानी - स्वातंत्र्यापूर्वीचे शेवटचे अधिवेशन

◾️1948 : जयपूर अधिवेशन - पट्टाभी सीतारामय्या अध्यक्ष - स्वातंत्र्यानंतरचे पहिले अधिवेशन

◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सरचिटणीस - एओ ह्यूम

◾️INC च्या पहिल्या अधिवेशनावेळी लॉर्ड डफरिन हे व्हाइसरॉय होते

◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष - बद्रुद्दीन तैयबजी (1887 चेन्नई 3रे)

◾️1889 च्या अधिवेशनात ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य चार्ल्स ब्रेड लॉ उपस्थित राहिले

◾️ राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे ऐवजी मुंबईत भरवले कारण पुण्यात कॉलरा ची साथ आली होती

◾️पाहिले परकीय अध्यक्ष - जॉर्ज यूल (3रे) - 1888 - अलाहाबाद 


👉 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना वेळ 72 प्रतिनिधी पैकी मुंबई प्रांताचे  प्रतिनिधी (यावर प्रश्न येतो)

◾️दादाभाई नौरोजी

◾️के टी तेलंग

◾️फिरोजशहा मेहता

◾️कृष्णाजी नूलकर

◾️दिनशा वाँच्छा

◾️नारायण गणेश चंदावरकर

◾️शिवराम हरी साठे

◾️रहिमतुल्ला सयानी

◾️वामन शिवराम आपटे

◾️सीताराम चिपळूणकर

◾️रामकृष्ण गोपाल भांडारकर

◾️रामचंद्र मोरेश्वर साने

◾️गोपाळ गणेश आगरकर

◾️गंगाराम मस्के

◾️बेहराम मलबारी

◾️न्या. महादेव गोविंद रानडे

वनस्पतींमधील काही महत्त्वाचे हार्मोन्स


 🌱 ऑक्सिन्स:

- कार्य: पेशी वाढवणे, मुळांचा विकास, एपिकल वर्चस्व आणि फोटोट्रॉपिझम नियंत्रित करते.


 🌿 सायटोकिनिन्स:

- कार्य: पेशी विभाजनाला चालना देतात, वृद्धत्वास विलंब (वृद्धत्व) आणि शिखर वर्चस्व नियंत्रित करते.


 🌾 जिब्बेरेलिन्स:

- कार्य: स्टेम वाढवणे, फळांची वाढ, बियाणे उगवण आणि फुलणे उत्तेजित करते.


 🍂 ॲब्सिसिक ॲसिड (एबीए):

- कार्य: वाढ रोखते, बियाणे सुप्तावस्थेत राहण्यास प्रोत्साहन देते, पर्यावरणीय ताणाला प्रतिसाद नियंत्रित करते.


 🍇 इथिलीन:

- कार्य: फळ पिकणे, पानांचे गळणे आणि वृद्धत्व नियंत्रित करते, तसेच रोपांमधील यांत्रिक तणावाच्या तिप्पट प्रतिसादास प्रोत्साहन देते.


🌼 ब्रासिनोस्टेरॉईड्स:

- कार्य: पेशी वाढवणे, बियाणे उगवण यांना प्रोत्साहन देते आणि तणावाचा प्रतिकार वाढवते.

वस्तू आणि सेवा कर (GST) बद्दल काही महत्वाच्या तथ्ये :-


➡️ हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर आहे.


➡️ 1954 मध्ये जीएसटी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश होता


🔖 GST हा 101वा दुरुस्ती कायदा म्हणून सादर करण्यात आला.

➡️ संविधानिक दुरुस्ती विधेयक 122वी दुरुस्ती विधेयकाद्वारे नवीन करप्रणाली भारतात एप्रिल 2016 पासून लागू केली जाणार आहे.


⭐️ GST कायदा विधानसभेत पारित करणारे भारतातील पहिले राज्य 

- आसाम


⭐️ भारताचा GST कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे ?

- कॅनडा


⭐️ भारतात GST कधीपासून लागू झाला ? 

- 1 जुलै 2017


⭐️ भारत GST लागू करणारा कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

- 171 वा देश 


⭐️ भारतात GST लागू करण्याची सूचना कोणत्या समितीने केली ? 

- विजय केळकर समिती


⭐️ जीएसटी विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते 

- असीम दासगुप्ता


⭐️ GST दरांचे किती प्रकार आहेत ?

