Saturday, 21 September 2024

समोर परीक्षेची तारीख ही नाही;अभ्यास ही होत नाही..

अजून ही combine 24 चे वेळापत्रक आलेले नाही.त्यामुळे बरेच जण वेळापत्रक येईपर्यंत मुख्यचा अभ्यास करावा का? अभ्यास होत नाहीये इ. बद्दल विचारत आहेत.त्यासाठी माझे वैयक्तिक मत देत आहे.

पुर्व परिक्षेबद्दल जरी आणखी काहीही अधिकृत घोषणा नसली तरी मला अस वाटत की पूर्वचाच
अभ्यास सुरू राहू द्या.लक्षात घ्या,आता मुख्य चा पेपर-2 हा पूर्वच्या पेपर सारखा आहे.त्यामुळे तुम्ही जो अभ्यास करताय तो मुख्य परीक्षेसाठी करताय अस समजून चला.
आता पूर्व चा इतका जबरदस्त अभ्यास करा की पूर्व मध्ये 65+ पडणार आणि प्रथम उत्तरतालिका आली की लगेच मुख्यच्या अभ्यासाला लागायचं.
लक्षात घ्या,जर पूर्व मध्ये परत काठावर गुण मिळाले तर त्या इतकी दोलायमान परिस्थिती नसते.सारखं वाटतं,होईल की नाही,प्रत्येक क्लासेस चे दररोज कट ऑफ बघा,मग अश्यात एक दिवस अभ्यास होतो,तर एक दिवस होणार नाही.. काय होईल...होईल की नाही..सारखं तेच ते मनात घोळत असत.सोडता ही येत नाही आणि करायची इच्छा ही होत नाही. जरी पूर्व उत्तीर्ण झालोच तरी निकाल ऐन परीक्षेच्या तोंडावर लागलेला असतो म्हणून अभ्यास ही नीट झालेला नसतो,त्यामुळे अंतिमतः निराशाच पदरी येते. या उलट ज्यांना 60+ गुण असतील त्यांचा एक ही दिवस वाया जात नाही.त्यांना कोणता कट ऑफ prediction, दुसरी उत्तरतालिकेने माझे गुण कमी झाले मग???? हे असलं काहीच बघायचं टेन्शन नसत.त्यामुळे जास्त अभ्यास होतो.
मला माहित आहे तुमच्या पैकी बरेच जन थोड थंड पडले असतील,ते साहजिक आहे.कारण समोर निश्चित तारीख (Dead End) नसल्यामुळे अभ्यास हा हवा तितका होतच नाही. परीक्षा पुढे जात आहे ती एक संधी समजा.पूर्व चा चांगला अभ्यास करा म्हणजे मुख्य च्या पेपर -2 ची आताच तयारी होईल आणि पूर्व झाली की पूर्ण वेळ मराठी इंग्रजी ला देता येईल आणि यावेळी खात्रीने निकाल येईल.
बरेच जण अमुक अमुक तास अभ्यास झाला नाही तर निराश होऊन जाता.मग अश्यात आपसूकच इतरां सोबत बरोबरी होते,तो किती तास अभ्यास करतो, माझं इतक्या कमी अभ्यासात होईल की नाही... वगैरे वगैरे...!?
लक्षात घ्या..एखाद्या दिवशी एकदम चांगला अभ्यास होतो,एखाद्या दिवस कमी होतो,एखाद्या दिवशी अजिबात होत नाही, अश्या वेळी हिरमसून न जाता अभ्यास करत राहायचा.सर्वांचा असा वेळ जात असतो, शेवटी आपण सर्वच homo sapiens कुळातील आहोत,यंत्र मानव नाहीत की दररोज अमुक अमुक तास काम होईलच.
शेवटी तुम्ही दररोज,जीव लावून,जितकं होतील तितके सर्वोत्तम मनातून प्रयत्न करताय ना...? ते महत्वाचं आहे...एक गोष्ट कायम लक्षात घ्या की बदलत्या परिस्थिती नुसार आपल्याला बदलता आला पाहिजे.म्हणजे काय तर आता परीक्षेची तारीख समोर नसताना आपण पूर्वी सारखा अभ्यास होणार नाही हे पहिले मान्य केला पाहिजे.
Its absolutely OK Not to be OK.
आपण सर्व सारखेच आहोत.आता जो राज्यात पहिला येणार आहे 2024 मध्ये त्याचा पण इतक्या जोश मध्ये अभ्यास होत नसणार,कारण तो सुद्धा एक माणूस आहे. तर सांगायचा उद्देश हाच की मान्य करा की माझा 10-12 तास अभ्यास होणार नाही.हरकत नाही.मी पण कोरोना च्या काळात तयारी करताना हे मान्य केलेलं.मग मी सकाळी लवकर उठून अभ्यास करून घ्यायचो दुपार पर्यंत..4/6/8 तास अभ्यास व्हायचा आणि मग उरलेला वेळ Group Discussion साठी द्यायचो.तुम्ही ही तस करू शकता.ज्यांचा होत नाहीये त्यांच्यासाठी खालील बदल करून बघा,जमतंय का..

1.नवीन काही तरी वाचा.उदा. PYQ prelims explanation च पुस्तक घेऊन ते संपवून टाका.
2. जे राज्यसेवा करताय ते हा वेळ Maths करा थोड्यावेळ आणि जे Combine करत आहेत ते PYQ expln book मधून पर्यावरण,प्राचीन मध्ययुगीन करू शकता.(दोन्ही पूर्व देणार असाल तरच)
3. चालू घडामोडी संपवून टाका.
4.दुसरा जो विषय राहिला आहे तो करायला घ्या.नवीन पुस्तक घ्या,ते चाळा.
5.जास्तीत जास्त Group discussion करा.
यावेळी तुम्ही तुमचं सर्वोत्तम दिल तर गुलाल 100% पक्का आहे. फक्त स्वतः वर विश्वास ठेवा.आता पर्यंत झाला तो झाला time pass.. आता राहिलेल्या दिवसांसाठी Lions Attitude ने fight द्या.🦁🔥
कधी कमी अभ्यास होईल,कधी जास्त,परंतु अभ्यास होणं गरजेचं,त्याहून महत्त्वाचं प्रयत्न करण गरजेचं आहे.एक होता कार्व्हर पुस्तकात मार्टिन लुथर किंग यांची ओळख झाली होती.नंतर कालांतराने त्यांच्या विषयी एका मासिकात आणखी वाचण्यात आले.
त्यांचे बरेच वाक्य गाजलेले आहेत.त्यापैकी माझ्या सर्वात आवडत्या वाक्याने शेवट करतो..

यदि आप उड़ नहीं सकते हो, तो दौडो  
यदि दोड़ नहीं सकते हो, तो चलो।
यदि चल भी नहीं सकते हो, तो रेंगो
लेकिन हमेशा आगे बढ़ते रहो...🔥

विजयी भव✨