- 0% 5% 12% 18% 28%


⭐️ GST नोंदणी क्रमांकामध्ये किती अंक आहेत

- 15 अंक


⭐️ GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत 

- अर्थमंत्री


⭐️ राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयाचे उद्घाटन 

– पणजी, गोवा येथे. 


➖➖➖➖➖➖➖➖➖

महत्त्वाची माहिती वाचून काढा.

1. भगवान बुद्धांना ज्ञान कोठे मिळाले? 

उत्तर : बोधगया


2. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 

उत्तर : स्वामी दयानंद


3. पंजाबी भाषेची लिपी काय आहे? 

उत्तर : गुरुमुखी


4. भारतीय मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? 

उत्तर : कन्याकुमारी


5. भारतातील कोणत्या राज्यात सूर्य प्रथम उगवतो? 

उत्तर : अरुणाचल प्रदेश


6. इन्सुलिनचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारात केला जातो? 

उत्तर : मधुमेह


7. बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? 

उत्तर : आसाम


8. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते?

उत्तर : व्हिटॅमिन सी


9. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? 

उत्तर : विल्यम बेंटिक


10. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला?

उत्तर : चीन


11. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? 

उत्तर : सिद्धार्थ


12. भारतातील सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? 

उत्तर : अध्यक्ष


13. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो? 

उत्तर : व्हिटॅमिन ए


14. पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे? 

उत्तर : तामिळनाडू


15. गिधा आणि भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहेत? 

उत्तर : पंजाब


16. दूरदर्शनचा शोध कोणी लावला? 

उत्तर : जॉन लॉगी बेयर्ड


17. भारताची पहिली महिला शासक कोण होती? 

उत्तर : रझिया सुलतान 


18. मासे कशाच्या मदतीने श्वास घेतात? 

उत्तर : कल्ले


19. ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही घोषणा कोणी दिली? 

उत्तर : भगतसिंग


20. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कुठे झाले? 

उत्तर : १९१९ इ.स. अमृतसर




● भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम कोणता आहे? 

उत्तर- भारतीय रेल्वे 


● भारतीय रेल्वे किती झोनमध्ये विभागली गेली आहे? 

उत्तर- 18 


● भारतात पहिली ट्रेन कधी धावली? 

उत्तर- १६ एप्रिल १८५३ इ.स 


● भारतातील पहिली ट्रेन कोठे धावली? 

उत्तर- मुंबई आणि ठाणे दरम्यान


● भारतात सर्वप्रथम रेल्वे कोणी सुरू केली? उत्तर- लॉर्ड डलहौसी 


● रेल्वे सेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर- अलाहाबाद, मुंबई, कोलकाता, भोपाळ आणि चेन्नई


● भारतीय रेल्वे नेटवर्कचे आशिया खंडात कोणते स्थान आहे? 

उत्तर- दुसरा


● भारतात सर्वप्रथम रेल्वे कोणी सुरू केली?

 उत्तर- लॉर्ड डलहौसी 


● रेल्वे सेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर- अलाहाबाद, मुंबई, कोलकाता, भोपाळ आणि चेन्नई 


● भारतीय रेल्वे नेटवर्कचे आशिया खंडात कोणते स्थान आहे? 

उत्तर- दुसरा 


● भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना केव्हा झाली? 

उत्तर- 1905 मध्ये 


● जगातील पहिली ट्रेन कधी धावली? 

उत्तर- इ.स. १८२५, इंग्लंड 


● भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती ?

उत्तर - समझौता एक्सप्रेस


● जगातील पहिली ट्रेन कधी धावली? 

उत्तर- इ.स. १८२५, इंग्लंड 


खटल्यांचे वर्गीकरण


💥 प्रस्तावनेसंदर्भातील खटले

1. बेरुबारी यूनियन वि. भारतीय संघ (1960)

2. गोलखनाथ वि. पंजाब राज्य (1967)

3. केशवानंद भारती वि. केरळ राज्य (1973)

4. इंदिरा नेहरू गांधी वि. राजनारायण (1975) 

5. मिनर्वा मिल वि. भारतीय संघ (1978)


💥घटनादुरुस्ती संदर्भातील खटले

▪️कलम 368

1. शंकरी प्रसाद वि. भारतीय संघ (1951)

2. सज्जन सिंग वि. राजस्थान (1954)

3. गोलकनाथ वि. पंजाब राज्य (1967) 

4. केशवानंद भारती वि. केरळ (1973)


💥मूलभूत हक्कांसंदर्भातील खटले

1. ए. के. गोपालन वि. मद्रास राज्य (कलम 13) (1950)

2. चंपकम दोराइराजन वि. मद्रास राज्य (कलम 15) (1951)

3. इंद्रा सहानी वि. भारतीय संघ (कलम 15) (1993)

4. मनेका गांधी वि. भारतीय संघ (कलम 21) (1978)

5. एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (कलम 25 ते 28) (1994)


💥आणीबाणी संदर्भातील खटले

▪️कलम 352 ते 360

1. मिनव्हा मिल वि. भारतीय संघ (1980)

2. एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (1994)


👉 यापूर्वी आपण basic structure संदर्भात सर्व खटले दिलेले आहेत ते सुद्धा परीक्षेपूर्वी वाचून घ्या.

आरक्षणासंबंधीचे महत्वाचे खटले

✅ श्रीमती चंपकम दोराईजन वि. मद्रास राज्य (1951)

👉 जाती आधारित आरक्षण घटनेच्या कलम 15 (1) चे उल्लंघन करते.


✅ एम. आर. बालाजी वि. म्हैसूर राज्य (1962)

▪️शासनाच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी 68% इतक्या आरक्षणास अत्याधिक व वास्तव मानन्यात आले.


✅ इंद्र सहानी वि. भारतीय संघ (1992)

👉 घटनेने सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाला मान्यता दिली परंतु आर्थिक मागासलेपणाला नाही. 

👉 सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा नोकऱ्यांमध्ये OBC साठी आरक्षण कायम ठेवले परंतु क्रिमीलेअरला वगळण्यास सांगितले.


✅ अखिल भारतीय शोसित कर्मचारी संघ (रेल्वे) वि. भारतीय संघ.

▪️50% आरक्षणापेक्षा जास्त पदांच्या निवडीमध्ये रेल्वे बोर्डाचा "कॅरी फॉरवर्ड नियम" कायम ठेवला जाईल, (परंतु तो काही विशिष्ट स्थितीमध्ये) बढतींमध्ये आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही.


✅ एम. नागराज आणि इतर वि. भारत संघ (2006)

▪️77 व्या दुरुस्तीची घटनात्मकता कायम ठेवली. परंतु सुप्रीम कोर्टने भरतीतील आरक्षण मान्य केले आणि प्रतिनिधित्व कमी असल्याने संख्यात्मक माहिती देणे गरजेचे आहे असे सांगितले तसेच मागासलेपणा सिद्ध करावा लागेल आणि कामाची कार्यक्षमता कमी होता कामा नये.


✅ बी. के. पवित्रा वि. कर्नाटक राज्य (2019).

कर्नाटक शासनाचा बढतीतील आरक्षणाचा नियम योग्य ठरवला आणि कलम 335 मधील कामातील गुणवत्तेचा मुद्दा जो नागराज खटल्यात महत्त्वाचा मानला गेला होता, त्यात सुप्रीम कोर्टने बदल करून म्हटले की गुणवत्तेसोबतच संविधानातील मूल्ये व ध्येये पूर्ण करणेही आवश्यक आहे. (कर्नाटक शासनाने कमी प्रतिनिधित्वाची संख्यात्मक माहिती दिली होती.)

भारतीय संविधानाची निर्मिती

📜 कॅबिनेट मिशन योजना:

- एकूण जागा: ३८९

  - ब्रिटिश भारत: २९६ जागा (२९२ जागा ११ राज्यपाल प्रांतांमधून, ४ मुख्य आयुक्त प्रांतांमधून)

  - संस्थाने: ९३ जागा (मुस्लिम लीग सदस्यांच्या माघारीमुळे ७० जागा)


---


🏛️ संविधान सभेची रचना:

- मूळ जागा: २९९

- ब्रिटिश भारत प्रांत: २२९ जागा

- संस्थाने: ७० जागा


---


⚖️ सार्वभौम संस्था:

- पूर्णपणे सार्वभौम आणि विधायी अधिकार असलेली संस्था.

- अध्यक्षता करणारे:

  - विधायी सत्र: जी.व्ही. मावळंकर

  - संविधान सत्र: डॉ. राजेंद्र प्रसाद


---


🗓️ महत्वाच्या तारखा:

- पहिलं सत्र: ९ डिसेंबर १९४६

- अंतिम सत्र: २४ जानेवारी १९५०

- स्वीकारणे: २६ नोव्हेंबर १९४९

- अंमलबजावणी: २६ जानेवारी १९५०


---


📝 मसुदा समिती:

- अध्यक्ष: डॉ. बी.आर. आंबेडकर

- सदस्य:

  - एन. गोपालस्वामी आयंगार

  - अलादी कृष्णस्वामी अय्यर

  - डॉ. के.एम. मुंशी

  - सैयद मोहम्मद सादुल्लाह

  - एन. माधव राव

  - टी.टी. कृष्णमाचारी


---


📘 संविधानाची माहिती:

- प्रारंभिक सामग्री: उद्देशिका, ३९५ कलमे, ८ अनुसूचियां

- सभेचे अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद

- उपाध्यक्ष: एच.सी. मुखर्जी, वी.टी. कृष्णमाचारी

- तात्पुरते अध्यक्ष: डॉ. सच्चिदानंद सिन्हा

- प्रतीक: 🐘

- संवैधानिक सल्लागार: बी.एन. राव

- सचिव: एच.व्ही.आर. आयंगार

- मुख्य मसुदाकार: एस.एन. मुखर्जी

- कॅलिग्राफर: प्रेम बिहारी नारायण रायझादा

- सजावट: नंदलाल बोस, ब्योहर राममनोहर सिन्हा


---


🗳️ मतदान आणि प्रतिनिधित्व:

- मुसलमान, शीख, आणि सामान्य श्रेणींना जागा वाटप.

- प्रातिनिधिक मतदान प्रणालीद्वारे मतदान.

- संस्थानामधून नामांकित सदस्य होते.


प्रमुख नेमणुका

 🚩1. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक(CAG) – गिरीश चंद्र मुर्मू (14 वे)


🚩2.  भारताचे लेखा नियंत्रक (CGA) – श्री एस.एस. दुबे (24वे)


🚩3. भारताचे ऍटर्नी जनरल- आर वेकेटरामानी


🚩4. भारताचे सॉलिसिटर जनरल – तुषार मेहता


🚩5. संरक्षण प्रमुख (CDS) – अनिल चौहान


🚩6. इस्रोचे अध्यक्ष- एस सोमनाथ (10वे)


🚩७.  नौदलाचे अध्यक्ष अॅडमिरल आर. • हरी कुमार (२५वे)


🚩८.  वायुसेना प्रमुख – विवेक राम चौधरी (२७वे)


🚩९. लष्करप्रमुख – मनोज पांडे (२१ वे)


🚩१०.  भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष – शक्तिकांत दास (२५वे)


🚩11. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (५०वा)


🚩12.  15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – एन. ऑफ. सिंह


🚩१३.  भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार (२५वे)


🚩14.  नीती आयोगाचे CEO – B•V•R सुब्रमण्यम


🚩15.  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा – रेखा शर्मा


🚩16. विधी आयोगाचे 22 वे अध्यक्ष – ऋतुराज अवस्थी


🚩17.  नीती आयोगाचे उपाध्यक्ष – डॉ. सुमन के बेरी


🚩18.  लोकसभा अध्यक्ष – ओम बिर्ला (17वे)


🚩19.  रेल्वे बोर्डाच्या सीईओ/महिला अध्यक्षा – जय वर्मा सिन्हा


🚩20. FTII भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था – आर माधवन


🚩21. भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक – राकेश पाल 


आणीबाणी


1. आणीबाणीचे प्रकार

   - कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी (युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड).

   - कलम 356: राष्ट्रपती राजवट (राज्य शासन).

   - कलम 360: आर्थिक आणीबाणी (आजपर्यंत लागू नाही).


2. घोषणेसाठी आधार

   - भारताची सुरक्षा: 

   - 42 वी घटनादुरुस्ती: विशिष्ट भागात आणीबाणी.

   - 44 वी घटनादुरुस्ती: "आंतरर्गत गोंधळ" चे "सशस्त्र बंड" मध्ये बदल; मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता.


3. न्यायालयीन पुनरावलोकन

   - 38 वी घटनादुरुस्ती: राष्ट्रीय आणीबाणी पुनरावलोकनापासून मुक्त.

   - 44 वी घटनादुरुस्ती: तरतूद हटविली.

   - मिनर्वा मिल्स प्रकरण (1980): आणीबाणीची घोषणा न्यायालयात आव्हान दिली जाऊ शकते.


4. मंजुरी प्रक्रिया

   - संसद मंजुरी: एका महिन्याच्या आत (पूर्वी दोन महिने होते).

   - लोकसभा विसर्जन असल्यास: नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठक पासून 30 दिवस टिकेल, राज्यसभेची मंजुरी आवश्यक.

   - वाढ: दर सहा महिन्यांनी संसदेच्या मंजुरीने अनिश्चित काळासाठी वाढवता येते.


5. मंजुरीसाठी बहुमत

   - एकूण सदस्य: बहुमत आवश्यक.

   - उपस्थित आणि मतदान करणारे: दोन-तृतीयांश बहुमत.


6. राष्ट्रीय आणीबाणीचे रद्दीकरण

   - राष्ट्रपतींचे रद्दीकरण: कधीही शक्य.

   - लोकसभा ठराव: सतत चालू ठेवण्याचे नकार.

   - लेखी सूचना: एक-दशांश सदस्यांनी सूचना द्यावी; 14 दिवसांत विशेष बैठक बोलवावी.

   - साधे बहुमत: नकारासाठी.


7. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम

   - केंद्र-राज्य संबंध: कार्यकारी, विधायी, आर्थिक बदल.

   - आयुष्य वाढ: लोकसभा आणि राज्य विधानमंडळांचे कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.

   - मूलभूत अधिकार:

     - कलम 19: स्वयंचलित निलंबन (कलम 358).

     - कलम 32: राष्ट्रपतींच्या परवानगीने निलंबन (कलम 359).


8. ऐतिहासिक उदाहरणे

   - 1962, 1971, 1975: राष्ट्रीय आणीबाणी घोषित.

इतिहासातील महत्वाच्या परिषदा


[A] वि. रा. शिंदे


1) अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, मुंबई 1918

- अध्यक्ष = सयाजीराव गायकवाड

- स्वागताध्यक्ष = न्या. चंदावरकर

- प्रमुख उपस्थिती= लोकमान्य टिळक, भुलाभाई देसाई, बिपिनचंद्र पाल 


2) अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, नागपूर 

डिसेंबर 1920

- अध्यक्ष = म. गांधी

- प्रमुख उपस्थिती = मोतीलाल नेहरू, सरदार पटेल, सरोजिनी नायडू 


3) मुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणे 1928


4) वाळवे तालुका शेतकरी परिषद, वाळवे 1931

- वि. रा. शिंदे अध्यक्ष


5) चांदवड तालुका शेतकरी परिषद, चांदवड 1932


[B] राजर्षी शाहू महाराज

1) खामगाव मराठा परिषद 1917 चे अध्यक्ष


2) पीपल्स युनियन सभा 1918 चे अध्यक्ष


3) कुर्मी क्षत्रिय परिषद, कानपूर 1919 ला उपस्थिती

- याच परिषदेत शाहू महाराजांना 'राजर्षी' पदवी दिली.


4) दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद, माणगाव 

मार्च 1920

- अध्यक्ष = डॉ बाबासाहेब आंबेडकर

- प्रमुख पाहुणे व परिषदेसाठी पुढाकार = शाहू महाराज 


5) अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, नागपूर

मे, जून 1920 

- अध्यक्ष = शाहू महाराज

- स्वागताध्यक्ष = बाबू कालीचरन नंदागवळी

- सचिव = गणेश गवई व किसन फागोजी बनसोडे


6) अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद, दिल्ली 1922

- अध्यक्ष = शाहू महाराज

- आयोजन = गणेश गवई


7) मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परिषद, पुणे 1923

- अध्यक्ष = धनजी कूपर

- याच परिषदेत 'अस्पृश्य' ऐवजी 'आदी हिंदू' शब्द वापरला

मुडीमन समिती (१९२४) (१०० वर्ष पूर्ण)


ब्रिटिश सरकारने सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नेत्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि 1920 च्या दशकाच्या सुरुवातीला स्वराज पक्षाने मांडलेला ठराव लक्षात घेऊन एक समिती स्थापन केली होती. त्यात रॉयल कमिशन नेमण्याची शिफारसही केली होती.ब्रिटिश सरकारने सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती जी भारतीय नेत्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि स्वराज पक्षाने 1920 च्या दशकाच्या सुरुवातीस स्वीकारलेल्या ठरावाच्या अनुषंगाने मुद्दीनमन समिती म्हणून प्रसिद्ध होती. या समितीत ब्रिटीश सदस्यांव्यतिरिक्त चार भारतीय सदस्य होते.


समितीचे भारतीय सदस्य

1. सर शिवस्वामी अय्यर

2. डॉ.आर.पी. परांजपे

3. सर तेजबहादूर सप्रू

4. मोहम्मद अली जिना


1919 च्या भारतीय परिषद कायद्यांतर्गत 1921 मध्ये स्थापन केलेल्या घटनेच्या कामकाजाबाबत संविधानावरील द्वैतप्रश्नाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यामागील संकल्पना. हा अहवाल 1925 मध्ये सादर करण्यात आला होता ज्यामध्ये दोन भाग होते- बहुसंख्य आणि अल्पसंख्याक अहवाल.


मुडिमन समितीच्या शिफारशी

1. Diarchy ची निंदा केली आणि गैर-अधिकृत भारतीयांच्या कर्तव्यात किरकोळ बदल करण्याची शिफारस केली.

2. 1919 च्या भारत सरकार कायद्याच्या संरचनेत मूलभूत बदलांची शिफारस.

त्यामुळे रॉयल कमिशन नेमण्याची शिफारस केली. भारताचे राज्य सचिव लॉर्ड बर्कनहेड म्हणाले की, बहुमताच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल.

महत्वाचे प्रश्नसंच

 1. भिल्लांचा उठाव कोठे झाला?

Answer: खानदेश


2. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशी वर आधारित आहे?

Answer: रॅली कमिशन


3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1887 च्या मद्रास  अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

Answer: बद्रुद्दिन तय्यब्जी


4. सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?

Answer: ॲनी बेझंट


5. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

Answer: ढाका


6. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली

Answer: लॉर्ड कर्झन


7. कोणत्या देशातील प्रतिक्रियांमुळे भारतात खिलापत चळवळ सुरू झाली?

Answer: तुर्कस्तान


8. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाची संबंधित होता

Answer: नीळ


9. खालीलपैकी कोण भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते?

Answer: एम एन रॉय 


10. इंडिया हाऊस ची  स्थापना कोणी केली

राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर


◾️ठिकाण - विज्ञान भवन , नवी दिल्ली

◾️दिनांक - 11 डिसेंबर 2025

◾️विविध श्रेणीतील 45 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

◾️एकूण 46 कोटी रुपयांची बक्षीस दिले गेले

◾️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण 

◾️राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सहसा दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो

◾️या वर्षी स्पर्धेत 1.94 लाख ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला, ज्यामध्ये 42 पुरस्कार विजेत्या पंचायतींपैकी 42% महिलांचे नेतृत्व होते

◾️या कार्यक्रमात पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी ‘पुरस्कार प्राप्त पंचायतांचे कार्य: सर्वोत्तम प्रथा’ या पुस्तिकेचे अनावरण केले. 


🏆राज्यांच्या नुसार क्रमांक 

1️⃣पहिला क्रमांक - ओडीसा आणि त्रिपुरा (7 पुरस्कार)

2️⃣दुसरा क्रमांक - महाराष्ट्र (6 पुरस्कार)

3️⃣तिसरा क्रमांक - आंध्रप्रदेश ( 4 पुरस्कार)

3️⃣चौथा क्रमांक - बिहार आणि हिमाचल (3 पुरस्कार)

💘 पुरस्काराच्या श्रेणी कोणत्या आहेत 

1】दीनदयाळ उपाध्याय पंचायत सातत विकास पुरस्कार (DDUPSVP)

2】नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत विकास पुरस्कार

3】ग्राम उर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार

4】कार्बन न्यूट्रल विषेश पंचायत पुरस्कार

5】पंचायत क्षेत्र निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार

💘 6 पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी


1️⃣मान्याचीवाडी ग्रामपंचायत- नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार प्रथम क्रमांक (1.5 कोटी)

2️⃣मान्याचीवाडी ग्रामपंचायत - ग्राम उर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार श्रेणीत प्रथम क्रमांक (1 कोटी)

3️⃣बेला ग्रामपंचायत- कार्बन न्यूट्रल श्रेणीत प्रथम (1 कोटी)

4️⃣मोडाळे ग्रामपंचायत(नाशिक) - स्वच्छ व हरित पंचायत (तृतीय क्रमांक)

5️⃣यशदा अकादमी (पुणे) - पंचायत क्षमतानिर्माण  सर्वोत्तम संस्थान या श्रेणीत तृतीय क्रमांक (50 लाख)

6️⃣तितोरा पंचायत (जिल्हा गोंदिया) - सर्वोत्कृष्ट ब्लॉक पंचायत


व्यवस्थित वाचा महत्वाचा पुरस्कार आहे , एकदम सोपं करून दिल आहे ⭐️

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...